संदीप औलीया आहे याची साक्ष देणारी ही एक सुरेख कविता ! स्वच्छंद जगण्याची आदीम उर्मी प्रत्येकाच्या अंतरी आहे पण रोजच्या जगण्यात ती हरवून गेलीये. स्वानंद किरकिरेची शायरी रांचो नांवाच्या स्वछंदाला शोधतांना हृदयस्पर्शी होते आणि डोळ्यात पाणी तरळवून जाते....
बहती हवा सा था वो,
उड़ती पतंग सा था वो,
कहाँ गया उसे ढूँढो
हम को तो राहें ही चलती
वो खुद अपनी राह बनता
गिरता संभालता, मस्ती में चलता था वो |
हमको कलकी फिकर सताती,
वो बस आज का जश्न मनाता,
हर लम्हें को खुल के जीता था वो |
कहाँ से आया था वो
छू के हमारे दिल को
कहाँ गया...उसे ढूँढो |
स्वानंद म्हणतो आम्हाला रोजचा दिनक्रमच चालवतो, पण तो स्वतःचा दिवस मांडतो. आम्ही उद्याच्या चिंतेत जगतो, तो हरेक आजचा उत्सव करतो आणि हर क्षणाला साहसानं सामोरं जातो. झेन मास्टर रिंझाई या स्वच्छंदाचं वर्णन, केवळ दोनच शब्दात करतो `लिव्ह डेंजरसली !' आणि संदीप त्याच्या स्वच्छंदाचा माहौल रंगवतांना म्हणतो :
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो !
ही कविता संदीपनं स्वत: गायलीये कारण ते त्याचं स्वत:चंच वर्णन आहे. त्यानं प्रत्येक कडव्यापूर्वी कव्याचं विवरणही केलंय त्यामुळे हे रसग्रहण म्हणजे एका अर्थानं संदीपशी केलेली जुगलबंदी आहे. तो कवितेतून स्वत:ला खोलतोयं आणि मी गद्यातून स्वच्छंदाचा माहौल उभा करण्याचा यत्न करतोय. संदीप म्हणतो ही आपल्यातल्याच दोन मींची कविता आहे. मला वाटतं, हा एका स्वच्छंद गवसलेल्याचा रोजच्या जगण्याचा अंदाज़ आहे. एकदा स्वच्छंद गवसला की चौकटीत जगणारं असं कुणी राहातच नाही.
रोज तेचते जगण्याची वृत्ती, सुरक्षितचौकटीत जगण्याची सवय आणि किरकोळ गोष्टींनी व्यथित होणं संदीप किती सुरेखपणे मांडतो. सहज भिडणारी रुपकात्मकता रसिकाला संदीपच्या अनुभवाशी तत्क्षणी रिलेट करते. जुनाट दार आणि किरकिरा बंदी ही धारणात बांधली गेलेली मानसिकता आहे, जी मोकळा श्वासच घेऊ देत नाही. स्वानंद म्हणतो तसा ‘एक कहानी ख़तम तो, दुजी शुरु हो गई मामू !’ असा जगण्याचा पॅटर्न होऊन बसतो. संदीप ती स्थिती ‘बिजागरीशी जीव गंजवत बसतो’ अशी मांडतो आणि शेवटच्या ओळीत तर कहर करतो...तो लंघून चौकट पार निघाया बघतो ! ही चौकट म्हणजे भीती आहे. आणि ती भीती दुहेरी आहे. मूळात जे भय आहे ते शारीरिक म्हणजे मृत्यूचं आहे आणि मानसिक भय इज्जतीचा कधीही फालुदा होण्याचं आहे. या दोन भयांना जो पार करतो तो चौकट लंघून जातो, स्वच्छंद होतो.
मी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो !
मग या रोजमर्राच्या जिंदगीत वरुन कितीही हसतमुख दिसलो तरी आत कधीही भडका होईल असा संताप धगधगत असतो. इन अ वे, व्यक्तीमत्त्वाच्या जगण्याला हा उन्हाचा शाप आहे. आणि ज्याला स्वच्छंद गवसला तो याच उन्हाचे दागिने घडवतो ! तीच रिलेशनशिप्सची गुंतागुंत, त्याच आर्थिक विवंचना, तेच दैहिक प्रश्न, पण चौकट लंघून गेलेला त्यांची दाहकता सूर्यफुलात रुपांतरित करतो.
डोळ्यांत माझिया सूर्याहुनी संताप
दिसतात त्वचेवर राप, उन्हाचे शाप !
तो त्याच उन्हाचे झगझगीत, लखलखते-
- घडवून दागिने सूर्यफुलांवर झुलतो !!
यशस्वी झालो तरच खरा जगलो ही मानसिकता अस्तित्वाविरोधात लढा उभा करते. प्रत्येक अडचण काच होते आणि रडीचा का होईना डाव खेळून जिंकण्याची इर्ष्या निर्माण करते. पण निसर्गदत्त महाराज म्हणतात तसा ‘स्व कायम विजयी आहे’ कारण तो दुसर्याच्या विजयात स्वत:ची हार मानत नाही तर ते त्याचं कौशल्य मानतो, त्याला दाद देतो. आणि मग ती हार सुद्धा त्याला आनंद देऊन जाते कारण तो नवं काही तरी शिकलेला असतो.
मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो !
आस्तिक देवावर भरोसा ठेवून असतो आणि तो सदैव आपल्याच पाठीशी उभा राहावा म्हणून नवस-सायास करतो. ‘तो’ आपल्या मनाजोगतं घडवेल या भाबड्या आशेपायी वेळातवेळ काढून भक्ती करतो. पण स्वच्छंद जगणार्याला दान काय पडेल याची फिकीर नसते, त्याचा सगळा रस खेळण्यातच असतो. या निर्वेध चित्तदशेमुळे आणि अशा बहुआयामी विश्वात, आपली व्यक्तिगत इच्छा रेटणं व्यर्थ आहे हे उमगल्यानं, तो अस्तित्वाशी कायम समरुप असतो. असं जगणं मग कृतार्थ होतं आणि अस्तित्वाचा धन्यवाद घेऊन जातं.
मी आस्तिक ! मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेवून लाच, लावतो बोली !
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्या
अन् 'धन्यवाद' देवाचे घेऊन जातो !!
ज्या काव्याला अध्यात्मिक आयाम नाही ते फार सुपरफिशियल होतं. संदीप त्याचं अध्यात्मिक आकलन कवितेत आणतोच आणि त्यामुळेच तर त्याची कविती मिस्टीकल होते. चौकटीत जगणार्याला स्यूडो अध्यात्माचा मोठा आधार असतो. म्हणजे ‘तत् त्वं असी’ किंवा फारच डेरींग असेल तर ‘अहं ब्रह्मास्मी’ असे काही फंडा मनातल्या मनात रिपीट करत तो जगत असतो. शिवाय हे फंडे प्रसंगानुरुप बदलत असतात. या मानसिकतेला संदीप म्हणतो...मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार ! पण हे इतकं वरवरचं असतं की आतला चेहरा तसाच भेसूरच राहातो, कारण व्यक्तीमत्त्वातून सुटका झाल्याखेरिज तो बदलणार तरी कसा? स्वच्छंद जगणारा आकाश झालेला असतो ! त्याचं सगळं जगणं मोरपंखी झालेलं असतं. आणि या स्थितीचं वर्णन संदीप असं काही कमालीचं लोभस करतो की त्याच्या प्रतिभेचा केवळ हेवा वाटतो !...तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही, त्या शामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !!
मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार
लपतो न परि चेहरा आत भेसूर !
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही
त्या शामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !!
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो !
वाचन संख्या
19974
प्रतिक्रिया
103
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्लिज. उगीच प्रतिसाद ठोकायला
In reply to ज्योक करतायं काय ? by संजय क्षीरसागर
पुन्हा विनोद ?
In reply to प्लिज. उगीच प्रतिसाद ठोकायला by संदीप डांगे
पैसे हमखास मिळणारच हा तुमचा
In reply to पुन्हा विनोद ? by संजय क्षीरसागर
पैसे हमखास मिळणारच हा तुमचा
In reply to पैसे हमखास मिळणारच हा तुमचा by संदीप डांगे
इथले प्रतिसाद उजवीकडे सरकत
फिकर णॉट
In reply to इथले प्रतिसाद उजवीकडे सरकत by सतिश गावडे
सबसे जबरदस्त प्रतिसाद! क ह र!
In reply to फिकर णॉट by पैसा
नक्कीच पायजे!
In reply to सबसे जबरदस्त प्रतिसाद! क ह र! by संदीप डांगे
गावडेसर... खफवर दिला होता तो
In reply to इथले प्रतिसाद उजवीकडे सरकत by सतिश गावडे
धीस डिस्कशन
स्वच्छंदी जगण्याबद्दल जी
.
In reply to स्वच्छंदी जगण्याबद्दल जी by पुंबा
स्वच्छंदी असणे म्हणजे आदर्श व्यवस्था असे म्हणणे अतीरंजीत आहे.तुमच्या संकल्पनेतच गल्लत आहे. स्वच्छंद म्हणजे जवाबदारी नाकारणं नसूनस्वेच्छेनं काम करणंआहे. आनंद कामात नाही तर तुमच्यात आहे, हे न समल्यानं सगळा गोंधळ आहे. स्वेच्छेनं काम करणारा आनंदी असतो त्यामुळे त्याचं काम आनंदाचं होतं.केवळ वर्तमानातला क्षण सत्य मानून जगा, भविष्य आणि भूतकाळाला फाट्यावर मारा हा एक अत्यंत सुपरफिशीयल सल्ला वाटतो, तो अस्तित्वात आणणे शक्य असेलही मात्र त्याने आनंद मिळेलच आणि तोच महान आनंद असेल ही दोन्हीही गृहीतके खोटी वाटतात.इथे ही आकलनाची गल्लत आहे. वर्तमान हा एकच काळ जगायला उपलब्ध आहे. भूतकाळ ही वर्तमानात प्रकट झालेली स्मृती आणि भविष्यकाळ ही वर्तमानातच केलेली कल्पना आहे. वर्तमानाचा उपयोग भविष्यात घडू शकणार्या गोष्टीसाठी करता येतो, उदा. तिकीट बुकींग. पण क्रिया कायम वर्तमानातच घडते. वर्तमानात राहून सतत गतस्मृतींचा आढावा घेणं किंवा तो सतत भविष्याची तरतूद करण्यासाठी वापरणं हा त्याचा अपव्यय आहे जो परिणामी जीवन नीरस करतो. तस्मात, आनंदात जगण्यासाठी केवळ वर्तमानच उपलब्ध असतो, त्यामुळे तुमचा मुद्दा टिकत नाही.सुंदर.