✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दगड!

व — वेल्लाभट, Wed, 01/04/2017 - 15:03
a चित्र श्री संदीप डांगे यांजकडून साभार ब्लॉग दुवा रागाची ती उचल काय, दगड! विचारांची मजल काय, दगड! जात पात वजा भाग गणित गणिताची उकल काय, दगड! अभेद्य त्यांच्या आयुष्याची शिल्पं पुतळे तोडून तुटंल काय, दगड! देऊळ म्हणून आत गेलो बघत गर्दीपुढे अचल काय, दगड! बळावलेला ज्वर आहे, जबर औषधानं निघंल काय, दगड! तोड-फोड टीका निषेध कहर सरतेशेवटी सफल काय, दगड! नीट बघा, कळणार नाही फरक हात, बाण, कमळ काय, दगड! उद्या पुन्हा देतीलच ते वचन निर्लज्जांचं नवल काय, दगड! आमंत्रणं, आरक्षणं सकल उरलेल्यांची दखल काय, दगड! पोखरतील विकून खातील असंच देशामध्ये उरंल काय, दगड! चिडचिडच व्हायची लिहून अखेर, कविता काय, गझल काय, दगड! - अपूर्व ओक

प्रतिक्रिया द्या
5742 वाचन

💬 प्रतिसाद (33)

जबरदस्त भावना मांडल्यात. सलाम

संदीप डांगे
Wed, 01/04/2017 - 15:13 नवीन
जबरदस्त भावना मांडल्यात. सलाम ची आठवण आली..
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

आदूबाळ
Wed, 01/04/2017 - 15:23 नवीन
जबरदस्त! याचं मिपाच्या यूट्यूब चॅनलसाठी वाचन करावं असं सुचवतो.
  • Log in or register to post comments

x १०० सहमत

सुधांशुनूलकर
Wed, 01/04/2017 - 16:55 नवीन
मिपाच्या यूट्यूब चॅनलसाठी वाचन करावं - प्रचंड अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

नक्की विचार करतो.

वेल्लाभट
Wed, 01/04/2017 - 17:07 नवीन
नक्की विचार करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

१०००%

पिलीयन रायडर
Wed, 01/04/2017 - 21:20 नवीन
१०००% अत्यंत सुंदर जमली आहे रे कविता.. कविता वाचन करच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

+१ . एक नंबर जमलीये.

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/05/2017 - 05:26 नवीन
+१ . एक नंबर जमलीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

खूप छान!!

हतोळकरांचा प्रसाद
Wed, 01/04/2017 - 15:27 नवीन
खूप छान!!
  • Log in or register to post comments

""उद्या पुन्हा देतीलच ते वचन

विशुमित
Wed, 01/04/2017 - 15:45 नवीन
""उद्या पुन्हा देतीलच ते वचन निर्लज्जांचं नवल काय, दगड!"" लाजवाब...!! आदूबाळ यांच्याशी सहमत...
  • Log in or register to post comments

माझ्या मना बन दगड

अनन्त्_यात्री
Wed, 01/04/2017 - 16:17 नवीन
मन्गल देशा , पवित्र देशा, दगडान्च्या देशा
  • Log in or register to post comments

सगळ्यांना _/\_

वेल्लाभट
Wed, 01/04/2017 - 17:08 नवीन
सगळ्यांना _/\_ हे कुठे जाऊन संपणार आहे, संपणार आहे की नाही याचा विचार करून त्रास होतो
  • Log in or register to post comments

खूप छान!

अनुप ढेरे
Wed, 01/04/2017 - 17:22 नवीन
खूप छान!
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

चांदणे संदीप
Wed, 01/04/2017 - 17:40 नवीन
दगडाला घेऊन अशी सुंदर रचना वेल्लाभटाचं करू जाणे! :) Sandy
  • Log in or register to post comments

:)

चांदणे संदीप
Wed, 01/04/2017 - 17:56 नवीन
लिहिणारे वाऱ्यावर सुगंध लिहितात ही दाद माझी दरवळंल काय, दगड! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

दरवळंल ना भौ! वाह

वेल्लाभट
गुरुवार, 01/12/2017 - 14:43 नवीन
दरवळंल ना भौ! वाह
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

मस्त

पाटीलभाऊ
Wed, 01/04/2017 - 17:47 नवीन
मस्त कविता
  • Log in or register to post comments

समयोचित कविता. आवडली.

रेवती
Wed, 01/04/2017 - 18:14 नवीन
समयोचित कविता. आवडली.
  • Log in or register to post comments

सत्य आणि स्पष्ट भाषा.

शार्दुल_हातोळकर
Wed, 01/04/2017 - 21:26 नवीन
सत्य आणि स्पष्ट भाषा. कविता आवडली.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

रातराणी
गुरुवार, 01/05/2017 - 00:00 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

अप्रतिम कविता.

अजया
गुरुवार, 01/05/2017 - 09:18 नवीन
अप्रतिम कविता.
  • Log in or register to post comments

दगडांच्या देशात राहून दगडांशीच वैर?

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 01/05/2017 - 09:31 नवीन
उगाच असल्या कविता लिहून कशाला डोकेफोड करुन घ्यायची? दगडांवर त्याचा काही परीणाम होणार आहे का? दादोजी झाले, गडकरी झाले, शनिवारवाड्याचा नंबर काही फार दूर नाही. आपण तालिबानला उगाच नावे ठेवतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

हम्म

पैसा
गुरुवार, 01/05/2017 - 10:45 नवीन
माझ्या मना बन दगड म्हणायची वेळ आलीय. जळजळीत कविता आणि भेदक चित्र.
  • Log in or register to post comments

वाह

मित्रहो
गुरुवार, 01/05/2017 - 23:02 नवीन
जबरदस्त आवडली कविता
  • Log in or register to post comments

अस्खलित !!

कवि मानव
Wed, 01/11/2017 - 14:47 नवीन
अस्खलित !!
  • Log in or register to post comments

परखड

चाणक्य
Wed, 01/11/2017 - 14:51 नवीन
.
  • Log in or register to post comments

चाणक्य, कवीमानव, मित्रहो,

वेल्लाभट
गुरुवार, 01/12/2017 - 14:41 नवीन
चाणक्य, कवीमानव, मित्रहो, पैसाताई, पैजारबुवा, अजया, रातराणी, रेवती, पाटीलभाऊ, शार्दुल, सगळ्यांचे अनेक आभार.__/\_
  • Log in or register to post comments

सुंदर !

मदनबाण
Sun, 01/15/2017 - 13:42 नवीन
सुंदर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अम्बरसरिया..मुंडयावे कचिया कलियाँ ना तोड़, तेरे माँ ने बोले हैं मुझे तीखे से बोल... :- Fukrey
  • Log in or register to post comments

मस्तच!!

देशप्रेमी
Tue, 01/17/2017 - 13:25 नवीन
सत्यवचन! एकदम रोखठोक भाषा!
  • Log in or register to post comments

वेल्लाने अत्यंत सुंदर अभिवाचन

पिलीयन रायडर
गुरुवार, 05/04/2017 - 18:17 नवीन
वेल्लाने अत्यंत सुंदर अभिवाचन केले आहे. नक्की ऐका!
  • Log in or register to post comments

भन्नाट!!

चतुरंग
गुरुवार, 05/04/2017 - 21:48 नवीन
फारच छान अभिवाचन. अभिनंदन वेल्ला! आणि इथे लिंकवल्याबद्दल धन्यवाद पिरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

वा , वा. आपल्या यु ट्युब चॅनल

स्रुजा
गुरुवार, 05/04/2017 - 21:50 नवीन
वा , वा. आपल्या यु ट्युब चॅनल वर एक सुंदर भर पडली, धन्यवाद वेल्ला.
  • Log in or register to post comments

_/\_ धन्यवाद पिरा इथे

वेल्लाभट
गुरुवार, 05/04/2017 - 22:18 नवीन
_/\_ धन्यवाद पिरा इथे डकवल्याबद्दल आणि चतुरंग, स्रुजा; धन्स !
  • Log in or register to post comments

भेदक कविता, सुंदर वाचन !

संदीप-लेले
गुरुवार, 05/04/2017 - 23:41 नवीन
सुंदर वाचन ! कविता तर फारच भेदक - क्या बात है !
  • Log in or register to post comments

सुरेख अभिवाचन.

पद्मावति
Wed, 05/10/2017 - 16:18 नवीन
सुरेख अभिवाचन.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा