✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

साहेबांची अमेरिकावारी !

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
Sat, 10/15/2016 - 10:02  ·  लेख
लेख
आता भारतीय राजकारणात काही करण्यासारखं उरलेलं नाही असं वाटल्याने साहेबांचा मोर्चा डोनाल्ड ट्रंपकडे वळला आहे....काय होईल आता अमेरिकेत ? खालीलपैकी काही पर्याय की अजून काही ? ब्रेनस्टॉर्मिंग करुया जरा ! १. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला मूक मोर्चे.... २. ट्रंपची राजकीय शिकवणी.... ३. ओबामाची प्रकरणं अमेरिकन मीडियाद्वारे उघडकीस ? ४. दुहेरी मतदान ? ५.अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे भारतात ? ६.तिथले साखर कारखाने आणि त्यांची निवडणूक घेणार ? ७. ट्रंप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचं आश्वासन ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26760 वाचन

💬 प्रतिसाद (120)

प्रतिक्रिया

अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे

किसन शिंदे
Sat, 10/15/2016 - 10:47 नवीन
अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे भारतात ?
खिक्क !! रच्याकने, तुम्हीही आम्रिकावारीची जाहीरात करताय कि काय असं वाटलं. =))
  • Log in or register to post comments

नाही हो.....

माम्लेदारचा पन्खा
Sat, 10/15/2016 - 10:59 नवीन
एक तर आम्ही स्वत:च स्वत:ला साहेब म्हणत नाही....परदेशवारीची झैरात त्याहून करत नाही... देशाची मातीच आम्हाला प्रिय आहे.....(मधून मधून आम्ही खातोही ती !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

कडक प्रतिसाद! ;)

संदीप डांगे
Sat, 10/15/2016 - 11:51 नवीन
कडक प्रतिसाद! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

सरळ सरळ सांगा ना ठाण्यात

सतिश गावडे
Sat, 10/15/2016 - 12:06 नवीन
सरळ सरळ सांगा ना ठाण्यात हार्डवेअरच्या दुकानात तुम्हाला लाल रंगाचे डबे मिळाले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

सध्या दिवाळीमुळे अनेक घरांचे

किसन शिंदे
Sat, 10/15/2016 - 12:12 नवीन
सध्या दिवाळीमुळे अनेक घरांचे रंगकाम काढल्याने स्टॉक संपला असेल. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आणि अशा प्रकारे डोनाल्डराव अमेरिका तालुक्याच्या निवडणुकीत

माम्लेदारचा पन्खा
Wed, 11/09/2016 - 22:03 नवीन
बहुमतानं निवडून आलेत ! साहेबांचा विजय असो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

डोनाल्ड ट्रंप

नाखु
Sat, 10/15/2016 - 11:07 नवीन
  • यांना तिथे ऐपील काढण्याचे सुचविणार, वेळ पडली तर ललित मोदीला अमेरिकेत धाडणार (पण भागीदारी पक्की पण नाव कुठेही नको याच तत्वावर)
  • अता हिलरींना कट्टर विरोध करून जमल्यास नंतर त्याम्च्याशीच संगनमत करून एखादे मंत्रीपद गटवता कसे येईल ते सम्जवणार.
  • ट्रंप बाबाची कुठलीही प्रकरणे बाहेर येऊ नयेत चैकशी होऊ नये म्हणून त्याला मोर्च्याची आयडीया देणार त्या साठी हिलरी बाईम्चा वंश्/वर्ण्/मूळ देश ई चे भांडवल कसे करायचे त्याचे प्रशिक्षण देणार.
  • खास महारष्ट्रात बोलावून माझ्या लोकांकडून मीच कसा जाणता राजा आहे हे पत्रकार ते (पगारी) लेखक पासून हाताशी असलेले वर्तमान पत्र या द्वारे कसं बिंबवलं आहे हे दाखविणार म्हणजे ट्रंप बाबा अम्रिकेत एखादा पेपर सकाळी गिळणार,आप्ल्या लोकांना कामाला लावून सगळीकडे आव्हाढ आगावु लोकांमार्फत (कुटे) कुठे फलबाजी करून ट्रंप बाबा शिवाय अमेरिकेला पर्याय नाही असे भासविणार.
  • ट्रंप बाबाला लेक असेल तर तिला उठ्सूट ओमाब्याला आणि हिलरीला एकेरीत शिव्या द्यायचे काम द्यायचे आणि मुख्य म्हणजे ट्रंप ला गुटक्याची गुळणी धरायला शिकविणार म्हणजे बोलायला तोंड उघडायचे कामच नाही.
तूर्त इतकेच
  • Log in or register to post comments

श्या..तुम्ही आमच्या साहेबांना

चिनार
Sat, 10/15/2016 - 11:53 नवीन
श्या..तुम्ही आमच्या साहेबांना पुरते ओळखलेच नाही अजून..काही महत्वाचे अजेंडे खाली आहेत.. 1. अमेरिकन धरणांचा मूत्रविसर्जनच्या संदर्भाने अभ्यास 2. ख्रिश्चन धर्मियांच्या पोटजातींविषयी अभ्यास आणि अन्यायग्रस्त पोटजातींसाठी आंदोलनाची रूपरेषा 3. अमेरिकन एक्सप्रेस सारख्या मोठ्या बँकाच्या 'शेतकरी कर्जवाटप आणि वसुली' या विषयावर एक चर्चासत्र 4. 'अमेरिकन बँक आणि सहकार चळवळ- काळाची गरज' या विषयावर व्याख्यान 5. 'जात - कधी लपवावी आणि कधी काढावी' - या कादंबरीचे प्रकाशन 6. चेहरा एक,मुखवटे अनेक - या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती 7. नैसर्गीक आपत्तीकडे सुर्वणसंधी म्हणून कसे पाहावे याविषयावर अमेरिकन संसदेत भाषण 8. 'साहेब" या आगामी चरित्रपटासाठी वॉर्नर ब्रदर्ससोबत भागीदारीविषयी चर्चा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

खूप हिणकस आणि द्वेष भावनेने

विशुमित
Sat, 10/15/2016 - 12:02 नवीन
खूप हिणकस आणि द्वेष भावनेने दिलेला प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

एक राहिलेच..

चिनार
Sat, 10/15/2016 - 12:10 नवीन
एक राहिलेच.. 9. 'द्वेष -- करावा पण लपूनछपून' -- या विषयावर आधारित लघुकथांचे वाचन.. (या लघुकथा पुरोगामी महाराष्ट्रात साहेबांची सत्ता असताना आणि नसताना घडलेल्या असून..ह्यातले पात्र आणि घटना ह्या साहेबांचे निकटवर्तीय,कार्यकर्ते,संघटना ह्यांच्याशी थेट संबंधित असूनही सुसंकृत साहेबांचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

+1

सुखी
Sat, 10/15/2016 - 19:43 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

+11111111

सुखीमाणूस
Sat, 10/15/2016 - 22:57 नवीन
+11111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

अगागागागा

वटवट
Mon, 10/17/2016 - 17:35 नवीन
अगागागागा.... फुटलो राव हसून... येऊ द्या अजून.. ते अजून एक राहिलंच कि... "विस्तृत आणि मोठ्या भूभागाचा विकास" ह्या विषयावर सखोल अर्थपूर्ण चिंतन... (ट्रम्पपट्टा किंवा बुशपट्टा असं काहीतरी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

:)

पैसा
Sat, 10/15/2016 - 11:18 नवीन
थोडक्यात आटपलंत ओ! अजून मस्त फुलवता येईल हा विषय.
  • Log in or register to post comments

पाया रचलाय....

माम्लेदारचा पन्खा
Sat, 10/15/2016 - 11:49 नवीन
सगळ्यांनी थोड्या थोड्या विटा लावा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तरीपण काय या धाग्याचे 500

मोदक
Sat, 10/15/2016 - 11:59 नवीन
तरीपण काय या धाग्याचे 500 वगैरे होतील असे वाटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

मला या धाग्यावर दगड घालावासा

विशुमित
Sat, 10/15/2016 - 11:58 नवीन
मला या धाग्यावर दगड घालावासा वाटतोय. (सुसंस्कृतपणा आणि संयम या दोन गोष्टींनी हात बांधले आहेत) अगदी निरर्थक, बिनबुडाचा, पूर्वग्रह, ऐकीव आणि कोत्या मनाने अत्मरंजन करणारं विडंबन वाटलं.
  • Log in or register to post comments

लई शिरेस घ्यू नका...

चौकटराजा
Sat, 10/15/2016 - 12:03 नवीन
अशे निरथेक धागे अंमळ करमणुकीसाठी असतात.... तुम्ही शिरेस घेतलं तर मिपाकर इरेस पेटतील .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

धागाकर्त्याला दगड मारणार असला

मोदक
Sat, 10/15/2016 - 12:03 नवीन
धागाकर्त्याला दगड मारणार असला तर सांगा, पत्ता देतो. सोबतीला आणखी चार हितचिंतकही तयार होतील, मूक मोर्चा काढणार असाल तरी सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

आमची संस्कृती नाहीय ती दगड

विशुमित
Sat, 10/15/2016 - 12:10 नवीन
आमची संस्कृती नाहीय ती दगड मारण्याची. पण तरी पण पत्ता द्याच, भेटावं म्हणतोय त्यांना एकदा... हितचिंतक गोळा करण्याची जरुरी नाही एक व्हाट्सअप केला की होतात लगेच गोळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

भोसल्यांच्या घरी जाऊन त्यांचा

चिनार
Sat, 10/15/2016 - 12:24 नवीन
भोसल्यांच्या घरी जाऊन त्यांचा पाहुणचार घ्यायचा. आणि त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात ," एकेकाळी भोसले फडणवीसांना पेशवेपद द्यायचे आता फडणवीस भोसल्यांना देतात" असं जाहीररीत्या बोलायचं.
ही संस्क्रुती आणि हा सुसंस्कृतपणा अंगी असल्यावर वेगळे दगड मारण्याची संस्कृती असावीच लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

<<<<<<" एकेकाळी भोसले

विशुमित
Sat, 10/15/2016 - 12:50 नवीन
<<<<<<" एकेकाळी भोसले फडणवीसांना पेशवेपद द्यायचे आता फडणवीस भोसल्यांना देतात" असं जाहीररीत्या बोलायचं.>>>> मग त्याने काय झालं? भोसल्यानी लगेच भाजपला सोडचिट्टी दिली? तुम्हाला रूपक पण समजू नाही? याचा पूर्वइतिहास हा आहे.... http://indianexpress.com/article/india/politics/maharashtra-bjp-sends-shivaji-descendant-sambhaji-raje-to-rajya-sabha-2848038/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

मोदक राव...

विशुमित
Sat, 10/15/2016 - 12:53 नवीन
पत्ता द्या की...आज सुट्टीच आहे, भेटून येतो त्यांना हितचिंतकां बरोबर....!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

तुम्हाला त्यात रूपक वाटत असेल

चिनार
Sat, 10/15/2016 - 13:03 नवीन
तुम्हाला त्यात रूपक वाटत असेल तर तसे समजा..पण अंगाशी आल्यावर साहेबांना लगेचच हे रूपक फिरवावं लागलं होतं..(अर्थात त्यांच्यासाठी हे नवीन नाहीच ) बाकी ते सर्जिकल स्ट्राईक बद्दलचं बोलणं पण रूपक म्हणावं का ?? नवीन साहित्यिक पर्वाचा उदय होतोय म्हणायचं महाराष्ट्रात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

विशुमित

बोका-ए-आझम
Sat, 10/15/2016 - 14:29 नवीन
असले प्रतिसाद देण्याऐवजी सरळ भक्त आहोत असं म्हणा आणि सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

प्रतिसाद द्याचे की नाही, भक्त

विशुमित
Sat, 10/15/2016 - 15:00 नवीन
प्रतिसाद द्याचे की नाही, भक्त आहे म्हणायचं की नाही हे ठरवणारे आपण मिपाचे मालक नाही आहात, हे मला खात्रीशीर माहिती आहे. नाहीतर मिपाचे जे कोणी मालक असतील त्यांनी हा धागा उडवून टाकावा. प्रतिसाद बंद होतील. कोणी काही ही बेछूट आरोप करायचे, विडंबन करायचं, मनाला वाटेल ती भडास काढायची, वर म्हणायचं दगड घालण्यासाठी पत्ता देतो (जो त्यांनी अजून दिला नाही), आणि परत म्हणायचं प्रतिसाद देणं बंद करा ? जे धागा कर्त्याने आणि इतर मंडळींनी विडंबनच्या माध्यमातून आरोप केले आहेत, देशाच्या पाठीवर अजून तरी सिद्ध नाही झाले आणि सिद्ध करू ही शकणार नाही. जर हे कोणी सिद्ध करू शकत नसेल तर ही अमंगळ बोलबच्चन गिरी बंद करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

जे धागा कर्त्याने आणि इतर

श्रीगुरुजी
Sat, 10/15/2016 - 15:12 नवीन
जे धागा कर्त्याने आणि इतर मंडळींनी विडंबनच्या माध्यमातून आरोप केले आहेत, देशाच्या पाठीवर अजून तरी सिद्ध नाही झाले आणि सिद्ध करू ही शकणार नाही. जर हे कोणी सिद्ध करू शकत नसेल तर ही अमंगळ बोलबच्चन गिरी बंद करा.
या बाबतीत मात्र मी साहेबांना महाकौशल्याला दाद देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

दाद कशाला देता, मिठाची गुळणी

विशुमित
Sat, 10/15/2016 - 15:19 नवीन
दाद कशाला देता, मिठाची गुळणी घेऊन बसा. उत्तर नसलं की महाकौशल्य दिसतं. असो ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मिठाची गुळणी कशाला? साधं

श्रीगुरुजी
Sat, 10/15/2016 - 15:21 नवीन
मिठाची गुळणी कशाला? साधं कौतुक पण करायचं नाही का? उद्या आम्ही गप्प बसलो तर लगेच म्हणाल की साहेबांच्या कौशल्याचा मत्सर वाटतोय, म्हणून साधं कौतुक सुद्धा करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

मत्सर नाही...द्वेष !!

चिनार
Sat, 10/15/2016 - 15:23 नवीन
मत्सर नाही...द्वेष !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अमंगळ बोलबच्चन गिरी बंद करा.

चिनार
Sat, 10/15/2016 - 15:15 नवीन
अमंगळ बोलबच्चन गिरी बंद करा.
ही गोष्ट तुमच्या माननीय साहेबांना आणि त्यांच्या चेल्यांना सुद्धा पटवून द्या..आणि जर त्यांनी ऐकले नाहीच तर बोलून झाल्यावर ,"मी असं बोललोच नाही !!" हा पळपुटेपणा तरी बंद करायला सांगा.. -- 'साहेब' या व्यक्तीचा आणि प्रवुत्तीचा एक विरोधक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

तुम्ही विरोधक असा नाहीतर इतर

विशुमित
Sat, 10/15/2016 - 15:24 नवीन
तुम्ही विरोधक असा नाहीतर इतर कोणी त्याच आम्हाला काय देणे घेणे. म्हणजे तुम्ही फक्त एकांगीच प्रतिक्रिया देणार हे सिद्ध करताय आणि दुसऱ्यांना चेले चपाटे म्हणताय?? आम्ही बाजू घेतली की चेले चपाटे आणि तुम्ही बाजू घेतली की भक्त ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

ते जानकर पळाले काल खंडेरायाची

विशुमित
Sat, 10/15/2016 - 15:32 नवीन
ते जानकर पळाले काल खंडेरायाची शपथ घेऊन...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

साहेबांच्या तुलनेत जानकर

श्रीगुरुजी
Sat, 10/15/2016 - 15:35 नवीन
साहेबांच्या तुलनेत जानकर म्हणजे डेल स्टेनच्या तुलनेत ईशांत शर्मा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

इतर मिपावर द्वेष मुलुख

विशुमित
Sat, 10/15/2016 - 15:39 नवीन
इतर मिपावर द्वेष मुलुख प्रतिसाद देणाऱ्यांची तुलना न केलेली बरं, असंच सुचवायचं आहे ना तुम्हाला??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मी लिहिलं ते एक रूपक आहे.

श्रीगुरुजी
Sat, 10/15/2016 - 15:41 नवीन
मी लिहिलं ते एक रूपक आहे. रूपक समजून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

समजलो मी...!! धन्यवाद...!!

विशुमित
Sat, 10/15/2016 - 15:44 नवीन
समजलो मी...!! धन्यवाद...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अरेरे कुठे नेवुन ठेवलाय महाराष्ट्र माझा

अशोक पतिल
Sat, 10/15/2016 - 20:45 नवीन
जानकरांचि सुसंस्क्रूत मुक्ताफळे एकुन संपुर्ण महाराष्ट्र धन्य झाला ! इथे मात्र अजुन लघवी पुराण च . अरेरे कुठे नेवुन ठेवलाय महाराष्ट्र माझा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मी तुम्हाला चेले -चपाटे

चिनार
Sat, 10/15/2016 - 15:44 नवीन
मी तुम्हाला चेले -चपाटे म्हटलेलं नाही. अर्थात तुम्ही स्वतःला तसं काही समजत असाल तर माझा आक्षेप नाही. मी विरोधक आहे हे जाहीर करतोय. बाकी ते एकांगी, रूपक-बिपक वगैरे चालुद्या.. साहेबांचे आगामी काल्पनिक रूपक : 1. आम्ही सुद्धा अणू चाचण्या केल्या होत्या आमच्या वावरात. आम्हाला ते जाहीर करायची गरज नाही वाटली. 2. ह्या असल्या EBC सारख्या घोषणा आम्ही सुद्धा केल्या होत्या. आमच्या इतर निर्णयांप्रमाणे ह्या सुद्धा पूर्ण नाही केल्यात एवढंच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

हहपुवा

सुखीमाणूस
Sat, 10/15/2016 - 23:06 नवीन
फारच करमणूकप्रधान धागा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

सुपर्ब!

बोका-ए-आझम
Sat, 10/15/2016 - 15:22 नवीन
जे इथे कोणी म्हटलेलंच नाही त्यावर comments करण्याचं तुमचं कौशल्य जबरदस्तच आहे.
जे धागा कर्त्याने आणि इतर मंडळींनी विडंबनच्या माध्यमातून आरोप केले आहेत, देशाच्या पाठीवर अजून तरी सिद्ध नाही झाले आणि सिद्ध करू ही शकणार नाही.
सिद्ध झाले नाहीत हे ठीक आहे. कोणीही करु शकणार नाही असं तर साहेब पण म्हणत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

साहेब काय तुमच्या एकट्याचे आहेत का !

माम्लेदारचा पन्खा
Sat, 10/15/2016 - 18:42 नवीन
ते आमचेही श्रध्दास्थान आहे....खिशात नेहमी त्यांचा फोटो असतो..स्वत:साहेब सुध्दा त्यांच्याविषयीचे विनोद खेळकरपणे घेतात.... पण इथे तर "चाय से ज्यादा किटली गरम है" !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

भक्तीच एक उदाहरण,

चिनार
Sat, 10/15/2016 - 15:32 नवीन
भक्तीच एक उदाहरण, सर्जिकल स्ट्राईक वरील साहेबांच्या वक्तव्यावर भरपूर जोक्स सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यावर आमच्या ओळखीतला एक साहेबांचा भक्त तावातावाने म्हणाला, "साहेबांना बदनाम करण्याची फ्याशन आलीये आजकाल. साहेब काय चुकीचं बोलले? त्यांच्याकाळात सुद्धा सर्जिकल स्ट्राईक झाल्या होत्या. मग झाल्या असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे ना !" माझा प्रश्न ," साहेबांच्या या वक्तव्यावर तुझा विश्वास आहे का ?" "मला खरंखोटं माहिती नाही आणि मला ते जाणूनसुद्धा घ्यायचे नाही"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

लोकाना एवढ पण कळेना

सुखीमाणूस
Tue, 10/18/2016 - 07:10 नवीन
त्या काळातले सर्जिकल स्ट्राईक कसे प्रसिध्ध करणार होते? मुस्लिम अनुनयाचे काय झाले असते मग? त्यान्च्या भावना दुखवल्या गेल्या असत्या ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

>>>

श्रीगुरुजी
Sat, 10/15/2016 - 15:11 नवीन
<<<<<<" एकेकाळी भोसले फडणवीसांना पेशवेपद द्यायचे आता फडणवीस भोसल्यांना देतात" असं जाहीररीत्या बोलायचं.>>>> मग त्याने काय झालं? भोसल्यानी लगेच भाजपला सोडचिट्टी दिली? तुम्हाला रूपक पण समजू नाही?
रूपकबिपक असलं काही नव्हतं. ती साहेबांनी जाणूनबुजून टाकलेली जातीयवादी काडी होती. साहेब अशा जातीयवादी काड्या नेहमीच टाकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

नाय नाय गुरुजी..ते रूपकच होतं

चिनार
Sat, 10/15/2016 - 15:22 नवीन
नाय नाय गुरुजी..ते रूपकच होतं !! हे जातीयवाद वगैरे सगळे तुमच्या मनातले खेळ.. साहेबांचं मायमराठी साहित्यावरचं प्रेम ठाऊक आहे ना तुम्हाला...व्याकरण चालवतात तसे साहेब जात चालवतात (व्याकरणाच्या साहाय्याने)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हहपुवा!

श्रीगुरुजी
Sat, 10/15/2016 - 15:24 नवीन
हहपुवा! सहजच आठवलं. १९९० च्या निवडणुक प्रचारातलं साहेबांचं एक रूपक होतं - "पुण्यामुंबईच्या काही जणांना महाराष्ट्रात पेशवाई परत आणायची आहे".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

अगदी ब्रोबर. भांडारकर

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 11/10/2016 - 06:55 नवीन
अगदी ब्रोबर. भांडारकर इन्सिट्युट ची तोडफोड बहुदा आपोआप झाली असावी. रच्याकने
हितचिंतक गोळा करण्याची जरुरी नाही एक व्हाट्सअप केला की होतात लगेच गोळा.
अगदी अगदी. पण एक करा ढाई किलो का हात सहन होणार्‍याचं हितचिंतकांना व्हॉट्सअ‍ॅप करा. परत त्यांना 'पोचवण्याचीही' व्यवस्थाही नक्की करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

अगा बाबाव.!!

विशुमित
गुरुवार, 11/10/2016 - 15:12 नवीन
अगा बाबाव.!! सनी देओल आला. आपण जाम घाबरलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पुढची भेट कधी आहे आपली ?

माम्लेदारचा पन्खा
Sat, 10/15/2016 - 18:44 नवीन
लवकरच व्हावी अशी इच्छा आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा