Skip to main content

साहेबांची अमेरिकावारी !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 15/10/2016 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आता भारतीय राजकारणात काही करण्यासारखं उरलेलं नाही असं वाटल्याने साहेबांचा मोर्चा डोनाल्ड ट्रंपकडे वळला आहे....काय होईल आता अमेरिकेत ? खालीलपैकी काही पर्याय की अजून काही ? ब्रेनस्टॉर्मिंग करुया जरा ! १. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला मूक मोर्चे.... २. ट्रंपची राजकीय शिकवणी.... ३. ओबामाची प्रकरणं अमेरिकन मीडियाद्वारे उघडकीस ? ४. दुहेरी मतदान ? ५.अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे भारतात ? ६.तिथले साखर कारखाने आणि त्यांची निवडणूक घेणार ? ७. ट्रंप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचं आश्वासन ?

वाचने 27051
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे भारतात ?
खिक्क !! रच्याकने, तुम्हीही आम्रिकावारीची जाहीरात करताय कि काय असं वाटलं. =))

In reply to by किसन शिंदे

एक तर आम्ही स्वत:च स्वत:ला साहेब म्हणत नाही....परदेशवारीची झैरात त्याहून करत नाही... देशाची मातीच आम्हाला प्रिय आहे.....(मधून मधून आम्ही खातोही ती !)

  • यांना तिथे ऐपील काढण्याचे सुचविणार, वेळ पडली तर ललित मोदीला अमेरिकेत धाडणार (पण भागीदारी पक्की पण नाव कुठेही नको याच तत्वावर)
  • अता हिलरींना कट्टर विरोध करून जमल्यास नंतर त्याम्च्याशीच संगनमत करून एखादे मंत्रीपद गटवता कसे येईल ते सम्जवणार.
  • ट्रंप बाबाची कुठलीही प्रकरणे बाहेर येऊ नयेत चैकशी होऊ नये म्हणून त्याला मोर्च्याची आयडीया देणार त्या साठी हिलरी बाईम्चा वंश्/वर्ण्/मूळ देश ई चे भांडवल कसे करायचे त्याचे प्रशिक्षण देणार.
  • खास महारष्ट्रात बोलावून माझ्या लोकांकडून मीच कसा जाणता राजा आहे हे पत्रकार ते (पगारी) लेखक पासून हाताशी असलेले वर्तमान पत्र या द्वारे कसं बिंबवलं आहे हे दाखविणार म्हणजे ट्रंप बाबा अम्रिकेत एखादा पेपर सकाळी गिळणार,आप्ल्या लोकांना कामाला लावून सगळीकडे आव्हाढ आगावु लोकांमार्फत (कुटे) कुठे फलबाजी करून ट्रंप बाबा शिवाय अमेरिकेला पर्याय नाही असे भासविणार.
  • ट्रंप बाबाला लेक असेल तर तिला उठ्सूट ओमाब्याला आणि हिलरीला एकेरीत शिव्या द्यायचे काम द्यायचे आणि मुख्य म्हणजे ट्रंप ला गुटक्याची गुळणी धरायला शिकविणार म्हणजे बोलायला तोंड उघडायचे कामच नाही.
तूर्त इतकेच

In reply to by नाखु

श्या..तुम्ही आमच्या साहेबांना पुरते ओळखलेच नाही अजून..काही महत्वाचे अजेंडे खाली आहेत.. 1. अमेरिकन धरणांचा मूत्रविसर्जनच्या संदर्भाने अभ्यास 2. ख्रिश्चन धर्मियांच्या पोटजातींविषयी अभ्यास आणि अन्यायग्रस्त पोटजातींसाठी आंदोलनाची रूपरेषा 3. अमेरिकन एक्सप्रेस सारख्या मोठ्या बँकाच्या 'शेतकरी कर्जवाटप आणि वसुली' या विषयावर एक चर्चासत्र 4. 'अमेरिकन बँक आणि सहकार चळवळ- काळाची गरज' या विषयावर व्याख्यान 5. 'जात - कधी लपवावी आणि कधी काढावी' - या कादंबरीचे प्रकाशन 6. चेहरा एक,मुखवटे अनेक - या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती 7. नैसर्गीक आपत्तीकडे सुर्वणसंधी म्हणून कसे पाहावे याविषयावर अमेरिकन संसदेत भाषण 8. 'साहेब" या आगामी चरित्रपटासाठी वॉर्नर ब्रदर्ससोबत भागीदारीविषयी चर्चा.

In reply to by विशुमित

एक राहिलेच.. 9. 'द्वेष -- करावा पण लपूनछपून' -- या विषयावर आधारित लघुकथांचे वाचन.. (या लघुकथा पुरोगामी महाराष्ट्रात साहेबांची सत्ता असताना आणि नसताना घडलेल्या असून..ह्यातले पात्र आणि घटना ह्या साहेबांचे निकटवर्तीय,कार्यकर्ते,संघटना ह्यांच्याशी थेट संबंधित असूनही सुसंकृत साहेबांचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही !)

In reply to by चिनार

अगागागागा.... फुटलो राव हसून... येऊ द्या अजून.. ते अजून एक राहिलंच कि... "विस्तृत आणि मोठ्या भूभागाचा विकास" ह्या विषयावर सखोल अर्थपूर्ण चिंतन... (ट्रम्पपट्टा किंवा बुशपट्टा असं काहीतरी)

थोडक्यात आटपलंत ओ! अजून मस्त फुलवता येईल हा विषय.

In reply to by पैसा

सगळ्यांनी थोड्या थोड्या विटा लावा !

मला या धाग्यावर दगड घालावासा वाटतोय. (सुसंस्कृतपणा आणि संयम या दोन गोष्टींनी हात बांधले आहेत) अगदी निरर्थक, बिनबुडाचा, पूर्वग्रह, ऐकीव आणि कोत्या मनाने अत्मरंजन करणारं विडंबन वाटलं.

In reply to by विशुमित

धागाकर्त्याला दगड मारणार असला तर सांगा, पत्ता देतो. सोबतीला आणखी चार हितचिंतकही तयार होतील, मूक मोर्चा काढणार असाल तरी सांगा.

In reply to by मोदक

आमची संस्कृती नाहीय ती दगड मारण्याची. पण तरी पण पत्ता द्याच, भेटावं म्हणतोय त्यांना एकदा... हितचिंतक गोळा करण्याची जरुरी नाही एक व्हाट्सअप केला की होतात लगेच गोळा.

In reply to by विशुमित

भोसल्यांच्या घरी जाऊन त्यांचा पाहुणचार घ्यायचा. आणि त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात ," एकेकाळी भोसले फडणवीसांना पेशवेपद द्यायचे आता फडणवीस भोसल्यांना देतात" असं जाहीररीत्या बोलायचं.
ही संस्क्रुती आणि हा सुसंस्कृतपणा अंगी असल्यावर वेगळे दगड मारण्याची संस्कृती असावीच लागत नाही.

In reply to by चिनार

" एकेकाळी भोसले फडणवीसांना पेशवेपद द्यायचे आता फडणवीस भोसल्यांना देतात" असं जाहीररीत्या बोलायचं.>>>> मग त्याने काय झालं? भोसल्यानी लगेच भाजपला सोडचिट्टी दिली? तुम्हाला रूपक पण समजू नाही? याचा पूर्वइतिहास हा आहे.... http://indianexpress.com/article/india/politics/maharashtra-bjp-sends-s…

In reply to by विशुमित

तुम्हाला त्यात रूपक वाटत असेल तर तसे समजा..पण अंगाशी आल्यावर साहेबांना लगेचच हे रूपक फिरवावं लागलं होतं..(अर्थात त्यांच्यासाठी हे नवीन नाहीच ) बाकी ते सर्जिकल स्ट्राईक बद्दलचं बोलणं पण रूपक म्हणावं का ?? नवीन साहित्यिक पर्वाचा उदय होतोय म्हणायचं महाराष्ट्रात..

In reply to by बोका-ए-आझम

प्रतिसाद द्याचे की नाही, भक्त आहे म्हणायचं की नाही हे ठरवणारे आपण मिपाचे मालक नाही आहात, हे मला खात्रीशीर माहिती आहे. नाहीतर मिपाचे जे कोणी मालक असतील त्यांनी हा धागा उडवून टाकावा. प्रतिसाद बंद होतील. कोणी काही ही बेछूट आरोप करायचे, विडंबन करायचं, मनाला वाटेल ती भडास काढायची, वर म्हणायचं दगड घालण्यासाठी पत्ता देतो (जो त्यांनी अजून दिला नाही), आणि परत म्हणायचं प्रतिसाद देणं बंद करा ? जे धागा कर्त्याने आणि इतर मंडळींनी विडंबनच्या माध्यमातून आरोप केले आहेत, देशाच्या पाठीवर अजून तरी सिद्ध नाही झाले आणि सिद्ध करू ही शकणार नाही. जर हे कोणी सिद्ध करू शकत नसेल तर ही अमंगळ बोलबच्चन गिरी बंद करा.

In reply to by विशुमित

जे धागा कर्त्याने आणि इतर मंडळींनी विडंबनच्या माध्यमातून आरोप केले आहेत, देशाच्या पाठीवर अजून तरी सिद्ध नाही झाले आणि सिद्ध करू ही शकणार नाही. जर हे कोणी सिद्ध करू शकत नसेल तर ही अमंगळ बोलबच्चन गिरी बंद करा.
या बाबतीत मात्र मी साहेबांना महाकौशल्याला दाद देतो.

In reply to by विशुमित

मिठाची गुळणी कशाला? साधं कौतुक पण करायचं नाही का? उद्या आम्ही गप्प बसलो तर लगेच म्हणाल की साहेबांच्या कौशल्याचा मत्सर वाटतोय, म्हणून साधं कौतुक सुद्धा करत नाही.

In reply to by विशुमित

अमंगळ बोलबच्चन गिरी बंद करा.
ही गोष्ट तुमच्या माननीय साहेबांना आणि त्यांच्या चेल्यांना सुद्धा पटवून द्या..आणि जर त्यांनी ऐकले नाहीच तर बोलून झाल्यावर ,"मी असं बोललोच नाही !!" हा पळपुटेपणा तरी बंद करायला सांगा.. -- 'साहेब' या व्यक्तीचा आणि प्रवुत्तीचा एक विरोधक

In reply to by चिनार

तुम्ही विरोधक असा नाहीतर इतर कोणी त्याच आम्हाला काय देणे घेणे. म्हणजे तुम्ही फक्त एकांगीच प्रतिक्रिया देणार हे सिद्ध करताय आणि दुसऱ्यांना चेले चपाटे म्हणताय?? आम्ही बाजू घेतली की चेले चपाटे आणि तुम्ही बाजू घेतली की भक्त ???

In reply to by श्रीगुरुजी

इतर मिपावर द्वेष मुलुख प्रतिसाद देणाऱ्यांची तुलना न केलेली बरं, असंच सुचवायचं आहे ना तुम्हाला??

In reply to by श्रीगुरुजी

जानकरांचि सुसंस्क्रूत मुक्ताफळे एकुन संपुर्ण महाराष्ट्र धन्य झाला ! इथे मात्र अजुन लघवी पुराण च . अरेरे कुठे नेवुन ठेवलाय महाराष्ट्र माझा .

In reply to by विशुमित

मी तुम्हाला चेले -चपाटे म्हटलेलं नाही. अर्थात तुम्ही स्वतःला तसं काही समजत असाल तर माझा आक्षेप नाही. मी विरोधक आहे हे जाहीर करतोय. बाकी ते एकांगी, रूपक-बिपक वगैरे चालुद्या.. साहेबांचे आगामी काल्पनिक रूपक : 1. आम्ही सुद्धा अणू चाचण्या केल्या होत्या आमच्या वावरात. आम्हाला ते जाहीर करायची गरज नाही वाटली. 2. ह्या असल्या EBC सारख्या घोषणा आम्ही सुद्धा केल्या होत्या. आमच्या इतर निर्णयांप्रमाणे ह्या सुद्धा पूर्ण नाही केल्यात एवढंच..

In reply to by विशुमित

जे इथे कोणी म्हटलेलंच नाही त्यावर comments करण्याचं तुमचं कौशल्य जबरदस्तच आहे.
जे धागा कर्त्याने आणि इतर मंडळींनी विडंबनच्या माध्यमातून आरोप केले आहेत, देशाच्या पाठीवर अजून तरी सिद्ध नाही झाले आणि सिद्ध करू ही शकणार नाही.
सिद्ध झाले नाहीत हे ठीक आहे. कोणीही करु शकणार नाही असं तर साहेब पण म्हणत नाहीत.

In reply to by विशुमित

ते आमचेही श्रध्दास्थान आहे....खिशात नेहमी त्यांचा फोटो असतो..स्वत:साहेब सुध्दा त्यांच्याविषयीचे विनोद खेळकरपणे घेतात.... पण इथे तर "चाय से ज्यादा किटली गरम है" !

In reply to by बोका-ए-आझम

भक्तीच एक उदाहरण, सर्जिकल स्ट्राईक वरील साहेबांच्या वक्तव्यावर भरपूर जोक्स सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यावर आमच्या ओळखीतला एक साहेबांचा भक्त तावातावाने म्हणाला, "साहेबांना बदनाम करण्याची फ्याशन आलीये आजकाल. साहेब काय चुकीचं बोलले? त्यांच्याकाळात सुद्धा सर्जिकल स्ट्राईक झाल्या होत्या. मग झाल्या असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे ना !" माझा प्रश्न ," साहेबांच्या या वक्तव्यावर तुझा विश्वास आहे का ?" "मला खरंखोटं माहिती नाही आणि मला ते जाणूनसुद्धा घ्यायचे नाही"

In reply to by चिनार

त्या काळातले सर्जिकल स्ट्राईक कसे प्रसिध्ध करणार होते? मुस्लिम अनुनयाचे काय झाले असते मग? त्यान्च्या भावना दुखवल्या गेल्या असत्या ना?

In reply to by विशुमित

" एकेकाळी भोसले फडणवीसांना पेशवेपद द्यायचे आता फडणवीस भोसल्यांना देतात" असं जाहीररीत्या बोलायचं.>>>> मग त्याने काय झालं? भोसल्यानी लगेच भाजपला सोडचिट्टी दिली? तुम्हाला रूपक पण समजू नाही?
रूपकबिपक असलं काही नव्हतं. ती साहेबांनी जाणूनबुजून टाकलेली जातीयवादी काडी होती. साहेब अशा जातीयवादी काड्या नेहमीच टाकतात.

In reply to by श्रीगुरुजी

नाय नाय गुरुजी..ते रूपकच होतं !! हे जातीयवाद वगैरे सगळे तुमच्या मनातले खेळ.. साहेबांचं मायमराठी साहित्यावरचं प्रेम ठाऊक आहे ना तुम्हाला...व्याकरण चालवतात तसे साहेब जात चालवतात (व्याकरणाच्या साहाय्याने)

In reply to by चिनार

हहपुवा! सहजच आठवलं. १९९० च्या निवडणुक प्रचारातलं साहेबांचं एक रूपक होतं - "पुण्यामुंबईच्या काही जणांना महाराष्ट्रात पेशवाई परत आणायची आहे".

In reply to by विशुमित

अगदी ब्रोबर. भांडारकर इन्सिट्युट ची तोडफोड बहुदा आपोआप झाली असावी. रच्याकने
हितचिंतक गोळा करण्याची जरुरी नाही एक व्हाट्सअप केला की होतात लगेच गोळा.
अगदी अगदी. पण एक करा ढाई किलो का हात सहन होणार्‍याचं हितचिंतकांना व्हॉट्सअ‍ॅप करा. परत त्यांना 'पोचवण्याचीही' व्यवस्थाही नक्की करा.

१. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला मूक मोर्चे.... पुढच काय व्हइल त्याचा काय अंदाजा लावणं तस कठीण हाय बघा...गोर्‍या काळ्यांनी एकमेकांची टकुरी फोडली नाही म्हणजे झालं... २. ट्रंपची राजकीय शिकवणी.... शिकवणी ! हॅहॅहॅ... ग्रॅब देम बाय टिंब टिंब. ३. ओबामाची प्रकरणं अमेरिकन मीडियाद्वारे उघडकीस ? ट्र्प्म तर दुर्गेला आत टाकणार आहेत म्हणाले ना ? ओबामामामांचे काय ठावुक नाय बाँ... बाकी ओबामामा हापिसात आले तेव्हा टोटल debt $10.6 trillion होते आता ते 19.7 trillion झाले आहे, ओबामा ही फिगर २० trillion करुनच बाहेर पडतील काय ? ४. दुहेरी मतदान ? रशिया यासाठी जवाबदार असेल... समजलं ? ५.अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे भारतात ? जाणता राजांशी बोलणी झाली तरं हे सुद्धा सहज शक्य होईल असं म्हणतात म्हणे! ;) ६.तिथले साखर कारखाने आणि त्यांची निवडणूक घेणार ? मला वाटलं ते जीएम कॉर्न आणि इथेनॉल असावं... ७. ट्रंप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचं आश्वासन ? युनाटेड नेशन अमेरिका कंट्रोल करेल काय ? असा प्रश्न जालावर वाचन करताना पडला ! कारण युनाटेड नेशनच्या गाड्या म्हणे अमेरिकेत दिसल्या म्हणे ! यावर विचार करण्यासारखी बातमी वाचनात आली होती ती म्हणजे US approves UN use of force to protect civilians in conflict U.S. approves UN use of force to protect civilians in conflict US approves UN use of force to protect civilians in conflict Truck Strop काही इडियो मनोरंजासाठी देतो :- जाता जाता :- ट्रंप यांचे नग्न पुतळे ऑगस्ट मध्ये अचानक जागोजागी प्रकट झाले होते... मग काय लोकांनी मोबाईल काढले आणि फोटो सेशन सुरु झाले ना ! ;) { बादवे हे कोणी केले असेल बरं ? } (संपादित)

In reply to by मदनबाण

पुतळा बघून सादरकर्त्याचे खालीलप्रमाणे स्टेटमेंट असावे असे वाटते, " Trump have no balls and a small penis" टिपिकल अमेरिकू आहे, ;)

In reply to by संदीप डांगे

हो, ते तसेच आहे इन अमेरिकन स्टाईल... ;) अगदी परफेक्ट न्यूज स्टाईल मध्ये :- 'Emperor Has No Balls'

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Why the world fears Russia’s S-400 Triumf missile defence system that India is buying

In reply to by अभ्या..

बघवत नाहीत रे पुतळ्याचे फोटो बाणा. :( खरयं, पण अमेरिकन पब्लिकला काही वाटेना बघ ! बाकी माझ लक्ष कमनिय बांध्याच्या सुंदर पाखरांकडेच जास्त गेलं... ;) *फोटो आक्षेपार्ह वाटतं असल्यास ते काढुन टाकण्यास हरकत इल्ले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Why the world fears Russia’s S-400 Triumf missile defence system that India is buying

In reply to by मदनबाण

आयला, तिथे डॉक्टरांच्या धाग्यात बाईचा पदर बाईच्या पदराच्या उपमेने केवढा गहजब (त्या उपमेंट काहीही वाईट नव्हते तरीही) आणि इथे कोणा पुरुषाचा दिगंबरवस्थेतला फोटो दिला तर त्याबद्दल एक चकार शब्द नाही

आता भारतीय राजकारणात काही करण्यासारखं उरलेलं नाही असं वाटल्याने साहेबांचा मोर्चा डोनाल्ड ट्रंपकडे वळला आहे....काय होईल आता अमेरिकेत ? खालीलपैकी काही पर्याय की अजून काही ? ब्रेनस्टॉर्मिंग करुया जरा !
निवडणुकीच्या आदल्या रात्री कसं सेटिंग करायचं, साड्या वगैरे वाटून मतं कशी फिरवायची इ. साठी साहेब ट्रंपची शिकवणी घेणार असतील.

एकंदरीत साहेब हे स्वतःच एक लिजंड झाले आहेत. भविष्यात "साहेबपुराण" या नावाने १९ वे पुराण लिहिले जाऊन त्यात साहेबलीलांचे वर्णन असेल हे निश्चित.

In reply to by श्रीगुरुजी

त्यातील स्कंदातील एका एका श्लोक वर आयुष्यभर प्रवचन करायला मिळेल. आणि तरी सुद्धा संपणार नाही पुढच्या पिढीला अनाहूत आणखी सोया होईल.

In reply to by विशुमित

बरोबर. पण त्यांच्या पुराणावर प्रवचन करण्याचा अधिकार फक्त त्यांच्या भक्तांनाच असणार. आम्हाला ती संधी मिळणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

हा हा हा .... खरंच की. सर्वानी आम्हाला एकदम भक्तच करून टाकलत. पण तस नाही गुरुजी-- खंडेराया शपथ सांगतो मी त्यांचा भक्त नाही. पण त्यांचं कार्य अगदी जवळून पाहिलं आहे आणि त्यांच्यावर जे बिनबुडाचे आणि कमरे खालचे वार केले जातात हे पाहून स्वस्त बसवत नाही.

In reply to by विशुमित

ही पण fashion आहे. बाकी चालू द्या.
त्यांच्यावर जे बिनबुडाचे आणि कमरे खालचे वार केले जातात हे पाहून स्वस्त बसवत नाही.
एकच सत्य. भक्त भक्त!

In reply to by विशुमित

साहेबांच्या कार्याबद्दल एक शेप्रेट लेख( पुराव्यासहीत) लिहा आणि या टीकाकारांचे प्रतिसाद बंद करुन टाका ! ( आणि कार्य सापडले नाही तर तसा सांगा ,वसंतदादापासून ते भुजबळ व्हाया ब्रिगेड मी सांगतो)