Skip to main content

सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 28/10/2016 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ प्रकाश वेरेकर सेक्सॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी स्त्री-पुरुष संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असलेल्या पिडीएफमधे वाचता येतील. सदर पुस्तिकेत लैंगिक संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (प्युबिस रींग), इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे हा लेख त्यांच्या रिंगची जाहिरात नाही, पण उपाय नामी आहे हे नक्की. तर मुद्दा असा की वरकरणी डॉ वेरेकरांचे विचार कितीही एकांगी वाटले आणि पारस्पारिक आदर आणि समानता यावरुन स्त्री-पुरुष संबंधात वाद दिसले तरी ते स्त्रीची अतृप्ती आणि पुरुषाचं असामर्थ्य या फंडामेंटल गोष्टीतून निर्माण होतात. याचा अर्थ स्त्रीला कामतृप्त करुन पुरुष पारस्पारिक आदर आणि समभाव यांना हरताळ फासू शकतो असा नाही. किंबहुना प्रणयतृप्त स्त्री आणि पुरुषात विनासायास अनुबंध निर्माण होतो. स्त्री दीर्घकाल आकर्षक दिसू आणि राहू शकते. आणि पुरुषाला अर्थ आणि मोक्ष हे पुरुषार्थ अचंबित होण्याइतपत साधता आले नाहीत तरी, काम हा पुरुषार्थ साधल्यानं तो समाधानी राहून सुखाचा संसार करु शकतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 83411
प्रतिक्रिया 252

प्रतिक्रिया

In reply to by बोका-ए-आझम

=))

In reply to by पैसा

निराकार पोकळीत सोडून दिलेला प्रश्न आहे. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तुमचे उत्तर काहीही असले तरी माझेच उत्तर बरोबर असणार आहे.

In reply to by मोदक

मला हेच म्हणायचे होते. शीर्षकाचा आव असा आहे कि स्त्रीपुरुष यातील संबंध हे एक कोडे आहे आणि याचे एकमेव आणि अखेरचे उत्तर मला सापडले आहे. कारण "जिग सॉ पझल" चे एकमेव उत्तर असते. स्त्रीपुरुष संबंध हा एक अत्यंत गहन विषय आहे. याचा पार वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र, अध्यात्म आणि कायदा या सर्व विषयांच्या अभ्यासकांना आणि दिग्गजांना अनादिकालापासून आजतागायत लागलेला नाही. याहून अधिक काय लिहिणे?

In reply to by सुबोध खरे

वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र, अध्यात्म आणि कायदा या सर्व विषयांच्या अभ्यासकांना आणि दिग्गजांना "स्व" गवसला होता का..?

In reply to by सुबोध खरे

>>>> स्त्रीपुरुष संबंध हा एक अत्यंत गहन विषय आहे. याचा पार वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र, अध्यात्म आणि कायदा या सर्व विषयांच्या अभ्यासकांना आणि दिग्गजांना अनादिकालापासून आजतागायत लागलेला नाही. याहून अधिक काय लिहिणे ? अच्छा ! म्हणजे कोणी ना कोणी प्रत्येकवेळी स्त्री-पुरुष संबंधाच्या बाबतीत काही तरी नवं सांगू इच्छितो (कदाचित ते जुनेही असेल) असेच म्हणावे लागेल नाही का ? ते विवेचन अंतिम नसेल असे नक्की म्हणु या. कोणी रिंग सुचवेल, कोणी उंट किंवा गाढव यांच्या प्रमाणे नैसर्गिक उत्सर्ग करायचा प्रयत्न करतील. अश्वमेध घोड्याशी यजमान स्त्रीने निजण्याचा प्रकार असेल (पाहा भारतीय विवाह संस्थेचा इतिहास) हे सर्व प्रकार सुख आनंदासाठी असतीलच असे नव्हे पण प्रयोग आणि प्रकार इतिहासातही दिसून येतोच. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी. सर्वच बरोबर नसतं, हे मान्य आहे. कदाचित ते जीवघेणेही असू शकेल. अशा वेळी सदसद्विवेक बुद्धी वापरलीच पाहिजे. ठीक आहे, एखादा म्हणत असेल की मला याचा शोध लागला तर म्हणू देत की आपण आहातच त्यातले बरोबर काय आणि चुक सांगायला. पण, चर्चा व्हायला काय हरकत आहे काय म्हणता ? दारु वाईट आहे, त्याचे दुष्परिणाम आहेत हे माहिती आहे, तरीही लोक दारु पितातच. आपण डॊक्टर म्हणुन सांगू शकाल की दारुने लिव्हर खराब होते आणि नंतर माणुस मरुही शकतो. बाकी, गोष्टीच्या बाबतीतही आपला असाच दृष्टीकोन असला पाहिजे असे वाटते. आपलं भांडन आचा-याच्या जिल्बीशी की आचा-याशी एकदा ठरवलं पाहिजे. :) -दिलीप बिरुटे (आपलाच)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकाच पाकात जिलबी घोळवून फक्त तीच जिलबी कशी भारी आहे हे सांगताना जगात पुडिंग, तिरामीसू, कस्टर्ड वगैरे प्रकार कसे भंपक आहेत हे सांगणारा जिलाबीवाला लै डोक्यात जातो. जिलबीवाल्याने नवीन जिलब्या तळण्यास हरकत नाही पण उगाच "माझीच लाल लाल जिलबी कशी छान छान..!!" ची रेकॉर्ड कशाला? आता जिलबीवाल्याने जबरदस्ती केली नाही हे ही खरे आहे, यावर उत्तर शोधून देतो (आणि तेच उत्तर बरोबर असेल) ;) आपलाच, मोदक

In reply to by मोदक

माणुस म्हटलं उन्नीस बीस चालायचंच मोदकसेठ. माझीच जिलेबी भारी आणि मी म्हणेल तीच जिलेबी भारी अशी "मी मी मिरवणारी" खुप लोक आहेत मिपावर काही दिसतात काही नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चार बोटं स्वतःवर रोखलेली असतात हे लोक्स का विसरतात ते कळत नाही. (अज्ञ विद्यार्थी) बोका-ए-आझम

In reply to by मोदक

हायला, असल्या धाग्यांना जिलबीची उपमा देऊन'जिलबी' या सुंदर पदार्थाचा आणि ती बनवणार्‍या आचार्‍यांचा कशाला अवमान करता भाऊ ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राध्यापक साहेब मी कोण हो चूक कि बरोबर सांगणारा? ते प्रत्येकाने स्वतः शोधायचे असते. वैद्यकाची चार बुकं शिकली कि माणूस सर्वज्ञ होत नाही. संक्षी यांनी दिलेला दुवा ज्या डॉक्टरांचा आहे त्यांच्या (डॉ प्रकाश वेरेकर) दाव्यातील फोलपणा आणि शाब्दिक कोलांट्या मी दाखवल्या एवढेच. मुळात स्त्रीपुरुष संबंधाचा संभोग हा एक पैलू आहे. यातील संभोग आणि त्याचा स्त्री/पुरुषांवर होणार परिणाम हा एक अत्यंत मोठा आणि गहन विषय आहे या पूर्ण विषयावर बरंच काही लिहिण्यासारखं आहे अर्थात मी जर लिहिलं तर ते फक्त या विषयाचा वैद्यकीय अंगाचा एक पैलू असेल एवढंच. एखाद्या संगीताच्या अभ्यासकाने एखाद्या रागाबद्दल काही विवेचन केल्यासारखे. त्याला तो राग गाता येईल असेही नाही. माझं म्हणणं एवढंच आहे कि अंतिम सत्य फक्त मलाच गवसलं आहे असे कुणी म्हणून नये किंवा मला गवसलं तेच अंतिम सत्य आहे असंही म्हणू नये.

In reply to by सुबोध खरे

एवढ्या जबरदस्त आध्यात्मिक अनुभवाबद्दल असं लिहवतं कसं तुम्हाला म्हणतो मी! प्रस्तुत धागाकर्ते बोलले म्हणजे साक्षात कामदेव बोलला हे माहित आहे ना तुम्हाला?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गाढवाला गुळाची.....आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र रिंगेची गरज काय? =))
या अर्थाने वरचे वाक्य बरोबरच आहे ;)

बाकी माझा सॉफिस्टिकेटेड> हा विडंबनाचा धागा संमनी पुन्हा जिवंत करण्यास हरकत नसावी... इतकाही वाह्यात नव्हता हो..

In reply to by मराठी कथालेखक

बाकी माझा "(सॉफिस्टिकेटेड)" हा विडंबनाचा धागा संमनी पुन्हा जिवंत करण्यास हरकत नसावी
असे वाचावे

किती भरकटवलं गेलं. एकतर हा धागा रिलेशनशीपच्या फिजिकल परिमाणावर आहे. त्यात टाईम लॅग हा उघड इश्यूच इथले सदस्य काय वैद्यकसुद्धा मान्य करत नाहीत तर चर्चा कशी होईल. आणि बेडरुम टू बोर्ड (पोस्ट व्यक्तिगत प्रश्नाचं सार्वत्रिकरण आहे) असा स्टँड घेतला तर मग बोलणंच संपलं. प्युबिस रिंग निर्धोक आहे किंवा नाही हे किमान एकदा वापरुन पाहिली तर कळेल. ज्याप्रमाणे खेळतांना प्लेअर्स रिस्ट बँड बांधतात तसा रिंगाचा सपोर्ट आहे. पण एखादी एक्स्ट्रीम केस किंवा priapism शी रिंगचा संबंध जोडून धसका निर्माण केला तर टाईम लॅग सोडवायला दुसरा उपाय काय तर मंत्र ! पॉज हा सामान्यातल्या सामान्य माणसानं सुद्धा केलेला प्रयोग असेल पण तो किती तकलादू आहे याचा अनुभव नसेल असं नाही. मग तो मुद्दा लढवण्यात काय हशील आहे? विवाहसंबंधातल्या मानसिक आणि आध्यात्मिक पैलूंवर या पोस्टमधे विवेचन व्हावं अशी अपेक्षा केली आहे. मारवांना दिलेल्या प्रतिसादात, विषयाला अनुसरुन जमेल तितका मानसिक पैलूचा उलगडा केला आहे. अध्यात्मिक परिमाणावर चर्चा होऊ शकेल असा माझ्या मते तरी हा फोरम नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

>>>>> प्युबिस रिंग निर्धोक आहे किंवा नाही हे किमान एकदा वापरुन पाहिली तर कळेल. संक्षिसेठ, आता तुम्ही रिंग बद्दल माहिती सांगितली. अनुभव सांगितला. आता वापरायचा हट्ट नका धरु राव. रिंग बद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. आता नवीन गझल वगैरे विषय घ्या...! बाकी, कोनाशी वैचारिक भांडन वगैरे फार लांबवू नका. मै तो चला ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुणी हट्ट धरावा आणि इतरांनी तो अनुसरावा अशी परिस्थिती इंटरनेटवर तरी नाही. बाकी तुमच्या सर्व प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार. नवी गज़ल नक्कीच घेईन पण ही पोस्टसुद्धा त्याच रोमँटिसिझमचा गद्य अविष्कार आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

अध्यात्मिक परिमाणावर चर्चा होऊ शकेल असा माझ्या मते तरी हा फोरम नाही.
नसेना का तेवढी लायकी मिपाकरांची, पण एवढ्या तळमळीनं नारीजातीच्या कल्याणाचा विडा उचललाय, तर इथेच सांगा ना रिंगेचे अध्यात्मिक परिणाम. शंभरातल्या एका तरी कळेल ना काहीतरी, की तेवढीही लायकी नाही तुमच्या मते मिपाकरांची ?

. त्यात टाईम लॅग हा उघड इश्यूच इथले सदस्य काय वैद्यकसुद्धा मान्य करत नाहीत तर चर्चा कशी होईल. हा निष्कर्ष आपण कशावरून काढला?

In reply to by सुबोध खरे

एकही प्रतिसाद इथे दिसला नाही. आणि तसं झालं असतं तर चर्चेनं वेगळं वळण घेतलं असतं. कदाचित तुम्ही आता मान्य करत असाल तर तदनुषंगिक मुद्दे असे येतील : > टाईम गॅप आहे > टाईम गॅप हा स्त्रीच्या प्रणय तृप्तीतला (किमान फिजिकल लेवलवर तरी) मुख्य घटक आहे > सेक्श्युअल कंपॅटीबिलिटी आणि सटायटी (अर्थातच दोघांचीही) जोडप्यातले विसंवाद बरेच कमी करते आणि इतर बरेच प्रश्नही शांतपणे हाताळले जातात असा निष्कर्ष बर्‍याच मनोविकारतज्ज्ञांच्या अभ्यासातून दिसतो (सातीजींचा प्रतिसाद) > टाईम गॅप मॅच करायचा उपाय (आणि तोच तर या धाग्याचा विषय आहे). मी सुरुवातीच्या प्रतिसादात म्हटलंय की वेरेकरांना वगळून टाईम गॅप आणि स्त्रीची (फिजिकल लेवलवर) अतृप्ती यावर चर्चा झाली असती तर बरं.

प्रस्तुत धागालेखक अध्यात्मिक तत्वज्ञ व 'काम'सू दिसतात. अध्यात्म व कामशास्त्र या दोन्ही क्षेत्रात एक्सपर्ट असलेले एक महान अवतारी युगपुरूष २० व्या शतकात भारतात होऊन गेले होते. त्यांनी मिपावर पुनर्जन्म घेतलेला दिसतो.

In reply to by सतिश गावडे

मला पण टाइम लॅग म्हणजे काही माहीती नाही. पण संक्षींसरांच्या मते जर संभोग लांबवणे म्हणजे स्त्रीला त्रुप्त करणे असेल. तर संभोग लांबवण्यासाठी काही योग्याभ्यास आहेत. बाकीचेही उपाय आहेत. लोकलज्जेस्तव मी इथे ते सांगू शकत नाही. संक्षीसरांना याबाबत खाजगीत सांगायला आवडेल.

In reply to by खटपट्या

लोकलज्जेस्तव मी इथे ते सांगू शकत नाही.
याचाच दुसरा अर्थ असा की तुम्ही प्रगल्भ नाही.

मिसेस संक्षि बद्दल मनात कमालीची करुणा दाटून आली. आपले खाजगीपण असे जाहीर उधळलेले त्या माउलीला नक्कीच माहीत नसणार किंवा सहन करावे लागत असणार !

पत्नी म्हणजे प्रयोगशाळेतले चंचुपात्र असते का संसारातले? मी कसे वेगवेगळे प्रयोग करतो पत्नीवर हे ओपन फोरमवर न सांगता लेख असता तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानले असते.ज्या माणसाला आपण पत्नीची प्रतिष्ठा जपत नाहीये हे कळत नाही त्यांनी पत्नीला मिळणार्या कामतृप्तीची चर्चा करणे हा प्रचंड संभावितपणा आहे.खरंतर विकृतीकडे झुकणारा. सौ संक्षींसाठी अतिशय वाईट वाटत आहे.

In reply to by अजया

त्यांच्यापर्यंत हे पोचत नसेलच का? समजा त्या मिपावर किंवा अनाहितामध्ये असल्या तर?

In reply to by पैसा

मग, आहेच मी निरागस बाकी मिपाचे साचलेपण घालवायला आणि आपण प्रगल्भ आहोत हे दाखवायला "तसली खेळणी" या विषयावर धागा काढावा का?

In reply to by टवाळ कार्टा

समजा त्या मिपावर असल्याच आणि त्यांना काही वावगे वाटले नसल्यास? तर त्यांना अगदी योग्य जोडीदार मिळाला असे म्हणता येईल. पण उद्या त्यांनासुद्धा त्यांचे वैयक्तिक अनुभव इथे न टंकण्याची बुद्धी झाली तर सदस्यांवर मेहेरबानी होईल. जर त्यांनाही वावगे वाटत असेल तर वरच्या दया ,करुणा इत्यादी भावनांशी सहमत.

In reply to by अजया

तो त्यांना प्रत्यक्षात आलाय असं तुम्ही गृहीत का धरतात? जर हा सगळा लेखकाचा कल्पनाविलास असला तर? पुलंनी ' मी आणि माझा शत्रुपक्ष ' मध्ये लिहिल्याप्रमाणे - दाखवायला आणलेल्या पहिल्या चि.सौ.कां.च्या गळ्यात माळ घालणाऱ्या अनेक लेखकांनी प्रेमकथा आणि कादंबऱ्या नाही लिहिल्या?

In reply to by बोका-ए-आझम

मला वाटतं आक्षेप रिंगने आलेल्या अनुभवांवर नसुन; "हा प्रतिसाद लिहीण्याच्या आधी जस्ट रिंग वापरुन आलोय" ह्या वाह्यातपणाला आहे.. तुमचा नाहीये का?

In reply to by पिलीयन रायडर

जेव्हा ते मी लेख लिहिण्याआधीच रिंग वापरून बघितली लिहितात तेव्हा ते भलेही कल्पना रंगवताना असले तरी पत्नीला पात्र म्हणून वापरत आहेत.आणि त्यात अशा प्रकारे एका स्त्रीचा उल्लेख होणे हा खटकणारा भाग आहे.यावर आक्षेप आहे.कोणत्या स्त्रीला तिच्या कामतृप्तीची चर्चा नवरा ओपन फोरमवर करतो हे वाचायला आवडेल? तिचा असा उल्लेख केला गेलाय याची तिला कल्पना नसताना?

In reply to by पिलीयन रायडर

मुळात स्वतःचे असे intimate अनुभव मांडणं - खरे किंवा काल्पनिक - आणि तेही ज्या व्यक्तीबरोबर तो अनुभव घेतलाय त्या व्यक्तीच्या भावनांचा विचार न करता - हे घृणास्पद आहे. पण कसं आहे की माणसाचं मन fantasize करु शकतं. तशी fantasy धागाकर्त्याने मनात कल्पिलेली असण्याचा एक benefit of doubt त्यांना देणं किंवा निदान तसा विचार करणं हे आपण करु शकतो. पैसाताईंनी मागे एकदा एका लेखाच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे - इथे आंतरजालावर लोक एकमेकांना प्रत्यक्ष पाहू शकत नसल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया या टोकाच्या असतात. तशा प्रतिक्रिया ते समोरासमोर भेटल्यावर देणार नाहीत. मीही धागाकर्त्याने असं का लिहिलंय यावर वैतागलो होतोच. पण ही एक शक्यता मी विचारात घेतली, एवढंच. (हुश्श!)

In reply to by बोका-ए-आझम

सर्वसाधारणपणे हे बरोबर असले तरी यालाही अपवाद असतात. माझ्या पलीकडे एक सोसायटी सोडून एक मिपाकर राहत असे. तो समोर आला की माझ्याशी जिभेवर साखर ठेऊन बोलत असे. मात्र मिपावर मी काही प्रतिसाद दिला रे दिला की हा त्यावर तुटून पडत असे. हातात भाकरी घेऊन लहान मूल अंगणात आले की कावळा जसा झडप घालतो तसा. मात्र हा अपवादात्मक अनुभव झाला. बहुतांशी वेळा एखाद्या व्यक्तीशी प्रत्यक्ष भेट झाली की प्रतिसादात तुटून पडणे अवघड जाते; प्रोव्हायडेड दॅट तुमच्यातील मतभेद विकोपाला गेले नाहीत.

In reply to by टवाळ कार्टा

जे तुमच्या मनात आहेत ते नाही. ते समोर राहतात. आणि ते लाखोलीच्या ऐवजी पुरणपोळी खाऊ घालतात.

In reply to by बोका-ए-आझम

कदाचित त्यांचं लग्न झालंय हीच एक फॅन्टसी (त्यांची) असेल आणि प्रत्यक्षात ते अविवाहित असतील.

In reply to by बोका-ए-आझम

मी मागवलेल्या रिंगला बीडस आहेत त्यामुळे क्लिटोरल स्टिम्युलेशन उत्तम होतं शिवाय ती अत्यंत उच्च दर्जाच्या सिलीकॉनपासून बनवल्यामुळे कमालीची सॉफ्ट आहे.
हे वाचून देखील तुम्हाला वाटतं की मिपाकर गृहीत धरत आहेत? आता कोणी काय आणि किती मोकळेपणाने सांगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण जी गोष्ट सांगतोय ती आपल्यापुरती मर्यादित नसून काही अंशी जोडीदाराशीही संबंधित आहे याचं भान असावं. आणि आता सांगतच आहे तर मिपाकरांचा अज्ञानातून उद्धार करायला आपला अवतार झालाय असे आव आणू नयेत. मूळ मुद्द्यावर यावेत. या अशा स्वभावावर मला एक मिपाच्याच एका कट्ट्यात ऐकलेला संवाद नेहमी आठवतो...तो येणेप्रमाणे (अर्थात पात्रांची नावं बदलून): "सुमे तुला सांगते शेजारणीचा चकलीचा सोर्‍या पाहून मी माझ्या नवर्‍याकडे धोशाच लावला मलाही असाच सोर्‍या हवा. तात्पुरता म्हणून जावेच्या माहेरुन सोर्‍या घेऊन आले. माझ्या जावेचं माहेर म्हणजे ते अत्तर वाले केळकर आहेत कीनईऽऽऽ, ते!!" वरील सगळ्या पाल्हाळात जसा सोर्‍या हा महत्वाचा नसून शेवटचं बडेजावाचं वाक्य अधोरेखित करायचं आहे, त्यातलाच एकूण प्रकार हा धागा आहे. असे लोक प्रचंड डोक्यात जातात.


१.
स्त्री-पुरुष संबंधात वाद दिसले तरी ते स्त्रीची अतृप्ती आणि पुरुषाचं असामर्थ्य या फंडामेंटल गोष्टीतून निर्माण होतात.
पुरुषाला तृप्त करू न शकणारी स्त्री असा काही प्रकार अस्तित्वात असतो का? की रतिक्रीडेत मनापासून सहभागी न होणारी स्त्री हा प्रकार इथल्या कुणाला सापडलेलाच नाहिये? आपल्याकडलेच नव्हे, तर जगभरातले 'संस्कार' हे स्त्रीची कामेच्छा मारून कशी टाकता येईल, यावरच जास्त भर देणारे आहेत. २. स्तंभन, उर्फ तुमचा घासाघीस करण्याचा स्टॅमिना वाढवणे हा पुरुषार्थ कधीपासून झाला? नॅचरलीच स्त्रीला उद्दिपीत व्हायला अधिक कालावधी लागतो. पूर्ण उद्दिपनानंतर, मानसिक रिप्रेशन नसेल, तर स्त्री व पुरुष दोघांचाही अ‍ॅक्चुअल कॉयटस टाईम सारखा आहे. रिंगेसारख्या सेक्स-एड्स (संभोगासाठीच्या मदतीची साधने) या लैंगिक आजारांसाठी, योग्य तपासण्या झाल्यानंतर वापरावयाच्या बाबी आहेत. 'नॉर्मल' वापरासाठी अजिबात नाहीत. शेवटी, या जगात खरे लैंगिक शिक्षण अतीव गरजेचे आहे...

In reply to by आनंदी गोपाळ

पुरुषाला तृप्त करू न शकणारी स्त्री असा काही प्रकार अस्तित्वात असतो का? की रतिक्रीडेत मनापासून सहभागी न होणारी स्त्री हा प्रकार इथल्या कुणाला सापडलेलाच नाहिये? आपल्याकडलेच नव्हे, तर जगभरातले 'संस्कार' हे स्त्रीची कामेच्छा मारून कशी टाकता येईल, यावरच जास्त भर देणारे आहेत. पुरुषाची कामतृप्ती इजॅक्युलेशनवर अवलंबून आहे पण स्त्रीच्याबाबतीत ती बरीच काँम्प्लेक्स आहे. माझ्या मते प्रिती हा अत्यंत फंडामेंटल सायकॉलॉजिकल फॅक्टर, टाईम लॅग हा शारीरिक फॅक्टर, स्त्रीच्या चित्ताची निर्वेधता आणि अपराधभावाचा आभाव (गिल्ट फ्री स्टेट ऑफ माइंड) या सर्वांच्या एकत्रित परिणामातून स्त्रीच्या कामतृप्तीची संभावना निर्माण होते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जगभरातले 'संस्कार' हे स्त्रीची कामेच्छा मारून कशी टाकता येईल, यावरच जास्त भर देणारे आहेत . त्यामुळे स्त्रीची कामेच्छा गिल्ट फ्री माइंडवर अवलंबून असावी. युगुलातला पारस्पारिक अनुबंध आनंद घेण्यापेक्षा `देण्याची' भावना निर्माण करतो. त्यामुळे माझ्या अनुभावनं संभोग हा `शेअरींग एक्स्पिरियंस' (सम-भोग) आहे. पारस्पारिक प्रिती, निर्वेध चित्तदशाआणि अपराधशून्य मनोदशा, कोणत्याही साधनाचा वापर न करता दोघांनाही एकाच वेळी कामतृप्त करतात. तरीही शारीरिक परिमाणावर पुरुषाचा स्तंभन काल काही वेळा कमी पडू शकतो त्यामुळे प्युबिस रिंगचा उपयोग होतो इतकाच लेखाचा विषय आहे. स्तंभन, उर्फ तुमचा घासाघीस करण्याचा स्टॅमिना वाढवणे हा पुरुषार्थ कधीपासून झाला? अर्थ, काम आणि मोक्ष हे तीन पुरुषार्थ प्राचिन कालापासून मान्य आहेत. धर्म हा मोक्षाचा भाग आहे त्यामुळे तो वेगळा पुरुषार्थ नाही. माझ्या अनुभवानं अर्थ या पुरुषार्थाला कोणताही निर्वैयक्तिक निकष नाही. म्हणजे नक्की किती संपत्ती म्हणजे पुरुषार्थ याला मोजमाप नाही. तद्वत मोक्ष हे अध्यात्मिक परिमाण आहे आणि जवळपास दुर्लभ आहे त्यामुळे तो ही पुरुषार्थ कितपत साधेल हे साशंक आहे. काम हा पुरुषार्थ मात्र स्त्रीला कामतृप्त करणे, खरं तर दोघांनी एकाच वेळी कामतृप्त होणे यात आहे. त्याचं मोजमाप हे सखीच्या कमालीच्या शांत झालेल्या चेहेर्‍यावरचा आनंद, तिच्या देहात निर्माण झालेली उब, संपूर्ण शरीरात आलेलं रिलॅक्सेशन आणि श्वासाची शांत झालेली लय आहे. त्यामुळे प्रतिसादातली ग्राम्य कल्पना आणि अपेक्षित पुरुषार्थ यात फरक आहे. नॅचरलीच स्त्रीला उद्दिपीत व्हायला अधिक कालावधी लागतो. पूर्ण उद्दिपनानंतर, मानसिक रिप्रेशन नसेल, तर स्त्री व पुरुष दोघांचाही अ‍ॅक्चुअल कॉयटस टाईम सारखा आहे. स्त्रीच्या पूर्ण उद्दिपनात रिप्रेशनच्या आभावाखेरिज समर्पणभावाचा फार मोठा हात आहे आणि त्यासाठी पारस्पारिक अनुबंध आवश्यक आहे. शिवाय दोघांची चित्तदशा निर्वेध असल्याशिवाय समसमयावच्छेद शक्य होईलसे वाटत नाही. रिंगेसारख्या सेक्स-एड्स (संभोगासाठीच्या मदतीची साधने) या लैंगिक आजारांसाठी, योग्य तपासण्या झाल्यानंतर वापरावयाच्या बाबी आहेत. 'नॉर्मल' वापरासाठी अजिबात नाहीत. प्युबिस रिंग नॉर्मल पुरुषानं वापरु नये याच्याशी मी सहमत नाही. ती सर्रास वापरण्याची गरज नाही पण इट इज जस्ट अ जॉय डिवाइस. सदस्यांनी प्रतिसादातून केवळ वाचलेल्या माहितीवरुन निर्माण केलेला धसका निराधार आहे. या जगात खरे लैंगिक शिक्षण अतीव गरजेचे आहे... लेखावरच्या एकूण प्रतिसादांवरुन माझं ही असंच मत झालंय.

In reply to by संजय क्षीरसागर

काम हा पुरुषार्थ मात्र स्त्रीला कामतृप्त करणे, खरं तर दोघांनी एकाच वेळी कामतृप्त होणे यात आहे.
'काम' या संकल्पनेचा अतिशय संकुचित, विपर्यस्त अर्थ. धर्म म्हणजे सर्वसाधारणपणे मानवी जीवनातील नानाविध प्रकारची कर्तव्यकर्मे, अर्थ म्हणजे जीवनयापनासाठी करण्याची कर्मे, तर 'काम' म्हणजे मनुष्याच्या 'मनोकामना' आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे. अर्थात 'काम' हे अगदी तान्ह्या बाळापासून मरणसन्न अवस्थेत असलेल्या कोणत्याही वयाच्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि तृतीय पंथी व्यक्तीच्या ठायी क्षणोक्षणी उत्पन्न होणार्‍या इच्छांना दिलेले सर्वसमावेशक नाव होय. या तिन्हीत अडकून पडलेली व्यक्ती म्हणजे 'बद्ध'... पुढे यातून मुक्त होण्याची आस निर्माण झाली की ती अवस्था म्हणजे 'मुमुक्षु' ... मग त्यातून मुक्त होण्यासाठी प्रयास करणारा तो (किंवा ती) म्हणजे 'साधक' आणि अंतिमतः ती मुक्ती वा मोक्ष प्राप्त होणारी व्यक्ती म्हणजे 'सिद्ध' अशी संपूर्ण मानव जीवन व्यापणारी विराट व्यवस्था आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली आहे, त्याचा एक अगदी छोटासा अंश म्हणजे रतिक्रिया या शब्दातून ध्वनित होणारा 'काम'. चार 'पुरुषार्थ' फक्त 'नर' - पुरुष याचेसाठी नसून प्रत्येक मनुष्यप्राण्याच्या जीवनाची एक विचारपूर्वक केलेली मांडणी आहे.

In reply to by चित्रगुप्त

'काम' म्हणजे मनुष्याच्या 'मनोकामना' आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे. यात पुरुषार्थ कसा जोखणर ? अर्थात 'काम' हे अगदी तान्ह्या बाळापासून मरणसन्न अवस्थेत असलेल्या कोणत्याही वयाच्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि तृतीय पंथी व्यक्तीच्या ठायी क्षणोक्षणी उत्पन्न होणार्‍या इच्छांना दिलेले सर्वसमावेशक नाव होय. नवजात अर्भकानं, तृतीय पंथीयानं किंवा मरणासन्न व्यक्तीनं काय पुरुषार्थ साधावा अशी अपेक्षा असेल ? चार 'पुरुषार्थ' फक्त 'नर' - पुरुष याचेसाठी नसून प्रत्येक मनुष्यप्राण्याच्या जीवनाची एक विचारपूर्वक केलेली मांडणी आहे. स्त्रीच्या बाजूनं विचार केल्यास `चार पुरुषार्थांचं' मापन कसं करणार? शिवाय पूर्ण प्रतिसादात `अर्थाचा' उल्लेख नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रतिसादातच हे सर्व आले आहे की ! अर्थ म्हणजे जीवनयापनासाठी करण्याची कर्मे, हे आहेच वरच्या प्रतिसादात. गरज नाही पण तरीही याचा अजून इक्साटून अर्थ सांगायचा तर "जीवन सुखात जावे यासाठी मिळविण्याची साधनसंपत्ती" असे म्हणता येईल. तर 'काम' म्हणजे मनुष्याच्या 'मनोकामना' आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे. अर्थात 'काम' हे अगदी तान्ह्या बाळापासून मरणसन्न अवस्थेत असलेल्या कोणत्याही वयाच्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि तृतीय पंथी व्यक्तीच्या ठायी क्षणोक्षणी उत्पन्न होणार्‍या इच्छांना दिलेले सर्वसमावेशक नाव होय. ह्यात अजून काय इस्काटून सांगणार ?? *************** "पुरुषार्थ" या विशाल अर्थाच्या शब्दाचा अर्थ केवळ शय्यागृहापुरता संकुचित ठेवणारे "विचारी" लोक आहेत हे आश्चर्यकारक आहे ! शब्दभांडाराच्या अर्थाचे प्रत्येकाने आपल्या मनाने पुनर्लेखन करणे भाषेसाठी योग्य होणार नाही असे वाटते. बाकी चालू द्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पुरुषार्थ" या विशाल अर्थाच्या शब्दाचा अर्थ केवळ शय्यागृहापुरता संकुचित ठेवणारे "विचारी" लोक आहेत हे आश्चर्यकारक आहे !
+१०००००० अगदी तीव्र सहमत!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तस्मात, देहाची सार्थकताच कामसक्षम असण्यात आहे. जो देह कामदुर्बल झाला तो वृद्धत्वाकडे झुकू लागतो. याचा अर्थ व्यक्तीनं कामुक असावं असा नाही पण प्रणयसक्षम असणं हिताचं आहे मग तो देह स्त्री असो वा पुरुष. "पुरुषार्थ" या विशाल अर्थाच्या शब्दाचा अर्थ केवळ शय्यागृहापुरता संकुचित ठेवणारे "विचारी" लोक आहेत हे आश्चर्यकारक आहे ! इतर पुरुषार्थांचा उल्लेख लेखात आणि प्रतिसादात आहे त्यामुळे पुरुषार्थ केवळ कामापुरताच मर्यादित आहे असा कुठेही दावा नाही. तरीही कामाचा अर्थ `मनुष्याच्या 'मनोकामना' आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे'. असा काढला तर त्यात पुरुषार्थ तो काय ? नक्की कोणत्या मनोकामनांची पूर्ती झाली की पुरुषार्थ साधला असे म्हणता येईल? आणि हे मानदंड कसेही प्रस्थापित केले तरी ते व्यक्तीपरत्वे बदलतील. शिवाय पुरुषार्थ हा लेखात आलेला अनुषंगिक भाग आहे. पारस्पारिक कामतृप्तीनं एकमेकात अनुबंध निर्माण होतो, तारुण्य दीर्घकाल टिकू शकतं आणि संसार सुखाचा होतो इतका साधा विषय आहे. चर्चेत विषयांतर नको म्हणून उद्देश अधोरेखित करणारा सातीजींचा एकमेव समंजस प्रतिसाद पुन्हा उधृत करतो : सेक्श्युअल कंपॅटीबिलिटी आणि सटायटी (अर्थातच दोघांचीही) जोडप्यातले विसंवाद बरेच कमी करते आणि इतर बरेच प्रश्नही शांतपणे हाताळले जातात असा निष्कर्ष बर्‍याच मनोविकारतज्ज्ञांच्या अभ्यासातून दिसतो.