Skip to main content

नवीन थीमबाबत चर्चा

लेखक नीलकांत यांनी रविवार, 01/01/2017 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज मिपाला एक नवीन रूप आहे. याला नवीन थीम असं म्हणू या. या नवीन थीमबाबत तुमचं मत काय? यातील काय आवडलं? काय नाही आवडलं? ते नक्की लिहा. या रंगरूपासोबत आपण मिपाची ठेवण बदलायला सुरुवात केलीये. एखादं नवीन लेखन करताना जोडायचे संबंधित टॅग आता सहज जोडता येतील. नवीनसुद्धा जोडता येतील. आजपासून प्रत्येक सदस्याला आपला फोटो लावता येईल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी 'माझे खाते'मध्ये जाऊन आपला फोटो लावून घ्यावा. याशिवाय यापुढे काही काळ हे बदल होत राहतील, त्या बदलांबाबतसुद्धा येथेच चर्चा व्हावी. आपल्या प्रतिक्रिया, सूचना, मत हे मिपाच्या जडणघडणीत खूप मोलाचं आहे. त्यामुळे आवर्जून आपलं मत मांडा. - नीलकांत

वाचने 42590
प्रतिक्रिया 182

प्रतिक्रिया

एक-दोन दिवस वापरून पाहिलं, मग प्रतिसाद देतोय. नव्या रचनेबद्दल कोणतीही अडचण आली नाही. फाँट आवडला. प्रोफाइल फोटोही टाकलाय. वरची आणि खालची पट्टी (जिथे स्वगृह साहित्य प्रकार आणि मूलभूत माहिती, नवीन सदस्यांकरिता... इ.) काळ्या रंगाची आहे, ती रंगीत होईल थोड्या दिवसात, असं वाटतं. एकूण छान.

In reply to by सुधांशुनूलकर

वरची आणि खालची पट्टी (जिथे स्वगृह साहित्य प्रकार आणि मूलभूत माहिती, नवीन सदस्यांकरिता... इ.) काळ्या रंगाची आहे, ती रंगीत होईल थोड्या दिवसात, असं वाटतं.
...लाल झाली नाही म्हणजे मिळवली.

बदल रिफ्रेशिंग आणि चांगला आहे.

डेस्कटॉपवर IE11 मधे मिपा व्यवस्थीत उघडत नाही. रिकामे कप्पे दिसत आहेत पण माहिती दिसत नाही. तसेच मिपाचे नेवीगेशनचे वरच्या काळ्या पट्टीतील लिंक्स पण दिसत नाहीत. डेस्कटॉपवर मिपाचा लोगो पडद्याचा जवळपास ५०% भाग व्यापत आहे.

थीम आवडली, मात्र प्रतिसादांप्रमाणे धागा वर येणे, प्रतिसाद, उपप्रतिसाद एका खाली एक येणे ही वैशिष्ट्ये पुन्हा मिळावीत, आपला लेख आणि प्रतिसाद संपादीत करण्याची सुविधा देखील मिळावी ही विनंती सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!!

मी आज लॅप्टॉप वर लॉगिन केले पण मला सगळे ब्लँक दिसतेय मिपावर. इंटरनेट एक्सप्लोर चा प्रॉब्लेम आहे का ? माझा IE 11 आहे.

नमस्कार, आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. आपणासर्वांच्या मताची दखल घेतली आहे. सध्या काही सुविधा उपलब्ध नाहीत त्या लवकरच कार्यरत करतो. इन्टरनेट एक्पलोरर मध्ये अडचण आहे हे लक्षात आलंय. मात्र विन्डोज १० वर एज ब्राऊजर मध्ये मिपा उत्तम चालतंय. वाचनखुणा, खरडवही, प्रतिसादांसहीत वर खाली होत जाणारा नवे लेखनवाला विभाग आदी सर्व थोड्याच काळत ठीक होईल. प्रतिक्रिया देत रहा त्याने मदत होते. - नीलकांत

आधीच्या थीममध्ये "माझा सहभाग"वर क्लिक केलं ही आपण आधी केलेल्या कमेंट्स आणि त्यावर आलेली उत्तरं असलेल्या धाग्यांची यादी दिसत असे. विशेषतः तंत्रजगत विभागात काही प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर आलं की नाही हे बघायला ती सोय खूप उत्तम होती. ती सोय आता आहे का? असल्यास मार्गदर्शन कराल का?

विभागवार दुव्यांवर क्लिक करून विभागात गेल्यासही धाग्यांचा क्रम हा ताज्या प्रतिसादांनुसार लागलेला वाटतोय. तो धागा काढल्याच्या दिनांकानुसार लागायला हवा. अन्यथा नवे, पण कमी प्रतिसाद असलेले धागे वाचले जाणारच नाहीत.

खूप स्लो झालाय का हे ? multiple टॅब्स ओपन केले कि लोड होताना खूप वेळ घेतायत

मला जाणवलेला (आणि खटकलेला सुद्धा) मोठा बदल म्हणजे - लँडींग पेजवर सर्वात वर शिफारस असने तीही फार मोठ्या स्वरुपात. शिफारसअसू नये असे नाही पण माझ्या मते मिपासारख्या मुक्त संकेतस्थळावर संपादकाचा एक कोपरा असावा आणि तेथे शिफारस आणि संपाकाची घोषणा असे काही असावे. नाहीतर पूर्वी सारखे नवे लेखन हेच लँडींग पेज असावे. User Based Free साइट असल्याने ती तशी राहावी असे माझे मत. - मिपावर आधी अक थिम अशी होती ज्यात मिपावर आल्या आल्या विविध विषयावरील दहा धागे दिसयाचे. त्यावेळी नवीन लिखाणाचे आयुष्य तीन ते चार दिवस असायचे. एकदा धागा लँडींग पेजवरुन बाद झाला की काही अपवाद वगळता त्याला वाचने नाही प्रतिसाद सुद्धा नाही. आताची थीम काहीशी तशीच आहे पण फक्त पाच धागे दिसतात. काही जुन्या समस्या नवीन कॉमेंटसवर क्लीक केले की पहील्या पेजवरील प्रतिसाद दिसनार दुसऱ्या पेजवरील दिसनार नाही. प्रतिसादात +१ लिहिण्यापेक्षा असे काही करायची वेगळी सोय असावी. आवडलेले बरेचसे - मला मुळात बदल आवडतो. तेच तेच पणाचा कंटाळा येतो. - मोबाइलवर व्यवस्थित वाचता येते. - लेख, किंवा कविता वर क्लिक केल्यास लेखांची संक्षिप्त माहीती आहे. - मला रंगसंगती सुद्धा आवडली.

विभागवार लेखांमध्ये लेखकाचे नाव दिसत नाही .(दिसावे अशी आशा आहे )

नवीन थीम आवडली. आशा आहे कि येत्या काही दिवसांत ज्या थोड्या बहुत त्रुटी आहेत त्या दूर होतील. मिसळपाव आणि स्वगृह यापैकी दोन्हीवर टिचकी मारल्यावर एकच पान उघडतंय...! मिपा विशेषण आणि मदत पान याबद्दलही हेच सर्वेक्षण.

नवीन थीम सुटसुटीत आहे .... मो ब ई ल फ्रेंडली आहे .... लेखनास स्टार रेटिंग देण्याची सुविधा मिळु शकेल का ?

छान दिसतोय मिपाचा मुखडा. आधीच्या एकाच पानापेक्षा हे जास्त सुटसुटीत वाटतंय. जास्तीत जास्त धागे दिसू शकतायत, तरी सगळा पसारा सॉर्ट करून, आवरून घराची रचना बदलून नीटनेटकं लावल्यासारखं दिसतंय :-) धन्यवाद नीलकांत.

वर म्हणल्याप्रमाणे प्रतिसादाला +१ द्यायचे असेल तर लाईक प्रमाणे सोय हवी. धाग्यांनाही रेटींग देण्याची सोय असेल तर चांगले धागे निवडायला मदत होईल.

साठवलेल्या वाचनखुणा कुठे सापडतील?

मिपाचे नवे रूप मला अजिबात आवडले नाही. कारण काय ते सांगता येत नाही. मुळात सुरवात झाली ती 'थीम' या शब्दाचा वापर बघून. अजून एकही सदर उघडले नाही. काही वाचायला मनच होत नाही.

मला तरी नवे रुपडे आवडले आहे. उपप्रतिसादाला दिलेले प्रतिसाद मूळ प्रतिसादाखाली दिसत आहेत. ते जर का पहिल्या फॉरमॅट प्रमाणे करता आले तर (प्रतिसाद- उपप्रतिसाद - उपउपप्रतिसाद) चांगले वाटेल.

अं हं नवीन थीम आवडली नाही . माझ्या मोबाईल वरून झूम आउट करता येत नाहीये। नवीन प्रतिसाद पाहायच्या लिंक चालत नाहीये आणि एकदम स्क्रोल डाऊन केले तर शेवटचा प्रतिसाद दिसण्याचा ऐवजी अन्य माहिती दिसत आहे .

नव्या रुपावर बरीच मेहेनत झालेली वाटते आहे. शिफारस मुख्यपानावर थेट मध्यभागी असणे खूप आवडले. यामुळे एक इन्ट्यूटीव फिल्टर आपसूकच येतो आहे. पडीक रहायचं असल्यास "नवे लेखन" वर जाण्यास एखाद्दुसरा क्लिक जास्त नाही. पहील्या सर्विसिंगनंतर गाडी अजून स्मूथ होईल. मालकांना धन्यवाद्स!

लॉग इन चा बॉक्स वरती हवा होता . मिपा ओपन केल्यावर लॉग इन उजव्या बाअजूस हवे . सध्या लॉग इन साठी खालीपर्यंत स्क्रोल करावे लगते. साईटवर आल्यावर लॉग इन हे सहज आणि स्क्रोल विना दिसला पाहिजे

माननीय प्रशासक,
माझ्या मोबाईल वरून झूम आउट करता येत नाहीये।
माझीही हीच तक्रार आहे. फिरस्त्यावर दृश्यविस्तार (= मोबाईलवर झूम इन) केल्यास डावी आणि उजवीकडे पांढरे प्रांत (=व्हाईट स्पेसेस) येतात. आ.न., -गा.पै.

मिपा वरच लिखाण शोधायला काही पर्याय आधीच उपलब्ध आहे का?म्हणजे मिपा वरील लेखन त्याच्या लेखाच्या नावाने, लेखकाच्या नावाने वगैरे शोधायचं असेल तर काही लिंक आधीच उपलब्ध आहे का? असली तर कुठे आहे आणि नसली तर तशी सोय उपलब्ध करून देता येईल काय? तसच सध्या (म्हणजे पूर्वी देखील) टंक लेखन करताना बॅक स्पेस देऊन (काही चुकले असेल तर) पुन्हा लिहायला सुरुवात केली कि आधी लिहिलेली अक्षरे गंडतात. त्यासाठी सध्या कामचलाऊ उपाय म्हणजे alt + tab दोनदा दाबून परत लिखाणाच्या ठिकाणी येणे व लिहायला सुरुवात करणे. नवीन थीम मध्ये हे सुधारता येईल काय?

अजून काही शिफारसी/ सुधारणा : १. +१ असा प्रतिसाद देण्या ऐवजी लाईक सारख काहीतरी असाव. २. शिफारस चा चौकोन पण सगळ्यात पहिले असू नये, तो उजव्या बाजूच्या पॅनेल मधे च असावा, किंवा खालच्या बाजूला असावा. कारण प्रत्येक वेळी मिपा उघडल कि तेच तेच लेख सगळ्यात पहिले दिसतात. त्या ऐवजी सगळ्यात पहिले एका चौकटीत नुकतेच नवीन लेखन झालेले (नवीन प्रतिसाद आलेले नव्हे) ५ लेख दिसले तर जास्त संयुक्तिक वाटेल. ३. नवीन प्रतिसादांवर टिचकी मारली कि जर पहिल्या व पुढील कुठल्या हि पानावर नवीन प्रतिसाद असतील तर पहिल्या पानावरचे नवीन प्रतिसाद खुण केलेले दिसतात. पण पुढच्या पानावर टिचकी मारून गेले कि त्या पानावरचे नवीन प्रतिसाद अधोरेखित अथवा तसे खूण केलेले दिसत नाहीत. हे जुन्या थीम मध्ये पण होतच होत. पण नवीन थीम मध्ये सुधारणा झाली तर आवडेल. ४. वाचकांना लेखाला मतदान करता आल किंवा शिफारस करता आली तर बर होईल. त्यामुळे वाचकांनीच निवडून दिलेल्या चांगल्या लेखाची यादी बनत जाईल जी नवीन आलेल्या वाचकाला उपयुक्त ठरेल. यात फक्त लेख वाचनीय आहे एव्हढेच TAG करता याव. यात श्रेणी असू नये. म्हणजे मुद्दामून कोणाला कंपुगिरी करून वाईट लेख अस मतदान करता येणार नाही. ५. मिसळपाव वरील आत्ता पर्यंत च्या चांगल्या लेखांचे संकलन करून तिमाही प्रमाणे वर्गीकरण करून त्याचे पण वेगळे पान द्यावे.

नवीन थीम मोबाईलमधून वाचताना छान वाटते. डेस्कटॉपवर तितकी आवडली नाही. पहिल्या पानावर खूप जास्त टेबल टेबल दिसतायत. मधला सुविचाराचा टेबल नसला तरी चालेल किंवा बॅनर नसेल तर सुविचार असं काही असावं. पहिल्या पानावर लेख, चर्चा, कविता, इत्यादी सर्व टेबल न दिसता फक्त शिफारस आणि ज्या विभागात नवीन लेखन झाले आहे तोच विभाग दिसला तर मुख्य पानावरील कन्टेन्ट कमी होईल. बरीच माहिती योग्य त्या ठिकाणी ठेवली तर अजून सुटसुटीत दिसेल, जस की साहित्य संपादकांविषयी आणि अनाहिता सदस्यत्व ही माहिती नवीन सदस्यांकरिता महत्वाचे दुवे इथे ठेवली तरी चालेल. मिसळपावचे फेसबुक पान, ट्विटर, युट्युब चॅनेल या तिन्हीचा फक्त लोगो हेडर आणि फूटर दोन्हीमध्ये ठेवावा. अतिरिक्त माहिती मिसळपाव बद्दल मूलभूत माहिती किंवा नवीन सदस्यांकरिता महत्वाचे दुवे इथे दिली तरी चालेल. साहित्य प्रकार आणि नवे लेखन दोन वेगळे ओपशन करण्याऐवजी, नवे लेखनखालीच विविध साहित्य प्रकार हा मेनू सामावून घेतला तरी चालेल. स्वगृह खाली आवागमन, घोषणा, मदत पान हा छोटा मेनू ठेवला तरी चालेल. जेव्हा काही महत्वाची घोषणा असेल तेव्हा घोषणा या टेक्सटसमोर किंवा हेडरमध्ये एखादा दवंडी पिटणारा माणूस अशी अनिमेटेड इमेज टाकली तर वाचकांचे लक्ष वेधून घेता येईल. असेच युट्युब चॅनेल साठीही करता येईल. जेव्हा जेव्हा नवीन विडीयो अपलोड झाला असेल तेव्हा हेडर मधील युट्युब लोगो इमेज अनिमेट होईल असे काही.

In reply to by रातराणी

खुप चांगल्या सजेशन्स आहेत. सईच्याही कल्पना आवडल्या. मदत पान इथे खुप लिंक्स एकतर ठेवता येतील. मिपाचा साईट मॅप असला तर बरं होईल. मदत पानवर संपादक, साहित्य संपादक, वाविप्र, अनाहिता, सदस्य झाल्यावर वाचायचे दुवे इ. सर्व ठेवत येईल. आणि ती माहिती वर असणे आवश्यक आहे. पुर्ण पेज खाली गेल्यावर एकदम बरीच माहिती मिळतेय, त्याने नव्या माणसाला गोंधळायला होऊ शकतं. सोशल मिडीयाचे फक्त लोगो फेडर - फुटरला असावेत असे माझेही मत आहे. शक्यतो असेच असते. म्हणजे साईटवर पहिल्यांदा आलेल्या माणसाला मिपाच्या शाखा कळतील. तातडीने लाईक / सबस्क्राईब / फॉलो करता येईल. टेबल्स जास्त होत आहेत हे खरंय. त्यातही सई म्हणते तसं सतत शिफारस मधले तेच ४-५ लेख सतत दिसत आहेत. त्यामुळे मी तरी नवे लेखनवरच सतत जात आहे. मुख्य टेबल्स मधुन मी कोणताही लेख पाहिला नाहीये अजुन. तेव्हा शिफारसची जागा बदलावी असे मलाही वाटतेय. बॅनर रोज असणारे का? कारण ती एक महत्वाची दृश्य जागा जातेय. डेस्कटॉपवर अर्धा भाग बॅनर आणि अर्धा शिफारस ह्यात जातोय.

थीम आवडली.. काही बाबी नजरेत आल्यात त्या: लॉग-इन केल्यावर आणि लॉग-इन न करता वेगवेगळे सुविचार दिसत आहे. (खरं तर सुविचारांपेक्षा त्या दिवसाचे खास महत्त्व किंवा ट्रिव्हिया असलेलं जास्त आवडेल.) स्वतःचे सर्व लेखन दिसत नाहीये. म्हणजे http://www.misalpav.com/user/me/authored यात काहीच दिसत नाही. माझाच सदस्य क्रमांक वापरला तर मात्र दिसते. http://www.misalpav.com/user/11117/authored याशिवाय आणखी काही मुद्दे सुचवते - "हॉटेलात आलेली माणसं" लॉग-इन केलं नसल्यास दिसू नये असं मला आधीपासून वाटत आलं आहे. फक्त किती सदस्य आणि किती वाचक हजर आहेत यांचे आकडे असावेत. एखाद्या सदस्याच्या सर्व लेखनात, विभागवार वर्गीकरण करता आले आणि ते फिल्टर म्हणूनही वापरता आले तर शोधायला सोपे पडेल. ज्यांचे वेगवेगळ्या विभागांत लेखन आहे, पण समजा त्यांची एखादी पाकृ शोधायची आहे, तर पाकृचा फिल्टर वापरता येईल. शिवाय बापाचा नैवेद्य/ श्रीगणेश लेखमाला यांतले लेखन दिसतच नाही, तेही दिसायला हवे. सदस्याच्या प्रोफाइलवर गेल्यावर "Track" ऐवजी "सहभाग" / "प्रतिसाद" शब्द योग्य वाटतात. यातही फक्त लेखाचा दुवा दिसतो. त्यात सदस्याच्या प्रतिसादांचेच दुवे दिसले तर जास्त बरे होईल. वाचनखुणा सध्या दिसत नाहीयेत, पण पुढे दिसतील असे गृहीत धरुन - लेखाच्या खाली "वाचनखूण साठवा" हा पर्याय असतो, त्याऐवजी तो वरच देता आला तर? लेख नंतर वाचायचाय म्हणून खूण साठवण्यासाठी कधी कधी फार "स्क्रोल" करावे लागते. एखाद्या लेखाला फार प्रतिसाद आले तर एकापेक्षा अधिक पाने लागतात, पण पुढच्या पानांवर लेख पुन्हा दिसतो, तो फक्त पहिल्या पानावर दिसला तर? प्रतिसाद पाहायला पुन्हा फार "स्क्रोल" करावे लागते. एक-दोन सदस्यांनी सुचवले आहेच. तसे स्वतःच्या प्रोफाइलसाठी वर उजव्या कोपर्‍यात चित्र आणि ड्रॉपडाउन मेन्यु असावा असे वाटते.

मिसळपाव वर सर्च ईंजिन आहे का? एखादा लेख, लेखक कसा शोधायचा?

नवीन रचना आवडली, छान सुटसुटीत आहे. माझा +१ माझ्या काही सूचना: १. फॉन्ट थोडा मोठा करता आला तर वाचायला सोपं वाटेल. २. प्रतिसादात सदस्याचे नाव आणि त्याशेजारी लगेच प्रतिसादाचे शीर्षक दिसत असल्याने वाचताना गोंधळ उडतोय. सदस्याचे नाव त्याच्या फोटोखाली टाकता येईल का? किंवा सदस्यानाम आणि प्रतिसादाचे शीर्षक यांचा फॉन्ट/रंग वेगवेगळे ठेवता येतील का? ३. हेडर तात्पुरता आहे हे समजतेय पण काळया रंगाच्या जागी मिपाचा गडद लाल रंग कसा वाटेल? ४. सर्व लेखनप्रकारांना न्याय दिल्यामुळे मुखपॄष्ठ क्लटर्ड वाटतेय. धाग्यांची वर्गवारी करण्याकरता २-३ प्रकारचे क्रायटेरिया वापरून त्यानुसार मुखपॄष्ठावरचा डॅशबोर्ड असावा असं वाटतं.

नवीन थीममध्ये बरेच जुने धागे गायब झाले आहेत. "ताज्या घडामोडी - ३" या धाग्यावर प्रतिसाद देऊनसुद्धा हा धागा अदृश्यच आहे. नोटाबंदीवरील अनेक हॉट धागे गायब आहेत. खरडवही सुद्धा गायब आहे. फॉन्ट खूप मोठा व ठळक आहे. एकंदरीत नवीन थीम फारशी आवडली नाही. अर्थात सवय झाल्यावर आवडायला लागेल असं वाटतंय.

प्रतिसाद पे प्रतिसाद , प्रतिसाद पे प्रतिसाद ....प्रतिसाद पे प्रतिसाद , प्रतिसाद पे प्रतिसाद ...और फिर उसपे 'कडेलोट होनेतक प्रतिसाद ' हे मिस होतंय ... त्याशिवाय सदस्यांना भांडण्यात मजा कशी येईल ? आणि कुठे थांबायचं ते तरी कसं कळणार ना ? बोले तो ट्री हवाच !!

In reply to by संदीप डांगे

हे वैशिष्ट्य परत आलोय! आत परत पोटभरून भांडूया आणि कडेलोट होईपर्यंत अंताक्षरीपण खेळता येईल. हे वैशिष्ट्य परत आणल्याबद्दल मिपामालकांचे खूप खूप आभार!!

In reply to by मराठी कथालेखक

:):) ह्या नवीन थीम मध्ये कडेलोट होणार कि नाही माहित नाही. एका कडेलोट झालेल्या जुन्या धाग्यावर जाऊन आलो तर तिथे आता प्रतिसाद व्यवस्थित दिसत आहेत! :):)

लेख, प्रतिसाद, उप प्रतिसाद, खरडवही, खरडफळा व व्य नि यांवर जी वेळ दाखवतात ती २४ तासांची दाखवतात त्यात बदल करुन ती जर १२ तासाची केली तर बरे हेईल.. म्हनजे वेळेपुढे AM/PM आसले तर जरा बरे होईल...

नवीन थीम फारच छान खूपच आवडली लेखावर जेंव्हा प्रतिक्रिया दिली जाते तेंव्हा सर्वात शेवटची प्रतिक्रिया ( Latest comment ) लेखाखाली सर्वात पहिल्यांदा दिसायला हवी म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन प्रतिक्रिया वाचताना scroll करून खाली जावे लागणार नाही . चर्चा रुपी लेखांसाठी तर हे खूप सोपे जाईल.

थीमचा पार्श्वभाग पांढरा असल्याने आवडली नाही तो फिकट रंगीत हवा होता . ज्यांना जुनी थीम वापरायची त्यांना ती थीम वापरायची सोय हवी होती .  मुख्य पानावर शिफारस च्या दालनामध्ये "शिर्षक" च्या ऐवजी "शीर्षक" असा बदल करावा .शि र्हस्व च्या ऐवजी दीर्घ करावा.

मागचे लेख दिसत नाहीये . उदा. गुगल वरून मी http://www.misalpav.com/node/33244 हा लेख शोधला , त्यावर प्रतिक्रियाही दिली पण तो लेख प्रतिक्रिया प्रकाशित झाल्यानंतरही नवे लेखन या सदरात दिसत नाहीये .तसेच त्या लेखाची वाचनखुणही साठवता येत नाहीये .तसेच लिंक पण नाही देता येत आहे.

In reply to by प्रचेतस

मिपावर अजिबात जीव लागत नाहीहे. मिपा तंत्रज्ञाचा अजिबात अवमान करायचा नाही. पण पूर्वीच्या मिपात आपलं एक आपलेपण वाटायचं. सध्याच्या मिपा रंगसंगतीच्या बाबतीत अजिबात काही विशेष असं काहीच नाही. चारही बाजूंनी काळा पडदा मारुन निर्जन बेटावर एकट्याच माणसाने वावरावे असे स्वरुप आलेले दिसते. मोबाईलच्या दृष्टीकोनातून पूर्वीचं मिपाही नीट इंजॉय करताच येतं होतं. काही तरी करायचं म्हणुन केलेला प्रयोग अजिबात झेपला नाही, हे नम्रपणे आणि स्पष्ट सांगू इच्छितो. बाकी काय करायचं ते करा. आम्ही मिपावर प्रेम करतो म्हणुन हे सोसणं आलं असं समजून मन मारुन मिपावर लिहित राहू. प्लीज प्लीज प्लीज. पूर्वीचं मिपा आणा भो............. ! -दिलीप बिरुटे

चारही बाजूंनी काळा पडदा मारुन निर्जन बेटावर एकट्याच माणसाने वावरावे असे स्वरुप आलेले दिसते. असंच काहीसं वाटत होतं, फक्त शब्दात मांडता येत नव्हतं

काही किरकोळ त्रुटी आहेत पण त्या लक्षात येतील तशा नीलकांत आणि प्रशांत दूर करत आहेत. घर किंवा गाव बदललं तर सवय होईपर्यंत जरा वेगळं वाटतं. मग त्याची हळूहळू सवय लागते. त्यासाठी पुन्हा जुन्या लहान पडणाऱ्या घरात जायची गरज नसते. आता वाचकांचा मोठा वर्ग मोबाईल वरून मिपा वाचणारा आहे. त्यांची डेटा कमी वापरण्याची गरज लक्षात घेऊन नीलकांतने theme बदलली त्याबद्दल धन्यवाद!

In reply to by यशोधरा

प्रतिक्रिया देताना वरचा बार मोठा दिसतो ही एक अडचण येते आहे. पण माझी ती दुरुस्त होईपर्यंत थांबायची तयारी आहे. मला तो मिपा बंद असण्याएवढा मोठा प्रॉब्लेम वाटत नाही. होईल हळूहळू. नीलकांत आणि प्रशांत याना वेळ होईल तसे करतील एकेक. मोबाईलवर आधी उभे आडवे दोन्ही दिशाना स्क्रोल करावे लागत होते. आता ते नाही. बाकी प्रत्येक मोबाईलच्या डिस्प्ले सेटिंगमुळेही फरक पडत असावा. पेज लोड नक्कीच कमी वेळात होत आहे. आताचा फाँट अतिशय सुबक आहे हे एक लिहायचं राहिलं.

In reply to by पैसा

फॉन्टबद्द्ल माझे अनुकूल मत नाही. तसे तपशिलात नीलकांतला कळवले आहे. इथे सर्वांना विचारावे वाटते की आधीच्या आणि आताच्या फॉन्टमुळे वाचतांना काय बदल जाणवतो? चांगला किंवा वाईट कसाही..