Skip to main content

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो !

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 08/02/2017 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप औलीया आहे याची साक्ष देणारी ही एक सुरेख कविता ! स्वच्छंद जगण्याची आदीम उर्मी प्रत्येकाच्या अंतरी आहे पण रोजच्या जगण्यात ती हरवून गेलीये. स्वानंद किरकिरेची शायरी रांचो नांवाच्या स्वछंदाला शोधतांना हृदयस्पर्शी होते आणि डोळ्यात पाणी तरळवून जाते.... बहती हवा सा था वो, उड़ती पतंग सा था वो, कहाँ गया उसे ढूँढो हम को तो राहें ही चलती वो खुद अपनी राह बनता गिरता संभालता, मस्ती में चलता था वो | हमको कलकी फिकर सताती, वो बस आज का जश्न मनाता, हर लम्हें को खुल के जीता था वो | कहाँ से आया था वो छू के हमारे दिल को कहाँ गया...उसे ढूँढो | स्वानंद म्हणतो आम्हाला रोजचा दिनक्रमच चालवतो, पण तो स्वतःचा दिवस मांडतो. आम्ही उद्याच्या चिंतेत जगतो, तो हरेक आजचा उत्सव करतो आणि हर क्षणाला साहसानं सामोरं जातो. झेन मास्टर रिंझाई या स्वच्छंदाचं वर्णन, केवळ दोनच शब्दात करतो `लिव्ह डेंजरसली !' आणि संदीप त्याच्या स्वच्छंदाचा माहौल रंगवतांना म्हणतो : मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो ! ही कविता संदीपनं स्वत: गायलीये कारण ते त्याचं स्वत:चंच वर्णन आहे. त्यानं प्रत्येक कडव्यापूर्वी कव्याचं विवरणही केलंय त्यामुळे हे रसग्रहण म्हणजे एका अर्थानं संदीपशी केलेली जुगलबंदी आहे. तो कवितेतून स्वत:ला खोलतोयं आणि मी गद्यातून स्वच्छंदाचा माहौल उभा करण्याचा यत्न करतोय. संदीप म्हणतो ही आपल्यातल्याच दोन मींची कविता आहे. मला वाटतं, हा एका स्वच्छंद गवसलेल्याचा रोजच्या जगण्याचा अंदाज़ आहे. एकदा स्वच्छंद गवसला की चौकटीत जगणारं असं कुणी राहातच नाही. रोज तेचते जगण्याची वृत्ती, सुरक्षितचौकटीत जगण्याची सवय आणि किरकोळ गोष्टींनी व्यथित होणं संदीप किती सुरेखपणे मांडतो. सहज भिडणारी रुपकात्मकता रसिकाला संदीपच्या अनुभवाशी तत्क्षणी रिलेट करते. जुनाट दार आणि किरकिरा बंदी ही धारणात बांधली गेलेली मानसिकता आहे, जी मोकळा श्वासच घेऊ देत नाही. स्वानंद म्हणतो तसा ‘एक कहानी ख़तम तो, दुजी शुरु हो गई मामू !’ असा जगण्याचा पॅटर्न होऊन बसतो. संदीप ती स्थिती ‘बिजागरीशी जीव गंजवत बसतो’ अशी मांडतो आणि शेवटच्या ओळीत तर कहर करतो...तो लंघून चौकट पार निघाया बघतो ! ही चौकट म्हणजे भीती आहे. आणि ती भीती दुहेरी आहे. मूळात जे भय आहे ते शारीरिक म्हणजे मृत्यूचं आहे आणि मानसिक भय इज्जतीचा कधीही फालुदा होण्याचं आहे. या दोन भयांना जो पार करतो तो चौकट लंघून जातो, स्वच्छंद होतो. मी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो तो लंघून चौकट पार निघाया बघतो ! मग या रोजमर्राच्या जिंदगीत वरुन कितीही हसतमुख दिसलो तरी आत कधीही भडका होईल असा संताप धगधगत असतो. इन अ वे, व्यक्तीमत्त्वाच्या जगण्याला हा उन्हाचा शाप आहे. आणि ज्याला स्वच्छंद गवसला तो याच उन्हाचे दागिने घडवतो ! तीच रिलेशनशिप्सची गुंतागुंत, त्याच आर्थिक विवंचना, तेच दैहिक प्रश्न, पण चौकट लंघून गेलेला त्यांची दाहकता सूर्यफुलात रुपांतरित करतो. डोळ्यांत माझिया सूर्याहुनी संताप दिसतात त्वचेवर राप, उन्हाचे शाप ! तो त्याच उन्हाचे झगझगीत, लखलखते- - घडवून दागिने सूर्यफुलांवर झुलतो !! यशस्वी झालो तरच खरा जगलो ही मानसिकता अस्तित्वाविरोधात लढा उभा करते. प्रत्येक अडचण काच होते आणि रडीचा का होईना डाव खेळून जिंकण्याची इर्ष्या निर्माण करते. पण निसर्गदत्त महाराज म्हणतात तसा ‘स्व कायम विजयी आहे’ कारण तो दुसर्‍याच्या विजयात स्वत:ची हार मानत नाही तर ते त्याचं कौशल्य मानतो, त्याला दाद देतो. आणि मग ती हार सुद्धा त्याला आनंद देऊन जाते कारण तो नवं काही तरी शिकलेला असतो. मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो मी डाव रडीचा खात जिंकतो अंती तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो ! आस्तिक देवावर भरोसा ठेवून असतो आणि तो सदैव आपल्याच पाठीशी उभा राहावा म्हणून नवस-सायास करतो. ‘तो’ आपल्या मनाजोगतं घडवेल या भाबड्या आशेपायी वेळातवेळ काढून भक्ती करतो. पण स्वच्छंद जगणार्‍याला दान काय पडेल याची फिकीर नसते, त्याचा सगळा रस खेळण्यातच असतो. या निर्वेध चित्तदशेमुळे आणि अशा बहुआयामी विश्वात, आपली व्यक्तिगत इच्छा रेटणं व्यर्थ आहे हे उमगल्यानं, तो अस्तित्वाशी कायम समरुप असतो. असं जगणं मग कृतार्थ होतं आणि अस्तित्वाचा धन्यवाद घेऊन जातं. मी आस्तिक ! मोजत पुण्याईची खोली नवसांची ठेवून लाच, लावतो बोली ! तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन्‌ 'धन्यवाद' देवाचे घेऊन जातो !! ज्या काव्याला अध्यात्मिक आयाम नाही ते फार सुपरफिशियल होतं. संदीप त्याचं अध्यात्मिक आकलन कवितेत आणतोच आणि त्यामुळेच तर त्याची कविती मिस्टीकल होते. चौकटीत जगणार्‍याला स्यूडो अध्यात्माचा मोठा आधार असतो. म्हणजे ‘तत् त्वं असी’ किंवा फारच डेरींग असेल तर ‘अहं ब्रह्मास्मी’ असे काही फंडा मनातल्या मनात रिपीट करत तो जगत असतो. शिवाय हे फंडे प्रसंगानुरुप बदलत असतात. या मानसिकतेला संदीप म्हणतो...मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार ! पण हे इतकं वरवरचं असतं की आतला चेहरा तसाच भेसूरच राहातो, कारण व्यक्तीमत्त्वातून सुटका झाल्याखेरिज तो बदलणार तरी कसा? स्वच्छंद जगणारा आकाश झालेला असतो ! त्याचं सगळं जगणं मोरपंखी झालेलं असतं. आणि या स्थितीचं वर्णन संदीप असं काही कमालीचं लोभस करतो की त्याच्या प्रतिभेचा केवळ हेवा वाटतो !...तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही, त्या शामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !! मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार लपतो न परि चेहरा आत भेसूर ! तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही त्या शामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !! मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20032
प्रतिक्रिया 103

प्रतिक्रिया

In reply to by पिलीयन रायडर

सायरनच्या आवाजासरशी जेवायला जाणारा, आणि पैशासाठी नोकरी करणारा माणुसही अत्यंत आनंदी आणि समरसुन जगणारा असु शकतोच. मग चर्चा कशासाठी चाललीये ? माझ्यामते तुम्हाच्याकडे अबोव्ह अ‍ॅव्हरेज बुद्धिमत्ता आणि पैसा आहे म्हणुन तुम्हाला बहुसंख्य सामान्यांचे प्रश्न लक्षात येत नाहीत. अजिबात नाही ! स्वच्छंद जगायला साहस लागतं आणि एकदा मनसोक्त जगायला लागलं की समोर येणार्‍या प्रश्नाची उत्तरं लगोलग मिळतात. ते प्रश्न राहात नाहीत, तो चॅलेंज होतो. स्वतः चा बचाव करत राहाणारी व्यक्ती फक्त साहस न करण्यासाठी कायम कारणं शोधत राहाते.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्हीच तर ९-५ वाल्यांवर प्रश्न उपस्थित करताय. की बाबांनो तुम्हाला वाट्टेल तेव्हा उठता येतं का? वाट्टेल तितकं उशीरा जागता येतं का? वगैरे वगैरे.. म्हणुन चर्चा चालली आहे. असो... मी थांबते... धन्यवाद!

In reply to by पिलीयन रायडर

पण ९ ते ५ चा विषय कशामुळे निघाला ते पाहा, म्हणजे तुमचा परत हिणवणं वगैरे गैरसमज व्हायला नको. एकसुरी वर्किंग डेला सामोरं जाण्यापेक्षा वर्किंग डे एकसुरीच न होऊ देणे म्हणजे स्वछंद नव्हे का? याचा अर्थ हप्रनां ९ ते ५ एकदम स्वच्छंदी करता आलंय असा त्यांचा दावा होता, म्हणून स्वच्छंदाच्या डिटेल्स मागितल्या इतकंच.

In reply to by संजय क्षीरसागर

हप्र म्हणत आहेत की नोकरी असुनही स्वच्छंद होता येईल, आहे तो दिवस आनंदानी जगता येईल. तर तुम्ही त्याला वरचे प्रश्न विचारुन काऊंटर केलंत की ९-५च्या बंधनात अडकुन ते शक्य नाही. म्हणुन मी तुम्हाला काऊंटर केलं की असं बंधन असणं आणि तरीही स्वच्छंदी असणं शक्य आहे (जे की हप्र सुद्धा म्हणत आहेत). तर तुम्ही म्हणताय की मग चर्चा का करतोय आपण? हो किंवा नाही मध्ये एका प्रश्नाचं उत्तर दिलंत तर हा मुद्दा निकाली लागेल. ९-५ नोकरी करणारा मनुष्य स्वच्छंदी होऊ शकतो का?

In reply to by पिलीयन रायडर

असा दुहेरी खेळ चालवलायं. स्वच्छंदीपणाच्या मुळात अशा व्याख्या असणं हेच किती बोरिंग आहे... स्वेच्छेनं काम करणं ही कल्पना तुम्हाला बोरींग वाटते ना ? तद्वत ९ ते ५ मधे माणूस स्वेच्छेनं जगतो ही कल्पना मला हास्यास्पद वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

अहो, त्याची काही आखीव रेखीव 'संक्षिकृत' व्याख्या असणं बोअरींग वाटते असे म्हणल्या त्या.. तुमच्या मूळ कल्पनेला त्यांचा पाठिंबाच आहे असे दिसतंय.. (सॉरी, मध्येच टपकतोय...)

In reply to by संदीप डांगे

आता इतकं समजुन घेतलं दुसर्‍याचं तर त्यांना संक्षी का म्हणावं!! संक्षी, रात्री बेरात्री जागुन शकणारा, सकाळी वाट्टेल तेवढा झोपु शकणारा, ९-५ मध्ये न अडकलेला... असल्या व्याख्या तुम्ही करताय. त्या मला पटत नाहीत, असो.. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कधी देणार? हो किंवा नाही मध्ये...

In reply to by संजय क्षीरसागर

स्वेच्छेनं काम करणं ही कल्पना तुम्हाला बोरींग वाटते ना ?
नीट वाचत चला हो.
तद्वत ९ ते ५ मधे माणूस स्वेच्छेनं जगतो ही कल्पना मला हास्यास्पद वाटते.
म्हणजे उत्तर "नाही" आहे तर. एकंदरित स्वच्छंदी होऊन जगायला व्यवसायच केला पाहिजे, कारण नोकरी करणारा माणुस ९-५ मध्ये अडकल्याने स्वच्छंदी होऊ शकत नाही. तुमच्या स्वच्छंदीपणाच्या कल्पना तुमच्यापुरत्याच बरोबर आहेत. जमल्यास इतरांना त्याच तराजुत तोलु नका. लोक तुम्हाला जे सतत सांगतात की तुम्ही दुसर्‍यांना हिणवता किंवा मुर्खात काढता.. ते हेच.

In reply to by पिलीयन रायडर

माझ्या मते जगता येत नाही कारण सगळा फोकस फक्त कामावरच ठेवावा लागतो इतका साधा मुद्दा आहे. यात मूर्खलेखण्याचा संबंध कुठे आला ? तस्मात, तुम्ही आनंदात असाल तर मला दु:ख होण्याचं काही कारण नाही. स्वछंद जगता येत नाही म्हणजे मूर्ख आणि म्हणून स्वतःला मूर्ख समजणं हा तुम्ही स्वतःपुरता काढलेला निष्कर्श आहे. अर्थात, नोकरदारांनाही स्वच्छंद कसं जगता येईल याच्या ब्रॉड हिंटस मी अभिजीतला वर दिल्या आहेत. मला कुणालाही कमी लेखण्यात रस नाही. तुम्हाला स्वतःला कमी लेखून इतरांची सहानुभूती मिळवायची असेल तर तो तुमचा दृष्टीकोन आहे. मला प्रश्न सोडवण्यात रस आहे. पण इथे काही विद्वान सदस्यांनी अध्यात्माच्या लेखांवर इतकी विद्वत्तापूर्ण शेरेबाजी केली आहे की आता त्या विषयावर लिहीणे नाही. आणि अध्यात्मिक आकलनच व्यक्तीत साहस निर्माण करु शकतं हा अनुभव आहे. पण आता ती संधी येणे नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

पण मी काय म्हणतो, ह्या एवढ्या गहन चर्चेनंतर मला एक प्रश्न पडला आहे. स्वछंदीपणा आणि लहरीपणा यातला फरक काय मग? मला वाटेल तेव्हा आणि लहर आली की लहर पूर्ण करणे म्हणजे लहरीपणा असंच मी आतापर्यंत समजत आलोय.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आणि लहरीपणा म्हणजे कामाच्याबाबतीतली अनास्था. लहरी माणसाची कामं पेंडींग राहातात, त्याच्यावर भरोसा टाकता येत नाही. स्वेच्छेनं काम करणारा एकदा जवाबदारी घेतल्यावर काम पूर्ण करतोच आणि तेही वेळेत. स्वेच्छेनं काम करणारा जर मनात नसेल तर काम नाकारेल, लहरी माणूस काम घेईल आणि मग नंतर गोंधळ घालून ठेवेल. थोडक्यात, लहरीपणा बेजवबदार असतो आणि स्वच्छंदी कायम जवाबदारीनं वागतो.

In reply to by पिलीयन रायडर

एग्झॅक्टली! मी ह्याच प्रश्नावर येणार होतो आता... पण त्यावरही त्यांच्याकडे उत्तर असेल हे माहित आहे म्हणून विचारला नाही. वर माझ्या प्रतिसादात त्या प्रश्नाचे उत्तर आहे. "स्वच्छंद असतो तर नोकरी सोडून व्यवसायिकच झालो असतो". पण मेजॉरिटीला देण्यासारखे उत्तर पर्सनल अनुभवांवरुन देता येत नसते हे मला ठावूक आहे. मला वाटते संक्षिंनी जो नोकरदारांचा सॅम्पल जमवला आहे ज्यावरुन ते आपले निरिक्षण मांडत आहेत, ते संक्षिंकडे फार करवादत असावेत... सगळं आलबेल असतांना उगाच करवादणे हाही काहींचा गुण असतो. त्यातून संक्षिंना आपले व्यवसायिक असल्याने मुक्त असणे खूप भावले असावे. अवांतरः (प्रश्न संक्षिंच्या रोखाने अजिबात नाही हे आधीच नमूद करतो) फार दिवसांपासून मनात एक कुतूहल आहे. मला इथल्या सी-ए लोकांना प्रश्न विचारायचा आहे की बेरोजगार सि-ए, किंवा कमाई करण्यास असमर्थ सी-ए अशी काही परिस्थिती असते काय? म्हणजे आधीच सी-ए लोक इतक्या तगड्या परिक्षेतून तावून सुलाखून पास होत असतात, त्यांना वकिल-डॉक्टर-इंजिनियर-आर्किटेक्ट यांच्यासारखी सनद मिळत असली तरी पास-आउट्सची संख्या मर्यादित असल्याने इतर सनदधारी व्यवसायिकांसारखे संख्यात्मक स्पर्धेला सामोरे जावे लागत नसावे असे वाटते. त्यामुळे कामच मिळत नाही, उपाशी राहायची पाळी आली, सी-ए होऊन फायदा नाही झाला असे होत नसावे. असे काही असते काय? कृपया मार्गदर्शन करावे. म्हणजे आमच्या व्यवसायात तुम्ही कुठून डिग्री घेतली, काय शिकलात ह्याला परफॉर्मन्स पुढे महत्त्व नसते त्यामुळे स्पर्धा भरपूर असते, त्यात लग्जरी व्यवसाय, आले क्लायंटच्या मना तर काम, तर पैसे, तर सगळी मज्जा. तसे सी-एच्या व्यवसायात नसते ना? कम्पलसरी टॅक्सेस भरावेच लागतात. सी-एशिवाय काम होत नाहीच. वगैरे वगैरे.

In reply to by संदीप डांगे

पण मेजॉरिटीला देण्यासारखे उत्तर पर्सनल अनुभवांवरुन देता येत नसते? साहस हे सर्वांसाठी एकच आहे. तुम्ही नोकरीत करता की धंद्यात यानं त्यात फरक पडत नाही. पण साहसाशिवाय स्वच्छंद नाही हे तितकंच नक्की. त्यामुळे कामच मिळत नाही, उपाशी राहायची पाळी आली, सी-ए होऊन फायदा नाही झाला असे होत नसावे. असे काही असते काय? उपाशी राहाण्याचा नाही, कामाच्या स्टाईलचा प्रश्न आहे. माझे सर्वच्या सर्व मित्र अजूनही स्वतःच्या ऑफिसमधे नोकरी केल्यासारखं काम करतात. कारण त्यांना स्टाफसमोर कामसू इमेज राखायची असते. शिवाय क्लायंटचा दट्ट्या असतोच, म्हणजे कामच्या वेळेत हा पिक्चरला गेला तरी ट्रिब्यूनला जातोयं असंच सांगातो. शिवाय सगळा व्यावसाय हा सरकारची मनमानी आणि क्लायंटची टॅक्स भरण्याविषयी नाराजी यातला खेळ आहे, जो इतर कोणत्याही व्यावसायात नाही. थोडक्यात क्वालिफीकेशन आणि स्वच्छंद जगणं यांचा डायरेक्ट संबंध नाही. झाडू मारणारा सुद्धा मनसोक्त जगू शकतो आणि मोस्ट क्वालिइफाइड सुद्धा , बाहेर पडून काही करता येणार नाही म्हणून कॉलेजात छपरी विषय आयुष्यभर शिकवू शकतो.

In reply to by संजय क्षीरसागर

झाडू मारणारा सुद्धा मनसोक्त जगू शकतो आणि मोस्ट क्वालिइफाइड सुद्धा , बाहेर पडून काही करता येणार नाही म्हणून कॉलेजात छपरी विषय आयुष्यभर शिकवू शकतो.
मी तरी अजून वेगळे काय म्हणतोय. झाडू मारणारा कदाचित आळशी असू शकेल, किंवा कॉलेजात छ्परी विषय शिकवण्याची नोकरी पत्करणारे कदाचित त्यांच्या स्वच्छंदाच्या कक्षेतून बघत असतील. आपण कोण आहोत कोणाला जज करणारे? नाही का?

In reply to by संदीप डांगे

तुम्ही हे म्हणतायं ! मला वाटते संक्षिंनी जो नोकरदारांचा सॅम्पल जमवला आहे ज्यावरुन ते आपले निरिक्षण मांडत आहेत, ते संक्षिंकडे फार करवादत असावेत... सगळं आलबेल असतांना उगाच करवादणे हाही काहींचा गुण असतो. त्यातून संक्षिंना आपले व्यवसायिक असल्याने मुक्त असणे खूप भावले असावे. आणि आता मूळ विषय सोडून उगीच असा आपण कोण आहोत कोणाला जज करणारे? नाही का? सेंटी मारतायं. मी कुणालाही जज कलेलं नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आणि सीए व्यावसायाची गोष्ट काढलीये म्हणून सांगतो. ऐकून भल्याभल्यानां फेफरं येईल. व्यावसायिक सिएला ऑलमोस्ट सगळ्या क्लायंटसचं काम वर्षभर करायला लागतं आणि पैसे वर्षातून फक्त एकदाच, म्हणजे रिटर्न भरल्यावर मिळतात. त्यामुळे तुम्ही उगीच मी म्हणतोयं तेच म्हणतायंत वगैरे गैरसमज करुन घेऊ नका.

In reply to by संजय क्षीरसागर

मी काहीही सेन्टी मारलं नाहीहो! तुमच्या काही घट्ट समजुती वाटल्या म्हणून.. कोणीही स्वच्छंदी जगू शकतो, अगदी कोणीही. मग तसंच जगतोय असं कोणीतरी सांगितलं तरी तुम्ही मात्र आपले मत सोडलेले नाही असे क्रेडिटकार्डच्या धाग्यावरच्या चर्चेत दिसलं. तिथेही आप्ण कर्ज असेल तर माणूस स्वच्छंदी (म्हणजे तुमच्यासारखा) जगूच शकत नाही हेच सांगत होतात ना? आता मात्र झाडूवाला, प्रोफेसर अशी जेनेरिक उदाहरणे देऊन स्वच्छंदीपणाला कोणतीही अट नसते हे सांगत आहात. नेमकं काय खरं समजायचं असं झालंय मला. म्हणजे कोणी नोकरदार स्वतः तुम्हाला सांगतोय तरी म्हणताय त्याला स्वच्छंदी जगणे शक्यच नाही, आणि स्वतःचा आता म्हणताय की कोणालाही शक्य आहे.
व्यावसायिक सिएला ऑलमोस्ट सगळ्या क्लायंटसचं काम वर्षभर करायला लागतं आणि पैसे वर्षातून फक्त एकदाच, म्हणजे रिटर्न भरल्यावर मिळतात. त्यामुळे तुम्ही उगीच मी म्हणतोयं तेच म्हणतायंत वगैरे गैरसमज करुन घेऊ नका.
>> म्हणजे? वर्षातून एकदाच मिळतात म्हणजे? त्यात फेफरं येण्यासारखं नक्की काय आहे ते समजलं नाही. जरा विस्तार कराल काय...

In reply to by संदीप डांगे

तिथेही आप्ण कर्ज असेल तर माणूस स्वच्छंदी (म्हणजे तुमच्यासारखा) जगूच शकत नाही हेच सांगत होतात ना? तिथे तुम्ही या विचाराशी सहमत होतात, हे पाहा : इएमआय ही काँस्टंट लाईनीत ठेवणारी गोष्ट आहे. >> अगदी सहमत. माझे तर मत असे आहे की इएमआय ही आधुनिक व्हाईटकॉलर वेठबिगारी आहे. असो. हे माझे वैयक्तिक मत आहे. आता मात्र झाडूवाला, प्रोफेसर अशी जेनेरिक उदाहरणे देऊन स्वच्छंदीपणाला कोणतीही अट नसते हे सांगत आहात. संदर्भ नीट वाचलात तर गोंधळ उडणार नाही. ते मी स्वच्छंद आणि क्वालिफिकेशन या तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलंय. त्यावर मी ठाम आहेच. म्हणजे? वर्षातून एकदाच मिळतात म्हणजे? त्यात फेफरं येण्यासारखं नक्की काय आहे ते समजलं नाही. जरा विस्तार कराल काय... नोकरदाराला जसा महिन्याला पगार मिळतो किंवा इतर व्यावसायात जसं सतत काम आणि पैसे हे चक्र चालू असतं तसं व्यावसायिक सीएच्या प्रोफेशनमधे नसतं. वर्षभर क्लायंट सपोर्ट द्यावा लागतो आणि त्याचं बिलींग इन्कमटॅक्स रिटर्न भरल्यावर म्हणजे वर्षातून एकदाच होतं . तुम्ही तुमच्या सीएला वर्षातून किती वेळा पैसे देता?

In reply to by संजय क्षीरसागर

माझे आजही हेच मत आहे की इएमआय ही आधुनिक व्हाईटकॉलर वेठबिगारी आहे. पण त्यापुढे तुम्ही जे विवेचन करत गेलात ते मात्र मला पूर्णपणे मान्य नाही. आणि तो संदर्भ गृहकर्जाचे इएमआय भरणार्‍यांबद्दल आहे. इएमआय भरण्यासाठीच नोकरी करत राहण्याची गरज पडणे ही वेठबिगारी आहेच. मात्र जसे तिथे काहींनी म्हटले की ते त्यांच्या अ‍ॅबिलिटीनुसार मॅनेजेबल आहे तेव्हा तेही पटले. म्हणजे सरसकट इएमआय हा वाईटच आणि वेठबिगारीच असे म्हणत नाही, माझे मत वर बोल्ड केले आहे. समजा एक लाख पगार असणार्‍याने १२ महिन्याचा २००० रुपये इएमआय घेतला तर तो वेठबिगारी नाही. पण चाळीस हजार कौटुंबिक इन्कम असनार्‍यांनी वीस हजार इएमआय भरणे वेठबिगारी आहे. केस्टूकेस बदलतं ते. मी आपली मते संदर्भासहीत मांडत आहे व सरसकटीकरण टाळत आहे.
ते मी स्वच्छंद आणि क्वालिफिकेशन या तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलंय. त्यावर मी ठाम आहेच.
>> ओके.
नोकरदाराला जसा महिन्याला पगार मिळतो किंवा इतर व्यावसायात जसं सतत काम आणि पैसे हे चक्र चालू असतं तसं व्यावसायिक सीएच्या प्रोफेशनमधे नसतं. वर्षभर क्लायंट सपोर्ट द्यावा लागतो आणि त्याचं बिलींग इन्कमटॅक्स रिटर्न भरल्यावर म्हणजे वर्षातून एकदाच होतं . तुम्ही तुमच्या सीएला वर्षातून किती वेळा पैसे देता?
>> इतरांचे महिन्यावारी, तसे सीएंचं वार्षिक... म्हणजे रेगुलरच ना? ह्यात इर्रेगुलॅरिटी कुठे आहे? फेफरं येईल असं काय आहे ते समजलं नाही. मी वर्षातून समजा दहा लाख कमवत असेल , ते मला रोज थोडे थोडे मिळाले काय, महिन्या-तिमाही-सहामाहिला मिळाले काय किंवा वार्षिक मिळाले काय त्यात फेफरं येण्यासारखं काय आहे ते समजत नाही. वर्षातून एकदा इन्कम ह्या रेगुरॅलिटीच्या अवतीभवतीच आयुष्य गुंफलं असेल ना सीएंचे? जसे नोकरदाराचे महिन्यावारी आणि रोजंदारीवाल्याचे रोजावारी असते तसे? वर्षभर सपोर्ट केल्यावर आता रिटर्न फाइल केल्यावर क्लायंटच्या मर्जीवर पैसे देणं न देणं अवलंबून असतं काय? अनसर्टंटी असायला पाहिजे ना फेफरं येण्यासाठी. ती अनसर्टंटी दिसत नाही यात. तीच शोधत आहे मी.

In reply to by संदीप डांगे

किंवा वार्षिक मिळाले काय त्यात फेफरं येण्यासारखं काय आहे ते समजत नाही. वर्षातून एकदा इन्कम ह्या रेगुरॅलिटीच्या अवतीभवतीच आयुष्य गुंफलं असेल ना सीएंचे? यात अनिश्चितता नाही ? वर्षातून एकदा पैसे अशी सायकल कोणत्या प्रोफेशनमधे आहे सांगाल काय? का उगीच प्रतिसाद ठोकायचा म्हणून चाललंय ?

In reply to by संजय क्षीरसागर

अनिश्चितता नाहीच आहे. आम्हाला महिन्याला १० हजार मिळत असतील तर तुम्हाला वर्षाला एकदाच एक लाख २० हजार मिळत असतील. ह्यात "अनिश्चित" काय आहे? पैसे मिळतात ना? हे म्हणजे रोजंदारीवर काम करणार्‍याला "तुझं बरंय रे.. तुला रोज १० रुपये मिळतात. मला एकदाच महिन्यातुन १० हजार. परत महिनाभर काही नाही." असं म्हणण्या सारखं आहे. आता तुम्ही सीए हे एक अद्भुत प्रोफेशन आहे असंही म्हणायचं आहे का?

In reply to by संजय क्षीरसागर

प्लिज. उगीच प्रतिसाद ठोकायला मी रिकामा नाही. किंवा तुम्हाला वादात हरवायचेच असंही अजिबात नाही. काहीतरी जेन्युइन शंका आहे म्हणून विचारले आहे. मला समजले नाही म्हणून विचारत आहे. मला वर्षातून एकदाच एकहाती, वर्षभर खर्चाला पुरतील असे पैसे खात्रीने मिळत असतील तर त्यात अनिश्चितता कोठे आहे? वर्षभर काम करुनही पैसे मिळण्याची खात्रीच नसेल तर अनिश्चितता आहे. क्लायंट मिळण्याची-टिकण्याची खात्री नसेल तर अनिश्चितता आहे. ही फेफरं आणणारी सिच्युएशन माझ्या व्यवसायात चांगलीच अनुभवली आहे. तसे काही असेल तर खरंच मान्य करतो. महिन्यावारी मिळण्याऐवजी वर्षाकाठी मिळणे ही काही अनिश्चितता होऊ शकत नाही. तसं बघितलं तर मग मासिक-पगार मिळवणारे रोज संध्याकाळी पैसे मिळणार्‍यांना, 'फेफरं येतील तुम्हाला' असं म्हणू शकतात. शिवाय काळ-वेळ हा भ्रम आहे असे आपण नेहमीच म्हणत असता. मला तरी ह्या निश्चिततेत कुठलीही फेफरं येणारी सिचुएशन दिसली नाही. प्लिज एलाबोरेट इफ यु फील इट्स इम्पोर्टन्ट.

In reply to by संदीप डांगे

तुम्ही सीएच्या आर्थिक परिस्थितीची विचारणा केली होती त्यावर मी प्रतिसाद दिला आहे. वर्षातून एकदा पैसे मिळणं हे कुठल्या व्यावसायात आहे याचं तुमच्याकडे उत्तर नाही. आणि जे लिहीलंय ती वास्तविकता आहे त्यामुळे वादात हारण्याचा प्रश्न कुठे येतो ? वर्षातून एकदा मिळणारे पैसे आणि महिन्याला मिळणारे पैसे यातली अनिश्चितता तुम्हाला दिसत नसेल तर माझा नाईलाज आहे. कारण जितका कालावधी मोठा तितकी अनिश्चितता जास्त हे सरळ गणित आहे. शिवाय पैसे हमखास मिळणारच हा तुमचा अंदाज फक्त हॉस्पिटल आणि हॉटेलला लागू होतो हे तुमच्यासारख्या व्यावसायिकाला समजायला काही हरकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसे हमखास मिळणारच हा तुमचा अंदाज फक्त हॉस्पिटल आणि हॉटेलला लागू होतो हे तुमच्यासारख्या व्यावसायिकाला समजायला काही हरकत नाही. ^^^ ओके, म्हणजे पैसे मिळण्यात अनिश्चितता आहे तर, तेही वर्षभर काम करून. इतकं डेंजरस, बेभरवशाचे काम कोणी करणे कसे काय शक्य आहे ह्याचेही आता कुतूहल आहे, मला हे खरंच माहित नव्हते. सगळे व्यावसायिक सीए तुमच्यासारखे 'लिव्ह डेंजरसली' ह्या विचारसरणीचे तर नसतील ना? असे जिवावर उदार होऊन वर्षभर मरमर काम करून पैसे मिळतील कि नाही ह्याची वाट पाहणे भयंकर आहे. इतके हुशार आणि व्यवहारी लोक असे कसे जगू शकतात, जणू काही दुसरा पर्याय नाही?

In reply to by संदीप डांगे

पैसे हमखास मिळणारच हा तुमचा अंदाज फक्त हॉस्पिटल आणि हॉटेलला लागू होतो
आणि गंजिफ्रॉकच्या दुकानाला.

इथले प्रतिसाद उजवीकडे सरकत असल्याने आणि माझ्या चतूर भ्रमणध्वनी/ न्याहाळकामध्ये आडवा सरकपट्टा येत नसल्याने मी अनेक अनमोल प्रतिसादांना मुकतोय.

In reply to by सतिश गावडे

गावडेसर... खफवर दिला होता तो अनमोल सल्ला विसरलात कि बघितलाच नाही. :-) मोबाईल ब्राउजरला डेस्कटॉप साईट रिक्वेस्ट करा.. सारे प्रतिसाद आनंदासकट हजर होतीलच,

गोज बॅक टू कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क , त्यातलं हे वाक्य,
....काय आधार आहे या विचारामागे ? तर मुळात कार्य हा अस्तित्वाचा छंद आहे , कंपलशन नाही. ज्या वेळी काम कंपलशन म्हणून केलं जातं त्यावेळी आपण अस्तित्वापासून वेगळे झाल्यासारखे वाटतो. आपली समग्रता हरवते. आपली सृजनात्मकता लयाला जाते. केवळ फलप्राप्तीच्या आशेनं आपण कामाचं ओझं वाहातो आणि त्यातून कालनिर्मिती होते. हा काल दुहेरी असतो, एकीकडे तो कालावधी संपण्याची इच्छा निर्माण करतो आणि दुसरीकडे काम वेळेत संपवण्याचं टेंशन तयार करतो .
अँड देन फरदर गोज बॅक हिअर, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफलेहेतुर्भूर्मा ते संगोSत्स्वकर्मणी... २(४७) एक कोअन आहे आणि भारत गेली हजारो वर्षे ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. वरकरणी अर्थ अगदी साधा आहे पण तो आचरणात आणायला गेलं की तुम्ही कर्मात अडकता!
आता मजा अशी आहे की मी सांगतो आणि तुम्ही मंजूर केलंत तर त्याला अर्थ नाही आणि तुम्ही माझ्याशी वाद घालून ही उपयोग नाही. काम व्यक्तिनिरपेक्ष आहे त्यामुळे फरक तुम्ही काय करताय यानी पडत नाही तर तुमच्या आकलनानं पडतो.

स्वच्छंदी जगण्याबद्दल जी चर्चा वर चालुये त्याबद्दल माझे मतः १. ९ ते ५ नोकरी करणारा माणूस या वेळात त्याचे स्किल्स वापरून तो जे निर्माण करतो त्याचा त्याला मोबदला मिळतो, त्याने त्याचे घर चालते. जगण्यासाठी लागणार्‍या गरजांची पूर्ती करण्यासाठी त्याला काही ना काही ट्रान्झॅक्ट करावेच लागणार आहे आणि ते म्हणजे त्याचे स्किल्स किंवा श्रम असतात. त्यामुळे एम्प्लॉयरच्या अपेक्षा पूर्ण करणे, आपल्या स्किल्स्मुळे होणारी निर्मीती पाहता येणे, इतर लोक सहजी रिप्लेस न करू शकणारे असे योगदान देण्यामुळे परीपूर्तीचा आनंद मिळणे आणि सर्वात महत्त्वाचे जो मोबदला मिळतो त्याने सार्‍या मूलभूत गरजा, चैनी भागवण्याकरीता पैसा मिळणे हे सारे सुखाचे विवीध पदर नोकरदाराच्या नशीबात येणारच. त्यामुळे स्वच्छंदी असणे जरी उपभोगायला मिळत नसले तरीही अंतीम ध्येय जे की आनंदी होणे हे प्राप्त होऊ शकते. २. स्वच्छंदी असणे म्हणजे आदर्श व्यवस्था असे म्हणणे अतीरंजीत आहे. स्वच्छंदी मनुष्य आनंदी होईलच आणि त्याला मिळणारा आनंद निकोप, उदात्त असेलच असे नाही. उलट केवळ चोचले पुरवण्याला स्वच्छंदाचे नाव देऊन जगलो तर माझ्या तो केवळ पाशवी आनंद असेल. ३. सामान्य नेहमी मध्यममार्गच स्विकारू शकतात. रोजच्या कामात जितके वैविध्य, अचूकता आणि नैपुण्य आणता येईल तितके कामाचा आनंद अधिक मिळू शकेल, दुर्दैवाने आजीबात न आवडणारे काम करावे लागले तरीदेखील ते सोडून आवडणारे काम मिळवण्यासाठी प्रयत्न चालू ठेऊन कामाच्या वेळेला त्या वेळेपुरता आनंद घेऊन काम करणे शक्य असते आणि बरेच जण ते करतात(उदा. मी स्वतः) ४. उरलेला वेळ देखील प्रापंचीक जबाबदार्‍या आणि स्वतःचे छंद, आवडी यांच्यात विभागावाच लागतो. केवळ माझे स्वच्छंदपणे जगणे महत्त्वाचे म्हणून जबाबदार्‍यांकडे पाठ फिरवणे शक्य नसते. जबाबदार्‍या पार पाडण्यातदेखील आनंद असतोच, मुख्य म्हणजे त्या जबाबदार्‍या पार पाडल्याने येणारी कृतार्थतेची जाणीव. उरलेल्या वेळात मात्र स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याची चैन करता येते, तो वेळ स्वविकासासाठी, छंदाच्या परीपूर्तीसाठी देता येतो. शेवटी त्यानेदेखील मिळते काय? आनंदच. तेव्हा आनंद मिळणे हे ध्येय आहे. स्वच्छंदी राहणे हे त्या आनंदी राहण्याच्या सिद्धीकडे पोहोचण्याचा एक मार्ग(तुमच्या मताप्रमाणे) आहे. तोच एकमात्र मार्ग आहे हे आजिबात मान्य नाही. ५. केवळ वर्तमानातला क्षण सत्य मानून जगा, भविष्य आणि भूतकाळाला फाट्यावर मारा हा एक अत्यंत सुपरफिशीयल सल्ला वाटतो, तो अस्तित्वात आणणे शक्य असेलही मात्र त्याने आनंद मिळेलच आणि तोच महान आनंद असेल ही दोन्हीही गृहीतके खोटी वाटतात. भूतकाळाच्या आठवणींनी व्याकूळ होणे, इतीहासातील चुकांचे अवलोकन करणे, भविष्यासाठी तरतूद करणे, भविष्यातील यशाची स्वप्ने पाहणे या कृतींतून मिळणारा आनंद, तृप्ती यांना वर्तमानातला एकच क्षण जगणारे मुकत नाहीत का?

In reply to by पुंबा

स्वच्छंदी असणे म्हणजे आदर्श व्यवस्था असे म्हणणे अतीरंजीत आहे. तुमच्या संकल्पनेतच गल्लत आहे. स्वच्छंद म्हणजे जवाबदारी नाकारणं नसून स्वेच्छेनं काम करणं आहे. आनंद कामात नाही तर तुमच्यात आहे, हे न समल्यानं सगळा गोंधळ आहे. स्वेच्छेनं काम करणारा आनंदी असतो त्यामुळे त्याचं काम आनंदाचं होतं. केवळ वर्तमानातला क्षण सत्य मानून जगा, भविष्य आणि भूतकाळाला फाट्यावर मारा हा एक अत्यंत सुपरफिशीयल सल्ला वाटतो, तो अस्तित्वात आणणे शक्य असेलही मात्र त्याने आनंद मिळेलच आणि तोच महान आनंद असेल ही दोन्हीही गृहीतके खोटी वाटतात. इथे ही आकलनाची गल्लत आहे. वर्तमान हा एकच काळ जगायला उपलब्ध आहे. भूतकाळ ही वर्तमानात प्रकट झालेली स्मृती आणि भविष्यकाळ ही वर्तमानातच केलेली कल्पना आहे. वर्तमानाचा उपयोग भविष्यात घडू शकणार्‍या गोष्टीसाठी करता येतो, उदा. तिकीट बुकींग. पण क्रिया कायम वर्तमानातच घडते. वर्तमानात राहून सतत गतस्मृतींचा आढावा घेणं किंवा तो सतत भविष्याची तरतूद करण्यासाठी वापरणं हा त्याचा अपव्यय आहे जो परिणामी जीवन नीरस करतो. तस्मात, आनंदात जगण्यासाठी केवळ वर्तमानच उपलब्ध असतो, त्यामुळे तुमचा मुद्दा टिकत नाही.

खुप मस्त रसग्रहण. पण यात आध्यात्माचे काँटेक्स्ट उगाच आल्यासारखं वाटतय. हि कविता मानसशास्त्रावरची आहे. माणसाच्या जगण्याच्या ऊर्मीने जगण्यातल्या भितीवर केलेली मात, प्रसंगी समझोता. इट्स प्योर सायकॉलॉजी... आणि हेच या कवितेचं बलस्थान आहे.