Skip to main content

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ निकाल

लेखक गॅरी ट्रुमन यांनी सोमवार, 07/11/2016 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, अमेरिकेत मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणुकांसाठी मतदान होईल. भाप्रवे सकाळी ५.३० पासून मतमोजणी सुरू होईल. दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडायच्या प्रायमरी सुरू झाल्यानंतर मिपावर त्याविषयी लिहायला सुरवात केली होती पण नंतर इतर काही कामांमुळे त्या धाग्यांवर पाहिजे तितक्या प्रमाणात लिखाण करता आले नव्हते. तेव्हा निदान भारतातील निवडणुकांच्या मतमोजणीप्रमाणे अमेरिकेतल्या या निवडणुकांच्या मतमोजणीवर लाईव्ह धागा काढावा हा मानस आहे. शक्य झाल्यास बुधवारी रजा घेऊन या धाग्यावर जसेजसे निकाल येतील त्याप्रमाणे लिहिणार आहे. जरी रजा घेता आली नाही तरी कल स्पष्ट होऊन कोण अध्यक्षपदी विराजमान होणार हे नक्की झाल्यावरच ऑफिसला जायला निघणार आहे :) अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये इलेक्टोरल कॉलेज हा महत्वाचा घटक असतो. याविषयी मी मिपावर पूर्वी इथे लिहिले आहे. या निवडणुकांसाठी इलेक्टोरल कॉलेजमध्ये पुढीलप्रमाणे मते आहेतः Electoral College सध्याच्या विविध मतदानपूर्व चाचण्यांमध्ये पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे: Projections वरील चित्रात डेमॉक्रॅटिक पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद लाल रंगात दाखविली आहेत. तसेच डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या लाल रंगाने दाखविली आहेत. तर चुरस असलेली राज्ये पिवळ्या रंगाने दाखविली आहेत. नेब्रास्का आणि मेन राज्यात इलेक्टोरल कॉलेजमधील मते विभागली जातात तर इतर सर्व राज्यांमध्ये विजयी उमेदवाराला संबंधित राज्यातील सर्व मते मिळतात. नेब्रास्कामधील ५ मतांपैकी ४ मते रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे मिळतील तर पाचव्या मतासाठी चुरस असेल तसेच मेनमधील ४ मतांपैकी ३ मते डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे मिळतील तर एक मत रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारे असेल असा चाचण्यांचा अंदाज आहे. सर्व आकडे एकत्र केल्यावर डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे २०० मते तर रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे १५७ मते मिळतील. तसेच ६८ मते डेमॉक्रॅटिक पक्षाकडे झुकणारी असतील तर ४७ मते रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारी असतील. या राज्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल लागले तर हिलरींना २६८ तर ट्रम्प यांना २०४ मते मिळतील तर उरलेल्या ६६ मतांसाठी चुरस असेल. तेव्हा डॉनल्ड ट्रम्प यांना जिंकायचे असेल तर ही सगळी ६६ मते (अ‍ॅरिझोना, फ्लॉरीडा, न्यू हॅम्पशायर, नेवाडा, नॉर्थ कॅरोलायना आणि नेब्रास्कामधील चुरस असलेले एक) जिंकावी लागतील तर हिलरींना चुरस असलेल्या राज्यांपैकी एक राज्य जिंकले तरी चालणार्‍यातले असेल. तेव्हा सध्याचा अंदाज असा दिसत आहे की अध्यक्षपदी हिलरी क्लिंटन येतील. प्रत्यक्ष काय होते हे भाप्रवे प्रमाणे बुधवारी समजेलच.

वाचने 49960
प्रतिक्रिया 171

प्रतिक्रिया

सी.एन.एन ने टेक्ससमध्ये (२९ मते) डॉनल्ड ट्रम्पना 'प्रोजेक्टेड विनर' म्हणून जाहिर केले आहे. आताचे आकडे: डॉनल्ड ट्रम्पः १२८ हिलरी क्लिंटनः ९७

नॉर्थ कॅरोलायना (१५ मते): ७४% मते मोजून झाल्यावर ट्रम्प १.३% मतांनी पुढे. ओहायो (१८ मते): ५०% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प ७.४% मतांनी पुढे फ्लॉरीडा (२९ मते): ९४% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प १.५% मतांनी पुढे व्हर्जिनिया (१३ मते); ७५% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प २% मतांनी पुढे कोलोरॅडो (९ मते): ३८% मते मोजून झाल्यानंतर हिलरी क्लिंटन ८% मतांनी पुढे न्यू हॅम्पशायर (४ मते): २१% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प ०.५% मतांनी पुढे पेन्सिल्वेनिया (२० मते): १४% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प २०% मतांनी पुढे डॉनल्ड ट्रम्प व्हर्जिनियातील आघाडीमुळे नक्कीच खुषीत असतील. कारण हिलरींचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार टिम केन व्हर्जिनियाचे आहेत. पेन्सिल्वेनियामध्ये ट्रम्पना मोठी आघाडी दिसत असली तरी रिपब्लिकन स्ट्राँगहोल्ड असलेल्या भागांमधून आकडे आले आहेत. फिलाडेल्फिया, पिट्सबर्ग, हॅरीसबर्ग या डेमॉक्रॅटिक भागातील आकडे अजून आलेले नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

:( -दिलीप बिरुटे

कनेक्टिकट (७ मते): हिलरी क्लिंटन प्रोजेक्टेड विनर (अपेक्षेप्रमाणे) लुईझियाना (८ मते): डॉनल्ड ट्रम्प प्रोजेक्टेड विनर (अपेक्षेप्रमाणे) आताचे आकडे: डॉनल्ड ट्रम्पः १३६ हिलरी क्लिंटनः १०४

मिशिगन (१६ मते): २०% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प ४% मतांनी पुढे ओहायो (१८ मते): २०% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प १०% मतांनी पुढे नॉर्थ कॅरोलायना (१५ मते):७९% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प २.४% मतांनी पुढे विस्कॉन्सिन (१० मते):२४% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प ५.५ % मतांनी पुढे व्हर्जिनिया (१३ मते): ८०% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प ०.३ % मतांनी पुढे फ्लॉरीडा (२९ मते): ९५% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प १.२ % मतांनी पुढे न्यू हॅम्पशायर (४ मते): ३२% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प ०.९% मतांनी पुढे व्हर्जिनिया प्रचंड इंटरेस्टींग वाटत आहे.

floridaest. 95% in trump 49.0% clinton 47.8% north carolinaest. 79% in trump 50.1% clinton 47.3% virginiaest. 80% in trump 47.6% clinton 47.3%

ओहायो- मिशिगन ही राज्ये बराक ओबामांनी दोनदा जिंकली होती. त्या राज्यांमध्ये सध्या ट्रम्प पुढे आहेत. ही निवडणुक एकतर्फी असेल असे चित्र उभे केले गेले होते तितकी एकतर्फी निवडणुक ही नाही हे नक्की. हे लिहिता लिहिता हिलरी क्लिंटन व्हर्जिनियामध्ये ०.१% मतांनी आघाडीवर आहेत.अजूनही हिलरींचेच पारडे जड आहे पण ३०० पेक्षा कमी मते इलेक्टोरल कॉलेजमध्ये मिळतील असे दिसते.

आणखी काही प्रोजेक्शनः मोन्टाना (३ मते): ट्रम्प आताचे आकडे: ट्रम्पः १३९ क्लिंटनः १०४

व्हर्जिनियामध्ये हिलरी क्लिंटन आरामात जिंकतील असे मतदानपूर्व चाचण्यांमधून भाकित वर्तवले होते. ८३% मते मोजून झाल्यानंतर हिलरी अवघ्या ०.५% मतांनी पुढे आहेत. सी.एन.एन वर चाचण्या 'सुप्त लाटेचा' अंदाज घेण्यात अपयशी ठरल्या असे म्ह्णू लागल्या आहेत. मिशिगनमध्ये ट्रम्प पुढे आहेत, विस्कॉन्सीनमध्ये, अ‍ॅरिझोनामध्ये, न्यू हॅम्पशायरमध्ये ट्रम्प पुढे आहेत. अ‍ॅरिझोनामध्ये ट्रम्प जिंकतील हे अपेक्षित होते. पण मिशिगन, विस्कॉन्सीन आणि पूर्वेकडच्या न्यू हॅम्पशायरमध्येही ट्रम्प पुढे आहेत म्हणजे ही निवडणुक बरीच चुरशीची आहे. अजूनही मिशिगन, विस्कॉन्सीन या राज्यांमध्ये ट्रम्प जिंंकतील असे नाही तरीही हिलरींना 'रन फॉर मनी' मिळणार हे नक्की. आता कॅलिफॉर्नियातले आकडे आले की हिलरी आघाडीवर दिसतील.

In reply to by गॅरी ट्रुमन

व्हर्जिनिया चे रीझल्ट्स आलेत, क्लिंटन पूढे आहेत. फ्लॉरिडा मध्ये मँडेटोरी रीकाऊंट सुरु झालाय.. दोघांच्या मतांमध्ये ०.५ % चाच फरक आहे. मला एक कळत नाही , रिकाऊम्ट ने काय होणार? मशिन च मोजणी करतंय ना नाहीतरी? मग कितीही वेळा मोजा.. मतं कशी बदलतील?

In reply to by स्रुजा

व्हर्जिनियामध्ये मतमोजणी चालू आहे. ८४% मते मोजून झाली आहे. तर फ्लॉरीडामध्ये १.५% मते मोजून झाली आहेत. कदाचित फ्लॉरीडामधील काही काऊंटीमध्ये रिकाऊंट चालू आहे. एका अर्थी फ्लॉरीडातील पाम बीच काऊंटीमुळे जॉर्ज डब्ल्यू बुश २००० साली अध्यक्ष झाले होते.
रिकाऊम्ट ने काय होणार? मशिन च मोजणी करतंय ना नाहीतरी? मग कितीही वेळा मोजा.. मतं कशी बदलतील?
हो ना. आणि यावेळी कोणाही उमेदवाराचा भाऊ पण फ्लॉरीडाचा गव्हर्नर नाही :)

In reply to by गॅरी ट्रुमन

लोल .. रच्याकने, आता केव्हिन स्पेसीचा रीकाऊंट लागलाय एका चॅनलवर. स्पेसीने गोअरचं काम केलंय. भारी आहे सिनेमा.

आणखी काही प्रोजेक्शनः न्यू मेक्सिको (५ मते): हिलरी क्लिंटन मिसॉरी (१० मते) : डॉनल्ड ट्रम्प डॉनल्ड ट्रम्पः १४९ हिलरी क्लिंटनः १०९

मिशिगनमध्ये ट्रम्प ५% मतांनी आघाडीवर आहेत. २०१२ मध्ये ओबामांनी हे राज्य ९% मतांनी जिंकले होते. डिट्रॉईटच्या वेन काऊंटीमध्ये हिलरी आघाडीवर आहेत पण २०१२ मध्ये ओबामांना मिळालेल्या मतांपेक्षा बरीच कमी मते हिलरींना मिळत आहेत. विस्कॉन्सीनमध्ये ट्रम्प १.८% मतांनी आघाडीवर आहेत. मागच्या वेळी ओबामांनी हे राज्य ७% मतांनी जिंकले होते.

डॉनल्ड ट्रम्पने ओहायो घेतल्यानंतर आता ट्रम्प १६७ आणि क्लिंटन १०९ मतांवर आहेत. आता खरी मजा येणार आहे. कारण हिलरींनी कॅलिफॉर्निया (५५ मते) घेतल्यानंतर दोन्ही उमेदवार साधारणपणे एकाच पातळीवर येतील. पण हिलरी क्लिंटनसाठीची वाईट बातमी म्हणजे हक्काचे मिशिगन आणि विस्कॉन्सिन गमावले असेल तर मात्र हिलरींच्या हक्काची राज्ये फार राहणार नाहीत. अर्थात अजूनही मिशिगनमध्ये ३२% आणि विस्कॉन्सिनमध्ये ४२% मते मोजून झाली आहेत. तेव्हा चित्र अजूनही पालटू शकते. यापूर्वी रिपब्लिकन पक्षाने ओहायो जिंकले तरीही व्हाईट हाऊस गमावले असे यापूर्वी १९६० मध्ये रिचर्ड निक्सन यांच्याबरोबर झाले होते. त्यातल्या त्यात हिलरींसाठी चांगली बातमी म्हणजे व्हर्जिनियामध्ये त्यांना आता १.५% मतांची आघाडी आहे. व्हर्जिनिया पण गमावले असते तर मात्र हिलरींना फारच कठिण गेले असते.

व्हर्जिनियामधून हिलरी क्लिंटनना प्रोजेक्टेड विनर म्हणून जाहिर केले गेले आहे. हिलरी नक्कीच हुश्श असे म्हणाल्या असतील. आताचे आकडे: ट्र्म्पः १६७ क्लिंटनः १२२

विस्कॉन्सिनमध्ये अजूनही ट्रम्प आघाडीवर आहेत. या राज्यात रिपब्लिकन पक्ष जिंकला होता १९८४ मध्ये-- रॉनाल्ड रेगन जिंकले तेव्हा. त्यानंतर एकाही अध्यक्षीय निवडणुकांमध्ये या राज्यात रिपब्लिकन पक्ष जिंकलेला नाही. या राज्यातही ट्रम्प आघाडीवर असतील तर मात्र हिलरींसाठी ही फार चांगली बातमी नाही.

हिलरी अपेक्षेप्रमाणे कॅलिफॉर्निया आणि हवाई जिंकणार तसेच ट्रम्प आयडॅहो जिंकतील असे प्रोजेक्शन आहे. आताचे आकडे: हिलरी क्लिंटनः १९० डॉनल्ड ट्रम्पः १७१

trump 171 (49.3%) votes40,279,237 clinton 190 (46.4%) votes37,969,444 270 electoral votes to win

अजूनही नॉर्थ कॅरोलायना आणि जॉर्जियामध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत (एकूण ३१ मते). जॉर्जिया रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहे तर नॉर्थ कॅरोलायनामध्ये ९३% मते मोजून झाली आहेत. तेव्हा ही ३१ मते ट्रम्प यांच्या पारड्यात आली की सध्या हिलरींची आघाडी दिसत आहे ती पिछाडीत बदलेल. तसेच ट्रम्प अजूनही मिशिगन आणि विस्कॉन्सिन (एकूण २६ मते) आघाडीवर आहेत. या दोन राज्यांवर बरेच काही अवलंबून असेल.

ट्रम्पः २१६ क्लिंटनः १९० पेन्सिल्वेनियात क्लिंटन आघाडीवर

ऑरेगनमध्ये हिलरी क्लिंटन अपेक्षेप्रमाणे विजय मिळेल असे प्रोजेक्ट केले गेले आहे. ट्रम्पना नेब्रास्कामध्ये आणखी एक मत मिळेल असे प्रोजेक्शन आहे आहे. सी.एन.एन वर पुढील आकडे दाखवत आहेतः क्लिंटनः १९७ ट्रम्पः १८७ अ‍ॅरिझोनामध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत, फ्लॉरीडामध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत (एकूण ४० मते). तसेच मिशिगन-विस्कॉन्सिनमध्ये ट्रम्प २-२.५% मतांनी आघाडीवर आहेत. या राज्यांमध्ये ट्रम्पना अजूनही प्रोजेक्टेड विनर म्हणून सी.एन.एन ने जाहिर केलेले नाही. हे पोस्ट करता करता मिशिगनमध्ये ट्रम्प आता ०.८% मतांनी आघाडीवर आहेत.

पेन्सिल्वेनियामध्ये ८१% मते मोजून झाली आहेत आणि हिलरी क्लिंटन १.५% मतांनी आघाडीवर आहेत. हिलरींची पेन्सिल्वेनियामधील आघाडी कमी झाली आहे. चुकूनमाकून ट्रम्पनी हे राज्य जिंकले तर मात्र पूर्ण हॅवॉक होईल. आणि ट्रम्प जिंकले नाही तरीही हिलरींना या राज्यात इतक्या कडव्या प्रतिकाराची अपेक्षा नसावी.

सी.एन.एन ने फ्लॉरीडामधून ट्रम्प जिंकतील असे जाहिर केले आहे. आता ट्रम्पः २१६ क्लिंटनः १९७

हिलरी मिशिगनमध्ये पिछाडी कमी करत आहेत. विस्कॉन्सिनमध्ये अजूनही ट्रम्प आघाडीवर आहेत. जर हिलरींनी मिशिगन जिंकले आणि ट्रम्प यांनी विस्कॉन्सिन जिंकले तर २००० सालप्रमाणे चुरस बघायला मिळेल आणि विजयी उमेदवाराला २७० च्या आसपास मते मिळतील असे सी.एन.एन वर बोलायला लागले आहेत.

ट्रम्पः २३२ क्लिंटनः २०९ अंदाजः पेन्सिल्वेनिया - क्लिंटन वैस्कॉन्सिन, आयोवा - ट्रम्प

सी.एन.एन ने अपेक्षेप्रमाणे हिलरी क्लिंटन वॉशिंग्टन राज्य जिंकतील असे प्रोजेक्ट केले आहे. आताचे आकडे: ट्रम्पः २१६ क्लिंटनः २०९ ट्रम्प मिशिगनमध्ये १.३% मतांनी तर विस्कॉन्सिनमध्ये ३.५% मतांनी आघाडीवर आहेत.

ट्रम्प जॉर्जिया जिंकतील असे सी.एन.एन ने जाहिर केले आहे. आता-- ट्रम्पः २३२ क्लिंटनः २०९

In reply to by उपाशी बोका

काल म्हटल्याप्रमाणे अनेकांनी "आम्ही डॉनाल्ड ट्रम्पना मत देणार" असे चाचण्यांना सांगणे अप्रशस्त वाटल्यामुळे पोलिटिकली करेक्ट राहण्यासाठी "आम्ही हिलरींना मत देऊ" असे म्हटले पण प्रत्यक्षात त्यांनी ट्रम्पना मते दिली असे दिसत आहे. २००४ मध्ये भारतात लागला तसा दणका २०१६ मध्ये अमेरिकेत जनमतचाचण्यांना लागताना दिसत आहे. अजूनही निवडणुकीचा निकाल लागलेला नाही.पण हिलरी आरामात निवडून येतील असे वातावरण सगळ्या चाचण्यांनी उभे केले होते ते मात्र चुकीचे ठरले आहे हे नक्कीच. ही निवडणुक वाटली होती तितकी एकतर्फी नक्कीच झालेली नाही. हिलरी जिंकल्या तरी त्या थोडक्यात जिंकतील.

In reply to by गॅरी ट्रुमन

सिनेट आणि हाउस सुद्धा रिपब्लिकन्सच्या ताब्यात जाणार अशी लक्षणे दिसत आहेत. हिलरी प्रेसिडेण्ट झाली तरी फार काही करू शकेल अशी लक्षणे दिसत नाहीत.

पेन्सिल्वेनियामध्ये हिलरींची आघाडी आता ०.८% इतकीच राहिली आहे. तर युटामध्ये ट्रम्प अपेक्षेप्रमाणे मोठी आघाडी घेऊन आहेत.

डॉनल्ड ट्रम्प आयोवा जिंकतील असे सी.एन.एन ने प्रोजेक्ट केले आहे. आता-- ट्रम्पः २३८ क्लिंटन: २०९ आयोवा ट्रम्प जिंकतील हे अनपेक्षित नव्हते. पण इतर काही कल नक्कीच अनपेक्षित आहेत.

ट्रम्पला अजून २६ वोट हवी आहेत. अरिझोना तर रेड स्टेट आहे (११). मिशिगन (१६), विस्कॉन्सिन (१०) मध्ये ट्रम्प अघाडीवर आहे. सी.एन. एन. ने आत्ताच सांगितले की तो आयोवा जिंकेल. It is only matter of time for Trump to be next president.

आता पेन्सिल्वेनियामध्येही ट्रम्प ०.२% मतांनी आघाडीवर आहेत. विस्कॉन्सिनमध्ये त्यांनी आघाडी ४% पर्यंत नेली आहे आणि मिशिगनमध्ये १.९% मतांनी ते आघाडीवर आहेत. पेन्सिल्वेनियामधून हिलरींचा पराभव झाला तर मी ऑफिसला जायला मोकळा होईन :)

President 85 electoral votes still available Clinton 209 Trump 244 ------------- 72% reporting Votes Donald Trump Republican Party 48% 5,10,61,310 Hillary Clinton Democratic Party 47% 4,98,95,788 ------------------------------------- US Senate 34 of 100 seats up for election Democrats 46 - 5 needed Republicans 48 - 3 needed 51 to win majority --------------------------------- US House 435 seats up for election Democrats 157 - 61 needed Republicans 213 - 5 needed 218 to win majority

युटा आणि अ‍ॅरिझोनामध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. ती आणखी १७ मते ट्रम्पच्या पारड्यात गेली तर सी.एन.एन च्या आकड्यांप्रमाणेही ट्रम्प २५५ वर जातील. तसेच अलास्कामधील ३ मते पण ट्रम्पना मिळतील अशी चिन्हे आहेत. तेव्हा होतील मते २५८. मिशिगन, पेन्सिल्वेनिया, विस्कॉन्सिन आणि न्यू हॅम्पशायरवर सगळे काही अवलंबून आहे. हे लिहितालिहिता पेन्सिल्वेनियामध्ये ट्रम्प २,८५७ मतांनी (०.१% पेक्षा कमी) आघाडीवर आहेत. ही निवडणुक २००० सालच्या निवडणुकीपेक्षाही चुरशीची होताना दिसत आहे.

नेट सिल्वरने ट्रम्प जिंकायची शक्यता ८४% दाखवली आहे. काल हा आकडा २९% होता!!

गॅरी जॉन्सन आणि ती दुसरी बाई यांनी बरीच मतं खाल्ली म्हणे फ्लोरिडात. हिलरी समर्थक त्यांना खूप श्या घालतायत.

In reply to by अनुप ढेरे

ट्रम्प आणि हिलरी यांच्यात आता १ टक्क्याचा फरक दिसतो आहे तर त्या दोघानी मिळून आतापर्यंत ४% मते खाल्ली आहेत.

न्यू हॅम्पशायरमध्ये हिलरी क्लिंटन १८ मतांनी आघाडीवर!!

सी.एन.एन ने नेवाडामधून हिलरी क्लिंटन जिंकतील असे प्रोजेक्ट केले आहे. आताचे आकडे: ट्रम्पः २३८ क्लिंटनः २१५

ट्रम्पभौ जिंकतायत - पेनसिल्व्हानियासह उरलेल्या राज्यांमध्येही आघाडीवर आहेत. हिलरीबाईनी दोन भाषणं तयार ठेवली आहेत.

पेन्सिल्वेनियामध्ये ९३% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प ०.५% मतांनी तर मिशिगनमध्ये ७५% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प ०.९% मतांनी आघाडीवर आहेत. विस्कॉन्सिनमध्ये ८४% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प ३.५% मतांनी आघाडीवर आहेत.

आता पेन्सिल्वेनियामध्ये ९५% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प ०.६% मतांनी तर मिशिगनमध्ये ७५% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प १.१% मतांनी आघाडीवर आहेत. विस्कॉन्सिनमध्ये ८४% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प ३.४% मतांनी आघाडीवर आहेत. या तीनपैकी दोन राज्ये जरी ट्रम्पनी जिंकली तरी ४५ वे अध्यक्ष म्हणून डॉनल्ड ट्रम्प २० जानेवारी २०१७ रोजी शपथ घेतील.

अरिझोनाची सुध्दा 11 निवडणूकीय मते आहेत ना?

In reply to by बोलबोलेरो

नाही. सी.एन.एन ने अ‍ॅरिझोनाची ११ मते अजून ट्रम्पच्या पारड्यात धरलेली नाहीत. थोड्याच वेळात अ‍ॅरिझोनामधूनसुध्दा ट्रम्प प्रोजेक्टेड विनर म्हणून सी.एन.एन जाहिर करेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

विस्कॉन्सिन्स , मिशिगन, अ‍ॅरिझोना तिन्ही मध्ये ट्रंप भाऊ पुढे... अब की बार , ट्रंप सरकार ! आत्ताचा नंबर : ट्र २४४/ क्लि २१५

टाइम्स ऑफ इंडिया ची बातमी ट्रम्प 264 (AP )