Skip to main content

सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 28/10/2016 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ प्रकाश वेरेकर सेक्सॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी स्त्री-पुरुष संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असलेल्या पिडीएफमधे वाचता येतील. सदर पुस्तिकेत लैंगिक संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (प्युबिस रींग), इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे हा लेख त्यांच्या रिंगची जाहिरात नाही, पण उपाय नामी आहे हे नक्की. तर मुद्दा असा की वरकरणी डॉ वेरेकरांचे विचार कितीही एकांगी वाटले आणि पारस्पारिक आदर आणि समानता यावरुन स्त्री-पुरुष संबंधात वाद दिसले तरी ते स्त्रीची अतृप्ती आणि पुरुषाचं असामर्थ्य या फंडामेंटल गोष्टीतून निर्माण होतात. याचा अर्थ स्त्रीला कामतृप्त करुन पुरुष पारस्पारिक आदर आणि समभाव यांना हरताळ फासू शकतो असा नाही. किंबहुना प्रणयतृप्त स्त्री आणि पुरुषात विनासायास अनुबंध निर्माण होतो. स्त्री दीर्घकाल आकर्षक दिसू आणि राहू शकते. आणि पुरुषाला अर्थ आणि मोक्ष हे पुरुषार्थ अचंबित होण्याइतपत साधता आले नाहीत तरी, काम हा पुरुषार्थ साधल्यानं तो समाधानी राहून सुखाचा संसार करु शकतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 83410
प्रतिक्रिया 252

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

पुरुषार्थ चार है - (1) धर्म (religion 0r righteouseness), (2) अर्थ (wealth) (3) काम (Work, desire and Sex) और (4) मोक्ष (salvation or or liberation)।

In reply to by संजय क्षीरसागर

जी गोष्ट आपण आपल्या जीवनभराच्या सोबत्यासोबत चार भिंतींच्या आत करतो ती सार्वजनिक संस्थळावर 'कशी करतो' हे जगजाहीर करणे हा पण एक 'पुरुषार्थ' असेल.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्हाला सगळं बाल की खाल काढून सांगावं लागतं म्हणून. जर मी चुकत नसेन तर 'काम' हे नाम संस्कृत 'कम्' (थांबा इतक्यात कान टवकारुन डोळे विस्फारु नका) या धातुपासून आहे. याचा अर्थ 'इच्छा बाळगणे' असा होतो. इच्छा मग ती कोणत्याही गोष्टीची असू शकते. आता जर तुम्ही लहान मुलाशी याचा काय संबंध म्हणाल तर आठवा ते दिवस, जेव्हा मुलं दुसर्‍याच्या हातातल्या चॉकलेट आदि गोष्टींकडे टकामका बघत असतात. अर्थात ते हवं आहे अशी त्यांची इच्छा असते. तर जे जे आपल्याला हवं असतं, त्याचा तुम्हाला अभिप्रेत असलेला हा रिंगवाला काम एक छोटासा भाग आहे. तुम्ही मात्र सगळं उचलून बेडरुमशी कनेक्ट करत आहात. याहून काही समजावता येईल असं वाटत नाही. त्यामुळे समजलं तर ठीक नाहीतर रिंगा रिंगा चालू देत.

In reply to by सूड

संक्षींना इथे काहीही बोलणे म्हणजे त्यांना "टारगेट" करणे आहे असा काही लोकांचा समज आहे. पण तुम्ही ३-४ जणांनी वर कितीही मुद्देसुदपणे "काम" ह्या संकल्पनेचा अर्थ सांगितला तरी संक्षी तो मान्य करणार नाहीत अशी माझी अटकळ आहे. आपली बेसिक कन्सेप्ट्च टोटली गंडली आहे हे संक्षी कधीच मान्य करत नाहीत हे मात्र काही लोक सोयीस्कररित्या विसरतील. संक्षीच्या लिखाणाचा टोन बदललाय हे मी सुद्धा मान्य करते. पुर्वीसारखी समोरच्याची अक्कल आता ते काढताना दिसत नाहीत. अजुनही काही खटकणार्‍या बाबी आहेतच पण बदल झालाय हे मान्य आहे. पण जर त्यांनी "काम" ह्या संकल्पनेची आपली व्याख्या चुकली आहे आणि ही चर्चा करताना वैयक्तिक बाबी इथे आणायची गरज नव्हती हे मान्य केलं, तर मात्र तो माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का असेल.

In reply to by संजय क्षीरसागर

निराधार मांडणी वाटते
पूर्वी शास्त्रार्थाचे वेळी अथवा नवीन ग्रंथ लिहीताना आपल्या विधानाला कोणकोणत्या शास्त्रांचा आधार आहे, हे सप्रमाण सांगावे लागायचे त्याची आठवण झाली हे वाचून. ओशोंच्याच साहित्यात सापडेल सर्व. शोधले तर सापडेल.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही डॉक्टर आहात म्हणून प्रतिसाद देतो
एक ऐरागैरा, बाजारबुणगा मिपाकर म्हणून लई म्हंजे लईच मज्जा आली हे वाचून.
"सरजीका परशाद पाने के लिए 'डॉक्टर' होना अनिवार्य है, ऐरे-गैरे को जवाब नही मिलेगा"

In reply to by बोका-ए-आझम

इथे प्रतिसाद टंकणार्‍या काहींत सुधारणा होइल अशी अपेक्षाही नसल्याने मी नेहेमीच आनंदी असतो. बादवे, ही असली सर्फिटिक्टं वाटायचा परवाना कुटं व केवड्यात मिल्तो मिपावर?

आहे, रिंग सोडा व स्किन धारण करा. बघा मग सांगाल की " पहले क्यों नहीं बताया " स्वानुभव आहे तर तो जाहीर केला तर इतरांनी स्वतःच्या भावना नियंत्रित करण्यात येणारे अपयश व अपराधाचे रूपांतर करूणेत केले यावरुन आपल्या संकुचित मनाचे प्रदर्शन झालेय. जाओ पहले उस आदमी का साइन लेके आओ टाईप. टीप- तथाकथित संशोधन न वाचता दिलेला प्रतिसाद. मुद्दामच, प्रसारकाला वकील बनवण्याचा हा राजरोस प्रकार.

हे जे डॉक्टर आहेत त्यांना तर जन्मठेपच व्हायला हवी.... मुलगाच होण्याचे उपाय ?? मूर्खपणा आहे सगळा...रस्त्याशेजारचा तंबूतला युनानी हकीम आपली जाहिरात करतोय असं वाटतंय !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

इथे दोन-तीनद उल्लेख आला म्हणुन जाऊ पाहिली ती पीडीएफ परत. खरंच त्यात चक्क हेच लिहीलय की "मुलगाच होण्यासाठी रिंग सहाय्य करते.." ह्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते ना? अजुन एक म्हणजे, इथे तर किंमत १०००/- सांगितली आहे. शिवाय फोन करुन माझ्याशीच बोला असंही लिहीलंय. =))

In reply to by पिलीयन रायडर

तिथल्या दिलेल्या पत्त्याची खात्री करायला हवी आणि असे प्रकार जर तिथे चालत असतील तर कायदेशीर पध्दतीने गुन्हा दाखल करता येईल.

In reply to by पिलीयन रायडर

अजुन एक म्हणजे, इथे तर किंमत १०००/- सांगितली आहे. शिवाय फोन करुन माझ्याशीच बोला असंही लिहीलंय. =))
हो ना! पण सरांना ९०% डिस्काऊंट मिळालेला दिसतोय.

In reply to by आदूबाळ

टाईम लॅग आणि प्युबिस रिंगचा उपयोग इतकंच मर्यादित होतं. वेरेकरांच्या जेंडर प्रेफरन्साचा पहिल्या पानावर निषेध केला आहे आणि रिंग इतरत्र उपलब्ध आहे असं लेखातच लिहीलंय. वेरेकरांवर जेंडर प्रेफरंशियल ट्रिटमंटबद्दल दावा दाखल करायचा का लेखातल्या मुद्यावर चर्चा करायची हे ज्याचं त्यानं ठरवावं.

In reply to by संजय क्षीरसागर

बाकीची सगळी बडबड राहु द्या . तुमच्या बायकोने तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवुन चार भिंतीच्या आत तुम्हाला साथ दिली आणि त्याचे तुम्ही चार चौघात प्रदर्शन मांडले आहे त्याबद्दल आधी माफी मागा त्यांची. अत्यंत अपमानास्पद आहे हे त्यांच्यासाठी.

In reply to by स्रुजा

आपण काही चुकीचं केलंय किंवा दोन व्यक्तींमधील अशा पूर्णतः यक्तिगत गोष्टी चव्हाट्यावर मांडून औचित्यभंग केलाय हेच त्यांना मान्य नाही. त्यामुळे अजूनही त्यांचे नवीन प्रतिसाद सुरूच आहेत. माफी वगैरे तर फार लांबची गोष्ट झाली.

In reply to by संजय क्षीरसागर

वेरेकर राहू देत. तुमच्या नको इतक्या तपशीलांबद्दल कधी बोलताय? तुम्ही औचित्यभंग तर केलाच आहे , पण हे तुमच्या बायकोने कधी वाचलं तर त्यांना ह्युमिलिएटिंग वाटेल असं कधी चुकुन देखील वाटलं नाही का ? ते काय अद्वैत का काय असतं तुमच्या मते नवरा बायकोत त्यात एकमेकांची खाजगी स्पेस जपणे, आदर करणे एवढ्या साध्या गोष्टी येत नाहीत का?

In reply to by आदूबाळ

"पुरुषाचे खरे पुरुषत्व हे मादीला पूर्ण शरीर सुख देवून तिच्या लैंगिक इच्छेचे संपूर्ण शमन करण्यात आहे. मग ती त्याची पत्नी असो, मैत्रीण असो, अकस्मात प्रेमिका असो किंवा पैश्याच्या मोबदल्यात शरीर देणारी वेश्या असो...." (पृ.२) "प्युबिस रिंग ही भारतात कुठेही उपलब्ध नाही. डॉ. वेरेकर यांचेकडेच ती मिळते."..... (पृ.१४) " या प्युबिस रिंगची किंमत सध्या रु. १०००/- फक्त आहे. या रिंग किंमतीत दर सहा महिन्यात वाढ होत जाते..." "ज्यांना फक्त मुलीच होतात मुलगा होत नाही ...... प्युबिस रिंगच्या उपयोगाने मुलगाच होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते...." "नव्या स्त्री पार्टनरला इंप्रेस करण्यासाठी -- जीवनात संधी मिळाल्यास, नवी स्त्री जीवनात आल्यास ......... आजच पैसे पाठवून मागवून घ्या आणि नेहमी जवळ ठेवा. अशी संधी कधी येईल ते सांगता येत नाही. जेंव्हा संधी येईल तेंव्हा 'दैव देते आणि कर्म नेते' अशी अवस्था व्हायला नको...." (पृ. १६)

स्वतःचे व आपल्या पत्नीचे संपूर्णत: खाजगी व चार भिंतीच्या आत असलेले वैयक्तिक असलेले अनुभव सार्वजनिक करणे हे अनुचित आहे हे मी आधीच लिहिले होते. परंतु काही जणांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रगल्भता असे मुद्दे काढून लेखाला विरोध केला नाही.

संक्षी,खरंच? खरंच तुम्हाला रिंग च्या उपयुक्ततेबद्दल हा धागा काढायचा होता? तुमचे प्रतिसाद नीट वाचले तर असं दुरान्वयेही वाटत नाहीये. बाकी, ते डॉक्टर नाशकातलेच आहेत, भेटून येतो आता जरा त्यांना... लेख असू देत पण संपादक मंडळाने किमान ती पीडीएफ लिंक नाहीशी करायला हवी होती, विनासायास मिपाचा प्लॅटफॉर्म वाह्यात अशा फुकट जाहिरातीसाठी वापरला जातोय.

In reply to by संदीप डांगे

रच्याकने एखादी गोष्ट बेकायदेशीर असेल तर तिचा प्रचार आणि प्रसार हाही बेकायदेशीर असतो, बरोबर? उद्या इथे कोणीतरी गांजाबद्दल लिहील. काय करावे ब्रे अशावेळी?

In reply to by संदीप डांगे

त्यामुळे वेरेकरांचा आणि लेखाचा संबंध टाईम लॅग आणि प्युबिस रिंग पुरताच मर्यादित राहिला आहे.

ह्या विषयावर खूपच चर्वण झाले आहे, त्यामुळे आता पुढचे प्रतिसाद वाचायचा देखील कंटाळा येऊ लागलाय.

धागा, पीडीएफ आणि सगळी चर्चा वाचली. पीडीएफ वाला डॉक्टर 'पुत्रजीवक बीज' आणि 'वैद्य रंजन' वगैरे छाप यझ माणूस वाटला. धागाकर्ते अनुभवांनी बोलत असल्याने त्यावर आपला पास ;) काही सदस्यांना हे विषय हाताळायला मिपा प्रगल्भ न वाटण्याची कारणे बघून तेचं अजून प्रगल्भ नाहीत असे वाटून गेले.

संक्षी,अजया व इतर महीला सदस्या जे म्हणाल्या तेच म्हणतो.स्वतःच्या पत्नीला तुम्ही इथे ऑब्जेक्टीफाय करत आहात असे वाटले.लेख प्रथमपुरुषी एकवचनी ऐवजी द्वीतीयपुरुषी अनेकवचनी असता तर आक्षेप घ्यायचे काही कारण न्हवते.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

द्वीतीयपुरुषी अनेकवचनी असता तरी स्वतःच्या काय किंवा दुसऱ्याच्या काय कोणाच्याही पत्नीला ऑब्जेक्टिफाय केले जाणारच!

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

माझं मत असं आहे की आपण कसा लोकांचा उद्धार करण्यासाठी अवतरलो आहेत असे भाव आणून नयेत. बडेजाव करायचाच आहे तर सरळ मुद्द्यावर यावे, उगाच वेड घेऊन पेडगावला जाऊ नये. सिम्पल!! तसेही कोणी आरती ओवाळली नाही तर तबकासमोर आपलं श्रीमुख ओवाळून घेणारी मंडळी कमी नाहीत.

तो वेरेकर एक येडा अन हा संक्षी दहा येडा. त्या दोघांनाही एंटरटेन करणारे मिपाकर शंभर येडे आहेत असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. (येडा) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

त्यांना कोण एंटरटेन करतंय..? इथं लोक स्वतःला एंटरटेन करत बसलेत ना भाऊ! वेळ कसा घालवायचा एवढा!!

In reply to by पिलीयन रायडर

इथं लोक स्वतःला एंटरटेन करत बसलेत ना भाऊ!
छ्या... टंकाळा आला बुवा आता स्वतःला एंटरटेनवून घेण्याचा. तिकडे सरजी पण आता 'कामा'त गुंतलेत. (म्हणजे 'काम' म्हणजे नेमके काय, 'पुरुषार्थ' कशास म्हणावे वगैरे विकि-शोधात, ओशोंचं कोणतं वाक्य कोट करता येईल ते हुडकण्यात.. वगैरे) त्यामुळे काहीकाळ मिपासंन्यास घ्यावा आता. पीडीयफ वाचून, रिंग मागवून त्यानंतर होणार्‍या पोरा-पोरींची नावं कळायला अजून टैम लागेल.... रिंग्नेश, रिंगेंद्र, रिंगप्पा, रिंगकुमार, रिंगपाल, रिंगसिंह, रिंगेबिहारी, रिंगेंदर सिंग, रिंगेंदर कौर, रिंगबाला, रिंगरिका, अशी असणार कायतरी (मुलगे ज्यास्त होणार म्हणून मुलग्यांची नावे ज्यास्त). .... आता "पीडीयफ हटी, पब्लिक छटी" असं होणार. चालायचंच.

धागे अधून मधून वरती आणण्यापेक्षा - ट्याक्सविषयीचे धागे जीएसटी - २०१९-०७-०१, जीएसटी - २०२०-०१-०१, जीएसटी - २०२०-०७-०१, असे पुन्हा नवीन काढणे गरजेचे आहे. त्यात मागचा आढावा आणि आगामी बदलाचे परिणाम चर्चेला घेता येईल. ((बजेट येऊन नंतर कायमचे बदल होतात. कधी मध्येच नवीन बदल होतात.)) नवीन धाग्यात जुन्या धाग्याची लिंक असावी.