✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

व.. व... व्हिडिओचा! ऊर्फ मिपा फिल्लम इन्स्टिट्युट!

प
पिलीयन रायडर यांनी
Fri, 11/18/2016 - 00:51  ·  लेख
लेख
राम राम! तर आता आपलं मिपा युट्युब चॅनल सुरु झालेलं आहे. आणि त्यावर दंगा करायला नवा उपक्रमही येत आहे. पण सर्वात मोठा प्रश्न अनेकांना आहे की हे व्हिडिओ बनवायचे कसे?! काही नाही हो.. इयत्ता दुशली ब चा कार्यानुभवचा वर्ग आहे! आम्ही मिपा युट्युब चॅनलवर अजुन दोन व्हिडिओज आणलेत. १. सेक्स चॅट विथ पप्पु अ‍ॅण्ड पापा ह्या लेखाचं व्हिडिओ आर्टिकल २. हा व्हिडिओ विंडोज मुव्ही मेकर मध्ये कसा बनवला ह्याची झलक धागा उघडायला जड जाऊ नये म्हणुन केवळ लिंक्स देत आहोत, प्रतिसादांमध्ये व्हिडिओ टाकु! आणि हो.. अर्धे मिपाकर हापिसातुन चोरुन चोरुन मिपा बघतात हे आम्हाला माहिती असल्याने, एक क्विक समरी सुद्धा इथे देत आहोत. व्हिडिओ बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. प्रत्येकाचे काही फायदे आणि तोटेही आहेत. १. विंडोज मुव्हि मेकर WMM हे एक चकटफु आणि चांगल्या दर्जाचं सॉफ्टवेअर आहे. कोणत्याही व्हिडिओ एडीटर मध्ये आधी विषयाशी अनुरुप फोटो टाकावे लागतात, मग त्याच्या मागे ऑडिओ फाईल टाकावी लागते. अगदी बेसिक व्हिडिओ बनवायला हे पुरेसं आहे. पण तुम्हाला हवं असेल तर फोटोंचा सिक्वेन्स बदलणे, टाईमिंग देणे, अ‍ॅनिमेशन्स देणे, ऑडिओ फाईल स्प्लिट करणे, तिला फेड इन - फेड आउट देणे इ. कामे करता येतात. फोटोंच्या खाली टेक्स्ट टाकुन त्यालाही खाली-वर-गोल-गोल वगैरे फिरवता येतं. पिक्चर सुरु होताना जशी नावं येतात तसंच करायचं असेल तर ते टेम्प्लेटही उपलब्ध आहेत. फायदे - १. वापरायला अत्यंत सोपे आणि सुटसुटीत. युझर इंटरफेस उत्तम २. ऑफलाईन काम करु शकता. फोटो आणि ऑडिओ असला तर इंटरनेट वगैरेची गरज नाही. तोटे- १. सॉफ्टवेअर डालो करावे लागते आणि मग फक्त त्याच लॅपटॉप / कॉम्पुटरवर काम करावे लागते. २. फार काही हाय-फाय ऑप्शन्स नाहीत. स्क्रिन कॅप्चर फिचर किंवा स्वतःची ऑडिओ लायब्ररी वगैरे उपलब्ध नाही. २. युट्युब व्हिडिओ एडिटर YouTube युट्युब मध्ये डॅशबोर्डमध्ये गेलात, की क्रिएट मध्ये व्हिडिओ हा पर्याय निवडा. इथे तुम्हाला व्हिडीओ बनवता येतो. सगळी पद्धत वर सांगितली तशीच आहे. फोटो घ्या आणि त्यामागे तुमची ऑडिओ फाईल लावा. इथेही अ‍ॅनिमेशनचे पर्याय आहेतच. फायदे १. इंटरनेट हाताशी असेल तर काहीही डाऊनलोड न करता जगात कुठुनही काम करता येते. आणि ते तुमच्या अकाऊंट्ला सेव्ह होत रहाते. २. तुमच्या गुगल ड्राईव्ह मधले फोटो इथे आपोआप लिंक होत असल्याने, अल्बममधुन हवे ते फोटो सरळ व्हिडिओ मध्ये ड्रॅग करता येतात. तोटे १. इंटरनेट आवश्यक आहे. ते नसेल तर एडिट कराण्याचे पर्याय कदाचित वापरता येतील पण काम सेव्ह करता येणार नाही. २. ऑडिओ एडीट (ट्र्म, स्प्लिट, फेड इन-आउट) करण्याचे पर्याय मला तरी अजुन सापडले नाहीत. ह्या व्यतिरिक्त अजुनही खुप पर्याय आहेत, थोड्या जास्त करामती करायच्या असतील तर इतर सोफ्टवेअरचा आधार घ्यावा लगतो.. आम्ही ते प्रतिसादांमधुन टाकत राहुच. आपल्या "गोष्ट तशी छोटी..!" उपक्रमात ह्याचा कसा उपयोग करुन घेता येईल? १. कोणताही लेख ज्यात खुप सार्‍या चित्रांचा समावेश आहे, तो लेख हिडिओ आर्टिकल मध्ये जास्त भारी वाटेल. जसं की एखाद्या पिक्चरची ओळख करुन देताना, त्या पिक्चर मधले सीन कट करुन मध्ये टाकले आणि त्यावर टिपण्णी केली तर वाचकांना नक्की काय घडले हे इमॅजिन करत बसावे लागत नाही. सेट, मेकप, लोकेशन इ. "दाखवायच्या" गोष्टी व्हिडिओ आर्टिकल मध्ये मस्त उलगडतील. २. समजा तुम्हाला "रोसेश साराभाई - एक अनवट कवी" ह्यावर बोलायचं असेल, तर रोसेशचा आवाज, शब्दफेक, "मॉमा" अशी आर्त हाक ह्या शब्दातीत गोष्टींना तुम्ही लेखात कसं बरं बसवणार?! अशा वेळेला साराभाईमधला रोसेशचा व्हिडिओ क्रॉप करुन तो वापरला तर विचार करा प्रेक्षकांच्या मनावर किती ठसतील त्या कविता! अशी अनेक "रसग्रहणं" अशा पद्धतीने व्हिडिओ क्रॉप करुन होऊ शकतात. ३. ज्या मुलाखती आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातुन इथे प्रकाशित करतो, त्याच व्हिडिओ शुट करुनही इथे टाकता येतील. किंवा निर्मिती संस्थाची माहिती तिथले काम दाखवुन देता येईल. मेकप आर्टिस्टची मुलाखत असेल तर ती "आर्टिस्ट अ‍ॅट वर्क" असेल तरच खुलुन दिसेल. त्याचेही शुटींग अथवा फोटो टाकता येतील. ४. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी कठपुतलीचा खेळ बघत असाल आणि पटकन मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन ठेवत असाल, तर लगे हाथो दोन शब्द त्या कलाकारांशीही बोला. असं मनोगत आणि त्यांच्या कार्यक्रमाचं शुट एकत्र करुन छोटीशी डॉक्युमेंटरी सुद्धा होऊ शकते. ही झाली काही उदाहरणं! तुमच्या डोक्यातुन अजुन सुपीक कल्पना येतीलच. फक्त काहीही करताना आपण कॉपीराईटचा भंग होऊ देत नाही आहोत ना, हे जरूर तपासा! समांतरः- गोष्ट तशी छोटी - म्हणजे काय रे भाऊ? नवीन उपक्रम : गोष्ट तशी छोटी..! - आवाहन
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
29569 वाचन

💬 प्रतिसाद (102)

प्रतिक्रिया

१. हो, फीडबॅक म्हणुनच घेतला!

पिलीयन रायडर
Tue, 11/22/2016 - 20:24 नवीन
१. हो, फीडबॅक म्हणुनच घेतला! :) २. हो. पण जर रेस्ट्रिकटेड मोड असेल तर तुम्हाला अ‍ॅडल्ट कंटेंट दिसणार नाही. ३. धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कंजुस काका, आम्ही एक प्रिकॉशन

स्रुजा
Tue, 11/22/2016 - 20:59 नवीन
कंजुस काका, आम्ही एक प्रिकॉशन म्हणुन व्हिडीओ चं नाव बदललंय. आता बघता का जरा , युट्युब चे सजेशन्स बदलले आहेत का? https://www.youtube.com/watch?v=wGBOwaA_XxU
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

धन्यवाद! नक्कीच फरक होईल याने

कंजूस
Tue, 11/22/2016 - 23:03 नवीन
धन्यवाद! नक्कीच फरक होईल याने. मुलं जेव्हा कार्टून्स पाहतात तेव्हा इतर त्याप्रकारचेच व्हिडिओज झळकत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

जेव्हा अकाऊंटमधून ळोग-इन करुन

रुपी
Wed, 11/23/2016 - 01:31 नवीन
जेव्हा अकाऊंटमधून ळोग-इन करुन किंवा मोबाईल, लॅपटॉपवरुनही व्हिडिओ बघता, तेव्हा आधीच्या ब्राउजिंग हिस्टरीवरुन तुम्हाला रिलेटेड व्हिडिओज दिसतात. पूर्ण हिस्टरी, कूकीज सगळं डिलिट केलं तर वेगळा अनुभव आहे. एवढंही करायचं नसेल तर फक्त 'न्यु प्रायव्हेट विंडो' उघडून त्यात ह्या व्हिडिओची लिंक टाकली तर काकांसारखाच अनुभव आला. आता तुम्ही नाव बदललंय तर कदाचित हळूहळू रिलेटेड व्हिडिओज बदलतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ओके, एकदा नवीन व्हिडीओ पण

स्रुजा
Wed, 11/23/2016 - 02:03 नवीन
ओके, एकदा नवीन व्हिडीओ पण बघशील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

पाहिला ना.. सध्या तरी कंजूस

रुपी
Wed, 11/23/2016 - 02:16 नवीन
पाहिला ना.. सध्या तरी कंजूस काकांसारखाच अनुभव आहे.. म्हणून तर शेवटच्या वाक्यात लिहिलंय हळूहळू बदलतील..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

ओके, थांब आम्ही अजुन एक बदल

स्रुजा
Wed, 11/23/2016 - 02:26 नवीन
ओके, थांब आम्ही अजुन एक बदल करतोय. तो झाला की परत सांगु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

अहो पिरातै, मी विंडोज

खटपट्या
Tue, 11/22/2016 - 12:27 नवीन
अहो पिरातै, मी विंडोज मुव्हीमेकर डाउनलोड केला की सिमेंटटेक अँटीवायरस त्याला डीलीत करते,
  • Log in or register to post comments

ऑईंग!!! मला तर असा काहीच

पिलीयन रायडर
Tue, 11/22/2016 - 19:50 नवीन
ऑईंग!!! मला तर असा काहीच त्रास झाला नाही. मी इथुन डालो केलंय - https://support.microsoft.com/en-us/help/14220/windows-movie-maker-download माझ्या कडे विन्डोज १० आहे, पण तरीही इथुन डालो केलेलं मुव्हि मेकर चालतंय माझ्याकडे. माझ्याकडे मॅकफी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

त्याला सेफ म्हणुन टाका

स्रुजा
Tue, 11/22/2016 - 21:01 नवीन
त्याला सेफ म्हणुन टाका तुमच्या अ‍ॅव्हा च्या यादीत. असं व्हायला नाही पाहिजे खरं तर कारण तो नेटिव्ह प्लेअर आहे विंडोज चा. विन १० वापरत असाल तर एकदा अपडेट पण डालो करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

बघतांव आणि सांगतांव.

सूड
Tue, 11/22/2016 - 20:09 नवीन
बघतांव आणि सांगतांव.
  • Log in or register to post comments

बढिया

वरुण मोहिते
Tue, 11/22/2016 - 20:31 नवीन
चांगला उपक्रम . सबस्क्राईब करा हो सगळ्यांनी. अनेक चांगल्या गोष्टी या निमित्ताने पाहायला ऐकायला मिळतील .
  • Log in or register to post comments

मस्तं कल्पना ! आता

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/22/2016 - 20:38 नवीन
मस्तं कल्पना ! आता मिपाकरांच्या एकाहून एक सरस कलाकृती पहायला मिळणार !
  • Log in or register to post comments

व्हिडिओ लेख निवेदनासह कसा

कंजूस
Tue, 11/22/2016 - 22:58 नवीन
व्हिडिओ लेख निवेदनासह कसा बनवावा आता मिपा युट्युब पेज सुरू केलं आहे त्यावर आपले व्हिडिओ देण्याची सोय झालेली आहे. इतके वर्ष आपण लेख देत होतो आणि त्यासोबत फोटो. मिसळपाव साइटच्या सर्वरवर फोटो साठवायची सोय नसली तरी गुगल,याहू,फेसबुक इत्यादी मोठ्या इंटरनेट सेवा देणाय्रा कंपन्यांच्याकडून दिल्या जाणाय्रा काही हजार मेगाबाइट्स मोफत साठवणीचा उपयोग करून फोटो देत होतो. व्हिडिओ लेख , प्रात्यक्षिकं देण्याचा विचार आतापर्यत केला नसला तरी आता करणं शक्य झालं कारण मोबाइलमधले कॅम्रे अधिकाधिक उत्तम व्हिडिओ चित्रण करू लागले,तसेच डेटा सेवेचे दर कमी होऊ लागले. कंम्प्युटरच्या संकुचित बोजड माध्यमातून बाहेर पडून कुठेही नेता येणाय्रा बहुगुणी मोबाइलचा उपयोग वाढला. चांगला व्हिडिओ कसा असावा हे आपण लगेच सांगू शकतो. लहान असावा, चित्राबरोबर उचित माहिती सावकाश सांगितली जावी ,आवाज स्पष्ट असावा इत्यादी. परंतू हे सर्व साध्य कसे करायचे? काय काय अडचणी येतात त्यासाठी काय करता येईल ते थोडक्यात पाहूया. १) व्हिडिओ शूटिंग व्हिडिओ शूटिंग करताना तीस चाळीस सेकंदांचे केले तर ते नंतर अपलोड करण्यास सोपे जातात. छोटेछोटे भागही नंतर हवे ते जोडता येतात. व्हिडिओ रेझलुशनकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आताचे मोबाइल कॅम्रे व्हिजिए ( 640x480 ), HD ( 1280X960 ; 1280X720 ) ,FULL HD ( 2560X1920; 1920X1080 ) इत्यादी रेझलुशनचे व्हिडिओ शूटिंग करू शकतात. तसेच 24/30/60/120 frames per second अशा वेगातही करतात. हे दोन्ही जेवढे जास्त तेवढा व्हिडिओ पाहाण्यास चांगला वाटतो. परंतू फाइल साइज वाढत जाते. शूटिंगचे रेझलुशन आणि वेळ यावर नियंत्रण ठेवून कमीतकमी फाइल साइजमध्ये चांगला व्हिडिओ मिळवायला हवा. साठवलेली फाइल AVI अथवा MPEG फॅार्मॅटमध्ये असते. फाइल इक्सटेन्शन .avi / .mp4/ .m4a असेल. जर का आपण शूटिंग करतानाच आहे तोच आवाज हवा असेल तर प्रश्न नाही परंतू काही वेगळी कॅामेंटरी नंतर जोडायची असेल तर ओप्शनमधले सेटिंग बदलून साउंड 'म्यूट' ठेवा. २) व्हिडिओ कम्प्रेसर अॅप अशी अॅप्स वापरून केलेल्या व्हिडिओचे रेझलुशन कमी करता येते. फाइल साइजचे MB कमी करता येतात. अॅपने बदललेली फाइल त्या अॅपमध्ये नसून मेमरी कार्डवर आली पाहिजे. ३) साउंड रेकॅार्डिंग अॅप्स केलेला व्हिडिओ चालवून कोणती दृष्ये आल्यावर काय सांगायला पाहिजे ते कितव्या सेकंदादरम्यान याची प्रथम नोंद करा. किती लांबीचे शूटिंग हे पाहून ठेवा. आता एक टाचण लिहून ते एक दोनदा अशा गतीने बोला की नोंद केलेल्या वेळेस ठराविक माहिती बोलली जाईल. एखाद्या बंद खोलीत हे सर्व एका साउंड रेकॅार्डींग अॅप'ने रेकॅार्डींग करा. ही फाइल WAVE अथवा MPEG formatमध्ये असेल आणि फाइल इक्स्टेन्शन .wav / .wave / mp3 असेल. लांब व्हिडिओइतकीच हवी. फाइल स्टोरिजला हवी. ४) आवाज देणारे अॅप्स/ मिक्सर/एडिटर अॅप हे एक मिक्सर अॅप असते. प्रथम व्हिडिओ फाइल निवडा ,नंतर ओडिओ फाइल ,नंतर मिक्स करण्यावर क्लिक केल्यावर दोन्ही मिक्स होईल॥ म्हणजे नक्की काय होते? ही अॅप्स फार ग्रेट नसतात त्यामुळे व्हिडिओ शूटिंगच्यावेळचा आवाज जाणार नाही पण तुमचे निवेदनमात्र जोडले जाते. ही एक वेगळीच फाइल मेमरीमध्ये साठवली जाते आणि मूळ दोन्ही फाइल्सना काही फरक केला जात नाही. आवाज/ निवेदन बदलावे वाटले तर पुन्हा नवीन आवाज जोडता येईल. पाककृतीवगैरेच्या शूटिंगदरम्यान येणारे आवाज असणे फार उपयुक्तच ठरतील. ५) आता हा तयार झालेला निवेदनासहचा व्हिडिओ मिपाच्या लिंकला पाठवा.संपिदकमंडळ मिपाच्या युट्युब पेजला अपलोड करतील. अथवा तुमच्या लेखात द्यायचा असल्यास तुमच्या पेजला अपलोड करून शेअर लिंक मिळवा. त्या लिंकचा वापर करून व्हिडिओ प्लेअर देता येईल. इम्बेड कोड कॅापी करून लेखात दिल्यासही काम होते. यासाठी युट्युब अपलोडर अॅप्सही पटकन काम करतात आणि शेअरिंग लिंक देतात. ( मी वापरलेली चारही अॅप्स दोनचार एमबीची विंडोजवरची होती ) करून पाहा.
  • Log in or register to post comments

मस्त माहिती देत आहात काका!!

पिलीयन रायडर
Tue, 11/22/2016 - 23:16 नवीन
मस्त माहिती देत आहात काका!! मी पण माझी एक पुरवणी जोडते. १. व्हिडिओ शुटींग ह्यात दुसरा पर्याय म्हणजे फोटो वापरणे. किंवा फोटो + व्हिडिओ वापरणे. ह्यानेही फाईल साईज कमी होते. २. व्हिडिओ कॉम्प्रेसिंग हे अजुन आम्हीसुद्धा वापरुन पाहिलेले नाही. वापरुन कळवतो. :) ३. रेकॉर्डींग स्रुजा ह्यावर विस्तृत लिहु शकेल. आम्ही आत्तापर्यंत लॅपटॉप किंवा मोबाईल रेकॉर्डर वापरला आहे. बर्‍यापैकी काम होते.आम्ही आधी मसुदा लिहितो, मग तो रेकॉर्ड करतो आणि मग त्या हिशोबाने, त्या त्या शब्दाला आवश्यक फोटो जोडतो. मुव्हि मेकरचा जो ट्युटोरिल व्हिडिओ आहे, तो स्क्रिन कॅप्चर करुन केलाय. (स्क्रिन कॅप्चरला वेगळे अ‍ॅप वापरले). आणि ते करतानाच ऑडिओ मोबाईलवर रेकॉर्ड केला. मुव्हि मेकरमध्ये ऑडिओ / व्हिडिओ हवे तसे ट्रिम करता येतात. आणि व्हिडिओचा व्हॉल्युमही हवा तो ठेवता येतो. ४. मिक्सिंग - अलाईनमेंट हेच काम मुव्हि मेकर करते. व्हिडिओला ऑडिओ जोडणे. आणि फोटो असतील तर त्यांना अ‍ॅनिमेशन देणे. टेक्स्ट टाकणे. इ. ५. व्हिडिओ किंवा मिव्हि मेकर प्रोजेक्ट फाईल - misalpav.channel@gmail.com ला पाठवा. अधिक मदतीसाठी मला/स्रुजाला व्यनि करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ओडिओ रेकॅार्डींगसाठी फोनमधला

कंजूस
Wed, 11/23/2016 - 00:28 नवीन
ओडिओ रेकॅार्डींगसाठी फोनमधला रेकॅार्डर वापरलात तर त्याच्या सेटिंगमध्ये दोन पर्याय दिसतील.साउंड क्वॅालटि १)लो/स्पीच , २)हाइ/म्युझिक. तर पर्याय क्रमां पहिला वापरू नका. त्याने AMR या फॅार्मॅटमध्ये रेकॅार्डिंग होईल ते आपल्या मिक्सिंगला उपयोगाचे नाही. दुसय्रा पर्यायाध्ये MPEG पद्धतीत .mp3 /.mp4 / .m4a फाइल मिळतील त्याच उपयोगाच्या आहेत. अॅप्स(size , डिवेलपर )विंडोज 8.1--- १)थेट mp3/ mp4/m4a फाइल करणारे साउंड रेकॅार्डर बरेच अॅपटस आहेत कोणतेही वापरा. २)"Add Audio to Video ( 2 MB ,Cidade ), ३ )Video compressor ( 1 MB ,Eduardo ,Semprebon ), ४ ) Upload to Youtube ( 5 MB , BC3 Technologies )
  • Log in or register to post comments

झकास

निनाद
Wed, 11/23/2016 - 10:00 नवीन
झकास कल्पना आहे! आता मिपाकरांच्या एकाहून एक सरस कलाकृती पहायला मिळणार असे वाटते. यात कुणी अ‍ॅनिमेशन्स पण करा... हे आमच्या कन्येचे अगदी लहान असताना बनवलेले अ‍ॅनिमेशन. ही कल्पना डिजिटल कॅमेर्‍यावर फोटो वेगाने पाहताना सुचली. मी त्याला खत पाणी घालून ते पुर्ण करून घेतले होते.
  • Log in or register to post comments

त्या नंतर

निनाद
Wed, 11/23/2016 - 10:04 नवीन
त्या नंतर ती (आणि मी ही) थोडे मोठे झाल्यावर हे अ‍ॅनिमेशन बनवले. यासाठी शाळेत झालेले बोलणे कारणीभूत ठरले. प्र्यावरणाविषयी जागृती करायची या विचाराने तेव्हा झपाटलेले दिवस होते ते :)
  • Log in or register to post comments

वा. हे कसे केलेत तेही सांगा.

खटपट्या
Wed, 11/23/2016 - 11:51 नवीन
वा. हे कसे केलेत तेही सांगा. मला भींती रंगवण्याचा छंद आहे. म्हणजे भींतींवर चित्रे चीतारण्याचा छंद. मला सुरवातीपासून शेवटपर्यंत असा व्हीडीओ बनवायचा आहे. टाइमलॅप्स मुव्ही की असेच काहीतरी म्हणतात या प्रकाराला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

फोटो

निनाद
Wed, 11/23/2016 - 17:07 नवीन
क्यामेरा एका ठिकाणी पक्का केला आणि प्रत्येक हालचालींचे फोटो काढत गेलो. अनेक फोटो काढून त्यांना मुव्हीमेकर ने एकत्र केले. जितके जास्त फोटो काढाल तेव्हढे ऍनिमेशन सुंदर होते. भिंत रंगवताना एक, आणि दर दहा ब्रश झाल्यावर एक असे फोटो काढत राहिलात तर आपोआप असा विडिओ तयार होईल. फक्त क्यामेरा एकाच ठिकाणी पक्का करणे आवश्यक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

हल्ली

निनाद
गुरुवार, 11/24/2016 - 01:55 नवीन
टाइम लॅप्स चे अप्प मिळतात त्याने ही शक्य आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

फोटो

निनाद
गुरुवार, 11/24/2016 - 01:48 नवीन
क्यामेरा एका ठिकाणी पक्का केला आणि प्रत्येक हालचालींचे फोटो काढत गेलो. अनेक फोटो काढून त्यांना मुव्हीमेकर ने एकत्र केले. जितके जास्त फोटो काढाल तेव्हढे ऍनिमेशन सुंदर होते. भिंत रंगवताना एक, आणि दर दहा ब्रश झाल्यावर एक असे फोटो काढत राहिलात तर आपोआप असा विडिओ तयार होईल. फक्त क्यामेरा एकाच ठिकाणी पक्का करणे आवश्यक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

भींत रंगवताना दर दहा

खटपट्या
Fri, 11/25/2016 - 11:13 नवीन
भींत रंगवताना दर दहा सेंकदांनी फोटो आपोआप निघेल अशी काही सेटींग आहे का बघतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

अप्रतिम!!!!!

पिलीयन रायडर
Wed, 11/23/2016 - 21:24 नवीन
अप्रतिम!!!!! बस्स ह्याच स्पिरिटची गरज आहे! आपण सामान्य माणसं आहोत. फार काही हाय फाय नाही जमणाअर कदाचित. पण साध्या सोप्प्या गोष्टीतुनसुद्धा किती सुंदर काही बनु शकतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

व्हिडियो मध्ये शेवटी श्रेय

निनाद
Wed, 11/23/2016 - 10:07 नवीन
व्हिडियो मध्ये शेवटी श्रेय नामावली आणि प्रसिद्धी दिनांक जरूर टाका.
  • Log in or register to post comments

निनाद, फाइल साइज टाका.

कंजूस
Wed, 11/23/2016 - 11:03 नवीन
निनाद, फाइल साइज टाका.
  • Log in or register to post comments

समजले नाही

निनाद
गुरुवार, 11/24/2016 - 01:53 नवीन
हे आधीच आहे अपलोड केलेले. मूळ प्रत कुठे आहे हा प्रश्नच आहे. कदाचित काढूनही टाकली असेल :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

या आताच्या व्हिडिओची म्हणतोय.

कंजूस
गुरुवार, 11/24/2016 - 05:56 नवीन
या आताच्या व्हिडिओची म्हणतोय.
  • Log in or register to post comments

कशी शोधू?

निनाद
गुरुवार, 11/24/2016 - 06:35 नवीन
साइझ कशी शोधू? कुठे कळेल? मी फोटो घेताना अगदी कमी रिझोल्युशन ठेवले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

निनादचे व्हिडिओ लिंक्स

कंजूस
Fri, 11/25/2016 - 11:10 नवीन
निनादचे व्हिडिओ लिंक्स १) Gargi' Fish ,file size 600 Kb आमच्या कन्येचे अगदी लहान असताना बनवलेले अ‍ॅनिमेशन. २ ) प्र्यावरणाविषयी जागृती .Gragi's tree. File size 2.77 MB
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

२ ) प्र्यावरणाविषयी जागृती

कंजूस
Fri, 11/25/2016 - 11:12 नवीन
२ ) प्र्यावरणाविषयी जागृती .Gragi's tree. File size 2.77 MB
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कोंडेश्वर धबधब्याचा व्हिडिओ

कंजूस
गुरुवार, 11/24/2016 - 09:10 नवीन
कोंडेश्वर धबधब्याचा व्हिडिओ माझ्या फेसबुक वर अपलोड करून त्याची लिंक ही.. फाइल साइज 1.5 MB. ब्राउजरमध्ये याचा डाउनलोड पर्याय असतो . UC BROWSER मध्ये आहेच. व्हिडिओ फाइल मेमरी कार्ड/ स्टोरिजमध्ये साठवली जाते. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहता येतील. युट्युबच्या जाहिरातींपासून सुटका होईल. या फेसबुक लिंकचाच प्लेअर बनवता आला नाही अजून. ( युट्युबवरचे व्हिडिओ डाउनलोड करण्याचे बरेच अॅप्स असले तरी ती डाउनलोड केलेली फाइल फोनच्या मेमरीमध्येच अथवा अॅपमध्ये राहाते. मेमरी कार्डावर घेता येत नाही ही मोठी अडचण आहे. फोन मेमरी कमी पडेल इतर कामासाठी )
  • Log in or register to post comments

१) सेक्स चॅट विथ पप्पु अ‍ॅण्ड

कंजूस
गुरुवार, 11/24/2016 - 14:04 नवीन
१) सेक्स चॅट विथ पप्पु अ‍ॅण्ड पापा ह्या लेखाचं व्हिडिओ आर्टिकलची लिंक = youtube dot com watch? v=wGBOwaA_XxU ही अॅड्रेसबारमध्ये टाकली की This Video is Private हा मेसिज येतो आणि सगळे जडबंबाळ व्हिडिओज हजर होत आहेत. २)//आम्ही एक प्रिकॉशन म्हणुन व्हिडीओ चं नाव बदललंय. आता बघता का जरा , युट्युब चे सजेशन्स बदलले आहेत का?// --तुम्ही हे पप्पूच्या व्हिडिओला कॅज्मेटिक बदल केले तरी लिंक सेमच ठेवली आहे!!! हे सर्व प्रकरणच डिलीट केले नाहीतर तुमचा आइएसपी अॅड्रेसही गुगल लक्षात ठेवेल हे नक्की.
  • Log in or register to post comments

नवा व्हिडिओच अपलोड केला आहे,

पिलीयन रायडर
Fri, 11/25/2016 - 05:27 नवीन
नवा व्हिडिओच अपलोड केला आहे, म्हणुन जुनी लिंक दिसत नाही. वर दुसर्‍याच प्रतिसादात मी नवा व्हिडीओ लावला आहे. नको ते प्रश्न?? पप्पु & पापा - व्हिडिओ अर्टिकल - ह्या नव्या नावाने आता व्हिडिओ दिसेल. आम्ही केलेल्या टेस्ट नुसार आता कसंही पाहिलं तरी लहान मुलांचेच व्हिडिओ दिसत आहेत. तुम्ही पण चेक करा आणि सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हा

निनाद
Fri, 11/25/2016 - 07:01 नवीन
नको ते प्रश्न?? पप्पु & पापा - व्हिडिओ अर्टिकल हा व्हिडियो प्रताधिकार मुक्त आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मिसळपाव चा कॉपीराईट आहे.

स्रुजा
Fri, 11/25/2016 - 07:25 नवीन
मिसळपाव चा कॉपीराईट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

आता जे लिंक असलेलं हेडिंग

कंजूस
Fri, 11/25/2016 - 07:22 नवीन
आता जे लिंक असलेलं हेडिंग दिलय "नको ते प्रश्न?? पप्पु & पापा - व्हिडिओ अर्टिकल" याबरोबरच फाइल साइज 4.4MB असं दिलं तर बरं होईल कारण व्हिडिओ पाहणारच आहोत तर ही लिंक "युट्युब व्हिडिओ डाउनलोड अॅप"मध्ये टाकून व्हिडिओ अगोदर सेव करून घेतला. तो ओफलाइन पाहता येतोय.लिंकही बदललेली दिसली. शेवटी सेक्स चॅट-- ची फाइल जोडली आहे का? ती "डॅमेजड" असं दिसलं.प्लेअरबरोबर लिंक आणि फाइल साइज द्या.आता नवीन व्हिडिओखाली तसले व्हिडिओ दिसले नाहीत.ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पर्फेक्ट, धन्यवाद काका.

स्रुजा
Fri, 11/25/2016 - 07:27 नवीन
पर्फेक्ट, धन्यवाद काका. पण फाईलचं नाही कळलं. स्क्रीन शॉट टाकता का/?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

फक्त कॉस्मेटिक बदल केलेले

स्रुजा
Fri, 11/25/2016 - 06:27 नवीन
फक्त कॉस्मेटिक बदल केलेले नाहीयेत. हिस्टरी पण बिल्ड अप व्हायची गरज नाहीये. एज लॉक इथे उपयोगाचं नाही, त्याचं काम नेमकं उलटं आहे. आधीच्या व्हिडीओ चे आणि ऑडिओ फाईल्स चे नाव एक च होते. आम्ही ते दोन्ही बदलुन आता नवाच व्हिडीओ टाकलाय. आता लॉगिन न करता आणि इतर सजेशन्स न येता हा व्हिडीओ ३ वेगवेगळ्या लॅपटॉप वर पाहिला. कॅश क्लीअर करुन पण पाहिलंय .. सजेशन्स हे आपण नंतर काय बघतो त्यावर बिल्ड अप होत जातात. ती प्रोसेस या नंतर होईल. आत्ता तरी खुप च रँडम व्हिडीओ दिसतायेत. तरी कुणाला काही दिसलं तर सांगा, पण आता होणार नाही तसं.
  • Log in or register to post comments

//आत्ता तरी खुप च रँडम

कंजूस
Fri, 11/25/2016 - 07:27 नवीन
//आत्ता तरी खुप च रँडम व्हिडीओ दिसतायेत.// - होय. सूचक शब्द बदलल्याचा परिणाम असेल.ओके.लिंक आणि फाइल साइज दिल्यास "युट्युब डाउनलोडर" अॅप वापरून ओफलाइन सेव करता येईल.फाइल साइज पाहून मोबाइल नेटवर पाहायचं का नाही ठरवायला सोपे होईल.
  • Log in or register to post comments

एक संकलक (एडिटर)

म्हया बिलंदर
Fri, 11/25/2016 - 18:01 नवीन
चित्रकाराला जवळ ब्रश, पेन्सिल, कॅनवास, साधा कागद देखिल भेटु नये, किंवा एखाद्या कविला अकाउंट्स च्या फर्म मधे नोकरी मिळावी असं काहिसं झालय. मी काही स्वत:ला मोठा एडिटर म्हणत नाही पण एडिटींग चे पिनॅकल पासुन एफ्.सी.पी. पर्यंत सगळे सॉफ्ट्वेअर्स हाताळलेत. स्टुडिओ ते चॅनल, आय मॅक ते मॅक प्रो वर काही वर्षे एडिटींग चा अनुभव, थोडं ब्रश अप करावं लागेल. आणी आता........... असो. काही सुचवु शकलो तर नक्कि सुचवेन. ता.क. - मी पुण्यात राहतो. जवळ डेस्कटॉप/लॅपटॉप नसल्याने काही करता येत नाही. कोणासही मदत लागल्यास सेवा घरपोच नि:शुल्क मिळेल(माझ्या सवडीनुसार(आवड आहे हो प्रचंड, सवडच भेटत नाही)).
  • Log in or register to post comments

अरे वा!! पुण्यातल्या

पिलीयन रायडर
Sun, 11/27/2016 - 05:27 नवीन
अरे वा!! पुण्यातल्या मिपाकरांनो लक्ष द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हया बिलंदर

धन्यवाद. तुमची मदत नक्की

खटपट्या
Wed, 12/07/2016 - 23:22 नवीन
धन्यवाद. तुमची मदत नक्की घेतली जाइल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हया बिलंदर

"संगणक,ल्यापटॅाप नसल्याने ---

कंजूस
Fri, 11/25/2016 - 18:13 नवीन
"संगणक,ल्यापटॅाप नसल्याने ----" - - मोबाइलात त्याहून अधिक करता येतं. कॅम्र्यासह नेताही येतो पण... या फाइल्स जोडून ओडिओ टाकून दहा मिनिटांच्या केल्या की ६०एमबीपेक्षा जास्ती होतात ते अपलोड/डाउनलोड परवडणारं नाही॥
  • Log in or register to post comments

मोबाइलात

म्हया बिलंदर
Fri, 11/25/2016 - 19:10 नवीन
मोबाइलात त्याहून अधिक करता येत असेल तर "आमचा अनुभव तोकडा" असं आम्ही म्हणू,६० एमबी पेक्षा पण कमी करता येउ शकतात, आता नेमका कम्प्रेसर सांगता नाही येणार पण ते नक्कीच शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

आहे ना कम्प्रेसर पण 720p

कंजूस
Fri, 11/25/2016 - 21:48 नवीन
आहे ना कम्प्रेसर पण 720p video ला 240x320 करावं लागतं/होतं.फोटोंचं रेझलुशनस कमी आणणे हेसुद्धा आलंच. काहीच कम्प्रेस न करता केलेली फाइल ब्लुटुथने समोर देऊ शकतो. आपले टिव्ही चानेलचे sd चानेल कार्यक्रम अर्धा तासांचे रेकॅार्ड केले तर 400 mb असतात. जरा बरे क्वॅालटी 900 mb . HDचा विचारच नाही केलाय
  • Log in or register to post comments

पापिलर डिमांडवरुन डेडलाईन १५

स्रुजा
Wed, 12/07/2016 - 23:09 नवीन
पापिलर डिमांडवरुन डेडलाईन १५ पर्यंत पुढे नेत आहोत. लेखकांनी नोंद घ्यावी ( पिराच्या) हुकुमावरुन (गरीब बिचारी) स्रुजा ;)
  • Log in or register to post comments

कालच्या माथेरान ट्रेकचा एक

कंजूस
Fri, 12/09/2016 - 08:39 नवीन
कालच्या माथेरान ट्रेकचा एक व्हिडिओ बनवलाय ओडिओ कॅमेंटरी जोडून. मूळ व्हिडिओ १२०एमबी होता त्याला १० एमबीपर्यंत कमी केल्याने पिक्चर क्वॅालटी कमी झाली आहे . युट्युबवर टाकून तुम्च्याकडे लिंक पाठवायची का?दीड मिनिटाचा आहे.
  • Log in or register to post comments

misalpav.channel@gmail.com

पिलीयन रायडर
Fri, 12/09/2016 - 22:56 नवीन
misalpav.channel@gmail.com इथे व्हिडिओ पाठवाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

@त्याला १० एमबीपर्यंत कमी

अत्रुप्त आत्मा
Sat, 12/10/2016 - 06:16 नवीन
@त्याला १० एमबीपर्यंत कमी केल्याने ››› कसं कमी करतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा