तू फक्त चल म्हण
मी कधीची तयार आहे
बेगडी समाजाच्या बेड्या
तोडायला आतुर आहे
तू फक्त बोल म्हण
मी सांगायला तयार आहे
न उल्लेखलेल्या घटनांची
आज फुटणार माळ आहे
तू फक्त हो म्हण
सगळं मी निभावणार आहे
संगत-सोबत असेल तुझी तर
समाजाला अंगावर घेणार आहे
तू फक्त.... फक्त....
आहे मी म्हण.......
म्हण मात्र ...
जोवर अंगात प्राण आहे...
कलेवरा जवळ बसून राडण्यापेक्षा
जोवर तू अन् मी आहे तोवर 'जहां हें'
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2223
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय सुंदर!!
सहमत आहे. लिहिताना स्वतःशीच
In reply to अतिशय सुंदर!! by जव्हेरगंज
धन्यवाद. प्रयत्न करते. खरं तर
खूप खूप आवडली...
मस्त !! आशय खुप छान आहे....
हात शिवशिवताहेत. :-)
मग
In reply to हात शिवशिवताहेत. :-) by एस
अगदी अगदी
In reply to हात शिवशिवताहेत. :-) by एस
आवडली... छान धार आहे कवितेला
मस्त...
धन्यवाद