Skip to main content

क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का?

लेखक ट्रेड मार्क यांनी गुरुवार, 19/01/2017 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे. सगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर "बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते. तर खूप वर्षे भारतात नोकरी केल्यावर आमच्या कंपनीने एकदाचे आम्हाला अमेरिकावारी घडवून आणण्याचे ठरवले. नियमाप्रमाणे सुरुवातीच्या खर्चासाठी $३००० हे ऍडव्हान्स म्हणून देतात, त्यातील $२८०० हे HDFC च्या प्री लोडेड डेबिट कार्डवर तर $२०० रोख अश्या स्वरूपात मिळतात. मला $२०० हे $१०० च्या २ नोटा अश्या स्वरूपात मिळाले. तेव्हा अमेरिकेची काहीच माहिती नसल्याने एवढा विचार केला नाही आणि $१०० च्या २ नोटा आणि बरोबर स्वतः घेतलेले थोडे डॉलर्स घेऊन न्यू यॉर्क मध्ये पाऊल ठेवले. जवळचे सुट्टे डॉलर्स तर लगेच संपून गेले आणि $१०० च्या २ नोटा व डेबिट कार्ड वरचे $२८०० उरले. बहुतेक सर्व दुकानांमध्ये $२० च्या वरील नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असे बोर्ड्स लावलेले असतात. आता आली का पंचाईत, पक्का भारतीय असल्याने कॅशने खर्च करण्याची सवय आड येत होती आणि वर HDFC डेबिट कार्ड असल्याने काही ठिकाणी स्वीकारले जायचे तर काही ठिकाणी प्रॉब्लेम यायचे. दुकानदारांना HDFC म्हणजे काय हे माहित नसल्याने त्यांचीही काही मदत होऊ शकत नव्हती. शेवटी बँक ऑफ अमेरिकेत खाते उघडताना त्यात सुरुवातीची रक्कम म्हणून भरून सुटका करून घेतली. मग BOA च्या डेबिट कार्डवरून ATM मधून $२० च्या नोटा मिळू लागल्या. तर, अमेरिकन बँकेचे डेबिट कार्ड मिळवून एक अडथळा पार झाला. पण माझे मित्र म्हणत होते की क्रेडिट कार्ड काढणे महत्वाचे आहे कारण त्यातून क्रेडिट हिस्टरी तयार होते व ते पुढे बरेच फायदेशीर पडते. हे काही माझ्या डोक्यात शिरत नव्हते की एक तर क्रेडिट हिस्टरी का बनवायची आणि त्यासाठी क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे? मी माझी सगळी बिलं, म्हणजे विजेचं; पाण्याचं; फोनचं बिल, व्यवस्थित भरलं की झालं. पण तसं नाही, क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचं कर्ज आहे आणि तुमची पत तयार करायची असेल तर हे कर्ज घेऊन ते सलग वेळच्या वेळी फेडले पाहिजे. तरी पण विचार होता की क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे, उगाच कर्ज काढून नसतं लचांड मागे लावून घ्यायचं. पण मग एकदा गाडी भाड्याने घेताना लक्षात आलं की क्रेडिट कार्ड गरजेचे आहे. डेबिट कार्डवर मिळत नाहीच असं नाही पण कमी रेंटल कंपन्या डेबिट कार्ड स्वीकारतात. मग आता क्रेडिट कार्ड मिळवणे आले. पण ते एवढे सोपे नाही. बँक ऑफ अमेरीकेने क्रेडिट कार्ड द्यायचे नाकारले म्हणून मग इथे सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड म्हणून मिळते ते घ्यायचे ठरवले. हे थोडक्यात असे असते की तुम्ही बँकेत एक ठराविक रक्कम म्हणजे उदा. $१००० ठेवायची आणि त्याबदल्यात बँक तुम्हाला $१००० चे क्रेडिट कार्ड देणार, वर $४० वार्षिक फी पण घेणार. मी $१००० दिले व कार्डसाठी अर्ज दिला. पण इथेही नशीब असं की तो अर्ज पण रिजेक्ट झाला. इथे माझ्या नंतर आलेल्यांना महिन्याभरात क्रेडिट कार्ड्स मिळत होती आणि तब्बल १ वर्ष अकाउंट असूनही मला मात्र मिळत नव्हते. अखेरीस दीड वर्षांनी एकदाचे बँक ऑफ अमेरिकेने कृपा केली आणि मला एक क्रेडिट कार्ड दिले. मग त्याचे बिल मी अगदी नित्यनेमाने भरले. होताहोता क्रेडिट स्कोअर वाढू लागला. मग हळू हळू कार्डच्या ऑफर यायला लागल्या. त्यात पहिली मिळालेली म्हणजे तुम्ही त्या कार्डवर, तुमच्या लिमिटच्या आत, कितीही खर्च करा पण जर का बिल वेळेवर भरलं तर प्रत्येक तिमाहीला $२५ कार्डवर क्रेडिट देणार. मग काय घेऊन टाकलं. थोड्या दिवसांनी अजून एका कार्डावर काहीतरी ऑफर मिळाली असं करता करता कार्ड्स जमा होऊ लागली. पण मग त्यांचे बिल वेळेवर भरणे ही एक डोकेदुखी होऊ लागली. जर का एक जरी दिवस उशीर झाला तरी भरभक्कम लेट फी आणि व्याज भरायला लागणार. पण मग ऑटो पे नावाची एक सुविधा कामी आली. मग कार्ड्स वरच्या जमा झालेल्या पॉइंट्सने एखादी वस्तू घेता यायला लागली. उदाहरणार्थ एक कार्डच्या पॉईंट्स वरून मला एकही पैसे न देता $८० चे ब्लूटूथ हेडसेट्स घेता आले. पण हे किरकोळ ठरेल असे दोन फायदे अजून दोन कार्डने मिळाले. एका कार्डची ऑफर आली की कार्ड मिळाल्यावर पहिल्या ३ महिन्यात $३००० खर्च केले तर ५०००० पॉईंट्स मिळणार. या कार्डची वार्षिक फी $९५ होती जी पाहिलं वर्ष माफ असणार. म्हणून घेतलं कार्ड, पण $३००० खर्च करायचे? मग एक आयडिया काढली. तसंही घराचं भाडं भरायला लागतंच ते कार्ड वर भरूया. पण जर कम्युनिटीच्या (सोसायटी) च्या वेबसाईट वरून $३५ फी लागत होती. मग अजून शोध घेतला तर rent.कॉम नावाच्या एका साईटवर $२० चार्जेस होते. पण म्हणजे $६० खर्च करायचे? अजून एक आयडिया काढली की ३ महिन्याचं भाडं एकदम भरायचं मग त्याला पण $२० चार्जेस पडणार. पण मग $३००० ची एकदम सोय करायची? तर नाही, जर का नीट बघितलं तर पहिल्या महिन्याच्या शेवटी भाडं भरायला लागलं आणि ते भरायला जवळपास ५० दिवसाचा अवधी मिळाला. म्हणजे उलट मला $१००० ते $२००० वापरायला मिळाले. आता या ५०००० पॉईंट्स चा काय फायदा होऊ शकतो? ५०००० पॉईंट्स म्हणजे ५०० डॉलर्स, एक मार्ग म्हणजे हे पॉईंट्स वापरून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. पण मी दुसरा मार्ग निवडला. हे पॉईंट्स युनाइटेड एरलाईन्सला ट्रान्सफर करायची सुविधा होती. आणि ४२५०० पॉईंट्स वापरून पुणे ते अमेरिका वन वे तिकिट काढता येते, ज्याची तशी किंमत जवळपास ९००-१००० डॉलर्स असते. मला माझ्या वडिलांचे एका बाजूचे तिकीट या पॉईंट्सवर निघाले. पण आता परतीची पण सोय बघणे आवश्यक होते. पण ते वर्षभर थांबणार असल्याने वेळ होता. या कार्डला एक वर्ष पूर्ण होताच ते बंद करून टाकलं आणि अजून एक ऑफर घेतली ज्यात पहिल्या ३ महिन्यात $२००० खर्च केले की ४०००० पॉईंट्स आणि एक कार्ड वापरणारी व्यक्ती ऍड केली की १०००० पॉईंट्स असे ५०००० पॉईंट्स मिळणार होते. माझ्या कॅनडा ट्रीपचं बुकिंग मी या २००० डॉलर मध्ये केलं आणि टार्गेट पूर्ण केलं. त्यामुळे वडिलांचं परतीचं तिकीटसुद्धा ४२५०० पॉईंट्स च्या बदल्यात अमेरिका ते पुणे मिळालं. म्हणजे माझे जवळपास १५००-१७०० डॉलर्स वाचले. पुढे दुसऱ्या एका कार्डवर एक ऑफर आली की ३ महिन्यात २००० डॉलर्स खर्च करायचे, यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचा फोन सगळे पैसे देऊन घेऊ शकता. आणि मग त्यातले ६५० डॉलर्स तुम्हाला परत मिळणार. म्हणजे मला ८०० डॉलर्सचा फोन फक्य २५० डॉलर्स ला पडला (बाकीचे खर्च मिळून). तर मंडळी, क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का? मी म्हणीन जर तुम्ही कार्डचं बिल वेळच्यावेळी पूर्णपणे भरू शकत असाल तर नक्कीच फायदेशीर आहे. पण मग ट्रान्झॅक्शन चार्जेसचं काय? अमेरिकेत तरी बहुतेक कुठल्याही दुकानात, पेट्रोल पंपावर चार्जेस लागत नाहीत. अर्थात अमेरिकेतली काही भारतीय दुकानं अपवाद आहेत, ज्यात $१० च्या आतल्या बिलासाठी क्रेडिट कार्ड वापरलं तर ५० पैसे जादा द्यावे लागतात. पण त्याव्यतिरिक्त मला कुठे चार्जेस लागले नाहीत. उलट एक विशिष्ट सोय असलेलं कार्ड असेल तर दुसऱ्या देशात केलेल्या ट्रान्झॅक्शनवर पण Foreign Transaction चार्जेस लागत नाहीत. अजून सांगायचे फायदे म्हणजे काही कार्ड्स अशी सुविधा देतात की रेंटल कार घेताना जर का ते कार्ड वापरलं तर इन्शुरन्स वेगळा घ्यायला लागत नाही. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी आणि त्याचा इन्शुरन्स असेल तर तो रेंटल कारला पण वापरता येतो. पण जर नसेल तर मात्र रेंटल कंपनीकडून इन्शुरन्स घ्यायला लागतो तो जवळपास गाडीच्या भाड्याएवढा असतो. तसेच कार्ड वापरून खरेदी केलेल्या वस्तूंना आपोआप जास्तीची वॉरंटी किंवा इन्शुरन्स आपोआप मिळतो. उदा. मी जर रेबॅनचा गॉगल एक कार्ड वापरून घेतला. पण ३ महिन्यांनी तो फुटला किंवा चोरीला गेला तर जरी रेबॅनने मला पैसे किंवा नवीन गॉगल द्यायला नकार दिला (माझा गहाळपणा हे कारण सांगून) तर मला कार्ड कंपनीकडून परतावा मिळतो. एखादी मोठी खरेदी, म्हणजे समजा आमची ४ जणांची भारतवारीची तिकिटं मी कार्ड वापरून काढली तर जवळपास ४-५ हजार डॉलर्स खर्च येतो. अश्या वेळेला मला बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा वापरता येते आणि त्याला भरायला बिनव्याजी १२-१८ महिन्यांचा कालावधी मिळतो. इथे स्टोअर कार्ड वापरून तुम्हाला त्या स्टोअरमधील खरेदीवर सूट मिळते. तसेच जमा झालेले पॉईंट्स पुढील खरेदीवर जास्तीची सूट मिळवून देतात. अमेरिकेतसुद्धा कार्ड्स वापरणे किंवा रोखीशिवाय व्यवहार करणे ही संकल्पना रुजवताना त्रास झाला असेलच. उलट आता इथे नवीन आलेल्याला जर कार्ड लगेच मिळालं नाही तर त्रास होतो. तसेच तुम्ही केलेल्या काही उद्योगांमुळे क्रेडिट हिस्टरीवर परिणाम झाला असेल तरी कार्ड्स मिळत नाहीत व त्रास होतो. हे सगळे माझे स्वतःचे अनुभव आहेत इतरांना वेगळे अनुभव येऊ शकतात. या धाग्याचा उद्देश फक्त कार्ड्स वापरून फायदा कसा करून घेता येईल हे सांगण्याचा आहे. ज्यांना घेता येईल त्यांनी फायदा करून घ्यावा अथवा ....

वाचने 86821
प्रतिक्रिया 290

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

ओके. पण काय आहे ना, की "जगावं कसं याची ट्युशन देतो ये..." असं सांगणारे सद्गुरू आणि बद्द-गुरू मला माझ्या छोट्याशा आयुष्यात लय भेटले आहेत. त्यामुळे "जगायचं कसं" हा प्रश्न सोडवण्यात मला काहीच इंट्रेस्ट नाहीये. कर्जाशिवाय फ्लॅट कसा घेता येतो या आधिभौतिक प्रश्नात मात्र आहे. आणी त्याचं मला समजलीलं उत्तर असं आहे, की ते शक्य आहे इफ यू आर इन द राईट प्लेस अ‍ॅट द राईट टाईम. पण हे जवळपास सगळ्याच गोष्टींबाबत खरं असतं. त्यामुळे...

In reply to by आदूबाळ

राईट प्लेस पण कशाला.. तुमच्या कडे आज घराच्या किंमती इतके दागिने आणि चांदी असेल तर झालं काम. थोडक्यात एनर्जी जसा फॉर्म बदलते तसं तुम्ही फक्त एक अ‍ॅसेट दुसरीत कनव्हर्ट करताय. आता तर मला काहीही गंगाजळी हाताशी नसताना स्वतःवर विश्वास ठेवुन कर्ज घेणारे आणि मेहनत करुन ते फेडणारे लोक जास्त भारी असतात असं वाटायला लागलंय. सगळं लिक्विडेट करुन फक्त डाऊनपेमेंट जमतं. त्याच्या चौपट किंमतीचा फ्लॅट घेणं गंमत नाही.

विकल्प हा सामान्यपणे हिंदीत वापरला जातो असा माझा समज आहे. संक्षी यांनी 'विकल्प' असण्याला सुख मानलेले आहे असाही माझा समज आहे. या प्रतिसादासाठी मी 'विकल्प' या शब्दाचा अर्थ 'पर्याय'असा समजून लिहीत आहे. हा खरेतर संक्षी ('संक्षि') यांच्या अनेक प्रतिसादांना उपप्रतिसाद आहे पण इतके 'उप'टसुंभप्रतिसाद झाले असल्याने स्वतंत्र प्रतिसाद म्हणून लिहीत आहे. संक्षी, तुम्ही आनंदाच्या डोही सदैव तरंगत असता याबाबत माझ्या मनात तीळमात्रही संशय नाही. पण माझ्यासारखे जीव जगण्यासाठी तडजोडी करणारे असतात. व्यक्तिगत पातळीवर कर्जाच्या उपलब्धतेमुळे माझे जीवनमान उंचावले आहेत. कर्ज नसते तर परिस्थितीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍यांचे जीवन आणि माझे जीवन सारख्याच पातळीवर असले असते. तर कर्ज नेमके काय करते? कर्जाने वर्तमानात अनेक 'विकल्प' उपलब्ध होतात. आता विचार करा. एका शेतकर्‍याच्या मुलाला इंजिनियरींग कॉलेजला प्रवेश मिळण्यासाठी कर्ज घ्यावे लागले तर त्या मुलाकडे अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचा 'पर्याय' निर्माण होतो. कर्ज वर्तमानात पर्याय निर्माण करतात आणि भविष्यासाठी काही पर्यायांचा संकोच. पण शेतकर्‍याच्या मुलाचा कर्जशिवाय भविष्यात संकोच व्हावा इतकेही पर्याय नसतील. कर्ज काही लोकांसाठी 'गरज' असते. असो. इथे अनेकांनी तुम्हाला रोजच्या जगण्याच्या अनुभवांवरून प्रामाणिक युक्तिवाद केलेले आहेत. त्यांच्या चपला घालून क्षणभर विचार करा.

In reply to by अनरँडम

मुद्दा एकदम साधा आहे. आपण प्राथमिक आहोत आणि बाकी सर्व गोष्टी दुय्यम आहेत, मग तो रोजच्या जगण्यातला पैसा असो की काम. आपण आनंदात असू तर पैसा किंवा कामाला अर्थ आहे. हा बेसिक फंडा आहे. रुपकात्मक पद्धतीनं सांगायचं तर, जीवनाच्या रथाचं सारथ्य कृष्णाकडे (म्हणजे आपल्याकडे) असेल तर जगण्याची मजा आहे, ते अर्जुनाकडे (म्हणजे मनाकडे) गेलं की मजा संपते. कर्जामुळे विचार प्रमुख आणि आपण दुय्यम होतो. रथाचं सारथ्य अर्जुनाकडे जातं. कर्ज नेमके काय करते? कर्जाने वर्तमानात अनेक 'विकल्प' उपलब्ध होतात. कर्जामुळे भविष्यकाळ निर्माण होतो ! थोडक्यात, जगायला आणि उपभोगायला सदैव वर्तमान काळच उपलब्ध असतो पण कर्जदाराला कर्ज फेडीची चिंता लागते आणि त्याचा वर्तमनाशी संपर्क तुटतो. शैक्षणिक कर्जाची परतफेड नोकरी नंतर करायची असते त्यामुळे विद्यार्थी निर्धोकपणे आभ्यासावर फोकस करु शकतो. विद्यार्थ्याचा वर्तमान भविष्याकडे उधार राहात नाही. गृह कर्जाची फेड लगोलग करायची असते त्यामुळे कर्जदाराचा वर्तमान बांधला जातो. यथावकाश जेव्हा कर्जफेड होते तेव्हा कर्जदार पुन्हा वर्तमनाशी कनेक्ट होतो परंतु दरम्यानच्या काळात त्याला स्वच्छंद जगण्याचं साहस करता येत नाही. म्हणजे त्या काळात काम आणि पैसा प्राथमिक आणि आपण दुय्यम राहतो. जेव्हा `काम न करण्याचा विकल्प' हरवतो तेव्हा कामातली मजा निघून जाते.

In reply to by ट्रेड मार्क

मुद्दा एकदम साधा आहे. आपण प्राथमिक आहोत आणि बाकी सर्व गोष्टी दुय्यम आहेत...
संक्षींची मते त्यांच्याकरता प्राथमिक आहेत. इतरांची मते दुय्यम आहेत. प्राथमिक मतः कर्ज वाईट्ट असते. दुय्यम मतांचा सारांशः कर्ज काही लोकांसाठी गरजेचे असते. कर्जाशिवाय त्यांचे वर्तमान आणि भविष्य सुधरण्याची शक्यता कमी आहे. कर्ज अनेकांकरता 'चांगले' असते.

चला, ह्या धाग्यामुळे माझी तरी सोय झाली बुवा ! "जगी सर्व सुखी असा कोण आहे ?" असे रामदासबुवांनी विचारलेय त्याला निदान आता सकारात्मक उत्तर तरी देता येईल.

In reply to by धर्मराजमुटके

:) सुखी माणसाच्या सदर्‍यांचे दुकान काढायच्या आयडियाची कल्पना कशी आहे ? ;)

मला अजूनपर्यंत फक्त गॅरी ट्रूमनने आपली क्रेडिट कार्डे दिलीत, बाकीच्यांची कुठे आहेत? आणा लवकर! मला चिनी साईटीवर धाड टाकायची आहे. =))

काय करणार आहेस कार्ड घेऊन? दळण महोत्सव का? शिकरण खाद्यसोहळा , घंटगाडी कचरा प्रदान महोत्सव पण फार रोमांचक असतो . बघ ट्राय करुन आहेच कार्ड तर ;)

In reply to by अजया

पत्ते खेळीन पुरेशी जमली तर. नाहीतर आप्पानी सांगितली तसली सहल काढीन. येतेस का बोल! रोमान्स च्या नावावर नवऱ्याला सोबत आणायचं नाही पण. कुठेही गेले तरी पिट्ट्या पाडतात कामाचा.

In reply to by ट्रेड मार्क

त्यामुळे त्यांनी विकेंड धरला आहे. वर्कींग डे आणि विकेंड असा फरक मला नाही.

संक्षी म्हणतात की असतील नसतील तेवढे पैसे गोळा करून जो पुढील खर्च करायचा तो करावा. म्हणजे सर्व पैसे स्वतःच्या खिश्यातुन काढायचे. मी तर क्रेडिट कार्ड घेऊन फक्त कर्ज मला पाहिजे तेव्हा मिळेल याची सोय करून ठेवली. त्याबदल्यात मला एकही पैसा खर्च न करता अमेरिकेचे एक रिटर्न तिकीट (किंमत साधारणपणे $१३०० ते १५०० म्हणजे ९०००० ते १००००० रुपये) मिळालं. पुढे ते कार्ड वापरायचं का नाही, म्हणजेच "कर्ज" घ्यायचं का नाही हा विकल्प मी माझ्याकडे ठेवला. जरी मी कार्ड वर खर्च केले तरी ते जे मी करणारच आहे असे आवश्यक खर्च करणार. कार्ड न वापरल्यामुळे त्याक्षणी द्यायला लागणारे पैसे मला कार्ड वापरलं तर ४०-५० दिवस वापरायला मिळतात. परत पॉईंट्स जमा झाल्याने काही वस्तू फुकट पण मिळतात. क्रेडिट कार्ड तर बरेच लोक घेतात पण धागा काढण्याचा उद्देश हा आहे की या कार्ड कंपन्यानी दाखवलेल्या प्रलोभनांमधून तुम्ही तुमचा फायदा कसा करून घेऊ शकता.

In reply to by ट्रेड मार्क

धागा क्रेडीट कार्डवरुन इएमआयवर गेला . पण चर्चा अनुषंगिक आणि व्यापक होती, ती इतरांना उपयोगी झाली असावी.

In reply to by संजय क्षीरसागर

जरी ईएमआयचा विषय घेतला तरी माझं उदाहरण मी वर दिलेलं आहे. सोयीसाठी परत एकदा देतो २००९ साली मी रेडी पझेशन फ्लॅट ३० लाखाला घेतला. एकदम एवढे पैसे भरण्याची ऐपत नसल्याने गृहकर्ज घेतले. साधारणपणे २०१३/२०१४ मध्ये ते कर्ज पूर्ण फेडून टाकले. कर्ज फेडले त्यावेळची किंमत जरी धरली तरी साधारणतः ५५ लाख होती. आता ३० लाख नव्हते म्हणून मी जर २००९ साली फ्लॅट घेतला नसता तर मी अजूनही ५५/६० लाख कदाचित गोळा करू शकलो नसतो. जरी गोळा केले असते तरी दोन्हीतला फरक बघा => कर्ज घेऊन घेतलेला फ्लॅट: ३० लाख + व्याज समजा ३ लाख धरलं तर - लगेच स्वतःच्या घरात राहायला जाता आले: भाड्याचे साधारणतः १४००० प्र. म. x ४८ = ६,७२,००० वाचले - कर्ज फेडले तेव्हाची किंमत ५५लाख - ३३ लाख = २२ लाख फायदा - टोटल फायदा: २९ लाख + भाड्याचे घर बदलण्याचा त्रास वाचला => पूर्ण ५५ लाख गोळा होईपर्यंत थांबलो असतो तर फायदा तर सोडाच हे जास्तीचे २९ लाख मलाच भरायला लागले असते. आता घर घेण्याचे पूर्ण पैसे काहीही केलं तरी नाहीत या परिस्थित आम्हा सामान्य माणसांनी कुठला मार्ग स्वीकारावा? कृपया तत्वज्ञान न सांगता पैश्यांच्या भाषेत सर्वसामान्यांना समजेल असे सांगावे ही विनंती.

In reply to by ट्रेड मार्क

वा मस्त. मला अगदी हेच म्हणायचे आहे (अर्थात आकडे वेगळे आहेत). हल्ली (म्हणजे वय झाल्यापासून) इतरा संयम राहिला नाहीये म्हणून असले काही लिहिता येत नाही :(

In reply to by ट्रेड मार्क

तुमच्या केसमधे संक्षींचा फॉर्मुला लागू होत नाही. १. त्यांचा फॉर्म्युला खिशात ३० लाख असतील किंवा ३० लाख मिळतील असे अ‍ॅसेट्स असतील तरच उपयोगी. भले मग नोकरी, काम असो वा नसो भविष्यासाठी कोणतीच तरतूद न ठेवता हा निर्णय घेणे शक्य आहे. २. तुमच्या केसमधे किंवा कोणत्याही नुकत्याच नोकरीला लागलेल्या व्यक्तीकडे अ‍ॅसेट्स नसतील तर विषयच बंद. चालू असलेल्या नोकरी-धंद्याच्या जीवावर परवडेल इतके कर्ज काढून घर घेणे हाच एकमेव पर्याय. माझे वैयक्तिक मत सांगायचे तर "दोन धृवावर दोघे आपण" छाप चर्चा निष्फळ निघणारच...

In reply to by संदीप डांगे

माझीच केस काय बहुतांशी लोकांना हा फॉर्मुला लागू होत नाही. ज्याच्याकडे घर घेण्याचे पूर्ण पैसे पडून असतील तो काही कर्ज काढून घेणार नाही. मला वाटलं संक्षींच्या CA च्या ज्ञानातून आम्हाला पण काही ट्रिक्स कळतील. तत्वज्ञान ऐकण्यापुरतं ठीक आहे, जो पर्यंत ते आचरणात कसं आणायचं याचं स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन एखादा जाणकार करत नाही.

In reply to by ट्रेड मार्क

कृपया तत्वज्ञान न सांगता पैश्यांच्या भाषेत सर्वसामान्यांना समजेल असे सांगावे ही विनंती. तुमची कॅलक्युलेशन्स बरोबर आहेत. पण प्रश्न कॅलक्युलेशन्सचा असता तर चर्चेची गरजच नव्हती. प्रश्न `काम न करण्याच्या विकल्पाचा' आहे. २२ लाखाच्या फायद्यामुळे आज स्वच्छंद जगता येतं का हा प्रश्न आहे. जर तुम्ही मन मानेल तसं जगू शकत असाल तर तुमचा दुहेरी फायदा आहे. आणि जगू शकत नसाल तर त्या फायद्याला अर्थ आहे का ते तुम्ही ठरवा. पैश्याच्या भाषेत बोलायचं तर स्वच्छंदापुढे पैसा व्यर्थ आहे आणि तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर जोपर्यंत वर्तमानात जगण्याची खुमारी उमगली नाही तोपर्यंत भविष्याचा धसका कायम आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

समाजाच्या, कुटुंबसंस्थेच्या आणि माझ्यावर असलेल्या इतर जबाबदाऱ्यांच्या मर्यादेत राहून मला मन मानेल तसं जगता येतं. यात माझ्यावर किती कर्ज आहे हा विचार १२ महिने २४ तास मला छळत नसतो. अगदीच घराचा हप्ता किंवा उर्वरित कर्ज पण सुरक्षित करायचं म्हणलं तर तसे इन्शुरन्स पण उपलब्ध आहेत. वर्तमानात जगायचं हे ठीक आहे उद्याचा दिवस कोणात्याही मनुष्यास चुकला नाही आणि उद्याचा दिवस नाही म्हणजे तो मनुष्य या जगात नाही. सगळे पैसे एका गोष्टीवर लावणे हे माझ्यामते तरी चूक आहे. कारण जरी व्यक्तिशः एखाद्याला उद्या नसला तरी त्याच्या बाकी कुटुंबाला तर असणारच आहे. वेळ सांगून येत नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण मी स्वतः त्यातून बरेचदा गेलो आहे. मनुष्य अगदी काही कोटींच्या घरात रहात असेल पण खिश्यात पैसा नसेल तर कठीण प्रसंगी त्या घराचा काय उपयोग? उदा. द्यायचे झाले तर आज एखाद्याने स्वतःकडे आहे नाही ते विकून, सगळी जमापुंजी टाकून २ कोटींचे घर घेतले. पुढच्याच महिन्यात त्याच्या धंद्यात काही कारणाने त्याला २५ लाखांची गरज पडली तर काय २ कोटींचे घर विकणार? आता घर एवढे महागाचे आणि खिश्यात पैसे नाही तर सांगा तुम्ही काय उपाय करणार?

In reply to by ट्रेड मार्क

वर्तमानात जगायचं हे ठीक आहे उद्याचा दिवस कोणात्याही मनुष्यास चुकला नाही आणि उद्याचा दिवस नाही म्हणजे तो मनुष्य या जगात नाही. जो आजचा दिवस मनसोक्त जगू शकत नाही तो कधीच मनसोक्त जगू शकत नाही कारण आज ही एकमेव रियालिटी आहे. कल्पनेतला उद्या सुद्धा आज झाल्याशिवाय जगायला उपलब्ध नाही. उद्याची कल्पना करत आजमधे जगणं केवळ मनरंजन आहे. सगळे पैसे एका गोष्टीवर लावणे हे माझ्यामते तरी चूक आहे. कारण जरी व्यक्तिशः एखाद्याला उद्या नसला तरी त्याच्या बाकी कुटुंबाला तर असणारच आहे. वेळ सांगून येत नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण मी स्वतः त्यातून बरेचदा गेलो आहे. गरज असल्यावर पैसे खर्च करणं याशिवाय पैश्याचा दुसरा उपयोग नाही. भविष्यकाळाची भीती पैश्याचा आधार शोधते. पण वर्तमानात जगण्याचं कौशल्य पैश्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जे. कृष्णमूर्तींचं एक सुरेख विधान आहे `नाऊ इज दि अल्टीमेट सिक्योरिटी !' जो वर्तमानाशी समरुप आहे तो अस्तित्वाशी एकरुप असतो कारण अस्तित्वात एकच काळ आहे `वर्तमान'. भविष्यकाळ हा मनानं घातलेला धसका आहे. ....आता घर एवढे महागाचे आणि खिश्यात पैसे नाही तर सांगा तुम्ही काय उपाय करणार? या काल्पनिक गोष्टीतून सुद्धा भविष्याची भीतीच प्रतीत होते . आता पुन्हा समेवर येऊ. भविष्याची भीतीच भविष्यकाळ निर्माण करते. ही भीती वर्तमानाचा उत्सव होऊ देत नाही. कर्ज घेणं म्हणजे भविष्यकाळ निर्माण करणं आहे. त्यामुळे वर्तमान भविष्याकडे उधार पडतो. इएमआयचा विचार (मग तो केव्हाही येवो) मन सक्रीय करतो. सक्रीय मन भीती निर्माण करतं, त्यानं रथाचा लगाम कृष्णाकडून (पक्षी आपल्याकडून) अर्जुनाकडे (पक्षी मनाकडे) जातो आणि जगण्यातला स्वच्छंद हरवतो. सगळी कॅलक्युलेशन्स बरोबर असतांना, ऋणमुक्त स्थितीत सुद्धा, वर्तमानात जगण्याचं साहस होत नाही हे तुमचा प्रतिसाद सांगतो. यावरनं कर्जदार व्यक्ती इएमआयनी बांधलेल्या आयुष्यात स्वच्छंद जगू शकणार नाही हा मुद्दा सिद्ध होतो.

In reply to by संजय क्षीरसागर

कमवायला लागल्यावर पहिली कित्येक वर्षे (१४ वर्षे) कोणताही इ एम आय नव्हता. त्यानंतर काही काळ एकाच वेळेस सहा इ एम आय पण होते ( दोन दवाखान्याचे दोन इ एम आय, दोन घरांचे दोन, मोटारीचा एक आणि मोटारसायकलचा एक). आणि आता एकच आहे( ज्याच्या समोर तितकेच पैसे मी अधिक व्याजावर ठेवले असल्याने तो फिटल्यासारखाच आहे). परंतु माझ्या आयुष्यातील स्वच्छंदी पण कधी कमी झाला किंवा सकाळी उठल्यावर कोणतेही ताण तणाव होते असे कधीच झाले नाहीत. . एकही ईएम आय नव्हता तेंव्हाही मी दिवसात सात तास काम करत असे आणि सहा इ एम आय असल्यावरही मी कोणतेही अतिरिक्त काम केले नाही. आताही मी सात तासच काम करतो. आपण म्हणता तशी भविष्याकडे उधारी इ काहीच नव्हती मी काही रामशास्त्री, कृष्णमूर्ती, ओशो, रविशंकर वगैरे वाचले नाही. त्यामुळे आपल्या "मनावर ताण येतो" वगैरे काही माहित नाही. मी तेंव्हाही दुपारी झोपत असे आणि आताही दुपारी झोपतो आणि अजूनही मला दुपारी( रात्रीपण) छान झोप येते. आपण म्हणता तसे "सगळी कॅलक्युलेशन्स बरोबर असतांना, ऋणमुक्त स्थितीत सुद्धा, वर्तमानात जगण्याचं साहस होत नाही" हि वृत्ती आहे. ताण घेणे हि वृत्ती आहे तसेच स्वच्छंदी जगणे हि पण वृत्ती आहे. आणि याच्या उलट सहा इ एम आय असताना हि मी वर्तमानातच आनंदात जगत होतो याचा अर्थच इ एम आय आणि आणि स्वच्छंद जगणे यांचा काहीच संबंध नाही.

In reply to by सुबोध खरे

तुमची केस अपवादात्मक आहे हे मागेच सांगितले आहे. तसा मी ही अपवादात्मक आहे. तुम्ही नियोजनामुळे निर्धास्त असाल, मी नियोजनरहित असल्यामुळे बिनधास्त आहे. मुद्दा किती साधा आहे ते पाहा : सद्य स्थितीत लोन काढून नव्या किंमतीला फ्लॅट घेण्यानं हेवी इएमाय बसतो त्याचा कर्जदाराच्या मनावर हमखास ताण येतो. तो मन मानेल तसं जगू शकत नाही. याचा अर्थ इएमाय आणि स्वच्छंद जगणं एकमेकांशी उघडपणे निगडीत आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षी, खरं तर तुमची केस अपवादात्मक आहे. मिपावरीलच काय पण संपूर्ण भारतात असे किती लोक असतील जे एकरकमी पैसे देऊन घर घेऊ शकतील. आणि जरी घेतलं तरी त्यातले किती काम न करण्याचा किंवा अगदी मनाला येईल तेव्हा काम करण्याचा विकल्प वापरू शकतील?

In reply to by ट्रेड मार्क

माझी केस अपवादात्मक आहे हे आधीच कबूल केलंय पण ती एकरकमी पैसे देऊ शकण्यामुळे नाही तर वर्तमानाशी इमान राखण्यामुळे आहे. काय वाट्टेल ते झालं तरी भविष्याला वर्तमानावर कुरघोडी करु द्यायची नाही या निश्चयामुळे आहे. पण तुमची केस प्रातिनिधिक आहे. सगळं मनाजोगतं असूनही व्यक्ती`दि ऑप्शन नॉट टू वर्क' हे साहस करु धजावत नाही असं ती दर्शवते. मला अनिश्चिततेत जगायला मजा येते, इट इज ऑलवेज अ चॅलेंज. पुढे काय होईल ते पुढे बघू आजचा दिवस उत्सव करु हा तो जगण्याचा अंदाज आहे. तुमच्यासाठी उद्या महत्त्वाचा आहे आणि त्याच्या नियोजनासाठी तुम्ही आज वापरतायं. माझ्यासाठी आज महत्त्वाचा आहे आणि उद्या कधी येतच नाही !

In reply to by संजय क्षीरसागर

दि ऑप्शन नॉट टू वर्क हे मी पण वापरतोय. मागच्या आठवड्यात सकाळी ऑफिसला जायची तयारी झाल्यावर काम करू नये असं वाटलं म्हणून मी ना ऑफिसला गेलो ना काही काम केलं. या आठवड्यातही आणि पुढच्याही आठवड्यात मनाला येईल तेव्हा मी हे करू शकतो. एवढंच काय, काम करत असतानाही वाटलं की हातातलं काम पूर्ण झालं की बास, तर तो ही ऑप्शन मी वापरू शकतो. यात माझ्यावर कर्ज आहे का नाही याचा काय संबंध? त्यामुळे अगदी रोज काम करायलाच पाहिजे अशी जबरदस्ती माझ्यावर नाहीये. आधी सांगितल्याप्रमाणे कर्ज जरी असलं तरी ते मनाला येईल तेव्हा फ्लॅट विकून वा दुसऱ्या कुठल्या मार्गाने फेडता येईल, त्यामुळे आता हे कर्ज कसं फेडणार असं रोज डोक्याला हात लावून बसायची वेळ माझ्यावर येत नाही. तुम्ही रोज उत्सव करा व करू नका पण नियोजन हे करावंच लागतं. कारण वेळ कधी कुणावर सांगून येत नाही हे स्वानुभवावरून सांगतो. माझ्यासाठी आज पण महत्वाचा आहे आणि उद्या सुद्धा. कारण उद्याचा विचार तुम्ही केला नाहीत तरी तो आहेच. फक्त तुम्ही त्याच्याकडे आज झाल्यावर बघता आणि मी आधीच त्याची तयारी करून ठेवतो. बादवे - कुतूहल म्हणून विचारतोय, उत्तर द्यावेच ही अपेक्षा नाही. तुम्ही अपॉइंटमेंट वगैरे देत किंवा घेत नाही का? तसेच स्टाफ असेल तर रोजच्यारोज पगार देता का? तुम्ही विकांताला ट्रिपला गेला होतात ते नियोजन न करता गेला होतात का? अचानक शनिवारी सकाळी ७ वाजता वाटले ट्रिपला जायचं म्हणून कुठे जायचं ते न ठरवता गाडीत बसून निघालात आणि रस्ता नेईल तिकडे गेलात असं नेहमीच करता का? एखाद्यावेळी मी हे करतो पण तुम्ही प्रत्येक वेळी असंच करता का?

In reply to by ट्रेड मार्क

यात माझ्यावर कर्ज आहे का नाही याचा काय संबंध? .....त्यामुळे आता हे कर्ज कसं फेडणार असं रोज डोक्याला हात लावून बसायची वेळ माझ्यावर येत नाही. कर्ज असतं आणि ते इतर कोणत्याही मार्गानं फेडण्याचा (फ्लॅट विकण्याशिवाय) उपाय नसता तर तुम्हाला ऑफिसला न जाण्याचा विचार डावलावा लागला असता. तुम्ही रोज उत्सव करा व करू नका पण नियोजन हे करावंच लागतं. नियोजन हे सुद्धा आताच्या क्षणीच होतं त्यामुळे हा क्षणच सर्व ठरवतो. तुम्ही अपॉइंटमेंट वगैरे देत किंवा घेत नाही का? नाही. आयत्या वेळी फोन करुन जी परिस्थिती असेल तसा निर्णय घेतो. तसेच स्टाफ असेल तर रोजच्यारोज पगार देता का? माझं झीरो स्टाफ ऑफिस आहे . काही कामं आऊट सोर्स केली आहेत. त्यामुळे ऑफिसला जाणं ही भानगड नाही. तुम्ही विकांताला ट्रिपला गेला होतात ते नियोजन न करता गेला होतात का? अर्थात ! मेव्हण्याचा फोन आल्यावर बॅग भरली आणि निघालो. त्याचं महिनाभर प्लानींग चालू होतं आणि तारखा सतत बदलत होत्या. अचानक शनिवारी सकाळी ७ वाजता वाटले ट्रिपला जायचं म्हणून कुठे जायचं ते न ठरवता गाडीत बसून निघालात आणि रस्ता नेईल तिकडे गेलात असं नेहमीच करता का? एखाद्यावेळी मी हे करतो पण तुम्ही प्रत्येक वेळी असंच करता का? हे मी कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी करु शकतो ! आणि यालाच तर स्वच्छंद म्हणतात.

In reply to by संजय क्षीरसागर

इथे रात्रीचे १.४० झालेत तुमच्याकडे काय वेळ आहे ?

In reply to by संजय क्षीरसागर

तुमचा प्रतिसाद आला तेव्हा दुपारचे ३.१० झाले होते. मी ऑफिसमध्ये आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

ऑफिसला न जाण्याचा विचार डावलावा लागला असता. हे जर तर मध्ये झालं. आणि जरी फ्लॅट विकायचा पर्याय नसता तरी मी हेच केलं असतं... नाही केलं होतं, पहिल्या फ्लॅटचं कर्ज पूर्ण फेडलेलं नव्हतं तेव्हा. नियोजन हे सुद्धा आताच्या क्षणीच होतं त्यामुळे हा क्षणच सर्व ठरवतो. पण हा क्षणच पुढच्या क्षणाविषयी ठरवतोय. आयत्या वेळी फोन करुन जी परिस्थिती असेल तसा निर्णय घेतो. म्हणजे तुम्हाला एखादा क्लायंट फोन करून विचारतो की वेळ आहे का, तुम्ही - मी फिरायला बाहेर आलोय. क्लायंट - परत केव्हा फोन करू. तुम्ही - तसं काही सांगता येत नाही, तुम्हाला जमेल तेव्हा करा, मी उपलब्ध आहे की नाही ते सांगीन दुसऱ्या वेळेला - हीच कहाणी रिपीट फक्त तुम्ही वेगळं काहीतरी करत असता. दुसरा सीन तुमचा दात दुखतोय म्हणून तुम्ही डॉक्टरला फोन करता डॉक्टर - अजून ५ पेशंट बसलेत तुम्हाला उद्याची अपॉइंटमेंट देतो तुम्ही - उद्या कुठे घेऊन बसलात. मी तुम्हाला उद्याचा आज झाला की फोन करतो. उद्याचा आज झाल्यावर तुम्ही फोन करता परत वरील संभाषण रिपीट. काही कामं आऊट सोर्स केली आहेत. मग त्यांना रोजच्या रोज कामं आणि पैसे देता का? त्याचं महिनाभर प्लानींग चालू होतं ओह म्हणजे कोणीतरी कुठे जायचं काय करायचं याचं प्लॅनिंग केलं होतं तर. हे मी कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी करु शकतो ! हे तर मी पण करू शकतो नाही तर करतो. मग फक्त मी गृहकर्ज घेतलंय म्हणून स्वच्छंद नाही? बादवे - दुसरा दिवस कशाला आपली दुसऱ्या क्षणाची ग्यारंटी नाहीये.

In reply to by ट्रेड मार्क

पहिल्या फ्लॅटचं कर्ज पूर्ण फेडलेलं नव्हतं तेव्हा. आज कर्ज नसतांना तुम्ही रोज सकाळी उठल्यावर जसं वाटेल तसं जगू शकता का ? याचं प्रामाणिक उत्तर शोधा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या एकाच प्रश्नात आहेत. म्हणजे तुम्हाला एखादा क्लायंट फोन करून विचारतो की वेळ आहे का इतके सीन्स होत नाहीत. दोघांना आता वेळ आणि मूड असेल तर काम होतं. खरं तर हल्ली असे प्रश्नच येत नाहीत. सगळं काम मेल्स आणि फोनवर होतं. इथल्या क्लायंटसनी तर मला पाहिलेलं सुद्धा नाही. सगळी कामं वेळेपूर्वीच पूर्ण असतात. उद्याचा आज झाल्यावर तुम्ही फोन करता परत वरील संभाषण रिपीट डेंटीस्ट माझा मित्र प्लस क्लायंट आहे. त्याला वेळ झाला की तो फोन करतो आणि मी जातो. मग त्यांना रोजच्या रोज कामं आणि पैसे देता का? अशी फार थोडी कामं आहेत. काम झालं की लगेच पैसे देतो आणि विषय संपतो. हे तर मी पण करू शकतो नाही तर करतो. मग फक्त मी गृहकर्ज घेतलंय म्हणून स्वच्छंद नाही? मग प्रश्न काये ? स्वच्छंद जगणार्‍याला प्रश्न पडत नाहीत, तो स्वच्छंद जगतो. तो शनिवारी सकाळी सात वाजता नाही, मन मानेल तेव्हा खुर्चीतून उठू शकतो. बादवे - दुसरा दिवस कशाला आपली दुसऱ्या क्षणाची ग्यारंटी नाहीये. दुसरा क्षण आहे कुठे ?

In reply to by संजय क्षीरसागर

ओह म्हणजे कोणीतरी कुठे जायचं काय करायचं याचं प्लॅनिंग केलं होतं तर. प्लानींग त्यांनी केलं होतं, मी नाही. मजा येईल असं वाटलं आणि निघालो. खरं तर सहलीचं मला कौतुक नाही कारण रोजचं जीवनच इथे सहलीला आल्यासारखं जगतो. जीवन अनप्लान्ड सहलीसारखं जगण्यालाच तर स्वच्छंद म्हणतात. प्लान नसेल तरच उत्कंठा आहे. इतरांना मात्र विषेश सवड काढावी लागते म्हणून त्यांनी प्लानींग केलं होतं. रविवारी संध्याकाळी इतरांना परतीचे वेध लागले तेव्हा पत्नीला तिची इच्छा असेल तर अजून एक दिवस राहायचं का विचारलं. बाय द वे, आता तिथे रात्रीचा १ वाजला असेल. काय करतायं तुम्ही ?

In reply to by संजय क्षीरसागर

बाय द वे, आता तिथे रात्रीचा १ वाजला असेल. काय करतायं तुम्ही ? सोडून द्या.

आहे त्यात भागवायचं ठरवलं की माणूस स्वच्छंदी जगू शकतो. आहे ती परिस्थिती बदलायची ठरवली की माणसाला कष्ट घ्यावे लागतात. पण मुळात स्वच्छंदी जगणे हेच उत्तम जगणे हे गॄहितक कुणी ठरवले? भगवान श्रीकॄष्णाने गीतेमधे असे लिहून ठेवले आहे काय?

पत्नीबरोबर जाऊन १५ किलोचं दळण आणायचा मी उत्सव करतो.
बाब्बो... हे उत्सव वेग्रे नकोत म्हणुन आपण एक नट्राज आटा चक्की आणुन फेकलीये घरात... अजुन सोताचे घर नाही पण चक्की आहे... संक्षींपेक्षा मी जास्त स्वच्छंदी आहे असं वाटतंय... EMI पण नाही आणि चक्की पण... सोने पे सुहागा

In reply to by वपाडाव

नालासाठी घोडा आणलास का! आमचा गिरणीवाला दर १५ दिवसानी दहा किलो पीठ घरपोच आणून टाकतो. त्यामुळे उत्सवाला स्कोपच नाही!

In reply to by पैसा

तो गिरणीवाला कसा रोज उत्सव साजरा करतो बघा. वर तुम्ही त्याला पैसे पण देता. असं काम पाहिजे. तुम्ही त्या उत्सवाला मुकता. रच्याकने - त्याला पण विचारून घ्या तो किती स्वच्छंदपणे जगतो ते.

In reply to by ट्रेड मार्क

तो स्वच्छंद असणारच. कारण १५ लाखाचा टँपु घेऊन येतो पीठ पोचवायला.

In reply to by वपाडाव

वारल्या गेलो आहे...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मग काय घरातच रोज उत्सव !? ;) :)
बादवे, चक्कीमुळे उत्सव बर्का...! अजुन चक्कीवर उत्सव केलेला नाही. :) ;) :)

In reply to by वपाडाव

ह.ह.मे.आ. कसं काय सुचतं व.पा. तुम्हाला.

झालं तर क्रेडिट कार्ड घेऊ नका. कारण पैसे आता कुठे द्यायचा आहे, दिड महिन्यांनंतर द्यायचा आहे असा विचार करून खूप फालतू विचार करतो ..... गेल्या तीन वर्षांपासून माझं अवरेज बिल २५ हजार आहे, २ महिन्यापासून खर्च बराच कंट्रोल केलं आहे .....
क्रेडिट कार्ड फक्त आणि फक्त इन्शुरन्स चे हफते , लाईट बिल, मोबाईल बिल आणि इतर बिल ह्यांचीच पेमेंट करा, मग मिळालेले रिवॉर्ड पॉईंट रेडिम करून कॅश बॅक मिळते
... मला तीन वर्षात ४००० कॅशबॅक भेटला आहे ......

खरं सांगायचं झालं तर क्रेडिट कार्ड वापरायची भिती वाटते. काही लोकांवर क्रेडिट कार्ड तारतम्याने नं वापरल्याने आलेली 'धरणीमाय गिळ अता मला' अवस्था बघण्यात असल्याने धाडस होत नाही.) एक लोनं फेडत असल्याने आणि ३ फेडलेली असल्याने क्रेडिट रेटींग चांगलंचं आहे. तस्मात क्रेडिट कार्ड घेतलेलचं नाही. समस्तं ब्यांकांच्या क्रेडिट कार्डांच्या प्रतिनिधींना कटवुन लावायचं काम निष्ठेने करत असतो. थोडसं हास्यास्पद वाटतं हे पण शेवटी प्रत्येकाचा एक दृष्टीकोन असतो तसा माझा. शिवाय खरं सांगायचं झालं तर पैसे साठवुन मग वस्तु घेण्यामधे जी मजा आहे ती आवडली की विकत घेतली मधे नाही असं मला वाटतं. बाकी उत्तम चर्चा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

उगाच आहे सोय म्हणून वाटेल तशी वापरली की त्रास होणारच. माझ्याकडे एखादी वस्तू घ्यायचे रोख पैसे असतील तरच मी ती वस्तू क्रेडिट कार्डवर विकत घेतो. माझा टोटल क्रेडिट कार्ड वरचा खर्च माझ्या टोटल कार्ड लिमिटच्या ५% पण होत नाही. बादवे - भीती कसली वाटून घेताय. कार्ड वर घेतल्यावर पैसे तुमच्या खिश्यातुन गेलेले नाहीयेत. मग कसलं टेन्शन? कदाचित तुम्ही ४ लोन घेतलीत त्यामुळे असावं. उगाच उद्याचा विचार करून ताण घेताय. मस्तपैकी फक्त वर्तमानात जगून मनासारखा खर्च करायचा. आता कशाला उद्याची बात..

In reply to by ट्रेड मार्क

एकदम चार नै ओ घेतली =)). हे चौथं. रच्याकने सगळ्यांना नाही जगता येत स्वच्छंदीपणे. जगात काही शर्यतीचे उमदे घोडे असतात आणि काही ओझेवाहु गाढव असतात, त्यापैकी अस्मादिक अगदी टिपिकल मध्यमवर्गीय गर्दभ असल्याने उद्याच्या चिंतांची ओझी वहाणं हे काम करावचं लागतं. अंथरुण पाहुन पाय पसरायची सवय काही जात नाही. आम्ही ओझं वहायच्या कामांचा उत्सवं करतो. :)!!

In reply to by ट्रेड मार्क

एकदम चार नै ओ घेतली =)). हे चौथं. रच्याकने सगळ्यांना नाही जगता येत स्वच्छंदीपणे. जगात काही शर्यतीचे उमदे घोडे असतात आणि काही ओझेवाहु गाढव असतात, त्यापैकी अस्मादिक अगदी टिपिकल मध्यमवर्गीय गर्दभ असल्याने उद्याच्या चिंतांची ओझी वहाणं हे काम करावचं लागतं. अंथरुण पाहुन पाय पसरायची सवय काही जात नाही. आम्ही ओझं वहायच्या कामांचा उत्सवं करतो. :)!!

हे स्वच्छंद वगैरे ठीक आहे. अन्यथा घराची किंमत एकरकमी जमा होई पर्यंत मध्यमवर्गीय माणसाच्या अर्ध्या गोवऱ्या मसणात गेलेल्या असतील. मी १९९३ साली ५६० स्क्वेअर फुटाचे घर पहिले होते तेंव्हा ते ७ लेखाला होते तेंव्हाही मला ते परवडत नव्हते शेवटी २००४ साली घेतले तेंव्हा ते १८ लाखाला होत्ते तोवर माझी प्रथम वर्ग राजपत्रित अधिकारी म्हणून १७ वर्षे नोकरी झाली होती आणि तेंव्हाही ते कर्जाशिवाय मला परवडलेच नसते स्वतःला गहाण ठेवले किंवा विकले असते तरी.( मला गहाण ठेवून कोण घेणार हा मुद्दा अलाहिदा) आपली गायची पट्टी काळी दोन. हे संक्षी म्हणतात ते सर्व पांढरी पाच मध्ये गायचे धंदे आहेत. गाणं तर जमणारच नाही उलट आवाज फाटल्याने घरी बसायला लागेल.

In reply to by सुबोध खरे

अहो, त्यांच्याकडे २५ वर्षांपूर्वी (म्हणजे ९५ साली असणार) ३.५ लाख कॅश होते असे लिहिले आहे. ते लैच पैसेवाले आहेत. अशा माणसाने स्वच्छंदी पणाने जगले तर त्यात काय नवल आहे ? तसे नाही केले तरच आश्चर्य आहे. उद्या मुकेश अंबानीने पण मनात येईल तेव्हाच काम करायचे ठरवले तर आश्चर्य वाटायला नको.

In reply to by अप्पा जोगळेकर

१९९५ साली फ्लॅट ४ लाखाला होता आणि ३.५० लाख सगळे दागिने, चांदीची भांडी, एफडीज लिक्विडेट करुन जमा केले होते. फ्लॅट मिळाला नाही तरी बेहत्तर पण एक पैश्याचं कर्ज घेणार नाही हा निश्चय होता. ओनरनं तो फ्लॅट ५०,००० ला घेतला होता त्यामुळे त्याला फक्त लॉस इन प्रॉफिट होता याची मला पूर्ण कल्पना होती. रेडी कॅश हा व्यावहारातला हुकमी एक्का आहे त्यामुळे फ्लॅट मिळाला. आज सगळं दहा / पंधरा पटीनं वाढलं असलं तरी रिसेलच्या फ्लॅटसाठी निर्णायक फॅक्टर्स तेच राहातात. विकणार्‍यानं तो नेहमी कमी किंमतीत घेतलेला असतो आणि दोघांची निकड, घेणार्‍याची समोरासमोर व्यावहार करण्याची क्षमता आणि विषेशतः निर्भयता व्यावहार घडवते. अशा माणसाने स्वच्छंदी पणाने जगले तर त्यात काय नवल आहे ? तसे नाही केले तरच आश्चर्य आहे. दोनदोन फ्लॅटस आणि लाखो रुपये बँकेत किंवा इतरत्र गुंतवलेले कैक लोक आज आहेत. स्वेच्छेनं जगणारा मात्र अजून एकही भेटला नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मी ५ वर्षांपूर्वी फ्लॅट घेतला तेंव्हा माझ्याकडे फक्त ५ लाख होते. तेंव्हा ६ वर्ष नोकरी करुन झाली होती तरीही. पुण्यातला सगळ्यात स्वस्त फ्लॅट देखील तेंव्हा २५ लाखात मिळत होता. त्यामुळे मी मुकाट्याने कर्ज काढले. मला त्याचे दु:ख नाही. त्यामुळे तुमचे ९५ सालचे साडेतीन लाख मला खूपच वाटले. असो.

In reply to by अप्पा जोगळेकर

त्यामुळे मी मुकाट्याने कर्ज काढले. मला त्याचे दु:ख नाही. मग आता अडचण काये स्वच्छंद जगायला ? मी सगळे पैसे लावले, तुम्ही नियोजन केलंय. आणि तुम्हीच तर म्हटलंय : कर्ज काढण्यासाठी स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास असावा लागतो. हे एक साहस आहे. कर्तबगारीवर विश्वास आहे आणि कर्ज घेण्याचं साहस आहे तर रोज सकाळी उठल्यावर मन मानेल ते करु असं जगायला कितीसं साहस लागतं ? आणि तुमच्या दृष्टीनं तर : कोपर्‍यावर उभे राहून सकाळ संध्याकाळ सिगरेट फुकत बसणारी मवाली मुले सुद्धा स्वच्छंदी जीवन जगतात. इतकं ते सहज आहे !

In reply to by अप्पा जोगळेकर

कोपर्‍यावर उभे राहून सकाळ संध्याकाळ सिगरेट फुकत बसणारी मवाली मुले सुद्धा स्वच्छंदी जीवन जगतात. हा जसा तुमचा स्वच्छंदाबद्दल विचार आहे तसा माझाही विचार आहे : रोज सकाळी उठून कामाला जाणं आणि रात्री दमून झोपायचं कशासाठी तर सकाळी उठून परत कामाला जायचंय म्हणून ! इतकं साचेबद्ध जगणारे लोक सुद्धा आपण स्वच्छंदी जीवन जगतोयं आणि आनंदात आहोत या भ्रमात राहू शकतात.

In reply to by संजय क्षीरसागर

इतकं साचेबद्ध जगणारे लोक सुद्धा आपण स्वच्छंदी जीवन जगतोयं आणि आनंदात आहोत या भ्रमात राहू शकतात.

In reply to by अप्पा जोगळेकर

इतकं साचेबद्ध जगणारे लोक सुद्धा आपण स्वच्छंदी जीवन जगतोयं आणि आनंदात आहोत या भ्रमात राहू शकतात. हे तुम्ही माझ्याबद्दल लिहिले आहे का का ? मी स्वच्छंदी जगत नाही, आनंदाने जगतो. मनात आले तर काम करायचे, मनात आले की झोपायचे असे वागणे मला मान्यच नाही. आयुष्यात काही महत्वाकांक्षा आहेत, पुढेही असतील. काही पूर्ण केल्या आहेत, काही बाकी आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी मी स्वतःच्या चॉईसने एक रुटीन ठरवले आहे. त्याबद्दल अधिक काही लिहू इच्छित नाही. खाजगी गोष्टी चव्हाट्यावर मांडणे मला आवडत नाही. एखाद्याला आवडत असेल. जर वरील वाक्य माझ्याबद्दल नसेल तर हा प्रतिसाद लागू नाही असे समजावे.

In reply to by संजय क्षीरसागर

एखादा अगदीच अडलेला असेल तर आणि २ दिवसात रोखीत व्यवहार होतोय म्हणून थोड्या कमी किमतीत तो फ्लॅट देऊ शकतो. पण मग त्यावेळेला बाकी फॅक्टर्स, म्हणजे तुम्हाला फ्लॅट आवडणे; एरिया चांगला असणे; विकणाऱ्याला निकड असणे; दुसऱ्या कोणी आपल्यापेक्षा मोठी ऑफर न देणे ईई सर्व जुळले पाहिजेत. इथे आमच्याकडे ९०% रोख तर सोडाच २०% पण कसेबसे जमा झाले. तर बाकी तत्वज्ञान ठीक आहे, तुम्ही केलंत हे सर्व एकदम भारी आहे. पण तुम्ही आता जो स्पेसिफिक सिनॅरिओ विचारला आहे त्यात काय करता येईल, कश्याप्रकारे बिनकर्जाने फ्लॅट येईल हे कृपया सांगावे.

In reply to by संजय क्षीरसागर

काही प्रश्नः- १. तुम्ही १९९५ साली जे दागिने आणि भांडी विकली, ती सर्व तुम्ही स्वतःच्या पैशाने घेतली होती की वडिलोपार्जित / लग्नात आलेली होती? थोडक्यात ३.५ लाख, जे तुम्ही कॅशमध्ये उभे केलेत, ते तुमचे स्वतःचे होते की घरच्यांनी (आणि सासरच्यांनी) अप्रत्यक्ष का होईना, तुम्हाला मदत केली? २. तुमचे १९९५ साली वय काय होते? माझा अंदाज आहे की आज तुमचे वय ६०+ आहे. म्हणजे २५ वर्षांपुर्वी तुम्ही पस्तीशीत असाल. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. इथे लोक बहुदा नोकरी लागली की लगेच काही वर्षात, म्हणजे साधारण २५-३० मध्येच पुण्यात घर घ्यायचा विचार करत आहेत. साधारण नवी नोकरी + नवं लग्न + मुल + घरून आर्थिक मदत नाही (कदाचित त्यांचीच जबाबदारी आपल्यावर आहे) अशात घर घ्यायचे असेल तर लिक्विडेट करायलाही अ‍ॅसेट्स नसतात. अशावेळी कर्ज घेणे शहाणपणा आहे. ३. आमचे घर २००३ साली ८ लाखाला घेतले. जे की सगळं लिक्विडेट करुन कॅशनी घेणंही आम्हाला कदाचित शक्य होतं. (सोन्याचे भाव तेव्हा कमी होते त्यामुळे साशंक आहे..). तेच बाजुला हिंजवडी आयटी पार्कची बुम आली आणि १० वर्षात किंमत ३५ लाख झाली. घरातल्या बाकी मालमत्तेची (दागिने, भांडी इ.) किंमत मात्र तितक्या पटीने वाढली नव्हती. तेच घर दहा वर्षानी आम्हाला कॅशने घेता आले नसते. (आई बाबांची नोकरी २०+ वर्ष झालेली असुनही..) तेव्हा वेळेचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. मधल्या काळात घरांच्या किंमती खुप जास्त रेटने वाढल्या. पगार, सोनं, चांदी इ त्या वेगाने वाढले नसतील. तुम्ही त्या ग्राफमध्ये स्लोप कमी असताना घर घेतलंय आणि आम्ही स्लोप स्टिप होत असताना. काही आश्चर्य नाही की तुम्हाला कर्ज लागलं नाही. माझे वडील अत्यंत गरीब घरातुन आहेत. आणि २५ वर्षांपुर्वी फ्लॅट घायला "१ लाख" त्यांच्याकडे नव्हते. ( त्याच सुमारास तुमच्याकडे मात्र ३.५ लाख कॅश होते..) त्यांनी कर्ज घेतलं तेव्हा माझे आजोबा भयानक घाबरले होते आणि म्हणाले की आयुष्य जाणार तुझं ह्यात.. आज माझ्या वडीलांचे ३ फ्लॅट्स आहेत. कर्ज घेऊन. कॅशची वाट पहात बसलो असतो तर एकही झालं नसतं. ४. ज्यांचा बिझिनेस असतो त्यांना जनरलीच वीक डे आणि वीक एन्ड असा प्रकार नसतो. बिझिनेस करणारा माझा भाऊ सुद्धा अचानक उठुन बुधवारी महाबळेश्वरला जातो आणि कधी कधी ३ -३ दिवस न झोपता काम करत असतो. जे नोकरी करतात, त्यांना दोन्हीची गरज नसते. आणि दॅट्स ओके! तुम्ही सुद्धा मागे एका चर्चेत "३१ जुन / जुलैच्या कामामुळे उत्तर देता येणार नाही." हे बोलला होतात. तेव्हा तुम्हाला अनेकांनी त्यावरुन डिवचलंही होतं. तेव्हा डेडलाईन्स तुम्हालाही आहेतच. पण बिझनेस असल्याने त्या तुमच्या हातात आहेत. संक्षी तुम्ही बुद्धिमान आहातच. म्हणुन तुमच्याकडे उत्तम शिक्षण आहे, बिझनेस जोरात आहेत, पैसाही पुष्कळ असेल. सर्वांची हीच परिस्थिती नसते. सामान्य बुध्यांक आणि यथातथा शिक्षण असणारे लोक फारसा पैसा गाठीशी नसताना झगडत असतात. उगाच त्यांना हिणवु नये. लोक आपआपल्या पद्धतीने आनंद शोधत असतात.

In reply to by पिलीयन रायडर

उगाच त्यांना हिणवु नये. लोक आपआपल्या पद्धतीने आनंद शोधत असतात. तुमच्या याच अप्रोचमुळे चांगला मुद्दा कायम हरवत आला आहे. मी जगण्याचा एक वेगळा अंदाज़ मांडतो आहे. तुम्ही इतरांना कमी लेखतो हा स्टँड घेतला तर विषयच संपला. कित्येक महिने मला अक्षरशः एक रुपया सुद्धा मिळत नाही कारण धंद्यात मीटर चालू नसतं त्यामुळे उगीच भलते कंपॅरिटीवज आणण्यात अर्थ नाही. शून्य कमाईत तर लोकांचे प्राण कंठाशी येतील पण माझ्या जगण्यात कणमात्र फरक पडत नाही . शिवाय माझ्याकडे झीरो स्टाफ आहे यावरनं व्यावसाय किती मोठा असू शकेल याची कल्पना करा. पुन्हा आणि शेवटचं सांगतो साहसाचा पैश्याशी काहीएक संबंध नाही. तुम्ही स्वतः ला पैश्यापेक्षा श्रेष्ठ समजत असाल तर स्वच्छंद गवसतो. त्याचा क्वालिफिकेशन आणि बुद्धिमत्ता याच्याशी देखिल संबंध नाही तर स्वतःच्या गौरवाशी आहे. आणि मी या मार्गानं गेलो आहे. बाकी तुमची मर्जी. उद्या पुन्हा टेबलटेनीस टीमची पिकनिक आहे त्यामुळे उत्तरं द्यायला जमणार नाही. माझा मुद्दा मांडून झाला आहे आणि धागा ही नेहेमीच्या वळणावर चाललेला दिसतो त्यामुळे या धाग्यावर पुन्हा उत्तर देईन असं ही नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

हे तर आपलं नेहमीचं झालं. स्टँडर्ड भांडण आहे ते आपलं. ते राहु दे बाजुला. साहस वगैरे सगळं खरं आहे. तुम्ही कर्ज काढणारे आनंदात राहु शकत नाहीत असं म्हणताय आणि मुद्दा केवळ तोच आहे की निव्वळ साहसाची तयारी असणं पुरेसं आहे का. मुळात आनंदाचा, स्वच्छंदी रहाण्याचा कर्जाशी काही संबंध नाही. सध्या तुम्ही माझ्या प्रश्न १ आणि २ ची उत्तरं द्या. तितकं पुरे.

In reply to by पिलीयन रायडर

स्वच्छंदी रहाण्याचा कर्जाशी काही संबंध नाही.
हेच मत जवळजवळ सगळ्या प्रतिवाद करणाऱ्या सदस्यांनी वर मांडले आहे पण संक्षिना ते पटले नाही. संक्षिची स्वछंदी असण्याची व्याख्या खूप सोपी आहे - कुठलंही काम न करण्याचा पर्याय. स्वछंदीपणा हि वृत्ती आहे हेच त्यांना मान्य नाही त्यामुळे खाली जमिनी सत्यता, वर तत्वज्ञान आणि मधे अर्थकारण असं एक स्वादिष्ट सँडविच तयार झालेले आहे :):).

In reply to by अप्पा जोगळेकर

हांगाशी. आता हे स्वच्छंदाचे सत्य बाहेर आले. २५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९२ साली ३. ५ लाख रूपये होते म्हणजे संक्षी श्रीमंतच होते. साडेतीन लाखात तेंव्हा लॉ कॉलेज रॉड वर किंवा पार्वती पायथ्याशी झकास २-३ बेडरूमचे घर मिळत असे. त्यामुळे त्यांनी सांगितलेली गृहीतके मध्यमवर्गीयांसाठी नाहीतच. मी १९८८ साली पहिला पगार घेतला तो ३६००/- होता. त्यातील २६००/- मला हातात आले. (माझा भाऊ व्हीजेटीआय मधून इंजिनियर होऊन १९८५ साली नोकरीला सिमेन्स सारख्या कंपनीत लागला होता जी एक उत्तम पगार देणारी कंपनी होती त्याचा १९८८ साली पगार ४०००/- होता.) १९९२ साली मी लग्नासाठी रोहिणीत जाहिरात दिली तेंव्हा माझा पगार ६४००/- होता. म्हणजे माझा एक पैसा सुद्धा ना कापता पाच वर्षाचा सर्वच्या सर्व पगार बँकेत टाकला असता तरीही साडे तीन लाख जमले नसते.माझ्या मूळ पगाराच्या स्लिप्स आजही माझ्याकडे आहेत. लक्षात घ्या डॉक्टरला मूळ पगारात (बेसिक मध्ये) २५ % जास्त non practising allownce मध्ये भर असते त्यामुळे त्यावेळेस चार वर्षे नोकरी असलेल्या कोणत्याही सरकारी प्रथम वर्ग राजपत्रित अधिकाऱ्याच्या पेक्षा(आय ए एस पेक्षाही) लष्करात डॉक्टरला पगार जास्त असतो. असे असून मला साडे तीन लाख रुपये स्वकष्टाचे जमा करणे अशक्य होते. किंवा सोन्याच्या भावाशी तुलना केली तर तेंव्हाच्या सोन्याच्या भावापेक्षा आजचा भाव ७ पट आहे म्हणजेच आज कोणालाही स्वबळावर घर घ्यायचे असेल तर जवळ जवळ २५ लाख रुपये राख शिल्लक असावी लागेल. थोडक्यात संक्षीनि हि जी काही स्वच्छंदाची टेप लावली आहे त्याचा मूळ आधार त्यांच्या श्रीमंतीत होता किंवा आहे. साधारण उच्च मध्यम वर्गास सुद्धा स्वबळावर घर घेणे अशक्य आहे.

In reply to by सुबोध खरे

+१ यहीं तो मै (और चिंगी मिंगी केशव हमीद और ग्राम मिपा से हमारे बहुत सारे साथी) कह रहा हूं मालिक...