जगलो आहे
मनसोक्त डुंबावेसे वाटले पण
काठावरतीच जगलो आहे
आख्खी भाकर तर सोडाच
चतकोर वाट्यातच जगलो आहे
नुसतेच पाहणे, वास कसला घेतो
गुलाबाच्या काट्यातच जगलो आहे
गुरू त्यांचे प्रबळ होते
राहू केतूच्या कचाट्यात जगलो आहे
सुख एवढेच निखारे नव्हते
गरम फुफाट्यात जगलो आहे
राजेंद्र देवी
काव्यरस
वाचने
1183
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
पण
बुवा आता विडंबनाची जिलबी
In reply to पण by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद...
In reply to बुवा आता विडंबनाची जिलबी by भालचंद्र_पराडकर
धन्यवाद...