✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपाराज्य, ठाणे येथे गांधी जयंतीनिमित्त बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या मंत्रिमंडळ सभासदांचा वृत्तांत लिहिणेबाबत.

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
Mon, 10/03/2016 - 21:04  ·  लेख
लेख
मिपा शासन आहार, आरोग्य आणि मनोरंजन विभाग ठाणे उपविभाग ठाणे बैठक ठिकाण - हॉटेल अँब्रोसिया, ओवळे गाव, घोडबंदर रोड ठाणे दि . ०२ ऑक्टोबर २०१६ वेळ सायंकाळी ७ वाजता वाचा :- दि . ३०/०९/२०१६ रोजीची आमंत्रणपत्रिका http://www.misalpav.com/node/37535 प्रस्तावना :- सन २०१६-१७ या वर्षांमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या मिपाचे आहार तसेच उद्योगमंत्री श्री प्रभाकरराव पेठकर यांच्या झंझावाती ठाणे दौऱ्याच्या निमित्ताने दि २ ऑक्टोबर २०१६ रोजी म्हणजेच गांधी जयंतीनिमित्त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. याआधी जाहीर झालेल्या परंतु पार न पडू शकलेल्या "पुणे" येथील बैठकीची पुनरावृत्ती होऊ नये याची पुरेपूर काळजी स्थानिक आयोजकांनी घेतली होती व त्या दृष्टीने खबरदारीचे उपाय घेण्यात आले होते . कोणतीही बैठक यशस्वी होण्यासाठी तेथील व्यवस्थेचा सतत आढावा घेणे गरजेचे असल्यामुळे योग्य त्या सूचना सर्व सभासदांस देण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीत मिपा शासनाच्या बैठका अतिशय कमी होत असल्यामुळे सदरची बैठक यशस्वीरीत्या पार पाडणे गरजेचे होते. त्यानुसार श्री प्रभाकरराव पेठकर यांच्या सूचनेनुसार बैठकीचे ठिकाण ठरवण्यात आले होते. बरेच सभासद आणि इतर मंत्रिमंडळ ऐनवेळी ठरलेल्या ह्या दौऱ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. तरीही मिपाचे आरोग्यमंत्री श्री. सुबोध खरे, पणनमंत्री श्री मुक्त विहारी, वनमंत्री श्री सर्वसाक्षी, उच्चशिक्षणमंत्री श्री शॅम्पेन आणि मनोरंजन मंत्री श्री टकेश, अवजड उद्योगमंत्री श्री विनोदराव तसेच खाली सही करणार यांनी जातीने उपस्थिती लावली होती. काही नवीन सभासद जसे की श्री धर्मराज मुटके, वरून मोहिते, श्री हेमंत वाघे,श्रीमान योगी आणि टुकुल देखील या बैठकीस उपस्थित होते. गांधी जयंतीनिमित्त दुष्काळी दिवस असल्यामुळे काही नाराजीचे सूर उमटत होते परंतु शासनाच्या धोरणानुसार गांधीजींचा योग्य तो आदर राखला पाहिजे ह्यावर सदस्यांचे एकमत झाले. ऐनवेळी जगाचे मध्यवर्ती ठिकाण "० मैल डोंबोली" येथून बैठकीच्या ठिकाणी पोचण्यासाठी लाल दिव्याच्या गाडीची व्यवस्था न झाल्यामुळे आणि भारतीय रेल्वेमधून सामान्य जनतेबरोबर प्रवास केल्यामुळे स्वतःच लालेलाल झालेले पणन मंत्री तसेच अवजड उद्योग मंत्री ठाणे स्थानक येथे उशिरा पोचल्याने त्यांना घेऊन तसेच मध्ये उच्च शिक्षण मंत्र्यांना घेणे ठरल्यामुळे स्वतः संयोजकांना सभेच्या ठिकाणी पोचण्यास उशीर झाला. तरीही श्री प्रभाकरराव पेठकर यांनी श्रीमान योगी यांच्या साथीने बैठकीचे ठिकाण गाठले आणि धोरणात्मक चर्चा करण्यास सुरूवात केली. दरम्यानच्या काळात इतर सभासद आपापल्या वाहनातून ठरलेल्या ठिकाणी येऊन पोचले. साधारण एक दीड तास उलटूनही संयोजक तसेच उर्वरित सभासद न पोचल्यामुळे सभा आणि चर्चा तशीच पुढे चालू राहिली. अखेरीस ८. ३० च्या सुमारास संपूर्ण कोरम पूर्ण झाल्यामुळे मुख्य सभेला सुरुवात झाली. सुरुवातीला सभेचा ताबा आरोग्यमंत्री श्री सुबोध खरे यांचेकडे होता आणि त्या अनुषंगाने सर्व सदस्यांनी सध्याच्या आरोग्यविषयक सोयीसुविधांचा साधक बाधक आढावा घेतला. खानपान सेवा लगेच सुरु झाल्यामुळे थम्स अप आणि स्वीट लाईम सोडा यांचा आग्रह होत होता. एक व्हेज आणि एक नॉन व्हेज प्लॅटर यांचीही मागणी नोंदवली गेली. जसजसे पदार्थ येत होते तसे बैठकीलाही रंग चढत होता. पणन मंत्र्यांनी शेतीविषयक आणि जमीनविषयक माहिती, तदनुषंगाने बोकाळलेला भ्रष्टाचार याविषयी सविस्तर माहिती दिली. नवीन सभासदांना सभेची कार्यपद्धती समजावून देण्याच्या उद्देशाने एकमेकांची ओळख करून देण्यात आली व गप्पांना रंग चढला. बैठकीचे टेबल आयताकृती असल्यामुळे काही काळ सभासदांचे थोडे गट पडले आणि तिहेरी चर्चाही सुरु होत्या. दरम्यानचे काळात पनीर लाहोरी , चिकन रारा मसाला, नान आणि ग्रीन सलाड यांची फर्माईश पेश झाली. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता घेता स्वयंचित चारचाकी वाहने आणि त्या अनुषंगाने विविध मॉडेल्सची चर्चा झाली. सभेच्या उत्तररंगात श्री धर्मराज मुटके यांनी प्रत्येकासाठी पहिलीच भेट म्हणून आणलेले पेढे सर्व मंत्रिमंडळाला आश्चर्याचा धक्का देऊन गेले. घड्याळाचे काटे पाहून सभा आवरती घेणे भाग पडले. टी टी एम एम तत्वानुसार आपापले बिल सर्व सभासदांनी मनोरंजन मंत्री श्री टकेश यांचेकडे जमा केले . त्यानंतर सगळ्या मिपा मंत्रिमंडळाचे समूह छायाचित्र घेण्यात आले आणि एकमेकांचा सुमारे अर्धा तास निरोप घेऊन सगळे मंत्री आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले. मिपा शासन निर्णय : १) सदरच्या बैठका ह्या नियमित तत्वावर आणि जास्तीत जास्त सभासदांबरोबर पार पाडल्या जाव्यात असा निर्णय एकमताने घेण्यात आला. २) बैठकीसाठी अहोरात्र काम करणाऱया स्थानिक कार्यकर्त्यांच्या श्रमपरिहारार्थ एक विशेष बैठक ठेवली जावी असा प्रस्ताव मांडला गेला आणि मंजूर झाला. ३) उपरोक्त लेखावशर्षाखाली मंजूर करण्यात आलेली बैठक लवकरात लवकर आयोजित करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ शासनास सादर करावा. ४) सदर बैठकीची जळजळयुक्त छायाचित्रे मनोरंजन मंत्री यांनी प्रकाशित करावीत. ५) हे ज्ञापन मिपा ठाणे विभागाचा अनौपचारिक संदर्भ तसेच त्यामधील तरतुदी अन्वये कायदा विभागाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे. 5. सदर शासन निर्णय मिपा शासनाच्या www.misalpav.com या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा क्रमांक ठरवण्यात आलेला आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. - मिपाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने. माम्लेदारचा पंखा उप सचिव , कायदा विभाग प्रति, १) महामिपामालक, मिपाराज्य . २) नियमित बैठक कट्टा समन्वय समिती , पुणे (१२ प्रती) ३) मा. कार्यासन अधिकारी ४) आहार व उद्योग मंत्री कार्यालय ५) निवडक "नस्ती उठाठेव मंडळ"
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
विनोद
समाज
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
बातमी
मत
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
33486 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

झकास वृत्तांत!

अजया
Wed, 10/05/2016 - 18:48 नवीन
झकास वृत्तांत! फोटो नाही त्यामुळे सगळीच मनकी बातें की कांय!
  • Log in or register to post comments

बिल दिल्यावर सेवकवर्गाला टीप

सुबोध खरे
Wed, 10/05/2016 - 18:56 नवीन
बिल दिल्यावर सेवकवर्गाला टीप दिली गेली नाही हे लक्षात येऊन मापं यांना वाईट वाटले सेवक वर्गाची काळजी घेतली गेली आहे. २५० रुपये टीप बिलात वाढ करून त्याप्रमाणे सर्वाकडून त्याचे पैसे घेतले गेले हि नोंद व्हावी( हिशेब मीच केला होता).
  • Log in or register to post comments

बिल दिल्यावर सेवकवर्गाला टीप दिली गेली नाही

धर्मराजमुटके
Wed, 10/05/2016 - 19:00 नवीन
मात्र पेठकर काकांनी आपल्या व्यवसायबंधूंची अगोदरच काळजी घेतली होती हे सांगीतल्यावर माझा त्यांच्याबद्दलचा आदर वाढला.
हे लिहिलयं की ! काका म्हटले होते ना की मी हॉटेलवाला आहे म्हणून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एक कटींगवाला दुसर्‍या

अभ्या..
Wed, 10/05/2016 - 19:17 नवीन
एक कटींगवाला दुसर्‍या कटिंगवाल्याचे कटिंगचे पैसे घेत नाही म्हणे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

बरोबर आहे....पण ते एकटं असताना.....

माम्लेदारचा पन्खा
Wed, 10/05/2016 - 20:41 नवीन
इथे फौज होती.....धुपला असता तो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मी ठाण्याची स्पेशालिटी असलेले

सुबोध खरे
Wed, 10/05/2016 - 20:23 नवीन
मी ठाण्याची स्पेशालिटी असलेले "प्रशांत कॉर्नर" चे पेढे आणले होते पण ते असे रविवारच्या रात्री, अवेळी देऊ की नको याबाबत मनात संभ्रम उत्पन्न झाला होता. आम्ही पेढे कोणत्याही वेळेस कितीही खाऊ शकतो तेंव्हा "असा" किंतु मनात आणू नये. काजू लावलेल्या खमंग पेढ्याचा दर्जा "अत्युत्तम" होता त्यामुळे ते लगेच संपले सुद्धा. मुटके साहेबाना खास धन्यवाद बाकी "धर्मराज मुटके" असे भारदस्त असलेली व्यक्ती भारदस्त असेल असे वाटले होते पण ते तर एकदम तरुण आणि आमच्यासारखे बारीकच निघाले. हे म्हणजे एकदा मी कोल्हापूरला एका सरदार घराण्यात गेलो असता "रणजित राव" हाक मारल्यावर एक चार पाच वर्षाचे चिरंजीव बाहेर आले असे झाले.
  • Log in or register to post comments

श्री मुटके यांचा खास

खटपट्या
गुरुवार, 10/06/2016 - 00:01 नवीन
श्री मुटके यांचा खास व्रुत्तांत आवडला.
  • Log in or register to post comments

जियो

मी-सौरभ
गुरुवार, 10/06/2016 - 20:23 नवीन
मस्त वृत्तांत आणि मुटकेंची पुरवणि पण अप्रतिम. जाता जाता, टुकूल राव लै जुने सदस्य (क्र. १४२६) आहेत. फक्त मधे अज्ञातवासात होते आणि आता त्यांची घरवापसी झाली असावि असा अंदाज आहे .
  • Log in or register to post comments

हा हा.. मिपा सोडुन

टुकुल
Fri, 10/07/2016 - 12:55 नवीन
हा हा.. मिपा सोडुन अज्ञातवासात जास्त दिवस राहण जमलच नाही, वाचनमात्र होतो. हा कट्टा घराच्या एवढा जवळ होता आणी ड्राय डे असल्यामुळे होम मिनिस्टर नी पण परवानगी दिली, म्हणुन जमुन आले. --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

सौरभने

नाखु
Fri, 10/07/2016 - 13:04 नवीन
प्रतिसादात रिलायनस्ची जाहीरात केली असा आळ येऊ शकतो याची नोंद घ्यावी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

अरे पण अजुन्पर्यंत एकही फोटो

प्रीत-मोहर
Fri, 10/07/2016 - 14:12 नवीन
अरे पण अजुन्पर्यंत एकही फोटो नाहीये. टका फोटो कुठेत?
  • Log in or register to post comments

कट्टा झाला नसावा

पैसा
Fri, 10/07/2016 - 15:17 नवीन
कट्टा झाला नसावा अशी शंका घेण्यास जागा आहे. माणणीय अरविंद केजरीवाल यांचा आदर्श ठेवून सर्जिकल ऑपरेशनचा पुरावा प्रस्तुत करावा अशी मागणी मिपा आर्टीआय अ‍ॅ़क्टाअंतर्गत करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

मागील रविवार झालेल्या कट्याची

माझीही शॅम्पेन
Sat, 10/08/2016 - 13:12 नवीन
मागील रविवार झालेल्या कट्याची क्षणचित्रे Image removed.पुन्हा एकदा हे सिध्द झाले की ठाणेकरच यशस्वी कट्टे आयोजित करू शकतात :)
  • Log in or register to post comments

अर्र साइझ चुकली

माझीही शॅम्पेन
Sat, 10/08/2016 - 13:15 नवीन
अर्र साइझ चुकली Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

(No subject)

माझीही शॅम्पेन
Sat, 10/08/2016 - 13:17 नवीन
Image removed. परेड (डावी कडून) : 1) मामालेदार पंखा, 2) विनोद18, 3) माझीही शॅम्पेन (अस्मदिक), 4) टका, 5) सर्वसाक्षी, 6) टुकुल, 7) हेमंत वाघे, 8) डॉ सुबोध खरे, 9) पेठकर (सत्कार मूर्ती), 10) मुवि, 11) वरुन मोहिते, 12) योगी900, 13) धर्मराज मुटके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

उच्चशिक्षण मंत्र्यांनी लाज राखली......

माम्लेदारचा पन्खा
Sat, 10/08/2016 - 14:38 नवीन
मनोरंजन मंत्र्याला तातडीने बिनखात्याचा मंत्री करण्यात येत आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

न की ण?

प्रभाकर पेठकर
Tue, 10/11/2016 - 14:28 नवीन
11) वरुन मोहिते. वरून मोहिते की वरूण मोहिते? वरून मोहिते म्हंटले तर मनांत वात्रट प्रश्न येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

मस्तं फोटो आणि ओळख परेड.

पद्मावति
Sat, 10/08/2016 - 13:25 नवीन
मस्तं फोटो आणि ओळख परेड.
  • Log in or register to post comments

+१

नाखु
Sat, 10/08/2016 - 17:06 नवीन
फोटो छान आला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

+१

अजया
Tue, 10/11/2016 - 16:47 नवीन
नवीन मेंबरं पण दिसली ठाणे कट्ट्याला. असे शहाण्यासारखे ठरवुन पार पडलेले कट्टे याच साईडला होतात बहुतेक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

हो कारण हे पुणे नाही ना ;)

टवाळ कार्टा
Tue, 10/11/2016 - 18:33 नवीन
हो कारण हे पुणे नाही ना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मस्त

नंदन
Sun, 10/09/2016 - 02:19 नवीन
कट्ट्याचा वृत्तांत एक नंबर लिहिला आहे!
काही नवीन सभासद जसे की श्री धर्मराज मुटके, वरून मोहिते, श्री हेमंत वाघे,श्रीमान योगी आणि टुकुल देखील या बैठकीस उपस्थित होते
यात एक किंचित दुरुस्ती. वरून मोहिते हे ठाणे-कट्टा-व्हेटरन आहेत. अगदी गविंच्या वृत्तांताने गाजलेल्या पॉप-टेट्स कट्ट्यासहित!
  • Log in or register to post comments

नोंद घेतली गेली आहे.....

माम्लेदारचा पन्खा
Sun, 10/09/2016 - 07:50 नवीन
पुढील वेळी तेही क्याबिनेट मंत्री असतील !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

दणकट्टा!!

संदीप डांगे
Mon, 10/10/2016 - 02:24 नवीन
दणकट्टा!!
  • Log in or register to post comments

रंजक कट्टा.

प्रभाकर पेठकर
Tue, 10/11/2016 - 14:52 नवीन
ठाण्याच्या कट्ट्याला मज्जा आली. ड्राय डे नसता तर खुप मज्जा आली असती असं मला वाटतं. गप्पा मस्तं रंगल्या, हास्य विनोदाच्या फोडणीसह रंगल्या. डॉ. खरे ह्यांनी टिटवाळाच्या गणपतीची ख्याती आहे हे सप्रमाण सिद्ध केले. ज्ञानात एक नविन भर पडली. जमिनीच्या व्यवहारांबद्दल ही उद्बोधक चर्चा झाली. त्यामुळे आपणही जमीनीचा एक तुकडा घेण्याच्या विचारात आहोत हा अपराधी गंड मी सार्वजनिक न करता आपली झाकली मुठ झाकलीच ठेवली. योगी९०० ह्यांनी माझी जाण्यायेण्याची व्यवस्था चोख पार पाडली. त्यामुळे मुंग्यांच्या गर्दीत चालणार्‍या मुंगीसारखे वैफल्य आले नाही. तो भार योगी९०० ह्यांनी एखाद्या योग्याप्रमाणे शांत डोक्याने उचलला आणि मी निवांत प्रवास केला. धन्यवाद योगीसाहेब. पुन्हा पुढच्या महिन्यात भारतभेटीचा योग आहे. तेंव्हा पुन्हा गांधीजयंती (आडवी) येणार नाही ह्याची काळजी घेण्यात येईल.
  • Log in or register to post comments

हाहाहा !!!

वरुण मोहिते
Tue, 10/11/2016 - 15:51 नवीन
नावात दुरुस्ती करण्यात येईल पेठकर काका लवकर. बाकी कट्टा छानच झाला. सगळ्यांना भेटूनही मजा आली. पेठकर काकांनी गिफ्ट आणलेलं पण ड्राय डे असल्यानी नको असं सर्वांचं मत पडलं. वास्ताविक तिथेही घोडबंदर रोड ला बसून देतात बऱ्याच हॉटेलात ड्राय डे ला पण नेक्स्ट टाइम म्हणून आम्हीही गप्प राहिलो.नंतर गप्पा इतक्या रंगल्या कि कोणाला आठवलं नाही.असो असेच कट्टे होत राहोत मिपा चे .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा