✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्मार्ट शहर - स्मार्ट कट्टा !!

म
माझीही शॅम्पेन यांनी
Mon, 10/31/2016 - 18:06  ·  लेख
लेख
ठाणे शहराचा स्मार्ट शहर योजने मध्ये समावेश करावा अस सरकार ने आताच ठरविले असले तरी पहिल्या पासून ठाणे कर (डॉक्टर असल्याने मुलुंडकर पण ) भलतेच स्मार्ट आहे , मिपाचे यशस्वी कट्टे करावेत तर ते ठाणेकराने च , असो श्रीयुत टवाळ कार्टा ह्यांच्या एका धाग्याने ह्या स्मार्ट कट्टा आयोजनाची सुरुवात झाली , सुरुवातीलाच दिवाळी पाडवा असल्याने किती लोक येतील ह्याचा अंदाज नव्हता असो कट्टा मस्त झाला मेतकूट :- मेतकूट हि जागा निवडणे म्हणजे खरोखर धाडसीपण होत , मिपावरील ऐतिहासिक पार्शवभूमी त्याला आहेच अत्रन्गि पाऊस : - इतक्या सबाह्य सभ्य माणसाने हे नाव घेणं म्हणजे गंमत आहे आणि विशेष म्हणजे हे एक दिवस अगोदरच अर्रेचचा आवाज कट्टा नाही का म्हणून निघून गेले होते त्यामुळे येतील कि नाही सांगता येत नव्हते (बघा बघा किती उत्साह असतो एकेएकाला ) मदनबाण :- शिवसेनेच्या एखाद्या नाक्यावरच्या किल्ल्यातील उत्साही कार्यकर्ता म्हणून सहज खपून जाईल त्यात भर म्हणून गळ्यात रुद्राक्ष सदृश्य माळा घालून सर्वात प्रथम कट्यास हजार होते डॉक्टर खरे :- सर्व मान्य लोकप्रिय व्यक्तिमत्व , मी ओळख करून देणार म्हणजे काजव्याने सूर्याची ओळख होईल असं काही .. पाडव्यालाहि आलेले सर्व उत्साही मिपाकर्स :- खटपट्ये शेठ, , टका , अस्मादिक (माझीही शॅम्पेन ) , वरून मोहिते , डॉ खरे , अत्रन्गि पाऊस sarvmipakars घंटाळी मंदिर :- ठाण्यातील एक पुरातन मंदिर (नक्की माहित नाही पण दीडशे वर्षांपासून नक्कीच) इतर कट्टेकरी येई पर्यन्त मी , डॉ आणि मदनबाण ह्यांनी घंटाळी मंदिरात दर्शन घ्यायला गेलो , मदनबाण ह्यांनी फुल्लऑन दर्शन घेतलं (अगदी थाळी वैगरे घेऊन) मी चुकून सौ मदनबाण पण बरोबर तर नाहीत हे पुन्हा पुन्हा तपासून बघत होतो असो __/\__ तो पर्यंत जवळपास सर्व कट्टे करी आले होते (बोबो साहेब सोडून) जवळपास दोन मेतकूट आहेत एक जेवणाचं आणि एक नाश्त्याच , आमचं दुसरं होत कट्टा सुरु होता होता अत्रन्गि पाऊस दबकत दबकत आले आणि पहिली फर्माईश "पुडीच्या वडे" अशी सोडली , असेही मिपाकर कोणालाही सहज पुडीत बांधू शकतील असं त्यांना अप्रत्यक्षपाने सांगायचं असेल मग काय एका मागोमाग एक असे लजीज पदार्थ मागवले गेले , पदार्थ चविष्ट कि खमंग चर्चा असा प्रश्न होता , कट्ट्याचे विषय आणि त्याची रेंज पहिली असती एखादा नॉन-मिपाकर हादरून गेला असता सध्या आंतराष्ट्रीय बाजारात असलेली नावीन्यपूर्ण हत्यारे , नोकरी साठी मुलाखत कशी घ्यावी , आंतरराष्ट्रीय मंदी , द्रौपदीचे आणि कर्ण ह्यांचं सुप्त आकर्षण , बोली भाषा नि प्रमाण भाषा ह्यांचे वाद असे अनेक विषय चर्चेला आले कट्ट्याचा शेवट अतिशय धक्कादायक बातमीने झाला आणि ती बातमी २०१७ मध्ये किंवा थोडी आधी सर्वांना कळेल अशी अशा आहे :) असो चविष्ट गप्पा मारणारे आणि चविष्ट पदार्थ असतील तर कट्टा हमखास यशस्वी होतोच आणि झालंही तसाच खादाडीचे फोटो कुठलीशी कतली katali कोथिंबीर वड्या kvadi1 अळूच्या वड्या kvadi2 पुडीच्या वड्या kvadi2 मिक्स भजी k2 सर्व मिपा-करांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
18434 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

अंजीर कतली आहे ती

टवाळ कार्टा
Mon, 10/31/2016 - 18:27 नवीन
अंजीर कतली आहे ती
  • Log in or register to post comments

बाणाने आणलेले रातराणी अत्तर

टवाळ कार्टा
Mon, 10/31/2016 - 18:28 नवीन
बाणाने आणलेले रातराणी अत्तर जब्रा होते
  • Log in or register to post comments

बातमी काय ती टाका हो....

माम्लेदारचा पन्खा
Mon, 10/31/2016 - 18:37 नवीन
उत्सुकता ताणली गेली आहे.....!
  • Log in or register to post comments

माझा फोटो लय खराब आलाय

खटपट्या
Mon, 10/31/2016 - 18:45 नवीन
माझा फोटो लय खराब आलाय
  • Log in or register to post comments

ठाणे मेट्रो वृतान्त!!

कंजूस
Mon, 10/31/2016 - 18:53 नवीन
ठाणे मेट्रो वृतान्त!!
  • Log in or register to post comments

खटपट्याजी, तुम्ही भारतात

रेवती
Mon, 10/31/2016 - 18:56 नवीन
खटपट्याजी, तुम्ही भारतात जाणार होता हे आधी सांगितले नाहीत. आपली प्रथा आहे ती! नुसतं बुकिंग झालं की ब्यांडबाजा असतो. इथे तुम्ही जाऊन पोहोचलात, कट्ट्याला गेलात म्हणून समजतेय. असो, बघून घेतले जाईल. बाकी कट्टा वृत्तांत आवडण्यात आल्या गेला आहे.
  • Log in or register to post comments

धक्कादायक बातमीचा अंदाज आला

रेवती
Mon, 10/31/2016 - 18:56 नवीन
धक्कादायक बातमीचा अंदाज आला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मला पण :प

स्रुजा
Mon, 10/31/2016 - 20:30 नवीन
मला पण :प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आय माय सॉरी...घाइ जाहली.

खटपट्या
Mon, 10/31/2016 - 19:38 नवीन
आय माय सॉरी...घाइ जाहली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

टक्याच लग्न ठरलं का? ह्याच

पिलीयन रायडर
Mon, 10/31/2016 - 18:58 नवीन
टक्याच लग्न ठरलं का? ह्याच बातमीकडे डोळे लावुन आक्खं मिपा बसलं आहे... काय असेल तो सस्पेन्स फोडा.. ;) फायनली ते बोबो भेटलेच नाहीत का? अरेरे... कट्टा अगदी दणक्यात झालेला दिसतो. मिस केला की त्यांनी.
  • Log in or register to post comments

मलाही असंच वाटतंय !

माम्लेदारचा पन्खा
Mon, 10/31/2016 - 19:40 नवीन
टकाशी संबंधित असणार काहीतरी बहुतेक....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

कुंतीचे आणि कर्ण ह्यांचं

माझीही शॅम्पेन
Mon, 10/31/2016 - 18:58 नवीन
कुंतीचे आणि कर्ण ह्यांचं सुप्त आकर्षण
चुकून कुंती झाल आहे ते द्रौपदी करता येईल का ?
  • Log in or register to post comments

बदल केलाय.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/31/2016 - 20:25 नवीन
बदल केलाय. बाकी स्मार्ट शहर वगैरे मुंबईसाठी आहे, ठाणे डोंबोलीसाठी नव्हे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

बाकी स्मार्ट शहर वगैरे

मदनबाण
Mon, 10/31/2016 - 20:29 नवीन
बाकी स्मार्ट शहर वगैरे मुंबईसाठी आहे, ठाणे डोंबोलीसाठी नव्हे. =)) चूक :- Thane, Kalyan-Dombivli among 5 in state to make it to smart city list

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्लॉकबस्टर... ;) :- Sarrainodu
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

फर्स्ट राउंडात आम्ही हाव. ;)

अभ्या..
Mon, 10/31/2016 - 20:34 नवीन
फर्स्ट राउंडात आम्ही हाव. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

चाललं की... आमी बी जास्त मागे

मदनबाण
Mon, 10/31/2016 - 20:37 नवीन
चाललं की... आमी बी जास्त मागे नाय ! ;) तसही ठाणे टॉवर सिटी आणि मॉल सिटी म्हणुन प्रसिद्ध पावलीच आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्लॉकबस्टर... ;) :- Sarrainodu
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बदल केलाय.

माझीही शॅम्पेन
Tue, 11/01/2016 - 12:21 नवीन
बदल केलाय.
धन्यवाद , लिहिण्याच्या ओघात चूक झाली भलताच अर्थ निघत होता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

छोटेखानी वृत्तांत आवडला.

यशोधरा
Mon, 10/31/2016 - 19:00 नवीन
छोटेखानी वृत्तांत आवडला. खटपट्याभाऊंना "ती" चा ९ वा भाग टाकायची आठवण केली की नाही कोणी?
  • Log in or register to post comments

जुन्या पिक्चरात नायतर नाटकात

अभ्या..
Mon, 10/31/2016 - 19:05 नवीन
जुन्या पिक्चरात नायतर नाटकात मागे बाल्कनीचा सेट लावतात तसा का लावलाय? बाकी कट्टा ठिक. मेनु पुळचट. अर्थात गप्पा रंगल्या असल्याने त्याकडे लक्ष नसावेच कुणाचे. ;) धक्कादायक बातमी म्हणजे ट्रम्पकाका फिक्सींग मारले की काय? की मदनबाणाने जागतिक महायुध्दाचे भविष्य वर्तवले?
  • Log in or register to post comments

दुपारी येऊन चक्कर टाकली असता

गवि
Mon, 10/31/2016 - 19:21 नवीन
दुपारी येऊन चक्कर टाकली असता कट्टा समाप्त झाल्याचे दिसले. फोटो न दिसल्याने जळजळ नाही. पुढील कट्ट्यांना शुभेच्छा. यापूर्वी तिथेच समोर पुरेपूर कोल्हापूरमधे कट्टा झाला होता.
  • Log in or register to post comments

कट्टा छान झालेला दिसतोय.

नूतन सावंत
Mon, 10/31/2016 - 20:07 नवीन
कट्टा छान झालेला दिसतोय.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

कपिलमुनी
Mon, 10/31/2016 - 20:14 नवीन
श्री.टकारावांचे अभिनंदन ! ( कृ. आहेरामधे रिंग आणू नये)
  • Log in or register to post comments

मेतकूट

मदनबाण
Mon, 10/31/2016 - 20:20 नवीन
Image removed. बरेच दिवस पल्याडला कट्टे ठरत आणि मला त्याला काही हजर राहता येत नव्हते... यावेळी ते जमले ! :) मी मापं आणि इतर मंडळी ज्यांनी मला मागच्या सर्व कट्यांना विचारणा केली होती त्यांचे आभार मानतो आणि या कट्ट्याला त्यांना मिस केले हे देखील नमूद करु इच्छितो. मेतकूटला मिपा इतिहास असल्या कारणाने आणि इथे जावुन पहावयास हवे होते असे म्हंटले होते ते या कट्ट्याने पूर्ण झाले. टक्याला दोनदा फोनवले आणि योग्य मेतकूट असलेल्या जागी पोहचलो.वेळेच्या आधी पोहचण्याची खोड असल्या कारणाने आधीच हजर झालो होतो... मग डॉक आणि सर्व मंडळी हजर झाली. Image removed. खादाडीची सुरुवात अंजीरकतलीने झाली. :) Image removed. काय मागवायचे याची चर्चा झाल्यावर सर्व पदार्थांची ऑर्डर देण्यात आली. कोथिंबीर वडी बरोबर अळुवडी सुद्धा सांगा अशी माझी आवड सांगितली. :) डाविकडे पेंटिंग लावले आहे तिथे माझी नजर गेली... म्हंटल काय आहे ते जरा पाहुया ! Image removed. असेच एक अजुन सुंदर पेंटींग दिसले तेही टिपले... Image removed. कोथिंबीर वडी आणि अळुवडी काही वेळातच हजर झाल्या... Image removed. Image removed. पदार्थ झटपट पोटात जात होते आणि चर्चेला जोरदार रंग चढत होता... डॉक यांना कायाकल्प सिद्धी वश आहे असे जे नेहमी म्हणतो तेच परत रिपीट मारतो. :) रिंगां पासुन आयटी पर्यंत "सर्व" विषयावर माहितीपूर्ण चर्चा झाली ! ;) मग झाली भजीयों पे चर्चा... :) Image removed. घरला पाहुणे मंडळी येणार असल्याने आणि मस्त ताव मारुन पोट भरल्याने मी लवकर सटकलो... सर्वांना भेटुन फार आनंद वाटला... असेच कट्टे होत राहोत. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्लॉकबस्टर... ;) :- Sarrainodu
  • Log in or register to post comments

मस्त कट्टा झाला आहे...

माम्लेदारचा पन्खा
Mon, 10/31/2016 - 22:56 नवीन
भारी फोटो आणि माहिती ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अप्रतिम फोटो बाण राव

माझीही शॅम्पेन
Tue, 11/01/2016 - 12:18 नवीन
अप्रतिम फोटो बाण राव मूळ लेखात राहूनच गेलं कट्ट्याच्या सुरुवातीलाच तुम्ही आणलेले मृदगंध आणि रातराणी असे दोन अत्तर खूप छान होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

दुसरे चित्र

किसन शिंदे
Wed, 11/02/2016 - 13:37 नवीन
ठाण्याच्या मासुंदा तलावाचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बातमीचा टकाच्या लग्नाशी

सुबोध खरे
Mon, 10/31/2016 - 20:21 नवीन
बातमीचा टकाच्या लग्नाशी काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments

अरेरे.. मिपा आता लग्नघर होणार

पिलीयन रायडर
Mon, 10/31/2016 - 21:03 नवीन
अरेरे.. मिपा आता लग्नघर होणार अशी आशा होती..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बातमीचा टकाच्या लग्नाशी

माझीही शॅम्पेन
Tue, 11/01/2016 - 12:22 नवीन
बातमीचा टकाच्या लग्नाशी काहीही संबंध नाही.
+ १०० ह्याही बातमीचे पडसाद मिपा वर्तुळात नक्की उमटणार , फक्त काही दिवस थांबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

काय रहस्यमय कट्टा होता की काय

संदीप डांगे
Tue, 11/01/2016 - 12:29 नवीन
काय रहस्यमय कट्टा होता की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

टक्याचं स्थळ नाही म्हणता मग..

सूड
Tue, 11/01/2016 - 18:53 नवीन
नवीन संस्थळ सुरु करताय का चंपाग्ने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

भारी झालेला दिसतोय कट्टा.

अजया
Mon, 10/31/2016 - 21:06 नवीन
भारी झालेला दिसतोय कट्टा.
  • Log in or register to post comments

शेम टू शेम नाव असून वर एकाच

बोबो
Mon, 10/31/2016 - 21:50 नवीन
  • Log in or register to post comments

शेम टू शेम नाव असून वर एकाच

बोबो
Mon, 10/31/2016 - 21:50 नवीन
  • Log in or register to post comments

शेम टू शेम नाव असून वर एकाच

बोबो
Mon, 10/31/2016 - 21:50 नवीन
  • Log in or register to post comments

शेम टू शेम नाव असून वर एकाच

बोबो
Mon, 10/31/2016 - 21:51 नवीन
  • Log in or register to post comments

शेम टू शेम नाव असून वर एकाच

बोबो
Mon, 10/31/2016 - 21:51 नवीन
  • Log in or register to post comments

शेम टू शेम नाव असून वर एकाच

बोबो
Mon, 10/31/2016 - 21:52 नवीन
शेम टू शेम नाव असून वर एकाच एरियात असणारी हॉटेल्स यापुढच्या कट्ट्यांसाठी टाळावीत, असे आग्रहाचे णिवेदण. मला अर्धातास एकाच जागी उभा पाहून रोडच्या समोरच्या बाजूला उभे असलेले पो.मामा माझ्याकडे संशयाने पाहू लागले होते.अखेरीस अर्ध्या तासाने माझ्याबद्दल पूर्ण खात्री होऊन ते मला हटकण्यासाठी (की फटकवण्यासाठी? कोण जाणे)माझ्या दिशेने येऊ लागले तसा मी इकडेतिकडे सहज पाहात असल्याप्रमाणे हळूच तिथून काढता पाय घेतला. तुमच्या मेतकुटापायी जीव पार मेटाकुटीला आला भौ.
  • Log in or register to post comments

=))

टवाळ कार्टा
Mon, 10/31/2016 - 22:42 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोबो

घंटाळी मंदिर :- ठाण्यातील एक पुरातन मंदिर

अत्रन्गि पाउस
Mon, 10/31/2016 - 22:55 नवीन
वसई स्वारी च्या वेळेला चिमाजी अप्पांनी वसवलेले इतके जुने मंदिर आहे असे आम्ही लहानपणापासून ऐकतो. आज ह्या निमित्ताने औरंगाबादच्या कट्ट्यची (आम्हीच बोलवून ऐत्या वेळी न जाऊ शकल्याचा ) खंत आमच्या पुरती थोडीशी शमली ... कालच्या अनुभवावरून थोडा दबकत गेलो हे खरच .... सगळ्यांनाच भेटून फार बरे वाटले ...
  • Log in or register to post comments

कट्ट्याचा शेवट अतिशय

सूड
Tue, 11/01/2016 - 15:53 नवीन
कट्ट्याचा शेवट अतिशय धक्कादायक बातमीने झाला आणि ती बातमी २०१७ मध्ये
टक्क्याला शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

अरे वा !!

नीलमोहर
Tue, 11/01/2016 - 16:16 नवीन
म्हणजे आम्हाला गोग्गोड बातमी आणि लाडू मिळणार तर ... लौकरच, बाकी कट्टा वृत्तांत भारी,
  • Log in or register to post comments

फक्तं बातमी. लाडु बिडुला वेळ

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 11/01/2016 - 16:49 नवीन
फक्तं बातमी. लाडु बिडुला वेळ लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

उलट सुलट पण करु शकतो मी =))

टवाळ कार्टा
Tue, 11/01/2016 - 17:02 नवीन
उलट सुलट पण करु शकतो मी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

टक्कूमक्कूशोनू

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/01/2016 - 18:32 नवीन
टक्कूमक्कूशोनू Ssssssssssssss =)) लब्बाड.. . =)) कोण रे ती? . . . . . ह्या गावची का त्या गावची! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कोण रे ती?

मृत्युन्जय
Fri, 11/04/2016 - 16:04 नवीन
कोण रे ती? नक्की का? नाही म्हणजे बातमी धक्कादायक असल्याने विचारतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हि पाचवी ;)

टवाळ कार्टा
Fri, 11/04/2016 - 16:49 नवीन
हि पाचवी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

लाडूच रे, नंतर पेढे देतात.

सूड
Tue, 11/01/2016 - 17:16 नवीन
लाडूच रे, नंतर पेढे देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

शेवटी नूलकर येऊन गेले

अत्रन्गि पाउस
Tue, 11/01/2016 - 18:49 नवीन
आणि उभ्या उभ्या 10-15 मिनिटे बोलणे झाले ओरिगामी वर एक कार्यशाळा घेणेसंबंधी एक स्वतंत्र चर्चात्मक धाग्याची गरज आहे ...
  • Log in or register to post comments

भारी कट्टा झालेला दिसतोय.

किसन शिंदे
Wed, 11/02/2016 - 13:39 नवीन
भारी कट्टा झालेला दिसतोय. बाकी तिथून पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या रांगोळी प्रदर्शनाला भेट दिली असतीत तर तुमच्या कट्ट्याला चार चांद लागले असते. आमचे एक दादरकर मित्र त्या कोथिंबीर वडीला पीठलं वडी म्हणतात. =))
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा