Skip to main content

हात दाखवून अवलक्षण

लेखक नाखु यांनी सोमवार, 24/10/2016 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला. पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
  • सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
  • निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
  • महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
  • मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
  • आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
  • या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
विधायक कामाबाबत चर्चा/विरोध याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वानवा असताना हा विनाकारण शेपटीला आग लावून फिरण्याचा प्रकार आणि बळजुबरीने सैनीकांना यात ओढण्याचा प्रयत्न पाहून मला व्य्क्तीशः राज ठाकरे यांच्याबद्दल कीव +घृणा च वाटली. (एके काळी मनसे स्थापनेवेळी मी खंदा समर्थक होतो त्या पार्श्वभूमीवर जास्तीच राग आला) कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे. काही माजी सैनीक अधिकार्यांनी याचा धिक्कार आणि निषेधही केला आहे. मिपाकरांना काय वाटते?

वाचने 65668
प्रतिक्रिया 306

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

वरीलपैकी एका प्रतिसादात मी लिहिले आहे की "बाकी ५ कोटी रूपये देणगी किंवा चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्यातील शहीद सैनिकांना श्रद्धांजलीचा फलक दाखविणे या तोडग्यातूनच निघालेल्या दुय्यम गोष्टी आहेत. हिंसक आंदोलन रद्द होऊन शांतताभंग टळला आणि त्यामुळे कायदापालन झाले व निदान भविष्यात तरी पाकड्यांना काम मिळणे बंद होईल या घोषणेमुळे लोकभावनेचाही विजय झाला हेच दोन महत्त्वाचे निर्णय या यशस्वी तोडग्यातून निघाले." वरील वाक्यातून ५ कोटी रूपये मिळाले अशी फडणविसांनी किंवा मी जाहिरात केली आहे का? मी सुरवातीपासूनच हेच लिहिले आहे की रा़ज ठाकर्‍यांना आंदोलन करण्यापासून परावृत्त करणे हाच वाटाघाटींचा प्रमुख उद्देश होता. तो साध्य झाला. त्याव्यतिरिक्त ५ कोटींची देणगी, चित्रपटाच्या सुरवातीला फलक, भविष्यात पाकड्यांवर बंदी हे त्यातून निघालेले दुय्यम मुद्दे आहेत.

"म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो" हे खरे. तो सोकावू नये असे वाटत असेल तर Pastor Niemoller च्या खालील ओळी लक्षात ठेवाव्या, हे बरे. First they came for the Socialists, and I did not speak out, Because I was not a Socialist. Then they came for the Trade Unionists, and I did not speak out, Because I was not a Trade Unionist. Then they came for the Jews, and I did not speak out, Because I was not a Jew. Then they came for me—and there was no one left to speak for me. झुंडशाही ही कुणाच्या, कधी, आणि कशी अंगावर येईल, काय ठाऊक कधी तुमचाही करण जोहर होईल?

In reply to by रविकिरण फडके

सदर पास्टर महोदयांना भारतांतील भक्त मंडळींची ओळख नव्हती. इथे भक्त मंडळींना आपल्या परसांत काहीही गोंधळ झाला तरी शेजाऱ्याच्या भानगडींत नाक खुपसण्याची सवय. भाजप आणि संघाला मुस्लिम महिलांची चिंता, आपल्या हिंदूंना शाळा किंवा देऊळ चालवू देत नाहीत त्या बाबतीत डोके जमिनीत. सध्या भाजप आपल्याच समर्थकांना ढोला प्रमाणे दोन्ही बाजूने वाजवत आहे आणि भक्त मंडळी त्याचे सुद्धा समर्थन करीत आहेत.

हैला, पा़किस्तानला क्रिकेट खेळू देण्याबद्दल 'शरद पवार' बाळ ठाकरेंना 'मातोष्री' वर भेटतात तेंव्हा ती चर्चा असते. आता 'राज ठाकरे' एका चित्रपटा संदर्भात 'वर्षा' वर गेले तर ती मांडवली असते. यावेळी पहिल्यानेच श्री गुरुजींच्या सगळ्या प्रतिसादांशी सहमत आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

म्हणूनच म्हणतो - कि दुखणं चर्चा किंवा तथाकथित खंडणी हे नाहीये! दुखणं आहे मनसे सारख्या "फुटकळ", "गुंडांच्या" पक्षाला इतके महत्व कसे दिले जाऊ शकते!!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मनसे च्या ठिकाणी कोणतंही नाव टाका, चित्रपटाच्या ठिकाणी कोणताही विषय घ्या, गुंडगिरीला घाबरून एका घटनादत्त पदावरील व्यक्तीने असे तोडगे काढणे लोकशाहिस मारक आहे, पक्षभक्ती व विरोध क्षणभर बाजूला ठेवून विचार करावा सर्वांनी!

In reply to by संदीप डांगे

घटनादत्त पदावरील व्यक्तीने असे तोडगे काढणे लोकशाहिस मारक आहे साहेब, कसल्या लोकशाहीच्या बाता चालू आहेत. राजकारण कोणत्या थरापर्यंत बोकाळले आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. माझ्या मते मुख्यमंत्र्यांनी कोणताही कायदा न तोडता जनतेचे, पक्षाचे,स्वतःचे कमीत कमी नुकसान होईल असा तोडगा काढला. राज ठाकरेंसारख्या व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त ताकदवान झाल्या याबद्दल सांप्रतच्या मुख्यमंत्र्यांना कसा काय दोष देणार? तो तर या व्यवस्थेचा दोष आहे. व्यवस्था बदलण्यासाठी सत्तेत असणे आवश्यक आहे. सत्तेत राहण्यासाठी 'ऐ दिल..' किंवा 'नाणिंज' सारख्या तडजोडी करणे आवश्यक आहे. पाच कोटींच्या प्रस्तावाला माझा विरोध होता असे मुख्यमंत्री स्पष्ट म्हणत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ज्याने त्याने ठरवायचे. शिवाय पाच कोटींची मागणी राज ठाकरेंनी केली तरीदेखील त्याचा दोष मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर का फोडला जातो ते कळत नाही. या वाटाघाटी करत असताना त्यांनी नजिकच्या निवडणुकांसंदर्भात काही वाटाघाटी केल्या असतील तर त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. फार फार तर मुख्यमंत्र्यांनी साधन शुचिता पाळली नाही इथपर्यंत आरोप त्यांच्यावर करता येईल. पण मुख्यमंत्रीपदी बसणार्‍या माणसाला अशी साधन्शुचिता पाळता येत नाही. माझ्या मते मुख्यमंत्र्यां साठी ही 'विन-विन' नसून 'लूज-लूज' सिचुएशन होती. म्हणजे काहीही केले तरी या क्रूतीबद्दल मार खावा लागणार हे त्यांना स्पष्ट माहीत असावे. पैकी कमीत कमी त्रास होईल असा पर्याय त्यांनी निवडला. प्रूथ्वीराज चव्हाण किंवा फडणवीस यांच्यासारख्या चतुर आणि स्वच्छ सीएमना अशा कसरती करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. अन्यथा त्यांना राजकीय आत्महत्या करावी लागेल. शिवाय नंतर एखादा बनेल माणूस त्यांच्या जागी येउन बसेल नाही का ?

In reply to by अप्पा जोगळेकर

जर का सैनिक वेल्फेअर निधीला मदत ही मागणी मुख्यमंत्र्यांची नव्हती तर ते त्यानी आता दोन दिवसानी का स्पष्ट केले? सुरुवातीला का सांगितले नाही? त्याहून बेसिक प्रश्न. जर का ती करण जोहर आणि राज ठाकरे यांच्यातली सेटलमेंट असेल तर त्यात मुख्यमंत्री नेमके कशासाठी होते आणि काय करत होते? त्यांनी त्या दोघांच्या मधे असायची गरजच नव्हती ना!

In reply to by पैसा

जर का सैनिक वेल्फेअर निधीला मदत ही मागणी मुख्यमंत्र्यांची नव्हती तर ते त्यानी आता दोन दिवसानी का स्पष्ट केले? सुरुवातीला का सांगितले नाही? त्याहून बेसिक प्रश्न. जर का ती करण जोहर आणि राज ठाकरे यांच्यातली सेटलमेंट असेल तर त्यात मुख्यमंत्री नेमके कशासाठी होते आणि काय करत होते? त्यांनी त्या दोघांच्या मधे असायची गरजच नव्हती ना!
मुख्यमंत्र्यांनी यच्चयावत प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देणे गरजेचे नाही. सुरवातीला करण जोहर व इतर काही जण राजनाथसिंगांना भेटून आले होते. त्यांनी चित्रपटाला संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते व त्याबाबतीत फडणविसांशी बोलण्यास सांगितले होते कारण राज्यातील कायदासुव्यस्थेचा प्रश्न केंद्राच्या नसून राज्याच्या हातात असतो. त्याला अनुसरूनच मुख्यमंत्र्यांनी दोघांना एकत्र समोरासमोर आणले. जर राज व करण आपापपसात बोलून प्रश्न सोडवू शकले असते तर तिसर्‍या व्यक्तीची गरजच नव्हती. परंतु ते दोघेही आपल्या भूमिकेवर अडून होते.

In reply to by श्रीगुरुजी

राज व करण आपापपसात बोलून प्रश्न सोडवू शकले असते तर तिसर्‍या व्यक्तीची गरजच नव्हती.
हायला, नावांत पण राजकारण

In reply to by पैसा

जर का ती करण जोहर आणि राज ठाकरे यांच्यातली सेटलमेंट असेल तर त्यात मुख्यमंत्री नेमके कशासाठी होते आणि काय करत होते? गॄहखाते फडणवीसांकडेच आहे ना.ही सेटलमेंट करुन शांतता राखता आली तर बरे, शिवसेनेला शह देता आला तर बरे, मुंबई निवडणूकीच्या वाटाघाटी करता आल्या तर बरे असा प्रयन असावा. त्यात चुकीचे काय आहे ? जर का सैनिक वेल्फेअर निधीला मदत ही मागणी मुख्यमंत्र्यांची नव्हती तर ते त्यानी आता दोन दिवसानी का स्पष्ट केले? सुरुवातीला का सांगितले नाही? शंकेखोर लोकांनी जेव्हा वर्तमानपत्रे, समाज माध्यमे इत्यादीतून प्रश्न विचारले तेंव्हा सांगितले. आधीच एक्स्प्लनेशन देणे म्हणजे जणू काही गुन्हा केला आहे असे वाटून घेतल्यागत झाले असते.

In reply to by अप्पा जोगळेकर

ज्या कसल्या वाटाघाटी देवघेव करायची ती त्यांना करू देत. सैनिक कल्याण निधीला देणगी द्या हे सांगण्याचा शहाजोगपणा, अगोचरपणा मला अजिबात आवडलेला नाही. मला कोण विचारतोय म्हणा! खरे तर स्वतः मुख्यमंत्र्यानीच इतर दोघांशी चर्चा करायचे कारण नव्हतेच. कोणीही सेक्रेटरी, पोलीस आयुक्त करू शकले असते. बरे चर्चा केली तर स्पष्ट सांगायला पाहिजे होते की तुम्हा दोघाना कुठच्या खड्ड्यात जाऊन पडायचे तिकडे पडा, पण सैनिकांना यातून लांब ठेवा. आता आमच्यासारखे आलतूफालतू लोक सोडा, पर्रीकरांनी हे एक्झॅक्ट शब्द वापरले आहेत तेव्हा हे वागणे किती अश्लाघ्य आहे हे तुम्ही लोकच ठरवा. पर्रीकरांबद्दल काय वाटेल ते इथे मिपावर बोलले गेले आहे. त्या लोकांच्या माहितीसाठी सांगते. केंद्रात आणि महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती. पर्रीकर गोव्यात मुख्यमंत्री होते. तेव्हा एकदा नारायण राणेंचे आमदार नसलेले चिरंजीव गोव्यात गाड्यांचा ताफा घेऊन येत होते. प्रवेश कर भरायच्या बूथवर कर्मचार्‍यांनी त्याना अडवले आणि नियमाप्रमाणे ज्या गाड्या सिंधुदुर्गात नोंदणी झालेल्या आहेत त्या सोडून मुंबई रजिस्ट्रेशन वाल्या इतर गाड्यांसाठी प्रवेश कर भरा सांगितले. राणेंच्या ताफ्यातल्या लोकांनी लगेच गुंडगिरी करून टोल बूथची मोडतोड केली आणि तिथल्या कर्मचार्‍यांना दमदाटी करून मारहाण केली. त्यावेळी राणे सुपुत्राला झोडून काढून आत टाकला होता आणि त्याला सोडवायला स्वतः नारायण राणेंनी येऊन जामीन भरला होता. ही एका लहान राज्याच्या मुख्यमंत्र्याची धमक.

In reply to by पैसा

सैनिक कल्याण निधीला देणगी द्या हे सांगण्याचा शहाजोगपणा, अगोचरपणा मला अजिबात आवडलेला नाही. हे चुकीचेच आहे. 'देणगी द्या' असे राज ठाकरे यांनी सांगितले. सीएमने नाही. काल तर त्यांनी मी या देणगी प्रस्तावाला विरोध केला असेही सांगितले. कोणीही सेक्रेटरी, पोलीस आयुक्त करू शकले असते. फडणविसांकडे गॄहखाते सुद्धा आहेच ना. पर्रीकर चांगले काम करतात. फक्त त्यांनी वाचाळ पणा कमी केला तर मस्तच. प्रत्येकाची काम करण्याची शैली वेगळी. फ्डणवीसांनी मध्यस्थी केली म्हणजे फार मोठा गुन्हा केला अशा स्वरुपाच्या आरोपांना आक्षेप आहे. इतकेच.

In reply to by अप्पा जोगळेकर

पर्रीकर वाचाळ अजिबात नाहीत. फटकळ जरूर आहेत. काही कृती न करता नुसती बडबड करणार्‍याला वाचाळ म्हणतात. पर्रीकर १० करतील आणि एक बोलतील. एक तर ते खरे बोलतात किंवा मग बोलत नाहीत. इतके खरे बोलणे नुसते ऐकायलाही बर्‍याच लोकांना सोसत नाही.

In reply to by पैसा

हे मुख्यमंत्री मधे पडायचं प्रकरण, घटस्फोटातुर कौन्सिलिंगसाठी गेलेल्या पतिपत्नी सारखं नाही वाट्त ???

In reply to by इरसाल

सांभाळा! साधारण असंच कायतरी मी म्हटलं की उद्या नवराबायकोच्या भांडणात मुख्यमंत्री पडणार का, तर गुर्जी मला म्हणले मी जामोप्यासारखे लिहिते आहे. =)) बादवे, या नव्राबायकोला घटस्फोट नको होता. 'वो' ला संसारात सामावून घेण्यासाठी नवर्‍याने बायकोला काय गिफ्ट द्यावी, का तिच्या माहेरच्याना गिफ्ट द्यावी असा काहीसा मामला होता. असं नाही का तुम्हाला वाटत? =)) =)) मग तिथे कौन्सेलर काय सांगणार? मेव्हणीला हिर्‍याचा सेट द्या आणि तिघांनी नांदा सौख्यभरे? =))

In reply to by अप्पा जोगळेकर

राज ठाकरेंसारख्या व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त ताकदवान झाल्या याबद्दल सांप्रतच्या मुख्यमंत्र्यांना कसा काय दोष देणार? ^^ आप्पा, तुम्ही नक्की काय बोलताय हे लक्षात येतंय काय? राज ठाकरे ताकदवान आहेत व तेही मुख्यमंत्री ह्या पदापेक्षा? मग सारा कारभार राज ठाकरे का चालवत नाहीत? किंबहुना इतका ताकदवान माणूस राज्यात सत्तेवर का नसावा? एखादी व्यक्ती ताकदवान आहे हे म्हणतांना तुम्ही सांप्रत सरकारला कमकुवत म्हणत आहात चक्क! आताच्या सरकारचे हात मागच्या सरकारने बांधलेत का? राष्ट्रवादीवर, पवारांवर ते किती क्षुद्र आहेत अशी हिरीरीने मांडणी करणारे आज बस फडणवीस अडकलेत म्हणून राज ठाकरेला खूप महत्त्वाचा, डेंजर वगैरे सिद्ध करण्यात टंकनबळ घालवत आहेत, आधी संताप येत होता आता हसू येतंय...

In reply to by संदीप डांगे

राज ठाकरे मुख्यमंत्रीपदापेक्षा ताकदवान आहेत, सांप्रत सरकार कमकुवत आहे, आताच्या सरकारचे हात बांधलेत असे मी कुठेच लिहिले नाही.ते कदाचित तुम्ही ठरवून टाकले असेल. मी फक्त ते म्हणजे राज ठाकरे ताकदवान आहेत इतकेच लिहिले. कोणत्याही पक्षाच्या राज्य सरकारला दखल घ्यावी लागते इतके उपद्रव मूल्य आहे म्हणून ताकदवान. सत्ता मिळवण्याइतके बलवान नव्हेत. बाकी राष्ट्रवादी, पवार आणि फडणवीस ही तुलना उचित नाही. पवारांना फडणविसांइतकी राजकीय उंची गाठणे अशक्य आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

चार पाच हजार गुंड हाताशी धरून कोणी एखादा मुख्यमंत्री जेरीस आणू शकतो तो नक्कीच ताकदवान असेल, काय राव बोलताय? आपली विधानं परत एकदा वाचून बघा, नक्की काय अर्थ निघतोय, राज ठाकरेंना अटक झाली होती तेव्हाचे वातावरण आठवत असेल... ते तेव्हा होतं आता नाही.

In reply to by संदीप डांगे

डांगे अण्णा आपला मुद्दा सिद्ध करण्याच्या नादात एका राजकीय पक्षाला आपण फक्त गुंडांचा गट म्हणुन ठरवून मोकळे झालात. आजही या पक्षाचे विविध महापालिकांत सव्वाशे च्या वर नगरसेवक असतील. मागच्या निवडणुकीत एक आमदार निवडून आला परंतु त्यांच्या अगोदरच्या निवडणुकीत १३ आमदार होते. तेंव्हा चार पाच हजार गुंड हाताशी धरून हि भाषा अति होते आहे असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

'फक्त गुंडांचा गट' हे माझे नव्हे, तुमचे शब्द आहेत. आपले शब्द दुसऱ्यांच्या तोंडी कोंबून फार मोठा तीर मारला असे वाटून घेण्याचा नाद अनेकांना लागलाय, तुमच्यासारखे सुविद्य लोकही त्यात सामील होतात हे बघून सखेद आश्चर्य वाटले.

In reply to by संदीप डांगे

ते तेव्हा होतं आता नाही.
हे कशावरून ठरवता बुआ तुम्ही? मला वाटतं खरंच गल्लत होतेय, तुमचा वैयक्तिक विरोध आणि मनसेची खरी ताकद यात! साहेब आज हि राज ठाकरेंचं भाषण सर्व माध्यमे बाकी सगळं बाजूला सारून थेट प्रक्षेपित करतात! प्रत्येक वेळेला मतदान आणि निवडून आलेल्या लोकांची संख्या हेच एकमेव गणित नसतं हे सांगण्याची गरज आहे का? या हिशेबाने आठवलेंना तर राजकारणातून संन्यासाच घ्यावा लागला असता!

In reply to by संदीप डांगे

चार पाच हजार गुंड हाताशी धरून कोणी एखादा मुख्यमंत्री जेरीस आणू शकतो तो नक्कीच ताकदवान असेल मुख्यमंत्री जेरीस आले असे तुम्हीच ठरवून टाकले त्याला काहीही आधार नाही. माझ्या मते करण जोहर चित्रपट रिली व्हावा यासाठी आणि राज ठाकरे काहीच वाटाघाटी कशा होत नाहीत यासाठी जेरीस आले होते. त्याचा फायदा मुख्यमंत्र्यांनी करुन घेतला. त्यात काहीच चूक नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

म्हणूनच म्हणतो - कि दुखणं चर्चा किंवा तथाकथित खंडणी हे नाहीये! दुखणं आहे मनसे सारख्या "फुटकळ", "गुंडांच्या" पक्षाला इतके महत्व कसे दिले जाऊ शकते!!
प्रत्येकाचं वेगवेगळं दुखणं आहे. आपला नेहमीचा मुद्दा आपण उचलण्याच्या आतच मनसेने यशस्वीपणे पळविला व मनसे त्याचा निवडणु़कीत फायदा घेईल हे शिवसेनेचे दुखणं. तर फडणविसांनी वाटाघाटी केल्याने तोडफोड, दंगे टळले व त्यामुळे फडणविसांना धारेवर धरण्याची संधी गेल्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीचं दुखणं. तर कलेला, कलाकारांना देशाचं, सीमेचं बंधन नसतं असा फुटकळ व संतापजनक प्रतिवाद करून पाकड्यांची चाटणं आता आता बंद करावे लागणार असं पाकिस्तानप्रेमी शबाना आझमी वगैरेंचं दुखणं.

In reply to by श्रीगुरुजी

पाकड्यांची चाटणं आता आता बंद करावे लागणार असं पाकिस्तानप्रेमी शबाना आझमी वगैरेंचं दुखणं.> वा वा!! सुंदर भाषा... आपल्यापेक्षा वेगळे मत असणे म्हणजे गुन्हाच नाही का?? मग काय म्हणताय, पाठवायचय का त्यांना पाकिस्तानला? का कोणी तशी मागणी करेपर्यंत थांबायच म्हणता??

In reply to by श्रीगुरुजी

कायद्याचे राज्य आणण्याची अपेक्षा असलेल्या एका तरुण मुख्यमंत्र्याने आपली जबाबदारी हटकून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकां बरोबर वाटाघाटी करून आपल्या पदाचा आणि जनतेने दिलेल्या मतांचा अपमान केला हे दुखणं सुद्धा आमच्या सारख्या अनेकांना आहे. उद्या मुंबईत इस्लामी गुंड प्रभावी झाल्यानंतर मुख्य मंत्री असल्या वाटाघाटी करून "१००% हिजाब नको पण हिंदू मुलींनी किमान केस तरी झाकावेत" असा तोडगा काढतील. आणि भक्त मंडळी "इस्लामी गुंडापासून होणारी हिंसा मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुसुद्देगिरीने कशी टाळली" ह्याहूची हरिकथा सांगत बसतील.

In reply to by साहना

एकूणच जनतेच्या मतांचा खूप आदर करता तर तुम्ही. म्हणूनच जनतेच्या मतांवर अधिकृत बनलेल्या आणि अजूनही जनप्रतिनिधी बाळगून असणाऱ्या पक्षाचा उल्लेख तुम्ही वारंवार फुटकळ गुंडांचा पक्ष असा करत आहात. बाकी तुमची उदाहरणे मात्र फक्त तुमचा मुद्दा पुढे रेटण्यासाठीची आहेत असं मला वाटतं. असे झाले तर तसे झाले तर... बरेच काही झाले तर बरेच काही होऊही शकते. सद्यपरिस्थितीत तरी तसे काही घडले नाही आणि घडण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्र्यानी चर्चेने प्रश्न सोडवला (मूळ प्रश्न सुटलाय कि नाही माहित नाही, कारण अजून हि काही चित्रपट रांगेत आहेत आणि श्याम बेनेगल सारखे लोक हेकेखोरपणे चित्रपट बनवण्याच्या तयारीतच आहेत) म्हणून उद्या राज्यात बेकायदेशीरपणा बोकाळणार असे म्हणणे हा "क्राय फाऊल" वाटतो.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्याम बेनेगल सारखे लोक हेकेखोरपणे चित्रपट बनवण्याच्या तयारीतच आहेत हे खोटे आहे असा खुलासा स्वतः बेनेगलांनी केला आहे.

In reply to by पुंबा

ओह्ह! आय इट माय वर्ड्स देन! त्या नारायण कि काहीतरी नावाच्या दिग्दर्शकाने तसं म्हटल्याचा विडिओ आला होता मध्ये त्यावरून माझं तसं मत होतं. तसं नाही घडलं तर छानच!

In reply to by अप्पा जोगळेकर

"मातोश्री" अप्पा लीहा बघु १०० वेळा ;)

In reply to by ज्योति केंजळे

तुम्ही "लिहा" लिहा बघू १०० वेळा ;)

पा़किस्तानला क्रिकेट खेळू देण्याबद्दल 'शरद पवार' बाळ ठाकरेंना 'मातोष्री' वर भेटतात तेंव्हा ती चर्चा असते ^^^ आप्पा, डिटेल्स प्लिज...!

In reply to by संदीप डांगे

खालील लिंक पहा http://www.dnaindia.com/mumbai/report-pawar-and-thackeray-talked-cricke…यात शरद पवार, बाळासाहेब ठाकरेंना भारत-पाकिस्तान म्याच साठी भेटल्याची स्पष्ट बातमी आहे.

पैसाताई,
एखाद्या मुलीवर बलात्कार झाला म्हणून ती तक्रार करायला गेली तर जिवाच्या भीतीने त्या बलात्कार्‍याशी लग्न कर म्हणून तिला सांगणे कितीसे योग्य आहे? या केसमधे तेच चालू आहे.
साफ चूक ! इथे पोलीसच बलात्कारित आहेत. त्यांना वाचवणारा माणूस राज ठाकरे आहे. मग पोलिसांच्या जोरावर फडणवीस राज ठाकऱ्यांना काय अटक करणार? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

खरेच वाचवले? का सगळी स्टंटबाजी नुसती? बरं समजा एकदा उपकार केले तर आता त्याची किंमत वसुली करत आहेत ते असं म्हणताय का तुम्ही? मग तसे असेल तर पोलिसांच्या वाईट अवस्थेला इतर राजकारण्यांइतकेच तेही जबाबदार आहेत. मुंबई हल्ल्यात स्वतःचा जीव घालवून कसाबला कोणी पकडला हो? सैन्याचे कमांडो मुंबईत येईपर्यंत किल्ला कोणी लढवला होता? एवढे मोठे उदाहरण असताना पोलीस अगदी हतबल आहेत असा प्रचार का सुरू आहे? त्याना फ्री हँड द्या आणि मग बघा काय होते ते. आपल्याला वाचवणार्‍या राजला पोलीस अटक करणार नाहीत असे व्हायला ही काही मोगलाई नाही. मग आरोपी कोणी सोम्या गोम्या असो की कोणी तथाकथित मोठा माणूस. जो आदेश असेल तो पोलीस पाळतीलच.

In reply to by पैसा

स्टंटबाजी होती की नाही हे एखाद्याच्या पूर्वग्रहदूषित विचारांवर अवलंबून नसेल काय? मला नाही वाटत ती स्टंटबाजी होती..बाकीच्या पक्षांना त्या गोष्टीची दाखल घ्यावी वाटली नाही. आणि आता ते पोलिसांकडून कसली बुआ वसुली करत आहेत? त्यांनी त्यांच्या आंदोलनाचा रोख जाहीर केला होता आणि त्यासाठी तरीही कायदेशीर कारवाई करू नका असा सांगीतल्याचं ऐकिवात नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

इथे पोलीसच बलात्कारित आहेत. त्यांना वाचवणारा माणूस राज ठाकरे आहे. मग पोलिसांच्या जोरावर फडणवीस राज ठाकऱ्यांना काय अटक करणार?
या गामा पैलवान यांच्या विधानावर मी प्रश्न विचारलाय. आता क्लिअर आहे ना? वाचवण्याची किंमत म्हणून पोलीस राजला पकडणार नाहीत असा पैलवान यांच्या म्हणण्याचा अर्थ होतो ना? त्यापलिकडे मी एक अक्षरही बोललेले नाही. राज ठाकरे काय म्हणाले का म्हणाले नाहीत हे इथे कुठून काय आले?

In reply to by पैसा

ओके,क्लीअर! पण इथे पोलीस हा मुद्दाच नाही आणि त्यांना मोकळीक देण्याचा तर आणखीनच नाही. त्यांची भूमिका आंदोलनानंतर आली असती आणि मला वाटतं ती त्यांनी नक्कीच पार पाडली असती.

In reply to by गामा पैलवान

महाराष्ट्र पोलीस म्हणजे वस्त्र हरण होणारी द्रौपदी आहे का ? मग देवेंद्र काय डोळ्यावर पट्टी बांधणारे धृतराष्ट्र आहेत ? पोलिसांना वाचवायची जबाबदारी १ आमदार असलेल्या ठाकरे पक्षावर आहे तर मुंबईची आणि महाराष्ट्राची परिस्तिथी कठीण आहे.

भक्त प्रल्हाद,
कोणापासुन? मनसे पासुन? हाच विचार दहशतवादी हल्ल्याच्या वेळी करावा काय?
पोलिसांचा जीव कोणामुळे धोक्यात आहे ते इथे पाहायला मिळेल : http://marathi.eenaduindia.com/State/Thane/2016/10/14215945/Court-Order… संजय राठोड आणि पंढरीनाथ माळी जिवंत आहेत का मेलेत ते तरी कोणी सांगतोय का? राज ठाकऱ्यांच्या नावाने शिमगा कशासाठी? आ.न., -गा.पै.

सिनेमा हे मनोरंजनाचे साधन आहे. ते निवांतपणे, आनंदी वातावरणात बघण्यातच लोकांना स्वारस्य असणार. राज ठाकरेशी पंगा घेऊन, त्याच्या नाकावर टिच्चून समजा मुख्यमंत्र्यांनी तमाम थेटरांना कडेकोट संरक्षण दिले, तर अशा बंदूकधारी लोकांनी वेढलेल्या थेटरात, अत्यंत तंग वातावरणात सिनेमा बघायला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात येतील का? उगाच कशाला लफड्यात पडा? असा विचार करुन घरीच बसणारे जास्त असणार. "जेव्हा डीव्हीडी येईल तेव्हा पाहू" किंवा "वातावरण निवळल्यावर पाहू" असेच बहुतांश लोक ठरवणार. सिनेमा ही काही तळहातावर शीर घेऊन पहायची गोष्ट नाही! पंगा घेतला तर धंद्याचे वांधे होणार हे ओळखून करण जोहरने तडजोड करायचे ठरवले असणार. मला वाटते सिनेमासारखे क्षेत्र जे निव्वळ लोकप्रियतेवरच चालते त्यांना हे करावेच लागणार.

काय गम्मत आहे बघा, राज ठाकरे 'पाकिस्तान कलाकार विरोधी जनभावना' त्यांच्यासोबत आहे ह्या गृहितकातून आंदोलन करण्याची धमकी देतात, कसले आंदोलन तर एक चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचे, प्रदर्शित झाला तर लोक बघतील आणि निर्मात्याला पैसे मिळतील, हा सैनिकांचा अपमान आहे असं त्यांचं म्हणणं, जर जनभावना ह्यांच्या सोबत आहे तर मग चित्रपटगृहात सिनेमा बघायला नक्की कोण जातंय? फडणवीस नक्की कोणत्या जनभावना सांभाळत आहेत?

नक्कीच रजा घ्या . कितीही निरर्थक बोललात आणि स्वतः ची खळखळ बाहेर काढलीत तरी जितके जास्त बोलाल तितके अजूनच अडकत जाल आणि व्यक्तिगत व्हाल. कारण १. मुख्यमंत्र्यांनी योग्य मार्ग निवडून प्रश्न सोडवला आहे , २. सर्वाना संरक्षण देण्याचे कायम मान्य आहे , ३. त्यांनी स्वतः कोणतेही पैसे मागितले नाहीत अथवा ठाकरे जे म्हणतात त्याला त्यांचे कुठलेच समर्थन नाही ४. मुख्यामंत्र्यांचे याला समर्थन आहे असे राज ठाकरेही कोठे म्हणाले नाहीत.५. बोलावलेली चर्चा घटनाबाह्य नियमबाह्य नाही. हे सर्व सडेतोड मुद्दे आहेत. या व अनेक मुद्यांवर उगीचच ठाकरे मोठे झ्हाले काय , त्यांची ताकद मोठी झ्हाली का , घटनादत्त पदापेक्षा कोण मोठे वगैरे बालिश युक्तिवाद करून स्वतःचे हसे करून घेऊ नका . राज ठाकर्यांनी आंदोलन चालू केले म्हणून त्यांचे नाव आले इतकेच. ६१ आमदारांच्या पक्षाने हे केले असते तर त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी चर्चेस बोलावलेच असते . असो .आपला राज ठाकर्यांना अवाजवी महत्व मिळाल्यामुळे आलेला राग आम्ही समजू शकतो त्यावर "राज ठाकरे एक सत्य" असा एक्सपिरियंसी धागा काढा आणि चर्चेस विराम द्या. धन्यवाद.

पैसाताई, १.
मुंबई हल्ल्यात स्वतःचा जीव घालवून कसाबला कोणी पकडला हो?
२००६ साली भिवंडीत घांगुर्डे आणि जगताप या पूर्णपणे निरपराध पोलिसांना जाळून आणि गळे कापून ठार मारण्यात आलं. काय कारवाई झाली त्या धर्मांधांवर? तरीपण २००८ साली तुकाराम ओंबळे जिवावर उदार झाले हे त्यांचं वैयक्तिक शौर्य आहे. शासनाकडून कसलाही पाठींबा नाही. परत लिहितो, २६/११ ची चौकशी दडपण्यात आलेली आहे. हे माझं मत नसून हुतात्मा अशोक कामते यांची वीरपत्नी विनिता कामते यांचं मत आहे. भेकडकसाबला जिवंत पकडलं म्हणजे पोलीस सुरक्षित आहेत असा अर्थ निघंत नाही. २.
सैन्याचे कमांडो मुंबईत येईपर्यंत किल्ला कोणी लढवला होता? एवढे मोठे उदाहरण असताना पोलीस अगदी हतबल आहेत असा प्रचार का सुरू आहे?
पोलीस हतबल आहेतंच. महिला पोलिसांची अब्रू दिवसाढवळ्या राजरोस लुटली जातेय आणि त्याबद्दल साधी बातमीही येऊ नये? प्रत्यक्ष आयुक्त अरूप पटनायक दंगेखोरांना मोकळं सोडतोय. पोलिसांना जाळून ठार मारण्यात येतंय आणि तुम्ही विचारताय की ते हतबल कसे? वस्तुस्थितीपासून इतकी फारकत घ्यायची? हस्तिदंती मनोरा सोडा आता. ३.
बरं समजा एकदा उपकार केले तर आता त्याची किंमत वसुली करत आहेत ते असं म्हणताय का तुम्ही?
हे असंबद्ध विधान आहे. कोण कसली किंमत पोलिसांकडून वसूल करतोय म्हणताहात तुम्ही? चालू प्रकरणाचा पोलिसांशी काडीमात्र संबंध नाही. जर राज ठाकऱ्यांना अटक व/वा अटकाव करायचा ठरवला असता तर आणि तरंच पोलिसांचा हस्तक्षेप झाला असता. नेमका तोच होऊ नये म्हणून फडणवीस आटापिटा करताहेत. आ.न., -गा.पै.

इथे पोलीस काय व किती करू शकतात हा प्रश्नच नाहीये/ नसावा. पोलीस दंगे हाताळायला १००% सक्षम आहेत तरी पण दंगे झाले की सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आलंच. दंगेखोरांबरोबरच निरपराध नागरिक तसेच पोलीस सुद्धा जखमी होऊ शकतात. हे यापूर्वी झालेल्या कित्येक आंदोलनात सिद्ध झालेलं आहे. ते टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चेचा मार्ग स्वीकारला असावा. सध्याची एकूण पार्श्वभूमी बघता म्हणजे आरक्षणाच्या मागण्या, विविध मोर्चे, खुसपट काढायला तयार असलेले विरोधक ईई मुळे मुख्यमंत्र्यांनी अजून एका चित्रपट प्रदर्शनाच्या मुद्द्यावरून वाद आणि दंगे नको अशी भूमिका घेतली असावी. मुख्यमंत्रांनी ५ कोटी द्यावेत असा प्रस्ताव ठेवलेला नाही. राजने केलेली ही मागणी आहे आणि जी KJ ने मान्य केली. आता यात मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पार्टीज मान्य असताना स्वतः नाही म्हणणे म्हणजे सुटत आलेला तिढा परत वाढवणे झाले असते. जर का आतबट्याचा व्यवहार करायचाच असता तर हा ५ कोटींचा मुद्दा जाहीर केलाच नसता. परस्पर व्यवहार झाले असते व तुम्हाआम्हाला पत्ता सुद्धा लागला नसता. त्यातूनही आतबट्ट्याचा व्यवहार झालाच नसेल असं पण नाही, पण ते सिद्ध होण्यासाठी पुरावे नाहीत. त्यातून याला खंडणीचे स्वरूप देणे ही चाल ज्याने कोणी खेळली ती यशस्वी झाली म्हणायची. सध्या परिस्थिती अशी आहे की काहीही केलं तरी ते कसं चूक आहे हे सांगायला कोणीतरी पुढे येतंच. त्यातून परिस्थिती, वाक्य, शब्द तोडूनमोडून वा सरमिसळ करून दाखवण्यात बरेच लोक्स वाकबगार झालेत.

जाताजाता: बापूसाहेब, जाऊद्या, काही लोकांचे सुसंस्कृतपणाचे नियम आयडी बघून ठरतात, 'लोक भुंकतात' असे म्हटले की भुकम्प होतो पण 'कोल्हेकुई, गरळ ओकणे' हे शालीनतेचे लक्षण, मोदी, वाजपेयींबद्दल वाईट लिहिणे ब्रह्महत्या पण केजरीवालला थेट शिवीच म्हणणे सुसंस्कृत. इथे आत्ताच एक टेराबाईटी लिहून इतरांच्या सुसंस्कृतपणाचे माप काढण्याचा प्रयत्न करणारे विद्वान, त्यांचा माझा काहीही संबंध नसताना 'मी माझ्या आईबद्दल लैंगिक भावना ठेऊन आहे' असा स्पष्ट आरोप करून मोकळे झाले होते, अजूनही तो प्रतिसाद तिथेच असेल, मी काही स्क्रीनशॉट घेत नाही कि एक्सेल मेंटेन करत नाही, तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नव्हती, ------------ असो.

In reply to by संदीप डांगे

दुसर्‍याने तुमच्या कपड्यावर चिखल फेकला तर 'हा बघा कपड्यावर चिखल आहे' असे लोकांना दाखवत फिरायचे असते का ? एका फडतूस चर्चा. त्याकरता एवढ संतापून स्वतःचा आब घालवण्याची काय गरज आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

चिखल फेकणारा 'मी कित्ती सुंसंस्कृत' असा बोभाटा करत गावभर हिंडत असेल तर त्याला त्याची खरी ओळख करून द्यावी लागतेच! बाकी, तुम्हाला काय अर्थ काढायचे ते तुम्ही काढा!

या धाग्यावर इतकं दळण कांडण चाललय अजून ?? तिकडे बिचारा सायरस मिपाकरांच्या अमुल्य मदतीकडे आशेने बघतोय... कसं होणार मिपाचं... १) कुठल्याही प्रकारचं आंदोलन व्हावं हे करण मंडळींच्या हिताचं नव्हतं. चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याचं कलेक्शन महत्वाचं... दुसरा हप्ता हा जुगाराचा. पिच्चर चालला तर ठीक, नाहि तर परत बाँबे वेल्व्हेट व्हायचा. आपल्या लोकशाही/नागरी अधीकारांकरता वगैरे असला जुगार खेळणार्‍यातला करण नक्कीच नाहि. हा प्रसंगही अशा लढ्याला उचीत नाहि. तस्मात, अशी डील होऊन प्रकरण मिटवावं हि चित्रपट निर्मात्यांची अपेक्षा. २) आंदोलन नक्की फसणार हा राज मंडळींचा होरा. काहि लोकांची सहानुभूती, काहि कार्यकर्त्यांना सरकारी पाहुणचार, यापलिकडे काहि हाती लागणार नाहि हे ठाकरे साहेबांना नक्की ठाऊक होतं. तेंव्हा काहि मध्यस्थी व्हावी आणि प्रकरण बाईज्जत मिटावं हि त्यांची अपेक्षा. ३) अशी सेटलमेण्ट करणं, त्याला प्रोत्साहन देणं, शक्य असल्यास त्यातुन काहि (राजकीय/आर्थीक) फायदा मिळवणं हा सर्वमान्य सरकारी शिरस्ता. फडणवीसांच्या हातात गृहखाते असल्यामुळे, आणि "प्रत्यक्ष्य" राजसाहेब जातीने मीटींगला येणार म्हटल्यावर देवेंद्र स्वत: बैठक जमवतात. ४) इतक्या सोप्या भांडवलावर एकमेकांची पार ऐसीतैसी करून मिपाकर आपली दिवाळी साजरी करतात. मजा आहे.

In reply to by अर्धवटराव

ते इथल्या यच्चयावत स्वघोषित राजकीय पंडितांना समजलं नाही. माझं मत फडणवीसांनी चूक केली असं जरी असलं तरी तुमचं हे विश्लेषण पटण्यासारखं आहे.

In reply to by अर्धवटराव

सहमत! हि फक्त फडणवीस आणि राज यांची राजकीय अपरिहार्यता होती आणि करणची व्यावहारिक. आणि त्यातून वाईट काहीही घडले नाही असे मला वाटते. पण काही लोक असा आव आणत आहेत की सगळे कायदे पायाखाली तुडवून काहीतरी जगावेगळं करण्यात आलं. मला वाटतं भारतीय राजकारणाचा आणि राजकारण्यांचा पूर्वोतिहास पहिला तर हे अजिबात अयोग्य नाही. पण असो, सध्या मोदींविरोध (आणि राजविरोधही) इतका उत्स्फूर्त असतो की काहीही केलं तरी ठोक पडणारच आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

पहिले म्हणजे पूर्वोतिहासात जे झाले ते आत्ता विरोध करणाऱ्यांना मंजूर होते हा निष्कर्ष कसा काढलात?? सगळे जरी नाही तरी बरेच कायदे आधीही पायदळी तुडवले गेले होते (आणीबाणीत तर सगळेच समजा) जे चूकच होते, अन आजही माफक प्रमाणात कायदेबाह्य झाले आहे काम, मध्यस्थ कोणी असावे कोणी नाही त्याच्या कंडिशन , गरज, परिस्थिती ह्यांचा पूर्ण धांडोळा घेणार मध्यस्तीचा कायदा उर्फ "लॉ ऑफ आर्बिट्रेशन" भारतात अस्तित्वात असून इच्छूकांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. त्या उपरही जर ठाकरे अन फडणवीस बिचारे वगैरे वाटत असले तर सोडून द्या. फडणवीस जिथे उत्तम काम करतायत तिथे कौतुक करायलाच हवे, मराठा मोर्चाला त्यांनी जितके संयतपणे हँडल केले ते स्तुत्यच होते, फक्त इथे खेळी चुकली, अन त्या चुकलेल्या खेळीवर टीका करायचा हक्क एक नागरिक म्हणून प्रत्येकाला असावा, टीका करणारा फुल टाईम राजकीय विरोधक आहे असे समजणे म्हणजे शिक्के मारणे होय.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सोन्याबापू मी कसलाही निष्कर्ष काढला नाही आणि कोणाहीबद्दल वैयक्तिक तर नाहीच! वरील प्रतिसादांवरून जे निरीक्षण आहे ते सांगितले. बाकी आर्बिट्रेशन कायद्याचा म्हणाल तर तो व्यावसायिक तंट्यांसाठी (कमर्शिअल डिस्प्युट्स) असावा. भावनिक तंटे (सेंटीमेंटल डिस्प्युट्स) कव्हर करतो कि नाही माहित नाही. पण मुळात इथे कायद्याने मध्यस्थी करण्याचा प्रश्नच कुठं आहे? इथे राज्याचा मुख्यमंत्री दोन गटांना बोलावून दोघांची बाजू बाजू समजावून घेऊन घातलेले आंदोलन स्थगित करवतो यात चुकीचं किंवा बेकायदेशीर ते काय?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

१. करण जौहरचं जे काही नुकसान होणार होतं, ते आर्थिक होतं का भावनिक? बरं तो स्वतः सीएम कडे गेला होता का?? २. कायद्याने मध्यस्थीथी होऊ शकली असती का? तर होय, पहिले तर मुख्यमंत्र्यांना ह्या शुल्लक भांडणात पडायची गरज नव्हती, दुसरे म्हणजे स्वतःहून बोलवायचीही गरज नव्हती, जर कैक प्रतिसाद म्हणतायत तसे की भविष्यातली हानी टाळायला जर मध्यस्थी करायचीच होती तर सरळ कोर्टाला विनंती करून परस्पर दोन्ही पार्टी रुपी बॉल कोर्टाच्या कोर्टात टाकून नामानिराळे राहून आपलीच छवी वाचवता आली असती. ए दिल है मुश्किल ह्या चित्रपटनिमित्ताने महाराष्ट्रात झालेला वाद हा नवा नाहीये, तर असले वाद ह्या अगोदर तामिळनाडू मध्ये "कट्टी" ह्या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी झाला होता, त्याच्याबद्दल जालावर वाचले जाऊ शकते, इच्छा असल्यास जरूर लाभ घ्यावा ही विनंती. जर आपण कायदाबाह्य नाही असे म्हणता आहात तर प्रथम आपण ते तसे का म्हणता आहात ह्याला समर्थनार्थ काही तर्क द्या, हि अजून एक पूरक विनंती करतो. शांतपणे चर्चे बद्दल आभार :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

ते लॉ ऑफ अर्बायट्रेशन वगैरे अधिकॄत मध्यस्ठी साठी लागू होते. म्हणजे कमिशन मिळणार असेल तर. इथे कमिशन वगैरे मिळाले नाही. निदान तसे सिद्ध करता येत नाही. नोटरी पेपरवर मध्यस्थ म्हणून सीएमचे नावसुद्धा नाही. ज्या दोन पार्टीत मध्यस्थी झाली त्यांचे नाव सुद्धा नोटरी पेपरवर नाही. शिवाय ते कोर्टात जाऊन स्वतःची छबी वाचवणे वगैरे भानगडीत जनतेचे नुकसान व्हायचे ते झालेच असते. स्वतःच्या छबीची पर्वा न करता जनतेच्या,पक्षाच्या, स्वतःच्या हिताचा निर्णय घेतला म्हणून त्यांना मार्कच द्यायला पाहिजेत. हे वर्तन कायदाबाह्य आहे असे म्हणता तर त्याच्या समर्थनार्थ काही तर्क मिळाले तर आमच्या माहितीत भर पडेल. म्हणजे ते कोणत्या सेक्षन अन्वये कायदाबाह्य आहे वगैरे. आणि जर हे भांडण इतके क्षुल्लक होते तर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली या कॄतीला मुख्यमंत्र्यांनी एखादा गुन्हा किंवा घटनाबाह्य वर्तन केले अशा पद्धतीने का झोडपले जात आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

मला खालील व्याख्या सापडली. Any commercial matter including an action in tort if it arises out of or relates to a contract can be referred to arbitration. इथे सरळ सरळ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सौदा असा शब्द आहे. त्यामुळे हा कायदा प्रस्तुत केसमधे गैरलागू असावा असे वाटते.

आपले फुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी कुठल्याही थराला जाउ शकणार्‍या लोकांना बीजेपी ने केलेली विधायक कामे का दिसत नसावी बरे,तसेही बर्‍याच प्रमाणात इंग्रजी मिडीया,त्यांची मराठी भावंडे,नावातच हिंदु असलेले एक वर्तमानपत्र रांगेत पुढे आहेतच आणी त्यांना ओवरटेक करणे म्हणजे खुपच अवघड आहे बुवा.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

ह्यात पुरोगामित्वाचा काय अन कधी संबंध आला?? मुख्यमंत्र्यांनी चुकीचा पायंडा पाडायला नको होता, इतका साधा मुद्दा आहे, त्याला सहमती अगदी भाजप समर्थक मित्रांनी सुद्धा दर्शवली आहे, मग आता एका मुद्द्याला विरोध केला म्हणून ते पण फुरोगामी झाले का काय?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

शरद पवारांनी शशांक मनोहर ह्यांच्या सोबत ऑस्ट्रेलियन खेळाडुंसाठी बाळासाहेबांची भेट घेतली होति तेव्हा पवारांनी नव्हता का चुकीचा पायंडा पाडला.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तसेही बर्‍याच प्रमाणात इंग्रजी मिडीया,त्यांची मराठी भावंडे,नावातच हिंदु असलेले एक वर्तमानपत्र रांगेत पुढे आहेतच आणी त्यांना ओवरटेक करणे म्हणजे खुपच अवघड आहे बुवा.
हो.. हे अत्यंत अवघड आहे. विशेशतः द हिंदूने आपला दर्जा खूप कसोशीने टिकवला आहे. त्यांचे रिपोर्टर्सचे जाळे, कॉन्टॅक्ट्स, अतिशय विद्वान सदरलेखक(काही बायस्ड डावी मंडळी वगळता) हे जबरदस्त समीकरण आहे, त्यामुळे त्यांची एडीटोरियल मते कितीही एकांगी वाटली तरी हिंदूची बातमी म्हटलं की विश्वासार्ह वाटते, ती विश्वासार्हता दुसर्‍या कुठल्या वृत्तपत्राला मिळाली नाही असे वाटते.

(अता मीच काकु टाकल्याने धाग्यावर येणे अनिवार्य आहे) हा तुमचा मूळ प्रतिसाद (९०% पर्यंत वस्तुस्थीतीला धरून आणि तर्कसंगत आहेच)
१) कुठल्याही प्रकारचं आंदोलन व्हावं हे करण मंडळींच्या हिताचं नव्हतं. चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याचं कलेक्शन महत्वाचं... दुसरा हप्ता हा जुगाराचा. पिच्चर चालला तर ठीक, नाहि तर परत बाँबे वेल्व्हेट व्हायचा. आपल्या लोकशाही/नागरी अधीकारांकरता वगैरे असला जुगार खेळणार्‍यातला करण नक्कीच नाहि. हा प्रसंगही अशा लढ्याला उचीत नाहि. तस्मात, अशी डील होऊन प्रकरण मिटवावं हि चित्रपट निर्मात्यांची अपेक्षा. २) आंदोलन नक्की फसणार हा राज मंडळींचा होरा. काहि लोकांची सहानुभूती, काहि कार्यकर्त्यांना सरकारी पाहुणचार, यापलिकडे काहि हाती लागणार नाहि हे ठाकरे साहेबांना नक्की ठाऊक होतं. तेंव्हा काहि मध्यस्थी व्हावी आणि प्रकरण बाईज्जत मिटावं हि त्यांची अपेक्षा. ३) अशी सेटलमेण्ट करणं, त्याला प्रोत्साहन देणं, शक्य असल्यास त्यातुन काहि (राजकीय/आर्थीक) फायदा मिळवणं हा सर्वमान्य सरकारी शिरस्ता. फडणवीसांच्या हातात गृहखाते असल्यामुळे, आणि "प्रत्यक्ष्य" राजसाहेब जातीने मीटींगला येणार म्हटल्यावर देवेंद्र स्वत: बैठक जमवतात.
माझे चार पैसे (ही वयक्तीक माझी मते आहेत ती सगळ्यांना मान्य्/दुजोरा देण्या लायक घ्यावीत असे नाही) फडणवीसांना या निर्णयाचे संभाव्य (अपप्रचार आणि माध्यम मोडतोड अनुभव लक्ष्यात घेता ) काय होणार हे राजकीय परिपक्वतेने माहीत होते तर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राजच्या तोंडून आंदोलन मागे घेण्याची,करणच्या तोंडून स्वयंस्फुर्तीने सैनीक मदतनिधीची आणि निर्माता संघाकडून नैतीकतेच्या मुद्द्यावर पुन्हा पाक कलाकार न घेण्याची घोषणा करणे क्रमप्राप्त होते. शेवटी हा निर्णय वजा मध्यस्ती तोडगा मी शांततेसाठी आणि लोकभावनेचा आदर म्हणून व दोन्ही बाजूंच्या मागणीवरून केला आहे असे जाहीर करणे (धोनी फिनिशींग टच ९७ धावा गंभीरच्या,कोहली ४८,पण लक्ष्यात धोनीचा फटका, ही उपमा खास श्री गुरुजींसाठी) नेमके हेच टाळावे म्हणून मोदींनी संवेदन्शील विषयाबाबत सर्व राजकीय पक्ष्याच्या मातब्बर नेत्यांना बोलावून देशाच्या सुरक्षेबाबत कल्पना दिली आणि पुढचा (गणंगाचा अपवाद वगळता) अपप्रचार खुबीने टाळला. खरे तर या तोडगा चर्चेत आवर्जून अगदी शिवसेना नेत्याला व राष्ट्रवादी,आणि इं कॉ नेत्यालाही बोलावले असते तरी चालले असते.मुख्यमंत्री फक्त राज ठाकरेंनाच महत्व देतात असे चित्र झालेच नसते.(ते किती महत्वाचे आहेत हा वेगळा चर्चा विषय आहे)

सगळ्यांसमोर पत्रकार परिषद झाली असती तर मुख्यमंत्र्याने असे खुलासे देत बसावे लागले नसते (अशी चतुराई करण्याची सुवर्णसंधी फडणवीसांनी घालवली असे माझे प्रामाणीक मत आहे) एकीकडे मराठी मोर्च्याचे आयोजक चर्चेस येण्यास तयार नाहीत पण त्यांच्या वतीने निलेश राणे ईशारा मात्र देत आहेत तेंव्हा फडणवीसांनी चर्चेस आलात तर काहीतरी सकारात्मक नक्कीच घडते असा निर्भेळ संदेश दिला गेला असता. (फडणवीस काही चुकीचे वागले असतील तरीही त्यांची पाठराखण करण्याइतका झापडबंद विचार मी नक्कीच करू शकत नाही, जे सत्ता स्थापनेच्या वेळी अपरिपक्व वर्तन सेनेने केले तेच अता फडणविसांनी केले इतकेच मी म्हणेन आणि हे माझे ठाम मत आहे०)