कधी वाटे मजला जणु पोट भरून हसावे..
प्रेमाच्या या नात्यामध्ये अलगद हळूच फसावे..
कधी वाटे मजला जणु डोळे पाणवून रडावे..
काय जाहले विचार करूनी जीव आवळून चिडावे..
कधी वाटे मजला जणु तुझ्या प्रेमात रंगावे..
मिठीत घेऊन तुला कानी प्रेमळ गूज सांगावे..
कधी वाटे मला जणु तुलाच पहात बसावे..
नयनी माझ्या तुझे निर्मळ निरागस हसू ठसावे..
कधी वाटे मजला जणु तुझी साथ असावी..
चांदण्या रातीत चंद्राच्या प्रकाशी तुझीच प्रित दिसावी..
कधी वाटे मजला जणु तुला समजून घ्यावे..
तुलाच माझ्या हृदयी ध्यानी मनी स्थान द्यावे..
कधी वाटे मजला जणु तुझे दु:ख गिळावे..
माझे सुख तिरक्या वाटेने तुझ्यापाशी वळावे..
कधी वाटे मला जणु आयुष्य तुझे सजवावे..
आनंदाच्या चिंब लहरींत चित्त तुझे भिजवावे..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5742
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओ, जीव आवळून कसे चिडतात?
डोळे पाणवून रडतात तस्सेच! =))
In reply to ओ, जीव आवळून कसे चिडतात? by सतिश गावडे
सदा सर्वदा योग तुझा घडावा
काय करावे
माझे प्रभातीचे मनोगत
बुवा इज ब्याक =))
In reply to माझे प्रभातीचे मनोगत by अत्रुप्त आत्मा
बुवा इज हॅक!
In reply to बुवा इज ब्याक =)) by प्रचेतस
आगोबा इज हॅक!
In reply to बुवा इज ब्याक =)) by प्रचेतस
बुवांनी
In reply to आगोबा इज हॅक! by अत्रुप्त आत्मा
ह्हीह्हीह्ही
In reply to माझे प्रभातीचे मनोगत by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद...
कुणाला ?
In reply to धन्यवाद... by सोहम कामत
=))
मागे उभे आहेत =))
In reply to =)) by अजया
रिस्क
In reply to मागे उभे आहेत =)) by सतिश गावडे
=))
In reply to =)) by अजया
@बर्याच दिवसात झाली नव्हती
In reply to =)) by अजया
=))
In reply to @बर्याच दिवसात झाली नव्हती by अत्रुप्त आत्मा
माझ्या प्रेमा-चे मनोगत, -ची