Skip to main content

हात दाखवून अवलक्षण

लेखक नाखु यांनी सोमवार, 24/10/2016 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला. पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
  • सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
  • निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
  • महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
  • मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
  • आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
  • या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
विधायक कामाबाबत चर्चा/विरोध याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वानवा असताना हा विनाकारण शेपटीला आग लावून फिरण्याचा प्रकार आणि बळजुबरीने सैनीकांना यात ओढण्याचा प्रयत्न पाहून मला व्य्क्तीशः राज ठाकरे यांच्याबद्दल कीव +घृणा च वाटली. (एके काळी मनसे स्थापनेवेळी मी खंदा समर्थक होतो त्या पार्श्वभूमीवर जास्तीच राग आला) कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे. काही माजी सैनीक अधिकार्यांनी याचा धिक्कार आणि निषेधही केला आहे. मिपाकरांना काय वाटते?

वाचने 65668
प्रतिक्रिया 306

प्रतिक्रिया

असताना मनसेला एवढं महत्व देण्याची गरज होती का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतोय. त्यामुळे त्यांनी असले स्टंट करणं हे समजण्यासारखं आहे. पण मुख्यमंत्र्यांना हे अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग करण्याची काय गरज होती? येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत मनसेला चुचकारून शिवसेनेची कोंडी करण्याची व्यूहरचना हे एक कारण असू शकतं, पण त्यासाठी मनसेच्या एवढ्या पायघड्या घालणं आवश्यक नव्हतं.

In reply to by बोका-ए-आझम

क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?

In reply to by श्रीगुरुजी

राज ठाक-यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना स्वतःलाही प्रतिबंधात्मक अटक करायला हवी होती, ज्याचे आदेश गृहमंत्री म्हणून ते देऊ शकत होते. सरकारने मध्यस्थी करावी असं ना करण जोहर म्हणत होता, ना राज ठाकरे म्हणत होते.

In reply to by बोका-ए-आझम

- चित्रपटावर बंदी घालण्यात येणार नाही हे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले होते. - चित्रपटाला पूर्ण संरक्षण देण्यात येईल हे राजनाथसिंग व फडणविसांनी पूर्वीच सांगितले होते. - एका चित्रपटगृहावर निदर्शने करणार्‍या मनसेच्या १२ कार्यकर्त्यांना आधीच अटक केलेली होती. - प्रत्यक्ष चित्रपट प्रदर्शित होताना सर्व चित्रपटगृहांना संरक्षण देण्यात येणार होते. सरकार संपूर्णपणे कायदेपालन करणार होते. परंतु एवढे करून तोडफोड, दंगेधोपे व त्यातून निर्माण होणारी अशांतता व हिंसाचार पूर्णपणे टाळणे अशक्य होते. प्रत्यक्ष राज ठाकर्‍यांना व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करूनसुद्धा काही कार्यकर्ते मोकळे राहिलेच असते व त्यांनी तोडफोड केलीच असती. संपूर्ण महाराष्ट्रात किमान ७००-८०० चित्रपटगृहात हा चित्रपट दाखविला जाईल असा अंदाज आहे. प्रत्येक चित्रपटगृहावर किमान १० पोलिस ठेवले तरी ७-८ हजार पोलिस गुंतुन पडले असते. दिवाळीत दहशतवादी हल्ल्याचा धोका कायमच असतो आणि अशा परिस्थितीत इतके पोलिस वेगळ्या कामात अडकवून ठेवणे योग्य झाले नसते. आणि एवढे पोलिस ठेवूनसुद्धा तोडफोड पूर्णपणे टाळता आली नसती. काश्मिरमध्ये संचारबंदी असून व सैनिक पॅलेट गन्स घेऊन उभे असताना सुद्धा तिथले नागरिक संचारबंदी मोडून गन्सची भीति न बाळगता रस्त्यावर येऊन दगडफेक करीत होते. इथे तर हातात लाठ्या घेतलेले १०-१२ पोलिस काय करू शकणार होते? अशा परिस्थितीत आंदोलन टाळण्यासाठी सामोपचाराच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक होते. समजा बोलणी फिसकटली असती तर शेवटी पोलिस फोर्स होताच. परंतु कोणत्याही संघर्षात/वादात बलाचा वापर हा शेवटचा पर्याय असतो. वादावर चर्चेच्या, सामोपचाराच्याच माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आधी केला जातो. खलिस्तान आंदोलन, काश्मिर आंदोलन, आसाम आंदोलन, नक्षलवादी, मिझोराम आंदोलन इ. वादात वाटाघाटी करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न केला गेला होता. नक्षलवादी, शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटीचे सदस्य, मिझोरामचा लाल डेंगा, आसाममधील विद्यार्थी, हुरियतचे सदस्य हे काही जनतेचे निवडून आलेले प्रतिनिधी नव्हते. तरीसुद्धा त्यांचे उपद्रवमूल्य ओळखून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अगदी रामायणात सुद्धा प्रभू रामचंद्रांनी युद्ध करण्यापूर्वी अंगदाला शिष्टाईसाठी पाठविले होते आणि भगवान श्रीकृष्णानेसुद्धा महाभारत युद्ध टाळण्यासाठी दुर्योधनाशी वाटाघाटी केल्या होत्या (इथे मी फडणविसांची श्रीराम किंवा श्रीकृष्णाशी तुलना करीत आहे असा गैरसमज करून घेऊ नये). मनसेचा एकच आमदार असला तरी मनसेकडे भरपूर कार्यकर्ते आहेत व मनसे या पक्षाचे उपद्रवमूल्य खूप मोठे आहे. मनसेचे आंदोलन म्हणजे अण्णा हजारेंचे मौन किंवा उपोषण नाही किंवा अंनिसचा मोर्चा नाही. मनसे आंदोलनातून हिंसाचार, तोडफोड होण्याचा इतिहास आहे. मनसेचे आंदोलन कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर असले तरी त्यातून अशांतता निर्माण होऊन जनतेला त्रास होणार होता. राज ठाकर्‍यांना किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांना अटकेत ठेवून आंदोलन दडपता आले नसते. कायद्याचे पालन करणे हे जसे मुख्यमंत्र्यांवर बंधनकारक आहे तसेच शांतताभंग होऊन न देणे ही देखील त्यांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे आधी मनसेशी बोलणी करून आंदोलन रद्द करण्याचा प्रयत्न करणे व बोलणी फिसकटल्यास पोलिस फोर्स वापरून कायद्याचे पालन करणे हाच मार्ग त्यांच्यापुढे होता. परंतु पोलिस फोर्स वापरून तोडफोड पूर्णपणे टाळणे शक्य झाले नसते. त्यामुळेच त्यांनी दोघांना एकत्र बोलावून वाटाघाटींच्या माध्यमातून आंदोलन रद्द करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आधी लिहिल्याप्रमाणे ५ कोटींची देणगी हा काही चर्चेतील मुख्य मुद्दा किंवा अट नव्हती. आंदोलन रद्द करण्याचा प्रयत्न करणे हाच चर्चेतील प्राथमिक मुद्दा होता. या विषयावर खालील लेख चांगला आहे. http://indianexpress.com/article/india/india-news-india/devendra-fadnav…

In reply to by श्रीगुरुजी

जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं असतं तर एक निवेदन द्यायला हवं होत, ज्यात स्पष्टपणे सांगितलं असत कि जर या आंदोलनातून कुठल्याही पद्धतीचे मालमत्तेचे नुकसान झाले तर ते 'मनसे' कडून वसूल करण्यात येईल. आंदोलन करताना पकडण्यात आलेले कार्यकर्ते मनसे चे आढळल्यास 'मनसे' प्रमुखांना अशा हिंसक आंदोलनास पाठबळ देण्यासाठी अटक करण्यात येईल! पण हे केलं असत तर काही लोकांचा रोष घ्यावा लागला असता! त्यात निवडणूक आल्यात त्यात शिवसेना ताप देतेय!! मग मनसे ला दुखवून कसे चालेल? मनसे चे कार्यकर्तेसुद्धा आजकाल पक्षप्रमुखांच्या नावाने ओरडत असतात. आधीच दहीहंडीच्या केसेस पडल्यात कार्यकर्त्यांवर त्यात अशी काही कणखर कारवाई होण्याची शक्यता दिसली असती तर 10 वेळा विचार करावा लागला असता कार्यकर्त्यांना सुद्धा!

In reply to by शब्दबम्बाळ

बरोबर आहे.. मनसे अध्यक्षा सकट सर्व पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंदात्मक कारवाई करायला पाहिजे होती. वेळ पडली तर अध्यक्षा ला चोप देत पोलीस स्थानकात डांबून ठेवायला पाहिजे होते. मागील आघाडी सरकार ने त्यांचे खूप लाड पुरवले. खळ खट्याक ची धमकी देऊन सार्वजनिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या प्रवृत्तीना चाप बसवण्याची संधी फडणवीस यांच्या सारख्या कर्तबदार मुख्यमंत्र्यानी घालवली आहे. याचा खेड वाटतो.

In reply to by शब्दबम्बाळ

जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं असतं तर एक निवेदन द्यायला हवं होत, ज्यात स्पष्टपणे सांगितलं असत कि जर या आंदोलनातून कुठल्याही पद्धतीचे मालमत्तेचे नुकसान झाले तर ते 'मनसे' कडून वसूल करण्यात येईल. आंदोलन करताना पकडण्यात आलेले कार्यकर्ते मनसे चे आढळल्यास 'मनसे' प्रमुखांना अशा हिंसक आंदोलनास पाठबळ देण्यासाठी अटक करण्यात येईल!
वर सविस्तर उत्तर दिले आहे. त्यामुळे परत लिहित नाही.
पण हे केलं असत तर काही लोकांचा रोष घ्यावा लागला असता! त्यात निवडणूक आल्यात त्यात शिवसेना ताप देतेय!! मग मनसे ला दुखवून कसे चालेल? मनसे चे कार्यकर्तेसुद्धा आजकाल पक्षप्रमुखांच्या नावाने ओरडत असतात. आधीच दहीहंडीच्या केसेस पडल्यात कार्यकर्त्यांवर त्यात अशी काही कणखर कारवाई होण्याची शक्यता दिसली असती तर 10 वेळा विचार करावा लागला असता कार्यकर्त्यांना सुद्धा!
राज ठाकरे हा उधोजींइतकाच बेभरवशाचा व स्वतःच्या ताकदीबद्दल अवास्तव भ्रम बाळगणारा आहे. शेवटी हे दोन्ही बंधू शिवसेना संस्कृतीत वाढले आहेत. आपला पक्ष फार मोठा आहे, आपल्याला महाराष्ट्रात प्रचंड पाठिंबा आहे, आपण स्वबळावर सत्ता काबीज करू शकतो अशा भ्रमात हे दोघेही वावरत असतात. या दोघांबरोबरही युती किंवा तडजोड करणे अत्यंत अवघड आहे हे भाजप पुरेपूर ओळखून आहे. भाजपचे मुख्य ध्येय स्वबळावर लढण्याचेच आहे. त्यामुळे मनसेला दुखवू नये किंवा सेनेला चुचकारावे अशा गोष्टी भाजप करणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

>>पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं? सत्तेत नसुनहि राज ठाकरेंचीच चालते महाराष्ट्रात, तेंव्हा जनाची नाहि तरी मनाची लाज असेल तर फडणविसांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खाली करावी...

डावीकडून आणि उजवीकडून थपडा खाणे. सेन्सॉरने मंजुरी दिली असताना एका राजकीय पक्षाच्या दंडेलीला भीक घातली म्हणून डावीकडून आणि देशभक्ती खंडणीखोरांच्या दावणीला बांधली म्हणून उजवीकडून. #तोंडघशीफडणवीस

In reply to by बोका-ए-आझम

हि सगळी पवारसाह्यबांनी राज ठाक्रे, करन जोहर आदींकडून करवून आणलेली गेम आहे. फडनवीस बिचारे तोंडघशी पडले. आता त्यांनी जायला हरकत नाही. उगा मोर्चामुळे गेले असते तर महाराष्ट्रात वेगळा मेसेज गेला असता. ;) #सर्वकाहीसाहेबांमुळे

१. मुंबई नगरपालिकेच्या २०१७ निवडणूकीची ही नांदी आहे २. 'टायमिंग' साधून केलेली राजनिती आहे (आठवा टोल राड्याचे टायमिंग) ३. भाजपाने शिवसेनेला दाखवलेले 'मधले बोट' आहे ४. मनसे पार्टी फक्त पैसा छापण्याचे माॅडेल म्हणून कसा एस्टॅब्लिश झाला आहे त्याचे उदाहरण आहे ५. राजकारणातले निवडणूकपूर्व स्कोर सेटलिंग आहे ६. करण जोहरचा सिनेमा आणि पाक कलाकार हे निनीत्त आणि ह्या प्रकरणातले बळी आहेत ७. पाक कलाकारांना कधीच काम मिळणार नाही हा विजयी मुद्दा, मूळ मुद्द्याला झाकोळूना टाकण्याची तजवीज आहे - (दिलसे) सोकाजी

गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. घटनात्मक पदावर बसून काय निर्णय घ्यावे ह्याची अक्कल नसेल तर ... असो. डोकं फार तापलं आहे. उगा उणादुणा शब्द निघायचा... श्रीगुरुजी, मिपाची जनभावना तुमच्या विचारांविरुद्ध आहे असेच चर्चेत दिसत आहे, योग्य ती समज आपल्याला येवो, भाजपचे दलाल नकोत इथे मिपावर,

In reply to by संदीप डांगे

आपल्या प्रतिसादातील भाषा अस्थायी आणि सौजन्यशील आहे असे खेदाने नमूद करतो. श्रीगुरुजींनी अजुनतरी पातळी सोडुन बोलल्याचे किमान या धाग्यावर दिसत नाही. ते चुकीच्या गोष्टीचे समर्थन करताना दिसत आहेत. त्यात त्यांची केविलवाणी धडपड दिसते पण जाणुनबुजुन एखाद्या व्यक्तीची, पक्षाची अथवा समुदायाची खोडी काढलेली दिसत नाही. अश्या परिस्थितीत त्यांची कानौघडणी करणारा प्रतिसाद रास्तच असावा पण " फालतू टिवटिव बंद करा" आणि "भाजपाचे दलाल नकोत इथे मिपावर" ही वाक्ये पुर्णतः अस्थायी आहेत. मिपावर सर्वच पक्षांचे समर्थक आहेत. सर्वांचे विरोधक आहेत. आपण स्वतः भाजपाचे कट्टर विरोधक आहात. अश्या परिस्थितीत कोण्या एकाला "दलाल" वगैरे संबोधणे ही फारच वैयक्तिक टिप्पणी होते. शिवाय एखाद्याच पक्षाचे समर्थक नकोच असे म्हणणे ही चुकीचे आहे. आम्ही तर मिपावर आप आणी राष्ट्रवादीच्या समर्थकांना पण सहन करतो. त्यात काय एवढे?

In reply to by मृत्युन्जय

ओके. आता तुम्हीच ठरवा सगळं. धन्यवाद! रच्याकने, मी कोणाचा कट्टर विरोधक आहे किंवा नाही हेही तुम्हीच ठरवा.. परत असो.

In reply to by संदीप डांगे

डांगे अण्णा गुरुजींच्या मताशी मी पण सहमत नाही परंतु आपली भाषा (दलाल इ शब्द) हि कमरेच्या खाली उतरते आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते. आपल्याला गुरुजी दलाल आहेत हे सिद्ध करून दाखवता येईल काय? तुम्ही भक्त म्हणत होतात तोवर ठीक होते. याबाबतीत मृत्युंजय यांच्याशी सहमत.

In reply to by सुबोध खरे

मी गुरुजींनाच दलाल बोललो हे सिद्ध करता येईल काय? मिपावर भाजपचे दलाल नकोत अशी इच्छा व्यक्त केली आहे, ह्यात काय गैर? आणि हो, 'भाजपचे नकोत तर इतरांचे चालतील का' असा बुद्धिमान प्रश्न कोणी विचारू नये, ;)

In reply to by संदीप डांगे

डांगे अण्णा.. कशाला वाद वाढवताय उगाच. जाऊ द्या ना. कोणाला इथे दलाल म्हणू नये हे ठीक आहे.

In reply to by संदीप डांगे

तुमचा प्रतिसाद लिहिताना तोल सुटला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर गुरूजींना बोललेले शब्द मागे घ्या. अशी शब्दांची कसरत करत तुम्ही पायर्‍या खाली उतरत जाण्यापेक्षा शब्द मागे घेणे सोपे आहे.

In reply to by सुबोध खरे

दलाल वगैरे शब्द अयोग्य आहेत वगैरे सगळ्यांनी बोलून झालाय आणि ते बरोबर हि आहे. पण एखाद्या आयडी ला (तो नावडता असल्याकारणाने) "चड्डीला हात घातला", "सुंता केला" असे दिले गेलेले प्रतिसाद हे कमरेच्या वरचे आहेत का? कि आयडी च्या प्रसिद्धी आणि कंपू नुसार 'कमरेचे' माप बदलते?

In reply to by मृत्युन्जय

मी एकाच ठिकाणी दोन्ही ठिकाणचा आक्षेप घेतला आहे! ;) असाही माझ्या आक्षेपाला कोण विचारतो? आमची ना फॅन फॉलोविंग ना कंपू त्यामुळे ज्या धाग्यावर प्रतिक्रिया देत असतो तिथे ताळतंत्र सोडून प्रतिक्रिया दिल्याचे दिसले तर थोडं सांगायचं प्रयत्न करतो... पण तुमच्या प्रश्नाचा रोख काय आहे हे कळलं तर नीट उत्तर देऊ शकेन...

In reply to by शब्दबम्बाळ

इथे कुणाच्याच आक्षेपाला कुणीच विचारत नाही. मुद्दा बरोबर असेल तर कंपु असो वा नसो समर्थन मिळते. त्यामुळे इथे कंपुचा संबंध नाही. ताळतण्त्र सोडुन कुणी वागत असेल तर जरुर समज द्यावी. जिथे मला दिसते तिथे तशी समज मी देतोच. जर तसे करणे मला योग्य वाटले तर,. त्यामुळे माझ्या प्रतिक्रियेवर प्रतिसाद देण्याचे प्रयोजन कळाले नाही हा मुख्य रोख आहे. शिवाय प्रतिसाद देताना मी प्रतिसाद अयोग्य का वाट्तो याची कारणेही दिलेली आहेतच. असो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

In reply to by मृत्युन्जय

मुद्दा बरोबर असेल तर कंपु असो वा नसो समर्थन मिळते. मिळत नाही.धन्यवाद.

In reply to by मृत्युन्जय

अहो ती प्रतिक्रिया खरे काकांच्या प्रतिसादाला दिलेली आहे.. बघा पुन्हा! खरे काका काही वेळा मी त्या प्रतिक्रियेत लिहिल्या वाक्यांपैकी काहीतरी वापरतात(प्रसिद्ध आयडीला ) , त्या अनुषंगाने विचारले होते मी... असो, दिवाळीच्या तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा!

In reply to by संदीप डांगे

अरेच्या. मग सगळे ठरवण्याचा ठेका काय मिपा व्यवस्थापनाने तुम्हालाच दिलाय की काय? तुम्ही नाही का श्री गुरुजींना " भक्त", ठरवुन टाकलेत? जर तुम्ही भाजपा विरोधक नसाल तर श्री गुर्जी आपचे खंदे कार्यकर्ते आहेत असे पण म्हणूयात की. हाकानाका. असो. असोच. ....

In reply to by मृत्युन्जय

यात काहीच नवीन नाही. माझ्या प्रतिसादाचा प्रतिवाद न करता आल्याने समोरच्याने चिरडीला येउन संदर्भहीन व व्यक्तिगत टिप्पणी करणे हे नेहमीचेच आहे.

In reply to by मृत्युन्जय

फालतू टिवटिव आणि दलाल ह्या शब्दांत सौजन्यहीन असे काही आहे असे वाटत नाही. "श्री गुरुजी" असे सोज्वळ नाव धारण करणारी व्यक्ती खंडणीखोर वृत्तीची आणि अपली पदाची शपथ मोडणाऱ्या मुख्यमंत्र्याची बाजू मांडत आहे अन नेत्यासाठी "दलाल" हा शब्द १००% योग्य वाटतो. खुद्द मुख्यमंत्र्यानी जे काही केलं आहे त्याची बातमी इंग्रजी वर्तमान पत्रांनी "brokered" अशी दिली आहे. गुरुजींचा युक्तिवाद "फालतू टिवटिव" ह्याच सदरांत मोडतो. प्रत्यक्षांत श्री गुरुजी हे फार चांगले व्यक्ती असतील ह्यांची शंका नाही पण पक्ष भक्तीने त्यांना आंधळे बनवले आहे.

In reply to by मृत्युन्जय

राष्ट्रवादीच्या समर्थकांना पण सहन करतो>>>> -- उपकारच झाले मायबाप आमच्यावर. कुठे ऋण फेडू हे. या जन्मात तर शक्यच नाही. (हलके घ्या)

In reply to by संदीप डांगे

आणि सौजन्यहीन प्रतिसाद .... हे अनेकवेळा झालेले आहे. तुमच्या इतर धाग्यावरच्या प्रतिसादावरून आम्ही तुम्हाला पवार साहेबांचे दलाल असे म्हटले तर चालेल का ?

In reply to by संदीप डांगे

डांगेण्णा.. प्रतिसाद पटला नाही. तुमचा वाद घालण्याचा स्टॅमिना संपला असेल तर गुरूजींकडे दुर्लक्ष करा. सरकारचे चुकले आहे आणि गुरूजी लंगडी बाजू सावरत आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. बादवे.. "आपण अशी भाषा वापरणे = आपल्या बाबतीत दुसर्‍याला अशीच भाषा वापरण्याची परवानगी देणे"

In reply to by संदीप डांगे

भाजपचे दलाल नकोत इथे मिपावर,
१. बाकी पक्षांचे दलाल चालतील का? २. मिपावर काय चालेल आणि काय नाही हे नीलकांत आणि संपादक यांना ठरवू द्या की. तुम्ही नक्की कुठल्या अधिकाराने हे बोलताय?

सरकारने दोन विरोधी पार्टींना आमने-सामने बसवुन वाद मिटवावे, आंदोलनं टाळावी यात काहिच वावगं नाहि, नवखं देखील नाहि. बाँबे पासुन ते झेंड्यापर्यंत, आणि क्रिकेट सामन्यांपासुन ते अमुक तमुक लवादापर्यंत हेच धोरण अनेकदा नौभवलं आहे महाराष्ट्राने. यंदा फरक हाच, कि मनसेला एकदम सीएम लेव्हलची मध्यस्थी मिळायला नको होती. त्यामागे कदाचीत आगामी मुंबई इलेक्शनचे आराखडे असतील. दुसरी बाब म्हणजे ५ करोडच्या देणागीला खंडणीचा वास येणे. करण जोहर वगैरे मंडळींना काहिच तोशीक न लागता प्रकरण मिटु नये, व सैनीक कल्याणा फंडाला चार पैसे मिळवुन देऊन आपलं उदात्तीकरण करावं हा त्यातला स्वार्थ-परमार्थ असु शकेल. अदरवाईज जे झालं त्यात काहि खटकण्यासारखं काहि नाहि. या प्रकरणाची भारत-पाक व्यापारी संबंधांशी याचि तुलना करणे फारच हास्यास्पद आहे. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा, इतर व्यापार हे सर्व वाणिज्य, अर्थ, गृह, अगदी मिलट्री इंटलीजन्स आणि गुप्तहेर संघटनांच्या कॉर्डीनेशनचे उद्योग आहेत. आणि ते काय योग्य ते करतीलच. एखाद्या चित्रपटाच्या रिलीजशी त्याचा संबंध जोडणे म्हणजे फारच झालं.

In reply to by अर्धवटराव

सैनीक कल्याणा फंडाला चार पैसे मिळवुन देऊन आपलं उदात्तीकरण करावं हा त्यातला स्वार्थ-परमार्थ असु शकेल. अदरवाईज जे झालं त्यात काहि खटकण्यासारखं काहि नाहि. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते माहित नाही पण त्यातून आयजीच्या जीवावर बायजी उदारचा वहीम येतोय!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तसा तो आहेच. नुसतच इशारे वगैरे देऊन प्रकरण मिटवलं असतं तर ठाकरेंच्या हाति काहि लागलं नसतं. पक्षाला खंडणी मिळाली असती ( ति तशीही मिळाली असेल टेबलाखालुन) तर उरली-सुरली इज्जत गेली असती. नैसर्गीक आपत्ती, खेळ, पुतळे वगैरे करता पैसे घेऊन काहिच फायदा झाला नसता. सैन्याकरता पैसे घेऊन ठाकरे गंगेत बुडी मारायला गेले, पण ते प्रकरण अंगावर शेकलं दिसतय. खास करुन सैन्याधिकार्‍यांनी कानउघडणी केल्यामुळे काहि उत्तर पण देत येणार नाहि मनसेला. हे थोडं हात दाखवुन अवलक्षण झालेलं आहे मात्रं :)

श्रीगुरुजी,
क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?
मलाही नेमका हाच प्रश्न पडला आहे. फडणविसांनी नक्की काय करायला पाहिजे? लांडे कारभार करायला सांगितलं होतं कोणी करण जोहरला? आ.न., -गा.पै.

मोगाखान ला सर्रास शिव्या पडताना गप्प एन्जॉय करणारे, गुरुजींची पडेल बाजू सांभाळायला, (पर्यायाने भाजपची ) सरसावून मैदानात येतायत, कभी ख़ुशी कभी गम! 'माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल! माझे प्रतिसाद आक्षेपार्ह असतील तर संपादक मालक कार्यवाहीसाठी समर्थ आहेत, मालकांची द्वाही देणाऱ्यांना इतके समजले तरी पुरे! कभी अलविदा ना कहना! कुणाचेही नाव घेऊन कुणाला अपशब्द वापरला नाही ही नेहमीची अलिबाय, माझ्याच बाबतीत नेहमी विसरतात कसे, याचेही आश्चर्य नाही! कल हो ना हो! मनोरंजनाची हि पहिलीच वेळ नाही व शेवटचीही नसणार :) =))

In reply to by संदीप डांगे

लैच करमणूक करायला लागलात की. भाजप = गुरूजी..? मोगाखान ला सर्रास शिव्या पडताना गप्प एन्जॉय करणारे, गुरुजींची पडेल बाजू सांभाळायला, (पर्यायाने भाजपची ) सरसावून मैदानात येतायत, कभी ख़ुशी कभी गम! गुरूजींची पडेल बाजू कोण सांभाळत आहे..? इथे तुमच्या प्रतिसादाला विरोध नोंदवणार्‍या किती जणांनी गुरूजींना पाठिंबा दर्शवला आहे? नीट बघा जरा. 'माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल! हा हा.. खूपच विनोदी प्रतिवाद. यावर शब्द खुंटले. मुद्द्यावरून लक्ष हटवणे...??? - गिव्ह अ ब्रेक..!!!!! माझे प्रतिसाद आक्षेपार्ह असतील तर संपादक मालक कार्यवाहीसाठी समर्थ आहेत, मालकांची द्वाही देणाऱ्यांना इतके समजले तरी पुरे! कभी अलविदा ना कहना! असो. यावर पास. कुणाचेही नाव घेऊन कुणाला अपशब्द वापरला नाही ही नेहमीची अलिबाय, माझ्याच बाबतीत नेहमी विसरतात कसे, याचेही आश्चर्य नाही! कल हो ना हो! यासाठी आपण स्वतः शब्द जपून वापरायचे असतात. कोण कुणाच्या सहाय्याने कोणत्या विचारधारेची भलामण करत असते आणि कोण सरसकटीकरणाचे पिवळे चष्मे घालून प्रतिसादांचा रतीब पाडत असते हे न कळण्याइतके पब्लीक खुळे नसते. असो, तुमच्या प्रतिसादाला विरोध केला तर लगेचच सरसकट वैयक्तीक लेबले लाऊन आलेला प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटले नसले तरी याही प्रतिसादाचा टोन पटला नाही हे खेदपूर्वक नमूद करतो.

In reply to by संदीप डांगे

माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल!
Joke of the day! इथं तुमच्या प्रतिसादांना अाक्षेप घेणाऱ्या किती जणांनी गुरुजींच्या युक्तिवादाला समर्थन दिलंय ते एकदा बघून घ्या आणि मग काय ते बोला. नेहमी भाजपच्या बाजूने लिहिणाऱ्या किती जणांनी इथे सरकारची बाजू घेतलीय ते नीट बघा. अगदी धागा काढणाऱ्या नाखुकाकांपासून सुरूवात करा.

In reply to by संदीप डांगे

तुमच्या भाषेबद्दल सर्वप्रथम आक्षेप मीच घेतला आहे. तरी वरील सर्व आक्षेप माझ्याबद्दल असतील तर ते आधी स्पष्ट करावे तर मी पुढील प्रतिसाद देतो. अन्यथा उगाच तुमच्याबद्द्दल गैरसमज करुन घेउन प्रतिसाद देण्यात हशील नाही.

श्रीगुरुजींना आदर्श गुरुजी पुरस्कार , भगवी शाल आणि कमलपुष्प देउन सत्कार करण्यात येत आहे .

इथे ५० जणांनी ५०० प्रतिसाद लिहीे तरी गुर्जीं काय ऐकणार नाहीत, फक्त लिहीणारांची चिकाटी या मुद्दयांवर टिकते का हे पहायचा आहे !

पैसाताई,
गुंडगिरीचा समाचार घ्यायला महाराष्ट्र पोलीस समर्थ आहेत.
हाहाहा ! ज्योक ऑफ द डेकेड !! ऑगस्ट २०१२ चे आझाद मैदानातले दंगे विसरलात की काय? त्यानंतर पोलिसांचा मोर्चा निघाला होता. त्यातलं हे चित्रं खास तुमच्यासाठी डकवतोय : http://static.dainiktribuneonline.com/wp-content/uploads/2012/08/PTI8_21_2012_000146B.jpg पोलीस मनसेवर का हात उचलणार नाहीत हे वरील चित्रातून कळतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

राजकीय इच्छाशक्ती दाखवावी. गोव्यासारख्या लहान राज्याचे पोलीस टोल बूथ मोडणाऱ्या नारायण राणेंच्या सुपुत्राला झोडून काढून आत टाकू शकतात तर महाराष्ट्र पोलिसात नुसत्या लाठीने सशस्त्र अतिरेक्यांचा सामना करायची हिम्मत आहे. थोडा विश्वास दाखवा.

१. सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी. देश स्वतंत्र असेल तर कायद्याने ज्या गोष्टीची मुभा दिली आहे ते करण्याची १००% मुभा सर्वानाच असून त्यांत बंदी इत्यादींची भाषा करणारे गुंड आहेत. मुलीची छेड कडणाऱ्याला काय करतात तेच त्यांचे करावे. २. निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत. न्यायालयाला क्रिकेट नियामक मंडळ चालवण्याचे फार महत्वाचे काम असताना कायद्याचे रक्षण वगैरे करण्याचे फुटकळ काम करण्यासाठी काम नसावा. त्या शिवाय ह्यावर कायदेशीर निर्णय येई पर्यंत फवाद खान ला नातवंडे होतील. ह्या शिवाय न्यायालयाच्या निवडायचे पालन होईल ह्याची काय शाश्वती ? गुंड गिरीची भीती असेल तर तुम्ही आपल्या मुलांना चित्रपट गृहांत पाठवाल का ? इतर ५६ विषय सोडून राज ठाकरेंनी "चित्रपट" हेच क्षेत्र गुंडगिरी दाखविण्यासाठी का वापरले ? कारण इथे "वेळेला" महत्व आहे. ३. महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी? इथे फक्त चित्रपटाच्या गल्ल्याचा आणि निर्मात्यांच्या फायद्याचा प्रश्न नाही. चित्रपटाच्या डिस्ट्रिब्युशन मार्केटिंग साठी आधीपासूनच पैसे खर्च केलेला असतो. बहुतेक करून चित्रपटगृहांनी ऍडव्हान्स मध्ये प्रिंट्स आणि स्क्रिन्स बुक केलेल्या असतात. अनेक लोकांचे भवितव्याचा इथे प्रश्न आहे. करण जोहर चा चित्रपट लागला नाही तर पुढच्या वेळी त्याला ऍडव्हान्स डील्स बुक करणे मुश्किल होईल. ४. मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय? १००%. मुख्यमंत्र्यांचा निर्णय मूर्खपणाचा होता. २०% आमदार असणाऱ्या पक्षाने धमकी दिली असती तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लाख घालून कायद्याचे रक्षण चित्रपटाला द्यायला पाहिजे होते. मनसेचे आमदार आहेत १. अश्या पक्षाची धमकी फार तर पोलीस अधीक्षकांच्या पातळीवर हाताळली गेली पाहिजे होती. ५. आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे? खंडणीचा पैसे कुठे जातो ह्यावर काहीही अवलंबून राहत नाही. खंडणी ती खंडणी. ६. या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे. ह्या वादांत राज ठाकरे ह्यांच्या फायदा झाला आहे. फक्त १ आमदार असून सुद्धा आपण कोणी तरी मोठे नेते आहोत हे त्यांना दाखविण्याची संधी फडणवीसांनी विनाकारण उपलब्ध करून दिली आहे. आत रिपब्लिकन पक्ष, शेकाप, शिवसेना, AIIMB इत्यादी मंडळी सुद्धा त्यांच्या छाताडावर चढतील ह्यांत काहीही शंका नाही. कायदा हि सोयीस्कर आहे तेव्हांच अंबलबजावणी करण्याची गोष्ट नाही. उलट जेव्हा कायदा बजावण्यात धोका असतो तेव्हांच देशाच्या कायद्याची खरी कसोटी लागते. देवेंद्र ह्याच्या वागणुकीतून महाराष्ट्रांत कायदा बजावण्याची धमक नाही हेच स्पष्ट झाले आहे. इथे काँग्रेस वाला मुख्यमंत्री असता तर त्याने करण जोहर कडून १० कोटी घेतले असते १ राजला दिला असता ९ आपण ठेवले असते आणि चित्रपट शांत पाने लावू दिला असता आणि सार्वजनिक रित्या लोकांचा प्रक्षोभ टाळला असता. हे १० कोटी नंतर कारण जोहर ने तिकिटांचे दार वाढवून वसूल केले असते.

In reply to by साहना

"इथे काँग्रेस वाला मुख्यमंत्री असता तर त्याने करण जोहर कडून १० कोटी घेतले असते १ राजला दिला असता ९ आपण ठेवले असते आणि चित्रपट शांत पाने लावू दिला असता आणि सार्वजनिक रित्या लोकांचा प्रक्षोभ टाळला असता. हे १० कोटी नंतर कारण जोहर ने तिकिटांचे दर वाढवून वसूल केले असते." इथे असे काही झालेले नाही असे छातीठोकपणे सांगता येईल? सैनिक फण्डला काही रक्कम उघडपणे देऊन उरलेले निम्मे निम्मे वाटून घेतलेले नाहीत असे छातीठोकपणे सांगता येईल? अशा बातम्या विकीवर किंवा पेपरमध्ये येत नसतात. लोकांना दाट संशय आहे हे खरे.

In reply to by राही

या ठिकाणी भाजपाने पैसे खाल्ले आहेत आहे असे छातीठोकपणे सांगत असाल तर पुरावे आणा. आपणच आरोप करायचे आणि पुरावे नसल्याने समोरच्यालाच निर्दोषत्व सिद्ध करायला सांगायचे ही केजरीवाली पद्धत जुनी झाली. पत्रकारांना, सत्तेत नसलेल्यांना किंवा अगदी मराठी संस्थळावर आपल्या पक्षाचा अजेंडा रेटवणार्‍या खर्‍या खोट्या आयडींना हे सगळे करण्याबाबत काय काय मिळत असावेत याबाबत अनेकांना अनेक संशय आहेत. हे ही खरे.

In reply to by मोदक

एक तर संशय म्हणजे आरोप नव्हे. आणि असे संशय व्यक्त करण्यासाठीच तर माध्यमे असतात. तुम्ही आमच्यावर संशय घ्यायचे, आम्ही तुमच्यावर हे चालतेच. आणि पक्षाचा अजेंडा संतप्त भक्तिभावाने कोण रेटते ते वेगळे लिहायला नको. आणि भाजपसुद्धा काही धुतल्या तांदळासारखा नाही. डाळ घोटाळे, व्यापम (हा तर अनेक खून पडलेला न भूतो न भविष्यति असा घोटाळा, यात एकटा भाजप नव्हता, तरीसुद्धा) वगैरे.. आरोप केलेला नाही याबद्दल ठाम. त्यामुळे तुमची आव्हानेबिव्हाने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही.

In reply to by राही

एक तर संशय म्हणजे आरोप नव्हे. आरोपाच्या पूर्वीची पायरी किंवा आरोप करण्याइतके पुरावे नाहीत पण धुरळा उडवायचा आहे म्हणून काढलेली पळवाट असे काही आहे का..? आणि असे संशय व्यक्त करण्यासाठीच तर माध्यमे असतात पैशांच्या मोहाने माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे हे माहिती होते पण असे सार्वजनिकरीत्या कबूल होईल असे वाटले नव्हते. असो. माध्यमे संशय व्यक्त करण्यासाठी नसतात तर माध्यमांचे काम "निरपेक्षपणे विचार मांडणे आणि कोणत्याही घडामोडींवर संतुलीत भुमीकेने व्यक्त होणे" असे असावे. अर्थात हे मी माझ्या अत्यल्प अनुभवावरून आणि कोणत्याही विचारधारेच्या दावणीला बुद्धी न बांधता बोलत आहे. तुमचे विचार वेगळे असतील तर मान्यच आहे. तुम्ही आमच्यावर संशय घ्यायचे, आम्ही तुमच्यावर हे चालतेच तुम्ही / आम्ही..?? मी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाहीये हो, तसेच कोणत्याही प्रकरणाचे पुरावे माझ्यापर्यंत गुप्तपणे पोहोचण्याची सुतराम शक्यता नसल्याने मी कधीही कोणताही संशय व्यक्त करत नाही. आणि भाजपसुद्धा काही धुतल्या तांदळासारखा नाही. डाळ घोटाळे, व्यापम (हा तर अनेक खून पडलेला न भूतो न भविष्यति असा घोटाळा, यात एकटा भाजप नव्हता, तरीसुद्धा) वगैरे.. या वाक्याचा संदर्भ कळाला नाही. आरोप केलेला नाही याबद्दल ठाम. त्यामुळे तुमची आव्हानेबिव्हाने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. मी आव्हान दिले आहे हे शोधून दाखवा बरं. तुम्ही खुलेपणाने संशय व्यक्त करत आहात म्हणजे तुमच्याकडे काहीतरी खास पुरावे असावेत म्हणून मी म्हटले आहे की "भाजपाने पैसे खाल्ले आहेत आहे असे छातीठोकपणे सांगत असाल तर पुरावे आणा" सांगोवांगीच्या गप्पा असतील तर तसे सांगा.

In reply to by राही

डाव्या लोकांचे जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप असतात, माहित आहे ना तुम्हाला? एकदा डावी विचारसरणी म्हटल्यावर दुर्लक्ष करावं.

In reply to by बोका-ए-आझम

सल्ल्याबद्दल धन्यवाद बोकाशेठ. याबाबत मी क्लिंटन ला आदर्श मानतो, डावे दिसले की त्यांच्या विचारांमधील दांभीकता उघड पाडण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्याकडे पळवाटा तयार असतातच पण "इथे विरोध होतो आहे" इतकी साधी गोष्टही त्यांना पळ काढायला पुरेशी असते. दुर्लक्ष केले की "समोरच्याने उत्तर दिले नाही म्हणजे माझेच बरोबर" आणि उत्तर दिले की "बघा बघा किती असहिष्णुता वाढली आहे किंवा "अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी" वगैरे अपेक्षित रूळावरून गाडी जाईलच त्यामुळे आजिबात दुर्लक्ष करू नये.

In reply to by मोदक

पळ वगैरे काढण्याचा प्रश्नच नाही. पण तेच तेच मुद्दे उगाळले जाऊ लागले आणि तर्कहीन आर्ग्युमेंट होऊ लागले की प्रतिसाद लिहिण्याचाही कंटाळा येतो. मग गप्प राहावेसे वाटते इतकेच. मला इथे काही युद्धबिद्ध खेळण्यासाठी यायचे नसते. म्हणून तर कमीत कमी वावर असतो. पैशाच्या लोभाने माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे हे (तुम्हाला/सगळ्यांना) माहीत होते पण इथे (माझ्या प्रतिसादात) सार्वजनिकरीत्या कबूल होईल असे (तुम्हाला) वाटले नव्हते, हा तुम्ही काढलेला अर्थ वा तुम्ही व्यक्त केलेले मत माझ्या प्रतिसादातल्या कोणत्या वाक्यावरून होऊ शकते? आणि या माझ्या प्रतिसादात तुम्हाला दांभिकता कुठे दिसली? 'बघा बघा किती असहिष्णुता....' वगैरे टाइपचे प्रतिसाद मी कधी दिले? आणि 'डावे दिसले की त्यांच्या विचारातली दांभिकता उघड पाडण्याचा प्रयत्न करायचा' हा तुमचा अजेंडा असेल तर (असू शकतो, माझे त्याबाबत काहीही मत नाही) तुमचा वरील प्रतिसाद त्यानुसार नाही कारण त्यातून कोणतीही दांभिकता उघड झालेली नाही. म्हणून टंकाळा येतो.

इतर ५६ विषय सोडून राज ठाकरेंनी "चित्रपट" हेच क्षेत्र गुंडगिरी दाखविण्यासाठी का वापरले ? कारण इथे "वेळेला" महत्व आहे.
मुद्दा समजून घ्या. हे आंदोलन राज ठाकरे यांच्याशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केले आहे. मला वाटतं ते त्यांच्याशी संबंधितच क्षेत्र असावं.
मनसेचे आमदार आहेत १. अश्या पक्षाची धमकी फार तर पोलीस अधीक्षकांच्या पातळीवर हाताळली गेली पाहिजे होती
आमदार असणे हेच एखाद्या पक्षाच्या ताकदीचं मोजमाप असू शकतं काय? आता या घडीला तरी रस्त्यावर सगळ्यात जास्त पाठिंबा असलेले नेते राज ठाकरे नाहीयेत का? मला असं वाटतंय कि तथाकथित खंडणीचा पैसा सैनिक कल्याण निधीला नको हे मुळी दुखणंच नसून मनसे हे दुखणं आहे. अवांतर : सध्या सैनिक कल्याण निधीला जात असलेला सगळा पैसा खातरजमा करून घेतला जात असेल का (म्हणजे तो भ्रष्टाचारातून आलेला वगैरे नाही असा)? तो पैसा सैनिक कल्याण निधीत जातोय यापेक्षा खरंतर दुसरा आनंद नाही.
इथे काँग्रेस वाला मुख्यमंत्री असता तर त्याने करण जोहर कडून १० कोटी घेतले असते १ राजला दिला असता ९ आपण ठेवले असते आणि चित्रपट शांत पाने लावू दिला असता आणि सार्वजनिक रित्या लोकांचा प्रक्षोभ टाळला असता. हे १० कोटी नंतर कारण जोहर ने तिकिटांचे दार वाढवून वसूल केले असते.
व्वा! हे लॉजिक कशावरून बुआ? कि उगाच काहींच्या काही! म्हणून म्हणतो, दुखणं हे खंडणी नाही, दुखणं हे मनसे आहे!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

> मुद्दा समजून घ्या. हे आंदोलन राज ठाकरे यांच्याशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केले आहे. मला वाटतं ते त्यांच्याशी संबंधितच क्षेत्र असावं. 1 पक्ष असलेल्या पक्षाची कसली चित्रपट सेना ? आणि हिंसा सोडून इतर कुठली नीती ह्यांची होती ? होती हिम्मत तर बहिष्कार टाकायचा. > आमदार असणे हेच एखाद्या पक्षाच्या ताकदीचं मोजमाप असू शकतं काय? १००% होय. आणखीन काय माप आहे ? गुंडगिरीची प्रवृत्ती ? > सध्या सैनिक कल्याण निधीला जात असलेला सगळा पैसा खातरजमा करून घेतला जात असेल का (म्हणजे तो भ्रष्टाचारातून आलेला वगैरे नाही असा)? तो पैसा सैनिक कल्याण निधीत जातोय यापेक्षा खरंतर दुसरा आनंद नाही. खंडणीचा पैसा सैनिकांना द्या नाहीतर आणखीन कोणाला द्या. चोरी ती चोरी आहे. तुमची मुले किडनॅप करून मिळणार पैसे सैनिक निधीला दिला तर चालेल काय ? > व्वा! हे लॉजिक कशावरून बुआ? कि उगाच काहींच्या काही! म्हणून म्हणतो, दुखणं हे खंडणी नाही, दुखणं हे मनसे आहे! १ आमदार असलेल्या पक्षाचे काहीही दुखणे नाही. देवेंद्र फडणवीस सारख्या मुख्यमंत्र्याने ज्याच्या कडून अनेक अपेक्षा होत्या त्यानी फुटकळ गुंडा पुढे सपशेल शरणागती पत्करून दलाली करावी हे पटले नाही. मूळ दुखणे हेच आहे. मनसे किंवा राज ठाकरे माझ्या खिजगणतीत सुद्धा नाही.

In reply to by साहना

>>1 पक्ष असलेल्या पक्षाची कसली चित्रपट सेना ? आणि हिंसा सोडून इतर कुठली नीती ह्यांची होती ? होती हिम्मत तर बहिष्कार टाकायचा. परत तेच, फक्त द्वेष. माझ्या माहितीनुसार मनसे चित्रपट सेना हि सभासदांच्या संख्येनुसार सर्वात मोठी चित्रपट संघटना आहे! >>१००% होय. आणखीन काय माप आहे ? गुंडगिरीची प्रवृत्ती ? फक्त तुम्ही म्हणाल म्हणून सगळे खरे असे नसते! गुंडगिरीची प्रवृत्ती म्हणजे नेमकं काय? >>खंडणीचा पैसा सैनिकांना द्या नाहीतर आणखीन कोणाला द्या. चोरी ती चोरी आहे. तुमची मुले किडनॅप करून मिळणार पैसे सैनिक निधीला दिला तर चालेल काय ? हि तुलना योग्य वाटते तुम्हाला? मनसे ने तसे केले तर तो नक्कीच गुन्हा आहे आणि कोर्ट आहे त्यासाठी! तुमचा द्वेष व्यक्त करण्यासाठीचा हा कपोलकल्पित मुद्दा लागू होत नाही इथे. >>मनसे किंवा राज ठाकरे माझ्या खिजगणतीत सुद्धा नाही. हाहाहा! परत परत फुटकळ गुंड म्हणालात तरी तुम्ही परिस्थिती जाणतच असाल असे गृहीत धरतो! तुम्ही हा राग व्यक्त करत आहात कारण फक्त तुमचं मनसे बद्दलचं फुटकळ असं मत आणि मुख्यमंत्रांचं परिस्थितीचा आढावा घेऊन महत्व देण्याचं मत जुळत नाही. खरंतर तुमच्या या वाक्यावरूनच कळतंय कि तुमच्या खिजगणतीत कोण आहे आणि कोण नाही.

पाकिस्तानी कलाकारांना येथे काम करू द्यावे हे तात्विक दृष्ट्या बरोबर असले तरीही पाकिस्तानी कलाकारांच्या वाचून यांचे का आणि काय अडते? इतर परदेशी कलाकारांबाबत भारतीय नागरिकांची आत्यंतिक भूमिका नाही तर "फक्त पाकिस्तानी" कलाकारांबाबत आहे याचे कारण प्रत्येकाला माहीत आहे. हे "बाहेरून" येणारा पैसे बोलतो आणि "फिल्मी" लोकांचा पैसा हाच देव आहे. जसे जिहादी धर्मासाठी काहीही करायला तयार असतात तसेच हे फिल्मी लोक पैशासाठी काहीही करायला तयार होतात. मुळात मी सिनेमे कमीच पाहतो परंतु सलमान खान आणि शाहरुख खान यांचे "कर्तृत्व" पाहिल्यावर मी आणि माझे कुटुंब यांनी त्यांच्या सिनेमावर पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे. पाकिस्तानी कलाकारांबाबत प्रश्नच येत नाही. मी याच कारणासाठी "हिना" सुद्धा पहिला नाही. यांचे सिनेमे किंवा पाकिस्तानी कलाकार असलेले सिनेमे पाहिले नाही तर काही जीव जात नाही. प्रत्येक गोष्ट कायदेशीर असली तरीही नैतिक दृष्ट्या बरोबर असतेच असे नाही. सरकार कायद्यावर बोट ठेवून चालते त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना प्रवेश नाही हे म्हणणे त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यामुळे कठीण जात असावे. ( मला नक्की माहिती नाही हे मी आत्ताच नमूद करू इच्छितो). अगोदर झाले ते झाले. परंतु आपले इतके सैनिक( आणि आपले सीमेलगतच्या नागरिक आणि त्यांची गुरे/ पाळीव प्राणी) पाकिस्तान कडून मारले गेल्यावर जर श्री शाम बेनेगल याना बेशरम पणे परत पाकिस्तानी कलाकारांना घ्यावेसे वाटत असेल तर देशद्रोही म्हणून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यासाठी मी पाठिंबाच देईन. माझी देशभक्तीची व्याख्या चूक असेल एकांगी असेल तरीही ती कायद्याच्या आणि नैतिकतेच्या चौकटीत आहे.

मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हणेपर्यंत इथे संडास झ्हाली आहे . त्यामानाने टीवटीव हा सौम्यच शब्द म्हणावा लागेल . असेच आवांतर : आपण कुठल्या पार्टी ला समर्थन करतो त्यावरून आपली वैचारिक पात्रता कळते काय ?

In reply to by सुज्ञ

@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, @मृत्युंजय भाऊ, इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोय, इथे तुमचा निरक्षीर विवेक दिसलेला नाही असे सखेद आश्चर्याने नमूद करावे वाटते आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू थोडा वेळ तरी द्यायचा कि. पाच सात मिनिटांत लगेचं सगळे प्रतिक्रिया देतील असे कसे होईल?