त्या सॅलरी स्लिप त्याने बँकेत जमा केल्यावर त्याने (आनंदाने) एक बातमी दिली तुझी सॅलरी २,००,००० पेक्षा कमी आहे त्यामुळे तुझं लोन फक्त १,७०,००० एवढच होऊ शकत... (काय???? बाकीचे १,८०,००० कुठून आणु.) मी माझ्या मैत्रिणीला फोन केला मी ३. ५० लाख जमा करू शकत नाही आहे. तर तू मला थोडी मदत करशील का या वर माझ्या चुलत सासूबाई आजारी आहेत माझा नवरा चेकबुक आताच घेऊन गेलाय त्यामुळे मी काही मदत करू शकत नाही तुझं तुला पाहावं लागेल. (अरे हि तर म्हणत होती कि तुझ्या पैशांची जबाबदारी मी घेते, कमी पडलं तर मी मदत करेन ) मी गप्प बसलेली पाहून ती बोलली अग त्या खूप सिरिअस आहेत त्यामुळे मी तुला मदत नाही करू शकत. मी बोलली मग मी ३. ५० जमा नाही करू शकत. आणि माझा नवरा पण काही कामासाठी मुंबई बाहेर आहे तो आल्याशिवाय पुढची मीटिंगची तारीख नको घेऊस.( मला तिला थोडं थांबावाच होत म्हणून मी परत एकदा….) यावर ती म्हणाली Mr. परेश पण बाहेर आहेत आता. मी सांगते तुला काय करता येईल ते. (येथे ती नाही बोलली असती तर मी विषय बंद करायचं ठरवलं होत पण ती काही हार मानायला तय्यार नव्हती..)
तिने दोन दिवसानी मला फोन केला कि ते ठीक आहे म्हणता आहेत तुझ्या कडे किती जमा आहेत मी म्हणाली २ लाख ती म्हणाली Mr परेश बोलले कि तू दोन दिवसाच्या आत २. ७० जमा कर (अजूनही Mr परेश थिर्ड पार्टी मार्फत बोलत होता ). मी माझ्या नवऱ्याला फोन केला त्याला लोनची procedure सुरु कर असं सांगितलं. आणि त्याला विनंती केली माऊच्या FD वर लोन करूया तो तय्यार झाला त्याच अटीवर.
माझ्या मैत्रिणीने तुझं नॅशनॅलिझ बँकेत अकाउंट आहे का ? कारण त्या अकाउंटचा चेक लागेल असं सांगितलं. माझं नॅशनॅलिझ बँकेत अकॉउंट होत ते इनाक्टिव्ह होत. आणि इकडे बँकेने माझ्या नवऱ्याला सांगितलं कि बँकेत पैसे नाही आहेत त्यामुळे लोन पुढल्या आठवड्यात होईल. (आताच का पैसे संपले… आपली वेळ आली का समोरचा माणूस लंचला जातो, किंवा मशीन बंद होते, आणि पैसे संपून जातात...)
का माहित नाही मी रात्री खूप पॅनिक झाले, मी माझ्या नवऱ्याला सांगितलं कि हि संधी मला सोडायची नाही आहे. मला माझ्या माऊसाठी चांगलं करायचं आहे.
त्याने मला शांतपणे बसवलं तो म्हणलं तू पॅनिक होऊन निर्णय घेऊ नकोस, मला वाटतय तू शांतपणे निर्णय घे. त्यांना पैसे हवे आहेत. ते तुझ्यावर दबाव आणता आहेत ती त्याची strategy आहे जेणे करून तू पैसे देऊन मोकळी होशील. ते तू पैसे देईपर्यंत तुझा पिच्छा सोडणार नाही. मी गुजराथी मारवारी लोकांबरोबर असतो त्यांना त्याची liquid आणि assets डोळ्यासमोर लागतात. यावर मी शांत झाली होती. माझा निर्णय त्याने माझ्यावर सोडला होता. पण मी पैसे जमा करण मी सोडलं नव्हतं.
नवऱ्याचा मित्राने मदत केली पण तो बोलला कि पैसे जुन्या नोटा देईन आणि कॅशमध्ये देईन. मी अडचणीत होते मला हि पैसे दयाचे होते. मला नवऱ्याने फोन करून सांगितलं कि तू हे पैसे घे आणि तुझं लोन झालं कि त्याला परत कर. माझं आणि माझ्या नवराच जॉईंट अकाऊंट असल्यामुळे मी ते पैसे आमच्या अकाउंट मध्ये भरू शकत नव्हती. कारण त्याने पण त्यांच्या वेंडरचे पैसे जमा केले होते आणि जर का मी हे पैसे आमच्या अकाउंट मध्ये जमा केले असते तर माझ्या नवऱ्याला डायरेक्ट IT enquiry लागली असती.
माझ्या नॅशनलाइझ बँकेतील अकाउंट चालू करायचं हा एकाच उपाय होता. (हे राम.... )
मी बँकेत KYC देउन आली आणि मॅडमना विचारलं किती दिवसात अकाउंट चालू होईल त्यावर ती अगाऊ बाई मला ओरडला लागली गरज असल्यावर तुम्ही येता.एक आठवडयांनी या. पेपर्स बॅकऑफिस मध्ये जातील ते verify होतील मगच येतील. (****ली सरडा छाप तिराळी.. अस्सा राग आला होत ना तिचा शांतपणे माहितीसाठी विचारलं होत तर आख्या बँकेसमोर माझ्यावर ओरडली... Frustration काढायला मीच मिळावी…. गरज आहे म्हणून येतात लोक बँकेत नाहीतर.... कंट्रोल केलं स्वतःला) शांतपणे (राग गिळून...) बाहेर पडली. मी चरफडून मंदिरात आले माझा रागावले चेहरा बघुन पुजारी काकांनी काय झालं असं विचारलं मी झालेला प्रकार सांगितलं त्यावर ते एवढेच ना माझ्या मुलाचा मित्र त्या बँकेत ब्रँच मॅनेजर होता तु माझ्या मुलाला फोन कर. मी त्यांच्या मुलाला फोन केला त्याने त्याच्या मित्राला फोन केला तो त्याच बँकेच्या मोठ्या पदावर काम करत होता, त्याने माझ्या अकाउंट नंबर घेतला आणि एक दिवसात अकाउंट चालू करून दिल.
वाचने
19701
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी चाललंय !
वाचतोय !!! पुभालटा!!
त्या गुंतवणुकीच्या
+१
In reply to त्या गुंतवणुकीच्या by गवि
+१
In reply to त्या गुंतवणुकीच्या by गवि
येऊ द्या....
ताई, रागावू नका, पण क्यूनेट
कस काय
१) माझं ऑफिस सॅलरी स्लिप देत
In reply to कस काय by अबोली२१५
बंद का केलं नव्हतं
In reply to १) माझं ऑफिस सॅलरी स्लिप देत by आदूबाळ
+१००
In reply to १) माझं ऑफिस सॅलरी स्लिप देत by आदूबाळ
आदूशेठ, कायद्याची भाषा कितीही
In reply to १) माझं ऑफिस सॅलरी स्लिप देत by आदूबाळ
आहे ना. म्हणून तर आवर्जून
In reply to आदूशेठ, कायद्याची भाषा कितीही by पिंगू
वाचते आहे
easymoney नाही आहे
In reply to वाचते आहे by पैसा
मग तर तुम्हाला माहित नाही याचं आश्चर्य वाटतंय
In reply to easymoney नाही आहे by अबोली२१५
तेव्हा याचा फुगा फुटण्यापूर्वीच मी माझे पैसे काढून घेईन
In reply to मग तर तुम्हाला माहित नाही याचं आश्चर्य वाटतंय by पैसा
भले हुशार असेलही, पण , मलम
In reply to मग तर तुम्हाला माहित नाही याचं आश्चर्य वाटतंय by पैसा
मलम योजना !
In reply to भले हुशार असेलही, पण , मलम by खेडूत
मलम योजना ! :-) :-) :-
In reply to भले हुशार असेलही, पण , मलम by खेडूत
+१
In reply to वाचते आहे by पैसा
कॉम्प्युटर टाइपिंग ?
In reply to वाचते आहे by पैसा
अबब!
In reply to कॉम्प्युटर टाइपिंग ? by बबन ताम्बे
कोर्टाबाहेर बसतात ते?
In reply to अबब! by पैसा
कोर्टाचे माहीत नाही
In reply to कोर्टाबाहेर बसतात ते? by बोका-ए-आझम
मी याच उत्तर
ह्म्म्म
कारण त्याने पण त्यांच्या
पर्सनल आहे
In reply to कारण त्याने पण त्यांच्या by सतीश कुडतरकर
म्हणजे २.५० लाखाची लिमीट संपली होती !
In reply to कारण त्याने पण त्यांच्या by सतीश कुडतरकर
प्लीज
सगळे प्रतिसाद वाचून हेच मनात
In reply to प्लीज by धर्मराजमुटके
पण लेखिका ताई फारच ताणतायत.
In reply to सगळे प्रतिसाद वाचून हेच मनात by संदीप डांगे
घ्या
In reply to पण लेखिका ताई फारच ताणतायत. by गंम्बा
लेखिका ताई फारच ताणतायत. >>>>
In reply to पण लेखिका ताई फारच ताणतायत. by गंम्बा
वाईट वाटुन घेऊ नका पण तुम्ही
+१००
In reply to वाईट वाटुन घेऊ नका पण तुम्ही by निरंजन._.
सहमत.
In reply to वाईट वाटुन घेऊ नका पण तुम्ही by निरंजन._.
निःसंशय.. माझी हरकत विमा
In reply to सहमत. by बोका-ए-आझम
आदूबाळ आणि इतर Finance मधले दादा लोक यांना
हे क्युनेट प्रकरण आमच्या
सी जी का धनंजय :-)
भारी लिहीताय!! येऊंद्या!!