Skip to main content

नोटबंदीचे अभंग

लेखक भारी समर्थ यांनी शुक्रवार, 30/12/2016 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
एटीयमचिये द्वारी। उभा क्षणभरी। तेणे पाचशेच्या चारी। मिळतीया।। कार्ड चार हाती। स्लॉटमधे घासी। निकडीची रोकड मग। निघतीया।। रांगेत बहु जन। स्वतःचेच धन। घामेजलेले तन। ताटकळ्या।। ब्यांकेतही तेच। होई खेचाखेच। शिव्या कचाकच। निघतीया।। ऐसे शूराभिमानी। न देखिले कोणी। तयांसी देशाभिमानी। म्हणतीया।। एकच दिला धक्का। गुर्जर तो पक्का। 'मित्रों' ऐसी हाक। मारतोया।। सुका म्हणे बास। किती रोखावे श्वास। काय ३१ डिसेंबरास। करतोया??? - भारी समर्थ!

वाचने 4634
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

महागाई मेली | जरा हटली नाही | काढे शब्द वावगा तो | देशद्रोही || कार्डाचे चार्जेस | सोसा तुमचे तुम्ही | आम्ही खेळू लॉटरी | नशीबाशी || बारासहस्त्र कोटी | छापण्यात गेले | छापे घालून केली | घंटाकमाई || नव्या नोटांवर | पुन्हा तोच खेळ | भ्रष्टाचार जोमानं | बोकाळला || मेले किती तरी | जरा खंत नाही | याला म्हणती छाती | छप्पनइंच ||

In reply to by संजय क्षीरसागर

क्या बात हैं, सर.. व्वा. जबरा.. अभंग भारी जमलेयत, भारी समर्थ..

:-)

तेणे पाचशेच्या चारी। मिळतीया।।
चुकीची माहिती पसरवू नका. पाचशेच्या चार नोटा कुठल्याच एटीएम मध्ये मिळत नाहीत. एकच दोन हजाराची नोट मिळते.

यांचे अभंगाच्या पोथ्या इंद्रायणीत बुडवून टाका म्हणून धर्मपीठाचे फर्मान येईल. तरी आम्ही टाळकरी टाळ कुटच राहणार..!!