झाली सय संद्याकाय
दिवे लाव्याचा वखतं
वाट पायता राघुची
तोंड चाललं सोकतं
डोये फाळूनं फाळूनं
काय वाटी नं पायतं
धंदा पळला घरात
जीव काहाले जायतं?
चिळ्या रायल्या भऱ्याच्या
झाला किती वारखोळं
राघू साठी मैना तूहं
कुठी अळलं व घोळं?
अशी तिसऱ्या पायरी
बस्तं धरूनं ऊंबठा
तोही झिंजते घासूनं
तूह्या पायाचा आंगठा
नंदा ईचारती तव्हा
होटं उलतच नाई
आता काहाले दाठ्ठ्यातं
ऊभी रायतं व बाई?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2015
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त आहे कविता.
मस्त आहे कविता.
ही भाषा वाचायला खूप गोड वाटते.
एखादं ललित लिव्हा की!!
फार छान कविता! फार आवडली.
फार छान कविता! फार आवडली. काही शब्दांचा अर्थ सांगितल्यास अजून समजायला मदत होईल ही विनंती.
कोणते समजले नाही ते सांगितलेत
In reply to फार छान कविता! फार आवडली. by एस
कोणते समजले नाही ते सांगितलेत तर मदत करतो.
आहाहा!
हा हा व्वा!
मजा आ गया दोस्त!!
Sandy
सुरेख कविता!!
सुरेख कविता!!
सय संद्याकाय = संध्यासमय
सय संद्याकाय = संध्यासमय
वखतं = वेळ
सोकतं = सुकत, वाळत
धंदा पळला घरात = कामे खोळंबून आहेत
जीव काहाले जायतं? = जाळतेस.
चिळ्या रायल्या भऱ्याच्या = चिळ्या म्हणजे रॉकेल चे दिवे, त्यात रॉकेल भरणे म्हणजे चिळ्या भरणे, अंधार पडायच्या आधीच करावं लागतं
वारखोळं = उशीर, वेळ
कुठी अळलं व घोळं? = घोडे अडणे
दाठ्ठ्यातं = दाराची चौकट, प्रवेशद्वार
ओक्के, आत्ता कळली.धन्यवाद!
In reply to सय संद्याकाय = संध्यासमय by संदीप डांगे
ओक्के, आत्ता कळली.धन्यवाद!
मला वाटलं, चीरा भरणे. त्यानं अर्थ बदलून जातो.
आमच्या कडे चिमणी ला चिळी
आमच्या कडे चिमणी ला चिळी (चिडीया चा अपभ्रंश)म्हणतात
रॉकेलचा छोटा वातीवाला दिवा म्हणजे रॉकेलची चिमणी
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद मित्रांनो,धन्यवाद !
संदीपजी आपले विशेष आभार ...
कविता आणि भाषा दोन्ही आवडल्या
कविता आणि भाषा दोन्ही आवडल्या.
माझी प्यारी वऱ्हाडी :'(
माझी प्यारी वऱ्हाडी :'(
उद्भवभौ लै लै आभार देतो राजेहो तुम्हाले :)