✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी आज केलेला व्यायाम - फेब्रुवारी २०१७ - सायकलिंग / रनिंग चॅलेंज

म
मोदक यांनी
Wed, 02/01/2017 - 15:22  ·  लेख
लेख
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी. जानेवारी २०१७ - सायकलिंग - १०,७५५ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ६९५ किमी. ****************** सायकलिंग ग्रुपवर अनेक दिवस विशेष असे कांही घडत नव्हते. नियमीतपणे सायकल चालवणारे चालवत होते, मात्र अनेक जणांची सायकल उगाचच बंद झाली होती आणि जुन्या राईडचेच विषय चघळले जात होते. मग अचानक एक दिवस तिथल्या चावडीवर बोलताना डॉक्टर श्रीहास यांनी एक कल्पना मांडली. आपण नियम तयार करू आणि कांही आव्हाने ठेवू. या कारणाने का होईना पण लोकं पुन्हा सायकल चालवू लागतील..! देशपांडे मामा, सागर पाध्ये, प्रशांत सरपंच, डॉक्टर श्रीहास, मानसभौ आणि बाबा योगिराज.. आंम्ही सगळे जण लगेच यावर काम करू लागलो. आपआपल्या सुपीक डोक्यातून अनेक नियम काढले, हा नियम असावा का, नसावा का यावर चर्चा झाल्या, आंम्ही काढलेली आव्हाने (दिवसा ५० किमी सायकलिंग - असे सलग ७ दिवस) बाकी लोकांनी हाणून पाडली. त्या दृष्टीने विचार सुरू झाला. मध्येच सागर पाध्येंनी "एलिटिस्ट होवू नका रे" असा टोलाही हाणून घेतला. मग शेवटी असा निर्णय घेतला की एक तर ही आव्हाने टीम बनवून पार करायची किंवा एकेकट्याने पार करायची. सायकलश्री, सायकल रत्न अशा पदव्याही तयार झाल्या. ;) सायकल नसणार्‍यांना या उपक्रमात भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी पळण्याचे आव्हान तयार केले गेले. मूळ कल्पक डॉक्टर श्रीहास आणि बाकी टीमने भरपूर चर्चा करून पुढील नियम फायनल केले. १) कोणत्याही दिवशी चॅलेंज सुरू झाले तरी चालेल मात्र नक्की कोणते चॅलेंज आणि किती तारखेला सुरू करणार आहात याची माहिती स्ट्रावा किंवा व्हॉट्सप ग्रूपवर "चॅलेंज सुरू करण्यापूर्वी" द्यावी. २) कोणतेही चॅलेंज सलग ७ दिवस (कॅलेंडर डेज) पूर्ण झाले तरच गृहीत धरले जाईल. ३) टीम बनवून चॅलेंज पार पाडायचे असेल तर कमाल ४ लोकांची टीम तयार करावी लागेल, टीमचे रोजचे सायकलिंग ५० किंवा १०० किमी करावे लागेल, टीम मधील सर्वांनी रोज किमान ५ किमी सायकलिंग करणे आवश्यक आहे उदा. टीम मध्ये ३ सायकल स्वार असतील तर प्रत्येकाने रोज किमान ५ किमी सायकल चालवणे बंधनकारक आहे. दोघांनी २५ किमी आणि तिसऱ्याने ० असे झाले तर टीमला पुन्हा चॅलेंज सुरू करावे लागेल. ४) ७ दिवसांपैकी एखादा दिवस कांही कारणाने सायकलिंग झाले नाही तर संपुर्ण टीम चॅलेंजसाठी पात्र राहणार नाही, मात्र पुढील दिवसापासून नियम क्रमांक १ नुसार नवीन चॅलेंज सुरू करता येईल. उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला सायकलिंग झालेच नाही तर मी ६ तारखेपासून नवीन चॅलेंज सुरू करू शकतो जे १२ मार्चला संपेल. ५) वरील कोणताही नियम न बदलता - १०० किमीचे चॅलेंज घेतल्यानंतर अचानक कांही कारणाने ते ५० किमी मध्ये बदलता येईल. मात्र ५० किमीचे चॅलेंज १०० किमी मध्ये बदलण्यासाठी सगळे दिवस १०० किमी + सायकलिंग होणे आवश्यक आहे. उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च १०० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला ७५ किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीच्या चॅलेंजला पात्र असेन. तसेच समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले पण माझे पहिले चार दिवस प्रत्येकी १०० किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीचे चॅलेंज १०० किमीमध्ये बदलू शकतो. ६) ज्यांना रनिंग / वॉकिंग करायचे आहे त्यांनी टीम बनवुन चॅलेंज पूर्ण करावे. रनिंग साठीचे अंतर १० किमी, आणि प्रत्येक टीम मेंबरने किमान २ किमी रनिंग करणे आवश्यक. ******************** हे नियम ग्रुपवर टाकले आणि एकच हलकल्लोळ सुरू झाला, कांही तासातच टीम तयार झाल्या. टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी सायकलिंग ७ दिवस टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी सायकलिंग ७ दिवस लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी सायकलिंग ७ दिवस टीम लोड रनर - प्रसाद दाते, इरसाल कार्ट, मोदक - १० किमी रनिंग ७ दिवस यातील "लोन रेंजर" डॉक्टर श्रीहास यांनी आज सकाळी ५० किमीचे चॅलेंज पूर्ण केले. त्रिदेव आणि F1 जबरदस्त सायकलिंग करत आहेत. त्रिदेवांचे ५ दिवसात तब्बल ६६३ किमी सायकलिंग झाले आणि टीम F1 ४५१ किमी अंतर कापून त्यांना साथ देत आहे. चॅलेंज स्वीकारल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मला भटकंतीसाठी बाहेर पडावे लागले त्यामुळे एकच दिवस ५ किमी पळणे जमले व दुसर्‍या दिवशी चॅलेंज गुंडाळावे लागले. मात्र प्रसाद दाते आणि इरसाल कार्ट यांनी नाउमेद न होता दोघांतच आव्हान पूर्ण करायचा चंग बांधला आणि सध्या नियमीतपणे पळत आहेत. **************************** पुढील टप्पाही आता चर्चेत आहे. थोडी अवघड पण कस बघणारी आव्हाने सागर पाध्येंनी सुचवली आहेत. मासिक आव्हाने १. एक सलग फेरी ५० किमी (१०० किमी) २. एक सलग फेरी १०० किमी (कितीही) ३. एकूण अंतर ५०० किमी ४. एकूण अंतर १,००० किमी (*) ५. एकूण चढण ३,००० मी ६. एकूण चढण ७,००० मी (*) वार्षिक आव्हाने १. ५० किमी दररोज असे कोणतेही ४ आठवडे २. १०० किमी दररोज असा १ आठवडा ३. महिन्यात २२ वेळा ४०किमी + फेऱ्या (कसाही कॅलेंडर महिना) ४. महिन्यात २२ वेळा दिवसाचे ४० किमी (ऑफिस ऑफिस)⁠⁠⁠⁠ ५. किमान ५ घाट (*) **************************** सध्या या चॅलेंजमुळे ग्रुपवर सर्वजण एकदम उत्साहित आहेत, धमाल करत आहेत आणि अनेकजणांचे नियमीत सायकलिंग सुरू झाले आहे. **************************** @@@@@@@@@@@@@@@@@@@@ येथे विशेष उल्लेख म्हणून ज्यांनी ज्यांनी चॅलेंजे पूर्ण केले त्यांची माहिती देत आहे. १) लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ४३० किमी. २) टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ८८० किमी. ३) टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ५०२ किमी. ४) टीम लोड रनर - इरसाल कार्ट आणि प्रसाद दाते - १० किमी रनिंग ७ दिवस - एकूण रनिंग - ७९ किमी. ५) टीम सायक्लोमेनीयाक्स - सागर PDY, स्थितप्रज्ञ आणि नकुल पाठक - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ६४८ किमी. @@@@@@@@@@@@@@@@@@@@
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
38331 वाचन

💬 प्रतिसाद (184)

प्रतिक्रिया

किती झाले म्हणे प्रत्यक्षात..

मोदक
Wed, 02/08/2017 - 00:08 नवीन
किती झाले म्हणे प्रत्यक्षात..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

जानेवारी महीन्यात....

डॉ श्रीहास
Sat, 02/04/2017 - 10:40 नवीन
८.५ किमी ट्रेडमिल वर चालणं आणि ६१५ किमी सायकलींग असं चांगलासा व्यायाम केला .... फेब्रुवारीची सुरवात ५० किमी सायकलींगनी केली आहे, ३ दिवस गॅप पडलाय पण ... व्यायाम परत सुरू होईल.... ह्या धाग्यातून उद्युक्त झालेल्या प्रत्येकाला खूप शुभेच्छा _/\_
  • Log in or register to post comments

मोदक भाऊंनी लिहिल्याप्रमाणे

नितीन पाठक
Sat, 02/04/2017 - 15:52 नवीन
मोदक भाऊंनी लिहिल्याप्रमाणे बरेच दिवस सायकल सायकल ग्रुप वर फक्त राइड अपडेट किवा सायकल विषयी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीच जिवंत होता. आज माझी इतकी राईड झाली, आम्ही इकडे गेलो, तिकडे गेलो, खादाडी झाली इ. इ. या ग्रुपच्या डॉ़क साहेबांनी (डॉ श्रीहास) एक ७ दिवसाच्या नवीन चैलेंजची कल्पना काढली आणि ग्रुप मध्ये एकदम चैतन्य निर्माण झाले. डॉक्टर श्रीहास आणि बाकी टीमने भरपूर चर्चा करून पुढील नियम तयार केले. प्रत्येकाने लगेच आपल्या टीम साठी सदस्यांची शोधाशोध सुरू केली. मी, मा. श्री. योगेश साळुंके (बाबा योगीरा़ज) आणि मा. श्री. मानसरावजी चंद्रात्रे लातूरकर यांची एक टीम तयार झाली. नामकरण झाले --- टीम त्रिदेव कशी सायकल चालवायची हे ठरले आणि दि. २७ जानेवारी पासून सुरू झाला मग आपापल्या सायकलचा प्रवास, चाके गरागरा फिरू लागली. आकडे वाढायला लागले. एकमेकांना प्रोत्साहन देत चॅलेंज पुर्ण करण्याकडे टिम्सची वाटचाल सुरु झाली. पहिला दिवस, दुसरा दिवस ...... होता होता मग आला २ फेब्रुवारी ..... शेवटचा दिवस. आमच्या त्रिदेव टीम चे एकून सायकलींग झाले ८७९.५ किमी. सविस्तर वृत्तांत मा. श्री. योगेशभाउ देणार आहेत. चैलेंज सुरूवात केली आणि पहिल्याच दिवशी मा. योगेश भाउंच्या सायकलची ट्यूब खराब झाली, त्यांचा मूड गेला, त्या दिवशी त्यांची सयकलींग कमी झाली. आमचे योगेशभाउ नाराज झाले. दुस-या दिवसापासून मा. योगेश भाउंनी चागंलीच आघाडी घेतली. सोमवारी दि. ३० तारखेला तर योगेश भाऊंनी दणदणीत १२८ किमी सायकलींग केली. आम्ही दोघे एकदम गार. एका दिवसात १२८ किमी ?? बापरे !!! काय हे !! मा. मानसरावजी चंद्रात्रे लातूरकरांचे तर काय विचारता ? बिगर गिअर सायकल ने हा माणूस दररोज टळटळीत उन्हातान्हाचे कमीत कमी ५० किमी सायकल चालवत होता. काय बोलावे. यांची सायकल एकदा निघाली की ५० किमी शिवाय थांबतच नव्हती. मा. श्री. चंद्रात्रे लातूरकरांनी दररोज ५० किमी च्या वर सायकल चालवली आणि चैलेंज पूर्ण केले. इनको तो मानना पडेगा !! एक चैलेंज पूर्ण झाले. मनाला समाधान लाभले. किती झाले यापेक्षा आपण हे करू शकतो याचा आत्मविश्वास आला. खरे तर पहिल्यांदा चैलेंज मध्ये भाग घ्यायचा विचार केला तेव्हा असे वाट्ले की आपल्याला हे जमेल का ? नोकरी, प्रापंचिक जबाबदारी संभाळून हे जमू शकेल का असे ही मनात येउन गेले. पण मला आमच्या दोन्ही जोडीदारांनी प्रोस्ताहन देउन सहकार्य केले. तुम्हाला जमेल तेवढी सायकल चालवा, कमीत कमी ५ किमी दररोज चालवा असे सांगितले. आज, मा. श्री. योगेश सांळुके आणि मा. श्री. मानसरावजी चंद्रात्रे लातूरकर या दोन्ही जोडीदारांमुळे मी हे साध्य करू शकलो त्याबद्दल या दोघांना मनापासून प्रणाम. या दोघांचा मी शत:श आभारी आहे. आमच्या या चैलेंजच्या उपक्रमामध्ये सायकल सायकल समूहाच्या सर्व सदस्यांचे म्हणजे इतर सर्व सायकल स्वारांचे अतिशय प्रोत्साहन मिळाले, जोरदार पाठिंबा मिळाला. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. विशेषता डोक्टर श्रीहास, मोदक भाउ, सरपंच, अक्षयमामा देशपांडे, पाध्ये केडी, सागर पाध्ये, बाबा योगिराज, मानसभाउ, यांचे विशेष आभार. अभिजित बुचडे, प्रतिक पाटील, वॉडरींग व्ह्यूफाईंडर, प्रसाद दाते, किरण कुमार, नकुल, इ. इ. मित्रांचे मनापासून आभार (चूकुन कोणी राहीले असल्यास क्षमस्व) Team Load Runners and Team The Cyclomaniacs यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा .......... अजून समूहावर चैलेंजेस चालू आहे. चैलेंज घेतलेल्या सर्व सदस्यांना शुभेच्छा मिपावर ब-याच जणांनी / जणींनी वेगवेगळे नवीन चैलेंज स्वीकारले आहे त्या सर्वांना शुभेच्छा ... हे सगळे बघता ह्या सगळ्या उपक्रमाचा मुख्य ऊद्देश जो लोकांना व्यायाम करण्यासाठी उद्युक्त करणे होता तो नक्कीच साध्य झाला आहे ! परत एकदा सर्व सायकल स्वारांचे हार्दिक अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments

टीम - त्रिदेव

अरिंजय
Sat, 02/04/2017 - 17:55 नवीन
सायकल सायकल समुहावर काही दिवसांपुर्वी आव्हानांची संकल्पना मांडण्यात आली. त्यानुसार आम्ही म्हणजेच मिपाकर नितीन पाठक - रणगाडा चालक मालक 1982 ची हर्क्युलस सायकल, बाबा योगीराज व बगरघेर म्हणजेच बिना गिअर सायकलवाले मानस चंद्रात्रे असा "टीम त्रिदेव" हा संघ बनवला व 50×7 हे सांघीक आव्हान घेतले. 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात "टीम त्रिदेव"ने आपले सांघीक आव्हान, 50×7, पुर्ण केले. संघाच्या सात दिवसांच्या कामगिरीचा हा लेखाजोखा - दिवस पहिला - मानस चंद्रात्रे - 49.3 नितीन पाठक - 34.8 बाबा योगीराज - 7.9 पहिली टोटल = 92 किमी दिवस दुसरा - नितिन पाठक - 42.6 बाबा योगीराज - 52.8 मानस चंद्रात्रे - 51.9 दुसरी टोटल - 147.3 किमी दिवस तिसरा नितीन पाठक - 62.5 बाबा योगीराज - 38.5 मानस चंद्रात्रे - 43.6 तिसऱ्या दिवसाची टोटल -144.6 दणदणीत चौथा दिवस- नितीन पाठक - 33.8 बाबा योगीराज- 128.4 मानस चंद्रात्रे - 10.6 चौथ्या दिवसाची टोटल - 172.8 दिवस पाचवा नितीन पाठक - 44.5 बाबा योगीराज - 11.9 मानस चंद्रात्रे - 50.5 पाचव्या दिवसाची टोटल - 106.9 दिवस सहावा नितीन पाठक - 32.4 बाबा योगीराज - 11.1 मानस चंद्रात्रे - 50.7 सहाव्या दिवसाची टोटल - 94.2 दिवस सातवा नितीन पाठक - 42 बाबा योगीराज - 24.5 मानस चंद्रात्रे - 55.2 सातव्या दिवसाची टोटल - 121.7 Grand Total = 879.5 किमी वैयक्तीक कामगिरी - नितिन पाठक - 292.6 किमी बाबा योगीराज - 275.1 किमी मानस चंद्रात्रे - 311.8 किमी
  • Log in or register to post comments

__/\__

मोदक
Mon, 02/06/2017 - 20:20 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरिंजय

छ्या, अता लिहायला काय उरल?

बाबा योगिराज
Sat, 02/04/2017 - 18:38 नवीन
मानस भौ, पाठक काका पहिल ५०X७ च ध्येय तर यशश्विरित्या पूर्ण झालय. ह्या वेळेस ८८० किमी पुर्ण झालेत, पुढिल वेळी कमीत कमी १००० किमी पुर्ण करु. सायकल भागाओ संघट्नेचे सदस्य बाबा योगिराज
  • Log in or register to post comments

प्रयत्न करतो

मित्रहो
Sat, 02/04/2017 - 19:58 नवीन
१००० किमी फेब्रुवारी महिन्यात सायकलींग. प्रयत्नच आहे. कठीण आहे. पाचशेच्या वर गाडी गेली नाही कधी. चार दिवसात ६५ किमीच झाले ३ फेब्रु - २५ किमी ४ फेब्रु - ४० किमी
  • Log in or register to post comments

पुढे

मित्रहो
Mon, 02/06/2017 - 21:38 नवीन
५ फेब्रु - ९५ किमी (७७ आणि १८) ७७ किमी नेहमीच्याच रुटने असले तरी मस्त मजा आली यावेळेला. ६ आणि ७ बहुदा शून्यच राहनार. पायांना आराम. एकूण १७० किमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो

माझे आत्तापर्यंत ४२ किमी झाले

मोदक
Tue, 02/07/2017 - 00:52 नवीन
माझे आत्तापर्यंत ४२ किमी झाले आहेत. मलाही हजार किमी करायचे आहेत. येथे अपडेट देत राहूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो

पुढे

मित्रहो
Sun, 02/12/2017 - 13:27 नवीन
३ फेब्रु - २५ किमी ४ फेब्रु - ४० किमी ५ फेब्रु - १०५ किमी (७७ + १८+ १०) ८ फेब्रु - ३६ किमी ११ फेब्रु - ४३ किमी १२ फेब्रु - १०१ किमी एकूण- ३५० किमी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो

भारी सुरू आहे, माझे ५०० किमी

मोदक
Sun, 02/12/2017 - 18:22 नवीन
भारी सुरू आहे, माझे ५०० किमी झाले तरी लै झाले अशी अवस्था आहे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो

प्रयत्न सुरु

मित्रहो
Sun, 02/19/2017 - 13:00 नवीन
३ फेब्रु - २५ किमी ४ फेब्रु - ४० किमी ५ फेब्रु - १०५ किमी (७७ + १८+ १०) ८ फेब्रु - ३६ किमी ११ फेब्रु - ४३ किमी १२ फेब्रु - १०१ किमी १४ फेब्रु - ३८ किमी १८ फेब्रु - २०३ किमी (ब्रेव्हे पूर्ण ) एकूण- ५९१ किमी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो

तोंडात बोटे घालण्यात आलेली

एस
Sat, 02/04/2017 - 21:53 नवीन
तोंडात बोटे घालण्यात आलेली आहेत! सादर दण्डवत स्वीकारावा मंडळी!
  • Log in or register to post comments

:-(

गवि
Sun, 02/05/2017 - 01:46 नवीन
:-( खंड पडला राव. अपराधी भावना. सगळे जबरदस्त व्यायाम करताहेत आणि आम्ही पायाची इंज्युरी या निमित्ताने सुरु झालेला खंड वाढवत चाललोय. फक्त अधेमधे ३-४ दिवसांनी चालतोय. :-(
  • Log in or register to post comments

अजिबात अपराधी वाटून घेऊ नका...

डॉ श्रीहास
Mon, 02/06/2017 - 14:17 नवीन
तंगडी सलामत तो किलोमीटर पचास... मागील वर्षी सायकलवरून पडलो पाय मोडला , त्यातून बरं होऊन बाहेर आलो मग ३ वेळा १०० किमीहून अधिक राईड्स आणि एक २३० किमी ची औ'बाद-पुणे वारी केली... त्यामुळेच म्हणतो , बरे व्हा पुर्ण मग करा सुरवात !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

टीम लोड रनर

दाते प्रसाद
Mon, 02/06/2017 - 11:00 नवीन
सायकल ग्रुपवर जेव्हा चॅलेंजेस , टीम्सची चर्चा सुरु होती तेव्हा आपणही एका टीममधून सायकलिंचे आव्हान घ्यावे असं वाटत होतं पण फिरतीची नोकरी असल्याने कितपत जमेल हि शंका होती .मोदकाने रनिंगची आयडिया देऊन आमची टीम बनवली सुध्दा . मग पळणं चालु झालं , पहिल्या दोन दिवसात जरा दमायला झालं. २७ जानेवारीला मोदकाने त्याला कामामुळे /प्रवासामुळे रनींग जमणार नसल्याचं शुभवर्तमान दिलं, आणि आम्ही दोघांनी ( इरसाल कार्ट आणि मी ) हे चॅलेंज पुर्ण करायचं ठरवलं . त्यातसुद्धा मला एक दिवस बाहेरगावी जायला लागलं पण मी काम संपल्यावर तिथे त्या दिवसाचं रनींग पुर्ण केलं . अशा रीतीने आम्ही हे चॅलेंज २+७ दिवसात पूर्ण केलं . ९ दिवस सातत्यानी धावून माझा पाळायचा वेग जाणवण्याइतपत वाढला. स्पेशल थँक्स टू इरसाल कार्ट आणि मोदक
  • Log in or register to post comments

तुमचं बघून मी पण पळणं सुरू

डॉ श्रीहास
Mon, 02/06/2017 - 14:00 नवीन
तुमचं बघून मी पण पळणं सुरू करेन म्हणतो....आर्शिवाद असू द्या प्रसाद दादा _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दाते प्रसाद

का लाजवताय राव ,

दाते प्रसाद
Mon, 02/06/2017 - 16:14 नवीन
नक्की रनींग सुरु करा , तुम्ही खूप कंसिस्टन्ट आहात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

वेगापेक्षा तुमची जिद्द

इरसाल कार्टं
Mon, 02/06/2017 - 14:28 नवीन
वेगापेक्षा तुमची जिद्द फार मोठी आहे हो... चालुद्या नाही नाही... धावूद्या..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दाते प्रसाद

थँक्स इ का

दाते प्रसाद
Mon, 02/06/2017 - 16:18 नवीन
तुमच्याबरोबर रनींग चॅलेंज पूर्ण करायला मजा आली . आपण पुढचं चॅलेंज लवकरच ठरवु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल कार्टं

माझ्या मते सायकल चालवण्यासाठी

अप्पा जोगळेकर
Mon, 02/06/2017 - 17:50 नवीन
माझ्या मते सायकल चालवण्यासाठी स्ट्रेन्थ ट्रेनिंग सुद्धा आवश्यक आहे. मी एप्रिल महिन्यातल्या बीआरएम साठी तयारी करत आहे. माझे चॅलेंज मी येथे नोंदवतो. माझ्या संघात मी एकटाच असेन. ७ दिवसात २ वेळा सायकलिंग. पैकी एकदा १ तासात २५ किमी. (यामधे डांगे चौक, काळेवाडी येथील २ फ्लाय ओव्हर्स २ वेळा चढणे उतरणे असेल.) दुसर्‍यांदा २ तासात ४५ किमी. (हा कमी-अधिक चढणीचा रस्ता असेल. बहुधा वाकड ते तळेगाव आणि परत). बाकीचे दिवस स्ट्रेन्थ ट्रेनिंगचे असतील. ते येथे नोंदवत नाही. नेक्स्ट अपडेट पुढच्या सोमवारी देईन.
  • Log in or register to post comments

आप्पा.. फ्लायओव्हरसोबत

मोदक
Mon, 02/06/2017 - 19:32 नवीन
आप्पा.. फ्लायओव्हरसोबत देहूरोडचा चढ किंवा पानशेत / तळेगांवचे चढ चढा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

ताशी २५ किमीचा वेग!! रोडबाईक

बाळ सप्रे
Tue, 02/07/2017 - 14:43 नवीन
ताशी २५ किमीचा वेग!! रोडबाईक आहे का तुमची?? हायब्रीड अथवा माउंटनबाईकवर हा वेग खूप कठीण आहे.. शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

नाही. ष्नेल कंपनीची ६ गिअर

अप्पा जोगळेकर
Wed, 02/08/2017 - 10:30 नवीन
नाही. ष्नेल कंपनीची ६ गिअर वाली हायब्रिड बाईक आहे. माझे पहिले पर्सनल चॅलेंज हुकले आहे. १ तास २ मिनिटात २४ किमी झाले. ताशी २३ किमीचाच वेग गाठता आला. आता दुसर्या चॅलेंजचे काय होते ते पाहायचे. तुम्ही स्वतः घाटात अव्हरेज स्पीड ९-१० ने सायकल चालवता असे वाचल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

मार्गदर्शन मिळावे

स्थितप्रज्ञ
Tue, 02/07/2017 - 16:52 नवीन
स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये काय-काय करता? मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

प्रामुख्याने बलवर्धक योगासने

अप्पा जोगळेकर
Wed, 02/08/2017 - 10:48 नवीन
प्रामुख्याने बलवर्धक योगासने आणि जिन्यांची चढ- उतार. सायकल आणि धावणे यासाठी पद्मासन आणि पश्चिमोत्तानासन याचे आश्चर्यकारक फायदे होतात असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ

आभारी आहे

स्थितप्रज्ञ
गुरुवार, 02/09/2017 - 18:07 नवीन
उपयुक्त माहिती. थँक्यू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

आमचं सुद्धा ठरवल्याप्रमाणे

पिलीयन रायडर
Mon, 02/06/2017 - 19:38 नवीन
आमचं सुद्धा ठरवल्याप्रमाणे चालु आहे. तुमचे सायकलिंग आणि रनिंगचे आकडे पाहुन स्फुरण चढतं पण स्वतः पळायला लागलं की पार जीव घशात येतोय. चालणं मात्र जोरात चालु आहे. पळण्याची तयारी करणार रोज थोडी थोडी. सविता, स्रुजा, सामान्य वाचक जोरात धावपळ करत आहेत. इशा, विश आणि स्वाती सुर्यनमस्कार घालत आहेत. सगळं काही ऑन ट्रॅ़क!
  • Log in or register to post comments

अरे व्वा... भारीये...!

मोदक
Mon, 02/06/2017 - 20:13 नवीन
अरे व्वा... भारीये...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

काय काय व्यायाम करतात बापरे

इशा१२३
Tue, 02/07/2017 - 09:30 नवीन
काय काय व्यायाम करतात बापरे!आमच आपल लिंबुटिंबु चालुये.गेले वर्षभर रोज योगासने + सूर्यनमस्कार करायची सवय आहेच.सूर्यनमस्कार दिवसासाठि दिड महिना जस्त सूर्यनमस्कार सराव योगवर्गात सुरु केले होते. ४ फेब्रुवारिस सुर्यनस्कारदिवस योगसंस्थेकडुन साजरा केला गेला.वयक्तिक लक्ष होते १०८ सूर्यनमस्कार घालायचे.एक तासात पाच मिनिटाचे सात राउंड ,मधे तिन मिनिटाचे शवासन असे करत ११२ सूर्यनमस्कार घालु शकले. एकुणात नियमितपणा आणि सराव यामुळे जमु शकते असा तरि अत्मविश्र्वास आला. पाच ताखेपासुन परत २५ सूर्यनमस्कार आणि इतर योगासने सुरु केली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

३०० किमी ब्रेवे!!

देशपांडेमामा
Tue, 02/07/2017 - 08:16 नवीन
गेल्या शानिवारी ३०० किमी ची सायकलींगची BRM पुर्ण केली ! सकाळी ६.०० ते रात्री ९:२० ..फक्त आणि फक्त सायकलींग :-) देश
  • Log in or register to post comments

१६ तासात ३०० किमी ! बाब्बो !

sagarpdy
Tue, 02/07/2017 - 09:53 नवीन
१६ तासात ३०० किमी ! बाब्बो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडेमामा

मामा.. लेख लिहा एक..!

मोदक
Tue, 02/07/2017 - 14:26 नवीन
मामा.. लेख लिहा एक..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

अभिनंदन.. वेग भन्नाट आहे

बाळ सप्रे
Wed, 02/08/2017 - 10:19 नवीन
अभिनंदन.. वेग भन्नाट आहे तुमचा मामा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडेमामा

भन्नाट. अभिनंदन.

अप्पा जोगळेकर
Wed, 02/08/2017 - 10:57 नवीन
भन्नाट. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडेमामा

आज घर ते हाफिस - २१ किमी

मोदक
Tue, 02/07/2017 - 15:19 नवीन
आज घर ते हाफिस - २१ किमी सायकलिंग.
  • Log in or register to post comments

चॅलेंजचे उचलण्याचे मला झालेले फायदे

स्थितप्रज्ञ
Tue, 02/07/2017 - 16:03 नवीन
मागच्या वर्षी डिसेम्बर पासून नियमित सायकलिंग चालू केले. सुरुवातीला १९९९ साली घेतलेला रणगाडा चालवून बघितला. २ महिने सातत्य टिकल्यावर नवीन सायकल घेऊनच टाकली. सुरुवातीला नव्याचे नऊ दिवस जोरदार राईड्स झाल्या. २-३ attempt करून शंभरी पण गाठून झाली. त्यानंतर (आणि आधी सुद्धा) आठवड्यातून दोनएक दिवस कंपनीत सायकल नेणं सुरु झालं. नियमितता असली तरी अगदी न चुकता रोज सायकल काढणं म्हणजे आव्हानच वाटत होत. काल सायकल चालवली म्हणजे काही मोठा तीर मारला अशा आवेशात दुसऱ्या दिवशी आरामच व्ह्यायचा. मनातून वाटत राहायचे कि रोज सायकल चालवायला हवी पण पुश मिळत नव्हता. दरम्यान डॉ श्रीहास यांनी चॅलेंजची आयडियाची कल्पना मांडली आणि ग्रुपवर निस्ता धुमाकूळ चालू झाला. कामात गर्क असल्याकारणाने हा धुमाकूळ मिस झाला पण त्या संध्याकाळीच sagarpdy भाऊंचा "आपण टीम बनवायची का?" असा मेसेज आला. त्या आधी सागरशीच सिंहगड सर करण्याबद्दल बोलणे झाले होते त्यामुळे त्या संदर्भात काही असेल असे वाटून मी हो म्हंटले (और तीर कमान से छूट गया!). रात्री सगळे मेसेज वाचल्यावर कळले हे काहीतरी वेगळेच गौडबंगाल आहे. सागर ५० x ७ चा चॅलेंज उचलण्याबद्दल बोलत होता. तरी टीम मध्ये मिळून ५० करायचे असल्याने फार ताण येणार नव्हता म्हणून मीही लावून धरले. पण न चुकता रोज किमान ५ किमी तरी करावेच लागणार होते. म्हंटल होऊन जाऊद्या. आम्ही तिसरा गाडी शोधायचे ठरवले आणि नकुल तयार झाला. ठरल्या दिवशी (२ फेब्रुवारी) चॅलेंज सुरु झाला आणि ओघाओघाने रोज सायकलिंग सुरु झालं. वर्किंग-डे ला कंपनीत सायकल न्यायची आणि सुटीच्या दिवशी साधारण ३० किमी मारायचे असा प्रवास चालू होता. पण........... sagarpdy च्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. या पट्ठ्याने या चॅलेंजबरोबरच मासिक ५ घाटांचा वैयक्तिक चॅलेंजसुद्धा उचलला आणि पहिल्याच दिवशी पाबे (प्रचंड थकवणारा) आणि कादवे असे २ घाट सर केले. दरम्यान आमचा तिघांचा कायप्पा ग्रुप तयार झाला होता. त्यात सागरने दुसऱ्या दिवशी दिवे घाट मारण्याची मनीषा बोलून दाखवली (च्यायला मी मागच्यावेळेस पाबे मारला होता तर एक आठवडा विश्रांती घेतली होती. याने दोन अवघड घाट मारलेत आणि लगेच ३र्याची तयारी थक्क करणारी होती). नकुलला काही कारणामुळे जॉईन होणे शक्य नसल्यामुळे आम्ही हा घाट सर करण्याबाबत चर्चा चालू झाली. पण त्या दिवशी सकाळी ११ ला मला एक महत्वाचे काम असल्याकारणाने मी काढता पाय घेतला. तरी एखादा न चढवलेला घाट चढण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. सकाळी उशिरा उठलो होतो पण (जुना) कात्रज घाट आवाक्यात असल्याचे लक्षात आल्यावर अजिबात वेळ न दवडता सायकल घेतली आणि निघालो आणि बघता बघता घाट पूर्ण केला. घरी आल्यावर समजले योगायोगाने सागरनेही दिवे घाट संपवून जुना कात्रज घाटही सर केला होता (बापरे...दोन दिवसात ४ घाट...अबब!!!). पुढच्याही दिवशी सुट्टी होती. कायप्पा ग्रुपवर सागरने बोपदेव घाटाचा बेत ठरवला होता. पण आजच कात्रज घाट केला होता आणि उद्या लगेच घाट? पण परत म्हंटल होऊन जाऊदे एकदाचं. शिवाय सागर बरोबर असणारच होता, त्याच्याकडूनच प्रेरणा घाऊ. शेवटी १ वर्ष पेंडिंग असलेला बोपदेव घाट पार पडलाच. यातून काही महत्वाच्या गोष्टी शिकलो. १. Physical stress येणे साहजिक आहे पण तो जाणवणे आधी मेंदूत सुरु होते. तुम्ही स्वतःला पुश केलेत तर शरीर सुद्धा साथ देते. फक्त निश्चय पक्का पाहिजे. २. रेगुलर व्यायाम करणे फार कष्टप्रद असते असे आजपर्यंत समजत होतो तो एक "भ्रम" होता हे क्लिअर झाले. ३. आपल्या आजूबाजूला खूप "प्रेरणा" असतात. आपण त्यांना ओळखलं पाहिजे. ४. सर्वात महत्वाचे म्हणजे "क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!" हे प्रकर्षाने जाणवले. असो....असे चॅलेंजेस सुरु राहणार. तूर्तास चालू चॅलेंज पूर्णत्वास नेण्यास अग्रक्रम.
  • Log in or register to post comments

+११११११

दाते प्रसाद
Wed, 02/08/2017 - 10:50 नवीन
+११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ

मोदका

शैलेश दरेकर
Tue, 02/07/2017 - 16:05 नवीन
मोदका, माझेही १.५-२ कि.मी चालणे धरणार का तुमच्या टिम मधे ? तेवढाच आपला खारीचा वाटा... बाकी आपल रक्त "अति गोड" असल्याने फार काही जमेल अस वाटत नाही...
  • Log in or register to post comments

धरू की.. स्ट्रावा डाऊनलोड करा

मोदक
Wed, 02/08/2017 - 21:02 नवीन
धरू की.. स्ट्रावा डाऊनलोड करा आणि आपला ग्रूप जॉईन करा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेश दरेकर

अचाट प्रकार आहेत तुम्हा सगळ्यांचे!

शिवोऽहम्
Wed, 02/08/2017 - 02:27 नवीन
इथे सध्या रोज पाऊस पडतोय त्यामुळे धावणे जमत नाही. भर पावसात पळणारे गोरे आणि चीनी पाहिले की स्वतःची लाज वाटते पण मागे एकदा उत्साहाने पळणे सुरू केल्यानंतर गुडघेदुखी सुरू झाली होती. त्यामुळे पुन्हा पळणे सुरू करायचे तर 'कोअर स्ट्रेंग्थ' वाढवा असा मोलाचा सल्ला एका जाणकार मित्राने दिला. त्यानुसार ६० दंड व ४० बैठका गेले १५ दिवस नियमीतपणे सुरू आहे. आरंभशूरपणा नको म्हणून 'रनींग' शूज घेणे टाळतो आहे. पण पाऊस जरा थांबला की घेईन म्हणतो.
  • Log in or register to post comments

मलाही कुणी ह्याबाबतीत थोडं

पिलीयन रायडर
Wed, 02/08/2017 - 19:30 नवीन
मलाही कुणी ह्याबाबतीत थोडं सांगेल का? काल कंटाळा आला ट्रेडमिलचा म्हणुन सायकलिंग केलं जिम मध्ये. पण गुडघे फार दुखतात. सोबत काही पुरक व्यायाम करायला हवेत का? मुळात "कोअर स्ट्रेन्थ" म्हणजे काय? बिगिनर लेव्हलला सायकलिंगमध्ये रेझिस्टन्स किती ठेवावा हे ही कुणी सांगितलं तर बरं होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवोऽहम्

कोअर स्ट्रेंग्थ

शिवोऽहम्
Wed, 02/08/2017 - 23:19 नवीन
पाठ, पोट आणि कंबरेचे स्नायु म्हणजे साधारणपणे 'कोअर' म्हणता येईल. ते बळकट असतील तर धावताना योग्य पोश्चर राहील आणि मांड्या, गुडघे आणि पोटरीचे स्नायु यांवर अनावश्यक ताण पडणार नाही. सायकलींग करताना आधी (व नंतरही) स्ट्रेचेस नक्की करा, आणि हळूहळू रेझिस्टन्स वाढवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

सूर्य नमस्कार चॅलेंज

दाते प्रसाद
Wed, 02/08/2017 - 11:01 नवीन
डॉक ची आयडिया कॉपी करून आम्ही आमच्या नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये सूर्य नमस्कार चॅलेंज सुरु केलं आहे . प्रत्येकाने किमान ५ नमस्कार घालणं अपेक्षित आहे . ह्याला छान प्रतिसाद मिळाला आणि आमचा ग्रुप, फॉर्वर्डसऐवजी चॅलेंजची चर्चा करू लागला. रोज सकाळी अपडेट्स यायला लागल्यात , सगळं ग्रुप चार्ज्ड झाला आहे . येत्या १० तारखेला चॅलेंज पूर्ण व्हायला होईल .
  • Log in or register to post comments

व्वाह...!! टाळ्या..

मोदक
Wed, 02/08/2017 - 17:33 नवीन
व्वाह...!! टाळ्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दाते प्रसाद

मस्त

स्थितप्रज्ञ
Wed, 02/08/2017 - 19:00 नवीन
मस्त आयडिया....प्रत्येक ग्रुपने आदर्श घ्यावा अशी संकल्पना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दाते प्रसाद

भारी आयडीया आहे! कॉपी करण्यात

पिलीयन रायडर
Wed, 02/08/2017 - 19:28 नवीन
भारी आयडीया आहे! कॉपी करण्यात येईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दाते प्रसाद

आज पण ४२ किमी होतील.

मोदक
Wed, 02/08/2017 - 21:01 नवीन
आज पण ४२ किमी होतील. घर-हाफिस-घर
  • Log in or register to post comments

टीम सायक्लोमेनीयाक्स - सागर

मोदक
गुरुवार, 02/09/2017 - 09:30 नवीन
टीम सायक्लोमेनीयाक्स - सागर पाध्ये, स्थितप्रज्ञ आणि नकुल पाठक यांनी ५० किमी ७ दिवसाचे चॅलेंज यशस्वीरीत्या पूर्ण करून ६४८ किमी सायकलिंग केले..!! टाळ्या...!!!
  • Log in or register to post comments

जोरदार टाळ्या

अरिंजय
Sat, 02/11/2017 - 20:01 नवीन
टीम सायक्लोमॅनियाक्सचे दणकुन अभिनंदन. पाच घाट पालथे करणार्या सागर यांना दंडवत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा