Skip to main content

नवीन थीमबाबत चर्चा

लेखक नीलकांत यांनी रविवार, 01/01/2017 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज मिपाला एक नवीन रूप आहे. याला नवीन थीम असं म्हणू या. या नवीन थीमबाबत तुमचं मत काय? यातील काय आवडलं? काय नाही आवडलं? ते नक्की लिहा. या रंगरूपासोबत आपण मिपाची ठेवण बदलायला सुरुवात केलीये. एखादं नवीन लेखन करताना जोडायचे संबंधित टॅग आता सहज जोडता येतील. नवीनसुद्धा जोडता येतील. आजपासून प्रत्येक सदस्याला आपला फोटो लावता येईल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी 'माझे खाते'मध्ये जाऊन आपला फोटो लावून घ्यावा. याशिवाय यापुढे काही काळ हे बदल होत राहतील, त्या बदलांबाबतसुद्धा येथेच चर्चा व्हावी. आपल्या प्रतिक्रिया, सूचना, मत हे मिपाच्या जडणघडणीत खूप मोलाचं आहे. त्यामुळे आवर्जून आपलं मत मांडा. - नीलकांत

वाचने 42590
प्रतिक्रिया 182

प्रतिक्रिया

पण आमुलाग्र बदल झालेला असल्यामुळे सवय व्हायला थोडा वेळ लागेल. मात्र अशी अपेक्षा आहे की कमीत कमी "स्वगृह" मधे तरी पुर्वी जशी रचना होती तसे एखादे स्वतंत्र पान असायला हवे होते. बाकी पुर्वी जसे धागे प्रतिक्रियांनुसार वर वर येत होते, तसेच आताही नव्या रचनेत असणार आहे का? आणि प्रोफाईलमधे खरडवही वर टिचकी दिली असता एरर आला. सर्व मिपाकरांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

In reply to by शार्दुल_हातोळकर

"नवे लेखन" च्या पानावर टिचकी दिली आणि "स्वगृह" बद्दलचा प्रश्न निकाली निघाला. नवीन थीममुळे थोडासा गोंधळ उडाला. आता फक्त कविता/लेख वगैरे विभागातील नेवीगेशनचा प्रश्न सुटला तर छानच होईल.

In reply to by शार्दुल_हातोळकर

कमेंटसच्या क्रमाने धागे दिसायला हवेत. तसेच ज्या क्रमाने धागे आले त्या क्रमानेही दिसायला हवे. स्वगृहमधे नवे लेखन दिसायला हवे

आणि नेवीगेशन जर पुर्वीसारखे पान क्रमांकांप्रमाणे देता आले तर उत्तम होईल. आता next बटन वर टिचकी देऊन पुढे जावे लागत आहे, जे अडचणीचे वाटत आहे. एकदम विशिष्ट क्रमांकाच्या पानावर जाण्यासाठी पुर्वीची नेवीगेशन ची सुविधा जास्त चांगली होती.

मिपाचे नवीन रूप मोबाइल फ्रेंडली आहे. मोबाइल वर डावीकडे उजवीकडे स्क्रोल करावे लागत नाही. बाकी नवीन रुपाची सवय होइल हळू हळू

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मेनू बटन खाली स्क्रोल केल्यावर गायब होत न टॉपला जाऊन त्यातून नेव्हीगेट करावं लागत. त्याऐवजी जर मेन्यू बटनदेखील स्क्रोल करत खाली येत गेले तर छान होईल. (कदाचित मी मोबाईलहुन बघत असल्याने असे होत असेल?)

मिपाचे नविन रुप खुपच झक्कास आहे... पन नविन मिपावर मला आजुनही शोध/शोधा हा पर्याय सापडलाच/दिसलाच नाही.. शोधा हा पर्याय नविन मिपात हवा आहे.. म्हणजे सर्व लेख, प्रतिसाद, व मजकुर शोधने सोप्पे जाईल.. - कैवल्यसिंह

In reply to by कैवल्यसिंह

मोबाईलवर वरती काळ्या पट्टीत "मिसळपाव" या अक्षरांशेजारी तीन आडव्या पांढऱ्या रेघा आहेत. त्यावर टॅप केलं की स्वगृह, साहित्य प्रकार वगैरे विकल्प असलेली खिडकी उघडते. त्याच्या डोक्यावर "शोध" ही सोय आहे.

In reply to by आदूबाळ

मी मिपा ओपेरा मिनी वरुन बघतोय पन मला त्या काळ्या तीन रेघांच्या पर्यायामध्ये स्वगृह साहित्य प्रकार नवे लेखन मिपा विशेषांक घोषणा मदत पान एवढेच पर्याय दिसतात... शोध हा पर्याय दिसतच नाही.. मी अँड्रॉइड ४.२.२ वर ओपेरा मिनी वापरतोय....

In reply to by आदूबाळ

आदूबाळ,
मोबाईलवर वरती काळ्या पट्टीत "मिसळपाव" या अक्षरांशेजारी तीन आडव्या पांढऱ्या रेघा आहेत.
या तीन आडव्या रेघांना हँबर्गर आयकन म्हणतात. आपण त्यास वडापावचिन्ह म्हणूया. आ.न., -गा.पै

छान . नव्या रूपाची सवय होईलच. लॅपटॉपवरून अजून पाहिले नाही. ऑफिसातून वाचणार्‍यांचा नक्की विचार व्हावा. त्या दृष्टीने रंगाचा बटबटीतपणा कमी झालाय बहे चांगलेच. खरं तर एक ऑफिस व्हर्जन असावे, ज्यात निव्वळ टेक्स्ट दिसेल. पण ते तातडीचे नाही.

काल मोदींनी भाषणातुन हवा तसा धक्का दिला नाही पण येथे मालकांनी 'पुरे घर के बदल डालुंगा' च्या धर्तीवर संपुर्ण कायापालट केला. मी सकाळी पहिल्यांदा मोबाईलवरुन संकेतस्थळ उघडले ते अतिशय छान दिसले. आता लॅपटॉपवरुन बघत / लिहित आहे. नव्या वर्षात मालकांनी चांगली भेट दिली आहे. आपले आभार ! थोडा वापर केल्यावरच नवीन रुपाबद्द्ल अधिक लिहिता येईल.

नविन थिम अतिशय आवडली. सतत बदलत रहाणे ही मिपाची प्रवृती आहे. आणि त्या मुळेच मिपा अजूनही तरुण आहे. पैजारबुवा,

नविन थिम आवडली, पांढरा रंग थोडासा लाईट केल्यास रात्री वाचताना डोळ्यावर ताण कमी येइल. खरडवही दिसत नाहीये तसेच प्रतिसाद दिल्यावर धागे वर येत नाहीत. स्मायलीज दिसण्याची सोय हवी होती...

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- हम दोनो दो प्रेमी, दुनिया छोड़ चले जीवन की हम सारी रस्मे तोड़ चले... :- Ajnabee (1974)

In reply to by मदनबाण

खरडवही परत आली आहे पण त्यात आधीची एकही खरड नाही ! :( शिवाय खरडवही असे दिसण्या ऐवजी चतुरानंद यांची खरडवही असे दिसत आहे ! :प मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Puli Urumudhu... :- Vettaikaaran

पण मोबायलात प्रतिसाद of प्रतिसाद वाचताना झुम केल्यावर काळा मेन्युबार ४०% स्क्रीन माझीच असं म्हनतोय-(horizontal mode) अन सर्च इंजान पायजे राव , नविन मिपाकराने सहा सात वर्षापुर्वीचे लेख कसे शोधायचे. एकं दोनं करायचं जिवावर येत कधीकधी. गुरुप केल्या मुळं फरक पडणार म्हणा

नवी थीम हाताळायला पहिल्या थिम पेक्षा थोडी अवघड वाटली, कदाचित सवय होईल. पण, मिपाचं सगळ्यात आवडतं वैशिष्ट्य असणारं प्रतीसादांचं लेवलिंग गायब झालेलं दिसतंय! म्हणजे दुसऱ्या प्रतिसादानंतरचे सगळे प्रतिसाद एकाच लेवलला दिसत आहेत. शिवाय प्रतिसादानंतर धागा वर येत नाहीये.

मिपाची नवी थीम एकदम नेटकी वाटत आहे. संगणकावरून तर उत्तम दिसतच आहे पण चतुरभ्रमणध्वनीवर तर खूपच सोयीची वाटत आहे. या बदलांसाठी अनेक धन्यवाद. अधिक वापरल्यावर काही सुधारणा सुचल्या किंवा समस्या जाणवल्या तर या धाग्यावर प्रतिसादाच्या रुपात आवर्जुन नोंदवीन.

थीम प्रचंड जास्त आवडलेली आहे हो मालक. बेज्या झकास दिसू राहला सब्बन सेटप, मोकळंचाकळ स्वरूप आवडलेले आहे. रंग सुद्धा शांत अन डोयाले आल्हाददायक वाटतायत. तुम्ही घेत असलेल्या मेहनती करता तुमचे खूप आभार अन पुढील वाटचाली करता खूप शुभेच्छा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

एकदम सुटसुटीत आहे थीम.. पानावर आल्याआल्या आपल्याले पाहीजे तिकडं जाता येते. उगाच गण्याच्या घरी जाले ग्यानबाच्या दारातुन जाची गरज नाही.. रुळल्यावर हळूहळू आणखी गुणावगूण कळतील थीमचे, त्यानुसार बोलेनच.. पण 'फर्स्ट इंप्रेशन' झक्कास.. धन्यवाद ! आणि हो, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

निरनिराळ्या ब्राउजरमध्ये वेबसाइट्स डेस्कटॅाप, रीडिंग व्ह्यु,सिंगल कॅालम व्ह्यु बघण्याची सोय नवीन फोन्समध्ये असतेच त्यामुळे मला काही अडचण जाणवली नव्हती. पण आता मिसळपाव साइट फक्त सिंगल कॅालम/रीडिं व्ह्यु ठेवली आहे का? १) जुन्या आणि नव्या "नवे लेखन/स्वगृहचे अॅड्रेस बदलले आहेत ते पुन्हा बुकमार्क केलेत. २) जुन्या आणि नव्या "नवे लेखन/स्वगृहचे कोड चेक केले तेव्हा नवीन कोड २० टक्के कमी झालेला दिसतोय.( ४००० >>३४०० शब्द).यामुळे सर्वरसाइड लोड कमी झाला असेल. ३) आइडी फोटो अपलोड करताना किती साइजचा हवा हे सूचना दिसली नाही. २ एमबीचा २०० केबी करून टाकलाय. ४) अनुक्रमणिकेतील धाग्याची मोठी शीर्षकं फुल व्ह्युमध्ये शेवटी कापली जाताहेत पण सिंगल कॅालम व्ह्युमध्ये पूर्ण दिसताहेत.

नवी थिम बघून २००६ च्या सुमारास मनोगत होते त्याची आठवण झाली. नवे लेखन वर क्लिक केल्यानंतर पूर्वीप्रमाणेच सगळे लेख बघायला मिळत आहेत हे चांगलेच आहे. बाकी मिपा हे आपलेच आंतरजालावरील घर आहे. त्यामुळे ते जसे आहे तसे, ज्या थिममध्ये आहे त्या थिममध्ये चांगलेच आहे आणि असेल.

मिपामधले काही बदल अजुन चालु असतील किंवा नंतर येणार असतील. पण मला लक्षात आलेल्या काही गोष्टी इथे नमूद करतो. १) मुखपृष्ठावर वरती डाव्या कोपऱ्यात 'मिसळपाव' अशी अक्षरे दिसत आहेत. तिकडे मिपाचा लोगो अपेक्षित आहे. बॅनर सोडल्यास मुखपृष्ठावर इतर कुठेही मिपाचा लोगो दिसत नाही आहे. २) मिपाच्या बॅनरचा आकार आणखी थोडा मोठा हवा होता. मिपा लोगोच्या वरचा मजकुर वाचायला त्रास होतो आहे. ३) मिपा विशेषांकवर टिचकी मारल्यावर मदत पान दिसते आहे. तिकडे मिपाचे सगळे मिपा विशेषांक दिसणे अपेक्षित आहे. ४) आधीच्या रचनेमध्ये ऊजव्या बाजुला असलेले दखल सदर नव्या रूपात गायब झाले आहे. ते पुन्हा आणता येईल का? ५) रात्रीच्या वेळी मिपावर आल्यावर पांढऱ्या रंगामुळे वाचायला त्रास होतो. मिपावर 'नाईट मोड' आणणे शक्य आहे का? सध्या लक्षात आलेल्या गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत. नंतर त्यात योग्य ती भर घालेनच.

पूर्वी सगळ्या लेखांची यादी यायची.त्या यादीत सर्वात नवीन प्रतिसाद आलेला लेख सर्वात वर दिसायचा. आता 'नवे लेखन' वर (लॉगिनच्या खाली) क्लिक केले तर पूर्वीप्रमाणे यादी येते. पण त्या यादीत सर्वात वर नक्की कोणता लेख आहे याचा निकष समजला नाही. दुसरे म्हणजे सर्वात वर असलेल्या काळ्या पट्टीत 'नवे लेखन' वर क्लिक केले तर तशी यादी न दिसता कविता, लेख, चर्चा इत्यादी गोष्टीप्रमाणे लेख दिसतात. नवीन लेखन या एकच नावावर क्लिक केल्यावर दोन वेगळ्या गोष्टी दिसतात. त्यामुळे थोडी दिशाभूल व्हायची शक्यता आहे. त्याविषयी काही करता येईल का? दुसरे म्हणजे खरडवहीला पंख लावले गेले आहेत की काही दिवसांनी खरडवही परत येणार आहे? वर म्हटल्याप्रमाणे मिपा जसे आहे तसे आपलेच आहे. पण या गोष्टी समजल्या नाहीत.

मिपा तर मोदींच्याही दोन पावलं पुढे आहे....आधी केले मग सांगितले....सध्या थोडं गोंधळायला होतंय पण होईल सवय....मात्र सगळी शीर्षकं एकाच ठिकाणी दिसतील अशी एक तरी लिंक हवी....

मिपा तर मोदींच्याही दोन पावलं पुढे आहे....आधी केले मग सांगितले....सध्या थोडं गोंधळायला होतंय पण होईल सवय....मात्र सगळी शीर्षकं एकाच ठिकाणी दिसतील अशी एक तरी लिंक हवी....

ज्यांनी फोटो लावला नाहीये तिथे अमुक अमुक'स पिक्चर असं लिहून येतय. ते नावाबरोबर मिक्स होऊन खिचडी दिस्तय. फोटो नसेल तर रिकामा चौकोन चांगला वाटेल.

सर्व सदस्र्यांना विनंती, कृपया आपल्या प्रोफाईल फोटोवर कोणता तरी फोटो टाकाच. प्रतिसाद दिल्यावर "सदस्यांचा नाव' 's picture" असं दिसतंय. परत सदस्याचं नाव आल्याने ते विचित्र दिसत आहे. फोटो टाकाल तर तसं दिसणार नाही. नीलकांत, शक्य असेल तर अ‍ॅडमीनला प्लेसहोल्डर इमेज टाकता येईल काय सर्वांसाठी... ?

पुर्वी भटकंतीचे धागे पाहताना मी मुद्दामहून फोन ब्राउजरमधला रीडिंग /सिंगल कॅालम व्ह्यू करून चित्रे पाहात असे. त्यात ती मोठी आणि स्पष्ट दिसायची. आता थीमच तशी असल्याने काम झाले.

मोठ्या आडव्या मॅानिटरवाल्यांना खाली स्र्कोल करत जावे लागत असेल.

In reply to by आनंदी गोपाळ

१. माझ्या मोबाईलवर असं दिसतंय : मेन्यूबारची गिचमिड झालिये. मेन्यूचा आयकॉनही दिसत नाहीये. २. प्रतिसाद टाईप करण्याच्या खिडकीतला फाँटसाईझ इतर साईटपेक्षा लहान आहे. तो मोठा करता आला, तर माझ्यासारख्या वाचण्याचा चष्मा उर्फ वृद्धदृष्टीता असलेल्या लोकांची सोय होईल. ३. मोबाईलवर लॉगिन करताना स्क्रॉल करून पानाच्या शेवटापर्यंत जावं लागतंय. ती सोय वर आली तर छान होईल.

In reply to by आनंदी गोपाळ

तुमच्या मोबाईलचा ब्राउजर चे नाव काय आहे? माझ्याकडे Opera mini android browser आहे. पन असे नाही दिसत थोडे वेगळे दिसतेय..

In reply to by कैवल्यसिंह

हा मोबाईलचा फायरफॉक्स आहे. डेस्क्टॉपवर ठीक दिसतं, फाफॉत. मेन्यूबार गंडलेला आहेच पण बरा दिसतो.

छान हा!!! मोबाईलफ्रेंडली थीम आहे.

Displaying profile Picture's Rights' must be reserved...

मिपाचे हे नवे फॉन्ट तर फारच देखणे आहेत. पण मिपाचे पान व पार्शवभूमी यांचा रंग एक नको. तो आता सफेदच आहे. पार्श्व भूमीचा रंग ग्रे किंवा ग्रे प्लस ग्रीन असाही चालेल.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागरांशी सहमत. फिरस्त्यावरून (=मोबाईल) बरीच अडचणीची आहे. मेन्यूबार बरीच जागा खातो. नवे लेखन पानावर आडवी उलगड (= हॉरिॆझाँटल स्क्रॉलिंग) वापरल्याशिवाय उजवीकडील मजकूर दिसंत नाही. -गा.पै.

नवीन थीम हाताळायला अवघड वाटते पण हळूहळू सवय होईल. रंग संगती थोडी वेगळी हवीय.

बदल खूप चांगला आहे!!! मोबाईलवरुन सध्यातरी अडचणीचे वाटत आहे. मोबाईलवरुन desktop view पाहण्याची व्यवस्था केल्यास उत्तम. mobile browser HTML5 Support करत नसेल तर फार विचित्र दिसत आहे. anyway HTML5 साठी जास्तीची bandwidth खर्चावी लागेल!!! कथा विभाग कुठे दिसत नाही तो :(

फोटो टाकून बघितला तर इमेजचे पिक्सेल आॅटो अॅडजस्ट झाले.आता क्लिकुन बघितले तर इमेज डिस्टाॅर्टेड दिसतेय. फाइल साइज कमी केलाय दोन एमबीपेक्षा. काय करायला चुकतेय नेमके?

थोडसं बाचकायला होतय.... हळु हळु सवय होइल म्हणा.... पण मिपा आठवलं की डोळ्यासमोर तो पुर्वीचा देखावा यायचा. मालक एक विणंती आहे.... ती जुन्या थीम ची लिंक पण ठेवा की काही दीवस

माझा सहभाग म्हणून जो टॅब यायचा ज्यात आपण प्रतिसाद दिलेल्या धाग्यांवर नवीन काही आलय का ते समजायच, ही सोय नव्या थीममध्ये आहे का?

प्रतिसादांचं ट्री स्ट्रक्चर दिसत नाहीये. प्रतिसाद - उपप्रतिसाद- उपउपप्रतिसाद असं दिसायला हवं, ते न दिसता त्याच्या ऐवजी फक्त प्रतिसाद आणि उपप्रतिसाद एकाखाली एक असेच दिसताहेत.

In reply to by प्रचेतस

सहमत! इतर संकेतस्थळांच्या तुलनेत हे प्रतिसाद-उपप्रतिसादाचं वैशिष्ट्य खूप आवडायचं! ते गायब झाल्याचं पाहून वाईट वाटलं!

In reply to by प्रचेतस

ट्री स्ट्रक्चर मंदी, थोडा डिटेल प्रतिसादची लड लागली का देन, द लेटर्स युज्ड टू जंम्प डाऊन द व्हॅली सन, आपला व्हर्नाक्युलर पोरे लोक काय म्हणते ते कडेलोट होते. एका लाईन मंदी एकच अक्षर अन असा एक पॅराग्राफचा प्रतिसाद आला का 'मदर ऑफ कडेलोट' होतोनी साह्येब. त्येला आता येगले फिचर म्हणावे का सोडून द्यावे हेला मात्र पर्सनल चॉईस वर सोडले, फॉर मी जे हाय ते उत्तम हाय नी.

नवी थीम हाताळायला पहिल्या थिम पेक्षा थोडी अवघड वाटली, हळु हळु होइल सवय . वाचन खुणा पण हव्या होत्या .

मस्त आहे. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आता फालतू धागे (म्हणजे स्वतःला नको असलेले) धागे नजरेआड करण्याची मोठे सोय झाली. त्यासाठी धन्यवाद. शिवाय फाँटही मला आवडला. हा मंगल नाही आहे का? नसल्यास कुठला आहे ?

खूपच सुटसुटीत आणि सोयीस्कर वाटते आहे ही थीम. पूर्वीपेक्षा हाताळायला सहज. आणि फाँट अतिशय मस्त. धन्यवाद. ...लाल हेडरला फाटा दिल्याबद्दल विशेष धन्यवाद !

नवीन थीम छान आहे. विशेषतः हापिसात वापरायला चांगली आहे. लांबून दिसत नाही स्क्रीन वर काय आहे ते ;) पण काही अडचणी १. वाचनखुणा दिसत नाहीयेत. शोधा हा पर्याय नसल्यामुळे वाचनखुणा साठवून ठेवल्या होत्या विशेषतः पा. कृ. साठी पण आता वा. खु. नसल्यामुळे ते पण अवघड झाले आहे. २. मिपा विशेषांक वर टिचकी मारल्यावर – वारंवार विचारले जाणारे प्रश्न हा सरपंचांचा धागा उघडतोय. ३. वरच्या काळ्या पट्टीवर जिथे मिसळपाव, स्वगृह, साहित्य प्रकार वैगेरे लिहिले आहे त्यात बाकी हेडिंग एका रेषेत दिसतात पण "मिसळपाव" हे हेडिंग थोडे वर गेले आहे तिथे काही लोगो अपेक्षित आहे का? नसेल तर ते एका सरळ रेषेत चांगलं वाटेल आता गल्ली चुकल्यासारखं वाटत आहे.;) ४. हि काही प्राथमिक निरीक्षणं बाकी हाताळायला लागल्यावर समजतील तशी तशी इथे नोंदवेनच:)

राम राम मंडळी, सर्व प्रथम सगळ्यांना सादर प्रणाम ! मिपा संपादक मंडळाने आम्हाला इकडे कट्ट्या सामावून घेतले आणि बोलण्याची अनुमती दिल्या बद्दल धन्यवाद. एक छोटीशी विनंती 'भटकंती' प्रकारामध्ये जर भारतातील आणि भारताबाहेरील, सायकलिंग , रनिंग असे वेग वेगळे उपप्रकार करता आले. तर अजून सोईस्कर होईल. धन्यवाद. आभारी आहे, नाजूक पाटील.

मिपा आणि मिपा व्यसनी लोकांसाठी एवढी मेहनत कायमच घेत असल्याबद्दल मालकांचे अनेक आभार :) थीम सुटसुटीत आहे, अजून नवीन आहे, हळूहळू सवय होईलच, याआधीही मिपाची थीम बदलली गेली तेव्हा वेगळं वाटलं होतं, याचीही वापराने सवय होईल. बाकी खव गायबल्यामुळे वाईट वाटतंय, ती एक खूप छान सोय होती.

खूपच सुटसुटीत आणि सोयीस्कर वाटते आहे ही थीम. पूर्वीपेक्षा हाताळायला सहज. आणि फाँट अतिशय मस्त. धन्यवाद.मस्तच आहे.