नमस्कार मंडळी,
अमेरिकेत मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणुकांसाठी मतदान होईल. भाप्रवे सकाळी ५.३० पासून मतमोजणी सुरू होईल. दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडायच्या प्रायमरी सुरू झाल्यानंतर मिपावर त्याविषयी लिहायला सुरवात केली होती पण नंतर इतर काही कामांमुळे त्या धाग्यांवर पाहिजे तितक्या प्रमाणात लिखाण करता आले नव्हते. तेव्हा निदान भारतातील निवडणुकांच्या मतमोजणीप्रमाणे अमेरिकेतल्या या निवडणुकांच्या मतमोजणीवर लाईव्ह धागा काढावा हा मानस आहे. शक्य झाल्यास बुधवारी रजा घेऊन या धाग्यावर जसेजसे निकाल येतील त्याप्रमाणे लिहिणार आहे. जरी रजा घेता आली नाही तरी कल स्पष्ट होऊन कोण अध्यक्षपदी विराजमान होणार हे नक्की झाल्यावरच ऑफिसला जायला निघणार आहे :)
अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये इलेक्टोरल कॉलेज हा महत्वाचा घटक असतो. याविषयी मी मिपावर पूर्वी इथे लिहिले आहे. या निवडणुकांसाठी इलेक्टोरल कॉलेजमध्ये पुढीलप्रमाणे मते आहेतः
सध्याच्या विविध मतदानपूर्व चाचण्यांमध्ये पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे:
वरील चित्रात डेमॉक्रॅटिक पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद लाल रंगात दाखविली आहेत. तसेच डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या लाल रंगाने दाखविली आहेत. तर चुरस असलेली राज्ये पिवळ्या रंगाने दाखविली आहेत.
नेब्रास्का आणि मेन राज्यात इलेक्टोरल कॉलेजमधील मते विभागली जातात तर इतर सर्व राज्यांमध्ये विजयी उमेदवाराला संबंधित राज्यातील सर्व मते मिळतात. नेब्रास्कामधील ५ मतांपैकी ४ मते रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे मिळतील तर पाचव्या मतासाठी चुरस असेल तसेच मेनमधील ४ मतांपैकी ३ मते डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे मिळतील तर एक मत रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारे असेल असा चाचण्यांचा अंदाज आहे.
सर्व आकडे एकत्र केल्यावर डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे २०० मते तर रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे १५७ मते मिळतील. तसेच ६८ मते डेमॉक्रॅटिक पक्षाकडे झुकणारी असतील तर ४७ मते रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारी असतील. या राज्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल लागले तर हिलरींना २६८ तर ट्रम्प यांना २०४ मते मिळतील तर उरलेल्या ६६ मतांसाठी चुरस असेल. तेव्हा डॉनल्ड ट्रम्प यांना जिंकायचे असेल तर ही सगळी ६६ मते (अॅरिझोना, फ्लॉरीडा, न्यू हॅम्पशायर, नेवाडा, नॉर्थ कॅरोलायना आणि नेब्रास्कामधील चुरस असलेले एक) जिंकावी लागतील तर हिलरींना चुरस असलेल्या राज्यांपैकी एक राज्य जिंकले तरी चालणार्यातले असेल.
तेव्हा सध्याचा अंदाज असा दिसत आहे की अध्यक्षपदी हिलरी क्लिंटन येतील. प्रत्यक्ष काय होते हे भाप्रवे प्रमाणे बुधवारी समजेलच.

तेव्हा सध्याचा अंदाज असा दिसत आहे की अध्यक्षपदी हिलरी क्लिंटन येतील. प्रत्यक्ष काय होते हे भाप्रवे प्रमाणे बुधवारी समजेलच. वर्गीकरण
वाचने
49960
प्रतिक्रिया
171
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणीही येवो ....
हो
In reply to कोणीही येवो .... by गामा पैलवान
भारतासाठी काळे
In reply to हो by गॅरी ट्रुमन
गॅरी ट्रुमन यांच्या या
भाकित
माझ्या माहितीनूसार त्यांचे
In reply to भाकित by रमेश आठवले
म्हणजे बरोबरच आहे
In reply to माझ्या माहितीनूसार त्यांचे by निओ१
हहह
In reply to भाकित by रमेश आठवले
शक्यता
कॅलिब्रेशन
धन्यवाद साहेब.
अपेक्षित आणि अनपेक्षित...
In reply to धन्यवाद साहेब. by John McClain
- जर सगळे सुरळीत पार पडले तर मंगळवारच्या (नोव्हेंबर ८ च्या) रात्रीच्या बारापर्यंत (बॉस्टन टाईम) राष्ट्राध्यक्षिय निवडणुकीचा निकाल लागला असेल. काँग्रेस आणि सिनेटचे निकाल कळायला बुधवार सकाळ उजाडेल.
- पण जर का काही गडबड झाली: म्हणजे कुठल्याही राज्यात दोघांमधील इलेक्टोरल कॉलेज मधला फरक नगण्य असेल, तर निवडणुक प्रक्रीयात आपोआप फेरमोजणी करावी लागते. तसे झाले तर निकाल लागायला उशीर होऊ शकतो.
- त्याही पुढे जर कुठल्याही बाजूमुळे न्यायालयीन युद्ध सुरू झाले तर कितीही रेंगाळू शकते. कारण त्यामधे खालच्या कोर्टापासून सुरवात होऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला सरकत जाणार. तिथे रिपब्लिकन पक्षाने ओबामाला न्यायाधिश नेमून न दिल्याने ८ न्यायाधिश आहेत. त्यातील चार हे उजव्या विचारांचे अथवा रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षांनी नेमलेले आहेत तर ४ डेमोक्रॅट राष्ट्राध्यक्षांनी. परीणामी जर त्यांच्यातले मत टाय झाले तर बोंब!
- ते काही झाले तरी घटनेनुसार २० जानेवारी २०१७ हा ओबामाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शेवटचा दिवस आहे. जर तो पर्यंत राष्ट्राध्यक्ष ठरला नाही, तर अमेरीकन काँग्रेसचा सभापती हा राष्ट्रध्यक्ष होतो. तो कोण असेल हे उद्याच्या निवडणुकीत बहुमत कुणाला मिळते यावर आणि पक्षांतर्गत राजकारणावर अवलंबून राहील!
यातील १ आणि २ इतकेच मुद्दे अपेक्षित आहेत. पण तसे काय ट्रंप राष्ट्राध्यक्षिय उमेदवार होणे पण अनपेक्षित होते आणि तरी झाले! तेंव्हा काही बोलता येत नाही! ;)क्या बात है, गिर्याभाऊ!
आमचा एक दोस्त लोकांनी गेल्या
In reply to क्या बात है, गिर्याभाऊ! by पिवळा डांबिस
अमेरिकन निवडणूकीत मतदानाचा
In reply to आमचा एक दोस्त लोकांनी गेल्या by अनुप ढेरे
धन्यवाद
In reply to अमेरिकन निवडणूकीत मतदानाचा by डॉ सुहास म्हात्रे
काळजी हिलरीची
In reply to क्या बात है, गिर्याभाऊ! by पिवळा डांबिस
आज मुलाच्या शाळेतही काही
मला अस वाटतय की मतदानाच्या
इलेक्टोरल कॉलेज
In reply to मला अस वाटतय की मतदानाच्या by शाम भागवत
एकूणातच यावेळी अमेरिकी
कोमीने शेपूट घातली
+/-
In reply to कोमीने शेपूट घातली by गामा पैलवान
इंटरेस्टिंग असतात ह्या इलेकशन्स
बाकी गॅरी शी सहमत
धन्यवाद
ही निवडणुक म्हणजे मुलायम वि.
ह्यांच्याकडे फक्त दोनच पक्ष
तसे बरेच लहान पक्ष आहेत.
In reply to ह्यांच्याकडे फक्त दोनच पक्ष by मराठी_माणूस
कोणत्याही विशिष्ट धर्माचे
In reply to तसे बरेच लहान पक्ष आहेत. by श्रीगुरुजी
=))
In reply to कोणत्याही विशिष्ट धर्माचे by अनुप ढेरे
हिलरी आणि ट्रंप इतके नालायक
In reply to तसे बरेच लहान पक्ष आहेत. by श्रीगुरुजी
असा नियम आहे का?
In reply to हिलरी आणि ट्रंप इतके नालायक by पुंबा
पध्दत वेगळी आहे...
In reply to हिलरी आणि ट्रंप इतके नालायक by पुंबा
काय फरक पडतो?
प्रेसिडेंट म्हणजे नामधारी आहे
In reply to काय फरक पडतो? by रविकिरण फडके
माणणीय डोनाल्ड ट्रंप भाऊसाहेब विजयी भाषण करताना
णवस
सीएनएन प्रोजेक्शन
अगदी पहिले कल
हेच
In reply to अगदी पहिले कल by गॅरी ट्रुमन
फ्लॉरीडा आणि व्हर्जिनियामधील पहिले कल
फ्लॉरीडा-व्हर्जिनिया
वेस्ट व्हर्जिनिया-फ्लॉरीडा
फ्लॉरीडा-व्हर्जिनिया
आणखी काही राज्यांमधील कल
फ्लॉरीडा-नॉर्थ कॅरोलायना
एनबीएसी
In reply to फ्लॉरीडा-नॉर्थ कॅरोलायना by गॅरी ट्रुमन
हिलरींनी आघाडी घेतली आहे
फ्लॉरीडा-ओहायो-नॉर्थ कॅरोलायना
वाचतोय
फ्लॉरीडा
बेसिक प्रश्न
In reply to फ्लॉरीडा by गॅरी ट्रुमन
हो
In reply to बेसिक प्रश्न by अनन्त अवधुत
धन्यवाद..!
In reply to हो by गॅरी ट्रुमन
फ्लॉरीडा
आता फ्लोरिडात ट्रम्प पुढे
फ्लॉरीडा-छत्तिसगड
टेक्ससमधील धक्कादायक कल
:) बालेकिल्ल्याला भगदाड...
In reply to टेक्ससमधील धक्कादायक कल by गॅरी ट्रुमन
प्रोजेक्टेड विनर साऊथ कॅरोलायना, मिसीसीपी, ओक्लाहोमा
फरक तर फार कमी राहिला.
In reply to प्रोजेक्टेड विनर साऊथ कॅरोलायना, मिसीसीपी, ओक्लाहोमा by गॅरी ट्रुमन
हिलरी
In reply to फरक तर फार कमी राहिला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता काय परिस्थिती ?
वाचतेय.. टिव्हीवर पहातेय!
व्हर्जिनिया-फ्लॉरीडा
टेक्सस
इतर काही राज्ये
नवे आकडे
ओहायो-नॉर्थ कॅरोलायना