Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 10/28/2016 - 01:01
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
डॉ प्रकाश वेरेकर सेक्सॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी स्त्री-पुरुष संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असलेल्या पिडीएफमधे वाचता येतील. सदर पुस्तिकेत लैंगिक संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (प्युबिस रींग), इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे हा लेख त्यांच्या रिंगची जाहिरात नाही, पण उपाय नामी आहे हे नक्की. तर मुद्दा असा की वरकरणी डॉ वेरेकरांचे विचार कितीही एकांगी वाटले आणि पारस्पारिक आदर आणि समानता यावरुन स्त्री-पुरुष संबंधात वाद दिसले तरी ते स्त्रीची अतृप्ती आणि पुरुषाचं असामर्थ्य या फंडामेंटल गोष्टीतून निर्माण होतात. याचा अर्थ स्त्रीला कामतृप्त करुन पुरुष पारस्पारिक आदर आणि समभाव यांना हरताळ फासू शकतो असा नाही. किंबहुना प्रणयतृप्त स्त्री आणि पुरुषात विनासायास अनुबंध निर्माण होतो. स्त्री दीर्घकाल आकर्षक दिसू आणि राहू शकते. आणि पुरुषाला अर्थ आणि मोक्ष हे पुरुषार्थ अचंबित होण्याइतपत साधता आले नाहीत तरी, काम हा पुरुषार्थ साधल्यानं तो समाधानी राहून सुखाचा संसार करु शकतो.
  • Log in or register to post comments
  • 82832 views

प्रतिक्रिया

Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 11/01/2016 - 19:15

Permalink

अप्पा जोगळेकर,

अप्पा जोगळेकर,
असल्या धाग्यांना जिलबीची उपमा देऊन'जिलबी' या सुंदर पदार्थाचा आणि ती बनवणार्‍या आचार्‍यांचा कशाला अवमान करता भाऊ ?
ती जिलबी वायली आन ह्यो वायली. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 11/01/2016 - 21:18

Permalink

आतापर्यंत न दिसलेले दोन मुद्दे

१.
स्त्री-पुरुष संबंधात वाद दिसले तरी ते स्त्रीची अतृप्ती आणि पुरुषाचं असामर्थ्य या फंडामेंटल गोष्टीतून निर्माण होतात.
पुरुषाला तृप्त करू न शकणारी स्त्री असा काही प्रकार अस्तित्वात असतो का? की रतिक्रीडेत मनापासून सहभागी न होणारी स्त्री हा प्रकार इथल्या कुणाला सापडलेलाच नाहिये? आपल्याकडलेच नव्हे, तर जगभरातले 'संस्कार' हे स्त्रीची कामेच्छा मारून कशी टाकता येईल, यावरच जास्त भर देणारे आहेत. २. स्तंभन, उर्फ तुमचा घासाघीस करण्याचा स्टॅमिना वाढवणे हा पुरुषार्थ कधीपासून झाला? नॅचरलीच स्त्रीला उद्दिपीत व्हायला अधिक कालावधी लागतो. पूर्ण उद्दिपनानंतर, मानसिक रिप्रेशन नसेल, तर स्त्री व पुरुष दोघांचाही अ‍ॅक्चुअल कॉयटस टाईम सारखा आहे. रिंगेसारख्या सेक्स-एड्स (संभोगासाठीच्या मदतीची साधने) या लैंगिक आजारांसाठी, योग्य तपासण्या झाल्यानंतर वापरावयाच्या बाबी आहेत. 'नॉर्मल' वापरासाठी अजिबात नाहीत. शेवटी, या जगात खरे लैंगिक शिक्षण अतीव गरजेचे आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 11/01/2016 - 21:28

In reply to आतापर्यंत न दिसलेले दोन मुद्दे by आनंदी गोपाळ

Permalink

चपखल!

चपखल!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 11/01/2016 - 23:42

In reply to आतापर्यंत न दिसलेले दोन मुद्दे by आनंदी गोपाळ

Permalink

सहमत!

सहमत!
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 11/02/2016 - 00:38

In reply to आतापर्यंत न दिसलेले दोन मुद्दे by आनंदी गोपाळ

Permalink

तुम्ही डॉक्टर आहात म्हणून प्रतिसाद देतो

पुरुषाला तृप्त करू न शकणारी स्त्री असा काही प्रकार अस्तित्वात असतो का? की रतिक्रीडेत मनापासून सहभागी न होणारी स्त्री हा प्रकार इथल्या कुणाला सापडलेलाच नाहिये? आपल्याकडलेच नव्हे, तर जगभरातले 'संस्कार' हे स्त्रीची कामेच्छा मारून कशी टाकता येईल, यावरच जास्त भर देणारे आहेत. पुरुषाची कामतृप्ती इजॅक्युलेशनवर अवलंबून आहे पण स्त्रीच्याबाबतीत ती बरीच काँम्प्लेक्स आहे. माझ्या मते प्रिती हा अत्यंत फंडामेंटल सायकॉलॉजिकल फॅक्टर, टाईम लॅग हा शारीरिक फॅक्टर, स्त्रीच्या चित्ताची निर्वेधता आणि अपराधभावाचा आभाव (गिल्ट फ्री स्टेट ऑफ माइंड) या सर्वांच्या एकत्रित परिणामातून स्त्रीच्या कामतृप्तीची संभावना निर्माण होते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जगभरातले 'संस्कार' हे स्त्रीची कामेच्छा मारून कशी टाकता येईल, यावरच जास्त भर देणारे आहेत . त्यामुळे स्त्रीची कामेच्छा गिल्ट फ्री माइंडवर अवलंबून असावी. युगुलातला पारस्पारिक अनुबंध आनंद घेण्यापेक्षा `देण्याची' भावना निर्माण करतो. त्यामुळे माझ्या अनुभावनं संभोग हा `शेअरींग एक्स्पिरियंस' (सम-भोग) आहे. पारस्पारिक प्रिती, निर्वेध चित्तदशाआणि अपराधशून्य मनोदशा, कोणत्याही साधनाचा वापर न करता दोघांनाही एकाच वेळी कामतृप्त करतात. तरीही शारीरिक परिमाणावर पुरुषाचा स्तंभन काल काही वेळा कमी पडू शकतो त्यामुळे प्युबिस रिंगचा उपयोग होतो इतकाच लेखाचा विषय आहे. स्तंभन, उर्फ तुमचा घासाघीस करण्याचा स्टॅमिना वाढवणे हा पुरुषार्थ कधीपासून झाला? अर्थ, काम आणि मोक्ष हे तीन पुरुषार्थ प्राचिन कालापासून मान्य आहेत. धर्म हा मोक्षाचा भाग आहे त्यामुळे तो वेगळा पुरुषार्थ नाही. माझ्या अनुभवानं अर्थ या पुरुषार्थाला कोणताही निर्वैयक्तिक निकष नाही. म्हणजे नक्की किती संपत्ती म्हणजे पुरुषार्थ याला मोजमाप नाही. तद्वत मोक्ष हे अध्यात्मिक परिमाण आहे आणि जवळपास दुर्लभ आहे त्यामुळे तो ही पुरुषार्थ कितपत साधेल हे साशंक आहे. काम हा पुरुषार्थ मात्र स्त्रीला कामतृप्त करणे, खरं तर दोघांनी एकाच वेळी कामतृप्त होणे यात आहे. त्याचं मोजमाप हे सखीच्या कमालीच्या शांत झालेल्या चेहेर्‍यावरचा आनंद, तिच्या देहात निर्माण झालेली उब, संपूर्ण शरीरात आलेलं रिलॅक्सेशन आणि श्वासाची शांत झालेली लय आहे. त्यामुळे प्रतिसादातली ग्राम्य कल्पना आणि अपेक्षित पुरुषार्थ यात फरक आहे. नॅचरलीच स्त्रीला उद्दिपीत व्हायला अधिक कालावधी लागतो. पूर्ण उद्दिपनानंतर, मानसिक रिप्रेशन नसेल, तर स्त्री व पुरुष दोघांचाही अ‍ॅक्चुअल कॉयटस टाईम सारखा आहे. स्त्रीच्या पूर्ण उद्दिपनात रिप्रेशनच्या आभावाखेरिज समर्पणभावाचा फार मोठा हात आहे आणि त्यासाठी पारस्पारिक अनुबंध आवश्यक आहे. शिवाय दोघांची चित्तदशा निर्वेध असल्याशिवाय समसमयावच्छेद शक्य होईलसे वाटत नाही. रिंगेसारख्या सेक्स-एड्स (संभोगासाठीच्या मदतीची साधने) या लैंगिक आजारांसाठी, योग्य तपासण्या झाल्यानंतर वापरावयाच्या बाबी आहेत. 'नॉर्मल' वापरासाठी अजिबात नाहीत. प्युबिस रिंग नॉर्मल पुरुषानं वापरु नये याच्याशी मी सहमत नाही. ती सर्रास वापरण्याची गरज नाही पण इट इज जस्ट अ जॉय डिवाइस. सदस्यांनी प्रतिसादातून केवळ वाचलेल्या माहितीवरुन निर्माण केलेला धसका निराधार आहे. या जगात खरे लैंगिक शिक्षण अतीव गरजेचे आहे... लेखावरच्या एकूण प्रतिसादांवरुन माझं ही असंच मत झालंय.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Wed, 11/02/2016 - 01:47

In reply to तुम्ही डॉक्टर आहात म्हणून प्रतिसाद देतो by संजय क्षीरसागर

Permalink

पुरुषार्थ आणि 'काम'

काम हा पुरुषार्थ मात्र स्त्रीला कामतृप्त करणे, खरं तर दोघांनी एकाच वेळी कामतृप्त होणे यात आहे.
'काम' या संकल्पनेचा अतिशय संकुचित, विपर्यस्त अर्थ. धर्म म्हणजे सर्वसाधारणपणे मानवी जीवनातील नानाविध प्रकारची कर्तव्यकर्मे, अर्थ म्हणजे जीवनयापनासाठी करण्याची कर्मे, तर 'काम' म्हणजे मनुष्याच्या 'मनोकामना' आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे. अर्थात 'काम' हे अगदी तान्ह्या बाळापासून मरणसन्न अवस्थेत असलेल्या कोणत्याही वयाच्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि तृतीय पंथी व्यक्तीच्या ठायी क्षणोक्षणी उत्पन्न होणार्‍या इच्छांना दिलेले सर्वसमावेशक नाव होय. या तिन्हीत अडकून पडलेली व्यक्ती म्हणजे 'बद्ध'... पुढे यातून मुक्त होण्याची आस निर्माण झाली की ती अवस्था म्हणजे 'मुमुक्षु' ... मग त्यातून मुक्त होण्यासाठी प्रयास करणारा तो (किंवा ती) म्हणजे 'साधक' आणि अंतिमतः ती मुक्ती वा मोक्ष प्राप्त होणारी व्यक्ती म्हणजे 'सिद्ध' अशी संपूर्ण मानव जीवन व्यापणारी विराट व्यवस्था आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली आहे, त्याचा एक अगदी छोटासा अंश म्हणजे रतिक्रिया या शब्दातून ध्वनित होणारा 'काम'. चार 'पुरुषार्थ' फक्त 'नर' - पुरुष याचेसाठी नसून प्रत्येक मनुष्यप्राण्याच्या जीवनाची एक विचारपूर्वक केलेली मांडणी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 11/02/2016 - 18:38

In reply to पुरुषार्थ आणि 'काम' by चित्रगुप्त

Permalink

निराधार मांडणी वाटते

'काम' म्हणजे मनुष्याच्या 'मनोकामना' आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे. यात पुरुषार्थ कसा जोखणर ? अर्थात 'काम' हे अगदी तान्ह्या बाळापासून मरणसन्न अवस्थेत असलेल्या कोणत्याही वयाच्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि तृतीय पंथी व्यक्तीच्या ठायी क्षणोक्षणी उत्पन्न होणार्‍या इच्छांना दिलेले सर्वसमावेशक नाव होय. नवजात अर्भकानं, तृतीय पंथीयानं किंवा मरणासन्न व्यक्तीनं काय पुरुषार्थ साधावा अशी अपेक्षा असेल ? चार 'पुरुषार्थ' फक्त 'नर' - पुरुष याचेसाठी नसून प्रत्येक मनुष्यप्राण्याच्या जीवनाची एक विचारपूर्वक केलेली मांडणी आहे. स्त्रीच्या बाजूनं विचार केल्यास `चार पुरुषार्थांचं' मापन कसं करणार? शिवाय पूर्ण प्रतिसादात `अर्थाचा' उल्लेख नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 11/02/2016 - 18:58

In reply to निराधार मांडणी वाटते by संजय क्षीरसागर

Permalink

प्रतिसादातच हे सर्व आले आहे

प्रतिसादातच हे सर्व आले आहे की ! अर्थ म्हणजे जीवनयापनासाठी करण्याची कर्मे, हे आहेच वरच्या प्रतिसादात. गरज नाही पण तरीही याचा अजून इक्साटून अर्थ सांगायचा तर "जीवन सुखात जावे यासाठी मिळविण्याची साधनसंपत्ती" असे म्हणता येईल. तर 'काम' म्हणजे मनुष्याच्या 'मनोकामना' आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे. अर्थात 'काम' हे अगदी तान्ह्या बाळापासून मरणसन्न अवस्थेत असलेल्या कोणत्याही वयाच्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि तृतीय पंथी व्यक्तीच्या ठायी क्षणोक्षणी उत्पन्न होणार्‍या इच्छांना दिलेले सर्वसमावेशक नाव होय. ह्यात अजून काय इस्काटून सांगणार ?? *************** "पुरुषार्थ" या विशाल अर्थाच्या शब्दाचा अर्थ केवळ शय्यागृहापुरता संकुचित ठेवणारे "विचारी" लोक आहेत हे आश्चर्यकारक आहे ! शब्दभांडाराच्या अर्थाचे प्रत्येकाने आपल्या मनाने पुनर्लेखन करणे भाषेसाठी योग्य होणार नाही असे वाटते. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 11/02/2016 - 19:28

In reply to प्रतिसादातच हे सर्व आले आहे by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

पुरुषार्थ" या विशाल अर्थाच्या

पुरुषार्थ" या विशाल अर्थाच्या शब्दाचा अर्थ केवळ शय्यागृहापुरता संकुचित ठेवणारे "विचारी" लोक आहेत हे आश्चर्यकारक आहे !
+१०००००० अगदी तीव्र सहमत!
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 11/02/2016 - 23:14

In reply to प्रतिसादातच हे सर्व आले आहे by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

काम ही निसर्गाची स्वतःच्या पुनर्निमितीची प्रक्रिया आहे

तस्मात, देहाची सार्थकताच कामसक्षम असण्यात आहे. जो देह कामदुर्बल झाला तो वृद्धत्वाकडे झुकू लागतो. याचा अर्थ व्यक्तीनं कामुक असावं असा नाही पण प्रणयसक्षम असणं हिताचं आहे मग तो देह स्त्री असो वा पुरुष. "पुरुषार्थ" या विशाल अर्थाच्या शब्दाचा अर्थ केवळ शय्यागृहापुरता संकुचित ठेवणारे "विचारी" लोक आहेत हे आश्चर्यकारक आहे ! इतर पुरुषार्थांचा उल्लेख लेखात आणि प्रतिसादात आहे त्यामुळे पुरुषार्थ केवळ कामापुरताच मर्यादित आहे असा कुठेही दावा नाही. तरीही कामाचा अर्थ `मनुष्याच्या 'मनोकामना' आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे'. असा काढला तर त्यात पुरुषार्थ तो काय ? नक्की कोणत्या मनोकामनांची पूर्ती झाली की पुरुषार्थ साधला असे म्हणता येईल? आणि हे मानदंड कसेही प्रस्थापित केले तरी ते व्यक्तीपरत्वे बदलतील. शिवाय पुरुषार्थ हा लेखात आलेला अनुषंगिक भाग आहे. पारस्पारिक कामतृप्तीनं एकमेकात अनुबंध निर्माण होतो, तारुण्य दीर्घकाल टिकू शकतं आणि संसार सुखाचा होतो इतका साधा विषय आहे. चर्चेत विषयांतर नको म्हणून उद्देश अधोरेखित करणारा सातीजींचा एकमेव समंजस प्रतिसाद पुन्हा उधृत करतो : सेक्श्युअल कंपॅटीबिलिटी आणि सटायटी (अर्थातच दोघांचीही) जोडप्यातले विसंवाद बरेच कमी करते आणि इतर बरेच प्रश्नही शांतपणे हाताळले जातात असा निष्कर्ष बर्‍याच मनोविकारतज्ज्ञांच्या अभ्यासातून दिसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 11/02/2016 - 23:33

In reply to काम ही निसर्गाची स्वतःच्या पुनर्निमितीची प्रक्रिया आहे by संजय क्षीरसागर

Permalink

इतक्या उघड गोष्टीसाठी लिंकची गरज वाटत नाही तरीही ...

पुरुषार्थ चार है - (1) धर्म (religion 0r righteouseness), (2) अर्थ (wealth) (3) काम (Work, desire and Sex) और (4) मोक्ष (salvation or or liberation)।
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Wed, 11/02/2016 - 23:44

In reply to इतक्या उघड गोष्टीसाठी लिंकची गरज वाटत नाही तरीही ... by संजय क्षीरसागर

Permalink

जी गोष्ट आपण आपल्या

जी गोष्ट आपण आपल्या जीवनभराच्या सोबत्यासोबत चार भिंतींच्या आत करतो ती सार्वजनिक संस्थळावर 'कशी करतो' हे जगजाहीर करणे हा पण एक 'पुरुषार्थ' असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 11/02/2016 - 19:42

In reply to निराधार मांडणी वाटते by संजय क्षीरसागर

Permalink

तुम्हाला सगळं बाल की खाल

तुम्हाला सगळं बाल की खाल काढून सांगावं लागतं म्हणून. जर मी चुकत नसेन तर 'काम' हे नाम संस्कृत 'कम्' (थांबा इतक्यात कान टवकारुन डोळे विस्फारु नका) या धातुपासून आहे. याचा अर्थ 'इच्छा बाळगणे' असा होतो. इच्छा मग ती कोणत्याही गोष्टीची असू शकते. आता जर तुम्ही लहान मुलाशी याचा काय संबंध म्हणाल तर आठवा ते दिवस, जेव्हा मुलं दुसर्‍याच्या हातातल्या चॉकलेट आदि गोष्टींकडे टकामका बघत असतात. अर्थात ते हवं आहे अशी त्यांची इच्छा असते. तर जे जे आपल्याला हवं असतं, त्याचा तुम्हाला अभिप्रेत असलेला हा रिंगवाला काम एक छोटासा भाग आहे. तुम्ही मात्र सगळं उचलून बेडरुमशी कनेक्ट करत आहात. याहून काही समजावता येईल असं वाटत नाही. त्यामुळे समजलं तर ठीक नाहीतर रिंगा रिंगा चालू देत.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 11/02/2016 - 20:05

In reply to तुम्हाला सगळं बाल की खाल by सूड

Permalink

संक्षींना इथे काहीही बोलणे

संक्षींना इथे काहीही बोलणे म्हणजे त्यांना "टारगेट" करणे आहे असा काही लोकांचा समज आहे. पण तुम्ही ३-४ जणांनी वर कितीही मुद्देसुदपणे "काम" ह्या संकल्पनेचा अर्थ सांगितला तरी संक्षी तो मान्य करणार नाहीत अशी माझी अटकळ आहे. आपली बेसिक कन्सेप्ट्च टोटली गंडली आहे हे संक्षी कधीच मान्य करत नाहीत हे मात्र काही लोक सोयीस्कररित्या विसरतील. संक्षीच्या लिखाणाचा टोन बदललाय हे मी सुद्धा मान्य करते. पुर्वीसारखी समोरच्याची अक्कल आता ते काढताना दिसत नाहीत. अजुनही काही खटकणार्‍या बाबी आहेतच पण बदल झालाय हे मान्य आहे. पण जर त्यांनी "काम" ह्या संकल्पनेची आपली व्याख्या चुकली आहे आणि ही चर्चा करताना वैयक्तिक बाबी इथे आणायची गरज नव्हती हे मान्य केलं, तर मात्र तो माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Wed, 11/02/2016 - 20:31

In reply to निराधार मांडणी वाटते by संजय क्षीरसागर

Permalink

निराधार मांडणी

निराधार मांडणी वाटते
पूर्वी शास्त्रार्थाचे वेळी अथवा नवीन ग्रंथ लिहीताना आपल्या विधानाला कोणकोणत्या शास्त्रांचा आधार आहे, हे सप्रमाण सांगावे लागायचे त्याची आठवण झाली हे वाचून. ओशोंच्याच साहित्यात सापडेल सर्व. शोधले तर सापडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Wed, 11/02/2016 - 20:26

In reply to तुम्ही डॉक्टर आहात म्हणून प्रतिसाद देतो by संजय क्षीरसागर

Permalink

लई लई लई भारी वाटले

तुम्ही डॉक्टर आहात म्हणून प्रतिसाद देतो
एक ऐरागैरा, बाजारबुणगा मिपाकर म्हणून लई म्हंजे लईच मज्जा आली हे वाचून.
"सरजीका परशाद पाने के लिए 'डॉक्टर' होना अनिवार्य है, ऐरे-गैरे को जवाब नही मिलेगा"
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 11/02/2016 - 08:03

In reply to आतापर्यंत न दिसलेले दोन मुद्दे by आनंदी गोपाळ

Permalink

गोपाळरावांचे मुद्दे बरोबर आहेत.

त्यांच्यात ही सुधारणा कौतुकास्पद आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Wed, 11/02/2016 - 09:30

In reply to गोपाळरावांचे मुद्दे बरोबर आहेत. by बोका-ए-आझम

Permalink

चौफेर टोलेबाजी लावलीय राव

चौफेर टोलेबाजी लावलीय राव तुम्ही तर =))
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Wed, 11/02/2016 - 13:51

In reply to गोपाळरावांचे मुद्दे बरोबर आहेत. by बोका-ए-आझम

Permalink

सर्फिटिकेट प्रदानाबद्दल धन्यु!

इथे प्रतिसाद टंकणार्‍या काहींत सुधारणा होइल अशी अपेक्षाही नसल्याने मी नेहेमीच आनंदी असतो. बादवे, ही असली सर्फिटिक्टं वाटायचा परवाना कुटं व केवड्यात मिल्तो मिपावर?
  • Log in or register to post comments

Submitted by नमकिन on Tue, 11/01/2016 - 21:42

Permalink

स्किन पण

आहे, रिंग सोडा व स्किन धारण करा. बघा मग सांगाल की " पहले क्यों नहीं बताया " स्वानुभव आहे तर तो जाहीर केला तर इतरांनी स्वतःच्या भावना नियंत्रित करण्यात येणारे अपयश व अपराधाचे रूपांतर करूणेत केले यावरुन आपल्या संकुचित मनाचे प्रदर्शन झालेय. जाओ पहले उस आदमी का साइन लेके आओ टाईप. टीप- तथाकथित संशोधन न वाचता दिलेला प्रतिसाद. मुद्दामच, प्रसारकाला वकील बनवण्याचा हा राजरोस प्रकार.
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Tue, 11/01/2016 - 22:22

Permalink

बालाजी तांबेंंवर जर गुन्हा दाखल होऊ शकतो तर

हे जे डॉक्टर आहेत त्यांना तर जन्मठेपच व्हायला हवी.... मुलगाच होण्याचे उपाय ?? मूर्खपणा आहे सगळा...रस्त्याशेजारचा तंबूतला युनानी हकीम आपली जाहिरात करतोय असं वाटतंय !
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 11/01/2016 - 22:32

In reply to बालाजी तांबेंंवर जर गुन्हा दाखल होऊ शकतो तर by माम्लेदारचा पन्खा

Permalink

इथे दोन-तीनद उल्लेख आला

इथे दोन-तीनद उल्लेख आला म्हणुन जाऊ पाहिली ती पीडीएफ परत. खरंच त्यात चक्क हेच लिहीलय की "मुलगाच होण्यासाठी रिंग सहाय्य करते.." ह्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते ना? अजुन एक म्हणजे, इथे तर किंमत १०००/- सांगितली आहे. शिवाय फोन करुन माझ्याशीच बोला असंही लिहीलंय. =))
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Tue, 11/01/2016 - 22:49

In reply to इथे दोन-तीनद उल्लेख आला by पिलीयन रायडर

Permalink

नक्कीच होऊ शकते.....

तिथल्या दिलेल्या पत्त्याची खात्री करायला हवी आणि असे प्रकार जर तिथे चालत असतील तर कायदेशीर पध्दतीने गुन्हा दाखल करता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 11/01/2016 - 22:57

In reply to इथे दोन-तीनद उल्लेख आला by पिलीयन रायडर

Permalink

अजुन एक म्हणजे, इथे तर किंमत

अजुन एक म्हणजे, इथे तर किंमत १०००/- सांगितली आहे. शिवाय फोन करुन माझ्याशीच बोला असंही लिहीलंय. =))
हो ना! पण सरांना ९०% डिस्काऊंट मिळालेला दिसतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 11/02/2016 - 01:02

In reply to अजुन एक म्हणजे, इथे तर किंमत by आदूबाळ

Permalink

पिडीएफचं प्रयोजन

टाईम लॅग आणि प्युबिस रिंगचा उपयोग इतकंच मर्यादित होतं. वेरेकरांच्या जेंडर प्रेफरन्साचा पहिल्या पानावर निषेध केला आहे आणि रिंग इतरत्र उपलब्ध आहे असं लेखातच लिहीलंय. वेरेकरांवर जेंडर प्रेफरंशियल ट्रिटमंटबद्दल दावा दाखल करायचा का लेखातल्या मुद्यावर चर्चा करायची हे ज्याचं त्यानं ठरवावं.
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Wed, 11/02/2016 - 07:39

In reply to पिडीएफचं प्रयोजन by संजय क्षीरसागर

Permalink

बाकीची सगळी बडबड राहु द्या .

बाकीची सगळी बडबड राहु द्या . तुमच्या बायकोने तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवुन चार भिंतीच्या आत तुम्हाला साथ दिली आणि त्याचे तुम्ही चार चौघात प्रदर्शन मांडले आहे त्याबद्दल आधी माफी मागा त्यांची. अत्यंत अपमानास्पद आहे हे त्यांच्यासाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 11/02/2016 - 14:34

In reply to बाकीची सगळी बडबड राहु द्या . by स्रुजा

Permalink

आपण काही चुकीचं केलंय किंवा

आपण काही चुकीचं केलंय किंवा दोन व्यक्तींमधील अशा पूर्णतः यक्तिगत गोष्टी चव्हाट्यावर मांडून औचित्यभंग केलाय हेच त्यांना मान्य नाही. त्यामुळे अजूनही त्यांचे नवीन प्रतिसाद सुरूच आहेत. माफी वगैरे तर फार लांबची गोष्ट झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Wed, 11/02/2016 - 19:00

In reply to आपण काही चुकीचं केलंय किंवा by श्रीगुरुजी

Permalink

हो ना !! अवघड आहे..

हो ना !! अवघड आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 11/02/2016 - 07:44

In reply to पिडीएफचं प्रयोजन by संजय क्षीरसागर

Permalink

सर, पण तुम्ही निषेध करून

सर, पण तुम्ही निषेध करून वेरेकर exonerate होत नाहीत ना.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 11/02/2016 - 10:32

In reply to सर, पण तुम्ही निषेध करून by आदूबाळ

Permalink

आता लेखातली पिडीएफ लिंकपण काढली आहे

त्यामुळे लेखाचा विषय वेरेकररहित आणि एकदम सरळ झाला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Wed, 11/02/2016 - 19:03

In reply to आता लेखातली पिडीएफ लिंकपण काढली आहे by संजय क्षीरसागर

Permalink

वेरेकर राहू देत. तुमच्या नको

वेरेकर राहू देत. तुमच्या नको इतक्या तपशीलांबद्दल कधी बोलताय? तुम्ही औचित्यभंग तर केलाच आहे , पण हे तुमच्या बायकोने कधी वाचलं तर त्यांना ह्युमिलिएटिंग वाटेल असं कधी चुकुन देखील वाटलं नाही का ? ते काय अद्वैत का काय असतं तुमच्या मते नवरा बायकोत त्यात एकमेकांची खाजगी स्पेस जपणे, आदर करणे एवढ्या साध्या गोष्टी येत नाहीत का?
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Wed, 11/02/2016 - 03:49

In reply to अजुन एक म्हणजे, इथे तर किंमत by आदूबाळ

Permalink

पीडीयफ मधील काही उतारे

"पुरुषाचे खरे पुरुषत्व हे मादीला पूर्ण शरीर सुख देवून तिच्या लैंगिक इच्छेचे संपूर्ण शमन करण्यात आहे. मग ती त्याची पत्नी असो, मैत्रीण असो, अकस्मात प्रेमिका असो किंवा पैश्याच्या मोबदल्यात शरीर देणारी वेश्या असो...." (पृ.२) "प्युबिस रिंग ही भारतात कुठेही उपलब्ध नाही. डॉ. वेरेकर यांचेकडेच ती मिळते."..... (पृ.१४) " या प्युबिस रिंगची किंमत सध्या रु. १०००/- फक्त आहे. या रिंग किंमतीत दर सहा महिन्यात वाढ होत जाते..." "ज्यांना फक्त मुलीच होतात मुलगा होत नाही ...... प्युबिस रिंगच्या उपयोगाने मुलगाच होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते...." "नव्या स्त्री पार्टनरला इंप्रेस करण्यासाठी -- जीवनात संधी मिळाल्यास, नवी स्त्री जीवनात आल्यास ......... आजच पैसे पाठवून मागवून घ्या आणि नेहमी जवळ ठेवा. अशी संधी कधी येईल ते सांगता येत नाही. जेंव्हा संधी येईल तेंव्हा 'दैव देते आणि कर्म नेते' अशी अवस्था व्हायला नको...." (पृ. १६)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 11/01/2016 - 22:37

Permalink

स्वतःचे व आपल्या पत्नीचे

स्वतःचे व आपल्या पत्नीचे संपूर्णत: खाजगी व चार भिंतीच्या आत असलेले वैयक्तिक असलेले अनुभव सार्वजनिक करणे हे अनुचित आहे हे मी आधीच लिहिले होते. परंतु काही जणांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रगल्भता असे मुद्दे काढून लेखाला विरोध केला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 11/01/2016 - 22:51

Permalink

खालील बातमीचे शीर्षक

खालील बातमीचे शीर्षक वाचल्यावर धक्काच बसला. Spy ring: 16 more Pakistan high commission officials are involved! http://m.rediff.com/news/report/spy-ring-16-more-pakistan-high-commission-officials-are-involved/20161101.htm
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 11/02/2016 - 07:50

Permalink

संक्षी,खरंच? खरंच तुम्हाला

संक्षी,खरंच? खरंच तुम्हाला रिंग च्या उपयुक्ततेबद्दल हा धागा काढायचा होता? तुमचे प्रतिसाद नीट वाचले तर असं दुरान्वयेही वाटत नाहीये. बाकी, ते डॉक्टर नाशकातलेच आहेत, भेटून येतो आता जरा त्यांना... लेख असू देत पण संपादक मंडळाने किमान ती पीडीएफ लिंक नाहीशी करायला हवी होती, विनासायास मिपाचा प्लॅटफॉर्म वाह्यात अशा फुकट जाहिरातीसाठी वापरला जातोय.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 11/02/2016 - 07:59

In reply to संक्षी,खरंच? खरंच तुम्हाला by संदीप डांगे

Permalink

संक्षी बहुतेक त्या रिंगचे brand ambassador असावेत डांगेअण्णा!

रच्याकने एखादी गोष्ट बेकायदेशीर असेल तर तिचा प्रचार आणि प्रसार हाही बेकायदेशीर असतो, बरोबर? उद्या इथे कोणीतरी गांजाबद्दल लिहील. काय करावे ब्रे अशावेळी?
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 11/02/2016 - 11:07

In reply to संक्षी,खरंच? खरंच तुम्हाला by संदीप डांगे

Permalink

पिडीएफ लिंक काढली आहे

त्यामुळे वेरेकरांचा आणि लेखाचा संबंध टाईम लॅग आणि प्युबिस रिंग पुरताच मर्यादित राहिला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Wed, 11/02/2016 - 08:12

Permalink

फारच चर्वण झाले आहे

ह्या विषयावर खूपच चर्वण झाले आहे, त्यामुळे आता पुढचे प्रतिसाद वाचायचा देखील कंटाळा येऊ लागलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Wed, 11/02/2016 - 09:48

Permalink

धागा, पीडीएफ आणि सगळी चर्चा

धागा, पीडीएफ आणि सगळी चर्चा वाचली. पीडीएफ वाला डॉक्टर 'पुत्रजीवक बीज' आणि 'वैद्य रंजन' वगैरे छाप यझ माणूस वाटला. धागाकर्ते अनुभवांनी बोलत असल्याने त्यावर आपला पास ;) काही सदस्यांना हे विषय हाताळायला मिपा प्रगल्भ न वाटण्याची कारणे बघून तेचं अजून प्रगल्भ नाहीत असे वाटून गेले.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्बोचार्जड फिलॉसॉफर on Wed, 11/02/2016 - 13:01

Permalink

संक्षी,अजया व इतर महीला

संक्षी,अजया व इतर महीला सदस्या जे म्हणाल्या तेच म्हणतो.स्वतःच्या पत्नीला तुम्ही इथे ऑब्जेक्टीफाय करत आहात असे वाटले.लेख प्रथमपुरुषी एकवचनी ऐवजी द्वीतीयपुरुषी अनेकवचनी असता तर आक्षेप घ्यायचे काही कारण न्हवते.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 11/02/2016 - 14:36

In reply to संक्षी,अजया व इतर महीला by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

Permalink

द्वीतीयपुरुषी अनेकवचनी असता

द्वीतीयपुरुषी अनेकवचनी असता तरी स्वतःच्या काय किंवा दुसऱ्याच्या काय कोणाच्याही पत्नीला ऑब्जेक्टिफाय केले जाणारच!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 11/02/2016 - 14:45

In reply to संक्षी,अजया व इतर महीला by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

Permalink

माझं मत असं आहे की आपण कसा

माझं मत असं आहे की आपण कसा लोकांचा उद्धार करण्यासाठी अवतरलो आहेत असे भाव आणून नयेत. बडेजाव करायचाच आहे तर सरळ मुद्द्यावर यावे, उगाच वेड घेऊन पेडगावला जाऊ नये. सिम्पल!! तसेही कोणी आरती ओवाळली नाही तर तबकासमोर आपलं श्रीमुख ओवाळून घेणारी मंडळी कमी नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by पोप on Wed, 11/02/2016 - 14:57

Permalink

संक्शी आप वापस क्यों आये ?और

संक्शी आप वापस क्यों आये ?और आये तो पुरानी शराब नये बोतल में क्यों लाये?
  • Log in or register to post comments

Submitted by पोप on Wed, 11/02/2016 - 15:05

Permalink

संक्शी आप वापस क्यों आये ?

संक्शी आप वापस क्यों आये ? और आये तो पुरानी शराब नये बोतल मे क्यों लाये?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 11/02/2016 - 23:46

Permalink

तो वेरेकर एक येडा अन हा

तो वेरेकर एक येडा अन हा संक्षी दहा येडा. त्या दोघांनाही एंटरटेन करणारे मिपाकर शंभर येडे आहेत असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. (येडा) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 11/02/2016 - 23:48

In reply to तो वेरेकर एक येडा अन हा by बॅटमॅन

Permalink

त्यांना कोण एंटरटेन करतंय..?

त्यांना कोण एंटरटेन करतंय..? इथं लोक स्वतःला एंटरटेन करत बसलेत ना भाऊ! वेळ कसा घालवायचा एवढा!!
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 11/03/2016 - 03:36

In reply to त्यांना कोण एंटरटेन करतंय..? by पिलीयन रायडर

Permalink

पीडीयफ हटी, पब्लिक छटी

इथं लोक स्वतःला एंटरटेन करत बसलेत ना भाऊ!
छ्या... टंकाळा आला बुवा आता स्वतःला एंटरटेनवून घेण्याचा. तिकडे सरजी पण आता 'कामा'त गुंतलेत. (म्हणजे 'काम' म्हणजे नेमके काय, 'पुरुषार्थ' कशास म्हणावे वगैरे विकि-शोधात, ओशोंचं कोणतं वाक्य कोट करता येईल ते हुडकण्यात.. वगैरे) त्यामुळे काहीकाळ मिपासंन्यास घ्यावा आता. पीडीयफ वाचून, रिंग मागवून त्यानंतर होणार्‍या पोरा-पोरींची नावं कळायला अजून टैम लागेल.... रिंग्नेश, रिंगेंद्र, रिंगप्पा, रिंगकुमार, रिंगपाल, रिंगसिंह, रिंगेबिहारी, रिंगेंदर सिंग, रिंगेंदर कौर, रिंगबाला, रिंगरिका, अशी असणार कायतरी (मुलगे ज्यास्त होणार म्हणून मुलग्यांची नावे ज्यास्त). .... आता "पीडीयफ हटी, पब्लिक छटी" असं होणार. चालायचंच.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 02/01/2018 - 22:06

Permalink

असले भारी धागे

असले भारी धागे अधून मधून वरती यायला हवेत .
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sun, 03/29/2020 - 01:54

Permalink

अगदी बरोबर

अगदी बरोबर
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 03/29/2020 - 03:52

Permalink

धागे अधून मधून वरती

धागे अधून मधून वरती आणण्यापेक्षा - ट्याक्सविषयीचे धागे जीएसटी - २०१९-०७-०१, जीएसटी - २०२०-०१-०१, जीएसटी - २०२०-०७-०१, असे पुन्हा नवीन काढणे गरजेचे आहे. त्यात मागचा आढावा आणि आगामी बदलाचे परिणाम चर्चेला घेता येईल. ((बजेट येऊन नंतर कायमचे बदल होतात. कधी मध्येच नवीन बदल होतात.)) नवीन धाग्यात जुन्या धाग्याची लिंक असावी.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com