भारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे.
सगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर "बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते.
तर खूप वर्षे भारतात नोकरी केल्यावर आमच्या कंपनीने एकदाचे आम्हाला अमेरिकावारी घडवून आणण्याचे ठरवले. नियमाप्रमाणे सुरुवातीच्या खर्चासाठी $३००० हे ऍडव्हान्स म्हणून देतात, त्यातील $२८०० हे HDFC च्या प्री लोडेड डेबिट कार्डवर तर $२०० रोख अश्या स्वरूपात मिळतात. मला $२०० हे $१०० च्या २ नोटा अश्या स्वरूपात मिळाले. तेव्हा अमेरिकेची काहीच माहिती नसल्याने एवढा विचार केला नाही आणि $१०० च्या २ नोटा आणि बरोबर स्वतः घेतलेले थोडे डॉलर्स घेऊन न्यू यॉर्क मध्ये पाऊल ठेवले.
जवळचे सुट्टे डॉलर्स तर लगेच संपून गेले आणि $१०० च्या २ नोटा व डेबिट कार्ड वरचे $२८०० उरले. बहुतेक सर्व दुकानांमध्ये $२० च्या वरील नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असे बोर्ड्स लावलेले असतात. आता आली का पंचाईत, पक्का भारतीय असल्याने कॅशने खर्च करण्याची सवय आड येत होती आणि वर HDFC डेबिट कार्ड असल्याने काही ठिकाणी स्वीकारले जायचे तर काही ठिकाणी प्रॉब्लेम यायचे. दुकानदारांना HDFC म्हणजे काय हे माहित नसल्याने त्यांचीही काही मदत होऊ शकत नव्हती. शेवटी बँक ऑफ अमेरिकेत खाते उघडताना त्यात सुरुवातीची रक्कम म्हणून भरून सुटका करून घेतली. मग BOA च्या डेबिट कार्डवरून ATM मधून $२० च्या नोटा मिळू लागल्या.
तर, अमेरिकन बँकेचे डेबिट कार्ड मिळवून एक अडथळा पार झाला. पण माझे मित्र म्हणत होते की क्रेडिट कार्ड काढणे महत्वाचे आहे कारण त्यातून क्रेडिट हिस्टरी तयार होते व ते पुढे बरेच फायदेशीर पडते. हे काही माझ्या डोक्यात शिरत नव्हते की एक तर क्रेडिट हिस्टरी का बनवायची आणि त्यासाठी क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे? मी माझी सगळी बिलं, म्हणजे विजेचं; पाण्याचं; फोनचं बिल, व्यवस्थित भरलं की झालं. पण तसं नाही, क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचं कर्ज आहे आणि तुमची पत तयार करायची असेल तर हे कर्ज घेऊन ते सलग वेळच्या वेळी फेडले पाहिजे.
तरी पण विचार होता की क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे, उगाच कर्ज काढून नसतं लचांड मागे लावून घ्यायचं. पण मग एकदा गाडी भाड्याने घेताना लक्षात आलं की क्रेडिट कार्ड गरजेचे आहे. डेबिट कार्डवर मिळत नाहीच असं नाही पण कमी रेंटल कंपन्या डेबिट कार्ड स्वीकारतात. मग आता क्रेडिट कार्ड मिळवणे आले. पण ते एवढे सोपे नाही. बँक ऑफ अमेरीकेने क्रेडिट कार्ड द्यायचे नाकारले म्हणून मग इथे सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड म्हणून मिळते ते घ्यायचे ठरवले. हे थोडक्यात असे असते की तुम्ही बँकेत एक ठराविक रक्कम म्हणजे उदा. $१००० ठेवायची आणि त्याबदल्यात बँक तुम्हाला $१००० चे क्रेडिट कार्ड देणार, वर $४० वार्षिक फी पण घेणार. मी $१००० दिले व कार्डसाठी अर्ज दिला. पण इथेही नशीब असं की तो अर्ज पण रिजेक्ट झाला. इथे माझ्या नंतर आलेल्यांना महिन्याभरात क्रेडिट कार्ड्स मिळत होती आणि तब्बल १ वर्ष अकाउंट असूनही मला मात्र मिळत नव्हते.
अखेरीस दीड वर्षांनी एकदाचे बँक ऑफ अमेरिकेने कृपा केली आणि मला एक क्रेडिट कार्ड दिले. मग त्याचे बिल मी अगदी नित्यनेमाने भरले. होताहोता क्रेडिट स्कोअर वाढू लागला. मग हळू हळू कार्डच्या ऑफर यायला लागल्या. त्यात पहिली मिळालेली म्हणजे तुम्ही त्या कार्डवर, तुमच्या लिमिटच्या आत, कितीही खर्च करा पण जर का बिल वेळेवर भरलं तर प्रत्येक तिमाहीला $२५ कार्डवर क्रेडिट देणार. मग काय घेऊन टाकलं. थोड्या दिवसांनी अजून एका कार्डावर काहीतरी ऑफर मिळाली असं करता करता कार्ड्स जमा होऊ लागली. पण मग त्यांचे बिल वेळेवर भरणे ही एक डोकेदुखी होऊ लागली. जर का एक जरी दिवस उशीर झाला तरी भरभक्कम लेट फी आणि व्याज भरायला लागणार. पण मग ऑटो पे नावाची एक सुविधा कामी आली. मग कार्ड्स वरच्या जमा झालेल्या पॉइंट्सने एखादी वस्तू घेता यायला लागली. उदाहरणार्थ एक कार्डच्या पॉईंट्स वरून मला एकही पैसे न देता $८० चे ब्लूटूथ हेडसेट्स घेता आले. पण हे किरकोळ ठरेल असे दोन फायदे अजून दोन कार्डने मिळाले.
एका कार्डची ऑफर आली की कार्ड मिळाल्यावर पहिल्या ३ महिन्यात $३००० खर्च केले तर ५०००० पॉईंट्स मिळणार. या कार्डची वार्षिक फी $९५ होती जी पाहिलं वर्ष माफ असणार. म्हणून घेतलं कार्ड, पण $३००० खर्च करायचे? मग एक आयडिया काढली. तसंही घराचं भाडं भरायला लागतंच ते कार्ड वर भरूया. पण जर कम्युनिटीच्या (सोसायटी) च्या वेबसाईट वरून $३५ फी लागत होती. मग अजून शोध घेतला तर rent.कॉम नावाच्या एका साईटवर $२० चार्जेस होते. पण म्हणजे $६० खर्च करायचे? अजून एक आयडिया काढली की ३ महिन्याचं भाडं एकदम भरायचं मग त्याला पण $२० चार्जेस पडणार. पण मग $३००० ची एकदम सोय करायची? तर नाही, जर का नीट बघितलं तर पहिल्या महिन्याच्या शेवटी भाडं भरायला लागलं आणि ते भरायला जवळपास ५० दिवसाचा अवधी मिळाला. म्हणजे उलट मला $१००० ते $२००० वापरायला मिळाले.
आता या ५०००० पॉईंट्स चा काय फायदा होऊ शकतो? ५०००० पॉईंट्स म्हणजे ५०० डॉलर्स, एक मार्ग म्हणजे हे पॉईंट्स वापरून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. पण मी दुसरा मार्ग निवडला. हे पॉईंट्स युनाइटेड एरलाईन्सला ट्रान्सफर करायची सुविधा होती. आणि ४२५०० पॉईंट्स वापरून पुणे ते अमेरिका वन वे तिकिट काढता येते, ज्याची तशी किंमत जवळपास ९००-१००० डॉलर्स असते. मला माझ्या वडिलांचे एका बाजूचे तिकीट या पॉईंट्सवर निघाले. पण आता परतीची पण सोय बघणे आवश्यक होते. पण ते वर्षभर थांबणार असल्याने वेळ होता. या कार्डला एक वर्ष पूर्ण होताच ते बंद करून टाकलं आणि अजून एक ऑफर घेतली ज्यात पहिल्या ३ महिन्यात $२००० खर्च केले की ४०००० पॉईंट्स आणि एक कार्ड वापरणारी व्यक्ती ऍड केली की १०००० पॉईंट्स असे ५०००० पॉईंट्स मिळणार होते. माझ्या कॅनडा ट्रीपचं बुकिंग मी या २००० डॉलर मध्ये केलं आणि टार्गेट पूर्ण केलं. त्यामुळे वडिलांचं परतीचं तिकीटसुद्धा ४२५०० पॉईंट्स च्या बदल्यात अमेरिका ते पुणे मिळालं. म्हणजे माझे जवळपास १५००-१७०० डॉलर्स वाचले.
पुढे दुसऱ्या एका कार्डवर एक ऑफर आली की ३ महिन्यात २००० डॉलर्स खर्च करायचे, यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचा फोन सगळे पैसे देऊन घेऊ शकता. आणि मग त्यातले ६५० डॉलर्स तुम्हाला परत मिळणार. म्हणजे मला ८०० डॉलर्सचा फोन फक्य २५० डॉलर्स ला पडला (बाकीचे खर्च मिळून).
तर मंडळी, क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का? मी म्हणीन जर तुम्ही कार्डचं बिल वेळच्यावेळी पूर्णपणे भरू शकत असाल तर नक्कीच फायदेशीर आहे. पण मग ट्रान्झॅक्शन चार्जेसचं काय? अमेरिकेत तरी बहुतेक कुठल्याही दुकानात, पेट्रोल पंपावर चार्जेस लागत नाहीत. अर्थात अमेरिकेतली काही भारतीय दुकानं अपवाद आहेत, ज्यात $१० च्या आतल्या बिलासाठी क्रेडिट कार्ड वापरलं तर ५० पैसे जादा द्यावे लागतात. पण त्याव्यतिरिक्त मला कुठे चार्जेस लागले नाहीत. उलट एक विशिष्ट सोय असलेलं कार्ड असेल तर दुसऱ्या देशात केलेल्या ट्रान्झॅक्शनवर पण Foreign Transaction चार्जेस लागत नाहीत.
अजून सांगायचे फायदे म्हणजे काही कार्ड्स अशी सुविधा देतात की रेंटल कार घेताना जर का ते कार्ड वापरलं तर इन्शुरन्स वेगळा घ्यायला लागत नाही. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी आणि त्याचा इन्शुरन्स असेल तर तो रेंटल कारला पण वापरता येतो. पण जर नसेल तर मात्र रेंटल कंपनीकडून इन्शुरन्स घ्यायला लागतो तो जवळपास गाडीच्या भाड्याएवढा असतो. तसेच कार्ड वापरून खरेदी केलेल्या वस्तूंना आपोआप जास्तीची वॉरंटी किंवा इन्शुरन्स आपोआप मिळतो. उदा. मी जर रेबॅनचा गॉगल एक कार्ड वापरून घेतला. पण ३ महिन्यांनी तो फुटला किंवा चोरीला गेला तर जरी रेबॅनने मला पैसे किंवा नवीन गॉगल द्यायला नकार दिला (माझा गहाळपणा हे कारण सांगून) तर मला कार्ड कंपनीकडून परतावा मिळतो. एखादी मोठी खरेदी, म्हणजे समजा आमची ४ जणांची भारतवारीची तिकिटं मी कार्ड वापरून काढली तर जवळपास ४-५ हजार डॉलर्स खर्च येतो. अश्या वेळेला मला बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा वापरता येते आणि त्याला भरायला बिनव्याजी १२-१८ महिन्यांचा कालावधी मिळतो. इथे स्टोअर कार्ड वापरून तुम्हाला त्या स्टोअरमधील खरेदीवर सूट मिळते. तसेच जमा झालेले पॉईंट्स पुढील खरेदीवर जास्तीची सूट मिळवून देतात.
अमेरिकेतसुद्धा कार्ड्स वापरणे किंवा रोखीशिवाय व्यवहार करणे ही संकल्पना रुजवताना त्रास झाला असेलच. उलट आता इथे नवीन आलेल्याला जर कार्ड लगेच मिळालं नाही तर त्रास होतो. तसेच तुम्ही केलेल्या काही उद्योगांमुळे क्रेडिट हिस्टरीवर परिणाम झाला असेल तरी कार्ड्स मिळत नाहीत व त्रास होतो.
हे सगळे माझे स्वतःचे अनुभव आहेत इतरांना वेगळे अनुभव येऊ शकतात. या धाग्याचा उद्देश फक्त कार्ड्स वापरून फायदा कसा करून घेता येईल हे सांगण्याचा आहे. ज्यांना घेता येईल त्यांनी फायदा करून घ्यावा अथवा .... | लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
86821
प्रतिक्रिया
290
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओके. पण काय आहे ना, की "जगावं
In reply to कन्सलटंसीचा काय उपयोग आहे ? by संजय क्षीरसागर
राईट प्लेस पण कशाला.. तुमच्या
In reply to ओके. पण काय आहे ना, की "जगावं by आदूबाळ
विकल्पाची दुनिया
टसुंभप्रतिसाद झाले असल्याने स्वतंत्र प्रतिसाद म्हणून लिहीत आहे. संक्षी, तुम्ही आनंदाच्या डोही सदैव तरंगत असता याबाबत माझ्या मनात तीळमात्रही संशय नाही. पण माझ्यासारखे जीव जगण्यासाठी तडजोडी करणारे असतात. व्यक्तिगत पातळीवर कर्जाच्या उपलब्धतेमुळे माझे जीवनमान उंचावले आहेत. कर्ज नसते तर परिस्थितीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकर्यांचे जीवन आणि माझे जीवन सारख्याच पातळीवर असले असते. तर कर्ज नेमके काय करते? कर्जाने वर्तमानात अनेक 'विकल्प' उपलब्ध होतात. आता विचार करा. एका शेतकर्याच्या मुलाला इंजिनियरींग कॉलेजला प्रवेश मिळण्यासाठी कर्ज घ्यावे लागले तर त्या मुलाकडे अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचा 'पर्याय' निर्माण होतो. कर्ज वर्तमानात पर्याय निर्माण करतात आणि भविष्यासाठी काही पर्यायांचा संकोच. पण शेतकर्याच्या मुलाचा कर्जशिवाय भविष्यात संकोच व्हावा इतकेही पर्याय नसतील. कर्ज काही लोकांसाठी 'गरज' असते. असो. इथे अनेकांनी तुम्हाला रोजच्या जगण्याच्या अनुभवांवरून प्रामाणिक युक्तिवाद केलेले आहेत. त्यांच्या चपला घालून क्षणभर विचार करा.अरा,
In reply to विकल्पाची दुनिया by अनरँडम
कर्ज नेमके काय करते? कर्जाने वर्तमानात अनेक 'विकल्प' उपलब्ध होतात.कर्जामुळे भविष्यकाळ निर्माण होतो ! थोडक्यात, जगायला आणि उपभोगायला सदैव वर्तमान काळच उपलब्ध असतो पण कर्जदाराला कर्ज फेडीची चिंता लागते आणि त्याचा वर्तमनाशी संपर्क तुटतो. शैक्षणिक कर्जाची परतफेड नोकरी नंतर करायची असते त्यामुळे विद्यार्थी निर्धोकपणे आभ्यासावर फोकस करु शकतो. विद्यार्थ्याचा वर्तमान भविष्याकडे उधार राहात नाही. गृह कर्जाची फेड लगोलग करायची असते त्यामुळे कर्जदाराचा वर्तमान बांधला जातो. यथावकाश जेव्हा कर्जफेड होते तेव्हा कर्जदार पुन्हा वर्तमनाशी कनेक्ट होतो परंतु दरम्यानच्या काळात त्याला स्वच्छंद जगण्याचं साहस करता येत नाही. म्हणजे त्या काळात काम आणि पैसा प्राथमिक आणि आपण दुय्यम राहतो. जेव्हा `काम न करण्याचा विकल्प' हरवतो तेव्हा कामातली मजा निघून जाते.मुद्दा समजला
In reply to अरा, by संजय क्षीरसागर
धन्यवाद !
In reply to मुद्दा समजला by अनरँडम
आम्हालाही समजवा प्लीज
In reply to मुद्दा समजला by अनरँडम
माझे आकलन
In reply to आम्हालाही समजवा प्लीज by ट्रेड मार्क
चला माझी तरी एक सोय झाली
:)
In reply to चला माझी तरी एक सोय झाली by धर्मराजमुटके
सायलेन्स!
काय करणार आहेस कार्ड घेऊन?
कार्ड घेऊन
In reply to काय करणार आहेस कार्ड घेऊन? by अजया
आता ट्रीपला निघालोयं
शेवटी तुम्ही पण वीकांतालाच ट्रीपला जाताय
In reply to आता ट्रीपला निघालोयं by संजय क्षीरसागर
ही फॅमिली ट्रीप इतरांनी त्यांच्या सोयीनं प्लान केलीये
In reply to शेवटी तुम्ही पण वीकांतालाच ट्रीपला जाताय by ट्रेड मार्क
गम्मत बघा
सहमत आहे
In reply to गम्मत बघा by ट्रेड मार्क
हरकत नाही
In reply to सहमत आहे by संजय क्षीरसागर
+१००००००००००
In reply to हरकत नाही by ट्रेड मार्क
तुमच्या केसमधे संक्षींचा
In reply to हरकत नाही by ट्रेड मार्क
माझीच केस काय
In reply to तुमच्या केसमधे संक्षींचा by संदीप डांगे
ट्रेमा,
In reply to हरकत नाही by ट्रेड मार्क
कृपया तत्वज्ञान न सांगता पैश्यांच्या भाषेत सर्वसामान्यांना समजेल असे सांगावे ही विनंती.तुमची कॅलक्युलेशन्स बरोबर आहेत. पण प्रश्न कॅलक्युलेशन्सचा असता तर चर्चेची गरजच नव्हती. प्रश्न `काम न करण्याच्या विकल्पाचा' आहे. २२ लाखाच्या फायद्यामुळे आज स्वच्छंद जगता येतं का हा प्रश्न आहे. जर तुम्ही मन मानेल तसं जगू शकत असाल तर तुमचा दुहेरी फायदा आहे. आणि जगू शकत नसाल तर त्या फायद्याला अर्थ आहे का ते तुम्ही ठरवा. पैश्याच्या भाषेत बोलायचं तर स्वच्छंदापुढे पैसा व्यर्थ आहे आणि तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर जोपर्यंत वर्तमानात जगण्याची खुमारी उमगली नाही तोपर्यंत भविष्याचा धसका कायम आहे.मन मानेल तसं जगणे
In reply to ट्रेमा, by संजय क्षीरसागर
ट्रेमा, तुमच्या प्रतिसादातच उत्तर आहे
In reply to मन मानेल तसं जगणे by ट्रेड मार्क
वर्तमानात जगायचं हे ठीक आहे उद्याचा दिवस कोणात्याही मनुष्यास चुकला नाही आणि उद्याचा दिवस नाही म्हणजे तो मनुष्य या जगात नाही.जो आजचा दिवस मनसोक्त जगू शकत नाही तो कधीच मनसोक्त जगू शकत नाही कारण आज ही एकमेव रियालिटी आहे. कल्पनेतला उद्या सुद्धा आज झाल्याशिवाय जगायला उपलब्ध नाही. उद्याची कल्पना करत आजमधे जगणं केवळ मनरंजन आहे.सगळे पैसे एका गोष्टीवर लावणे हे माझ्यामते तरी चूक आहे. कारण जरी व्यक्तिशः एखाद्याला उद्या नसला तरी त्याच्या बाकी कुटुंबाला तर असणारच आहे. वेळ सांगून येत नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण मी स्वतः त्यातून बरेचदा गेलो आहे.गरज असल्यावर पैसे खर्च करणं याशिवाय पैश्याचा दुसरा उपयोग नाही. भविष्यकाळाची भीती पैश्याचा आधार शोधते. पण वर्तमानात जगण्याचं कौशल्य पैश्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जे. कृष्णमूर्तींचं एक सुरेख विधान आहे `नाऊ इज दि अल्टीमेट सिक्योरिटी !' जो वर्तमानाशी समरुप आहे तो अस्तित्वाशी एकरुप असतो कारण अस्तित्वात एकच काळ आहे `वर्तमान'. भविष्यकाळ हा मनानं घातलेला धसका आहे.....आता घर एवढे महागाचे आणि खिश्यात पैसे नाही तर सांगा तुम्ही काय उपाय करणार?या काल्पनिक गोष्टीतून सुद्धा भविष्याची भीतीच प्रतीत होते . आता पुन्हा समेवर येऊ. भविष्याची भीतीच भविष्यकाळ निर्माण करते. ही भीती वर्तमानाचा उत्सव होऊ देत नाही. कर्ज घेणं म्हणजे भविष्यकाळ निर्माण करणं आहे. त्यामुळे वर्तमान भविष्याकडे उधार पडतो. इएमआयचा विचार (मग तो केव्हाही येवो) मन सक्रीय करतो. सक्रीय मन भीती निर्माण करतं, त्यानं रथाचा लगाम कृष्णाकडून (पक्षी आपल्याकडून) अर्जुनाकडे (पक्षी मनाकडे) जातो आणि जगण्यातला स्वच्छंद हरवतो. सगळी कॅलक्युलेशन्स बरोबर असतांना, ऋणमुक्त स्थितीत सुद्धा, वर्तमानात जगण्याचं साहस होत नाही हे तुमचा प्रतिसाद सांगतो. यावरनं कर्जदार व्यक्ती इएमआयनी बांधलेल्या आयुष्यात स्वच्छंद जगू शकणार नाही हा मुद्दा सिद्ध होतो.कमवायला लागल्यावर पहिली
In reply to ट्रेमा, तुमच्या प्रतिसादातच उत्तर आहे by संजय क्षीरसागर
छान !
In reply to कमवायला लागल्यावर पहिली by सुबोध खरे
संक्षी, खरं तर तुमची केस अपवादात्मक आहे
In reply to छान ! by संजय क्षीरसागर
ट्रेमा,
In reply to संक्षी, खरं तर तुमची केस अपवादात्मक आहे by ट्रेड मार्क
दि ऑप्शन नॉट टू वर्क
In reply to ट्रेमा, by संजय क्षीरसागर
ट्रेमा,
In reply to दि ऑप्शन नॉट टू वर्क by ट्रेड मार्क
यात माझ्यावर कर्ज आहे का नाही याचा काय संबंध? .....त्यामुळे आता हे कर्ज कसं फेडणार असं रोज डोक्याला हात लावून बसायची वेळ माझ्यावर येत नाही.कर्ज असतं आणि ते इतर कोणत्याही मार्गानं फेडण्याचा (फ्लॅट विकण्याशिवाय) उपाय नसता तर तुम्हाला ऑफिसला न जाण्याचा विचार डावलावा लागला असता.तुम्ही रोज उत्सव करा व करू नका पण नियोजन हे करावंच लागतं.नियोजन हे सुद्धा आताच्या क्षणीच होतं त्यामुळे हा क्षणच सर्व ठरवतो.तुम्ही अपॉइंटमेंट वगैरे देत किंवा घेत नाही का?नाही. आयत्या वेळी फोन करुन जी परिस्थिती असेल तसा निर्णय घेतो.तसेच स्टाफ असेल तर रोजच्यारोज पगार देता का?माझं झीरो स्टाफ ऑफिस आहे . काही कामं आऊट सोर्स केली आहेत. त्यामुळे ऑफिसला जाणं ही भानगड नाही.तुम्ही विकांताला ट्रिपला गेला होतात ते नियोजन न करता गेला होतात का?अर्थात ! मेव्हण्याचा फोन आल्यावर बॅग भरली आणि निघालो. त्याचं महिनाभर प्लानींग चालू होतं आणि तारखा सतत बदलत होत्या.अचानक शनिवारी सकाळी ७ वाजता वाटले ट्रिपला जायचं म्हणून कुठे जायचं ते न ठरवता गाडीत बसून निघालात आणि रस्ता नेईल तिकडे गेलात असं नेहमीच करता का? एखाद्यावेळी मी हे करतो पण तुम्ही प्रत्येक वेळी असंच करता का?हे मी कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी करु शकतो ! आणि यालाच तर स्वच्छंद म्हणतात.बाय द वे,
In reply to ट्रेमा, by संजय क्षीरसागर
वेळ
In reply to बाय द वे, by संजय क्षीरसागर
तसं नाहीये
In reply to ट्रेमा, by संजय क्षीरसागर
ऑफिसला न जाण्याचा विचार डावलावा लागला असता.हे जर तर मध्ये झालं. आणि जरी फ्लॅट विकायचा पर्याय नसता तरी मी हेच केलं असतं... नाही केलं होतं, पहिल्या फ्लॅटचं कर्ज पूर्ण फेडलेलं नव्हतं तेव्हा.नियोजन हे सुद्धा आताच्या क्षणीच होतं त्यामुळे हा क्षणच सर्व ठरवतो.पण हा क्षणच पुढच्या क्षणाविषयी ठरवतोय.आयत्या वेळी फोन करुन जी परिस्थिती असेल तसा निर्णय घेतो.म्हणजे तुम्हाला एखादा क्लायंट फोन करून विचारतो की वेळ आहे का, तुम्ही - मी फिरायला बाहेर आलोय. क्लायंट - परत केव्हा फोन करू. तुम्ही - तसं काही सांगता येत नाही, तुम्हाला जमेल तेव्हा करा, मी उपलब्ध आहे की नाही ते सांगीन दुसऱ्या वेळेला - हीच कहाणी रिपीट फक्त तुम्ही वेगळं काहीतरी करत असता. दुसरा सीन तुमचा दात दुखतोय म्हणून तुम्ही डॉक्टरला फोन करता डॉक्टर - अजून ५ पेशंट बसलेत तुम्हाला उद्याची अपॉइंटमेंट देतो तुम्ही - उद्या कुठे घेऊन बसलात. मी तुम्हाला उद्याचा आज झाला की फोन करतो. उद्याचा आज झाल्यावर तुम्ही फोन करता परत वरील संभाषण रिपीट.काही कामं आऊट सोर्स केली आहेत.मग त्यांना रोजच्या रोज कामं आणि पैसे देता का?त्याचं महिनाभर प्लानींग चालू होतंओह म्हणजे कोणीतरी कुठे जायचं काय करायचं याचं प्लॅनिंग केलं होतं तर.हे मी कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी करु शकतो !हे तर मी पण करू शकतो नाही तर करतो. मग फक्त मी गृहकर्ज घेतलंय म्हणून स्वच्छंद नाही? बादवे - दुसरा दिवस कशाला आपली दुसऱ्या क्षणाची ग्यारंटी नाहीये..
In reply to तसं नाहीये by ट्रेड मार्क
पहिल्या फ्लॅटचं कर्ज पूर्ण फेडलेलं नव्हतं तेव्हा.आज कर्ज नसतांना तुम्ही रोज सकाळी उठल्यावर जसं वाटेल तसं जगू शकता का ? याचं प्रामाणिक उत्तर शोधा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या एकाच प्रश्नात आहेत.म्हणजे तुम्हाला एखादा क्लायंट फोन करून विचारतो की वेळ आहे काइतके सीन्स होत नाहीत. दोघांना आता वेळ आणि मूड असेल तर काम होतं. खरं तर हल्ली असे प्रश्नच येत नाहीत. सगळं काम मेल्स आणि फोनवर होतं. इथल्या क्लायंटसनी तर मला पाहिलेलं सुद्धा नाही. सगळी कामं वेळेपूर्वीच पूर्ण असतात.उद्याचा आज झाल्यावर तुम्ही फोन करता परत वरील संभाषण रिपीटडेंटीस्ट माझा मित्र प्लस क्लायंट आहे. त्याला वेळ झाला की तो फोन करतो आणि मी जातो.मग त्यांना रोजच्या रोज कामं आणि पैसे देता का?अशी फार थोडी कामं आहेत. काम झालं की लगेच पैसे देतो आणि विषय संपतो.हे तर मी पण करू शकतो नाही तर करतो. मग फक्त मी गृहकर्ज घेतलंय म्हणून स्वच्छंद नाही?मग प्रश्न काये ? स्वच्छंद जगणार्याला प्रश्न पडत नाहीत, तो स्वच्छंद जगतो. तो शनिवारी सकाळी सात वाजता नाही, मन मानेल तेव्हा खुर्चीतून उठू शकतो.बादवे - दुसरा दिवस कशाला आपली दुसऱ्या क्षणाची ग्यारंटी नाहीये.दुसरा क्षण आहे कुठे ?एक उत्तर राहीलंच
In reply to . by संजय क्षीरसागर
ओह म्हणजे कोणीतरी कुठे जायचं काय करायचं याचं प्लॅनिंग केलं होतं तर.प्लानींग त्यांनी केलं होतं, मी नाही. मजा येईल असं वाटलं आणि निघालो. खरं तर सहलीचं मला कौतुक नाही कारण रोजचं जीवनच इथे सहलीला आल्यासारखं जगतो. जीवन अनप्लान्ड सहलीसारखं जगण्यालाच तर स्वच्छंद म्हणतात. प्लान नसेल तरच उत्कंठा आहे. इतरांना मात्र विषेश सवड काढावी लागते म्हणून त्यांनी प्लानींग केलं होतं. रविवारी संध्याकाळी इतरांना परतीचे वेध लागले तेव्हा पत्नीला तिची इच्छा असेल तर अजून एक दिवस राहायचं का विचारलं. बाय द वे, आता तिथे रात्रीचा १ वाजला असेल. काय करतायं तुम्ही ?हा प्रश्न
In reply to एक उत्तर राहीलंच by संजय क्षीरसागर
बाय द वे, आता तिथे रात्रीचा १ वाजला असेल. काय करतायं तुम्ही ?सोडून द्या.स्वच्छंदी जगणे हेच उत्तम जगणे हे गॄहितक कुणी ठरवले?
??
काय पण!
In reply to ?? by वपाडाव
तो गिरणीवाला
In reply to काय पण! by पैसा
हो ना!
In reply to तो गिरणीवाला by ट्रेड मार्क
ह ह पु वा..
In reply to ?? by वपाडाव
एक नट्राज आटा चक्की आणुन
In reply to ?? by वपाडाव
एक नट्राज आटा चक्की आणुन फेकलीये घरातमग काय घरातच रोज उत्सव !? ;) :)--
In reply to एक नट्राज आटा चक्की आणुन by डॉ सुहास म्हात्रे
ह.ह.मे.आ.
In reply to -- by वपाडाव
बिलकुल घेऊ नका आणि घेतलाच तर .....
खरं सांगायचं झालं तर क्रेडिट
तारतम्याने वापरले पाहिजे हे खरंच आहे
In reply to खरं सांगायचं झालं तर क्रेडिट by कॅप्टन जॅक स्पॅरो
एकदम चार नै ओ घेतली =)). हे
In reply to तारतम्याने वापरले पाहिजे हे खरंच आहे by ट्रेड मार्क
एकदम चार नै ओ घेतली =)). हे
In reply to तारतम्याने वापरले पाहिजे हे खरंच आहे by ट्रेड मार्क
:) :)
In reply to एकदम चार नै ओ घेतली =)). हे by कॅप्टन जॅक स्पॅरो
हे स्वच्छंद वगैरे ठीक आहे.
अहो, त्यांच्याकडे २५
In reply to हे स्वच्छंद वगैरे ठीक आहे. by सुबोध खरे
अप्पा,
In reply to अहो, त्यांच्याकडे २५ by अप्पा जोगळेकर
अशा माणसाने स्वच्छंदी पणाने जगले तर त्यात काय नवल आहे ? तसे नाही केले तरच आश्चर्य आहे.दोनदोन फ्लॅटस आणि लाखो रुपये बँकेत किंवा इतरत्र गुंतवलेले कैक लोक आज आहेत. स्वेच्छेनं जगणारा मात्र अजून एकही भेटला नाही.मी ५ वर्षांपूर्वी फ्लॅट घेतला
In reply to अप्पा, by संजय क्षीरसागर
अप्पा,
In reply to मी ५ वर्षांपूर्वी फ्लॅट घेतला by अप्पा जोगळेकर
त्यामुळे मी मुकाट्याने कर्ज काढले. मला त्याचे दु:ख नाही.मग आता अडचण काये स्वच्छंद जगायला ? मी सगळे पैसे लावले, तुम्ही नियोजन केलंय. आणि तुम्हीच तर म्हटलंय :कर्ज काढण्यासाठी स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास असावा लागतो. हे एक साहस आहे.कर्तबगारीवर विश्वास आहे आणि कर्ज घेण्याचं साहस आहे तर रोज सकाळी उठल्यावर मन मानेल ते करु असं जगायला कितीसं साहस लागतं ? आणि तुमच्या दृष्टीनं तर :कोपर्यावर उभे राहून सकाळ संध्याकाळ सिगरेट फुकत बसणारी मवाली मुले सुद्धा स्वच्छंदी जीवन जगतात.इतकं ते सहज आहे !आय अॅम हॅपी. इत्यलम.
In reply to अप्पा, by संजय क्षीरसागर
छान!
In reply to आय अॅम हॅपी. इत्यलम. by अप्पा जोगळेकर
कोपर्यावर उभे राहून सकाळ संध्याकाळ सिगरेट फुकत बसणारी मवाली मुले सुद्धा स्वच्छंदी जीवन जगतात.हा जसा तुमचा स्वच्छंदाबद्दल विचार आहे तसा माझाही विचार आहे :रोज सकाळी उठून कामाला जाणं आणि रात्री दमून झोपायचं कशासाठी तर सकाळी उठून परत कामाला जायचंय म्हणून ! इतकं साचेबद्ध जगणारे लोक सुद्धा आपण स्वच्छंदी जीवन जगतोयं आणि आनंदात आहोत या भ्रमात राहू शकतात.इतकं साचेबद्ध जगणारे लोक
In reply to छान! by संजय क्षीरसागर
माफ करा. सगळेच अधोरेखित झाले.
In reply to इतकं साचेबद्ध जगणारे लोक by अप्पा जोगळेकर
निर्णायक फॅक्टर्स बदललेले आहेत
In reply to अप्पा, by संजय क्षीरसागर
काही प्रश्नः-
In reply to अप्पा, by संजय क्षीरसागर
बाईश्री
In reply to काही प्रश्नः- by पिलीयन रायडर
उगाच त्यांना हिणवु नये. लोक आपआपल्या पद्धतीने आनंद शोधत असतात.तुमच्या याच अप्रोचमुळे चांगला मुद्दा कायम हरवत आला आहे. मी जगण्याचा एक वेगळा अंदाज़ मांडतो आहे. तुम्ही इतरांना कमी लेखतो हा स्टँड घेतला तर विषयच संपला. कित्येक महिने मला अक्षरशः एक रुपया सुद्धा मिळत नाही कारण धंद्यात मीटर चालू नसतं त्यामुळे उगीच भलते कंपॅरिटीवज आणण्यात अर्थ नाही. शून्य कमाईत तर लोकांचे प्राण कंठाशी येतील पण माझ्या जगण्यात कणमात्र फरक पडत नाही . शिवाय माझ्याकडे झीरो स्टाफ आहे यावरनं व्यावसाय किती मोठा असू शकेल याची कल्पना करा. पुन्हा आणि शेवटचं सांगतो साहसाचा पैश्याशी काहीएक संबंध नाही. तुम्ही स्वतः ला पैश्यापेक्षा श्रेष्ठ समजत असाल तर स्वच्छंद गवसतो. त्याचा क्वालिफिकेशन आणि बुद्धिमत्ता याच्याशी देखिल संबंध नाही तर स्वतःच्या गौरवाशी आहे. आणि मी या मार्गानं गेलो आहे. बाकी तुमची मर्जी. उद्या पुन्हा टेबलटेनीस टीमची पिकनिक आहे त्यामुळे उत्तरं द्यायला जमणार नाही. माझा मुद्दा मांडून झाला आहे आणि धागा ही नेहेमीच्या वळणावर चाललेला दिसतो त्यामुळे या धाग्यावर पुन्हा उत्तर देईन असं ही नाही.हे तर आपलं नेहमीचं झालं.
In reply to बाईश्री by संजय क्षीरसागर
स्वच्छंदी रहाण्याचा कर्जाशी
In reply to हे तर आपलं नेहमीचं झालं. by पिलीयन रायडर
+१
In reply to काही प्रश्नः- by पिलीयन रायडर
पिराताई, हा मिपावरील सर्वात
In reply to काही प्रश्नः- by पिलीयन रायडर
हांगाशी. आता हे स्वच्छंदाचे
In reply to अहो, त्यांच्याकडे २५ by अप्पा जोगळेकर
+१
In reply to हांगाशी. आता हे स्वच्छंदाचे by सुबोध खरे