Skip to main content

मनाच्या खिशात...

लेखक संदीप डांगे यांनी सोमवार, 14/11/2016 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
समर्थकांच्या देशात सर्वत्र मंगल वातावरण आहे, प्रत्येक माणूस अतिशय आनंदात आहे, देशप्रेमाची लाट आहे, विजयाचा जयघोष आहे! विरोधकांच्या देशात लुटालूट, दंगे, अराजक माजलय, लोक मरत आहेत, पोरं उपाशी, रुग्ण रस्त्यावर आहेत, सर्वत्र फक्त आक्रोश आहे! आपण आपलं चाचपून बघावं, खिशात किती कॅश आहे, मनात किती संतोष आहे, किती असंतोष आहे!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1808
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

पेराल तेच उगवेल हेच जो तो सीमेपार, विसरून गेला आहे! चेहऱ्यावर जळकी स्मिते आणि काखेत सुरी बाळगून आहे Sandy

विरोध असो की समर्थन रोगराया या जुन्याच आज मुळासकट जाळू नवी पहाट येण्यास (न जमल्यास वस्त्रहरण करू नये)

मी ना समर्थकांच्या देशात राहतो, ना हि विरोधकांच्या देशात राहतो मी फक्त सामान्य माणूस असलेल्या भारत देशात राहतो.

आपण सगळेच सामान्य लोक. भाषणं करून भांडणं लावणारे तिकडे एकत्र पार्ट्या करतात न तुम्ही लोक इथे एकमेकांच्या उरावर बसता समर्थक आणि विरोधक म्हणून एकामेकाना शिव्या देत.