समर्थकांच्या देशात
सर्वत्र मंगल वातावरण आहे,
प्रत्येक माणूस अतिशय आनंदात आहे,
देशप्रेमाची लाट आहे,
विजयाचा जयघोष आहे!
विरोधकांच्या देशात लुटालूट, दंगे,
अराजक माजलय, लोक मरत आहेत,
पोरं उपाशी, रुग्ण रस्त्यावर आहेत,
सर्वत्र फक्त आक्रोश आहे!
आपण आपलं चाचपून बघावं,
खिशात किती कॅश आहे,
मनात किती संतोष आहे,
किती असंतोष आहे!
काव्यरस
वाचने
1808
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
देशाची अशी फाळणी का झालीये हा
:(
In reply to देशाची अशी फाळणी का झालीये हा by एस
सर्वच वाईट आहे!
विरोध असो की समर्थन
मी ना समर्थकांच्या देशात
+११ म्हणून मी आवर्जून म्हणतो
In reply to मी ना समर्थकांच्या देशात by महासंग्राम
छान !!
बरोबर
कोण विरोधक न कोण समर्थक