✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी आज केलेला व्यायाम - फेब्रुवारी २०१७ - सायकलिंग / रनिंग चॅलेंज

म
मोदक यांनी
Wed, 02/01/2017 - 15:22  ·  लेख
लेख
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी. जानेवारी २०१७ - सायकलिंग - १०,७५५ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ६९५ किमी. ****************** सायकलिंग ग्रुपवर अनेक दिवस विशेष असे कांही घडत नव्हते. नियमीतपणे सायकल चालवणारे चालवत होते, मात्र अनेक जणांची सायकल उगाचच बंद झाली होती आणि जुन्या राईडचेच विषय चघळले जात होते. मग अचानक एक दिवस तिथल्या चावडीवर बोलताना डॉक्टर श्रीहास यांनी एक कल्पना मांडली. आपण नियम तयार करू आणि कांही आव्हाने ठेवू. या कारणाने का होईना पण लोकं पुन्हा सायकल चालवू लागतील..! देशपांडे मामा, सागर पाध्ये, प्रशांत सरपंच, डॉक्टर श्रीहास, मानसभौ आणि बाबा योगिराज.. आंम्ही सगळे जण लगेच यावर काम करू लागलो. आपआपल्या सुपीक डोक्यातून अनेक नियम काढले, हा नियम असावा का, नसावा का यावर चर्चा झाल्या, आंम्ही काढलेली आव्हाने (दिवसा ५० किमी सायकलिंग - असे सलग ७ दिवस) बाकी लोकांनी हाणून पाडली. त्या दृष्टीने विचार सुरू झाला. मध्येच सागर पाध्येंनी "एलिटिस्ट होवू नका रे" असा टोलाही हाणून घेतला. मग शेवटी असा निर्णय घेतला की एक तर ही आव्हाने टीम बनवून पार करायची किंवा एकेकट्याने पार करायची. सायकलश्री, सायकल रत्न अशा पदव्याही तयार झाल्या. ;) सायकल नसणार्‍यांना या उपक्रमात भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी पळण्याचे आव्हान तयार केले गेले. मूळ कल्पक डॉक्टर श्रीहास आणि बाकी टीमने भरपूर चर्चा करून पुढील नियम फायनल केले. १) कोणत्याही दिवशी चॅलेंज सुरू झाले तरी चालेल मात्र नक्की कोणते चॅलेंज आणि किती तारखेला सुरू करणार आहात याची माहिती स्ट्रावा किंवा व्हॉट्सप ग्रूपवर "चॅलेंज सुरू करण्यापूर्वी" द्यावी. २) कोणतेही चॅलेंज सलग ७ दिवस (कॅलेंडर डेज) पूर्ण झाले तरच गृहीत धरले जाईल. ३) टीम बनवून चॅलेंज पार पाडायचे असेल तर कमाल ४ लोकांची टीम तयार करावी लागेल, टीमचे रोजचे सायकलिंग ५० किंवा १०० किमी करावे लागेल, टीम मधील सर्वांनी रोज किमान ५ किमी सायकलिंग करणे आवश्यक आहे उदा. टीम मध्ये ३ सायकल स्वार असतील तर प्रत्येकाने रोज किमान ५ किमी सायकल चालवणे बंधनकारक आहे. दोघांनी २५ किमी आणि तिसऱ्याने ० असे झाले तर टीमला पुन्हा चॅलेंज सुरू करावे लागेल. ४) ७ दिवसांपैकी एखादा दिवस कांही कारणाने सायकलिंग झाले नाही तर संपुर्ण टीम चॅलेंजसाठी पात्र राहणार नाही, मात्र पुढील दिवसापासून नियम क्रमांक १ नुसार नवीन चॅलेंज सुरू करता येईल. उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला सायकलिंग झालेच नाही तर मी ६ तारखेपासून नवीन चॅलेंज सुरू करू शकतो जे १२ मार्चला संपेल. ५) वरील कोणताही नियम न बदलता - १०० किमीचे चॅलेंज घेतल्यानंतर अचानक कांही कारणाने ते ५० किमी मध्ये बदलता येईल. मात्र ५० किमीचे चॅलेंज १०० किमी मध्ये बदलण्यासाठी सगळे दिवस १०० किमी + सायकलिंग होणे आवश्यक आहे. उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च १०० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला ७५ किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीच्या चॅलेंजला पात्र असेन. तसेच समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले पण माझे पहिले चार दिवस प्रत्येकी १०० किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीचे चॅलेंज १०० किमीमध्ये बदलू शकतो. ६) ज्यांना रनिंग / वॉकिंग करायचे आहे त्यांनी टीम बनवुन चॅलेंज पूर्ण करावे. रनिंग साठीचे अंतर १० किमी, आणि प्रत्येक टीम मेंबरने किमान २ किमी रनिंग करणे आवश्यक. ******************** हे नियम ग्रुपवर टाकले आणि एकच हलकल्लोळ सुरू झाला, कांही तासातच टीम तयार झाल्या. टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी सायकलिंग ७ दिवस टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी सायकलिंग ७ दिवस लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी सायकलिंग ७ दिवस टीम लोड रनर - प्रसाद दाते, इरसाल कार्ट, मोदक - १० किमी रनिंग ७ दिवस यातील "लोन रेंजर" डॉक्टर श्रीहास यांनी आज सकाळी ५० किमीचे चॅलेंज पूर्ण केले. त्रिदेव आणि F1 जबरदस्त सायकलिंग करत आहेत. त्रिदेवांचे ५ दिवसात तब्बल ६६३ किमी सायकलिंग झाले आणि टीम F1 ४५१ किमी अंतर कापून त्यांना साथ देत आहे. चॅलेंज स्वीकारल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मला भटकंतीसाठी बाहेर पडावे लागले त्यामुळे एकच दिवस ५ किमी पळणे जमले व दुसर्‍या दिवशी चॅलेंज गुंडाळावे लागले. मात्र प्रसाद दाते आणि इरसाल कार्ट यांनी नाउमेद न होता दोघांतच आव्हान पूर्ण करायचा चंग बांधला आणि सध्या नियमीतपणे पळत आहेत. **************************** पुढील टप्पाही आता चर्चेत आहे. थोडी अवघड पण कस बघणारी आव्हाने सागर पाध्येंनी सुचवली आहेत. मासिक आव्हाने १. एक सलग फेरी ५० किमी (१०० किमी) २. एक सलग फेरी १०० किमी (कितीही) ३. एकूण अंतर ५०० किमी ४. एकूण अंतर १,००० किमी (*) ५. एकूण चढण ३,००० मी ६. एकूण चढण ७,००० मी (*) वार्षिक आव्हाने १. ५० किमी दररोज असे कोणतेही ४ आठवडे २. १०० किमी दररोज असा १ आठवडा ३. महिन्यात २२ वेळा ४०किमी + फेऱ्या (कसाही कॅलेंडर महिना) ४. महिन्यात २२ वेळा दिवसाचे ४० किमी (ऑफिस ऑफिस)⁠⁠⁠⁠ ५. किमान ५ घाट (*) **************************** सध्या या चॅलेंजमुळे ग्रुपवर सर्वजण एकदम उत्साहित आहेत, धमाल करत आहेत आणि अनेकजणांचे नियमीत सायकलिंग सुरू झाले आहे. **************************** @@@@@@@@@@@@@@@@@@@@ येथे विशेष उल्लेख म्हणून ज्यांनी ज्यांनी चॅलेंजे पूर्ण केले त्यांची माहिती देत आहे. १) लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ४३० किमी. २) टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ८८० किमी. ३) टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ५०२ किमी. ४) टीम लोड रनर - इरसाल कार्ट आणि प्रसाद दाते - १० किमी रनिंग ७ दिवस - एकूण रनिंग - ७९ किमी. ५) टीम सायक्लोमेनीयाक्स - सागर PDY, स्थितप्रज्ञ आणि नकुल पाठक - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ६४८ किमी. @@@@@@@@@@@@@@@@@@@@
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
38331 वाचन

💬 प्रतिसाद (184)

प्रतिक्रिया

सायकल सायकल ग्रुप..

देशपांडेमामा
Wed, 02/01/2017 - 18:12 नवीन
मोदक भाऊंनी लिहिल्याप्रमाणे बरेच दिवस ग्रुप फक्त राइड अपडेट किवा सायकल विषयी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीच हलत होता. पण ग्रुपच्या एकुलत्या एका डॉक्टरांनी (डॉ श्रीहास) ही आयडीयाची कल्पना काढली आणि ग्रुप एकदम जागा झाला! डॉ (तेच औ.बाद वरुन पुण्याला सायकल चालवत येणारे), मोदकभाऊ (ग्लोब ट्रॉटर) , पाध्ये (उत्साहाचा मुर्तिमंत झरा! ), मानसराव (बगेर गिअर सायकल किंग) आणि बाकी मेम्बेर्स मिळुन लगेच दोनच दिवसात कल्पनेचा प्रवास अस्तिवापर्यंत आला! एकमेकांना प्रोत्साहन देत प्रसंगी (प्रेमाने) दम देत चॅलेंज पुर्ण करण्याकडे टिम्सची वाटचाल सुरु झाली. काही टिम्सचे चॅलेंज पुर्ण झाले काहींचे एक दोन दिवसात होइल. ज्यांचे चॅलेंज पुर्ण झाले ते नविन चॅलेंज घ्यायला तयार पण झालेत ! हे सगळे बघता ह्या सगळ्या उपक्रमाचा मुख्य ऊद्देश जो लोकांना व्यायाम करण्यासाठी उद्युक्त करणे होता तो नक्कीच साध्य झाला आहे ! परत एकदा सर्व सास्वांचे (सायकल स्वारांचे :-) ) हार्दिक अभिनंदन !!! देश
  • Log in or register to post comments

७ दिवसात ३५० किमीचं लक्ष्य होतं....

डॉ श्रीहास
Wed, 02/01/2017 - 18:55 नवीन
३५० किमी होतील ... पण ७ दिवस रोजचे ५० म्हणजे सहज करण्यासारखं वाटत नव्हतं... ४थ्या आणि ५व्या दिवशी थकवा कमी पण कंटाळा त्रास देऊ लागला.... हे अपेक्षित होत पण आपणंच चॅलेंज दिलं आणि बाहेर पडणं हे बरं नव्हतं.... शिवाय रोजची कामं होतीच दिवस लांबवायला...जोर लावला ; एक १०० किमी ची पण राईड मारली... सोबतचे नियमीत सायकलींग करणारे कारणं देऊन गायब होत गेले .... विलपावर का काय आणली ब्वा अन् ४३० किमी पेक्षा जास्त सायकलींग झालं ७ दिवसात... फार काही तीर मारला नाही कारण जोरदार सायकलींग करणारे लोक माहीती आहेत ना !! फॅन्टास्टीक फिलींग होतं.... हा ५० X७ चा प्रयोग ३-४ वेळा करायचा आहे .... मिपा परिवार व सायकल गृप च्या शुभेच्छा लागणार आहेत बरं का !! श्री
  • Log in or register to post comments

जोरदार अभिनंदन

sagarpdy
Fri, 02/03/2017 - 20:44 नवीन
7 दिवस रोजच्या रोज, सगळ्या कामांच्या वेळा सांभाळून 50 किमी सायकल चालवणे फारच कठीण काम आहे. डॉक यांना वंदन करून लवकरच हे आव्हान एकट्याने पेलण्याचा प्रयत्न नक्की करणार. उरलेल्या 50 किमी आठवड्यांसाठी बेस्ट हॉप लक. डॉक्टरकाका आगे बढो, हम तुम्हारे साथ है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

_/\_

डॉ श्रीहास
Sat, 02/04/2017 - 08:22 नवीन
धन्स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

रोज ५० किमी!!

योगेश लक्ष्मण बोरोले
Wed, 02/08/2017 - 19:42 नवीन
अभिनंदन श्री! ५० किमी सायकलिंगला साधारण किती वेळ लागतो रोज?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

फक्त...

डॉ श्रीहास
गुरुवार, 02/09/2017 - 17:17 नवीन
२ तास... रोडबाईकवर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश लक्ष्मण बोरोले

रनर्सचं काय?

इरसाल कार्टं
Wed, 02/01/2017 - 20:45 नवीन
आम्ही अजून धावपट्टीवरच आहोत राव, आमचं काय?
  • Log in or register to post comments

अरे.. काय माणसं आहात की कोण

पिलीयन रायडर
Wed, 02/01/2017 - 20:54 नवीन
अरे.. काय माणसं आहात की कोण आहात!!!! बरं आता हे सांगा की आमच्यासारखे लोक्स काय करु शकतील? जिम आहे उपलब्ध. तर आम्ही ट्रेडमिल वगैरे वापरुन सहभाग घेऊ शकतो का? आम्ही जिमवाल्यांचा ग्रुप बनवु शकु.. काहीच न करण्यापेक्षा हे चांगलंय ना. जिमवाल्यांचा ग्रुप बनणार असेल तर कोण कोण यायला तयार आहे? अवांतर :- ह्या उपक्रमाचे एक नाव ठेवुन, लोगो बनवुन तो मिपावर सतत दिसेल असा टाकला पाहिजे. मिपा दशकपुर्तीलाच सुरु झालेल्या ह्या उपक्रमाला, प्रॉपर मार्केटींग करुन वाढवायला हवं. आंतरजालावर असा उपक्रम पहाण्यात नाही.
  • Log in or register to post comments

तुम्ही ट्रेडमिल वर धावा...

इरसाल कार्टं
Wed, 02/01/2017 - 21:07 नवीन
तुम्ही ट्रेडमिल वर धावा...मी रोडवर धावतो. प्रसाद दाते येतील बहुधा जोडीला. विचारतो त्यांना. आमचे चालेंज शुक्रवारी संपतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

फोन नंबर शेअर होण्याच्या

मोदक
Wed, 02/01/2017 - 21:09 नवीन
फोन नंबर शेअर होण्याच्या कारणाने असे कॉमन स्त्री-पुरूषांचे ग्रुप तयार होतील असे वाटत नाही. (..आणि अनेक प्रकारची बंधने येतात. दोघांनाही. त्यामुळे वेगळे ग्रुपच बरे. यू नो इट नाऊ.) त्यामुळे तु पुढाकार घे आणि बायकांचा एक ग्रुप काढ आणि तेथे असे उपक्रम राबव. फिरायला जा, सूर्यनमस्कार घाला, सायकल चालवा किंवा जिममध्ये घाम गाळा.. काहीही करा. इथे अपडेट करा, आणखी लोकांना उद्युक्त करा. नवीन लोक आपल्यापेक्षा जास्त सूर्यनमस्कार घालतील, जास्त सायकल चालवतील, त्यांना मागे टाकण्यासाठी आळस झटकून तयार व्हा आणि सकारात्मक स्पर्धेने नियमीत व्यायाम करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मला माहित नव्हते...

इरसाल कार्टं
Wed, 02/01/2017 - 21:19 नवीन
मला माहित नव्हते पिलियन रायडर स्त्री आहेत. नै जमणार मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

फोन नंबरच शेअर व्हायला हवं

पिलीयन रायडर
Wed, 02/01/2017 - 21:21 नवीन
फोन नंबरच शेअर व्हायला हवं असं नाहीये ना. व्यनि मध्ये ग्रुप होऊ शकतो. टारगेट ठरवुन करायचं सगळ्यांनी रोज पुर्ण. किंवा इथेच एक ओपन ग्रुप होऊ शकतो. अर्थात मुली वेगळा ग्रुप बनवु शकतात, ते जास्त सोप्पंय वगैरे ठिक आहे. पण लगेच शाळेत असल्या सारखं मुली-मुलींचा ग्रुप.. मुला-मुलांचा ग्रुप काय!! मार्ग काढा की! असो.. जिमचा इथेच ओपन ग्रुप करु सध्या. जे जे करु शकतील ते इथे लिहतील. टारगेटः- ट्रेडमिलवर चालणे/धावणे किंवा सायकल वर - रोज ५ किमी किमान - सलग ७ दिवस ठिके? कोण कोण येतंय बोला? ह्या वीकांताला सुरु करता येईल चॅलेंज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

आम्ही ढीग मार्ग काढू हो.. पण.

मोदक
Wed, 02/01/2017 - 21:29 नवीन
आम्ही ढीग मार्ग काढू हो.. पण.. जाउदे.. तारखा सांग ५ किमी च्या. मी पण पेश्शल ५ किमी सायकल चालवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

४ फेबला जमवायचं का? शनिवारी

पिलीयन रायडर
Wed, 02/01/2017 - 21:34 नवीन
४ फेबला जमवायचं का? शनिवारी सुरू करतो. ते पुढे ७ दिवस. मी तर करेन ७ दिवस रोज. इतर कुणी जॉईन होणार असेल तर इथे लिहा. एक प्रश्नः- रोज एकच एक करायचं का? म्हणजे एक दिवस सायकलिंग आणि एक दिवस ट्रेडमिल चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

कसेही चालेल. पण ५ किमी पळणार

मोदक
Wed, 02/01/2017 - 21:42 नवीन
कसेही चालेल. पण ५ किमी पळणार असलीस तर त्याच्या तुलनेत १० किमी सायकलिंग करावे असे मला वाटते. सुरू तरी करूया. मग सुचत जाईल तसे सुधारणा करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

सर... लिहीताना विचार तर करा

पिलीयन रायडर
Wed, 02/01/2017 - 21:46 नवीन
सर... लिहीताना विचार तर करा की राव आमचा. १० किमी सायकलिंग नाही तर ५ किमी पळणे!! =)) ३ किमी चालणे ही सध्या अचिव्हमेंट वाटतेय!! मी माझ्या औकात प्रमाणे टारगेट सेट केलं तर चालेल का? ५ किमी ट्रेडमिल करु शकेन पहिल्या टप्प्यात. जर ते जमलं नीट तर परत नेक्स्ट लेव्हल चॅलेंज घेते. ओके?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ओके, तू सांग किती सायकलिंग /

मोदक
Wed, 02/01/2017 - 23:23 नवीन
ओके, तू सांग किती सायकलिंग / रनिंग करायचे ते. माझे रोजचे 40 किमी सायकलिंग होतेच. त्या नंतर तू सांगशील तितके सायकलिंग करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

स्वस्थ बस थोडा.. ४० किमी वर

पिलीयन रायडर
गुरुवार, 02/02/2017 - 08:47 नवीन
स्वस्थ बस थोडा.. ४० किमी वर अजुन काय करु म्हणे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

गुगल हँगाऔट वापरता येइल.

अंतु बर्वा
गुरुवार, 02/02/2017 - 02:31 नवीन
गुगल हँगाऔट वापरता येइल. हँगाउटच अ‍ॅप सर्व स्मार्टफोनवर अवेलेबल आहे. खरा इमेल पत्ता वापरायचीही गरज नाही. इथल्या सदस्यनामाशी मिळता जुळता जीमेल आयडी बनवला की झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ह्या उपक्रमाचे एक नाव ठेवुन,

पिलीयन रायडर
Mon, 02/13/2017 - 19:47 नवीन
ह्या उपक्रमाचे एक नाव ठेवुन, लोगो बनवुन तो मिपावर सतत दिसेल असा टाकला पाहिजे. मिपा दशकपुर्तीलाच सुरु झालेल्या ह्या उपक्रमाला, प्रॉपर मार्केटींग करुन वाढवायला हवं. आंतरजालावर असा उपक्रम पहाण्यात नाही.
हे मनावर घेऊन लगेच लोगो बनवल्याबद्दल धन्यवाद! अत्यंत झकास लोगो आहे! पण दोन बारिकशा सुचना करु का? १. हा लोगो फक्त स्वगृहवर दिसत आहे. तो कायमच दिसत राहिला पाहिजे. शक्यतो वर.. कारण हा गेले ४-५ महिने सातत्याने चालु असणारा महत्वाचा उपक्रम आहे. आणि चालु राहिलच. त्यामानाने लोगो लक्षात येत नाहीये चटकन. २. त्या लोगोवर क्लिक केलं की लेटेस्ट धाग्यावर जाता यायला हवं. बाकी उपक्रम झकास चालु आहे हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

इथे उत्साहाची, प्रोत्साहनाची

गवि
Wed, 02/01/2017 - 22:05 नवीन
इथे उत्साहाची, प्रोत्साहनाची कारंजी उडताहेत. धन्यु रे मोदका. तुझ्यावर रवाळ साजुक तूप पडो.
  • Log in or register to post comments

The Cyclomaniacs चा शुभारंभ

स्थितप्रज्ञ
गुरुवार, 02/02/2017 - 00:12 नवीन
कळविण्यास अत्यंत आनंद होतो की आमचे सवंगडी सागर आणि नकुल यांचेबरोबर सल्लामसलत करून आम्ही तिघांनीं उद्यापासून ५०x७ सायकलिंगचे आव्हान समर्थपणे पेलण्याचे योजिले आहे. टोळीचे नाव असेल The Cyclomaniacs. आनंदरावांचे आशिर्वाद आणि रेंजरची प्रेरणा आहेच....तुमची सर्वांची किरपा असुद्या... जय हिंद जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments

५०x७ चे आव्हान मस्त चालू आहे,

sagarpdy
Mon, 02/06/2017 - 10:19 नवीन
५०x७ चे आव्हान मस्त चालू आहे, आज ५ वा दिवस. ग्रुप मध्ये कल्पना दिली असली तरी इकडे टाकायचं राहून गेलं. आमच्या टोळीने ५० x ७ बरोबरच पुढील आव्हाने देखील स्वीकारली आहेत : १००० किमी सायकलिंग ७००० मी चढण (सायकलिंग) प्रत्येकी ५ घाट (सायकलिंग) डॉक श्री, टीम त्रिदेव यांनी मागच्या आठवड्यात प्रेरणेची घाऊक निर्मिती केली. त्याचा परिणाम हा विकांत एकदम भारी गेला. शनिवारी पुणे-पाबे घाट-वेल्हे(तोरणा)-कादवे घाट-पानशेत-पुणे अशी १०० किमी ची फेरी आणि त्यात २ घाट झाले. रस्ते बऱ्यापैकी खराब असल्याने फटिग आला होता. तरी रविवारी दिवे घाट करण्याचा मानस होता. तर सुखद आश्चर्य - माझा एक काका (वय वर्षे ५०+) म्हणाला मी पण येतो. मग एकदम स्फुरण आले आणि दिवे घाट मारलाच, जोडीला जवळच आहे म्हणून जुना कात्रज घाट पण करून झाला. (फोटो टाकले आणि ग्रुप वर मेसेज चा नुसता पूर) भरपूर खाऊन दुपारी मस्त झोप काढली, संध्याकाळी तसं फ्रेश वाटत होतं, तर हळूच आमच्या टोळी-सवंगड्याना म्हणालो - उद्या बोपदेव घाट करेन म्हणतोय. आमचे कप्तान - स्थितप्रज्ञ साहेब म्हणाले ते पण येत आहेत. एकदम खुश झालो. आज सकाळी उठून मी आणि स्थितप्रज्ञ खडीमशीन चौकात भेटलो आणि बोपदेव तासाभरात सर झाला पण! अशा प्रकारे माझे वैयक्तिक ५ घाटांचे आव्हान या वीकांतालाच सुफळ संपूर्ण झाले. टोळीचे प्रत्येकी ५ घाटांचे आव्हान स्थितप्रज्ञ आणि नकुल पुढे नेतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ

फारच जोरदार ....

डॉ श्रीहास
Mon, 02/06/2017 - 13:53 नवीन
तुम्ही लोकांनी हे चॅलेंज नेक्स्ट लेव्हल ला नेऊन ठेवलंय.... मजा येईल आता .... keep it up भावांनो ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

आम्ही आपला एक ओपन ग्रुप

पिलीयन रायडर
गुरुवार, 02/02/2017 - 08:59 नवीन
आम्ही आपला एक ओपन ग्रुप स्थापन करत आहोत. तुम्हा लोकांपुढे लिंबु टिंबु आहे. पण आमचाही खारीचा वाटा. ज्यांना जॉईन व्हायचंय त्यांनी व्हा. व्यनि साखळी करु हवं तर. हा फक्त मुलींचा ग्रुप नाही. ज्यांना अगदी थोडंफारही करायचं असेल त्यांनी सामील व्हा. नुसतंच विचार करत बसण्यापेक्षा २ सुर्यनमस्कार तरी घाला. ग्रुपचं वैशिष्ट्य असंय की सगळ्यांचं टारगेट सारखं नाही. कारण सध्या ज्या मुली हे करत आहोत, त्या सगळ्या वेगवेगळ्या रुटीनमध्ये अडकलेल्या आहेत. लहान मुल घेऊन काहींना सध्या थोडं अवघड आहे. सगळ्यांनाच ५ किमी पळणे वगैरे होणार नाही. पण ज्याला जे जमेल ते टारगेट घ्यायचं आणि सलग ७ दिवस ते पुर्ण करायचं इतकंच ठरवलं आहे. हे जमलं तर अजुन पुढच्या वेळेस थोडं अवघड ध्येय घेऊ. १. मी आणि स्रुजा - जिम मध्ये ५ किमी २. सामान्य वाचक - ५ किमी पळणे ३. विशाखा राऊत - ५ सुर्यनमस्कार ४. सविता ००१ - चालणे / सुर्यनमस्कार हे सध्या बोलणं चालु आहे. टारगेट्स पक्की करतो. साधारण ह्या शनिवारी सुरु करु.
  • Log in or register to post comments

गृप चं नाव पण ठेवायचं आहे का

स्रुजा
गुरुवार, 02/02/2017 - 19:06 नवीन
गृप चं नाव पण ठेवायचं आहे का ? सुचवा काही तरी. बादवे इथले टारगेट्स बघता #कुठेतोंड्लपवू असं झालंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

"iWorkout" हे नांव कसे वाटते.

मोदक
गुरुवार, 02/02/2017 - 20:41 नवीन
"iWorkout" हे नांव कसे वाटते..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

"iWorkout" हे नांव कसे वाटते.

पिलीयन रायडर
Fri, 02/03/2017 - 19:46 नवीन
"iWorkout" हे नांव कसे वाटते..?
हुच्च्भ्रु! सध्या आम्हाला सलग ७ दिवस होईल का ह्याचा विश्वास नसल्याने आणि ह्यावर आम्ही फार चर्चाच केली नसल्याने - "लिंबुटिंबु"! (अजुन बरं काही सापडलं तर बदलु पुढच्या वेळेला.) ग्रुप :- लिंबुटिंबु ध्येय : - ४ फेब पासुन ७ दिवस रोज स्रुजा - ५ किमी - जिम पिरा - ५ किमी - जिम विश - ५ सुन सावा - ५ किमी - पळणे सवि - ६ किमी - चालणे इशा - ३ किमी चालणे + २५ सुन स्वाती - २५ सुन हाहा - ९ किमी सायकलिंग हे तुमच्या मुळ चॅलेंजपेक्षा फार वेगळं आहे. पण वर्किंग मदर्सचा विचार करुन आम्ही बदल केलेत. चालवुन घ्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

टाळ्या..!!!!! सुरूवात

मोदक
Fri, 02/03/2017 - 20:05 नवीन
टाळ्या..!!!!! सुरूवात केल्याबद्दल अभिनंदन..! इथे नियमीतपणे अपडेट देत रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पिरा ताई..

डॉ श्रीहास
Sat, 02/04/2017 - 14:34 नवीन
व्यायाम करताय हे जास्त महत्वाचं आहे , आम्ही कोणीही प्रोफोश्नल अॅथलिट्स नाही आहोत .... वर्ष दोन वर्षापुर्वी सुरुवात केलेली लोक आहोत, नियमित सरावानंतर तुमची पण क्षमता नक्कीच वाढेल... आणि महत्वाचं म्हणजे कोणाशीही तुलना करू नका _/\_... तुमचं तुमचं चालू द्या , सोबत कोणी असो वा नसो,कंटाळा तर मदत करायला आम्ही लोक आहोतच ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

वाह

बाबा योगिराज
Sat, 02/04/2017 - 14:36 नवीन
चला, पिरा तै, तुमच्या मुळे सुरवात झाली. असेच हळु हळु सुरु करा, नंतर नियमित होत जात. उपक्रमास शुभेच्छा. बाबा योगिराज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुमचा पुढील आठवड्यात असाच

सही रे सई
Sat, 02/18/2017 - 03:51 नवीन
तुमचा पुढील आठवड्यात असाच आव्हान सुरु ठेवायचा विचार असेल तर मी पण सामील होते यात. फक्त विकांताला जरा अवघड आहे हे करणे (न जाणो या अव्हान प्रकरणामूळे होईलही कदाचित).. इतर दिवशी ५-६ किमी सायकलिंग ते पण हिल इंटर्व्हल मधे करायला जमेल मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हो.. आता हे सततच चालु राहील.

पिलीयन रायडर
Sat, 02/18/2017 - 07:09 नवीन
हो.. आता हे सततच चालु राहील. तू सुरू कर. किमान ७ दिवसांचं तरी चॅलेंज घे. त्याने वीकेंडला सुद्धा व्यायाम होतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई

पिरा,

सप्तरंगी
गुरुवार, 02/09/2017 - 20:46 नवीन
पिरा, हा ओपन ग्रुप कुठे सुरु केला आहे, मी जॉईन करू शकते का ? वॉट्स ऍप वापरात नाही बाकी ए-मेल ने वगैरे चालू शकेल मला. हे व्यनि काय आहे ? (फारच डफ्फर प्रश्न आहे का ?:)) आणि हो मी रोज ५ km पूर्ण करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

२९ जानेवारीला पुणे मॅरेथॉन

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 02/02/2017 - 10:24 नवीन
२९ जानेवारीला पुणे मॅरेथॉन होती. २१ किमी हाफ मॅरेथॉन २ तास ५१ मिनिटात कशीबशी फाफलत पूर्ण केली. आता एप्रिल मधे २०० ची बीआरएम करणार.
  • Log in or register to post comments

कशीबशी?

पैसा
गुरुवार, 02/02/2017 - 10:26 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

वा अभिनंदन , कुठलीही मॅरथॉन

माझीही शॅम्पेन
Fri, 02/03/2017 - 12:07 नवीन
वा अभिनंदन , कुठलीही मॅरथॉन पूर्ण करणे हे महत्वच आहे , लावलेला डाव अर्ध्यात सोडता कामा नये - फक्त एक सांगतो सतत दर महिन्याला मॅरथॉन पळू नये , एक ही दुखापत काही काळासाठी ऑफ ट्रॅक करते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

सुरुवात अशीच असते.. धावत रहा.

बाळ सप्रे
Fri, 02/03/2017 - 12:22 नवीन
सुरुवात अशीच असते.. धावत रहा.. वर्षभरात तुम्हीच सांगाल २:५१ चे २ तास कसे झाले ते .. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

ज्जे बात

बाबा योगिराज
Sat, 02/04/2017 - 14:37 नवीन
दादानु, मुजरा घ्या. बाबा योगिराज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

कसं जमतं हो पळायला ?

डॉ श्रीहास
Sat, 02/04/2017 - 14:49 नवीन
१०० किमी सायकलींग ला काही वाटतं नाही, पण १० किमी सुध्दा पळता येत नाही.... २१ किमी ची हाफ मॅरेथाॅन पण चालतच ३:०९ तासात पुर्ण केली होती :)) मॅरेथाॅनसाठी तुमचं खुऽऽऽऽऽऽप अभिनंदन ._/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

मस्त चॅलेंज ...

अमर विश्वास
गुरुवार, 02/02/2017 - 17:24 नवीन
मस्त चॅलेंज ... माझे फेब्रुवारी महिन्याचे टार्गेट : रोज ५ किमी रनिंग + सायकल (एक आड एक दिवस ) म्हणजेच दर आठवड्याला १५ किमी रनिंग + १५ किमी सायकल
  • Log in or register to post comments

मी महिनाभर तरी आऊट

पैसा
गुरुवार, 02/02/2017 - 19:23 नवीन
माझा घोटा पुन्हा स्प्रेन झालाय. आता खुर्चीत पाय वर घेऊन बसलेय मिपावर कीबोर्ड चालवत.
  • Log in or register to post comments

(No subject)

मोदक
Fri, 02/03/2017 - 11:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

पाच दिवसाची पळापळ

अनरँडम
Fri, 02/03/2017 - 20:09 नवीन
रविवारः ५ मैल सोमवारः (कन्हत-कुथत) ४ मैल मंगळवारः ४.६ मैल बुधवारः ४.७५ मैल गुरूवारः ५ मैल आज विश्रांती घेण्याचा विचार आहे. येथून प्रेरीत होऊन कदाचित एप्रिल-मे महिन्यात अर्धी मॅरॅथॉन पळावी असा विचार भीत भीत करत आहे.
  • Log in or register to post comments

लोड रनर्सचं चॅलेंज पूर्णत्वास...

इरसाल कार्टं
Fri, 02/03/2017 - 22:57 नवीन
आज लोड रनर्सचं चॅलेंज आज पूर्णत्वास आलं. मोदक, प्रसाद दाते आणि मी स्वीकारलेलं प्रतिदिन १० किमी धावण्याचं आव्हान मोदकाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तिसऱ्या दिवशीच नव्याने मी आणि प्रसाद दातेंनी मिळून सुरु केलं. मोदकाच्या प्रोत्साहनामुळे आम्हालाही खास हुरूप आला आणि आम्ही दोघांनीच आज हे आम्हां पूर्ण केलं. सोबत स्टॅट्स जोडत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

फोटो दिसत नाहीये.

मोदक
Fri, 02/03/2017 - 23:03 नवीन
फोटो दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल कार्टं

Flickr वरुन डकवला होता.

इरसाल कार्टं
Sat, 02/04/2017 - 07:34 नवीन
Flickr वरुन डकवला होता तरीही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हा घ्या आता दिसतोय.

इरसाल कार्टं
Sat, 02/04/2017 - 10:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

वाह

बाबा योगिराज
Sat, 02/04/2017 - 14:41 नवीन
एक भारी उपक्रम पुर्ण झालाय. अभिनंद्न. स्वगतः- च्या मारी मी कधी असा पळू शकेल? बाबा योगिराज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल कार्टं

प्रेरणादाई उपक्रम ..

अमर विश्वास
Sat, 02/04/2017 - 09:59 नवीन
प्रेरणादाई उपक्रम .. मोदक .. डॉक्टर .. या सर्वांचे उपडते पाहून स्फुरण चढते ... या आठवड्यातला केलेला व्यायाम : सोमवार : ४.५ किमी रनिंग (३० मिनिटे) मंगळवार : ५ किमी रनिंग (३४ मिनिटे) बुधवार : सायकल ६ किमी गुरुवार : ५ किमी रनिंग (३४ मिनिटे) शुक्रवार : सायकल ६ किमी शनिवार : आजचा प्लॅन : हनुमान टेकडीवर पाळणे : कांचनगल्ली पासून टेकडी चढणे ----ARAI --- वेताळ टेकडी ---- चतुश्रुंगी --- पाषाण आणि परत ... अंदाजे अंतर ८ किमी (प्रत्यक्षात किती होते ते रात्री लिहीनच )
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा