भिकारी
लेखनविषय:
काव्यरस
असे एक वेडा तिथे तो भिकारी
भुकेच्या आकांती जगाला पुकारी
तमा न तयाला उन्हा-पावसाची
दिसे भुक डोळी किती त्या दिसाची
नसे आप्त कोणी तया पामराला
जीवा साथ द्याया कुणी न घराला
थकुनी कधीचा फिरे तो अभागी
कुठे श्वान वेडे तयापाठी लागी
अधु पाय त्याचा अधु लोचनेही
नसे त्राण त्याच्या जराजीर्ण देही
करुणा जगाची कुठे आज गेली
दशा मानवाची खुलेआम झाली
दिले हाकलोनी जया अन्न मागी
अखेरी उपाशी बसे एक जागी
आगीने भुकेच्या जणु अर्धमेला
म्हणे तुच देवा पाहा लेकराला
किती लोक आले किती लोक गेले
तया पाहताही किती थेट गेले
कुणी एक आला दिली त्यास नाणी
दुवा देई त्याला अधु त्या हातानी
असे वंचिताचे कि ते संचिताचे
जिणे हे नशीबी जणु शापिताचे
दशा त्या जीवाची अशी का हो झाली?
कुणी दूर नाती अशी लोटलेली?
- शार्दुल हातोळकर
वाचने
6732
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
अतिशय लयबद्ध आणि विदारक.
In reply to अतिशय लयबद्ध आणि विदारक. by प्रचेतस
लयबद्ध +१
In reply to लयबद्ध +१ by चांदणे संदीप
हे करुण वर्णन इथुन आले आहे....
In reply to हे करुण वर्णन इथुन आले आहे.... by शार्दुल_हातोळकर
बरोबर. चित्रदर्शी वर्णन व
कवितेमधुन जे सांगायचे होते ते सगळे पोचले...
आवडली कविता!!
एका दुर्दैवी / कटू सत्याचा
कविता आवडली.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी
मनाचा ठाव घेतला कवितेने.
मनाचा ठाव घेतला कवितेने.
कविता अत्यंत भावस्पर्शी आहे.
In reply to कविता अत्यंत भावस्पर्शी आहे. by एस
खरं आहे...
संवेदनशील मनाचा माणूस अन्
बुद्धीनिष्ठ*
मनाला स्पर्शून गेली कविता
चित्रदर्शी कविता.
खूप उत्कट
अतिशय टोचून जाणारी कविता.
कविता आवडली.
सर्वांचे आभार! __/\__
चांगली लिहिलीय
सुरेख
धन्यवाद !!