✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्मार्ट शहर - स्मार्ट कट्टा !!

म
माझीही शॅम्पेन यांनी
Mon, 10/31/2016 - 18:06  ·  लेख
लेख
ठाणे शहराचा स्मार्ट शहर योजने मध्ये समावेश करावा अस सरकार ने आताच ठरविले असले तरी पहिल्या पासून ठाणे कर (डॉक्टर असल्याने मुलुंडकर पण ) भलतेच स्मार्ट आहे , मिपाचे यशस्वी कट्टे करावेत तर ते ठाणेकराने च , असो श्रीयुत टवाळ कार्टा ह्यांच्या एका धाग्याने ह्या स्मार्ट कट्टा आयोजनाची सुरुवात झाली , सुरुवातीलाच दिवाळी पाडवा असल्याने किती लोक येतील ह्याचा अंदाज नव्हता असो कट्टा मस्त झाला मेतकूट :- मेतकूट हि जागा निवडणे म्हणजे खरोखर धाडसीपण होत , मिपावरील ऐतिहासिक पार्शवभूमी त्याला आहेच अत्रन्गि पाऊस : - इतक्या सबाह्य सभ्य माणसाने हे नाव घेणं म्हणजे गंमत आहे आणि विशेष म्हणजे हे एक दिवस अगोदरच अर्रेचचा आवाज कट्टा नाही का म्हणून निघून गेले होते त्यामुळे येतील कि नाही सांगता येत नव्हते (बघा बघा किती उत्साह असतो एकेएकाला ) मदनबाण :- शिवसेनेच्या एखाद्या नाक्यावरच्या किल्ल्यातील उत्साही कार्यकर्ता म्हणून सहज खपून जाईल त्यात भर म्हणून गळ्यात रुद्राक्ष सदृश्य माळा घालून सर्वात प्रथम कट्यास हजार होते डॉक्टर खरे :- सर्व मान्य लोकप्रिय व्यक्तिमत्व , मी ओळख करून देणार म्हणजे काजव्याने सूर्याची ओळख होईल असं काही .. पाडव्यालाहि आलेले सर्व उत्साही मिपाकर्स :- खटपट्ये शेठ, , टका , अस्मादिक (माझीही शॅम्पेन ) , वरून मोहिते , डॉ खरे , अत्रन्गि पाऊस sarvmipakars घंटाळी मंदिर :- ठाण्यातील एक पुरातन मंदिर (नक्की माहित नाही पण दीडशे वर्षांपासून नक्कीच) इतर कट्टेकरी येई पर्यन्त मी , डॉ आणि मदनबाण ह्यांनी घंटाळी मंदिरात दर्शन घ्यायला गेलो , मदनबाण ह्यांनी फुल्लऑन दर्शन घेतलं (अगदी थाळी वैगरे घेऊन) मी चुकून सौ मदनबाण पण बरोबर तर नाहीत हे पुन्हा पुन्हा तपासून बघत होतो असो __/\__ तो पर्यंत जवळपास सर्व कट्टे करी आले होते (बोबो साहेब सोडून) जवळपास दोन मेतकूट आहेत एक जेवणाचं आणि एक नाश्त्याच , आमचं दुसरं होत कट्टा सुरु होता होता अत्रन्गि पाऊस दबकत दबकत आले आणि पहिली फर्माईश "पुडीच्या वडे" अशी सोडली , असेही मिपाकर कोणालाही सहज पुडीत बांधू शकतील असं त्यांना अप्रत्यक्षपाने सांगायचं असेल मग काय एका मागोमाग एक असे लजीज पदार्थ मागवले गेले , पदार्थ चविष्ट कि खमंग चर्चा असा प्रश्न होता , कट्ट्याचे विषय आणि त्याची रेंज पहिली असती एखादा नॉन-मिपाकर हादरून गेला असता सध्या आंतराष्ट्रीय बाजारात असलेली नावीन्यपूर्ण हत्यारे , नोकरी साठी मुलाखत कशी घ्यावी , आंतरराष्ट्रीय मंदी , द्रौपदीचे आणि कर्ण ह्यांचं सुप्त आकर्षण , बोली भाषा नि प्रमाण भाषा ह्यांचे वाद असे अनेक विषय चर्चेला आले कट्ट्याचा शेवट अतिशय धक्कादायक बातमीने झाला आणि ती बातमी २०१७ मध्ये किंवा थोडी आधी सर्वांना कळेल अशी अशा आहे :) असो चविष्ट गप्पा मारणारे आणि चविष्ट पदार्थ असतील तर कट्टा हमखास यशस्वी होतोच आणि झालंही तसाच खादाडीचे फोटो कुठलीशी कतली katali कोथिंबीर वड्या kvadi1 अळूच्या वड्या kvadi2 पुडीच्या वड्या kvadi2 मिक्स भजी k2 सर्व मिपा-करांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
18436 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

अरेच्चा तुम्ही आद्य कट्टेकरी

माझीही शॅम्पेन
Wed, 11/02/2016 - 14:43 नवीन
अरेच्चा तुम्ही आद्य कट्टेकरी मंडळी कुठे होतात !! कुठेशी होत हे रांगोळी प्रदर्शन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

विष्णू नगरला, १९ नंबर शाळेत.

किसन शिंदे
Wed, 11/02/2016 - 14:54 नवीन
विष्णू नगरला, १९ नंबर शाळेत.
  • Log in or register to post comments

छान वृ. तेवढा काही स्मार्ट

सस्नेह
Wed, 11/02/2016 - 15:05 नवीन
छान वृ. तेवढा काही स्मार्ट नाही वाटला कट्टा ! अनाहिता कट्टे यापेक्षा स्मार्टर असतात, असे खेदाने णमूद करते :(
  • Log in or register to post comments

अनाहिता कट्टे यापेक्षा

माझीही शॅम्पेन
Fri, 11/04/2016 - 11:58 नवीन
अनाहिता कट्टे यापेक्षा स्मार्टर असतात
ओके पण खेदाने का आनंदाने नमूद करा कि , अनाहिता कट्टे कसेही होत असले तर ते फक्त अनाहिता साठीच असतात ना :) (जंगल मी मोर नाचा ..... ) आमचं तस नाही सर्वे सुखिनः संतु टाईप्स :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ओके पण खेदाने का आनंदाने नमूद

टवाळ कार्टा
Fri, 11/04/2016 - 12:24 नवीन
ओके पण खेदाने का आनंदाने नमूद करा कि
=))
छान वृ. तेवढा काही स्मार्ट नाही वाटला कट्टा ! अनाहिता कट्टे यापेक्षा स्मार्टर असतात, असे खेदाने णमूद करते :(
हे मोठ्या साहेबांच्या वक्तव्यासारखे वाटले..."सर्जीकल स्ट्राईक आमच्यावेळेसही होत होते" टाईप =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

ळॉळ

सुबोध खरे
Fri, 11/04/2016 - 12:32 नवीन
ळॉळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ओहोहोहो!

पैसा
Fri, 11/04/2016 - 15:52 नवीन
अनाहिता कट्ट्याला लोकाना मेटाकुटीला आणत नै बै आम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आठवलं नाही

वरुण मोहिते
Wed, 11/02/2016 - 15:12 नवीन
दरवर्षी असतं तिथे रांगोळी प्रदर्शन ..पुढच्या वर्षी तुम्ही या कट्ट्याला आपण पाहू एकत्र
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा