मंडळी, दरवर्षीप्रमाणेच ह्याही वर्षीच्या व्हॅलेंटाईनला पाच वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवली. सहाजिकच चेहेर्यावर हसू पसरलं. चतुरंग हसण्याचं कारण न विचारते तरच नवल.
तर त्याचं असं झालं २००४ सालची गोष्ट. आमच्या धाकट्या बंधूराजांच्या लग्नानिमित्त मी मुलाला घेऊन पुण्याला गेले होते. रंगरावांना कामातून (नेहेमीप्रमाणेच) सुट्टी मिळाली नव्हती त्यामुळे ते अमेरिकेतच होते.
आता माझं माहेर हे लग्नघर झालेलं त्यामुळे सहाजिकच गडबड, धावपळ चालू होती. नवर्यामुलाला प्रथेप्रमाणे कमितकमी रजा मिळाली होती! मानाची मोठी करवली असल्याने सगळे महत्त्वाचे निर्णय माझ्याकडेच सोपवले होते. आमचे दोन वर्षांचे चिरंजीव कोणताही निर्णय तडीस जाऊ देत नव्हते ही गोष्ट वेगळी. उदा. बस्ता खरेदी अर्धी झाल्यावर दुकानातच उड्या मारताना चिरंजीव जमिनीवर जोरात आपटले, दात ओठात घुसले, रक्ताची धार, डोक्याला टेंगूळ आणि बस्ता अर्धवट सोडून आमची वरात रिक्षातून घराकडे! अशा सगळ्या लढाईतून पुढे जात आम्ही सगळे १७ फेब्रु.च्या लग्नासाठी सज्ज होत होतो. होता होता ग्रहमखाचा दिवस येऊन ठेपला.
स्थळ: पुणे, तारीख १४ फेब्रु २००४, वेळ सकाळी ९.३० -
व्हॅलेंटाईन डे! नवर्या मुलाच्या रजेचा पहिला दिवस त्यामुळे भल्यापहाटे दौर्यावरुन येऊन तो घरी हजर झाला होता. घरात ग्रहमखाची गडबड सुरु होती. गुरुजी यायच्या आधी सगळी तयारी वेळेत व्हायला हवी म्हणून माझी लगबग सुरु होती, एवढ्यात चिरंजिवांनी नैवेद्यासाठी ठेवलेले गूळ-खोबरे मटकावले! सकाळपासूनच नातेवाईक जमू लागले होते. समोरच रहाणार्या काका-काकूंनी त्यांचे घर हे प्रेमाने वापरायला दिलेले होते आणि लग्नघराचे जणू एक्स्टेंशनच असल्याप्रमाणे आम्ही ते मनमुराद वापरत होतो! जिन्यात पावले वाजली. गुरुजी आले असे समजून बाहेरच्या खोलीत गडबड झाली. पूजेत फारसा इंटरेस्ट नसलेली पुरुष मंडळी समोरच्या घरी जाऊन बसली. मुलांना त्यांचे खेळ आवरुन आतल्या खोल्यात पिटाळलं. दार उघडं असूनही बेल वाजली. मी आणि बाबा बाहेरच्याच खोलीत होतो. कोणी मुलगा आलाय असे बघून बाबा सामोरे गेले.
माझ्या नावाची विचारणा होऊन भला मोठा लाल गुलाबाच्या फुलांचा गुच्छ व ग्रीटिंग कार्ड बाबांकडे सोपवून "अमेरिकेहून पाठवलंय" एवढे सांगून, सही घेऊन तो निघून गेला. आम्ही आश्चर्यचकित......! (मंडळी, इथे क्रमशः टाकायचा खूप मोह होतोय! ;) )
मी पुढे होऊन बाबांच्या हातातून ग्रीटिंग कार्ड घेतलं. त्यात एक प्रेमसंदेश होता आणि अक्षर रंगरावांचं नव्हतं! आता आली का पंचाईत. तेवढ्यात फोन वाजला आणि रंगरावांनीच रंगेलपणे "गुच्छ पोचला का?" असे विचारले आणि मग सगळा उलगडा झाला! ई-सकाळच्या "व्हॅलेंटाईनचा प्रेमसंदेश आणि गुच्छ पाठवा" ह्या योजनेचा रंगरावांनी घेतलेला हा लाभ होता. सोवळे नेसून उभे असलेल्या बाबांच्या चेहेर्यावर जावयाचे कौतूक ओसंडून वाहत होते. मी सुद्धा आश्चर्याने थक्क!! (मी तिथे नसल्यानेच एवढा विचार रंगराव करु शकले होते ह्याची खात्री पटली! ;) ). ही बातमी एका क्षणात पक्वान्नांच्या दरवळाप्रमाणे घरात पसरली. स्वयंपाकघरातून "अग्गोबाई, काय तरी हौस बाई!", होक्का? मज्जा आहे बुवा!", "एकेक नवलंच म्हणायचं!" अशा उद्गारांची बरसात झाली. दुसरीकडे सोवळं नेसून तयार बसलेल्या नवरदेवाच्या डोक्यात चक्रं फिरु लागली. त्याचे विचार चेहेर्यावर स्पष्ट दिसले. बाबांनी ताबडतोब "आता तू बाहेर जायचं नाहीस!" असं त्याला खडसावलं. एव्हाना पुष्पगुच्छाची बातमी समोरच्या घरात पोचली होती. त्यांच्या सुनेला हे कळताच "बघा, लोकं अमेरिकेहून गुच्छ पाठवतात नाहीतर तुम्ही....!" पडलेल्या चेहेर्याने समोरच्या काकांचा मुलगा निमूट बाजारात निघून गेला.
ह्या सगळ्या गोंधळात गुरुजी आले कधी, पूजा सुरु झाली कधी काही समजले नाही. त्यात बंधुराजांचे लक्षच नव्हते. झटपट पूजा उरकून 'सकाळ मार्फत' औरंगाबादला आपल्या भावी बायकोस गुच्छ पाठवायला बंधुराज रवाना झाले!
स्थळ: औरंगाबाद, तारीख १४ फेब्रु २००४, वेळ संध्याकाळी ७.०० -
एका बंगल्याची बेल वाजते.
"देशपांडे आपणच का?"
"हो."
"पुण्याहून व्हॅलेंटाईनचा बुके आहे!" कुरियरवाला मुलगा.
ग्रीटींगकार्डावरचे नाव बघून हे देशपांडे आपण नसून शेजारचे असतील असे सांगून त्याला तिकडे पिटाळले. एव्हाना पुष्पगुच्छाला मरगळ यायला सुरुवात झाली होती.
शेजारच्या देशपांड्यांकडे उपवर मुलीला पुण्याहून गुच्छ वगैरे आलेला बघून हलकल्लोळ उडाला. काही वेळाने हेही देशपांडे ते नव्हेतच. ते कदाचित समोरचे असतील असा विचार करून कुरियरवाला तिकडे गेला.
नुकतीच ग्रहमख, जेवणावळी, पाहुणे यांची गडबड संपल्यामुळे थोडंसं निवांत असलेलं आणि दारावर नारळाचं, सोनेरी पानांचं तोरण असलेलं घर त्याला लगेच सापडलं.
"अरे वा, भलतंच प्रेम दिसतंय!" "मज्जा आहे बुवा एका मुलीची." असे चिडवाचिडवीचे उद्गार आमच्या भावी वहिनीसाठी निघू लागले. दुसरीकडे तिचा भाऊ आणि वहिनी ह्यांच्यात झालेला "प्रेमळ संवाद" असा,
"बघा! पुण्याहून लग्न व्हायच्या आधीच गुच्छ येताहेत! आणि इकडे लग्न होऊन सात सात वर्ष झाली तरी एक प्रेमाचा शब्द नाही....!"
तर मंडळी रंगरावांनी अमेरिकेहून पुण्याला गुच्छ काय पाठवला आणि पुण्यात आणि औरंगाबादेत अनेक घरात त्या गुच्छाने "प्रेमळ संवादांची" बरसात घडवली.
आमच्याकडे अजूनही दर व्हॅलेंटाईन डेला ह्या प्रसंगाची आठवण होऊन हास्याचे फवारे उडतात.
रेवती
वाचने
7633
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच
मस्तच
+१
रंगीला
In reply to +१ by मुक्तसुनीत
अगदी चपलख ...
In reply to +१ by मुक्तसुनीत
अरे डान्या,
In reply to अगदी चपलख ... by छोटा डॉन
:(
In reply to अरे डान्या, by ब्रिटिश टिंग्या
हा हा हा... :)
+१
In reply to हा हा हा... :) by वल्लरी
मस्त किस्सा!
:)
हा हा हा..
रेवती तूम्ही ही!
+१
In reply to रेवती तूम्ही ही! by प्रमोद देव
+२
In reply to +१ by सहज
जबरदस्त किस्सा..
प्रमोदसाह
+१
In reply to प्रमोदसाह by विसोबा खेचर
मस्त...
छान आहे किस्सा ...
मस्त
एक लंबर !!!
खूपच छान !
वाह !
मस्तच की..
खुपच मस्त
रेवतीताई, ए
धन्यवाद!
मस्तच
रंगित
छान
रंगीला रे.....
मस्त किस्सा आहे...
रेवती ताई मस्त किस्सा आहे!
>> वर्ष २१ आणि अजुनही 'एकटे'
In reply to रेवती ताई मस्त किस्सा आहे! by इंटरनेटस्नेही
एक जण
मस्त किस्सा....*आता माझ्या
छानच.
हा हा.. मस्त किस्सा! मजा आली!
असेच म्हणतो ....
In reply to हा हा.. मस्त किस्सा! मजा आली! by मेघवेडा
मस्त किस्सा
सर्व नवीन वाचकांचे
आता कसं!
In reply to सर्व नवीन वाचकांचे by रेवती