Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पिलीयन रायडर on Fri, 11/18/2016 - 00:51
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
राम राम! तर आता आपलं मिपा युट्युब चॅनल सुरु झालेलं आहे. आणि त्यावर दंगा करायला नवा उपक्रमही येत आहे. पण सर्वात मोठा प्रश्न अनेकांना आहे की हे व्हिडिओ बनवायचे कसे?! काही नाही हो.. इयत्ता दुशली ब चा कार्यानुभवचा वर्ग आहे! आम्ही मिपा युट्युब चॅनलवर अजुन दोन व्हिडिओज आणलेत. १. सेक्स चॅट विथ पप्पु अ‍ॅण्ड पापा ह्या लेखाचं व्हिडिओ आर्टिकल २. हा व्हिडिओ विंडोज मुव्ही मेकर मध्ये कसा बनवला ह्याची झलक धागा उघडायला जड जाऊ नये म्हणुन केवळ लिंक्स देत आहोत, प्रतिसादांमध्ये व्हिडिओ टाकु! आणि हो.. अर्धे मिपाकर हापिसातुन चोरुन चोरुन मिपा बघतात हे आम्हाला माहिती असल्याने, एक क्विक समरी सुद्धा इथे देत आहोत. व्हिडिओ बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. प्रत्येकाचे काही फायदे आणि तोटेही आहेत. १. विंडोज मुव्हि मेकर WMM हे एक चकटफु आणि चांगल्या दर्जाचं सॉफ्टवेअर आहे. कोणत्याही व्हिडिओ एडीटर मध्ये आधी विषयाशी अनुरुप फोटो टाकावे लागतात, मग त्याच्या मागे ऑडिओ फाईल टाकावी लागते. अगदी बेसिक व्हिडिओ बनवायला हे पुरेसं आहे. पण तुम्हाला हवं असेल तर फोटोंचा सिक्वेन्स बदलणे, टाईमिंग देणे, अ‍ॅनिमेशन्स देणे, ऑडिओ फाईल स्प्लिट करणे, तिला फेड इन - फेड आउट देणे इ. कामे करता येतात. फोटोंच्या खाली टेक्स्ट टाकुन त्यालाही खाली-वर-गोल-गोल वगैरे फिरवता येतं. पिक्चर सुरु होताना जशी नावं येतात तसंच करायचं असेल तर ते टेम्प्लेटही उपलब्ध आहेत. फायदे - १. वापरायला अत्यंत सोपे आणि सुटसुटीत. युझर इंटरफेस उत्तम २. ऑफलाईन काम करु शकता. फोटो आणि ऑडिओ असला तर इंटरनेट वगैरेची गरज नाही. तोटे- १. सॉफ्टवेअर डालो करावे लागते आणि मग फक्त त्याच लॅपटॉप / कॉम्पुटरवर काम करावे लागते. २. फार काही हाय-फाय ऑप्शन्स नाहीत. स्क्रिन कॅप्चर फिचर किंवा स्वतःची ऑडिओ लायब्ररी वगैरे उपलब्ध नाही. २. युट्युब व्हिडिओ एडिटर YouTube युट्युब मध्ये डॅशबोर्डमध्ये गेलात, की क्रिएट मध्ये व्हिडिओ हा पर्याय निवडा. इथे तुम्हाला व्हिडीओ बनवता येतो. सगळी पद्धत वर सांगितली तशीच आहे. फोटो घ्या आणि त्यामागे तुमची ऑडिओ फाईल लावा. इथेही अ‍ॅनिमेशनचे पर्याय आहेतच. फायदे १. इंटरनेट हाताशी असेल तर काहीही डाऊनलोड न करता जगात कुठुनही काम करता येते. आणि ते तुमच्या अकाऊंट्ला सेव्ह होत रहाते. २. तुमच्या गुगल ड्राईव्ह मधले फोटो इथे आपोआप लिंक होत असल्याने, अल्बममधुन हवे ते फोटो सरळ व्हिडिओ मध्ये ड्रॅग करता येतात. तोटे १. इंटरनेट आवश्यक आहे. ते नसेल तर एडिट कराण्याचे पर्याय कदाचित वापरता येतील पण काम सेव्ह करता येणार नाही. २. ऑडिओ एडीट (ट्र्म, स्प्लिट, फेड इन-आउट) करण्याचे पर्याय मला तरी अजुन सापडले नाहीत. ह्या व्यतिरिक्त अजुनही खुप पर्याय आहेत, थोड्या जास्त करामती करायच्या असतील तर इतर सोफ्टवेअरचा आधार घ्यावा लगतो.. आम्ही ते प्रतिसादांमधुन टाकत राहुच. आपल्या "गोष्ट तशी छोटी..!" उपक्रमात ह्याचा कसा उपयोग करुन घेता येईल? १. कोणताही लेख ज्यात खुप सार्‍या चित्रांचा समावेश आहे, तो लेख हिडिओ आर्टिकल मध्ये जास्त भारी वाटेल. जसं की एखाद्या पिक्चरची ओळख करुन देताना, त्या पिक्चर मधले सीन कट करुन मध्ये टाकले आणि त्यावर टिपण्णी केली तर वाचकांना नक्की काय घडले हे इमॅजिन करत बसावे लागत नाही. सेट, मेकप, लोकेशन इ. "दाखवायच्या" गोष्टी व्हिडिओ आर्टिकल मध्ये मस्त उलगडतील. २. समजा तुम्हाला "रोसेश साराभाई - एक अनवट कवी" ह्यावर बोलायचं असेल, तर रोसेशचा आवाज, शब्दफेक, "मॉमा" अशी आर्त हाक ह्या शब्दातीत गोष्टींना तुम्ही लेखात कसं बरं बसवणार?! अशा वेळेला साराभाईमधला रोसेशचा व्हिडिओ क्रॉप करुन तो वापरला तर विचार करा प्रेक्षकांच्या मनावर किती ठसतील त्या कविता! अशी अनेक "रसग्रहणं" अशा पद्धतीने व्हिडिओ क्रॉप करुन होऊ शकतात. ३. ज्या मुलाखती आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातुन इथे प्रकाशित करतो, त्याच व्हिडिओ शुट करुनही इथे टाकता येतील. किंवा निर्मिती संस्थाची माहिती तिथले काम दाखवुन देता येईल. मेकप आर्टिस्टची मुलाखत असेल तर ती "आर्टिस्ट अ‍ॅट वर्क" असेल तरच खुलुन दिसेल. त्याचेही शुटींग अथवा फोटो टाकता येतील. ४. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी कठपुतलीचा खेळ बघत असाल आणि पटकन मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन ठेवत असाल, तर लगे हाथो दोन शब्द त्या कलाकारांशीही बोला. असं मनोगत आणि त्यांच्या कार्यक्रमाचं शुट एकत्र करुन छोटीशी डॉक्युमेंटरी सुद्धा होऊ शकते. ही झाली काही उदाहरणं! तुमच्या डोक्यातुन अजुन सुपीक कल्पना येतीलच. फक्त काहीही करताना आपण कॉपीराईटचा भंग होऊ देत नाही आहोत ना, हे जरूर तपासा! समांतरः- गोष्ट तशी छोटी - म्हणजे काय रे भाऊ? नवीन उपक्रम : गोष्ट तशी छोटी..! - आवाहन
  • Log in or register to post comments
  • 29569 views

प्रतिक्रिया

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 11/18/2016 - 00:57

Permalink

१. सेक्स चॅट विथ पप्पु अ‍ॅण्ड

१. सेक्स चॅट विथ पप्पु अ‍ॅण्ड पापा ह्या लेखाचं व्हिडिओ आर्टिकल २. हा व्हिडिओ विंडोज मुव्ही मेकर मध्ये कसा बनवला ह्याची झलक
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 11/23/2016 - 03:49

In reply to १. सेक्स चॅट विथ पप्पु अ‍ॅण्ड by पिलीयन रायडर

Permalink

शक्य तिथे सगळीकडे एडिट करुन

शक्य तिथे सगळीकडे एडिट करुन आता नवा व्हिडिओ अपलोड केला आहे. आता बघा बरं.. अजुनही अ‍ॅडल्ट लिंक्स दिसत असतील तर प्लिझ कळवा. आम्ही अजुन चेक करु. संपादक - कृपया व्हिडिओच्या साईझ चुकत असतील तर दुरुस्त कराल का?
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 11/18/2016 - 02:50

Permalink

चांगलंय !!!

चांगलंय !!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Fri, 11/18/2016 - 02:53

In reply to चांगलंय !!! by खटपट्या

Permalink

नाव नोंदवा खटपट्या भाऊ.

नाव नोंदवा खटपट्या भाऊ.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 11/18/2016 - 05:49

In reply to नाव नोंदवा खटपट्या भाऊ. by स्रुजा

Permalink

म्हणजे सबस्क्राइब करायचे ना?

म्हणजे सबस्क्राइब करायचे ना?
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 11/18/2016 - 06:20

In reply to म्हणजे सबस्क्राइब करायचे ना? by खटपट्या

Permalink

ते तर कराच पण लेखही द्या..

ते तर कराच पण लेखही द्या..
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 11/18/2016 - 12:26

In reply to ते तर कराच पण लेखही द्या.. by पिलीयन रायडर

Permalink

वर दोन दीलेल्या वीडीओमधे आवाज

वर दोन दीलेल्या वीडीओमधे आवाज कोणाचा आहे? छान निवेदन
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 11/18/2016 - 17:56

In reply to वर दोन दीलेल्या वीडीओमधे आवाज by खटपट्या

Permalink

माझा! :)

माझा! :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Fri, 11/18/2016 - 21:20

In reply to म्हणजे सबस्क्राइब करायचे ना? by खटपट्या

Permalink

हे घ्या लेखांचे विषय : http:/

हे घ्या लेखांचे विषय : http://www.misalpav.com/node/37981
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Fri, 11/18/2016 - 06:04

Permalink

एक शंका

अशा वेळेला साराभाईमधला रोसेशचा व्हिडिओ क्रॉप करुन तो वापरला तर विचार करा प्रेक्षकांच्या मनावर किती ठसतील त्या कविता! --- एक शंका. अशा प्रकारे एखाद्या मिपाच्या मालकीच्या नसलेल्या व्हिडिओचा भाग मिपा युट्युब चॅनलवर वापरणे हे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 11/18/2016 - 06:10

In reply to एक शंका by अभिजीत अवलिया

Permalink

मी असे अनेक व्हिडिओ पाहिलेत

मी असे अनेक व्हिडिओ पाहिलेत ज्यात एखाद्या पिक्चरचे परीक्षण ह्या पद्धतीने केलेले असते. ह्यात आपण जाहिरात करत नसुन समीक्षा करत आहोत, ज्याला हरकत नसावी. शिवाय मिपा कोणतेही आर्थिक व्यवहार करत नाही. पण तरीही जाणकारांनी माहिती द्यावी. मलाही प्रताधिकारांचे नियम माहिती नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Fri, 11/18/2016 - 21:19

In reply to एक शंका by अभिजीत अवलिया

Permalink

ऑफिशिअल ट्रेलर वापरता यावा

ऑफिशिअल ट्रेलर वापरता यावा असं वाटतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 11/18/2016 - 06:06

Permalink

फोटो( आणि व्हिडिओ )

फोटो( आणि व्हिडिओ ) मोबाइलमध्ये असतील तर मेमरी कार्ड एलइडी टिव्हीच्या युएसबीत टाकले की काम होते.आपोआप प्ले होतात फोल्डर्स.शिवाय स्लाइडशो अॅपस् आहेत बरीच पाच ते पंचवीस एमबीची.आइफोनात मात्र मेमरी कार्ड नसते. :(
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 11/18/2016 - 06:15

In reply to फोटो( आणि व्हिडिओ ) by कंजूस

Permalink

हो काका.. विंडोज मध्येही फोटो

हो काका.. विंडोज मध्येही फोटो ओपन केला की स्लाईड शो हा पर्याय असतोच. पण ते व्हिडीओ आर्टीकल नाही. त्यात आपले भाष्य आपल्या आवाजात मागे वाजणे महत्वाचे आहे. शिवाय अ‍ॅनिमेशन्स, ऑडीओ एडीटींग हे ही आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 11/18/2016 - 07:04

Permalink

अॅनिमेशन्स नाही करता येत ऑडीओ

अॅनिमेशन्स नाही करता येत ऑडीओ हवा तो फोनमधला टाकता/बदलता येतो. आता कम्प्युटरातून लोक फोनकडे वळलेत. फोनमधले क्यम्रे काय अफलातून आलेत एक टेलिफोटो सोडले तर सर्व छान येतं. एक मुख्य गोष्ट पंधरा मिनिटांचेवर कोणाला आपले फोटो पाहण्यात सहनशिलता संपते. तीन मिनिटात तीस फोटोंचा स्लाइडशो असे चार झाले की जांभया सुरू होतात याचे भान ठेवायला लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 11/18/2016 - 08:24

In reply to अॅनिमेशन्स नाही करता येत ऑडीओ by कंजूस

Permalink

मोबाईल अ‍ॅप्स बद्दलही माहिती

मोबाईल अ‍ॅप्स बद्दलही माहिती देणार आहोत काका. तुम्हाला माहित असलेल्या अ‍ॅप्स बद्दलही लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 11/18/2016 - 07:17

Permalink

छान !

पप्पू आणि पापाचा व्हिडियो बघितला. दिलेला आवाज गोड आहे. उपक्रमास शुभेच्छा !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 11/18/2016 - 07:23

Permalink

एनडीटिव्हीवर पाच/सहाला पाच

एनडीटिव्हीवर पाच/सहाला पाच मिनिटे अगोदर पप्पु/अखिलेश/ममता/मोदी सर्वांचे विनोदी कार्टुनस येतात( ते नंतर वाटसपवर फिरतात)
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 11/18/2016 - 13:35

Permalink

नाउमेद करण्याचा हेतू नाही

नाउमेद करण्याचा हेतू नाही परंतू------ ही जी काही अॅप्स होती फोटोंचा स्लाइडशो बनवण्याची त्यामधल्या खास सोयी १) गॅलरीतले फोटो निवडणे, त्यांना दाखवताना सरकवण्याचे निरनिराळे प्रकार निवडणे, किती वेळ स्क्रीनवर दिसेल तो वेळ ठरवणे, २) त्याला मेमरीमधले कोणतेही संगीत मागे वाजेल असे निवडणे ,३) ही एक फाइल म्हणून वेगळी साठवणे. ही फाईल मग कुणालाही पाठवता येते. ब्लुटुथ/इमेल इत्यादीने. दोन वर्षांपुर्वी हे सर्व कौतुकपूर्ण असले तरी छोटे स्वस्त एलइडी टिव्ही फुल एचडी (+IPS)आल्यावर या सॅाफ्टवेरचे महत्त्व कमी होत आहे कारण १) टिव्हिच्या युएसबीला कार्ड रीडरमध्ये मेमरी कार्ड टाकले की कधीही स्लाइडशो,व्हिडिओ पटकन बघता येतात. डीजिटल कॅम्राचे कार्डही बसते. २) कोणत्याही सॅाफ्टवेरवर अवलंबून राहावे लागत नाही. ३) टिव्हीचे माध्यम फक्त मेमरी कार्ड वाचते ,त्यात उलट ब्लोट टाकून करप्ट करत नाही, कम्प्यूटरमध्ये तो धोका असतो. ४)कार्डास फार्मॅट करत नाही, ५) टीवी उचलून (२२-२४ इंची) नेण्याइतका हलका असतो. प्रोजेक्टरची गरज नाही पडत. अथवा फक्त युएसबी इक्स्टेन्शन केबल + कार्डरीडर नेऊन दुसय्रा मोठ्या टिव्हिला जोडून सादर करता येते. वाटसपचा प्रसार झाल्याने एकमेकास फोटो पाठवलेले असतातच तर आपण आणखी चाळीसेक फोटोंचा स्लाइडशो (=२०० Mb च्या आसपास )पाठवण्याचा खटाटोप कशाला करायचा? ओडिओ टाकण्याबद्दल विशेष काही साध्य होत नसावे. बघणारे थांबवून काहितरी प्रश्न विचारतातच ते सांगावे लागतेच.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 11/18/2016 - 17:55

In reply to नाउमेद करण्याचा हेतू नाही by कंजूस

Permalink

काका, तुम्ही आम्ही वर दिलेले

काका, तुम्ही आम्ही वर दिलेले व्हिडिओ पाहिलेत का? तुम्ही उपक्रमाचा व्हिडिओ पाहिलाय का? हे स्लाईडशो नाहीत. मुव्हि मेकर किंवा युट्युब हे ही "स्लाईड शो" बनवत नाही. व्हिडिओ आर्टीकल ही एक लहानशी फिल्म असते. जेव्हा विषय हा वाचण्यापेक्षा बघण्याचा अथवा ऐकण्याचा जास्त असतो तेव्हा लेखापेक्षाही व्हिडिओ जास्त प्रभावी माध्यम असतं. ह्यात तुम्ही नुसते फोटो एकामागे एक लावायचे नाही आहेत, तर एका सिनेमासारखे किंवा माहितीपटा सारखे एका सुत्रात बांधायचे आहेत. फोटोच का? कारण व्हिडिओ सुद्धा वापरता येतोच, पण त्यासाठी शुटींग करणे, तेवढ्या मोठ्या फाईलला एडीट करणे इ. अवघड काम आहे. तुलनेने स्टिल्स मध्ये काम करणं सोप्पं आहे. ह्यामागे "संगीत" वाजत नसुन, तुम्ही स्वतः केलेले नरेशन वाजत आहे. हा थोडक्यात तुम्ही केलेला एकपात्री प्रयोग आहे. पडद्यामागे रहायचं की पुढे यायचं हा तुमचा प्रश्न. तुम्ही कोणता टिव्ही इकडुन तिकडे उचलुन नेण्याबद्दल बोलताय काहीच कळत नाहीये, आणि कोण मध्येच थांबवुन प्रश्न विचारणारे? आपण यु ट्युब वर टाकायच्या आर्टीकल्स विषयी बोलत आहोत. आणि ते म्हणजे "स्लाईड शो" नव्हे.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 11/18/2016 - 18:30

In reply to काका, तुम्ही आम्ही वर दिलेले by पिलीयन रायडर

Permalink

ओके. विषय समजण्यात थोडा

ओके. विषय समजण्यात थोडा गोंधळ झाला. हेतू/उपयोगिता आणि सादरीकरणात फरक आहे.नवीन माध्यम.मुव्हिमेकर अॅप्स आणि स्लाइडशो अॅप्स वेगळी असावीत असं दिसतय. उगाच वेगळं मत मांडलं . अवांतर समजा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 11/18/2016 - 17:52

Permalink

उपक्रमास शुभेच्छा !

उपक्रमास शुभेच्छा ! बाकी व्हिडीयो एडिटिंगसाठी अ‍ॅडोब प्रेमियर प्रो शिकण्याची मनापासुन इच्छा आहे पण कधी योग येणार देव जाणे !
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 11/18/2016 - 17:56

In reply to उपक्रमास शुभेच्छा ! by प्रसाद गोडबोले

Permalink

धन्यवाद!

धन्यवाद! शिकल्यानंतर ह्या सॉफ्टवेअरची माहिती नक्की द्या!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 11/18/2016 - 18:42

Permalink

उपक्रमास शुभेच्छा.

उपक्रमास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Fri, 11/18/2016 - 18:48

Permalink

मलाही आता बर्‍याच गोष्टी

मलाही आता बर्‍याच गोष्टी समजल्यात. धन्यवाद या धाग्याबद्दल. व्हिडिओ आर्टिकल ही संकल्पना आवडली. मी असली आर्टिकल पाहिली होती पण ती बनवायची वेळ येईल असे वाटले नव्हते. पण हा प्रकार प्रभावी आहे हे निश्चित. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 11/18/2016 - 18:51

Permalink

ह्या उपक्रमात लघुपट बनवणंही

ह्या उपक्रमात लघुपट बनवणंही अपेक्षित आहे का किंवा कसे? वेरूळच्या लेण्यांत तिथल्या शिल्पांवर डॉक्युमेंटरी बनवायचा प्रयत्न आत्मुबुवांनी केला होता. मला वाटतं त्यांचा स्वताचा एक सेल्फी व्हिडीओ देखील बेडसे लेणीतील स्तूपाच्या पार्श्वभूमीवर आहे. ते एक उत्तम निवेदक आहेत असे येथे नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 11/18/2016 - 19:38

In reply to ह्या उपक्रमात लघुपट बनवणंही by प्रचेतस

Permalink

हो, मी सुद्धा तो व्हिडिओ

हो, मी सुद्धा तो व्हिडिओ पाहिला होता. बुवा खरंच उत्तम निवेदक आहेत! आणि त्यांना ह्या उपक्रमासाठी गाठायचा आमचा प्लान होताच! सध्या आम्ही फक्त उपक्रमांच्या विषयाच्या अनुषंगाने विचार करत आहोत. पण अर्थातच उपक्रमानंतर सर्वच प्रकारचे विषय करुन पहायचे आहेत. त्यासाठीच्या लिस्ट मध्ये आपले नाव सर्वात आधी सुचले होते! :) आपल्या कोणत्याही धाग्याचं एका उत्तम माहितीपटात रुपांतर करता येईल... रादर करायचंच आहे. लघुपट (शॉर्टफिल्म) सुद्धा कुणाला बनवायची असेल तर नक्की प्रयत्न करा. उपक्रम झाला की लगेच चॅनल सर्वांनाच खुले होणार आहे. पण तरीही तुमच्या कल्पना आम्हाला तातडीने कळवा. कदाचित उपक्रमात आणायलाच एखादी आयडीया आम्हाला मिळुन जाईल!
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Fri, 11/18/2016 - 21:16

In reply to ह्या उपक्रमात लघुपट बनवणंही by प्रचेतस

Permalink

होय, इथे बुवांचा विचार आम्ही

होय, इथे बुवांचा विचार आम्ही खुप आधीच करुन ठेवला होता. इथे आपल्या विषयांची यादी आहे : http://www.misalpav.com/node/37981 पिरा म्हणते आहे तसं, हे व्हिडीओ आर्टिकल्स आपल्याला या विषयांसंदर्भात आणायचे आहेत , या उपक्रमासाठी. नंतर चॅनल खुलं होणार आहे. तेंव्हा करायच्या खुप गोष्टी डोक्यात आहेत, एक तुमच्या शिल्पांचं आर्टिकल करायचं फार दिवसांपासून मनात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 11/22/2016 - 10:32

In reply to ह्या उपक्रमात लघुपट बनवणंही by प्रचेतस

Permalink

ते एक उत्तम निवेदक आहेत असे

ते एक उत्तम निवेदक आहेत असे येथे नमूद करू इच्छितो आत्मुबुआ वेदशाळेत शिकलेत न हो? असे असल्यास आपले बुआ उत्तम निवेदक असणे क्रमप्राप्तच म्हणावे लागेल मला. निव्वळ याज्ञकी करणे वेगळे अन वेदशाळेचे शिक्षण वेगळे, मुळात वेद मौखिक परंपरेने पुढे चालत आल्यामुळे वेदवेत्ते मंडळीने त्यांना रचतानाच साऊंड डिझाईन डोक्यात ठेवले होते का असा प्रश्न पडावा इतके ते आश्चर्यकारक रित्या रचलेले आहेत, त्याची घासून संथा घेतल्यावर आवाजात एक वजन येते अन पॉज घेणे, लय वाढवणे इत्यादी नैसर्गिक रित्या जमते असे वाटते (ह्यात धार्मिक पेक्षा ऐतिहासिक अन अनुषंघिक अभ्यासाचा भाग जास्त आहे हे नमूद करतो)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/22/2016 - 21:32

In reply to ते एक उत्तम निवेदक आहेत असे by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

अगदी! बैलाचा डोळा!

मौखिक परंपरेमुळे साउंड डिझाईन त्यात आले आहेच. हा विडिओ बघा एरहार्ड बंधूंनी म्हटलेला रुद्र. डोळे मिटून ऐका अंगावर काटा येतो! https://youtu.be/KKwY8OwXN-o
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 11/22/2016 - 23:09

In reply to अगदी! बैलाचा डोळा! by चतुरंग

Permalink

मस्तच आहेत हो एरहार्ड बंधू!

मस्तच आहेत हो एरहार्ड बंधू! मला असा सरारून काटा येतो 'भारत एक खोज' च्या टायटल कार्ड्स ऐकताना, 'पृथ्वी से पहले सत नही था' किंवा 'वह था हिरण्यगर्भ सृष्टी से पहले विद्यमान' ही 2 नासदीय सुक्तांची ट्रांसलेशन असो हिंदीतली तुफान आहेत, एकतर 'व्हॉइड' उर्फ शुन्यावस्था च इतकं शास्त्रोक्त वर्णन किंवा सूर्याचे वर्णन अन उपयोग हे आजपासून हजारो वर्ष अगोदर इतके काटेकोर नोंदवलेले आहेत हेच मला सर्द करून टाकते, त्यात ती दोन्ही अनुवादित सूक्त किंवा ऋचा नीट आरोह अवरोह जपून म्हणले गेलेले अन त्याला वनराज भाटियांचे संगीत! हमीअस्तु हमीअस्तु हमीअस्तु
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 11/22/2016 - 21:53

In reply to ह्या उपक्रमात लघुपट बनवणंही by प्रचेतस

Permalink

प्रचेतस, पि. रा, स्रुजा - मी

प्रचेतस, पि. रा, स्रुजा - मी याबाबत हवी ती मदत अगदी अवश्य करीन.
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Tue, 11/22/2016 - 22:05

In reply to प्रचेतस, पि. रा, स्रुजा - मी by अत्रुप्त आत्मा

Permalink

झकास ! बुवा, लवकरच व्यनि करतो

झकास ! बुवा, लवकरच व्यनि करतो आम्ही.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 11/18/2016 - 20:05

Permalink

इकडे लेखात जरा फोटो जास्ती

इकडे लेखात जरा फोटो जास्ती झाले की नेटप्याक गंडतात. व्हिडिओ आर्टिकलच्या प्लेअरच्यापुढे किती MB आहे,किती मिनिटांचा आहे ते दिलं तर मोबाइलच्या नेटवर पाहायचा अथवा वाइफाइवर हे ठरवता येईल. HD video एका मिनिटाचे ८० MBचे असतात.फुल HD 140 MB, VGA 24 MB.फक्त फोटोवाला लेख ब्राउज करायला वाचायला २-४MB.डेटा उडतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Sat, 11/19/2016 - 10:33

In reply to इकडे लेखात जरा फोटो जास्ती by कंजूस

Permalink

हो काका, त्या बद्दलही लिहीतो.

हो काका, त्या बद्दलही लिहीतो. सध्या आमचे मुव्हि मेकर मधले व्हिडिओ खुप हेव्ही आहेत. ३० एम्बी वगैरे. पण त्याच्या प्रोजेक्ट फाईल्स फक्त १०-१५ केबीच्या आहेत. तेव्हा तुम्ही प्रोजेक्ट फाईल दिली तर आम्ही कन्व्हर्ट करुन टाकु शकु बहुदा. युट्युबमध्ये प्रोग्रेसिव्ह डालो आहे. त्यामुळे जस जसा व्हिडिओ पहाल तसा डेटा खर्च होईल. व्हिडिओ पहाताना डेटा जाणारे हे मान्य आहेच. पण त्याला पर्याय नाही. आम्ही अजुन हलके फुलके ऑप्शन शोधत आहोतच.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजित - १ on Sun, 11/27/2016 - 13:33

In reply to इकडे लेखात जरा फोटो जास्ती by कंजूस

Permalink

ऑ !! काका आहात कुठे ? गोवा

ऑ !! काका आहात कुठे ? गोवा राज्य कॅशलेस होणार आहे ३१ डिसेंबर पासून. मोदींचा तर अक्खे भारत कॅशलेस करायचा विचार आहे. आता 3G 4G विथ १ GB कमीतकमी चे कनेक्शन लागणार. न्हावी, वडापाव वाला, रिक्षा , बस , कामवाली , हॉटेल सगळी कडे फक्त आणि फक्त कॅशलेस .. दर महिना ३०० रु नेट कनेक्शनची . अधिक paytm मध्ये पैसे भरायला १ टक्के फी .. तयारी ठेवा .. माफ करा चुकीची जागा आहे का मेसेजची ? पण मेसेज चुकीचा नाही. परत या टॉपिक वर येत नाहीए .. सॉरी .. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/less-cash-first-cashless-society-next-pm-narendra-modi-appeals-in-mann-ki-baat-radio-address/articleshow/55647360.cms - आधी 'लेस-कॅश', नंतर 'कॅशलेस' होऊ या: http://maharashtratimes.indiatimes.com/nation/goa-will-be-first-state-to-go-cashless-from-december-31/articleshow/55646436.cms - ३१ डिसेंबरपासून गोवा देशातील पहिले कॅशलेस राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 11/18/2016 - 21:18

Permalink

मस्तं उपक्रम. लेखन

मस्तं उपक्रम. लेखन-वाचनापलिकडे जाउन मराठी उपक्रम चालु होताहेत तेही कुठल्याही नफ्या तोट्याची गणितं नं करता हे खरोखर उल्लेखनिय आहे. :) किप इट अप. मदतीला आहेचं.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Fri, 11/18/2016 - 22:45

Permalink

फारच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे.

फारच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. मनःपूर्वक शुभेच्छा. आम्ही सोबत आहोतच. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Fri, 11/18/2016 - 22:51

In reply to फारच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. by एस

Permalink

तुमच्याशिवाय होणार च नाहीये

तुमच्याशिवाय होणार च नाहीये हा उपक्रम एस भाऊ. व्हिडीओ आर्टिकल्स बद्दल पुरेशी माहिती दिली आहे , आमच्या मते. तुम्ही तुमचे एक्स्पर्ट कॉमेंट्स पण द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 11/18/2016 - 22:59

Permalink

उत्तम

या उत्तम उपक्रमास अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 11/19/2016 - 04:12

Permalink

दोन वर्षांपूर्वी पक्षांचे

दोन वर्षांपूर्वी पक्षांचे आवाज हा ओडिओ असलेला लेख दिला होता.त्यामध्ये फक्त शेअरिंग साइटच्या लिंक्स होत्या पण प्लेअर नव्हते. चांगल्या सिक्यअर शेअरिंग साइट्सही माहित नव्हत्या. त्यानंतर कुणी ओडिओचा प्रयोग केला नाही. गेल्या महिन्याभराततही दोन ओडिओ प्लेअर खरडफळ्यावर दिलेले होते. पण तिकडे कुणी फारसं लक्ष दिलं नव्हतं. ज्यांना हे माध्यम जमलं आहे त्यांनी असले ओडिओ/व्हिडिओ लेख देण्याचा सपाटा लावायला हवा. त्यासाठी दूर अजिंठा वेरूळ लेणीच गाठली पाहिजे असे नाही. पाककृतींचे सादरी करण अथवा ओडिओ द्या. वाद्ये वाजवणार्यांनी ओडिओ देण्यास सुरुवात करावी.ओडिओ/व्हिडिओ प्लेअर देण्याचे templates मिपावर मोबाइलमधून फोटो कसे द्यावेत या लेखामध्ये दिलेले आहेतच.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Sat, 11/19/2016 - 08:55

Permalink

मिपा युट्युब चॅनलला १००

मिपा युट्युब चॅनलला १०० सबस्क्रिपशन्स झाल्या आहेत हो!!! आता लोक्स, व्हिडिओ आर्टिकल्स बनवायला लागा बरं झटपट!!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Tue, 11/22/2016 - 09:04

Permalink

छान माहितपुर्ण लेख!!!

छान माहितपुर्ण लेख!!! बरीच माहिती मिळाली!! दोन्ही व्हिडीओ आवडले!!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 11/22/2016 - 10:15

Permalink

नवीन ओडिओ मिक्स केलेला

नवीन ओडिओ मिक्स केलेला कोंडेश्वर धबधबा व्हिडिओ ट्राइअल. ( फाइल साइज 2 . 3 MB , 24 SEC )
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 11/22/2016 - 20:09

In reply to नवीन ओडिओ मिक्स केलेला by कंजूस

Permalink

मस्तच!!! २४ सेकंदात फक्त एका

मस्तच!!! २४ सेकंदात फक्त एका उत्तम स्पॉटची माहिती मिळाली. :) काका, ऑडिओ कसा मिक्स केलात हे ही इथे सांगा ना. इतरांना मदत होईल. तुम्ही वापरत असलेल्या सॉफ्टवेअरची माहितीसुद्धा इथे संकलित होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 11/22/2016 - 20:10

In reply to मस्तच!!! २४ सेकंदात फक्त एका by पिलीयन रायडर

Permalink

*फक्त २४ सेकंदात

*फक्त २४ सेकंदात
  • Log in or register to post comments

Submitted by jp_pankaj on Tue, 11/22/2016 - 20:50

In reply to नवीन ओडिओ मिक्स केलेला by कंजूस

Permalink

मस्त हो कंकाका

मस्त हो कंकाका
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 11/22/2016 - 10:44

Permalink

आपण जेव्हा व्हिडिओ टाकतो ,

आपण जेव्हा व्हिडिओ टाकतो , तेव्हा त्यामधल्या शब्दांचा आढावा गुगल सर्च, युट्युब डेटाबेस घेतो आणि त्याच्याशी संबंधित इतर व्हिडिओ /जाहिराती गुगलकडून दाखवल्या जातात ( त्याचे त्यांना पैसे मिळतात ). हे नवीन नाही. " सेक्स चॅट विद पप्पु ? " यामधले "सेक्स" आणि "पप्पु" हे दोन शब्द आग्यामोहोळ उठवायला आणि वेचक व्हिडिओजना आमंत्रण देण्यास पुरेसे आहेत इकडे लक्ष द्यावे ही विनंती. सध्या फेसबुकवर व्हिडिओ टाकून नंतर त्याचा प्लेअर बनवायच्या खटपटीत आहे. फेसबुक अधिक सुरक्षित आहे॥
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 11/22/2016 - 20:05

In reply to आपण जेव्हा व्हिडिओ टाकतो , by कंजूस

Permalink

मी स्वतः तीन अकाऊंट्स आणि

मी स्वतः तीन अकाऊंट्स आणि मोबाईल्/लॅपटॉप, दोन्ही वरुन चेक केलंय. मला कधीही हा त्रास झालेला नाही. जेव्हा मागे मी ही सिरिज पाहिली होती, तेव्हाही "सेक्स" ह्या शब्दामुळे मला काही भलते व्हिडिओ दिसले नव्हते. कंजुस काकांशिवाय अजुन कुणाला असा अनुभव आला तर प्लिझ कळवा. आम्ही २-३ जणांना विचारलंय वेगवेगळ्या देशातल्या, अजुन कुणालाही असा त्रास नाही. इन जनरल, युट्युब वर होम पेज वर खाली तुम्ही रिस्ट्रिक्टेड मोड ऑन करु शकता. त्याने असे व्हिडिओ दिसणार नाहीत.अजुन माहिती "पॉलिसी & सेफ्टी" ह्या टॅब मध्ये मिळेल. (सध्या माझा हा मोड ऑफ आहे, पण तरीही मला तसे व्हिडिओ दिसत नाहीत.) फेसबुक हा ही एक उत्तम पर्याय आहे. पण फेसबुक फक्त प्लेअर म्हणुन काम करतो. युट्युब सारखा व्हिडिओ एडीटर त्यात नाही. मी स्वतः फेसबुकवर लिमिटेड फोटो टाकते, बाकी सर्व गुगलवर सेव्हड असतात. युट्युब गुगलला लिंक्ड असल्याने ते फोटो / व्हिडिओ लगेच ड्रॅग करता येतात. म्हणुनही मला युट्युब जास्त सोयीचे वाटते. आणि योग्य त्या सेटींग असल्या की ते सेफही आहेच. फेसबुकवर सुद्धा अश्लील कंटेंट असतो. तो कुणी रिपोर्ट केला तसेल तर असाच अचानक दिसु शकतो. शिवाय फेसबुकही अशाच पद्धतीने पैसे मिळवते. तसं अ‍ॅबसोल्युट सेफ काहीच नसतं.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 11/22/2016 - 20:20

In reply to मी स्वतः तीन अकाऊंट्स आणि by पिलीयन रायडर

Permalink

१)केवळ विरोध करायचा म्हणून तो

१)केवळ विरोध करायचा म्हणून तो प्रतिसाद नसून तो फीडब्याक दिला. २)प्रत्येकवेळी व्हिडिओ बदली होतात. ३) ऑडिओ कसा मिक्स केलात हे ही इथे सांगा ना. इतरांना मदत होईल. तुम्ही वापरत असलेल्या सॉफ्टवेअरची माहितीसुद्धा इथे संकलित होईल. नक्की देतो. फार सोपं आहे. परंतू विंडोज स्टोरवरची दोनचार एमबीची अॅप्स आहेत. डिवेलपरचे नाव देतो त्याचे अॅन्डा्राइडवर शोधा. नंतर देतो.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com