ज्या ज्या मिपाकरांनी बँकेत जाऊन आपल्या(च) पाचशे -हजाराच्या नोटा बदलून आणल्या किंवा भरणा केल्या त्यांचे अनुभव इकडे तिकडे (प्रतिसादात) टाकण्यापेक्षा या धाग्यात द्याव्यात या करिता हे दालन खुले केले आहे.
एटीम चालू नसल्याने किंवा चालू होताच अर्ध्या तासात रोकड संपल्याने काय हाल होत आहेत ते सांगावेत.
नमनाचे तेल झाल्यावर माझे अनुभव.
खाते स्टेट बँक ऑफ ईंडीयात माझे आणि लेकाचेही.घरात कन्येच्या पिगी बँक (आज्जी बटव्यातले ३ हजार) व माझे आपत्कालीन ३ हजार भरणा करण्यास व बदलून घेण्यास गेलो.
लेकाच्या खात्यातच पिगी बँकेचे जमा करणार होतो त्यानुसार स्लिप वैगरे भरली होतीच.फक्त मला बदलायचे पैसे सविस्तर अर्ज आणि ओळख्पत्र वैगरेसहीत तयारीने गेलो होतो.(शुक्रवार दि.११).
बँकेत बर्यापैकी गर्दी होतीच रांगेत किमान १००-१५० नंबर असावेत, मुख्य दारातून एकावेळी १०-१५ लोकांना सोडले जात होते,पण एकूणच बँक कर्मचारी या अचानक आलेल्या लोंढ्याला आणि कामाला तोंड द्यायच्या क्षमतेइतके नव्हते हे वारंवार जाणवत होते.
शंका निराकरण करणारा कुठलाही फलक दर्शनी भागात व ठळक असा लावला नव्हता.सूचना ए टीम चा सुरक्षारक्षक देत होता त्याचा अवतार व शरीर यष्टी पहाता त्यालाच सुरक्षेची नितांत गरज होती.त्यातून तो बिचारा अमराठी (बहुधा उत्तर भारतीय) त्याला लोकांच्या शंकांना चौकशीला उत्तर देता येत नव्हते.त्यात रांगेतले लोकही एक्मेकांना अचूक माहीती देण्यापेक्षा नवीन च काहीतरी सांगत होते,प्र्त्येक भरणा रकमेसोबत ओळ्खपत्र (पॅनकार्ड ) लागेल असे त्यामुळे आणखीन्च गोंधळ. खरी गंम्मत माझा नंबर येऊन मी आणि मुलगा आत गेल्यावर आली. आम्ही दोघेही गेलो अश्यासाठी की जर आत दोन स्वतंत्र रांगा असतील्,बदलून घेण्यासाठी आणि भरणा करण्यासाठी तर सोयीचे व्हावे म्हणून (आणि तसेच होते स्वतंत्र रांगा होत्या).
आत पहिल्यांदा मी भरणा करण्याच्या रांगेत उभा राहिलो आणि मुलाला नोटा बदलून घ्यायच्या रांगेत उभे केले.त्याचा नंबर अंदाजे २०-२५ वा असेल,आणि माझा माझ्या रांगेत फक्त १०-१२.
माझ्या पुढील लोकांअध्ये काही संपुर्ण तपशील घेऊन आलेले होतेच पण :
दाखला क्रं १ :
एक मध्यमवयीन इसम (वय ४०-५०) :. प्र्त्येक भरणा करण्याला ओळ्खपत्र लागेल का?
बँकेतल्या बाई (कर्मचारी) : नाही फक्त पन्नास हजाराच्या वर असेल तर लागेल.आणि त्याचे तपशील स्लिपवर लिहा.
एक मध्यमवयीन इसम : मग मी या स्लिप बदलून वेगळ्या भरतो तिथेच भरायला सुरुवात वेगवेगळ्या खात्याच्या आणि बाईंकडे एक स्लिप देऊन रक्कम बहुधा ७०-७५ हजार दिले असावेत.बाईंनी पॅनचा तपशील मागताच त्याच स्लिप मध्ये खाडाखोड करून ४९ हजाराची स्लिप केली.उरलेली रक्कम तिथेच इतर स्लिप भरायला सुरुवात.एकूण वेळ सगळे निस्तरायला ३०-३५ मिनिटे.
दाखला क्रं १ :रांगेत त्या नंतरचा ५-६ वा नंबर मारवाडी स्त्री तीशीतली(पेहरावावरून व दागिन्यांवरून अंदाज उगा गहजब नको) सोबत एक लहान मुलगा ३-४ वर्षाचा आणि त्या स्त्रीची बहुधा आई.
नंबर येताच बँकेतल्या बाई (कर्मचारी) ने साम्गीतले रक्कम ५० हजार आहे तेंव्हा पॅनकार्ड लागेल.
बाईम्नी तिथून्च फोन करून घरी चौकश्या सुरु केल्या दोन चार फोना फोनीनंतर , नंतर दिला पॅन नंबर तर चालेल का तेही चिआरून झाले.बँकेतल्या बाईंनी नकार दिल्यावर शेवटी पुन्हा फोन.
बँकेतल्या बाई वैतागून तोडगा देतात ४९ हजार भरणा करा पॅनची गरज भासणार नाही,त्याच वेळी त्या आईसाहेब उवाच "हम अब इस हजार रुपये कब भरने आयेंगे" वगैरे जे काम ३-४ मिनिटात होणे होते त्याला वेळ १५-२० मिनिटांचा.माझा नंबर अग्दी २-३ वर येताच बँकेची घोषणा की नोटा बदलीच्या रांगेतल्या पुढच्या १० च लोकांना बदलून मिळतील (रोकड शिल्लक नसल्याने) उरलेल्यांनी उद्या येणे. बँकेच्या मॅनेजराला आधी अंदाज कसा आला नाही ते मलाही कळेना.(बँकेबाहेरील लोकाची चिडचिड/संताप स्वाभावीक होता,किमान टोकन पद्ध्त वापरून फक्त ५०-१०० लोकांनाच थांबण्यास सांगायला पाहिजे होते)
शेवटी मुलाकाचा नंबर १५-२० मध्येच असल्याने त्याचे कडून नोटाबदलीचे पैसे घेऊन (आधीच पर्यायी स्लिप भरून ठेवल्याने भरणा करायचे ठरवले) आणि दोन्ही पसे भरणा केले. व्य्वहार होत असताना. नोटाबदलीच्या कौंटरवर २००० हजारच्या नोटा नकोत सगळ्या फक्त शंभरच्याच द्या असे सांगणारे २-४ महाभाग होतेच.
थोडक्यात बेशिस्त अनागोंदी आणि पॅनीकता दोन्ही बाजूंनी आहे.(याच कारणामुळे १०-१५ व्य्वहारांना २-३ तास लागत आहेत)
त्या दिवशी चेक बुक बरोबर नेले नसल्याने काल चेक ने पैसे काढावे लागले मर्यादा १० हजाराची असूनही लगेच निकड नसल्याने ७ हजार काढले (पुन्हा ३ तास खर्ची करून) त्यात पहिली वहिली २ हजाराची नोट मिळाली त्यामुळे कन्या खूष आणि मुलालाही रांगेत थांबल्याचे चीज झाले असे वाटले.(सध्या नोट पिगि बँकेत्च राहिल असे फर्मान कन्येने दिले आहे)
कुणाचे अनुभव असतील तर ते टंकावेत.
लोक फक्त साक्षर झाले आहेत सुशिक्षीत होण्यास अजून बर्यापैकी मजल गाठावी लागेल.
त्या दिवशी चेक बुक बरोबर नेले नसल्याने काल चेक ने पैसे काढावे लागले मर्यादा १० हजाराची असूनही लगेच निकड नसल्याने ७ हजार काढले (पुन्हा ३ तास खर्ची करून) त्यात पहिली वहिली २ हजाराची नोट मिळाली त्यामुळे कन्या खूष आणि मुलालाही रांगेत थांबल्याचे चीज झाले असे वाटले.(सध्या नोट पिगि बँकेत्च राहिल असे फर्मान कन्येने दिले आहे)
कुणाचे अनुभव असतील तर ते टंकावेत.वर्गीकरण
वाचने
46932
प्रतिक्रिया
218
मिसळपाव
प्रतिक्रिया
पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे!
कॉसमॉस बॅंकेत
In reply to पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे! by यशोधरा
पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे!
In reply to पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे! by यशोधरा
पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे! =))बघा, इतर भाषांच्या शिरकावाने मराठी भाषा समृद्ध होत चालल्याचे नवीन पुरावे मिळले ! कोण रे तो स्वघोषित भाषाशास्त्री उगाच तक्रार करतोय ?! =)) अवांतर : या निमित्ताने माझ्या ऐकीव आवडीचा "वीकनेसपणा" हा शब्द आठवला. :)=))
In reply to पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे! by डॉ सुहास म्हात्रे
ह्याह्याह्या!! तसेच "परवडेबल"
In reply to पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे! by डॉ सुहास म्हात्रे
काल बॅंकेत गेलो, मोजून सहा
कोणती बँक?
In reply to काल बॅंकेत गेलो, मोजून सहा by संदीप डांगे
डोळे पाणावून पाझरु लागले.
In reply to काल बॅंकेत गेलो, मोजून सहा by संदीप डांगे
हाय प्रोफाईल म्हणजे RBI तर
In reply to काल बॅंकेत गेलो, मोजून सहा by संदीप डांगे
:))
In reply to हाय प्रोफाईल म्हणजे RBI तर by मोदक
दोन दिवस आधी बँकेतून आलेला
In reply to हाय प्रोफाईल म्हणजे RBI तर by मोदक
काल बॅंकेत गेलो, मोजून सहा सात लोक होते लायनीत, मी आठवा, उभा राह
In reply to काल बॅंकेत गेलो, मोजून सहा by संदीप डांगे
मपला आणभाव
लघू (म्हणजे छोटीशी) शंका
In reply to मपला आणभाव by चौकटराजा
कॉमन सेन्स
In reply to लघू (म्हणजे छोटीशी) शंका by निराकार गाढव
थोडक्या वेळात काम झाले
मी बँकेत पैसे काढायच्या
सेम २ सेम
In reply to मी बँकेत पैसे काढायच्या by पिंगू
मी स्वतः अजून बँकेत गेलो
जुनी सवय कामाला आली
मलाही अजुनतरी एकही रोख
In reply to जुनी सवय कामाला आली by बिहाग
गेल्या दोन दिवसात अंदाजे रोज
आइने ४३००० रुपये बँकेत भरले.
मी काल
"पडीले वळण इंद्रिया सकळा" लोळ
In reply to मी काल by धर्मराजमुटके
+११
In reply to "पडीले वळण इंद्रिया सकळा" लोळ by खटपट्या
http://atmsearch.in/ ही एक
https://docs.google.com
माझे ओरिएण्टल बँक आणि एस बँक
परवा HDFC बँकेच्या लायनीत दोन
मी काल नैनिताल ला ऑडिटर्स
मी काल नैनिताल ला ऑडिटर्स
In reply to मी काल नैनिताल ला ऑडिटर्स by विशुमित
इथे कोकाकोला फॅक्टरी टाकणर
In reply to मी काल नैनिताल ला ऑडिटर्स by असंका
का?
In reply to इथे कोकाकोला फॅक्टरी टाकणर by आदूबाळ
नाही नाही...
In reply to मी काल नैनिताल ला ऑडिटर्स by असंका
लय भारी नाखु !
माझा अनुभव
30 डिसेंम्बर पर्यन्त वेळ आहे
In reply to माझा अनुभव by भाते
बस सुटेल, पळा पळा
In reply to माझा अनुभव by भाते
कांहीच त्रास झाला नाही.
मी सहा जणांना मजकडच्या
In reply to कांहीच त्रास झाला नाही. by खेडूत
मी सहा जणांना मजकडच्या शंभरच्या नोटा देऊन चार दिवस धीर धरण्यास सांगितले.स्पृहणिय काम !काल
कॅनरा बँक. :)
In reply to काल by तुषार काळभोर
सहमत
सहमत
In reply to सहमत by पाटीलभाऊ
सहमत
In reply to सहमत by पाटीलभाऊ
एकूण प्रायव्हेट बँकांत लगेच
काल (१३ ता.) आय डी बी आय
काल गर्दीमध्ये
पॅन कार्ड
हुश्श्श्श
दुसर्या धाग्यावर लिहिले आहे
"आम्ही दोघेही माजी स्टाफ
In reply to दुसर्या धाग्यावर लिहिले आहे by पैसा
:D
In reply to "आम्ही दोघेही माजी स्टाफ by फास्टरफेणे
HDFC Bank
बस सुटेल, पळा पळा
मि नेहमि सुटे पैसे घेते
मध्यंतरी काही दिवस सुट्टीवर
काल दोन ब्यांकात प्रत्येकी
जीवाच्या भीतीने अधिक काही
In reply to काल दोन ब्यांकात प्रत्येकी by सतिश गावडे
जीवाच्या भीतीने अधिक काही लिहीत नाही=))=)))
In reply to जीवाच्या भीतीने अधिक काही by डॉ सुहास म्हात्रे
ते २००० च्या नोटांचा रंग जातो
In reply to काल दोन ब्यांकात प्रत्येकी by सतिश गावडे
तोच तर मास्टर प्लॅन आहे, सगळं
In reply to ते २००० च्या नोटांचा रंग जातो by प्रसाद गोडबोले
२००० च्या नोटेचा रंग गेला तरच
In reply to ते २००० च्या नोटांचा रंग जातो by प्रसाद गोडबोले
दुसर्या धाग्यावर माझा अनुभव
रेल्वे वाले चेक किंवा कार्ड
शनिवारी जुन्या नोटा बदलून घेतल्या..
ग्रामीण भागातील अनुभव आहे का कुणाला?
कोटक महिंद्रा बँकेचा अतिशय चांगला अनुभव होता
हीच माझी बँक आणि हाच अनुभव, :
In reply to कोटक महिंद्रा बँकेचा अतिशय चांगला अनुभव होता by वरुण मोहिते