अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ निकाल
वरील चित्रात डेमॉक्रॅटिक पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद लाल रंगात दाखविली आहेत. तसेच डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या लाल रंगाने दाखविली आहेत. तर चुरस असलेली राज्ये पिवळ्या रंगाने दाखविली आहेत.
नेब्रास्का आणि मेन राज्यात इलेक्टोरल कॉलेजमधील मते विभागली जातात तर इतर सर्व राज्यांमध्ये विजयी उमेदवाराला संबंधित राज्यातील सर्व मते मिळतात. नेब्रास्कामधील ५ मतांपैकी ४ मते रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे मिळतील तर पाचव्या मतासाठी चुरस असेल तसेच मेनमधील ४ मतांपैकी ३ मते डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे मिळतील तर एक मत रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारे असेल असा चाचण्यांचा अंदाज आहे.
सर्व आकडे एकत्र केल्यावर डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे २०० मते तर रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे १५७ मते मिळतील. तसेच ६८ मते डेमॉक्रॅटिक पक्षाकडे झुकणारी असतील तर ४७ मते रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारी असतील. या राज्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल लागले तर हिलरींना २६८ तर ट्रम्प यांना २०४ मते मिळतील तर उरलेल्या ६६ मतांसाठी चुरस असेल. तेव्हा डॉनल्ड ट्रम्प यांना जिंकायचे असेल तर ही सगळी ६६ मते (अॅरिझोना, फ्लॉरीडा, न्यू हॅम्पशायर, नेवाडा, नॉर्थ कॅरोलायना आणि नेब्रास्कामधील चुरस असलेले एक) जिंकावी लागतील तर हिलरींना चुरस असलेल्या राज्यांपैकी एक राज्य जिंकले तरी चालणार्यातले असेल.
तेव्हा सध्याचा अंदाज असा दिसत आहे की अध्यक्षपदी हिलरी क्लिंटन येतील. प्रत्यक्ष काय होते हे भाप्रवे प्रमाणे बुधवारी समजेलच. In reply to कोणीही येवो .... by गामा पैलवान
ट्रंप नावापुरतेच रिपब्लिकन आहेत.हो डॉनल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन असले तरी फ्री ट्रेडचा विरोध करत आहेत. तसेच इमिग्रेशनच्याही विरोधात आहेत. यापूर्वी रिचर्ड निक्सन हे मध्याच्या उजवीकडच्या लोकांच्या गळ्यातले ताईत होते. पण त्यांनीच किंमतींवर नियंत्रण लावण्यासारखे उजवे लोक कडाडून विरोध करतात ते निर्णय घेतले होते. ट्रम्प निवडून आले तरी रिपब्लिकनांपेक्षा अपेक्षित असलेले निर्णय ते घेणे कठिणच आहे. रॉनाल्ड रेगन यांची अफगाणिस्तानप्रकरणातील भूमिका कितीही पटत नसली तरी त्यांच्यानंतर हाडाचा रिपब्लिकन अध्यक्ष झाला नाही असेच म्हणायला हवे.
In reply to हो by गॅरी ट्रुमन
In reply to भाकित by रमेश आठवले
In reply to माझ्या माहितीनूसार त्यांचे by निओ१
In reply to भाकित by रमेश आठवले
In reply to धन्यवाद साहेब. by John McClain
- जर सगळे सुरळीत पार पडले तर मंगळवारच्या (नोव्हेंबर ८ च्या) रात्रीच्या बारापर्यंत (बॉस्टन टाईम) राष्ट्राध्यक्षिय निवडणुकीचा निकाल लागला असेल. काँग्रेस आणि सिनेटचे निकाल कळायला बुधवार सकाळ उजाडेल.
- पण जर का काही गडबड झाली: म्हणजे कुठल्याही राज्यात दोघांमधील इलेक्टोरल कॉलेज मधला फरक नगण्य असेल, तर निवडणुक प्रक्रीयात आपोआप फेरमोजणी करावी लागते. तसे झाले तर निकाल लागायला उशीर होऊ शकतो.
- त्याही पुढे जर कुठल्याही बाजूमुळे न्यायालयीन युद्ध सुरू झाले तर कितीही रेंगाळू शकते. कारण त्यामधे खालच्या कोर्टापासून सुरवात होऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला सरकत जाणार. तिथे रिपब्लिकन पक्षाने ओबामाला न्यायाधिश नेमून न दिल्याने ८ न्यायाधिश आहेत. त्यातील चार हे उजव्या विचारांचे अथवा रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षांनी नेमलेले आहेत तर ४ डेमोक्रॅट राष्ट्राध्यक्षांनी. परीणामी जर त्यांच्यातले मत टाय झाले तर बोंब!
- ते काही झाले तरी घटनेनुसार २० जानेवारी २०१७ हा ओबामाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शेवटचा दिवस आहे. जर तो पर्यंत राष्ट्राध्यक्ष ठरला नाही, तर अमेरीकन काँग्रेसचा सभापती हा राष्ट्रध्यक्ष होतो. तो कोण असेल हे उद्याच्या निवडणुकीत बहुमत कुणाला मिळते यावर आणि पक्षांतर्गत राजकारणावर अवलंबून राहील!
शक्य झाल्यास बुधवारी रजा घेऊन या धाग्यावर जसेजसे निकाल येतील त्याप्रमाणे लिहिणार आहे.बाकी निवडणुकीच्या निकालाचं सोडा पण निवडणुकीवर लिहिण्यासाठी एक दिवस रजा घेणार आहे हे वाचून ड्वाले पानावले! :) इथं शिंदळीचं सर्कार मतदानाच्या दिवशीदेखील सुट्टी देत नाही. कामाअगोदर, नंतर, किंवा लंचटाईममध्ये मतदान करावं लागतं!! :( त्या पार्श्वभूमीवर मतदानावर लिहिण्यासाठी सुट्टी घेण्याचा बेत् वाचल्यामुळे मुद्दाम लॉग-इन होऊन प्रतिसाद दिला. लगे रहो..
In reply to क्या बात है, गिर्याभाऊ! by पिवळा डांबिस
In reply to आमचा एक दोस्त लोकांनी गेल्या by अनुप ढेरे
In reply to अमेरिकन निवडणूकीत मतदानाचा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to क्या बात है, गिर्याभाऊ! by पिवळा डांबिस
In reply to मला अस वाटतय की मतदानाच्या by शाम भागवत
मतदानाच्या प्रमाणात ७ ते ८ टक्के वाढ होईल व भल्याभल्यांचे अंदाज चुकतील.मतदानाला सुरवात झाली आहे. सध्या मतदानाचा वेग किती आहे याविषयी माहिती नाही.तेव्हा त्याविषयी काही लिहित नाही. तरीही समजा मतदानाचे प्रमाण वाढले तरी भारतात किंवा इंग्लंडमध्ये जितका फायदा मिळाला असता तितका अमेरिकेत मिळेल असे नाही. याचे कारण इलेक्टोरल कॉलेज हा प्रकार. दोन्ही कोस्टवर तसेच मिशिगन आणि मिन्नेसोटा सारख्या राज्यांमध्ये अध्यक्षीय निवडणुकांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्ष खूपच प्रबळ आहे. तर मधल्या राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्ष प्रबळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे ठळकपणे बघायला मिळाले आहे. रिपब्लिकन पक्षाने कॅलिफॉर्निया शेवटचे जिंकले होते ते १९८८ मध्ये थोरल्या बुशनी तर न्यू यॉर्क शेवटचे जिंकले होते १९८४ मध्ये रॉनाल्ड रेगन यांनी.तर अमेरिकेच्या मध्य भागातील कॅन्सस हे राज्य डेमॉक्रॅटिक पक्षाने शेवटचे जिंकले होते १९६४ मध्ये लिंडन जॉन्सन यांनी (आणि त्यापूर्वी १९३६ मध्ये फ्रॅन्कलीन रूझवेल्ट यांनी). एकंदरीत रिपब्लिकन पक्षाचे प्राबल्य असलेली राज्ये जिंकण्यात गेल्या काही निवडणुकांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्ष अधिक यशस्वी झालेला आहे पण रिपब्लिकन पक्षाला मात्र डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्राबल्यक्षेत्राला खिंडार तितक्या सहजपणे पाडता आलेले नाही. उदाहरणार्थ १९९२ मध्ये बिल क्लिंटन यांनी रिपब्लिकन पक्षाचे प्राबल्य असलेली लुईझियाना, अरकॉन्सॉ, टेन्नीसी, मोन्टाना इत्यादी राज्ये जिंकली होती.पण कोस्टवरील राज्ये जिंकणे रिपब्लिकन पक्षाला गेल्या काही निवडणुकांमध्ये शक्य झालेले नाही. त्यातच इलेक्टोरल कॉलेजमुळे अजून गुंतागुंत वाढेल असे वाटते. अमेरिकेच्या मध्य भागातील परंपरावादी लोकांना एक स्त्री अध्यक्ष झालेली आवडेल असे वाटत नाही.तसेच ओबामांच्या ८ वर्षांच्या कारकिर्दीनंतर त्यांच्या 'व्हाईट सुप्रीमसी' ला काही प्रमाणावर तरी धक्का बसला असेल असे वाटते. त्यातून रिपब्लिकन पक्ष मुळात प्रबळ आहे अशा राज्यांमधून (टेक्सस,ओक्लाहोमा,कॅन्सस इत्यादी) ट्रम्पना जोरदार विजय मिळाला तरी त्यातून इलेक्टोरल कॉलेजमध्ये आणखी मते मिळणार नाहीत. मला वाटते की ट्रम्पची उघडपणे बाजू घेणे हे 'पोलिटिकली इनकरेक्ट' आहे. त्यामुळे अनेक मतदारांनी मतदानपूर्व चाचण्यांना आम्ही हिलरींना मत देऊ असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात ते ट्रम्पना मत देतील असे घडले तरच ट्रम्प जिंकतील. अन्यथा हिलरींचे पारडे जड आहे. असो. पुढील काही तासातच नक्की काय ते समजेल.
In reply to कोमीने शेपूट घातली by गामा पैलवान
In reply to ह्यांच्याकडे फक्त दोनच पक्ष by मराठी_माणूस
In reply to तसे बरेच लहान पक्ष आहेत. by श्रीगुरुजी
कोणत्याही विशिष्ट धर्माचे लांगूलचालन होत नसल्याने धम्रावर आधारीत पक्ष नसतात.हे नक्की खरं आहे का?
In reply to कोणत्याही विशिष्ट धर्माचे by अनुप ढेरे
In reply to तसे बरेच लहान पक्ष आहेत. by श्रीगुरुजी
अध्यक्षीय पद्धतीमुळे प्रादेशिक पक्ष (असल्यास) राष्ट्रीय राजकारणात हस्तक्षेप करू शकत नाहीत.असा नियम आहे का?
In reply to हिलरी आणि ट्रंप इतके नालायक by पुंबा
असा नियम आहे का?असा नियम नाही. पण अध्यक्षीय निवडणुक असल्यामुळे निवडणुक व्यक्तिकेंद्रीत बनते. अशा परिस्थितीत पक्षाच्या पाठबळाशिवाय किंवा प्रादेशिक पक्षाच्या प्रादेशिक पाठबळावर पूर्ण देशात अध्यक्ष म्हणून निवडून जाता येणे कठिणच आहे. भारतातही देवेगौडा संसदीय पध्दत आहे म्हणून पंतप्रधान झाले. पण देवेगौडांनी अध्यक्षपदाची निवडणुक लढवली असती तर कर्नाटक वगळता इतर राज्यांमध्ये त्यांचे काय झाले असते याची कल्पना करणे फारसे अवघड नाही. तरीही एखादा तगडा उमेदवार असेल तर अध्यक्षीय निवडणुकांमध्ये बर्यापैकी मते घेऊ शकतो. पण अध्यक्षपदावर निवडून जाणे अर्थातच कठिण असते.उदाहरणार्थ १९९२ मध्ये रॉस पेरॉ यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवून सुमारे १८-१९% मते घेतली. थोरल्या बुशचा १९९२ मध्ये पराभव झाला त्याला ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीबरोबरच रॉस पेरॉ हे पण जबाबदार होते. यापूर्वीचे उदाहरण घ्यायचे तर १९०१-१९०९ या काळात थिओडोर रूझवेल्ट अध्यक्ष होते.त्यानंतर १९०९-१९१३ या काळात विलिअम हॉवर्ड टाफ्ट हे अध्यक्ष होते. १९१२ च्या निवडणुकांमध्ये लढत होती रिपब्लिकन टाफ्ट आणि डेमॉक्रॅटिक वुड्रो विल्सन यांच्यात. पण माजी अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्या टर्मसाठी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली आणि बर्यापैकी मते घेतली (किंबहुना टाफ्ट यांची मते फोडली). त्यातून टाफ्ट यांचा दणकून पराभव झाला. टाफ्ट यांनी केवळ युटा आणि व्हरमॉन्ट ही दोनच राज्ये जिंकली तर रूझवेल्ट यांनी सहा राज्ये जिंकली. विद्यमान अध्यक्षांचा निवडणुकीत इतका प्रचंड मोठा पराभव त्यानंतर झालेला नाही. तसेच १९६८ च्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन रिचर्ड निक्सन यांनी डेमॉक्रॅटिक हर्बर्ट हम्फ्रे यांचा पराभव केला. त्या निवडणुकांमध्ये जॉर्ज वॉलेस या तिसर्या उमेदवारानेही १२-१३% मते घेतली होती आणि ५ राज्ये जिंकली होती. इतर प्रतिसादांना वेळ मिळेल त्याप्रमाणे उत्तर देतोच.
In reply to हिलरी आणि ट्रंप इतके नालायक by पुंबा
In reply to काय फरक पडतो? by रविकिरण फडके
प्रेसिडेंट म्हणजे नामधारी आहेहं... शक्य आहे.. कारण ओबामा तसा भला माणूस. पण काही विशेष उजेड पाडलाय त्याने असं वाटत नाही. युद्धखोरी न करण्यासाठी / किंबहूना गप्प राहण्यासाठी शांततेचं नोबेल पदरात पडलंय.
In reply to अगदी पहिले कल by गॅरी ट्रुमन
In reply to फ्लॉरीडा-नॉर्थ कॅरोलायना by गॅरी ट्रुमन
In reply to फ्लॉरीडा by गॅरी ट्रुमन
In reply to बेसिक प्रश्न by अनन्त अवधुत
In reply to हो by गॅरी ट्रुमन
In reply to टेक्ससमधील धक्कादायक कल by गॅरी ट्रुमन
In reply to प्रोजेक्टेड विनर साऊथ कॅरोलायना, मिसीसीपी, ओक्लाहोमा by गॅरी ट्रुमन
In reply to फरक तर फार कमी राहिला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आताचे आकडे by गॅरी ट्रुमन
In reply to http://m.rediff.com/news by श्रीगुरुजी
In reply to चुरशीची निवडणुक by गॅरी ट्रुमन
In reply to व्हर्जिनिया चे रीझल्ट्स आलेत, by स्रुजा
रिकाऊम्ट ने काय होणार? मशिन च मोजणी करतंय ना नाहीतरी? मग कितीही वेळा मोजा.. मतं कशी बदलतील?हो ना. आणि यावेळी कोणाही उमेदवाराचा भाऊ पण फ्लॉरीडाचा गव्हर्नर नाही :)
In reply to व्हर्जिनिया-फ्लॉरीडा by गॅरी ट्रुमन
In reply to आकडे by गॅरी ट्रुमन
In reply to हिलरी व्हर्जिनिया घेणार by गॅरी ट्रुमन
In reply to सुधारणा by गॅरी ट्रुमन
In reply to १३१ वर आल्या क्लि. by स्रुजा
In reply to अजून कुठले राज्य हिलरींनी by गॅरी ट्रुमन
In reply to अजून कुठले राज्य हिलरींनी by गॅरी ट्रुमन
In reply to नॉर्थ कॅरोलायना-जॉर्जिया by गॅरी ट्रुमन
In reply to नॉर्थ कॅरोलायना-जॉर्जिया by गॅरी ट्रुमन
In reply to गूगल ला विचारा by संग्राम
In reply to जॉर्जियामध्ये ट्रम्प by गॅरी ट्रुमन
In reply to आता सी.एन.एन.वर अॅण्डरसन by उपाशी बोका
In reply to जनमतचाचण्यांना दणका by गॅरी ट्रुमन
In reply to पेन्सिल्वेनिया by गॅरी ट्रुमन
In reply to गूगल वर by पैसा
In reply to गॅरी जॉन्सन आणि ती दुसरी बाई by अनुप ढेरे
In reply to आणि ऍरिझोना? by बोलबोलेरो
In reply to नाही by गॅरी ट्रुमन
In reply to एक मूलभूत प्रश्न by रविकिरण फडके

कोणीही येवो ....