✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

साहेबांची अमेरिकावारी !

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
Sat, 10/15/2016 - 10:02  ·  लेख
लेख
आता भारतीय राजकारणात काही करण्यासारखं उरलेलं नाही असं वाटल्याने साहेबांचा मोर्चा डोनाल्ड ट्रंपकडे वळला आहे....काय होईल आता अमेरिकेत ? खालीलपैकी काही पर्याय की अजून काही ? ब्रेनस्टॉर्मिंग करुया जरा ! १. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला मूक मोर्चे.... २. ट्रंपची राजकीय शिकवणी.... ३. ओबामाची प्रकरणं अमेरिकन मीडियाद्वारे उघडकीस ? ४. दुहेरी मतदान ? ५.अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे भारतात ? ६.तिथले साखर कारखाने आणि त्यांची निवडणूक घेणार ? ७. ट्रंप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचं आश्वासन ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26761 वाचन

💬 प्रतिसाद (120)

प्रतिक्रिया

मीडिया ने त्यांची "सस्पेन्स

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/20/2016 - 15:52 नवीन
मीडिया ने त्यांची "सस्पेन्स मॅन" म्हणून बनवलेली प्रतिमा
साहेबांच्या सुकन्या सुप्रियाताई सुळे यांना साहेबांच्या साठी का सत्तरीच्या निमित्ताने झालेल्या त्यांच्या मुलाखतीत एका शब्दात तुमच्या वडिलांचं वर्णन करा असं विचारलं असताना त्यांनी Unpredictable हा शब्द वापरला होता. जर साहेबांच्या कन्येचं हे मत आहे, तर बाकी लोकांनी काय म्हणावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

बोकाजी...

विशुमित
Fri, 10/21/2016 - 09:49 नवीन
2 स्मायली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सातार्याचे मतदान झाले कि शाई पुसुन

दुर्गविहारी
Sun, 10/23/2016 - 19:45 नवीन
विशुमित साहेब, लोकसभा निवड्णुकीवेळी नवी मुंबईत बोलताना "सातार्याचे मतदान झाले कि शाई पुसुन येउन मुंबैत मतदान करायचे" या वाक्यासाठी काय सांगणार आहात? वर महाराष्टात विनोद उरला नाही हे यांचे दुसर्या दिवशीचे वकत्व्य. राष्ट्रवादीतल्या नेत्यांची नाव घेउन बघा. निव्वळ गुंडाची टोळी आहे. मी एक वेळ आप किंवा एम.आय.एम. सहन करीन पण राष्ट्रवादी म्हणले कि डोक्यात तिडीक जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

<<<"सातार्याचे मतदान झाले कि

विशुमित
Mon, 10/24/2016 - 11:00 नवीन
<<<"सातार्याचे मतदान झाले कि शाई पुसुन येउन मुंबैत मतदान करायचे">>> -- विषय कधीच मिटलाय साहेब. दिलगिरी ही व्यक्त केली आहे. http://indianexpress.com/article/india/politics/pawar-writes-to-ec-regrets-ink-remark/ <<<<या वाक्यासाठी काय सांगणार आहात>>>> -- मी काय तुम्हाला सांगणार आहे, सगळे जण आंतरजाला मुळे सर्वज्ञ आहेत. <<<<निव्वळ गुंडाची टोळी आहे.>>>> -- बाबुल सुप्रियो तर दुसऱ्याच एका पक्षाला गुंडांची टोळी म्हंटला 2-3 दिवसा पूर्वी. एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष तडीपार गुंड होते म्हणे. नगरचे कर्डीले कुठले संत महात्मा आहेत? मुंबईचे शेलार यांचे तर थेट डॉन शी संबंध आहेत म्हणे? लिस्ट खूप लंबी होऊ शकते. गुंडांच्या टोळी ची जरा लिस्ट देता का? चर्चा करायला बरं पडेल. <<<<<राष्ट्रवादी म्हणले कि डोक्यात तिडीक जाते.>>>> -- मनामध्ये द्वेषच भरला असेल तर चर्चा करण्यात काय अर्थ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी

-- बाबुल सुप्रियो तर दुसऱ्याच

श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 13:01 नवीन
-- बाबुल सुप्रियो तर दुसऱ्याच एका पक्षाला गुंडांची टोळी म्हंटला 2-3 दिवसा पूर्वी. एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष तडीपार गुंड होते म्हणे. नगरचे कर्डीले कुठले संत महात्मा आहेत? मुंबईचे शेलार यांचे तर थेट डॉन शी संबंध आहेत म्हणे? लिस्ट खूप लंबी होऊ शकते.
कोणत्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष तडीपार गुंड होते म्हणे आणि शेलार यांचे थेट डॉनशी संबंध आहेत असे कोण म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

बरं... मग ते गुरूच्या पाठीत

वटवट
Tue, 10/18/2016 - 17:00 नवीन
बरं... मग ते गुरूच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा आणि शरद पवारांचा संबंध लावला जातो तो कसा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ते वसंतदादांच्या संदर्भात

खेडूत
Tue, 10/18/2016 - 17:08 नवीन
ते वसंतदादांच्या संदर्भात म्हटले जाते. ते उपचारासाठी परदेशात असताना हे कारस्थान झाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट

ओक्के

वटवट
Tue, 10/18/2016 - 17:24 नवीन
ओक्के
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

मिपा वर चांगलाच पवार फॅन क्लब

शब्दबम्बाळ
Mon, 10/17/2016 - 16:56 नवीन
मिपा वर चांगलाच पवार फॅन क्लब दिसतोय! पार दिवस जात नाही कि लोकांचा आठवण काढल्याशिवाय! :D असो, पण ते इतके भ्रष्ट आहेत कि आता मा. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे "धर्मसत्ताच" त्यांना वठणीवर आणेल कदाचित! कायदा वगैरे सगळ्या अंधश्रद्धा कशाला हव्यात?! :P
  • Log in or register to post comments

मी पण तीच वाट बघतोय कधी एकदा

विशुमित
Mon, 10/17/2016 - 17:23 नवीन
मी पण तीच वाट बघतोय कधी एकदा धर्मसत्ता पवार साहेबाना वठणीवर आणते ती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

बायदवे पवार ट्रम्पला भेटणार

बॅटमॅन
Tue, 10/18/2016 - 01:16 नवीन
बायदवे पवार ट्रम्पला भेटणार म्हणतात. म्हंजे आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार ट्रम्प निवडणूक हरणार की काय? =)) बाकी साहेबांच्या भक्तांची जळजळ उदाहरणार्थ रोचक वगैरे वाटली.
  • Log in or register to post comments

कॅलिफोर्निया मध्ये सध्या

साहना
Tue, 10/18/2016 - 03:30 नवीन
कॅलिफोर्निया मध्ये सध्या दुष्काळजन्य परिस्तिथी आहे पुतण्याला जरा पाठवून मुतायला लावावे ! लई उपकार होतील.
  • Log in or register to post comments

असले पाणी पिणार असाल तर गाळून

विशुमित
Tue, 10/18/2016 - 14:14 नवीन
असले पाणी पिणार असाल तर गाळून प्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

जायलाच हव साहेबानी आमेरिकेत

सुखीमाणूस
Tue, 10/18/2016 - 06:58 नवीन
मराठा मोर्चा काढायचा आहे ना ठिकठिकाणि ही बातमी देणारा,स्वप्निल पुरुषोत्तम खेडेकर,म्हनजे कोणाचा कोण?
  • Log in or register to post comments

अरेरे दुवा राहिला

सुखीमाणूस
Tue, 10/18/2016 - 06:59 नवीन
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=EBI79U
  • Log in or register to post comments

फारसा उपयोग झाला नसता

चौकटराजा
Wed, 10/19/2016 - 13:37 नवीन
मराठी माणूस या नात्याने साहेब प्रधानमंत्री झाले असते तर मला आनंद वाटला असता. पण ते " स्थितीवादी " राजकारणी आहेत. त्यानी खूप मुलभूत बदल कधीच घडवून आणल्याचे मला तरी दिसलेले नाहीत. त्यानी श्रीकर परदेशी यांच्या सारख्या नोकरशहा कडून काहीतरी शिकायला हवे होते. पण राजकारणी नोकरशहाना बदलतात हेच राजकारण्याचा फक्त माहिती असते.
  • Log in or register to post comments

साहेब मागील महिन्यात अमेरिकेत

श्रीगुरुजी
गुरुवार, 11/10/2016 - 00:00 नवीन
साहेब मागील महिन्यात अमेरिकेत जाऊन हिलरीला भेटले, तेव्हाच ट्रंपचा विजय नक्की झाला होता. माणसांचं सोडा, साहेब परमेश्वराला सुद्धा मॅनेज करू शकतात.
  • Log in or register to post comments

ह्या परदेश वारीचा संबंध आणि

साहना
गुरुवार, 11/10/2016 - 06:28 नवीन
ह्या परदेश वारीचा संबंध आणि १०००,५०० केल्या संबंध असावा असे वाटते
  • Log in or register to post comments

आहे संबंध

वरुण मोहिते
गुरुवार, 11/10/2016 - 16:06 नवीन
वर्ल्ड इकॉनॉमिक्स . काय करायचं काय नाही हे एका दिवसात ठरत नाही . आपल्याला कळतही नाही कित्येक गोष्टी . बाकी सगळे मुद्दे काढून फक्त साहेब कसे वाईट हे महाराष्ट्रात का चित्र रंगवलं जात कळत नाही . बाकीचे अखिल भारतातले लोक जे राजकारणात होते ते छान होते का ?? आणि साहेब वाईट तर मोदीजी का बोले सल्ला घेतो त्यांचा मी दर महिन्याला असं. असाच एक शंका .
  • Log in or register to post comments

सगळ्या राज्यात ह्या पेक्षा फालतू नेते आहेत

वरुण मोहिते
गुरुवार, 11/10/2016 - 16:12 नवीन
दक्षिणेकडे किंवा उत्तर भारतात तर विचारूच नका . पण आपल्याकडे नेहमी चढाओढ असते बाळासाहेब कसे वाईट आणि मोठे साहेब कसे वाईट . कशाला ?? ती लोक त्यांच्याबद्दल काही वाईट पण बोलू शकत नाहीत . मी असं म्हणत नाहीये कि याना चांगला म्हणा असतील काही दोष पण जे चांगलं आहे ते कधीतरी वाचा लिहा लोकांनी . एकपण चांगलं काम याचा दिसू नये . सतत टीका ऐसा नाही होता
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा