चंदबरदाई
चंदबरदाई हे नाव तुम्हाला माहिती आहे का ?
स्वामीनिष्ठेचं आणि मैत्रीचं असं उदाहरण मानव इतिहासात फक्त छत्रपती संभाजी आणि कवी कलश यांच्या व्यतिरिक्त कुठेच पाहायला नाही. उत्तर भारतात ही कथा खूप प्रसिद्ध आहे पण आपल्याकडे खूप कमी लोकांना याची माहिती आहे. त्यासाठीच ही माहितीपर कथा आपल्यासाठी देत आहे.
चंदबरदाई हा दिल्लीचे राजे पृथ्वीराज चव्हाण तिसरे यांचा बालमित्र आणि त्यांच्याच दरबारातील राजकवी व मुख्य सल्लागार होता. त्याने पृथ्वीराजावर “पृथ्वीराज रासो” हा हिंदी काव्यग्रंथ लिहिला जो नंतर त्याच्या मुलाने पूर्ण केला. तो गणित आणि ज्योतिषशास्त्रात पारंगत होताच पण वेश बदलून बेमालूमपणे हेरगिरी करण्यात देखील पटाईत होता. तुम्ही विविध हेरगिरीच्या आणि जेम्स बॉन्डच्या खूप कथा वाचल्या असतील पण चंदबरदाईची सर कशातच नाही. इ. स. ११४९ ते १२०० हा त्याचा जीवनकाळ. योगायोग असा कि याचा आणि पृथ्विराजांचा जन्म एकाच दिवशीचा. पृथ्वीराज हे धनुर्विद्येत अत्यंत प्रवीण होते व ते शब्दभेदि बाण चालवीत. पृथ्वीराज चव्हाण हे राजा सोमेश्वरनंतर गादीवर बसण्याआधी डोळ्यांवर पट्टी बांधून चंदबरदाई ने सांगितलेल्या ठिकाणी अचूक बाण सोडत.
कन्नोजचे राजा जयचंद हे दिल्ली राज्याचे शेजारी. दोघेही राजपूत आणि टोकाचे शत्रु. राजा जयचंद याची कन्या “संयुक्ता” व राजा पृथ्वीराज दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शत्रूच्या घरात मुलगी देणे जयचंदला शक्य नव्हते. त्याने संयुक्ताचे स्वयंवर आयोजित केले. त्यात चंदबरदाई हा राजपूत राजा व पृथ्वीराज चव्हाण त्याच्या सेवकाच्या रुपात या स्वयंवराला दाखल झाले. स्वयंवरादरम्यानच संयुक्ताला पृथ्विराजाने जयचंद समोरून पळवून नेले व नंतर लग्न केले. अपमानित जयचंदने पृथ्विराजांचा जुना शत्रू अफगाणिस्थानमधील मोहम्मद घौरीशी करार करून पृथ्विराजांचा पराभव केला. तसं पाहिलं तर याआधी या दोघांने एकटे लढून पृथ्वीराज्यांकडून पराभव पहिला होता पण हि अभद्र युती त्यांना पृथ्विराजास हरविण्यास कामी आली. पृथ्वीराज घौरीच्या हाती लागले. ह्याच घौरीला पृथ्विराजाने अभय दिले होते पण त्याने अफगाणिस्थान मधील “गझनी” येथे कैदेत ठेऊन पृथ्विराजाचे डोळे काढून घेतले. आता सुरु होते चंदबरदाईची कमाल. चंदबरदाईने खडतर प्रवास करून गझनी गाठले. तेथील बाजारात छोटे मोठे खेळ व जादू करून लोकांचे तो मनोरंजन करू लागला.नंतर त्याने जादुद्वारे सोन्याचे नाणे बनवून लोकांना दिले. यामुळे संपूर्ण गझनीमध्ये ही वार्ता वणव्याप्रमाणे पसरली आणि लवकरच राजा घौरीच्या कानापर्यंत पोहोचली. त्याने या अवलियाला त्वरित पकडून आणायचे फर्मान सोडले. अफगाण हा प्रदेश वेगवेगळ्या आदिवासी टोळ्यांचा. मुळचेच हे लोक अशिक्षित व अंधश्रद्धाळू. घौरी त्यांचाच राजा. तो तर कमालीचा अंधविश्वासू. चंदबरदाईने राजाला दरबारासमोर अनेक जादू म्हणजेच हातचलाख्या व गणिती आधार असलेले प्रयोग सादर केले.राजा व दरबार हे पाहून चकित झाले व ही व्यक्ती दैवी आहे यावर त्यांचा पक्का विश्वास बसला. त्यातच भारी गम्मत म्हणजे चंद बरदाईने मी सूर्य देखील झाकू शकतो असे घौरीला सांगून प्रयोगाची तिथी आणि वेळ पण सांगून टाकली. आधी सांगितल्याप्रमाणे चंदबरदाई हा जोतिषशास्त्रात पारंगत. जी तिथी आणि वेळ दिली ती होती सुर्याग्रहणाची. संपूर्ण प्रजेत कुतूहल पसरले.मग काय सर्व उपस्थितांसमोर व खूद्द राजा घौरी समोर चंदबरदाईने ध्यान मुद्रा धारण केली व हळूहळू चंद्राच्या सावलीने सूर्य झाकायला लागला. ओ....हो .....मग काय “ सुभानल्ला, सुभानल्ला !!!!!” म्हणत संपूर्ण राज्याने चंदबरदाईला डोक्यावर घेतले. राज्याच्या गळ्यातला तर ताईतच. घौरीने त्याला राज्यातील विषेश व्यक्तीचा दर्जा दिला ज्याला आजकाल आपण व्ही.आय.पी. म्हणतो ते. घौरीला वाटलं असा “खुदा का फरिश्ता” आपल्या सोबत असेल तर आपण कुठलीही लढाई सहज जिंकू. इतिहासातील पात्रांबद्दल असं बोलू नये पण घौरीला चंदबरदाईने आपल्या हुशारीच्या बळावर “मूर्ख” बनविले होते.
आता विषेश दर्जा मिळाल्याने चंदबरदाई कैद्यांच्या कोठडी सोडल्यास संपूर्ण राज्यात कोठेही विना परवानगी फिरू शकत होता पण त्याचे काम कैद्खान्याशीच होते. त्याने युक्तीकरून कैद्यांच्या कोठडीजवळ प्रवेश मिळवलाच. त्याला घाई झाली होती राजा पृथ्विराजाची भेट घेण्याची. राजा जिवंत तरी आहे कि नाही याची पण खबर मिळत नव्हती. कैदखान्यात चंदबरदाई अल्लाचे भजन गुणगुणत जात असताना पृथ्वीराजाने त्याचा आवाज ओळखला व त्याने आवाज दिला. चंदबरदाई राजाला पाहून हळहळला. खूप हाल आणि वेदनेत पृथ्वीराज होते. जिवंतपणी डोळे काढणे हा क्रूरपणा घौरीने केला होता आणि तेही त्याचे ज्याने आपल्याला युद्धात पराभानंतर प्राणाचे अभय दिले होते.याहूनही क्रोर्य औरंग्याने छत्रपती संभाजी सोबत केले होते याची आठवण आपल्याला अजून अस्वस्थ करते. तर राजाचे हे हाल पाहून चंदबरदाई भयंकर भडकला पण पर्याय नव्हता. पृथ्विराजाच्या शौर्याची परिसीमा तेंव्हा झाली ज्यावेळी त्याने चंदबरदाईकडे सुटकेची नव्हे तर अपमानाचा बदला घेण्याची इच्छा यक्त केली, परत राजा होण्याची नव्हे तर ज्याने राज्याचा अपमान केला त्याला यमसदनी (?) धाडायचा निश्चय केला.
काही दिवसांनी चंदबरदाईने घौरीला धनुर्विद्येत श्रेष्ठ सैनिक कोण आहे याची परीक्षा घेण्याची विनंती केली व घौरीने ती मान्य केली. राज्यभरातून अनेक धनुर्धर येऊन आपली विद्या दाखवून गेले. त्यात घौरीचा एक सैनिक अत्यंत तरबेज होता, त्याने त्याच्या विद्येने राजा घौरीसह सर्वांचे मन जिंकले. पण आपल्या चंदबरदाई ने काही तिळमात्रदेखील त्या सैनिकाचे कौतुक केले नाही. आता असं केल्यावर कुठल्याही राजाला अपमानित वाटणारच ना ? तेच घौरीच झालं. तो कोड्यात पडला व चंदबरदाईला त्याच्या अश्या वागण्याबद्दल विचारले. चंदबरदाईची चाल ठरल्याप्रमाणे यशस्वी होत होती. त्याने घौरीला सांगितले कि तुझ्या कैदेत असलेल्या एक कैदी शब्दाभेदी बाण सोडतो तुम्ही त्याला पण एक संधी द्या व तुमच्या सैनिकापेक्षा तो श्रेष्ठ आहे कि नाही हे पहा. घौरी साहेब चटकन मंजूर झाले कारण पृथ्वीराजाला त्याने दृष्टिहीन केले होते. झालं तर म पृथ्वीराजाला आणण्यात आले. सर्व धनुर्विद्येतील सैनिक, राज्यातील व दरबारातील प्रतिष्ठित मंडळी हा खेळ पाहण्यासाठी आधीच जमली होती त्यात नुकतेच ज्याला हरवले तो आपला कैदी पृथ्वीराज येणार म्हणल्यावर बघ्यांमध्ये अजूनच उत्साह आला. हा सर्व प्रकार राजे घौरी आपल्या सज्ज्यातून (मोठी खिडकी) पाहतच होते. चंदबरदाई या क्षणाची न जाणो किती दिवसांपासून वाट पाहत होता. अंध पृथ्विराज्याच्या हातात धनुष्यबाण दिला गेला. तो एकंदरीत बाणाचा व परिसराचा अंदाज घेतच होता तेव्हड्यात त्याच्या कानावर ओळखीचे शब्द पडले ..... "चार बांस, चौबीस गज़, अंगुल अष्ठ प्रमाण, ता ऊपर सुलतान है, मत चूको चौहान" पृथ्वीराज चव्हाणाने घेतले धनुष्य हाती व जो बाण सोडला तो सरळ घौरीच्या नरड्यात आणि घौरी साहेब क्षणार्धात अल्ला ला प्यारे झाले...........आणि चंदबरदाईने आपल्या हुशारीने आपल्या राजाचा व राज्याचा बदला घेण्याचा निश्चय तडीस नेला.
सगळीकडे गोंधळ उडाला व चंदबरदाईचे खरे रूप घौरीच्या सैन्याला कळाले. त्यांने तत्काळ पृथ्वीराजाला आणि चंदबरदाईला एकाच कोठडीत टाकले. यापुढे आता आपले काय होणार हे दोघांना माहित होते. चंदबरदाईला आपल्या स्वामीची सुटका हवी होती आणि राजासोबत स्वतःची देखील. या दोघांचा जन्म एकाच वेळचा आणि दुर्दैवाने मृत्यू देखील. कैदेतूनतर सुटका शक्य नव्हती त्यामुळे दोघांनी कैदेतच एकमेकांना मारून सुटका स्वतःची सुटका करून घेतली.एक शूरवीर राजा आणि एक स्वामिनिष्ठ सैनिक किंवा दोन जिवलग मित्रांची हि कथा इथेच संपली.
धन्यवाद !!!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाह!!!
खास .....
छान कथा.
जबरदस्त कथा.
जबरी कथा अन भयानक इतिहास !
सुंदर ओळख करुन दिलित. धन्यवाद
ह्म्म
हो मला पण प्रथम तेथूनच कळाले.
भारीच की!
अवश्य
रोचक
+१
जबरदस्त आहे ही कथा!
कथा
रोचक
मी लहानपणी ही कथा वाचली होती.
आमच्या वडीलांनी लहानपणी काही
जबरदस्त कथा !
जबरदस्त कथा आहे ही.
चांदबरदाई _____/\_____
कथा आवडली.
विषय अजून फुलवता आला असता,
आपले निरीक्षण मान्य आहे
पॄथ्वीराज चौहान
ये भी क्रेक्ट है
छान कथा
छान कथा
खरी कथा आहे का?
इतिहासतज्ञांच्या मताप्रमाणे
मिथक आहे
चार बांस , चौबिस गज, अंगुली
चार बांस , चौबिस गज, अंगुली
...
क्या बात है.
मस्त ; पण काल्पनिक
+११
बरोबर.
सहमत आहे
धन्यवाद !
हम्म ओके
लोककथेमधून लोकभावना
+१
+१००
लोकभावना आणि इतिहास
प्रचेतस तुम्ही माझं अर्ध
इतिहास हा नेहमी तटस्थ असतो,
+१११
मनराव, ह्या प्रतिसादाकरता
मस्त प्रतिसाद.
म्हणजे राम, हनुमान, रावण कोणी