झाली सय संद्याकाय
दिवे लाव्याचा वखतं
वाट पायता राघुची
तोंड चाललं सोकतं
डोये फाळूनं फाळूनं
काय वाटी नं पायतं
धंदा पळला घरात
जीव काहाले जायतं?
चिळ्या रायल्या भऱ्याच्या
झाला किती वारखोळं
राघू साठी मैना तूहं
कुठी अळलं व घोळं?
अशी तिसऱ्या पायरी
बस्तं धरूनं ऊंबठा
तोही झिंजते घासूनं
तूह्या पायाचा आंगठा
नंदा ईचारती तव्हा
होटं उलतच नाई
आता काहाले दाठ्ठ्यातं
ऊभी रायतं व बाई?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1982
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त आहे कविता.
फार छान कविता! फार आवडली.
कोणते समजले नाही ते सांगितलेत
In reply to फार छान कविता! फार आवडली. by एस
आहाहा!
सुरेख कविता!!
सय संद्याकाय = संध्यासमय
ओक्के, आत्ता कळली.धन्यवाद!
In reply to सय संद्याकाय = संध्यासमय by संदीप डांगे
आमच्या कडे चिमणी ला चिळी
धन्यवाद!
कविता आणि भाषा दोन्ही आवडल्या
माझी प्यारी वऱ्हाडी :'(