माझ्या प्रेमाचे मनोगत
कधी वाटे मजला जणु पोट भरून हसावे..
प्रेमाच्या या नात्यामध्ये अलगद हळूच फसावे..
कधी वाटे मजला जणु डोळे पाणवून रडावे..
काय जाहले विचार करूनी जीव आवळून चिडावे..
कधी वाटे मजला जणु तुझ्या प्रेमात रंगावे..
मिठीत घेऊन तुला कानी प्रेमळ गूज सांगावे..
कधी वाटे मला जणु तुलाच पहात बसावे..
नयनी माझ्या तुझे निर्मळ निरागस हसू ठसावे..
कधी वाटे मजला जणु तुझी साथ असावी..
चांदण्या रातीत चंद्राच्या प्रकाशी तुझीच प्रित दिसावी..
कधी वाटे मजला जणु तुला समजून घ्यावे..
तुलाच माझ्या हृदयी ध्यानी मनी स्थान द्यावे..
कधी वाटे मजला जणु तुझे दु:ख गिळावे..
माझे सुख तिरक्या वाटेने तुझ्यापाशी वळावे..
कधी वाटे मला जणु आयुष्य तुझे सजवावे..
आनंदाच्या चिंब लहरींत चित्त तुझे भिजवावे..
ओ, जीव आवळून कसे चिडतात?
डोळे पाणवून रडतात तस्सेच! =))
सदा सर्वदा योग तुझा घडावा
काय करावे
माझे प्रभातीचे मनोगत
बुवा इज ब्याक =))
बुवा इज हॅक!
आगोबा इज हॅक!
बुवांनी
ह्हीह्हीह्ही
धन्यवाद...
कुणाला ?
=))
मागे उभे आहेत =))
रिस्क
=))
@बर्याच दिवसात झाली नव्हती
=))
माझ्या प्रेमा-चे मनोगत, -ची