Skip to main content

मी हिंदू असूनही हिंदू धर्माची बाजू का घेतो... बरीच कारणे...

लेखक वटवट यांनी शुक्रवार, 14/10/2016 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार... कालच मी इथे " मी हिंदू असूनही हिंदू धर्माविरोधात का लिहितो? -- 4 कारणे" ह्या नावाचा लेख (?) वाचला... हिंदू धर्माचा, हिंदू इतिहासाचा, काडीचाही अभ्यास नसताना उगाच आपण कोणी खूप थोर विचारवंत वगैरे आहोत आणि माझ्या मताने हा देश बदलणार आहे असा सूर वाटला (अर्थात मी चुकीचा असेनही). त्या संदर्भात हे माझे चिंतन... "मला असं वाटतं कि धर्मनिरपेक्षता ही अत्यंत निरर्थक गोष्ट आहे जी कधीच वास्तवात उतरू शकत नाही... कधीच नाही" हे वाक्य मी खूप जबाबदारीने बोलत वा लिहीत आहे. मुळात पूर्ण जगात धर्मनिरपेक्ष व्यवस्था कोठे असेल का ही माझ्या मनात शंका आहे.. सर्व शक्तिमान राष्ट्रेसुद्धा स्वतःला ख्रिश्चनराष्ट्रे म्हणवतात. हिंसक राष्ट्रे आणि तेलकट राष्ट्रे स्वतःला इस्लामी राष्ट्रे म्हणवतात. उरलो नेपाळ आणि आपण. नेपाळ आपल्या महाराष्ट्रापेक्षाही छोटा.. बाकी ते बाली आणि मौरिशस आहेत पण ते लिंबूटिम्बु.... उरलो आपणच... आपल्यालाच का सेक्युलर व्हायची घाई? मुळात सेक्युलर हाही शब्द मूळ घटनेत नाही... नंतर टाकला गेला (४२ वी घटनादुरुस्ती). मुळात मलातरी सध्याच्या परिस्थितीत सेक्युलर हा शब्द हिंदूंविरोधीही असाच घेतला जातो असं वाटतं. म्हणून मी ह्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे (कोण्याही धर्माच्या नाही) तरी बरं धर्मनिरपेक्षता आणि विकास ह्याचा काडीचाही संबंध नाही... (असल्यास उदाहरणासहित दाखवावा) म्हणून मला हिंदू धर्माची बाजू घ्यावी वाटते... कारण नं १ १९४७ नंतर बाबासाहेबांना हिंदू कोड बिल आणायचं होतं, जे फक्त हिंदूंनाच लागू होणार होतं.. (म्हणजे हिंदू, जैन, बौद्ध, शीख वगैरे वगैरे). सर्वांनी विरोध केला... कारण फक्त हिंदूच का... सर्वांनाच लागू करा... पण बाबासाहेबांना फक्त हिंदू समाजाची काळजी होती, (मुस्लिमांची नव्हती बहुतेक). बाबासाहेब एव्हढे आग्रही होते ह्या बिलाबद्दल कि त्यांनी स्वतः ह्या बिलाबद्दल असं म्हटलं होतं कि, जर कोणी त्यांना विचारलं कि त्यांचं भारत देशाप्रती त्यांचं सगळ्यात स्पृहणीय कार्य कुठलं तर मी सांगेन कि हिंदू कोड बिल म्हणून... पण राजेंद्रप्रसादांनी विरोध केला, राजीनामा द्यायची धमकी दिली. नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं उगी राजकीय अस्थिरता नको म्हणून नेहरूंनी ते पुढे ढकललं... नंतरच्य निवडणुकीत पुन्हा अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच आलं. आणि नंतरच्या काळात हे हिंदू कोड बिल चार भागात विभागून लागू करण्यात आलं. १.हिंदू मॅरेज ऍक्ट २. हिंदू मायनॉरिटी अँड गार्डीयनशिप ऍक्ट ३. हिंदू एडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट आणि ४.हिंदू सकशेशन ऍक्ट असे ते चार ऍक्टस... हिंदू समाज खूप सुधारला. त्यातल्यात्यात हिंदू स्त्रियांच्या परिस्थितीत खूप चांगला आणि अमूलाग्र बदल घडवला ह्या बिलाने.... ह्यात कुठलाच वाद नाही... अगदी मान्य... पण फक्त हिंदू समाजच का? आणि इतर समाजासाठी तरतूद केल्यासारखी दाखवणे म्हणजे कलम ४४, भारतीय राज्यघटनेचे (वादग्रस्त युनिफॉर्म सिव्हिल कोड)... पुढच्या सरकारांवर ही जबाबदारी टाकली गेली... खरंतर आधीच ते शक्य होतं... कारण एकतर काँग्रेस ला पर्याय नव्हता... आणि बरेच कट्टर आणि धर्मान्ध मुस्लिम जिनांमागे पाकिस्तानात गेले होते... तेंव्हाच जर मुस्लिमांसाठी सुद्धा हे बिल लागू केलं असतं तर??? त्यांचं वाईट झालं असतं? ते तसं नं करण्यामुळे त्त्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढली. आणि आज त्यांच्या खर्चाचा बोजा आपण टॅक्स भरून उचलत आहोत... तेंव्हा हे बिल सर्व धर्मांना नं लागू करून त्यावेळेसच्या सरकारनं ह्या देशाचं सर्वार्थानं आणि अपरिमित, कधीही भरून नं निघणारं नुकसान केलं आहे. दरवेळेस सुधारण्याचा आणि इतरांची घाण काढण्याचा मक्ता हिंदूंनीच का घ्या बुवा??? कारण नं २ मध्ये एका फेसबुकपोस्ट वर वाचलं होतं कि ह्या भारतात फक्त तिघांच्याच मरणाची दाखल घेतली जाते. एक तर दलित, मुस्लिम किंवा जनावरे... हिंदूंच्या मरण्याची दखल कोणीच घेत नाही. आणि तसेच आहे वास्तवात सुद्धा... इतरांच्या मरण्याची दखल घेणाऱ्यांना विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष म्हटलं जातं. आणि हिंदूला जर कोणी मारलं आणि जर कोणी त्याबद्दल आवाज उठवला तर त्याला हिंदुत्ववादी म्हणून हिणवलं जातं, हेतुपुरस्सर.... कारण नं ३ भारताच्या घटनेत कलम २९ आणि ३० मायनॉरिटीला काही विशेष अधिकार देतात त्यांची संस्कृती अबाधित आणि जपली जावी म्हणून. तोच न्याय जर जगाला लावला तर हिंदू हेही अल्पसंख्यांकच आहेत.. तर आम्ही जर आमची संस्कृती जपायला सुरु केलं तर इतरांच्या पोटात का दुखावं?? आणि सेक्युलरीझमच्या नावाखाली हिंदुधर्माचा (अर्थात कोणत्याही धर्माचा) बळी देणे चुकीचे आहे असं मला वाटतं. कारण ४ मी जर माझ्याच घरावर टीका करत असेन, सतत इतरांच्या घराकडे दुर्लक्ष करत आणि तीच जर कसोटी असेल माझ्या निरपेक्षतेची तर ह्या असल्या निरपेक्षतेला आपण मधलं बोट दाखवतो, आणि तेही शेणात बुडवून... हिंदूंच्या बाबतीत हे असंच होत आलेलं आहे. हिंदूंवर टीका करणारे इतर धर्माच्या बाबतीत सोयीस्कर मौन पाळतात.. (अर्थात जे मुळात चुकीचं आहे त्याचं कधीच समर्थन होत नाही, कितीही प्रयत्न केला तरीही) निरपेक्ष लोकांनी सर्व बाजू लक्षात घ्याव्यात.. तसं नं करता उठसुठ हिंदू धर्माचं पायपुसणं करण्याच्या आपण विरोधात आहे. कारण ५ दहशतवाद आणि इस्लाम ह्यात काहीच संबंध नाही. दहशतवादाला धर्म नसतो असे म्हणणाऱयांनीच "हिंदू दहशतवाद" किंवा "भगवा दहशतवाद" ही संज्ञा रूढ केली, कुठलाही पुरावा नसताना. आजही ते प्रकरण खितपत पडलंय.. आणि ना शेंडा ना बुडखा... काही कुत्र्यांच्या छत्र्या "भगव्या दहशतवादाच्या" नावानं बॉम्ब मारत आपल्या पोळ्या शेकून घेत असतात.. आणि त्यांचा टी आर पी वाढवून घेत असतात. कारण ६ माझ्या धर्माने कधीही धर्मप्रसारासाठी कोणावर आक्रमण वा अत्याचार केल्याचे ऐकिवात नाही. कोणी ह्याच्यामागची कितीही कारणे द्यावीत तरी होय माझा धर्म सर्वात सहिष्णू आहे. मग माझ्या ह्या धर्मावर कोणी कसलीही माहिती नसताना किंवा अगदीच जुजबी माहिती असताना टीका केल्यावर माझं रक्त पेटतं... कारण ७ माझ्या धर्मात काही अनिष्ट रूढी, प्रथा आहेत. त्यांचं समर्थन मी अजिब्बात करत नाही. त्या नक्कीच काढून टाकल्या पाहिजेत. पण त्या काढून टाकताना हिंदू समाज विचारात घेतला जावा. हिंदू धर्म नाही. कारण धर्म हा रूढी आणि परंपरा ह्यापासून बर्याचदा वेगळा असतो. त्या काढून टाकल्यामुळे हिंदू धर्माला काहीच अडचण नसते. कायदा हा लवचिकच असावा. त्याप्रमाणे धर्म पण लवचिकच असावा ह्या मताचा मी आहे. काळानुसार बदल व्हावेच. ज्याप्रमाणे आपल्या घटनेमध्ये आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त वेळा घटनादुरुस्ती झालीये. पण ती करताना कधीही घटनेवर टीका करत झालेली नाही. हिंदू धर्माच्या बाबतीत मात्र असे होताना दिसत नाही. काही अनिष्ट प्रथेमुळे पूर्ण हिंदू धर्माला जाणूनबुजून लांच्छन दिले जाते. ते पूर्णपणे चुकीचे आहे. कारण ८ सध्यातरी एव्हढीच कारणे... अजून सापडल्यास टाकेन अजून... बाकी तथाकथित पुरोगाम्यांचे स्वागत...

वाचने 21584
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

मुस्लिमानी पर्सनल लॉ त्यांच्या पुस्तकानुसार होतील असे सांगितले. हिंदुंच्या बाबतीत पर्सनल लॉचे कोणते सर्वमान्य होउ शकणारे पुस्तकच नसल्याने बाबासाहेबाना कायदे लिहावे लागले. यात मुसलमानांचा काय दोष ?

In reply to by chitraa

मुस्लिमानी पर्सनल लॉ त्यांच्या पुस्तकानुसार होतील असे सांगितले.
यातले विचारमोती इथे टाका जरा मिपा काफरांना ज्ञानामृत दिल्याचे पुण्य मिळेल आणि तुम्हालाही अल्लाची मेहेरबानीने मिपावर पुन्हा पुन्हा जन्म घेता येईल.

In reply to by chitraa

कुठल्याही देशात कायदा हा नेहमीच धर्मापेक्षा मोठा असावा नाहितर त्या देशाचा पाकिस्तान होतो.आपले नागरिकत्व एक आहे गिता-बायबल-कुराणातील चांगल्या गौष्टी जरुर घ्याव्यात. आणी वाईटाचा त्याग करावा.

In reply to by औरंगजेब

चित्रा ताई मोड ऑन: तुमच्या गांधीबाबाने दिली ना फाळणी करून मग त्यात गरीब बिचाऱ्या पाकिस्तान्यांचा काय दोष ? आणि होती त्या जिना मध्ये हिम्मत..मागितला त्याने वेगळा देश..तुमच्यात तेव्हढी हिम्मत नव्हती त्यात जिन्नांचा (आणि गरीब बिचाऱ्या पाकिस्तान्यांचा) काय दोष ? आणि काय वाईट झालंय पाकिस्तानच धर्माला देशापेक्षा जास्त महत्व दिलं म्हणून...अजूनही अरबो-खरबोनी पेट्या येतायेत अमेरिकेतून...तुमच्या मोदीला ते जमत नाही हयात गरीब बिचाऱ्या पाकिस्तान्यांचा काय दोष ? चित्रा ताई मोड ऑफ

In reply to by chitraa

मुस्लिम पर्सनल लॉचे पुस्तक आहे कि नाही हे महत्वाचे नाही... त्यातले जे काही कायदे आहेत ते योग्य आहेत कि नाही हे महत्वाचे आहे... जेंव्हा पार्लमेंट एखादा कायदा पास करतं तो योग्यच असतो हे गृहीतक असतं. तसं आपण धर्माच्या बाबतीत बोलू शकत नाही... (मी गृहीत धरतो कि आपण जो मुद्दा उपस्थित केलाय तो मनापासून केलाय...) अवांतर: बाबासाहेबांनी हिंदूंसाठी जो कायदा केलाय त्यासाठी वेदांचा, पुराणांचा आणि श्रुती आणि स्मृतींचा आधार घेतला होता... मुस्लिमांच्याही बाबतीत ते असं करू शकले असते

In reply to by chitraa

मोगा खान तुमचा दुटप्पीपणा संपत नाही. तुमचे "एकच" पुस्तक बऱ्याच काही "भयानक" गोष्टी शिकवते. जर कुराण/ शरियत प्रमाणेच सर्व करायचे तर मुसलमानांना चोरी केल्यास हात तोडायची किंवा बलात्कार केल्यास डोळे फोडायची शिक्षा शरियत मध्ये लिहिली आहे त्याप्रमाणेच दिली जावी असे समर्थन का करीत नाही? समान "नागरी" कायदा नको पण समान "गुन्हेगारी" कायदा हवा हा दुटप्पीपणा सोडा. हि चापलुसी किंवा हरामखोरी म्हणा सोडली पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

नागरी कायद्याबद्दल हिंदुनाही कायद्यानुसारच शिक्षा मिळतात , धर्मग्रंथानुसार नव्हे. हींदुंचा विवाह कायदाही हिंदु धर्मपुस्तकांवरच आहे. मंत्र , हार , सप्तपदी इ विधीअंतर्गत केलेल्या विवाहाला हिंदु विवाह म्हणुन मान्यता आहे.. तो काही फार नवीन कायदा करुन थोपलाय असे नाही. मुस्लिमाना त्यांच्या प्रथेनुसार विवाह अलाउड आहे. राहिता राहिला प्रश्न एक व चार यांचा.. त्याबाबत तुज आहे तुजपाशीमधल्या आचार्य विरुद्ध काकाजी असा सामना आहे. आचार्याने स्वतःच सगळी बंधने स्वतःवर घाल्युन घेतलीत आणि आता सगळी जवानी झिजून गेल्यावर मला तरी काकाजीसारखं करा किंवा काकाजीला तरी आचार्यासारखं करा , अशी रडारड सुरु आहे.

In reply to by chitraa

मुद्द्याला फाटे फोडू नका. मुसलमानांना शरियत प्रमाणे गुन्हेगारी कायदा का लागू करू नये. (चोरी केल्यास हात तोडणे इ.) याचे सरळ आणि सुस्पष्ट असे उत्तर द्या. नागरी कायदा शरियत प्रमाणे पण गुन्हेगारी कायदा भारतीय दंडविधान संहितेप्रमाणे(Cr PC) या दुटप्पी हरामखोरपणा बद्दल स्पष्ट बोला.

In reply to by सुबोध खरे

भारतिय संविधानातिल विवाह विषयक नियम बरेचसे हिंदू विचारसरणीचा पुरस्कार करतात. लोकशाहीत ईतर धर्मिंयांच्या चालिरींचा आदर केला पाहिजे. या न्यायानुसार शरीयतमधिल शिक्षा सर्व भारतियांना लागूकेल्यास मुस्लिम देखिल समान नागरी कायद्याला माण्यता देतिल.

लेखाशी अंत्यत सहमत आहे.

अर्थहीन यांना धन्यवाद. त्यांच्यामुळे हा लेख वाचायला मिळाला. :-)) कृपया हलके घ्या.

अर्धवट ज्ञानी आणि अज्ञानी यांमध्ये अर्धवट रावांचेच जास्त नुकसान होते. कोणत्याही धर्मावर किंवा प्रथेवर टीका करण्याआधी त्या गोष्टी मागील (शास्त्रीय ) कारणे जाणून घेतली पाहिजेत. जे दिसते तेच सत्य असते असे पण होत नाही. साधे उदा. देव आहे की नाही या विषयावर खूप मोठी चर्चा होऊ शकते. पण मंदिरात गेल्यानंतर जे समाधान मनाला मिळते ते कदाचित इतर कुठेच मिळत नाही ( माझा अनुभव ) म्हणजे देव दर्शन केल्याचे समाधान ..आता काही फुरोगामी याला अंधश्रद्धा म्हणतील ज्याचा त्याचा प्रश्न . भारतीय संविधानाने सर्वाना आवडीचा धर्म निवडायची अधिकार दिला आहे त्यामुळे जे चांगले आहे ते घ्या पटत नाही ते सोडून द्या. चुकीचे आहे ते इतरांना पटवायचा प्रयत्न करा पण जास्त शहाणपणा करू नका. ज्याला त्याला निर्णय घेऊ द्या. आजच्या जगात कोणीही कोणावरही कोणत्याही रूढी लादण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे धर्मांध आणि सेकुलर दोघांनाही एकच सांगणे " जगा आणि जगू द्या "

In reply to by amit१२३

> गोष्टी मागील (शास्त्रीय ) कारणे जाणून घेतली पाहिजेत. आता "शास्त्रीय" म्हणजे "ग्रहणाच्या वेळी अन्न ग्रहण करून नये असे नासा ने सांगितलेय" वाले शास्त्र कि आपले नेहमीचे विज्ञान ? फिनमन ह्यांचा ह्या "शास्त्रीय" विषयावरचा निबंध आठवला : http://calteches.library.caltech.edu/51/2/CargoCult.htm > पण मंदिरात गेल्यानंतर जे समाधान मनाला मिळते ते कदाचित इतर कुठेच मिळत नाही ( माझा अनुभव ) म्हणजे देव दर्शन केल्याचे समाधान फुरोगामी ह्याला अंधश्रद्धा म्हणतील पण पोपचे पाय धुवून तुम्ही ते पाणी पिलात तर त्यातील समाधानाला मात्र ते "ब्रम्हानंद" समजतील ते झाले त्यांचे थोथांड. पण माणसाला शांती अनेक ठिकाणी भेटते. भीमसेन जोशींच्या संगीतांत, दारूच्या अड्ड्यांत, गांजाच्या विडीमध्ये, बदनाम गल्लीमध्ये, वाळवंटाच्या शांततेत किंवा आपल्या बेडरूम मध्ये. त्यात शास्त्रीय अशास्त्रीय ह्याचा काहीही संबंध नाही.

आता काही फुरोगामी याला अंधश्रद्धा म्हणतील ज्याचा त्याचा प्रश्न पुरोगामी ऐकले होते. ढोंगी पुरोगामी ऐकले होते, दाढ्या कुरवाळणारे पुरोगामी देखिल ऐकले होते. मात्र हा "फुरोगामी" नामक प्रकार नवीनच वाटतोय.

In reply to by प्रसाद_१९८२

पुरोगामी मूळ शब्दाचा अर्थ "पुढे चालणारे" म्हणजे इतर समाजाच्या आपण दोन पावले पुढे चालण्याचा आव आणणारे लोक. फुरोगामी म्हणजे "तुम्ही व्हा फुडं आम्ही मागास्नी यतो" वाले लोक. म्हणजे जिथे काही "कॉस्ट" नाही तिथे आपले फुरगामित्वाचे तरंग नाचवणारे लोक.

> "मला असं वाटतं कि धर्मनिरपेक्षता ही अत्यंत निरर्थक गोष्ट आहे जी कधीच वास्तवात उतरू शकत नाही... कधीच नाही" मातेचे प्रेम सुद्धा १००% निर्भेळ असत नाही. काही कुमाता असतात तर माता एका मुलापेक्षा दुसऱ्या मुलाला जास्त प्रेम देतात. ह्याचा अर्थ मातृत्व म्हणजे निरर्थक आहे असे होत नाही. धर्माधारित कायद्यापेक्षा धर्मनिरपेक्ष कायदे जास्त चांगला समाज निर्माण करतात असे वर वर पाहता तरी नक्कीच वाटते. धर्मनिरपेक्ष कायद्यांचा फायदा होण्यासाठी सगळे काही १००% धर्मनिरपेक्ष असायला पाहिजे असे नाही. कुठल्या विषयांत कायदे सामान आहेत ह्यावर सर्व निर्धारित आहे. खाजगी बाबतीत जसे लग्न, घटस्फोट इत्यादी बाबतीत धर्माधारित कायदे असले तरी विशेष फरक पडत नाही पण कर-पद्धती, शिक्षण, व्यवसाय, सरकारी खर्चांतील वाटा, समूह बंदी, गुन्हेगारी कायदा इत्यादी बाबतीत जर धर्माधारित/जातआधारित कायदे डोकावू लागले तर मात्र परिस्तिथी कठीण आहे. अर्थांत भारत देशांत धर्मनिरपेक्ष कायदे नाहीत.भारतीय कायदे धर्म आणि जात आधारित आहेत. "व्यवसायाचा अधिकार" हा घटनात्मक अधिकार फक्त अ-हिंदू लोकांनाच आहे. हिंदू लोकांना नाही. पहा : https://twitter.com/mnshzz/status/686916453568651264 आज हिंदू म्हणून मी ख्रिस्ती टेक्सास मध्ये आरामात देऊळ बनवू शकते आणि "फक्त स्त्रियांना प्रवेश" अशी पाटी लावू शकते किंवा फक्त १४०+ IQ असणाऱ्या मुलांसाठी शाळा उघडू शकते. दोन्ही गोष्टी भारतांत फक्त हिंदू साठी बेकायदेशीर आहेत.

आज हिंदू म्हणून मी ख्रिस्ती टेक्सास मध्ये आरामात देऊळ बनवू शकते आणि "फक्त स्त्रियांना प्रवेश" अशी पाटी लावू शकते किंवा फक्त १४०+ IQ असणाऱ्या मुलांसाठी शाळा उघडू शकते. दोन्ही गोष्टी भारतांत फक्त हिंदू साठी बेकायदेशीर आहेत
Thanks that you are NRI. माणुसकी (लय काहि नाहि सार काहि येते ह्याच्यात) म्हणजे हिंदुत्व तोच माझा धर्म.

जत्रा मे फत्रा बिठाया, तिरथ बनाया पानी दुनिया भयि दिवानि भै दुनिया भै दिवानी. पण हे समजायला साहना ताई तुम्हाला जत्रा बघावि लागेल, असो लेख न वाचता प्रतिक्रिया देतोय. कारण आम्हि लय जत्रा बघीतल्यात.

मध्ये एका फेसबुकपोस्ट वर वाचलं होतं कि ह्या भारतात फक्त तिघांच्याच मरणाची दाखल घेतली जाते. एक तर दलित, मुस्लिम किंवा जनावरे... हिंदूंच्या मरण्याची दखल कोणीच घेत नाही. दलित हिंदू नाहीत का ?

माझ्या धर्माने कधीही धर्मप्रसारासाठी कोणावर आक्रमण वा अत्याचार केल्याचे ऐकिवात नाही. कोणी ह्याच्यामागची कितीही कारणे द्यावीत तरी होय माझा धर्म सर्वात सहिष्णू आहे. मग माझ्या ह्या धर्मावर कोणी कसलीही माहिती नसताना किंवा अगदीच जुजबी माहिती असताना टीका केल्यावर माझं रक्त पेटतं...
अगदी अगदी. माझा धर्म सर्वात सहिष्णू धर्म असताना त्यावर टीका करतात म्हणजे काय. एकदा आपले रक्त पेटले की बघून घेतले पाहिजे अशांना.

In reply to by सतिश गावडे

मी एका नाटकात लिहून गेलो की स्थितप्रज्ञ हा गाढवासारखा असतो. त्यावर चिडलेल्या स्थितप्रज्ञांच्या किती धमक्या याव्यात? हे आठवलं.

In reply to by सतिश गावडे

सतीशजी... धर्म सहिष्णू असणे आणि माझ्यासारख्या माणसाचे रक्त पेटणे ह्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. (अर्थात आपण ही पोस्ट जेन्युइनली वाचलीत असे गृहीत धरून मी प्रतिसाद देत आहे)... रक्त पेटले कि दरवेळेस जाळपोळ, दंगल व्हायलाच हवी का? शांत माणसाचे रक्त पेटू शकत नाही? काय राव...

In reply to by सतिश गावडे

अतिपूर्वेकडील इंडोचायना भागातल्या देशांना चोल,पांड्य वगैरे राजे मंडळीने नुसती पत्रे लिहूनच हिंदू केले असेल का हो सगा सर ? ;) अंगोकरवाट मधील मंदिर निव्वळ सद्भावनेतून बांधले होते अन ते बांधताना मजुरांना त्याकाळची मिनिमम व्हेज लॉ नुसार पगार अन हेल्थकेर सुद्धा मिळत असे म्हणे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आर्य - अनार्य , आर्य - द्रविड , शैव - वैष्णव हेही सगळे अगदी न भांडता गुण्यागोविंदाने रहायचे म्हणे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हिंदू करायचे म्हणजे काय करायचे? ह्या राजांनी कुणालाही हिंदू केले नाही. वास्तविक इतर धर्मियांना ह्या व्यवस्थेत यायचा अधिकारच नव्हता. आज तिकडे जे हिंदू दिसताहेत ते मूळचे ह्या राजांसोबत तिकडे गेलेल्या आणि तिकडचेच होऊन राहिलेल्या मूळच्या एतद्देशीयांचे वंशज. बाकी मंदिरे बांधायचे काम कधीच गुलामांकडून केले जात नसे.त्यासाठी स्पेशालिस्ट कारागीर असत. अगदी बौद्ध लेणी, हिंदू मंदिरे ह्यांच्या शिलालेखातून / ताम्रपटातून पाथरवट, सुतार, लोहार अशा व्यावसायिकांचा उल्लेख आलेला आहे. आणि हे कसलेले कारागीर असल्याने ह्यांना नेहमीच नाणी किंवा धान्य/वस्तू अशा स्वरूपात चांगला मोबदला मिळत असे. पाठीवर चाबकाचे कोरडे मारून ह्यांच्याकडनं बांधणी करून घेतल्याचे उल्लेख निदान मी तरी कुठे पाहिलेले/ वाचलेले नाहीत. तुम्हास माहीत असल्यास अवश्य सांगावेत.

In reply to by प्रचेतस

तिथे बौद्ध ९२ % , मुस्लिम व ख्रिस्चन ५ % व इतर ३% .... तुम्ही हिंदूत फक्त हे ३ % पकडलेत की बौद्धही हिंदूतच जमा धरलेत ?

In reply to by प्रचेतस

हे बेट आज इंडोनेशिया आणि मलेशिया यांच्यात विभागलेलं आहे. ब्रुनेई देशही मला वाटतं याच बेटावर येतो. या लेखात Hindu Javanese Invaders असा उल्लेख वाचला. हे कोण असावेत?

In reply to by बोका-ए-आझम

Hindu Javanese Invaders बद्दल काही माहिती नाही. लेख नेमका कशा संदर्भात आहे? बाकी ब्रुनेई नाव बघून तिथल्या सुलतानाची आठवण झाली. ब्रुनेईचा सुलतान कायमच जगातल्या अतिश्रीमंतांच्या यादीत असतो.

In reply to by प्रचेतस

या बेटावर अठरापगड प्रकारचे लोक येऊन राहिलेले आहेत. Pagan जाति-जमाती, मुस्लिम, अरबांचे वंशज, आफ्रिकन अमेरिकनांचे वंशज वगैरे. बेटाच्या इतिहासाबद्दल बोलताना बाकीच्या लोकांना traders या प्रकारात टाकलंय आणि Hindu Javanese invaders असा उल्लेख आहे. म्हणजे हाच एक group जो वर्चस्व प्रस्थापित करायला आला. बाकी सगळे व्यापारासाठी आले असा अर्थ निघतोय.

In reply to by बोका-ए-आझम

Hindu Javanese invaders हाहाहा ! हा वाकप्रचार "प्रचलित व्यवस्थेत प्रबळ असणारे आपला भलेपणा, नीतिमत्ता व वरचढपणा दाखविण्यासाठी" नेहमी वापरतात. :) ;) भारतातून हिंदू लोक दक्षिणपूर्व आशियात इसवीसनपूर्वकालात पोचले होते. केवळ आताच्या मलेशिया, इंडोनेशिया नव्हे तर मध्य व दक्षिण व्हिएतनाममध्ये त्यांची राज्ये व साम्राज्ये होती. सद्या उपलब्ध असलेल्या संस्कृत व स्थानिक भाषेतील ग्रंथांत त्यांच्या राजधान्यांची व राजवंशातील लोकांची व सरदारांची नावे संस्कृतमध्ये आहेत. या राज्ये-साम्राज्यांचे बरेच मोठे अवशेष त्या सर्व भागांत विखुरलेले आहेत. कंबोडियातले अंगकोर वट हे जगप्रसिद्ध झाले, पण त्या भागात १०० मोठी देवळे आहेत. त्यातली दहा-बारा मंदिरे आजच्या कालातही प्रचंड म्हणावी अश्या आकाराची आहेत. दक्षिणपूर्व आशियातील देशांतील इतर ठिकाणांच्या अवशेषांचा इतिहास व पर्यटनाच्या दृष्टीने जिर्णोद्धार केला जात आहे. १३ व्या शतकात भारत व श्रीलंकेतून बौद्ध धर्म तेथे पसरू लागला. अनेक साम्राज्ये हिंदू --> बौद्ध --> हिंदू --> बौद्ध अश्या स्थित्यंतरांतून गेली आहेत. त्यामुळे एकाच देवळात बुद्ध आणि हिंदू देवता बाजूबाजूला नांदताना दिसतात. अंगकोर वट हे जगातले सर्वात मोठे हिंदू मंदीर (किंबहुना जगातले सर्वात मोठे धार्मिक संकुल) कंबोडियात आहे आणि जगातला सर्वात मोठा बौद्ध स्तूप इंडोनेशियाच्या जावा बेटावरील बोरोबुदुर येथे आहे. बोरोबुदुरजवळ मोठे मंदीर्समुहही आहेत. अरबी व्यापार्‍यांनी तेथे इस्लाम नेला. चौदाव्या शतकात मलाक्काच्या (आताच्या मलेशियातले एक राज्य) परमेश्वर नावाच्या राजाने इस्लामचा स्विकार केला व आजूबाजूला त्याचा प्रसार केला. मलेशियानंतर काही कालाने इंडिनेशियाच्या हिंदू/बौद्ध महापहित साम्राज्यातल्या एका सम्राटाने मुस्लीम धर्माचा स्विकार केला व तेथे इस्लामी सत्ता स्थापन झाली. त्या सम्राटाच्या एका भावाला धर्मांतर मान्य नव्हते. त्यामुळे तो बाली बेटावर स्थलांतरीत झाला. बालीतील ९२ टक्के लोक अजूनही हिंदू धर्मिय आहेत. काही शतके इस्लामी झाल्यावरही मलेशिया व इंडोनेशियामध्ये लेखन-नाट्य-कलांमध्ये आणि रुढी-परंपरांमध्ये रामायण व महभारताचा ठसा अजूनही दिसतो. थोडक्यात, मुस्लिम हा त्या भागात सर्वात शेवटी पोहोचलेल्या धर्माने इतर धर्मांशी जुळवून न घेता, नेहमीप्रमाणेच त्याच्या ताब्यात असलेल्या भूभागातील बहुतेक सर्वांना आपला धर्म स्विकारणे भाग पाडले आहे. मुख्य म्हणजे भारतियांना बहुदा अपरिचित असलेला हा इतिहास स्थानिक गाईड्स अभिमानाने सांगतान दिसले ! त्या प्रदेशांतली डोळ्यांनी पाहिलेली सचित्र माहिती खालील दुव्यांत सापडेल : http://www.misalpav.com/node/27096 http://www.misalpav.com/node/26163 http://www.misalpav.com/node/28079

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गोंधळ दूर केल्याबद्दल. पु.लं.नी पूर्वरंग मध्ये इंडोनेशियामधील इस्लामबद्दल बोलताना ' या नव्या धर्माचा स्वीकार काही नवीन तंत्रविद्याविषयक ज्ञान मिळेल या कारणामुळे केला गेला असावा ' असं म्हटलंय. त्याबद्दल काय मत आहे?

In reply to by बोका-ए-आझम

दक्षिणपूर्व आशियामधिल इस्लामचा प्रसार इंडोनेशियाचा राजा एका अरब व्यापार्‍याच्या मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करायला तिने घातलेल्या अटीमुळे मुस्लिम झाला असे म्हणतात. पण, मुख्य हेतू बहुदा, त्याकाळी सामुद्रिक व्यापारात प्रबळ झालेल्या अरब मुस्लिम व्यापार्‍यांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करून आपले व्यापारात महत्व निर्माण करून धनाढ्य होणे व त्यामुळे आपली सत्ता बळकट करणे हाच असावा. याचे मुख्य कारण असे. मलेशियन भूभागवर असलेल्या राजांची व जावा सम्राटांची सत्ता मलाक्का सामुद्रधुनीपासून पुढे चीनपर्यंत जाणार्‍या चिंचोळ्या व्यापारी समुद्रमार्गांवर अधिपत्य राखण्यावर अवलंबून होती. १८०० सालापर्यंत "भारत आणि त्याच्या पश्चिमेकडील देश" व "चीन आणि दक्षिणपूर्व आशिया" यांच्यातल्या समुद्री व्यापाराचा जागतिक व्यापारातला हिस्सा जवळ जवळ निम्मा ते २/३ इतका मोठा होता. त्या मानाने खुश्किच्या मार्गाने (उदा. भूमीवरून जाणारे रेशीममार्ग) जास्त खडतर, जास्त धोक्याचे व जास्त वेळकाढू होते. व्यापाराबरोबर धर्मही प्रवास करत गेले. कदाचित, हिंदू व बौद्ध हे धर्मही सुरुवातीला व्यापारी कारणांनीच पसरले असतील व नंतर त्यांचा मागोवा घेत राजकीय सत्ता स्थापन केल्या गेल्या असतील. पाश्चिमात्या देशांच्या वसाहतवादाचा आशियातला प्रसारही हेच समुद्री व्यापारी मार्ग वापरून झाला. पाश्चिमात्य लोकही प्रथम केवळ व्यापाराचे उद्दिष्ट्य समोर ठेवूनच आशियात आले होते. नंतर त्यांनी त्यांच्या सुधारलेल्या सामरिक शस्त्रास्त्रांचा आणि स्थानिक गलथानपणाचा व दुफळीचा फायदा घेवून साम्राज्ये स्थापन केली. व्हितनाम, कंबोडिया व जावा येथिल बर्‍याच दंतकथांमध्ये पश्चिमेकडून एक राजपुत्र आला आणि स्थानिक राजकन्येबरोबर प्रथम लढाई आणि मग विवाह करून त्याने आपले राज्ये स्थापन केले अश्या आशयाच्या दंतकथा आहेत. आताच्या ओरिसा-बंगाल्च्या भूभागावरू श्रीलंकेत गेलेल्या एका राजपुत्राने स्थानिक राजकन्येबरोबर विवाह करून राज्य स्थापन केल्यावर सिंहला वंश निर्माण झाला अशी कथा त्यांच्या राजवंशाच्या प्राचीन ग्रंथात आहे (http://www.misalpav.com/node/33791). मंत्र-तंत्र मंत्र-तंत्र हा भाग इस्लामला निषिद्ध आहे, किंबहुना अश्या गोष्टी करणार्‍यांना इस्लाममध्ये देहदंड आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या ओढीने इंडोनेशियात इस्लामचा स्वीकार होणे शक्य वाटत नाही. मात्र, हिंदू व बौद्ध राज्ये असताना तंत्राच प्रभाव येथे होता हे बोरोबुदुरचा स्तूप व संपूर्ण दक्षिणपूर्वेतली मोठी मंदीरे पाहिली तर त्यांत वापरलेल्या तंत्रीक व खगोलशास्त्रिय रचनांवरून सहज दिसते. तंत्ररचना आणि खगोलशात्रिय कल्पना वापरून बांधलेल्या मंदिरांची उत्तम उदाहरणे : १. अंगकोरमधिल नोम बाखेंग मंदिर : http://www.misalpav.com/node/27311.

नोम बाखेंग मंदिररचना (जालावरून साभार)

२. बोरोबुदुरचा स्तूप : https://en.wikipedia.org/wiki/Borobudur

 बोरोबुदुरच्या स्तूपाची रचना (जालावरून साभार)

 बोरोबुदुरच्या स्तूपाचे विहंगमावलोकन (जालावरून साभार)


In reply to by डॉ सुहास म्हात्रे

व्यापार व राज्य बळकट होणे या हेतूने राजाने स्वतःच इस्लामचा स्वीकार केला, तर त्यात इस्लामचा काय दोष? आणि समजा, राजा बोललाच असता की मी हिंदूच राहीन , माझ्या मुस्लिम बायकोलाही हिंदूच करा, तर हिंदु धर्म तसे करु शकणार होता काय?

In reply to by chitraa

व्यापार व राज्य बळकट होणे या हेतूने राजाने स्वतःच इस्लामचा स्वीकार केला, तर त्यात इस्लामचा काय दोष? असा दावा कोणीही केलेला नाही. प्रतिसादात एक साधे विधान (स्टेटमेंट) आहे आरोप (अ‍ॅलिगेशन) नाही, हे डोळे उघडून वाचल्यास कोणाही सर्वसामान्य बुद्धी असलेल्या माणसाला समजेल. इतर सर्वांना ते समजले आहे असेच दिसते. सगळीकडे केवळ कांगावा करायची सवय लागलेल्या कोणाच्या काकदृष्टीला काही इतर दिसले तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

थोडक्यात, मुस्लिम हा त्या भागात सर्वात शेवटी पोहोचलेल्या धर्माने इतर धर्मांशी जुळवून न घेता, नेहमीप्रमाणेच त्याच्या ताब्यात असलेल्या भूभागातील बहुतेक सर्वांना आपला धर्म स्विकारणे भाग पाडले आहे तुमच्या आधीच्या एका प्रतिसादात हे तुम्हीच लिहिले आहे... त्या सम्राटाने स्वतःच इस्लाम धर्म स्वीकारला .. जर तो हिंदूच राहिला असता व त्याची इच्छा जरी असती तरी हिंदू धर्माने त्याच्या बायकोला हिंदू केले नसते , त्याची संततीदेखील हिंदू मानली नसती. त्यापेक्षा तोच मुसलमान झाला आणि हा तिढाच संपला. म्हणजे जुळवून कुणी घेतले नाही ? हिंदू धर्माने की इस्लामने ?

In reply to by chitraa

त्याला त्या व्यापार्‍याच्या मुलीने लग्नासाठी धर्मांतराची अट घातली होती, अशी कथा आहे. फक्त, मूळ मुद्दा भरकटू नये म्हणून व विस्तारभयास्तव हा आणि इतर तडक संबंध नसलेले बरेच तपशील टाळले आहेत. चर्चेतला मूळ मुद्दा कोणत्याही धर्मावरच्या टीकेवर नसून धर्मांतर कसे होत गेले त्या प्रक्रियेबद्दल होता हे तुमच्या ध्यानात आले नाही, असे समजणे तुमच्या बुद्धीचा अपमान करणारे व खरे नसलेले विधान होईल. त्यामुळे ते मी करणार नाही. पण तरीही, तुमचे नेहमीचे पूर्वग्रहदूषीत लेखन पाहता तुमचे आताही जे तिरकस लेखन चालले आहे (जे नेहमीच चाललेले असते) त्याबद्दल फारसे आश्चर्य वाटले नाही, हे पण सत्य आहे. तुमच्या लेखनातून तुमच्या बुद्धीचे नेहमीच दर्शन होते (ही प्रशंसा उर्फ काँप्लिमेंट आहे). कारण, हेअर स्प्लिटींग करून मुळात नसलेला संदर्भ निर्माण करायलासुद्धा बुद्धी लागते. मात्र, तुम्ही असलेल्या बुद्धीचा सतत नकारात्मक उपयोग करत असता, जे तुमच्यासाठीच फार दुर्दैवाचे आहे. एका बुद्धिवान मिपाकराच्या चुकीच्या वागणूकीमुळे त्याच्याबद्दल वाटणार्‍या खरोखरच्या काळजीमुळेच हे सांगत आहे. कारण, अश्या वागण्याचा परिणाम केवळ बुद्धी फुकट जाण्यात होत नाही. इतर लोक तुमच्या वैचारिक कोलांट्याउड्या वाचून करमणूक करून घेतील किंवा काहीजण रागावून प्रतिसाद देतील आणि कालांतराने सर्वजण "क्षक्षक्ष माणुस आहे" असे म्हणून सोडून देतील. मात्र, सतत नकारात्मक विचार करण्यार्‍या तुमच्या सारख्याचे मन सतत चिंतित, अस्वस्थ आणि नाराज राहते. याचा दूरगामी मानसिक व शारिरीक परिणाम काय होतो हे 'मी वैद्यकीय व्यवसायीक आहे' असे कबूल केलेल्या तुमच्यासारख्या व्यक्तीला मी सांगायला हवेच असे नाही. बाकी, भारतिय लोकशाहीत लोकांना अविचाराने आपले स्वतःचे आयुष्य द्वेशपूर्ण व दु:खी करण्याचे एका सीमेपर्यंत स्वातंत्र्य आहेच. आयुष्य तुमचे, निर्णय तुमचा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आणि हो. आता तुम्ही विचारले आहे म्हणूनच... इस्लाम धर्म आक्रमक आहे व ताब्यात आलेल्या प्रदेशातील जनतेला साम-दाम-दंड-भेदाने मुस्लिम बनवावे ही त्याची धर्माज्ञा आहे, हे काही गुपीत नाही ! ही सर्वमान्य असलेली गोष्ट तुमच्यासारख्या त्या धर्माबद्दल खास ममत्व असलेल्याला सांगावे लागले तर मात्र तो तुमच्या बुद्धीचा अपमान होईल, त्यामुळे ते मी टाळत आहे. :) इस्लामचा इतिहास व आजच्या मध्यपूर्व व इतर ठिकाणच्या मुस्लिमबहुल देशांचा वरवर अभ्यास केला तरी हे सहज कळेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

होय काय ? कृन्वन्तु विश्वमार्यम ! हे कुणाच्या पुस्तकात लिहिलय ? आता प्रत्यक्ष्यात कुणी तसं करत नाही , हा एक वेगळा मुद्दा झाला. जमीन गादी आपली रहावी , आपल्या जातीधर्माची रहावी असे तर प्रत्येकालाच वाटते. अगदी मराठे / शीख / राजपूत / आर्य / द्रविड कोणत्याही ठिकाणी हे दिसतेच... पेश्वाईत तर देशस्थ - कोकणस्थ असाही सुप्त संघर्ष होता म्हणे ! मूसलमानानी त्यांचे चित्र रंगवायला कॅन्व्हास मोठा वापरला म्हणुन त्यांची ही इच्छा इतिहासात ठळकपणे दिसते , इतकेच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉक्टर... दगडावर डोके जेव्हढे आपटू आपलेच डोके फुटते.... दगड दगड आहे म्हणूया... तुम्ही कितीही म्हणालात कि कुराणमध्ये काफिरांना फक्त दोनच पर्याय आहे एक तर इस्लाम पत्करणे किंवा मृत्यू... हे मान्य करणार नाहीतच... त्याच्या दृष्टीने हिंदूंतच अडचण आहे... लेट देम डू जे काही करायचंय ते.... हैश्श्या...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

व्यापार्‍याच्या मुलीने अट घातली , ती त्याने मान्य केली , पण समजा , तिने अट नसती घातली , तरी तिला व तिच्या संततीला हिंदू धर्माने स्वीकारले असते का , माझा हा प्रश्न तुम्ही ऑप्शनला सोडुन भलतेच काही लिहित बसलात ! असो.

In reply to by chitraa

आता घरवापसी केली तरी बोम्ब मारत आहेत. आणि हिन्दु धर्माने स्वीकारले असते की पतिचा धर्म आणि जात बायको मुलाना मिळाले असते

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अंगकोर साम्राज्य त्याच्या सुरुवातीची अनेक शतके (९वे ते १३वे शतक) हिंदू साम्राज्य होते. नंतर तेथे बौद्धधर्माचा प्रचार झाला. अधिक माहिती इथे मिळेल.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

साम्राज्यविस्तार आणि धर्मप्रसार ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.. बर्याचदा इतिहास हा आपल्याला हवा तसा नसतो, तेंव्हा इतिहास आपल्याला हवा तसा बदलायचा प्रयत्न हा पुढच्या पिढयांसाठी घटक असतो... साम्राज्यविस्तार हा धर्मप्रसाराशिवाय होऊ शकतो हे हिंदूंनीच सांगितलं... असो आपणास हे पटणारंच नाही... आणि कोणाला काही पटावं म्हणून मी हे लिहिलेलं नाही... असो... श्री राम

आपल्या धर्मातील राजांनी आपापसातच मारामार्‍या करण्यात स्वतःला व जनतेला गुंतव्यून ठेवले. दुसर्‍या राष्ट्रात जाउन दुसर्‍या राजांशी संघर्ष करायला वेळच मिळाला नआही. यात सहिष्णुतेचा प्रश्न आलाच कुठे ?

In reply to by chitraa

काही तुरळक "रक्त पेटण्याची" भाषा करणारे सोडले तर हिंदू धर्म खरंच सहिष्णू आहे हे माझ्यासारखा "जन्महिंदू*" ही खात्रीने म्हणू शकतो. *परात्पर गुरुंनी माझ्यासारख्या लोकांसाठी काय शब्द शोधून काढला आहे राव. एकच नंबर.

मै कूच बोलू क्या? ;) हिंदू धर्माची बाजू वगैरे हा जो लेख लिहिलाय त्यामागची तळमळ समजू शकतो, पण हिंदू धर्मात टीकेचं स्वागत आहे त्यामुळे टीकाकारांना बोल लावणारे नेमक्या कोणत्या धर्माची बाजू घेऊन भांडतात हे कळत नाही. कि आपल्यावर टीका झाली की दुसरीकडे बोट दाखवायची गरज का उपटते तेही कळत नाही. हे म्हणजे अमेरिका भारतापेक्षा कैक पटीने सुधारलेली आहे म्हणून अमेरिकेवर कोणत्याही अमेरिकन नागरिकाने कसलीच टीका करू नये असे म्हणण्यासारखे आहे. असो, हेही नेहमीचेच झाले आहे म्हणा. हिंदू बद्दल कोणी काही बोलले कि त्यांना मस्तपैकी फैलावर घेणारे, 'मुस्लिमांना आधी सांगा' असा टाहो फोडणारे हिंदूंच्या नावावर मस्तवालपणा कारणाऱ्यांबद्दल मात्र गपचिप मूग कोंबून बसतात. विश्वहिंदुपरिषद, बजरंग दल, गौरक्षक आणि तत्सम संघटनांच्या कारवाया यांच्याबद्दल अगदी तस्सेच गप बसतात जसे सुडोसेकुलर विचारजंत मुस्लिम दहशतवाद व तत्सम गोष्टीवर गप बसतात. मस्तवाल हिंदू संघटनांबद्दल, आता विचारले पाहिजेत तेच प्रश्न जे अर्थहीन यांच्या धाग्यावर "मुस्लिम धर्मावर टीका न करणारांना" अनेकांनी, काहींनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन, विचारले आहेत, अपने गिरेबान में झान्क कर देखो, नुसते मुळमुळीत निषेध आणि नपुंसक विरोध करणे सोपेच असते, नैका? आता माझा एक प्रश्न, मथुरेत नास्तीक मेळाव्यावर हिंदू मस्तवालानी आक्रमण करून तोडफोड केली, गौरक्षकांनी उच्छाद मांडलाय, हिंदू समाजाचे अनावश्यक ध्रुवीकरणाचे प्रयत्न त्याबद्दल मी एक हिंदू म्हणून बोलावे कि नको?