ज्या ज्या मिपाकरांनी बँकेत जाऊन आपल्या(च) पाचशे -हजाराच्या नोटा बदलून आणल्या किंवा भरणा केल्या त्यांचे अनुभव इकडे तिकडे (प्रतिसादात) टाकण्यापेक्षा या धाग्यात द्याव्यात या करिता हे दालन खुले केले आहे.
एटीम चालू नसल्याने किंवा चालू होताच अर्ध्या तासात रोकड संपल्याने काय हाल होत आहेत ते सांगावेत.
नमनाचे तेल झाल्यावर माझे अनुभव.
खाते स्टेट बँक ऑफ ईंडीयात माझे आणि लेकाचेही.घरात कन्येच्या पिगी बँक (आज्जी बटव्यातले ३ हजार) व माझे आपत्कालीन ३ हजार भरणा करण्यास व बदलून घेण्यास गेलो.
लेकाच्या खात्यातच पिगी बँकेचे जमा करणार होतो त्यानुसार स्लिप वैगरे भरली होतीच.फक्त मला बदलायचे पैसे सविस्तर अर्ज आणि ओळख्पत्र वैगरेसहीत तयारीने गेलो होतो.(शुक्रवार दि.११).
बँकेत बर्यापैकी गर्दी होतीच रांगेत किमान १००-१५० नंबर असावेत, मुख्य दारातून एकावेळी १०-१५ लोकांना सोडले जात होते,पण एकूणच बँक कर्मचारी या अचानक आलेल्या लोंढ्याला आणि कामाला तोंड द्यायच्या क्षमतेइतके नव्हते हे वारंवार जाणवत होते.
शंका निराकरण करणारा कुठलाही फलक दर्शनी भागात व ठळक असा लावला नव्हता.सूचना ए टीम चा सुरक्षारक्षक देत होता त्याचा अवतार व शरीर यष्टी पहाता त्यालाच सुरक्षेची नितांत गरज होती.त्यातून तो बिचारा अमराठी (बहुधा उत्तर भारतीय) त्याला लोकांच्या शंकांना चौकशीला उत्तर देता येत नव्हते.त्यात रांगेतले लोकही एक्मेकांना अचूक माहीती देण्यापेक्षा नवीन च काहीतरी सांगत होते,प्र्त्येक भरणा रकमेसोबत ओळ्खपत्र (पॅनकार्ड ) लागेल असे त्यामुळे आणखीन्च गोंधळ. खरी गंम्मत माझा नंबर येऊन मी आणि मुलगा आत गेल्यावर आली. आम्ही दोघेही गेलो अश्यासाठी की जर आत दोन स्वतंत्र रांगा असतील्,बदलून घेण्यासाठी आणि भरणा करण्यासाठी तर सोयीचे व्हावे म्हणून (आणि तसेच होते स्वतंत्र रांगा होत्या).
आत पहिल्यांदा मी भरणा करण्याच्या रांगेत उभा राहिलो आणि मुलाला नोटा बदलून घ्यायच्या रांगेत उभे केले.त्याचा नंबर अंदाजे २०-२५ वा असेल,आणि माझा माझ्या रांगेत फक्त १०-१२.
माझ्या पुढील लोकांअध्ये काही संपुर्ण तपशील घेऊन आलेले होतेच पण :
दाखला क्रं १ :
एक मध्यमवयीन इसम (वय ४०-५०) :. प्र्त्येक भरणा करण्याला ओळ्खपत्र लागेल का?
बँकेतल्या बाई (कर्मचारी) : नाही फक्त पन्नास हजाराच्या वर असेल तर लागेल.आणि त्याचे तपशील स्लिपवर लिहा.
एक मध्यमवयीन इसम : मग मी या स्लिप बदलून वेगळ्या भरतो तिथेच भरायला सुरुवात वेगवेगळ्या खात्याच्या आणि बाईंकडे एक स्लिप देऊन रक्कम बहुधा ७०-७५ हजार दिले असावेत.बाईंनी पॅनचा तपशील मागताच त्याच स्लिप मध्ये खाडाखोड करून ४९ हजाराची स्लिप केली.उरलेली रक्कम तिथेच इतर स्लिप भरायला सुरुवात.एकूण वेळ सगळे निस्तरायला ३०-३५ मिनिटे.
दाखला क्रं १ :रांगेत त्या नंतरचा ५-६ वा नंबर मारवाडी स्त्री तीशीतली(पेहरावावरून व दागिन्यांवरून अंदाज उगा गहजब नको) सोबत एक लहान मुलगा ३-४ वर्षाचा आणि त्या स्त्रीची बहुधा आई.
नंबर येताच बँकेतल्या बाई (कर्मचारी) ने साम्गीतले रक्कम ५० हजार आहे तेंव्हा पॅनकार्ड लागेल.
बाईम्नी तिथून्च फोन करून घरी चौकश्या सुरु केल्या दोन चार फोना फोनीनंतर , नंतर दिला पॅन नंबर तर चालेल का तेही चिआरून झाले.बँकेतल्या बाईंनी नकार दिल्यावर शेवटी पुन्हा फोन.
बँकेतल्या बाई वैतागून तोडगा देतात ४९ हजार भरणा करा पॅनची गरज भासणार नाही,त्याच वेळी त्या आईसाहेब उवाच "हम अब इस हजार रुपये कब भरने आयेंगे" वगैरे जे काम ३-४ मिनिटात होणे होते त्याला वेळ १५-२० मिनिटांचा.माझा नंबर अग्दी २-३ वर येताच बँकेची घोषणा की नोटा बदलीच्या रांगेतल्या पुढच्या १० च लोकांना बदलून मिळतील (रोकड शिल्लक नसल्याने) उरलेल्यांनी उद्या येणे. बँकेच्या मॅनेजराला आधी अंदाज कसा आला नाही ते मलाही कळेना.(बँकेबाहेरील लोकाची चिडचिड/संताप स्वाभावीक होता,किमान टोकन पद्ध्त वापरून फक्त ५०-१०० लोकांनाच थांबण्यास सांगायला पाहिजे होते)
शेवटी मुलाकाचा नंबर १५-२० मध्येच असल्याने त्याचे कडून नोटाबदलीचे पैसे घेऊन (आधीच पर्यायी स्लिप भरून ठेवल्याने भरणा करायचे ठरवले) आणि दोन्ही पसे भरणा केले. व्य्वहार होत असताना. नोटाबदलीच्या कौंटरवर २००० हजारच्या नोटा नकोत सगळ्या फक्त शंभरच्याच द्या असे सांगणारे २-४ महाभाग होतेच.
थोडक्यात बेशिस्त अनागोंदी आणि पॅनीकता दोन्ही बाजूंनी आहे.(याच कारणामुळे १०-१५ व्य्वहारांना २-३ तास लागत आहेत)
त्या दिवशी चेक बुक बरोबर नेले नसल्याने काल चेक ने पैसे काढावे लागले मर्यादा १० हजाराची असूनही लगेच निकड नसल्याने ७ हजार काढले (पुन्हा ३ तास खर्ची करून) त्यात पहिली वहिली २ हजाराची नोट मिळाली त्यामुळे कन्या खूष आणि मुलालाही रांगेत थांबल्याचे चीज झाले असे वाटले.(सध्या नोट पिगि बँकेत्च राहिल असे फर्मान कन्येने दिले आहे)
कुणाचे अनुभव असतील तर ते टंकावेत.
लोक फक्त साक्षर झाले आहेत सुशिक्षीत होण्यास अजून बर्यापैकी मजल गाठावी लागेल.
त्या दिवशी चेक बुक बरोबर नेले नसल्याने काल चेक ने पैसे काढावे लागले मर्यादा १० हजाराची असूनही लगेच निकड नसल्याने ७ हजार काढले (पुन्हा ३ तास खर्ची करून) त्यात पहिली वहिली २ हजाराची नोट मिळाली त्यामुळे कन्या खूष आणि मुलालाही रांगेत थांबल्याचे चीज झाले असे वाटले.(सध्या नोट पिगि बँकेत्च राहिल असे फर्मान कन्येने दिले आहे)
कुणाचे अनुभव असतील तर ते टंकावेत.वर्गीकरण
वाचने
46878
प्रतिक्रिया
218
मिसळपाव
प्रतिक्रिया
बँकेच्या लोकांनी सांगितले का?
In reply to बँक ऑफ महाराष्ट्र च्या रांगेत by एस
जुन्या ५००/१००० च्या नोटा
In reply to बँकेच्या लोकांनी सांगितले का? by पैसा
सक्ती करता येणार नाही
In reply to जुन्या ५००/१००० च्या नोटा by श्रीगुरुजी
अर्थात हे मला माहीत आहे. पण
In reply to जुन्या ५००/१००० च्या नोटा by श्रीगुरुजी
हो, आज मी बँकेत गेलो तेव्हा
In reply to जुन्या ५००/१००० च्या नोटा by श्रीगुरुजी
कोणीही येऊन
In reply to हो, आज मी बँकेत गेलो तेव्हा by संदीप डांगे
५०० व १००० च्या नोटा बंदीवर सर्व
५०० व १००० च्या नोटा बंदीवर, सर्वसामन्य जनतेच्या काही संमिश्र प्रतिक्रिया.सोमवारी जाणार आहे बँकेत
कॉसमॉस बॅंकेत जाऊन ६०००/- कॅश
आज मला अक्षरश: दोन मिनिटात
परवा दिवशी पहिल्यांदा
महत्त्वाची बातमी: आता आजपासून
काल ३ वेगवेगळ्या ठिकाणाहून
http://maharashtratimes
बहुतेक पंतप्रधान आपण
In reply to http://maharashtratimes by अभिजित - १
पेटीम मध्ये चीन ची ४५%
In reply to बहुतेक पंतप्रधान आपण by संदीप डांगे
यात काय चूकीचं आहे पण? आज
In reply to बहुतेक पंतप्रधान आपण by संदीप डांगे
जबरदस्ती चुकीची आहे.
In reply to यात काय चूकीचं आहे पण? आज by स्रुजा
पण जबरदस्ती कुठे आहे? कॅशलेस
In reply to जबरदस्ती चुकीची आहे. by अभिजित - १
पैसे का येत नाहीत अजून. आजच
In reply to पण जबरदस्ती कुठे आहे? कॅशलेस by स्रुजा
मला पेटीएम बद्दल काही माहिती
In reply to पैसे का येत नाहीत अजून. आजच by अभिजित - १
पटत नसले तरी तेच सत्य आहे.
In reply to मला पेटीएम बद्दल काही माहिती by स्रुजा
हडपसर मधील SBI बँकेच्या ATM
In reply to पटत नसले तरी तेच सत्य आहे. by अभिजित - १
आधी 'लेस-कॅश', नंतर 'कॅशलेस' होऊ या: PM
In reply to मला पेटीएम बद्दल काही माहिती by स्रुजा
ताई काही पटतेय का ? मी दिलेल्या बातम्या वाचताय का ?
In reply to मला पेटीएम बद्दल काही माहिती by स्रुजा
वाचतीये, देते उत्तर थोड्या
In reply to ताई काही पटतेय का ? मी दिलेल्या बातम्या वाचताय का ? by अभिजित - १
सल्ल्यात कुठे काय वाईट आहे?
In reply to यात काय चूकीचं आहे पण? आज by स्रुजा
संदीप भाऊ, हल्ली
In reply to सल्ल्यात कुठे काय वाईट आहे? by संदीप डांगे
सृजातै, आकडे असे आहेत.
In reply to संदीप भाऊ, हल्ली by स्रुजा
सगळ्यात प्रथम, मला वाटते आपण
In reply to सृजातै, आकडे असे आहेत. by संदीप डांगे
स्मार्टफोन आणि इंटरनेटची गरज नाही
In reply to सृजातै, आकडे असे आहेत. by संदीप डांगे
हो, हे एसेमेसने पेमेंट बद्दल
In reply to स्मार्टफोन आणि इंटरनेटची गरज नाही by पैसा
प्रचार प्रसार नाही
In reply to हो, हे एसेमेसने पेमेंट बद्दल by संदीप डांगे
व्यवस्थित चालत आहे
In reply to प्रचार प्रसार नाही by पैसा
*९९# चा वापर कमी असण्याचे
In reply to व्यवस्थित चालत आहे by पैसा
जे स्मार्टफोन खेरीज शक्य माही
In reply to *९९# चा वापर कमी असण्याचे by jp_pankaj
जे स्मार्टफोन खेरीज शक्य माही.शक्य नाही असे वाचावे.नै रे
In reply to जे स्मार्टफोन खेरीज शक्य माही by jp_pankaj
एम पिन पण तिथेच जनरेट होतो.
In reply to नै रे by पैसा
एम पिन पण तिथेच जनरेट होतो. मी आता बॅलन्स चेक केला तो USSD वरून. एसेमेस चे पैसे कट झाले नाहीत. तसे पाहिले तर काहीच संपूर्ण फुकट नसते. जिथे इंटरनेट उपलब्ध नाही किंवा स्मार्टफोन नाही तिथेही कॅशलेस साठी हा एक पर्याय आहे हे नक्की.हे बहुतेक मोबाईल सर्व्हीस प्रोवायडर वर अवलंबुन असाव. शिल्लक तपासणे आणी रक्कम पाठवणे या सठी वेगळा पिन लागतो. अवांतर -(कुनलातरी पयशे पाठवुन बघा, माझ्या सारख्या गरीबाला पाठवलत तर दुवा देऊ, =))}वोक्के.
In reply to एम पिन पण तिथेच जनरेट होतो. by jp_pankaj
बरेच लोक चर्चा करताना कॅशलेस
In reply to हो, हे एसेमेसने पेमेंट बद्दल by संदीप डांगे
बातमी वाचली, त्यात पेटीएम
In reply to http://maharashtratimes by अभिजित - १
त्याचे काय आहे मोदी , भाजप ,
In reply to बातमी वाचली, त्यात पेटीएम by हतोळकरांचा प्रसाद
(No subject)
http://www.loksatta.com
दिवसेंदिवस लोकसत्ताचा अभ्यास
In reply to http://www.loksatta.com by संदीप डांगे
लेखातल्या विचारांचा (अभ्यास
In reply to दिवसेंदिवस लोकसत्ताचा अभ्यास by हतोळकरांचा प्रसाद
जरूर करतो, थोडा वेळ लागेल.
In reply to लेखातल्या विचारांचा (अभ्यास by संदीप डांगे
माझे मत
In reply to लेखातल्या विचारांचा (अभ्यास by संदीप डांगे
+1 प्रतिसाद आवडला.
In reply to माझे मत by माहितगार
अगदी हेच म्हणायचे होते मला!
In reply to +1 प्रतिसाद आवडला. by jp_pankaj
प्रतिसादाची नोंद घेतली आहे,
In reply to माझे मत by माहितगार
सहमत!
In reply to माझे मत by माहितगार
http://www.loksatta.com
In reply to http://www.loksatta.com by संदीप डांगे
नोटा बदल आणि पैसे काढणे (आपल्याच खात्यातून)
ऑफिसमध्ये येऊन रोख रक्कम वितरीत
आमच्या ही ऑफीस मधे येणार आहेत
In reply to ऑफिसमध्ये येऊन रोख रक्कम वितरीत by अमर विश्वास
आज atm मधून 2000 काढले
टाटा
नक्की काय कायदेशीर कसे विचारत
In reply to टाटा by संदीप डांगे
बंद नोटे बद्दल बोलतोय, आज नवा
In reply to नक्की काय कायदेशीर कसे विचारत by हतोळकरांचा प्रसाद
बहुतेक तुमचा प्रतिसाद अर्धाच
In reply to बंद नोटे बद्दल बोलतोय, आज नवा by संदीप डांगे
काळ डोंबिवली स्टेशन (वेस्ट )
हल्लीच... ३ तास लाइन मध्ये
दोन हजारच्या नोटांची सक्ती कशासाठी?
काल कॅनरा
In reply to दोन हजारच्या नोटांची सक्ती कशासाठी? by विचित्रा
मेव्हण्याने लग्नाच्या
In reply to काल कॅनरा by नाखु
आज आयसीआयसीआय
मी पण हेच लिहायला आलेलो
In reply to आज आयसीआयसीआय by अनिरुद्ध.वैद्य