एटीयमचिये द्वारी। उभा क्षणभरी।
तेणे पाचशेच्या चारी। मिळतीया।।
कार्ड चार हाती। स्लॉटमधे घासी।
निकडीची रोकड मग। निघतीया।।
रांगेत बहु जन। स्वतःचेच धन।
घामेजलेले तन। ताटकळ्या।।
ब्यांकेतही तेच। होई खेचाखेच।
शिव्या कचाकच। निघतीया।।
ऐसे शूराभिमानी। न देखिले कोणी।
तयांसी देशाभिमानी। म्हणतीया।।
एकच दिला धक्का। गुर्जर तो पक्का।
'मित्रों' ऐसी हाक। मारतोया।।
सुका म्हणे बास। किती रोखावे श्वास।
काय ३१ डिसेंबरास। करतोया???
- भारी समर्थ!
वाचने
4634
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- twenty one pilots: Heathens (from Suicide Squad: The Album) [OFFICIAL VIDEO]व्वा !
धिंगाणा, सर..
In reply to व्वा ! by संजय क्षीरसागर
:-)
देशद्रोही कुठले. :)
भारीच आहेत!
ह्या ह्या ह्या! =))
तेणे पाचशेच्या चारी। मिळतीया।
यांचे अभंगाच्या पोथ्या
"सुका म्हणे" विशेष आवडले.
एकतीसच्या संध्याकाळी| निघाला