✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मला व्यवहार ज्ञान नाही,माझे डोके कुठेच चालत नाही,मी काय करावे???????

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी
Wed, 11/23/2016 - 21:48  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरांनो मी थोडक्यात माझा प्रॉब्लेम मांडणार आहे. मी आहे ३१ वर्षाचा तरुण( केस पांढरे व्हायला लागले आहेत) .तसा मी बक्कळ शिकलो आहे.अगदी बी एस्सी विथ फर्स्टक्लास.पण मी कधीही नोकरी केलेली नाही.घरची शेती आहे पाच एकर ,त्यात मी कॉलेज झाल्यानंतर लक्ष घातले.लहानपणापासून शेतात जात असल्याने मला शेतीची थोडीफार माहीती आहे ,त्यावरच माझा चरितार्थ चालतो.आईवडील दोघेही शासकीय नोकरी करत होते ,ते दोघेही सध्या माझ्यावर अवलंबुन नाहीत. माझा प्रश्न असा आहे की माझे व्यवहारात व इतर ठीकाणी कुठेच डोके चालत नाही.मित्रांमध्ये गप्पा मारताना ,घरात,ईतर ठीकाणी काही इंटेलेक्च्युल चर्चा चालत असेल तर मला त्यातले ओ की ठो कळत नाही आपले डोके चालत नाही ,आपल्याला अक्कल नाही हे मला आंतरजालावर् आलो तेव्हा प्रकर्षाने जाणवू लागले.मिपाची गोडी मला २०११ साली लागली.इथे झडणार्या चर्चामध्ये मी भाग घेऊ लागलो,पण मुळात लॉजिकल आर्ग्युमेंटेशन करता येण्याजोगी अक्कल नसल्याने साईडलाईन झालो,मग मी एकामागोमाग आयडी घेऊन इथे बिन्डोक प्रतिसाद व नळावरची भांडणं करु लागलो.आताशा मी असल्या चर्चांमध्ये भाग घेत नाही. आंतरजालावरचे मी फारसे मनावर घेत नाही,पण जगताना प्रत्यक्ष व्यवहारात अक्कल असल्याशिवाय तुमचा निभाव लागत नाही.या मठ्ठपणामुळे जगण्याचा कंटाळा येऊन एकदा मी आत्महत्येचा बालिश प्रयत्नही केला होता. सध्या शेती करत असल्याने मला आत्तातरी चरितार्थाची काळजी नाही,पण भविष्यात शेती विकावी लागली व नोकरी धंदा करण्याची वेळ आली तर माझ्यासारख्या डोकं न चालणार्या व्यक्तीचा निभाव लागेल का ? याविचाराने मी अस्वस्थ होतो. तर मी काय करावे याविषयी अनुभवी मिपाकरांची मते हवी आहेत. १. डोकं चालत नाही ,व्यवहार ज्ञान नाही यावर काही उपाय आहे का? २. मी सध्या सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट घेत आहे ,त्याचा कितपत उपयोग होतो.? ३. आज आई वडील आहेत त्यामुळे मी निर्धास्त असतो,उद्या त्यांच्या माघारी माझ्यासारख्या बिंडोकाने काय करावे? ४. बिंडोक असणे गुन्हा आहे का? ५.की सरळ आत्महत्या करुन प्रश्न कायमचा मिटवून टाकावा?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
26302 वाचन

💬 प्रतिसाद (96)

प्रतिक्रिया

अहो चुकून सुद्धा अशी तुलना

पुंबा
गुरुवार, 11/24/2016 - 16:26 नवीन
अहो चुकून सुद्धा अशी तुलना करू नका. लहानपणी अनेकदा घरातले म्हातारे नातेवाईक, शेजारी वगैरे अशी तुलना करून मनावर ओरखडे उठवत असतात. तेच आयुष्यभर त्रास देतात. शेवटी प्रत्येक माणूस हा एकटाच असतो, त्याचे आयुष्य हे त्याचे एकट्याचेच असते, दुसऱ्याशी तुलना करून स्वतःला कमी लेखू नका. त्याने तुमचा त्रास कमी होण्याऐवजी वाढेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर

टफी जी माझी विनम्र सुचवणी

मारवा
गुरुवार, 11/24/2016 - 17:21 नवीन
१- सर्वप्रथम हा उपदेश वगैरे नसुन मित्रत्वाच्या नात्याने केलेली साधी सुचवणी आहे फ़क्त पटेल तितके घ्यावे नाहीतर सोडुन द्या ही विनंती. तुम्ही आत्महत्या करु शकला नाहीत याचाच अर्थ कुठे तरी जगण्याच्या मुलभुत इच्छेचा अंकुर तुमच्यात होताच ज्याने तुम्हाला मागे ओढले. इतकेच पुरेसे असते. ही मुलभुत विल टु लीव्ह च जर संपली तर मात्र सर्वच संपते. पण ही इतकी असली तरी पुरे बर का. कारण ही असेल तर याच्या फ़ोर्सनेच माणुस मग स्वत:च्या जीवनात अर्थ, ध्येय्य ,श्रद्धा, आनंद इ. डोलारा उभा करत जातो व खेळात दंग राहतो. त्यामुळे हा तरी तुमचा प्रॉब्लेम नाहीच. आता काही माझ्या अल्पबुद्धीने काही व्यावहारीक उपाय सुचवतो. २- एक आंतरजाल पुर्ण नेट वरील तुमच्या वावराला कुठे तरी मर्यादीत करा.. एक किमान का होइना वेळेची शिस्त आणा. म्हणजे काही दिवस किंवा काही तास दररोज निश्चीत करा व त्याचे काटेकोर पालन करा. उदा. रोज १ तास किंवा आठवड्यातुन ३ दिवस किंवा विकेंडला काहीतरी एक तुमचा स्वत:ला झेपेल असा प्लॅन करा मात्र. यानेच मोठा फ़रक पडेल. सतत व्यक्त होत राहावेसे वाटणे, सतत चौकात येऊन काहीतरी बोलावेसे वाटणे हे ही एक व्यसनच आहे. अव्यक्त राहण्यात व त्याहुन महत्वाच शिस्तबद्ध मर्यादीत वापराने अनेक गुंते सुटतील. एक प्रकारच मिडीया डाएट करा. नेट ला अन्ना सारख ट्रीट करा. जसे अन्नाच्या सेवनावर आपण काहीना काही तरी निर्बंध ठेवतो, कुठले खावे कुठले नाही, कीती प्रमाणात तसे. ३-तुमच्या शेतीत प्रत्यक्ष जीवनाच्या तुमच्या मित्र मंडळात तुमच्या कुटुंबात अधिक गुंतवणुक वाढवा. तुमच्या शेतीत जर सर्व काम मजुरांकडुन करवुन घेत असाल तर थोडे स्वत:ही करता येइल का असे एखादे शारीरीक कष्टाचे काम बघा, सफ़ाई का असेना, काही पेंडींग कामे असतील, कुंपणाच काम असेल तुम्हाला अधिक माहीत तर तुमच्या शेतीतल्या कामात जोरदार सहभाग घ्या. अलिप्त वा दुरस्थ वा सुपरवायजर सारखे न करता जमेल तितके स्वत: इन्व्हॊल्व्ह व्हा. ४- तुमचे बी.एस.सी झालेले आहे म्हणता त्याला बक्कळ शिक्षण म्हणता ? तुमच्या क्षेत्राचा वा एखाद्या आवडत्या क्षेत्राचा एखादा करस्पॉन्डन्स कोर्स करा. जो तुमच्या व्यवसायात प्रत्यक्षात मदतीला येइल असे एक्स्पो वा शिबीर अटेंड करणे असे काही तरी. खर तर तुमच्या क्षेत्रात तुम्ही कदाचित पुरेसे झोकुन देत नसाल असे मला आपले वाटते ( मी चुकु शकतो चुकल्यास आनंदच होइल.) पण तुम्ही इतका वेळ आंजा वर देता त्यावरुन वाटले. एक वाचलेल आठवतय अमेरीकेचे का कुठले शेतकरयांचे शिष्टमंडळ भारतात आलेले त्यांना विचारले तुमचे हे मंडळातील शेतकरी तेथील सर्वात अव्वल दर्जाचे असतील. तर उत्तर मिळाले नाही ते आमच्या बरोबर आले नाहीत. अवर बेस्ट फ़ार्मर्स नेव्हर लीव्ह देअर फ़ार्म असे काहीसे उत्तर होते. ५-आर्थिक असुरक्षिततेच्या भितीला वर डांगे म्हणाले तसे प्रत्यक्ष भिडा. जे उत्पन्न असेल त्यातुन किमान १००० रुपयाची तरी बचत सिस्टेमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन वा इतर कुठल्याही गुंतवणुकीत योग्य तज्ञाच्या सल्ल्याने करण्याचा संकल्प तरी सोडा व नियमीत बचतीचा प्रयत्न करा. प्रत्यक्ष बचत अगदी थोडी जरी केली तरी एक सायकॉलॉजिकल सिक्युरीटी फ़िलींग येइल. नुसत्या विचार करण्याने ती भिती जाणार नाही. ६- अनुभवी, अधिकृत सायकॉलॉजिस्ट च्या सल्ल्याने औषधोपचार चालु असतील तर ते ही नक्कीच मदतीला येइल. प्रत्येक वेळी नुसत्या कौन्सेलींगने प्रश्न सुटत नाहीत. ब्रेन मध्ये आवश्यक तो रासायनिक संतुलन साधण्यासाठी औषधयोजनाही कधी कधी गरजेची असते व फ़ार चांगली मदत होते. अर्थात पात्र चांगल्या डॉक्टर ची निवड काळजीपुर्वक करणे अती महत्वाचे. ७- चर्चा वाद संवाद हे सर्व आयुष्याच्या तुलनेने प्रत्यक्ष आयुष्याच्या जगण्याच्या तुलनेने फ़ारच दुय्यम व किरकोळ बाबी आहेत. त्यांचे एक मर्यादीतच महत्व आहे. आंजा हा स्व ला सिद्ध करण्याचे साधन नका करु. आंजा वरील मानसिक भावनिक अवलंबित्व कमी करा. अधिकाधिक प्रामाणिक स्वत:शी होत गेला. व बाहेरील रीयल लाइफ़ लाच आपल्या स्व च्या अभिव्यक्तीचे माध्यम बनवणे कधीही उत्तम. ते तुमचे खरे जीवन आहे त्यातील जे काही तुम्ही आहात जी काय पात्रता आहे ज्या काय पायरीवर आहात तिथेच थांबा. त्याचे अवलोकन करा समजुन घ्या व तिथुन पुढे कसे जाता येइल केवळ त्यावरच तुमची टाइम एनर्जी रिसोर्सेस केंद्रीत करा. आंजा वरील चर्चा वाद संवाद थोडा काळ पुर्ण टाळले तर बरे होइल. एकदा तिथे स्थिर व्हा. काही काळ इथे केवळ वाचनमात्र व्हा. त्या रीअल लाइफ़ वर तुमचे नियंत्रण आले तिथे तुम्ही कंम्फ़र्टेबल झालात की इथेही आपसुक व्हाल. वाद जिंकणे लढणे हा तर फ़ारच बालीश प्रकार आहे. तुमची एनर्जी इथे वेस्ट होत आहे ते वाईट पण त्याहुन वाईट तुमची रीअल लाइफ़ मधील गुंतवणुक कमी होतेय. इथे काहीही लेख वा प्रतिसाद देण्यापुर्वी एकदा तरी आत्मपरीक्षण करुन बघा की जे काय लिहीताय ते खरच लिहायचय की नुस्ती तात्पुरती उबळ आहे. मी तर म्हणतो तुम्ही काही काळ पुर्ण थांबा, तुमचे संबंध इतके बिघडलेले आहेत की तुम्ही साध्या गंमतीजमतीतही आता काही लिहाल तर ते वादाकडे जाईल कदाचित. एक तुम्ही अती चिवडल्यामुळे तुमचा आंजा वरील पुर्ण वावर तुम्हाला आता केवळ वेदनाच देइल तापच देइल असे वाटते इथुन तुम्हाला फ़ारसे काही गवसेल असे वाटत नाही. म्हणुन थोडे थांबा, अधिकाधिक वाचत जा, कमीत कमी व प्रामाणिकपणे व्यक्त व्हा. मग वाद चर्चा संवादाने मिळणारा जो खरा फ़ायदा समृद्धी आहे ती तुम्ही घेऊ शकाल. अन्यथा पुन्हा तेच " अनडिग्नीफ़ाइड सोल मुव्हींग अराउंड " होइल व तुम्हीही अजुन निराश होत जाल. अजुन एक जमल्यास कट्ट्यावर येऊन प्रत्येकाल भेटा एकेकदा गैरसमजांची धार तीव्रता कमी होइल. ८- व्यायाम हे फ़ार मोठे वरदान आहे. कुठलाही अगदी कुठलाही तुमच्या आवडीचा व्यायाम नियमीत पणे करा अनेक प्रकारच्या नकारात्मक विचारप्रवाहांना मोडण्यात व्यायामासारखा दुसरा उपाय नाहीच. रनींग स्वीमींग जिम जे आवडेल ते करा पण नियमीत व्यायाम कराच. तो तुमच्या डिप्रेशनकडे जाणारया सवयीला आश्चर्यकारक रीत्या तोडेल. ९- प्रेमाचा मार्ग धरा. प्रेमाची नाती बनवण्यासाठी तुमच्या वेळेची श्रमांची गुंतवणुक करा आयुष्यात अगदी दोन जरी माणसं जोडली जीवाभावाची तर डिप्रेशन मध्ये जाण अवघड होइल तुम्हाला बघा. १०- हे अस एकदाच प्रामाणिकपणे विचारत आहात हे चांगलच आहे पण अस सारख विचारणा करु नका नाहीतर सेल्फ़ पिटी ची सिंपथी गेन करण्याची सवय लागेल. पुढच्या वेळेस इथल्या सभासदांनी दिलेल्या सल्ल्याचा तुम्ही काय प्रत्यक्ष वापर केला व तुम्हाला नेमका फ़ायदा झाला की नाही की तोटा च झाला. तो सविस्तर फ़िडबॅक जरुर द्या. कारण तुमच्या सारखे इतर जे समस्याग्रस्त असतील त्यांनाही कळेल की कुठली गोष्ट तंत्र कामात येते कुठले निरुपयोगी आहे त्यांना फ़ायदा होइल. आणि त्याहुन महत्वाच तुमची कमिटमेंट दिसेल की तुम्ही खरचं स्वत:त बदल करण्यास उत्सुक आहात. कमी जास्त बोललो असेल थोडा उद्धटपणा आला असेल तर कृपया रागावु नका. माझी भावना केवळ मित्रत्वाच्या नात्याने सुचवणे इतकीच आहे त्याहुन वेगळी काहीच नाही.
  • Log in or register to post comments

मारवाजी ,आपल्या विस्तृत

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
गुरुवार, 11/24/2016 - 19:08 नवीन
मारवाजी ,आपल्या विस्तृत प्रतिसादासाठी आभारी आहे.नक्कीच प्रयत्न करुन पाहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

सगळ्यांनी चांगले प्रतिसाद

रेवती
गुरुवार, 11/24/2016 - 20:20 नवीन
सगळ्यांनी चांगले प्रतिसाद दिलेत. टफि, तुम्हाला आता बरे वाटत असावे अशी आशा. फक्त एकच करू नका, ते म्हणजे अशा मानसिक अवस्थेत लग्न! लग्न ही गोष्ट अडचणीत असताना करण्याची नसून जबाबदारीची जाणीव झाल्यानंतर करण्याची आहे. हामेरिकेतलं फारसं माहित नाही पण भारतियांमध्ये हा विचार बरेचदा दिसतो की 'लग्न करून टाका, सगळे व्यवस्थित होईल'. संसारात प्रश्न उभे राहणं व ते सोडवणं वेगळं व आधीच गंभीर प्रश्न असताना, त्याच्याशी काडीमात्र संबंध नसलेल्या मुलीला/ मुलाला त्यात ओढून आणणं व त्या व्यक्तिच्या गळ्यात ती प्रश्नांची माळ घालणं अजिबात योग्य नाही. आनंदी होण्यासाठी लग्न करू नका, आनंदी असताना लग्न करा. कल्पना करा की, दुसरी व्यक्तीही बरेच अनुत्तरीत पण गंभीर मामले तिच्या पदरात बांधून लग्नाला उभी रहात असेल तर तुमच्या प्रश्नांची व्याप्ती किती मोठी होईल. मला असे म्हणायचे नाही की सगळे सतत आलबेलच असते. अगदी आनंदात लग्न करताना काही प्रश्न प्रत्येकाचे असणारच आहेत. फक्त ते कोणते असले तरी चालतील हे पहावे लागेल. बाबौ! हे लिहिताना कसंसं झालं हे कबूल करते.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी माझ्या मनातही हेच्च

सानझरी
गुरुवार, 11/24/2016 - 20:25 नवीन
अगदी अगदी माझ्या मनातही हेच्च आलेलं.. ऊठसूठ लोक लग्नाचे सल्ले कसे काय देतात याचंच आश्चर्य वाटतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

गंमतीत

गामा पैलवान
गुरुवार, 11/24/2016 - 20:38 नवीन
सानझरी, मी गंमतीत दिलेला आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

फक्त तुम्हाला उद्देशून नाही

सानझरी
Fri, 11/25/2016 - 11:18 नवीन
फक्त तुम्हाला उद्देशून नाही बोल्ले हो मी. गैरसमज करून घेऊ नका. पण एकंदरीतच भारतात 'लाख दुखों की एक दवा' म्हणून लग्नाकडे बघीतल्या जातं आणि सगळीकडून लग्नाचे सल्ले यायला लागतात. नाखू म्हणताच तेच खरं - रोगा पेक्षा इलाज भयंकर. त्या मुलीची होणारी फरफट खाली रेवतीताईंनी लिहीलीच आहे.. असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

बरोबर आहे.

गामा पैलवान
Fri, 11/25/2016 - 13:11 नवीन
अहो, मीही ही सगळी गंमत धरून चाललो होतो. अचानक चर्चेने गंभीर वळण घेतलं. म्हणून म्हंटलं की आपला पवित्रा जाहीर केलेला बरा. तुम्ही केवळ निमित्तमात्र! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

होय गं, आणि बरेचदा त्या

रेवती
गुरुवार, 11/24/2016 - 20:44 नवीन
होय गं, आणि बरेचदा त्या बिचार्‍या मुली पार म्हातार्‍या होईस्तोवर खस्ता खातात. घरात कोणी बाईमाणूस नाही, मुलाचे व्यसन, डिप्रेशन वगैरे कारणांसाठी लग्न करणे म्हणजे त्या येणार्‍या मुलीसाठी किती मोठे प्रश्न आधीच तयार असतात. घरात असणारी तीन चार पुरुषमंडळी जर त्यांच्या आयुष्यातील प्रश्न सोडवू शकत नसतील तर बाहेरून आलेल्या व वयाने लहान असलेल्या मुलीने ते प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा असते त्यात ती पार पिचून जाते. घरात बाईमाणूस नसणे, म्हणजे गेलेले असणे हा प्रश्न त्या दुसर्‍या मुलीचा कसा असू शकतो? तसेच व्यसनी, डिप्रेस्ड मुलाची मनस्थिती सुधारायला जर त्याचे जन्मदाते काही करू शकत नसतील तर झालेल्या गोष्तींना अजिबात कारणीभूत नसलेली मुलगी कशी काय जबाबदार असू शकेल? मग मुलीचे आधीचे प्रेमप्रकरण, तिच्या घरातील कोर्टकज्जे, तिचे डिप्रेशन यांची किती जबाबदारी तो नवरा किंवा त्याच्या घरातील लोक्स घेणारेत? बरेचदा घेत नाहीत. अशावेळी लग्नाचा सल्ला देणे योग्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

प्रचंड सहमत.

एस
गुरुवार, 11/24/2016 - 22:15 नवीन
प्रचंड सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सहमत रेवती ताई

अभिजीत अवलिया
गुरुवार, 11/24/2016 - 23:23 नवीन
सहमत रेवती ताई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

+१००

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 11/26/2016 - 00:40 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

@रेवती,तुमचा मुद्दा पटतो

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
गुरुवार, 11/24/2016 - 21:17 नवीन
@रेवती,तुमचा मुद्दा पटतो .लग्न करुन समस्या वाढवून कुणा मुलीचं आयुष्य दावणीला लावण्याइतका मी असंवेदनशील नाही.it is like pushing the problem back to one step
  • Log in or register to post comments

टफीसाब....रुला दिया आपने.....

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 11/24/2016 - 21:20 नवीन
आपल्याला काहीच कळत नाही हेच ब-याचजणांना आयुष्यभर कळत नाही ....आणि तरीही ते मजेत जगतात.... तुम्ही ती उन्मनी अवस्था पार केलीत त्याबद्दल तुमचं अभिनंदन.... एकदाच मिळणारं आयुष्य यथेच्छ उपभोगून घ्या...कोणी लेकाच्यानं पुनर्जन्म पाहिलाय...परत बीएस्सीपर्यंत शिकणं हीच केवढी मोठी शिक्षा असेल....सोडून द्या हा विचार आणि मजेत रहा !
  • Log in or register to post comments

@मला व्यवहार ज्ञान नाही,माझे

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/24/2016 - 21:44 नवीन
@
मला व्यवहार ज्ञान नाही,माझे डोके कुठेच चालत नाही,मी काय करावे???????
››› टनाटन संघटनेत जा! ;) एंट्रिलाच ८०टक्के आध्यात्मिक पातळी असलेले साधक म्हणून गौरविले जाल! =))
  • Log in or register to post comments

माझी अध्यात्मिक पातळी १०५%

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
गुरुवार, 11/24/2016 - 22:10 नवीन
माझी अध्यात्मिक पातळी १०५% आहे.टनाटन पाच ट्क्के कमी करुन देणार काय???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

टफि, सॉरी हां. गंमत केली

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/25/2016 - 07:18 नवीन
टफि, सॉरी हां. गंमत केली मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर

माझी अध्यात्मिक पातळी १०५%

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
गुरुवार, 11/24/2016 - 22:10 नवीन
माझी अध्यात्मिक पातळी १०५% आहे.टनाटन पाच ट्क्के कमी करुन देणार काय???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मला वाटतं की ....

गामा पैलवान
Fri, 11/25/2016 - 02:00 नवीन
टफि, मला वाटतं की जर तुमची अध्यात्मिक पातळी १०५ % असेल तर तुम्हाला उपरोक्त प्रश्नंच पडायला नकोत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर

लहान तोंडी मोठा घास

तेजस आठवले
गुरुवार, 11/24/2016 - 22:29 नवीन
आपल्याला सल्ला द्यावा एवढी माझी पात्रता नाही. पण टोकाचे पाऊल उचलू नका." हे ही दिवस जातील" हे वाक्य सदैव मनाशी म्हणत राहा. केली जरी ज्योत बळेच खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे हे वचन लक्षात ठेवा. जगातला प्रत्येक माणूस सर्वज्ञ नसतो. त्यामुळे तुम्हाला जरी असे वाटत असले कि तुम्हाला बऱ्याच गोष्टींमधले कळत नाही तरी ते तसे नाही हे लक्षात घ्या. सध्या माहितीचा विस्फोट झाला आहे त्यामुळे हे असे वाटणे बऱ्याच जणांना होते. सर्वच गोष्टींमधील बदल इतक्या झपाट्याने होत आहेत कि तो वेग सर्वानाच झेपतो असे नाही. आणि ज्यांना झेपतो त्यांची भरपूर दमछाक होते हे देखील तितकेच खरे आहे. तुम्ही एखाद्या छंदात मन का रमवत नाही? अगदी बिल्ले गोळा करण्यापासून बाजारात जाऊन जुन्या गोष्टी धुंडाळणे असा कुठलाही छंद घ्या, तुमच्या आवडीप्रमाणे. चांगली पुस्तके वाचा. चांगले संगीत ऐका. कुठलेतरी संगीत असे नक्कीच असेल कि ते ऐकल्यावर तुम्हाला एकदम शांत वाटेल. खरंच ऐकत जा. चांगली लायब्ररी जॉईन करा. अगदी महत्वाचे. कोणाशीही तुमची तुलना करू नका.आपले आयुष्य हे आपले आहे.बुद्धी, हुशारी, कष्ट ह्याबरोबर काही प्रमाणात नशीब ही लागते(हे माझे वैयक्तिक मत आहे), त्यामुळे तुमच्या कडे जे काही आहे त्याचा वापर करा असे मी सांगेन.नैराश्य आले तर परिस्थिती अजून बिघडेल. त्यामुळे कुठेतरी मन रमवणे गरजेचे आहे. सूर्य तो सूर्यच, पण त्यामुळे पणतीचे महत्व कमी होत नाही. त्यामुळे आपण जे आहोत जसे आहोत त्याचा स्वीकार करा. चांगली अथवा वाईट परिस्थिती कधीच खूप वेळ राहत नाही हे पक्के ध्यानात ठेवा. असो, खूप बौद्धिक घेतले कि काय असे वाटले. पण खरंच टोकाचे पाऊल नका उचलू. तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या मनावरचे मळभ लवकर दूर होवो अशी सदिच्छा देतो.
  • Log in or register to post comments

मित्र आणि आईवडील

चित्रगुप्त
गुरुवार, 11/24/2016 - 22:52 नवीन
धागाकर्त्याचे प्रांजळ निवेदन आणि प्रगल्भ प्रतिसाद सर्वच मननीय वाटले. मित्र आणि आईवडील यांचेबद्दल फारसे कुणी लिहीलेले दिसले नाही. तुम्हाला अगदी खास, लहानपणापासूनचे मित्र आहेत का ? त्यांचेशी वारंवार भेटी, गप्पा, चर्चा होतात का ? आणि आईवडिलांशी कितपत आणि कसे संबंध आहेत ? तुमच्या शेतावर एक झकास मिपाकट्टा करा आणि नवीन मित्र मिळवा, असेही सांगावेसे वाटते. बाकी तथाकथित व्यवहारज्ञान नसलेले लोकच जास्त सुखी आणि समाधानी जीवन जगत असतात, हे स्वानुभवावरून सांगू शकतो. बाह्यतः सुखात असलेल्यांची अंदरकी बात इतरांना कळत नसते, त्यांचेशी स्वतःची तुलना करण्याची काहीच गरज नाही.
  • Log in or register to post comments

तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी.. स्वतः ला शोधा

DeepakMali
Fri, 11/25/2016 - 01:49 नवीन
तू चाल पुढं ... तुला रं गड्या भिती कशाची... पर्वा ती कोणाची... मस्त रहा तुमच्या टेन्शन घेण्याने कोणाला काही फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments

धागा कर्त्याचा उद्देश साध्य

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/25/2016 - 10:20 नवीन
धागा कर्त्याचा उद्देश साध्य झालेला आहे .
  • Log in or register to post comments

+१

शलभ
Fri, 11/25/2016 - 15:41 नवीन
+१ पण प्रतिसाद छान दिलेत लोकांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

नानासाहेब,

श्रीगुरुजी
Fri, 11/25/2016 - 15:53 नवीन
नानासाहेब, इथल्या सदस्यांना काय ** समजता का? 'स्त्रिया पुरूषांचे अनुकरण का करतात', 'antibiotic resistance ,मानवासमोर उभा ठाकलेला सर्वात मोठा धोका', 'मुक्त लैंगिक व्यवहार स्वीकारल्यास बलात्कार थांबतील का' असले धागे काढताना भरपूर डोके चालते, असंख्य डुआय तयार करताना भरपूर अक्कल वापरता, गोंदवल्याला जेवताना जानवे बघतात असले खोडसाळ आरोप करताना उकळ्या फुटतात आणि आता "मला व्यवहार ज्ञान नाही,माझे डोके कुठेच चालत नाही,मी काय करावे???????" असले फालतू धागे काढून गंमत बघता काय?
  • Log in or register to post comments

आपल्याला व्यावहार ज्ञान नाही अशी धारणा असणारी व्यक्ती

संजय क्षीरसागर
Sat, 11/26/2016 - 00:36 नवीन
विचारच करु शकत नाही असं आहे का? मी एकामागोमाग आयडी घेऊन इथे बिन्डोक प्रतिसाद व नळावरची भांडणं करु लागलो. हे तर त्यांनी स्वतः कबूल केलंय. त्यावर "असंख्य डुआय तयार करताना भरपूर अक्कल वापरता " हा व्यक्तिगत आकसातून आलेला शेरा वाटतो. दोन गोष्टी प्रकर्शानं जाणवल्या. मागे सोन्याबापूनी म्हटलं होतं की इथे काही आयडी अमरपट्टा घेऊन आलेत. आणि सोत्री म्हणाला होता की, इथे `काय लिहीलंय' याच्याऐवजी `कुणी लिहीलंय' हे पाहिलं जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या

श्रीगुरुजी
Sat, 11/26/2016 - 15:11 नवीन
त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या अवतारात निर्माण केलेले धागे व त्यांचे वेगवेगळ्या धाग्यांवरील प्रतिसाद बघा. त्यातून त्यांचे व्यवहार ज्ञान व तिरपागडे चालणारे डोके दिसून येते. माईसाहेब या अवतारातून दिलेले सभ्य प्रतिसाद बघा. त्यांचे धागे व प्रतिसाद हे अजिबात बिनडोक माणसाचे धागे व प्रतिसाद नाहीत. त्यांच्या जातीयवादी व शिवराळ भाषेमुळेच त्यांचे अनेक आयडी बॅन झाले आहेत. आपण बावळट असल्याचा आव आणून ते मिपा सदस्यांची फक्त मजा पहात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पण तुम्ही पण मजा बघा ना

सामान्य वाचक
Sat, 11/26/2016 - 18:10 नवीन
तुम्ही चिडलात तर त्यांचा हेतू साध्य झाला तुम्ही पण धागा एन्जॉय करा आणि लोकांचे जे चांगले प्रतिसाद आहेत, ते सगळ्यांनाच उपयोगी आहेत ना, फक्त धागाकरत्याला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पण तुम्ही पण मजा बघा ना

सामान्य वाचक
Sat, 11/26/2016 - 18:10 नवीन
तुम्ही चिडलात तर त्यांचा हेतू साध्य झाला तुम्ही पण धागा एन्जॉय करा आणि लोकांचे जे चांगले प्रतिसाद आहेत, ते सगळ्यांनाच उपयोगी आहेत ना, फक्त धागाकरत्याला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पण तुम्ही पण मजा बघा ना

सामान्य वाचक
Sat, 11/26/2016 - 18:14 नवीन
तुम्ही चिडलात तर त्यांचा हेतू साध्य झाला तुम्ही पण धागा एन्जॉय करा आणि लोकांचे जे चांगले प्रतिसाद आहेत, ते सगळ्यांनाच उपयोगी आहेत ना, फक्त धागाकरत्याला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

?

संजय क्षीरसागर
Sat, 11/26/2016 - 22:24 नवीन
आपण बावळट असल्याचा आव आणून ते मिपा सदस्यांची फक्त मजा पहात आहेत. तसं संपादकांना वाटलं तर ते धागा डिलीट करतील . अर्थात काही सदस्यांच्या कितीही व्यक्तिगत कमेंटस इथे कशा चालतात हे आश्चर्य आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मानस चंद्रातें यांची मुलाखात वाचा

अन्कुश शिन्दे
Sat, 11/26/2016 - 18:37 नवीन
मानस यांची मुलाखात वाचा... , ते व्यसनाच्या मगरमिठीतून कसे सुटले ..हे वाचले कि आपले अपयश तुच्छ वाटून जगण्याचा अर्थ काढण्यास मदत होईल
  • Log in or register to post comments

मिपावरच त्याचा धागा आहे.

अन्कुश शिन्दे
Sat, 11/26/2016 - 18:39 नवीन
मिपावरच त्याचा धागा आहे.
  • Log in or register to post comments

सर्र्ळ संन्यास घ्या जिमीन

Ram ram
Sun, 11/27/2016 - 06:58 नवीन
सर्र्ळ संन्यास घ्या जिमीन बिमीन दान करून टाका, बिनडोक लोकसंख्या फार वाढू लागली हो.
  • Log in or register to post comments

सर्र्ळ संन्यास घ्या जिमीन

Ram ram
Sun, 11/27/2016 - 09:26 नवीन
सर्र्ळ संन्यास घ्या जिमीन बिमीन दान करून टाका, बिनडोक लोकसंख्या फार वाढू लागली हो.
  • Log in or register to post comments

५.की सरळ आत्महत्या करुन

निओ१
Sun, 11/27/2016 - 18:17 नवीन
५.की सरळ आत्महत्या करुन प्रश्न कायमचा मिटवून टाकावा? do it. असे म्हणालो असतो, पण ते करण्याआधी काही गोष्टीचा विचार नक्की करा. आपण म्हणजे आपले जग नाही आहे, आपण ज्यांच्यासोबत आहोत, जे आपले आहेत त्या सर्वांचा एकदा विचार करा व मग वाटलेच तर.. पण मला खात्री आहे, असा मुर्खपणा एखादा विचारी व्यक्ती नक्कीच करु शकत नाही. अडचणी कोणाला येत नाहीत? अगदी गरिबातील गरिब आणि टाटा यांना देखील. बातम्या वाचत आहात ना? थोडा धीर धरा. एवढे म्हणावे म्हणतो आहे, कारण प्रत्येक प्रश्नावर उत्तर हे काळ आहे.
  • Log in or register to post comments

बहुदा

निनाद
Mon, 11/28/2016 - 03:29 नवीन
बहुदा तुमच्या आजुबाजुला असे कोणीतरी आहे की जे तुम्हाला हा न्युनगंड आणते आहे. तेव्हा संगत बदला! जे कोणी लोक सल्ले देताना 'तुम्ही किती मुर्ख आहात' असा आव आणत असतील त्यांना टाळा. 'कुणी, किती, कसा सहज पैसा कमावला' वगैरे चर्चा चालल्या असतील तर त्यापासून चार हात दूर रहा! फक्त आनंदी आणि पॉझिटिव्ह विचारांचे लोक शोधा. त्याच लोकांमध्ये जाणीवपुर्वक मिसळा. (कितीही आमंदी असले तरी व्यसनी मात्र नकोत.) नाही मिळाले तर तर आपणच आनंदी कसे राहता येईल याचा विचार करा. रोज किमान दोन चांगल्या झालेल्या गोष्टी झोपताना आठवा. शेती आहेच तर त्यात लक्ष घाला ते आनंददायी कार्य आहे. स्वत:च्या खाण्यासाठी सेंद्रिय भाजीपाल्याची बाग बनवा. त्यातून स्वतः (मजूर न लावता) भाजीपाला काढा. त्यात केव्हढा आनंद आहे!
  • Log in or register to post comments

एका

निनाद
Mon, 11/28/2016 - 03:31 नवीन
आणि दीर्घ कालीन उपाय योजना म्हणून, कोणत्याही एका साध्या - अगदी साध्या - गोष्टीत जाणीवपुर्वक तज्ञता (एक्स्पर्टाईज) आणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

बाकी माहीत नाही, पण

आनन्दा
Mon, 11/28/2016 - 12:50 नवीन
बाकी माहीत नाही, पण डांगेअण्णांकडे पहा एकद.. ते देखील अश्याच वाईट परिस्थितीतून गेले आहेत एकदा..
  • Log in or register to post comments

आनन्दा!!!!!! असं काय इज्जतीचं

संदीप डांगे
Mon, 11/28/2016 - 13:26 नवीन
आनन्दा!!!!!! असं काय इज्जतीचं धिरडं करता राव...!!!!!! आत्महत्येचा विचार सोडला तर बाकी काय कॉमन दिसतंय दादा????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

>>>मी आहे ३१ वर्षाचा तरुण(

मोदक
Mon, 11/28/2016 - 19:32 नवीन
>>>मी आहे ३१ वर्षाचा तरुण( केस पांढरे व्हायला लागले आहेत). तसा मी बक्कळ शिकलो आहे. या गोष्टींमध्ये साम्य असावे. :)) (आनंदा यांचा प्रतिसाद अस्थानी वाटला.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हा हा हा! मी 36 वर्षाचा 'तरुण

संदीप डांगे
Mon, 11/28/2016 - 21:13 नवीन
हा हा हा! मी 36 वर्षाचा 'तरुण' असून केस पांढरे होणे वयाच्या 20 व्या वर्षीच अलमोस्ट झाले आहे.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

फुल्ल डिमांड

कपिलमुनी
Wed, 11/30/2016 - 20:58 नवीन
कोणी पत्ता मागतय तर कोणी बायोडाटा ! मोदककाका फुल्ल डिमांड मधे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

असं काय इज्जतीचं धिरडं करता

पिलीयन रायडर
Mon, 11/28/2016 - 23:42 नवीन
असं काय इज्जतीचं धिरडं करता राव...!!!!!!
=)) का टफिला लोक मनावर घेताहेत काय कळत नाही. पण तुम्हाला त्या रांगेत अनावधानाने का होईना बसवलेलं पाहिलं, धन्य झाले मी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

काय वो

पैसा
Mon, 11/28/2016 - 23:47 नवीन
चार्ज संपला काय? एखादा काथ्याकूट काढा. तुमचे सगळे प्रॉब्लेम नाहिसे होतात का नाही बघा!
  • Log in or register to post comments

काथ्याकुटाला विषय - सीतेने

मोदक
Tue, 11/29/2016 - 00:17 नवीन
काथ्याकुटाला विषय - सीतेने रामाकडून पोटगी घ्यायला हवी होती का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा