Skip to main content

मी आज केलेला व्यायाम...!!

लेखक मोदक यांनी बुधवार, 02/11/2016 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार, गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत. व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया. व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा. सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा. आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील. मग... आज किती व्यायाम केला..? ************************************************************** काही डिस्क्लेमर्स. १) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे. २) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया. ३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :) ************************************************************** टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 112731
प्रतिक्रिया 496

प्रतिक्रिया

चांगला धागा आहे की हा! माझं रोज 3 किमी चालणे होते तसेच दिवसातून किमान दोनदा 3 मजले चढणे उतरणे... घरी गेल्यावर अंदाजे 30 मिनिटे व्यायाम... व्यायाम म्हणजे 3 सेट पुश अप चे, 3 सेट स्क्वाट्स(20 च करतो शक्यतो एका सेट मध्ये ) , ट्रायसेप्स 3 सेट आणि प्लॅन्क 3 सेट (पहिले 2 सेट 1min चे होतात पण तिसरा जात नाहीये अजून!!) काल व्यायाम करणे नाही शक्य झालं, आज घरी गेल्यावर करेनच! :)

In reply to by शब्दबम्बाळ

ठरवल्याप्रमाणे काल व्यायाम करण्यात आलेला आहे ! :) सारखा प्रवास होत असल्याने वजने वगैरे घेऊन जाता येत नाही. मग नुसता बॉडी वेट वर्कआऊट करण्यासोबत जोडीला काहीतरी असावे म्हणून रेसिस्टन्स बँड जवळ ठेवतो. त्याला जास्त वजन देखील नसते त्यामुळे सामानात टाकून सहजपणे कुठेही नेता येतो. band बाकी, कुठल्या व्यायामाने घाम नाही आला तरी साधासुधा दिसणारा प्लॅन्क काही सेकंदात घाम काढतो!

रोज 1 तास चालते आणि 15 मिनिटे योगासने करते. गेली अनेक वर्षे. पण अलीकडे वजन वाढले आहे थोडे. त्यामुळे सायकलिंग करण्याचा विचार आहे, त्यात नेमका हा धागा आणि त्यावरील प्रतिसाद वाचले. आता तर नक्कीच सायकलिंग सुरु करणार.

माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ आणि फुकटात अ‍ॅव्हलेबल जिम, स्विमिंग पुल आणि योग/झुम्बा/पिलाटेस चे क्लास आहेत. पण मी दिवसातले ८ तास (९-५) लॅपटॉपवर टाइमपास करते. आधी लाज वाटायची. आता त्याचीही सवय झाली. पण मोदकने धागा काढलाय म्हणुन प्रयत्न करुन पाहु. मला जिममध्ये मी करु शकेन असं लहानसं रुटीन कुणी सांगेल का? आणि पोहता येतं मला आता थोडं थोडं. तर कुणी कृपा करुन काही कॉम्बिनेशन सांगितलं तर जिम+पोहणे+योग असं करुन मन रमवता येईल. ह्यात थोडं खाण्यापिण्याचंही सांगा. १ महिना रोज पोहुन १ ग्रॅमही वजन कमी झालं नाही म्हणुन नैराश्यातुन सगळं सोडलंय मी... वजन कमी व्हायलाच पायजेल असा उपाय असेल तर सांगा..

In reply to by पिलीयन रायडर

जय बाबा रामदेव म्हणा आणि त्यांनी सांगितलेले प्राणायाम एक व्यवस्थीत रुटीन ठरवुन करा :) अगदी १५ मि. पासुन सुरुवात केली तरी चालेल. ३० मि. पर्यंत वेळ वाढवत न्या. महिन्याभरात हमखास रिजल्ट मिळतात.

In reply to by पिलीयन रायडर

१ महिना रोज पोहुन १ ग्रॅमही वजन कमी झालं नाही म्हणुन नैराश्यातुन सगळं सोडलंय मी..
इथे चुकलात. वर आप्पांना सांगितलेलंच सांगतो, थिंक फॅट लॉस; नॉट वेट लॉस. थिंक फिटनेस. वजन अजिबात हलणार नाही तुमचं महिनाभर; पण हे बघा की पहिल्या दिवशी ट्रेडमिल वर पाच मिनिटात धाप लागली असेल तर आता तुम्ही अर्धा तास न थांबता धावत असाल. पहिल्या दिवशी फ्रीवेट स्कॉट केलं असेल तर आता कदाचित १५ च्या प्लेटस टाकून स्कॉट करत असाल. यू माइट वे द सेम ऑन स्केल बट बी फीलिंग लाइटर, क्विकर अँड मीनर. अँड इफ दॅट इज नॉट हेल्पिंग यू बिलीव, लुक अ‍ॅट युअर्सेल्फ इन द मिरर. वजन हा डिराइव्ड नंबर आहे. लोकं तिथूनच सुरुवात करायला जातात. रोज रोज काट्यावर वजन करतात. ते कधीच फिटनेसचा मोठा गोल अचीव्ह करत नाहीत. आय सजेस्ट यू नॉट टू फॉल इन दॅट ट्रॅप. काय व्यायाम करा ते अनेक जण सांगतील इथे तुम्हाला. पण करत रहा, सातत्य ठेवा, इन्टेन्सिटी ठेवा (करायचा म्हणून करणं नको).. आणि उत्स्फूर्त काँप्लिमेंट्स येऊ लागतील तेंव्हा समजा की इट्स वर्किंग.

In reply to by वेल्लाभट

वेल्लाकाकांशी सहमत. उत्स्फूर्त कॉम्प्लिमेंटपेक्षा "साला मुझे भी स्विमिंग फिर से शुरु करना चाहिये", 'किती वेळ स्विम करता तुम्ही??, "खाण्याचं पथ्य पण असेल नै?" अशा कमेंट्स आल्या की समजावं आपण योग्य रस्त्यावर आहोत.

In reply to by पिलीयन रायडर

१ महिना रोज पोहुन १ ग्रॅमही वजन कमी झालं नाही म्हणुन नैराश्यातुन सगळं सोडलंय मी... कर्मण्येवाधिकारस्ते... :=))

मंडळी, आज ५.०५ किमी चाललो. वेळ एक तास लागला. चालण्याचा वेग जरा मंद होता. पर किमी १२ मिनिट लागले. ११ ते साडेअकरा मिनिट लागतात सामान्यपणे मला. १० मिनिट पर किमी यायचं आहे. आज जरा थंडी होती. उबदार रग सोडायचं जीवावर येत होतं. उद्यापासून फुल बाह्यांचा टीशर्ट आणि कानटोपी आवश्यक आहे, आज कोपरापासून हात आणि कान चांगलेच गार पडले. धन्यवाद. आपका दिन शुभ रहे. Screenshot_20161104-070332 -दिलीप बिरुटे

सांगण्यासारखं फार काही नाही. पुण्यात आज जास्त थंडी पडली होती. त्यामुळे लगेच येऊन गोधडीत दडी मारली. ;-) नंतर उठून थोडासा वॉर्मअप केला. हात, पाय, मान इ. गोष्टी हलवल्या. वर्किंग कंडिशनमध्ये आहेत हे पाहून हायसं वाटलं. उद्या दोन सूर्यनमस्कारांचं लक्ष्य आहे. मग परवापासून चार, सहा, आठ, दहा, बारा असं वाढवत नेणार. :-)

१२.७६ किमी चाललो , लागलेला वेळ २.०८ तास , खर्चलेले उष्मांक १०८० , वेग ६ किमी/तास ,गाळलेला घाम १.१४ लिटर .

In reply to by श्रीरंग_जोशी

एन्डोमोन्डो मोजतं माझ्या वजन,वय,वेग आणि तापमानाचा अंदाज घेऊन.... मग नंतर किती पाणी प्यायच ह्याचा अंदाज राहातो, डिहाड्रेशन हा फिटनेसचा सर्वात मोठा शत्रु बरं का !!

In reply to by डॉ श्रीहास

काही तरी अल्गोरिदम असावा असा माझा अंदाज होता. तो बरोबर निघाला :-) .

In reply to by डॉ श्रीहास

खर्चलेले उष्मांक १०८० कसे काय, मी ट्रेडमिल वर ४km चा ब्रिस्क-वॉक ३४ मिनीटात केला तरी तो १५५ calories burned असेच दाखवतो . खर्चलेले उष्मांक = calories burned ना ? कि काही चुकतेय माझं ?

हायला, ही सगळी अ‍ॅप कसली कंटाळवाणी आहेत. धावून,पोहून,सायकल चालवून झाल्यावर अंतर किती झाले असेल इथवर ठीक आहे. पण किती उष्मांक जळले, किती एलिव्हेशन वगैरे जरा अतिच वाटले. त्यातून धावताना ही अ‍ॅप सारखी इतके किमी झाले, इतका एवरेज स्पीड आहे, इतके उष्मांक जळले वगैरे पिरपिरत बसतात. धावण्याचा आनंद काय मिळणार अशाने? एखाद्या माणसाने सुग्रास जेवण जेवण्याऐवजी तेवढ्याच एक्विव्हॅलन्ट प्रथिने, जीवनसत्वे वगैरेच्या नुसत्या गोळ्याच खाव्यात तसे वाटते.

In reply to by अप्पा जोगळेकर

पण ह्यॅच ॲपमुळे मी नियमीत व्यायाम करू शकतो, सुट्या किंवा आॅफ दिवस डोळ्यासमोर राहातात...... तुम्हाला जर बिना अॅपचं शक्य असेल तर बढीया !!

In reply to by अप्पा जोगळेकर

त्यातून धावताना ही अ‍ॅप सारखी इतके किमी झाले, इतका एवरेज स्पीड आहे, इतके उष्मांक जळले वगैरे पिरपिरत बसतात. धावण्याचा आनंद काय मिळणार अशाने?
अ‍ॅक्टीविटी चालू असताना तुम्ही त्या अ‍ॅपना गप्प बसवू शकता. मी शक्यतो अ‍ॅक्टीविटि संपल्यावर आकडे बघतो.. अगदी एखादे कठीण टारगेट असेल तरच दर ५-१० मिनिटांनी बघत रहातो म्हणजे मागे पडतोय की ठिक चाललय ते समजतं. एलिवेशन वगैरे आकडे कधीकधी महत्वाचे असतात. जर सातारा/ हैद्राबाद सरखी मॅरॅथॉन धावायची असेल तर जास्त एलिवेशनला सराव करणे भाग असते. वजन व्यवस्थित फीड केले असेल तर उष्मांक वगैरे बरोबर असतात. वेट लॉस प्रोग्रॅम मधे अंतर / वेग यापेक्षा तो आकडा जास्त महत्वाचा असतो. काही लोक वेगापेक्षा हार्ट् रेट मॉनिटर करतात. एंड्युरन्स वाढवायला या प्रकारे सराव उपयोगी पडतो. अ‍ॅप खूप काही मोजत असतं.. आपल्याला काय हवय ते ठरवणं आपल्या हाती असतं..

In reply to by बाळ सप्रे

मी देखील ह्याच पध्दतीने अॅप वापरतो , विचार लिहून दाखवता येत नाहीत आपल्याला म्हणून सप्रेंची री ओढतो.... _/\_ आता राहीला प्रश्न आनंदाचा , व्यायामानंतर दु:खी माणूस मी तरी पाहीला नाहीये बरं !! एन्डाॅर्फिन नावाचे स्राव (हार्मोन्स्) व्यायामानंतर शरिरात स्रवतात .... ह्यांना सोप्या भाषेत फिल गुड हार्मोन्स् अस म्हणतात .... म्हणून तर आपण वर्कआउट नंतर मरगळुन न जाता जास्त तजेलदार आणि उत्साही असतो .... त्यामुळे अॅप नो ॲप पण व्यायाम गुपचाप !!

मिपा वर हे पाककृती आणि व्यायाम हे दोन्ही विभाग ताबडतोब बंद करावे असा मी प्रस्ताव मांडतो. लोक एक तर अशा खतरनाक पाककृती टाकतात त्यामुळे आमच्या आहाराचा बोऱ्या वाजतो. (मोठ्या मुश्किलीने सुटू पाहणारे पोट इतकी वर्षे सांभाळून ठेवले आहे) त्यातून या धाग्यावर व्यायाम करणारे नतद्रष्ट लोक मी इतका व्यायाम केला इतकी सायकल चालवली असे चढाओढीने लिहून आमच्यासारख्या आरामशीर( कोण रे तो आळशी म्हणतोय) लोकांना न्यूनगंड देत राहतात.

कालचा माझा अपर हाफचा दिवस होता जीम मध्ये. शोल्डर, बाय्सेप्स, ट्रायसेप्स, बॅक आदी कचकुन केले. शिवाय, कोअर अ‍ॅब्स होत्याच सोबतीला. आज लेग्स + अ‍ॅब्स.

काल बॅक आणि ट्राय सेप्स् . आज चेस्ट आणि बाय सेप्स्. सोबतीला ecliptor ३0 मिनिटे नेहमिच. देऊ का? व्यायाम करण्याच्या आधी पाच मिनिटे मी ब्लॅक कॉफी पिते..साखर नाही. त्या कॅफिनने एक्सर्साइज़ करायला एनर्जी बूस्ट मिळतो.

In reply to by पद्मावति

चालायचंच हो पद्मावती ताई ...कळफलक मनुष्यप्राणी किंवा भ्रमणध्वनीसारखा चलाख नसतो ना :D बा द वे ब्लॅक कॉफी घशाखाली उतरते का ? मला तर दूध असलेल्या कॉफीत पण कमीत कमी 2 चमचे साखर लागतेच :)..

In reply to by पद्मावति

एनर्जी बुस्ट साठी कॅफेन - याचे अवलंबित्व (किंवा शुद्ध मराठीत डिपेंडन्सी) तयार होत नाही का..? ..आणि खराखुरा प्रश्न म्हणजे, अशा एखाद्या गोष्टीचे व्यसन लागले तर काय ..?

In reply to by मोदक

अवलंबित्व असू शकते पण व्यसन नाही म्हणता येणार. तसे म्हटले तर आपण रोज सकाळ-संध्याकाळ चहा घेतो...पण त्याला व्यसन नाही म्हणत ना :P

In reply to by पाटीलभाऊ

एखाद्या झकास ट्रेकला गेल्यानंतर, दुपारी ४ वाजता चहासाठी तळमळणारे जीव पाहिले आहेत. चहाशिवाय एक दोन महिने राहू शकलात तर ते व्यसन नक्कीच नाही. ट्राय करा एकदा. ..बाकी अवलंबित्व आणि व्यसन यांमध्ये एक धूसर सीमारेषा असते असे माझे मत आहे.

In reply to by मोदक

अहो..'आपण' मध्ये मला स्वतःच समावेश नव्हता करायचा :D मी तर चहा वर्षभर झाले बंद केला होता. सध्या घेतो..पण फक्त विकांताला आणि तोही एकदाच :)
बाकी अवलंबित्व आणि व्यसन यांमध्ये एक धूसर सीमारेषा असते असे माझे मत आहे.
नक्कीच.

In reply to by मोदक

मी चहापावडर + दूध पावडर + थोडे आले+ १ वेलची यांचे मिक्श्चर नेतो ! सकाळी ५-६ वाजता गोठवणार्‍या थंडीत वाफाळता चहा :) मग चहा न पिणारे जीव सुद्धा तळमळतात =) (अवांतराबद्दल स्वारी)

In reply to by मोदक

dependency होते खरी. पण कॉफीच्या अवलंबित्वाच्या तोट्यापेक्षा व्यायाम जास्ती एफेक्टिव्ली होणार असेल तर हरकत नाही असे मला वाटते. अवलंबित्वाचं अजुन एक उदाहरण सांगायचं झालं तर बरेच लोकांना लाउड म्यूज़िक असल्याशिवाय व्यायाम करता येत नाही. मला स्वत:ला व्यायाम करतांना समोर टीवी मस्ट आहे. गाणी असली तर उत्तम नाहीतर उत्तम फील गुड तारक मेहेता सारखं धरावाहीक. एखादी भावनिक आणि स्ट्रेस देणारी मालीका अजिबात नको. त्याचेही अवलंबित्व येतंच पण त्याने व्यायाम होणार असेल तर ठीकच आहे.

In reply to by मोदक

एक्स्प्रेसो ब्लॅक कॉफी घेतल्याशिवाय काही करावसचं वाटत नसायचं. अन तल्लफ लागुन यायची. शेवटी प्रयत्नपुर्वक बंद केले. फक्त दोनेक महिनेच हा प्रकार झाल्याने जास्त आहारी गेलो नाही अस वाटतं.

In reply to by पाटीलभाऊ

मागची जवळपास 10 ते 12 वर्षे रोज एकतर फक्त लाल चहा (विना दूध, पाणी, साखर) फक्त अर्धे लिंबू पिळून किंवा अतिशय नीट प्रकारे ब्रू केलेला ग्रीन टी घेतो, अक्वायर्ड टेस्ट असते, सुरवातीला, तुरट, कडवट वाटते (लाल चहा) अन ग्रीन टी शक्यतो मातकट लागतो चक्क चवीला, पण सवय झाली की साधा चहा बघावसा सुद्धा वाटणार नाही. ग्रीनटी चे फायदे अफाट आहेत अन ते जाणवून येते :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मी देखील वर्षात हिरवा चहा घेत होतो. निलगिरीतून चहाची सुकविलेले पाने आणली होती. ती उकळून मग गाळून त्याचा चहा प्यायचो. पण सध्या त्यात खंड पडला आहे :(

In reply to by पाटीलभाऊ

अर्रर्र पाटीलभाऊ, हिरवा चहा/ग्रीन टी कधीच उकळायाचा नाही/ नसतो. पाणी (कप/मग) गरम करायचे थोडे, बुडबुडे फुटेस्तोवर नाही, पण कडकडीत गरम मग पातेलं/किटलीत पाणी घेऊन त्यात चमचाभर ग्रीन टी टाकायचा अन झाकून 2 मिनिटे ठेवायचे, नंतर गाळून प्राशन करायचे गरमागरम, घरी महिला मंडळाला उरलेला चोथा वापरता येतो चेहऱ्यावर लावायला, त्याने म्हणे चेहरा तुकतुकीत होतो (चहा का पीत नाहीस असे विचारायचे नाही हे लक्षात ठेवा)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हो...आधी मी उकळून प्यायचो(चुकीच्या पद्धतीने ). नंतर तुम्ही सांगताय त्या पद्धतीने घ्यायला लागलो(आणि थोड्याच दिवसांत बंद :( ). बाकी चेहरा तुकतुकीत होण्याचं जाऊ द्या... :P

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सहमत बापु, ग्रीन टी उत्तम. असंख्य फायदे आहेत इंक्लूडिंग फॅटलॉस, कोलेस्ट्रॉल साठी चांगले. त्या मधे प्रचंड प्रमाणात anti ऑक्सिडेंट्स असतात त्यामुळे स्किन तुकतुकीत आणि फ्रेश राहते. जपानी लोकं त्यामुळे नेहमीच त्यांच्या वयापेक्षा आठ दहा वर्षांनी लहान दिसतात. फॅट लॉस साठी ग्रीन टी पेक्षा उलॉंग टी जास्ती उपयोगी आहे. जेवणानंतर उलॉंग टी प्यायल्यास खाल्या जाणार्‍या अन्नामधले फॅट शरीरात खुप कमी प्रमाणात शोषले जातात.

In reply to by पाटीलभाऊ

मागची जवळपास 10 ते 12 वर्षे रोज एकतर फक्त लाल चहा (विना दूध, पाणी, साखर) फक्त अर्धे लिंबू पिळून किंवा अतिशय नीट प्रकारे ब्रू केलेला ग्रीन टी घेतो, अक्वायर्ड टेस्ट असते, सुरवातीला, तुरट, कडवट वाटते (लाल चहा) अन ग्रीन टी शक्यतो मातकट लागतो चक्क चवीला, पण सवय झाली की साधा चहा बघावसा सुद्धा वाटणार नाही. ग्रीनटी चे फायदे अफाट आहेत अन ते जाणवून येते :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

ग्रीन टी लेमन टी आपलंपन फेव्हरीट! लेमन जरा जास्त्च! एक्स्प्रेसोच्या होऊ घातलेल्या सवयीतुन लेमन टी नेच बाहेर येण्यात मदत केली.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

लेमन टी लैच खास हो जावईबुआ! म्हणजे बघा फ्रिज मध्ये चिल केला तर भारी कोल्ड्रिंक होते त्याचे.

सायकल २० किमी एकदा किंवा दोनदा, ह्लली कठीण होत आहे. फक्त वाीकेंड सायकल. शनिवार: ३०-५० किमी रविवार: ७५ ूद ९० किमी. ११५+ महि्यातून एकदा. चालने ३-५ किमी रोज

फुरुष लोक्स करिता, मेन्स फिटनेस मॅगझिनचे ऍप जबराट आहे. एकतर मेन्स फिटनेसचे नाव मोठे, ऍप पण जबराट बनवले आहे. फिल्टर्स असतात त्यात तुम्हाला कसा व्यायामाचा माहोल हवाय ते पहिले भरायचे (ओपन ग्राउंड/ जिम/ होम जिम/ डंबेल-केटलबेल सेट्स/ बॉडी वेट) मग काय टार्गेट आहे ते पण बयाजवार विचारते (अपर बॉडी/ऍब्स-कोर/कार्डिओ/मसलग्रुप वगैरे) हे फिल्टर्स अप्लाय केले की तुम्हाला (तुमच्या परिस्थितीला) साजेसे वर्कआऊट प्रोग्राम्स ऍप सजेस्ट करते, हे ऍप पेड आहे पण पैसे जास्त घेत नाही, तसंही चकटफू आहे म्हणून ऍप फाट्यावर मारून फिटनेस मध्ये टंगळमंगळ करण्यापेक्षा थोडे पैसे गेले तर माणुस किमान पैसे वसूल करायला तरी व्यायाम करेल असे वाटते.(भाबडा आशावाद). आठ महिने अगोदर वापरत होतो तेव्हा वर्षाचे १२०० (₹१२००/वर्ष फक्त) शुल्क लागत असे आत्ताचे माहिती नाही. (स्लिप डिस्कची आयमायबापआजा उध्दार करत ढेरी कुरवळणारा) बाप्याव

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मोबाइल खिशात ठेवायचा का खेळतांना ? -दिलीप बिरुटे