पायाला लागली ठोकर तिथे बांधायचे घर
जिथे काहिच नाही तिथे आभाळ आहेच वर
जिवनाचे पुस्तक लिहिले मी स्वत:च्या चेहर्यावर
वाचता आले तर विश्वास ठेव वेदनांच्या त्या शब्दांवर
तूला कधीच ह्या मनाचा मजकूर समजला नाही
मी बंद लिफाफा आहे जो कुणी उघडलाच नाही
मी समजवण्याचा प्रयत्न केला पण तो कुणाला समजलाच नाही
मन माझे कुणाला कळलेच नाही, तळ हातावर पोट घेऊन
कष्टकरी बनवत फिरत होते, इवल्याशा पोटाची भुक
भागावी म्हणूनच तर रक्त जाळत होते...!
काव्यरस
वाचने
2695
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !!
धन्यवाद
प्रयत्न चांगला आहे पण
छानच ...
शेवटी थोडी गडबडली का? भावना