स्मार्ट शहर - स्मार्ट कट्टा !!
ठाणे शहराचा स्मार्ट शहर योजने मध्ये समावेश करावा अस सरकार ने आताच ठरविले असले तरी पहिल्या पासून ठाणे कर (डॉक्टर असल्याने मुलुंडकर पण ) भलतेच स्मार्ट आहे , मिपाचे यशस्वी कट्टे करावेत तर ते ठाणेकराने च , असो
श्रीयुत टवाळ कार्टा ह्यांच्या एका धाग्याने ह्या स्मार्ट कट्टा आयोजनाची सुरुवात झाली , सुरुवातीलाच दिवाळी पाडवा असल्याने किती लोक येतील ह्याचा अंदाज नव्हता असो कट्टा मस्त झाला
मेतकूट :- मेतकूट हि जागा निवडणे म्हणजे खरोखर धाडसीपण होत , मिपावरील ऐतिहासिक पार्शवभूमी त्याला आहेच
अत्रन्गि पाऊस : - इतक्या सबाह्य सभ्य माणसाने हे नाव घेणं म्हणजे गंमत आहे आणि विशेष म्हणजे हे एक दिवस अगोदरच अर्रेचचा आवाज कट्टा नाही का म्हणून निघून गेले होते त्यामुळे येतील कि नाही सांगता येत नव्हते (बघा बघा किती उत्साह असतो एकेएकाला )
मदनबाण :- शिवसेनेच्या एखाद्या नाक्यावरच्या किल्ल्यातील उत्साही कार्यकर्ता म्हणून सहज खपून जाईल त्यात भर म्हणून गळ्यात रुद्राक्ष सदृश्य माळा घालून सर्वात प्रथम कट्यास हजार होते
डॉक्टर खरे :- सर्व मान्य लोकप्रिय व्यक्तिमत्व , मी ओळख करून देणार म्हणजे काजव्याने सूर्याची ओळख होईल असं काही ..
पाडव्यालाहि आलेले सर्व उत्साही मिपाकर्स :- खटपट्ये शेठ, , टका , अस्मादिक (माझीही शॅम्पेन ) , वरून मोहिते , डॉ खरे , अत्रन्गि पाऊस
घंटाळी मंदिर :- ठाण्यातील एक पुरातन मंदिर (नक्की माहित नाही पण दीडशे वर्षांपासून नक्कीच) इतर कट्टेकरी येई पर्यन्त मी , डॉ आणि मदनबाण ह्यांनी घंटाळी मंदिरात दर्शन घ्यायला गेलो , मदनबाण ह्यांनी फुल्लऑन दर्शन घेतलं (अगदी थाळी वैगरे घेऊन) मी चुकून सौ मदनबाण पण बरोबर तर नाहीत हे पुन्हा पुन्हा तपासून बघत होतो असो __/\__
तो पर्यंत जवळपास सर्व कट्टे करी आले होते (बोबो साहेब सोडून) जवळपास दोन मेतकूट आहेत एक जेवणाचं आणि एक नाश्त्याच , आमचं दुसरं होत
कट्टा सुरु होता होता अत्रन्गि पाऊस दबकत दबकत आले आणि पहिली फर्माईश "पुडीच्या वडे" अशी सोडली , असेही मिपाकर कोणालाही सहज पुडीत बांधू शकतील असं त्यांना अप्रत्यक्षपाने सांगायचं असेल
मग काय एका मागोमाग एक असे लजीज पदार्थ मागवले गेले , पदार्थ चविष्ट कि खमंग चर्चा असा प्रश्न होता , कट्ट्याचे विषय आणि त्याची रेंज पहिली असती एखादा नॉन-मिपाकर हादरून गेला असता सध्या आंतराष्ट्रीय बाजारात असलेली नावीन्यपूर्ण हत्यारे , नोकरी साठी मुलाखत कशी घ्यावी , आंतरराष्ट्रीय मंदी , द्रौपदीचे आणि कर्ण ह्यांचं सुप्त आकर्षण , बोली भाषा नि प्रमाण भाषा ह्यांचे वाद असे अनेक विषय चर्चेला आले
कट्ट्याचा शेवट अतिशय धक्कादायक बातमीने झाला आणि ती बातमी २०१७ मध्ये किंवा थोडी आधी सर्वांना कळेल अशी अशा आहे :)
असो चविष्ट गप्पा मारणारे आणि चविष्ट पदार्थ असतील तर कट्टा हमखास यशस्वी होतोच आणि झालंही तसाच
खादाडीचे फोटो
कुठलीशी कतली
कोथिंबीर वड्या
अळूच्या वड्या
पुडीच्या वड्या
मिक्स भजी
सर्व मिपा-करांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरेच्चा तुम्ही आद्य कट्टेकरी
विष्णू नगरला, १९ नंबर शाळेत.
छान वृ. तेवढा काही स्मार्ट
अनाहिता कट्टे यापेक्षा
ओके पण खेदाने का आनंदाने नमूद
ळॉळ
ओहोहोहो!
आठवलं नाही