Skip to main content

मी आज केलेला व्यायाम...!!

लेखक मोदक यांनी बुधवार, 02/11/2016 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार, गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत. व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया. व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा. सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा. आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील. मग... आज किती व्यायाम केला..? ************************************************************** काही डिस्क्लेमर्स. १) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे. २) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया. ३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :) ************************************************************** टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 112732
प्रतिक्रिया 496

प्रतिक्रिया

जास्त काय बोलत नै, उद्याचं उद्या बघू.. आज डान्स केला 15 मिनिटे, हाय इंटेन्सिटी. 5+2+5+2+5

धाग्याने प्रोत्साहित केलं हे विशेषत्वाने नमूद करतो आजचा व्यायाम जोर २० * २ फ्रीवेट स्क्वॉट्स २० * २ (पॉवर स्क्वॉट्स. स्लो एक्स्टेन्शन, फास्ट कॉन्ट्रॅक्शन)

थरो वार्माप + जोर + पुल अप मग पाय लईच दुखत होते तर जीम मध्ये सर्कीट ट्रेनिंग करत बसलो. पहिल्याच राऊंडला घाम निघाला एसी मध्ये :) ९ व्यायाम प्रकारांचे ३ सेट केले. मग अ‍ॅब्सकरता लेग राईझ अन क्रंचेस.

आज ३.१६ चाललो. नंतर दीड तास चार सेट बॅडमिंटनचे खेळलो. आता मरणाचा थकलोय. आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा जावो. Screenshot_20161105-071035 -दिलीप बिरुटे

धाग्यामुळे स्फूर्ती घेवून मी पण आज २ कि.मी. चालणे व दोन मजले चढणे हा व्यायाम केला ! बघू किती दिवस चालतो.

सायकलिंगवाल्यांना एक प्रश्न: वरच्या फोटोतल्या सायकलचे टायर इतके बारीक आहेत म्हणजे ही रोडरेसिंग सायकल आहे का? एमटीबी सायकलचे टायर चांगलेच जाडजूड असतात ना? मग कुठली सायकल चांगली? कुठली फास्ट पळते?

In reply to by एस

MTB सायकल - सर्वात जाड टायर - जास्ती फ्रिक्षन त्यामुळे वेग कमी हायब्रीड सायकल - MTB पेक्षा अरुंद टायर - वेग बऱ्यापैकी जास्त पण पंक्चरची शक्यता जास्त रोड बाईक - एकदम अरुंद टायर - कमी फ्रिक्षन मुळे भरपूर वेग हायब्रीड आणि रोड बाईकला पंक्चर रेझीस्टन्ट टायर मिळतात त्यामुळे शक्यतो पंक्चर होत नाही (प्रशांत मालकांचे टायर साध्या हायब्रीडपेक्षाही अरुंद आहेत)

In reply to by मोदक

अच्छा! पण रस्त्यावर जर खडी, वाळू इ. पसरल्यामुळे रस्ता निसरडा झाला असल्यास अशा रस्त्यावर कुठली सायकल घसरण्याची शक्यता कमी असेल? मला तरी सुरक्षितता आणि दणकटपणा यासाठी एमटीबी बरी वाटते. विशेषतः आपल्याकडील रस्त्यांची अवस्था लक्षात घेऊन.

In reply to by एस

MTB ला तोड नाही. कशीही ताबडा, काहीही होत नाही, रस्त्यावर मजबूत ग्रिप असते फक्त जास्ती पळत नाही आणि थोडा जास्त घाम गाळावा लागतो

In reply to by मोदक

MTB,हायब्रीड आणि रोडबाईक ....... मी तिन्ही वापरल्या आहेत.... हायब्रीड आणि MTB आपल्या रस्त्यांसाठी उत्तम त्याशिवाय स्टॅमिना वाढवण्यास मदत करतात.... पण रोडबाईक(नावाप्रमाणे रोडच) जी एरोडायनॅमिक्स आणि कमी वजन ह्यॅ वैशिष्ठ्यांनी ओळखली जाते ती लांबचे पल्ले गाठण्यासाठी चांगली, तसं बघायला गेलात तर टुरिंग बाईक्स हा एक वेगळाच प्रकार आहे जो हायब्रीड/MTB + रोडबाईक यांच्या काॅम्बिनेशन मधुन उगवलेला आहे जो फारच मोठे पल्ले सामानसुमान बांधुन जाण्यासाठी वापरला जातो..... सुरवात करणार असाल तर हायब्रीड सर्वोत्तम, पण दिसायला चांगली म्हणून बरेचदा MTB ला प्राधान्य दिलं जातं! खुप सायकलींग केल्यावर रोडबाईक खुणावायला लागते आणि माझ्यासारखे काहीजण बळी पडतात ;)) एक असतांना दुसरी सायकल कशाला ? असा प्रश्न खंद्या सायकलस्वाराला पडत नाही तो त्याच्या किंवा तिच्या घरच्यांना पडतो.....

In reply to by एस

अजून एक प्रश्न याच अनुषंगाने : लेह-लडाख सायकलवारी करणारे कोणत्या प्रकारची सायकल वापरतात? एमटीबी की अजून दुसरी? (प्रश्न विचारून भंडावून सोडल्याबद्दल क्षमस्व. :-) )

In reply to by एस

लेह लदाखवाले बहुतांश MTB च वापरतात. अन्यथा मॉडीफाय केलेली टूरींग बाईक. पण तेथे MTB (आणि बुलेटच) राज्य करतात. आता विषय निघाला आहे म्हणून हा एक व्हिडीओ बघा. आणि त्याच ग्रूपचा हा आणखी एक अप्रतीम व्हिडीओ... (असे काहीतरी करायला कधी वेळ मिळेल देव जाणे....)

In reply to by मोदक

कलीजा खलास व्हीडीओ, मला खात्री आहे तुमचा ही असा व्हीडीओ आम्हाला ईथे पहायला मिळेल. अलिकडे एका दीवसात जास्तीत जास्त ८० की.मी. सायकल चालवलेला ...अनियमित झेन.

वार्मअप अन सर्किट ट्रेनिंग ४० मिनिटे.

रविवारी ब्याडमिंटनच्या म्याचेस असतात. त्यामुळे नो वॉक. पण जीवापेक्षा जास्त खेळतो. प्रचन्ड थकून जातो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डीबी (:D) इलेक्ट्रॉल किंवा ग्लुकॉन-डी आठवणीने प्या. लै बॅडमिंटन खेळले की प्रचंड घाम येतो आणि डीहायड्रेशन होते.

In reply to by मोदक

आज लटकून गेलो. दिवसभर लोळत राहीलो. :( -दिलीप बिरुटे

कालचा व्यायाम.. . काल पहिल्यांदाच बॅडमिंटन खेळताना पेडोमीटर ट्राय केले, खिशात मोबाईलचे वजन जाणवत होते. नीट खेळता आले नाही. तसेच या अ‍ॅपने सायकलिंगच्या वेळेतला थोडा डेटा ट्रॅक केला. .

आजचे चालणे २.८ कि.मी. रविवार असुन. हे केवळ ह्या धाग्यामुळेच. एरवी रविवारचा बहाना नक्कीच मिळाला असता !

(१० जोर १० स्क्वॅाट) * ४ न थांबता वॅार्मअप नंतर अर्थात

In reply to by वेल्लाभट

काय काय आणि किती वेळ करता

In reply to by प्रशांत

१ मनगटं वर्तुळाकार फिरवणे *१५ २ दोनही हात खांद्यातून एकदा पुढच्या दिशेने व एकदा मागच्या दिशेने वर्तुळाकार फिरवणे *१५ ३ टॉर्सो ट्विस्ट - विश्रामावस्थेत उभं राहून कमरेवरचं शरीर एकदा डावीकडे एकदा उजवीकडे फिरवणे * १५ ४ लॅट स्ट्रेच - विश्रामावस्थेत उभं राहून कमरेवरचं शरीर एकदा डावीकडे एकदा उजवीकडे झुकवणे * १५ ५ दोनही पाय ताठ ठेवून हात अंगठ्यांना टेकवणे * ५ (एक दोन सेकंद ही अवस्था धरून ठेवणे) ६ दोनही पाय ताठ ठेवून कमरेवरील शरीर मागे झुकवणे (कमान टाकण्याची सुरुवात) * ५ (एक दोन सेकंद ही अवस्था धरून ठेवणे) ७ चवड्यावर उभं राहणे * १५ ८ मानेला ताण देणे - अ) हनुवटी गळ्याच्या दिशेने आणणे व त्याच्या विरुद्ध नेणे ब) मान डावीकडे व उजवीकडे झुकवणे क) मान डावीकडे व उजवीकडे वळवणे * १५ ९ हाताचे तळवे एकदा पाठीमागे नेऊन एकमेकांना टेकवणे व एकदा छातीपुढून परस्पर विरुद्ध खांद्यांना टेकवणे (मिठी मारल्यागत) * १५ १० जंपिंग जॅक्स * ५० a

धाग्याला मिळणारा उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन मोदकरावांच्याच मार्गदर्शनाखाली Strava नामक मोबाईल अॅपवर खालील रनिंग क्लब सुरु करण्यात आला आहे. https://www.strava.com/clubs/miparunners जास्तीत जास्त सदस्य यातून प्रेरणा घेऊन पळणे चालू करतील या उद्देशाने हा क्लब बनवण्यात आलेला आहे तरी याचा अवश्य लाभ घ्या. ग्रुपचे नाव "MiPa Runners"

ह्या प्रकाराला व्यायाम म्हणता यावं का, ह्याबद्दल साशंक आहे. मात्र सात मजले नियमित चढतो. घर नि हापिस दोन्ही लैच वरच्या मजल्यावर आहेत. शक्यतो लिफ्ट वापरत नाही. हल्ली पायर्‍या चढण्याचं एक तंत्र सवयीनं जमतय असं मला वाटतय. सतत , शांतपणे पायर्‍या चढायच्या; न बोलता. श्वास घेताना साधारणतः पूर्ण छाती भरुन घ्यायचा, साधारणपणे भस्त्रिका करताना करतो तसा. न थांबता सात मजले मी सध्या चढू शकतोय दीडेक मिनिटात आणि वरती गेल्यावर फार काही धाप लागलेली नसते. वरती पोचल्यावर श्वास किंचितच जोरात घ्यावा लागतो; तेही फक्त मिनिटभर. नंतर अगदि नॉर्मल. अर्थात अशा पद्धतीनं श्वास घेणं बरोबर की चूक हे मात्र माहित नाही; मला शरीर शास्त्राबद्दल शून्य माहिती आहे. निव्वळ अनुभव, प्रयोग शेयर करत आहे. जाणकारांकडून खात्री करुन घ्यावी. दिवसभरात ऑल्मोस्ट लिफ्ट वापरायचीच नाही, असा प्रयत्न असतो. बहुतांशी यशस्वी होतो. कधी कधी प्रयोग म्हणून बॅक-टू-बॅक दोनदा सात मजले चढतो. म्हणजे तळमजल्यापासून वर यायचं; श्वास नॉर्मल होइ पर्यंत मिनिटभर थांबायचं; मग पुन्हा तळमजला; आणी लगेच पुन्हा वरती यायचं. हे करुन पाहिलं. दोनदा चढउतार करुनही ऑल्मोस्ट काहीच दम लागला नाही. ( मिनिटभरात श्वास नॉर्मल होतो) धावणे , जिम , पोहणे , सायकलिंग ह्या गोष्टींसाठी मात्र वेगळा वेळ काढणे अजून जमत नाहिये :(

४२.४५ किमी, १:३८ तास, वेग २५.८ ते२६ किमी/तास...... एक दिवस आराम आणि एक दिवस प्रवास असे दोन दिवस आॅफ होते...

काल थकल्यामुळे आज पिव्वर आराम केला. पण उद्या वॉक ५ किमी झालाच पाहिजे. -दिलीप बिरुटे

आज ८. ८ किमी चाललो , १ तास १९ मिनिटे लागली , ८. ५९ मिनीट /किमी , ८५० कॅलरिज जळाल्या

काल बेटर-हाफ ला हाफ मॅरॅथॉन धावताना पेसिंग केले. तिला वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवता आली आणि चक्क ३ रे बक्षीसही मिळाले..

४ डिसेंबरच्या पुणे हाफ मॅरेथॉन ला रजिस्ट्रेशन करायचे आहे. काय करावे लागेल. क्रूपया ऑनलाईन पर्याय सुचवावेत.

In reply to by अप्पा जोगळेकर

वर्तमानपत्रात काय सापडले नाही आणि गुगलबाबा वर सुद्धा नुसतीच इव्हेन्टची माहिती आहे. नोंदणीचे कळत नाही काय करायचे.

मी काल (रविवारी) सकाळी ६.५ किमी चाललो आणि संध्याकाळी १४ किमी सायकल ४५ मिनिटांत चालवली. आज सकाळी परत ६.५ किमी चालणे झाले. संध्याकाळी पुन्हा सायकलींग करणार आहे. दररोज ओफिस मध्ये तीन मजले चढणे आणि उतरणे (अंदाजे ५-६ वेळा) चालू असतेच.

In reply to by संदीप डांगे

मलाही पुर्वी वाटायचं की वयोमर्यादा असेल किंवा फारस शक्य नसेल काही एका वयानंतर. पण माझ्या आईने हे साफ खोट ठरवलं. तिला अजिबात पोहायला येत नसताना तीन साठाव्या वर्षी पोहणे शिकायला सुरवात केली आणि काही महिन्यात तिला ते जमल पण. आता ती नियमित पोहायला जाते. तिने पहिले पोहण्याच्या तलावात चालण्यासाठी नाव घातले होते कारण कोणीतरी तिला सांगितलं कि पाण्यात रोज अर्धा तास चाललात तर गुढघेदुखी थांबेल. आणि ती खरच थांबली पण. मग आजूबाजूच्या बायकांनी प्रोत्साहित केल्यामुळे पोहायला शिकायचं पण ठरवलं.

कालपासून चालण्याचा श्रीगणेशा केलाय. पहिल्याच दिवशी ५ किमीचे टारगेट ठेवले होते ते ५५ मिनिटात पूर्ण केले. सातत्य राहणं महत्वाचं.

  काल मी न थांबता सलग ५० किमी चालवली. घरुन निघताना जे सायकल वर बसलो, ते घरी आल्यावरच उतरलो. ३५ किमी काही वाटले नाही. पण नंतर साधे साधे चढ सुद्धा जड चालले होते. ४० नंतर फारच जिवावर आले होते. शेवटचे ५ किमी अक्षरशः रडत पडत केल्यासारखे केले. शेवटी ५१.५ किमी करुनच सायकल थांबवली. घरी आल्यावर थोड्या मांड्या दुखल्या. त्या पलिकडे काहीही त्रास झाला नाही. सकाळी एकदम ओके.