Skip to main content

तू फक्त.....

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 26/11/2016 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
तू फक्त चल म्हण मी कधीची तयार आहे बेगडी समाजाच्या बेड्या तोडायला आतुर आहे तू फक्त बोल म्हण मी सांगायला तयार आहे न उल्लेखलेल्या घटनांची आज फुटणार माळ आहे तू फक्त हो म्हण सगळं मी निभावणार आहे संगत-सोबत असेल तुझी तर समाजाला अंगावर घेणार आहे तू फक्त.... फक्त.... आहे मी म्हण....... म्हण मात्र ... जोवर अंगात प्राण आहे... कलेवरा जवळ बसून राडण्यापेक्षा जोवर तू अन् मी आहे तोवर 'जहां हें'
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2223
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर!! एक माफक सुचवणी: काही ठिकाणी लय बिघडलीय. तसेच कविता अजून धारधार होऊ शकते. एका उत्तम कवितेचं मटरेल याच्यात नक्कीच आहे!

धन्यवाद. प्रयत्न करते. खरं तर सुचली.. लिहिली आणि इथे add केली... थोडी घाई झाली बहुतेक. मलाही जाणवलं लै तुटते आहे. पण मला जे भाव अपेक्षित होते त्यासाठी हेच शब्द सुचले

In reply to by एस

होऊ द्या खर्च...... आपली आवड कार्यक्रमाचा श्रोता नाखु विविधभारतीवाला

मस्त...मला खरंतर कवितेतलं जास्ती काही कळत नाही...पण जेवढं कळल ते मस्त होतं...