Skip to main content

निरोप

लेखक परिधी यांनी गुरुवार, 06/10/2016 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
बसल्या बसल्या सहज डोळे भरून येतात तुझ्या माझ्या आठवणी पिंगा घालु लागतात तस सांगण्यासारख फारस काही नव्हतंच एकदा फ़क्त "तू बोल" एवढं तरी म्हणायच इंजेक्षनच्या आधी गार गार अल्कहॉलने पुसाव मग सुईने शांतपणे आरपार टोचत टोचत जाव चंद्राच्या शीतल सहवासात तशीच बेसावध चांदणी विरहाची अबोल वेदना हळूहळू होत जाते जीवघेणी खंत याची नाही की वेगळ्या झाल्या वाटा कधी न कधी हात हातातुन सुटनार च होता एकच टोचनी लागून राहिली आहे तरी मनाला डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला
लेखनविषय:

वाचने 1878
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला...

वा मस्त खुपच छान तिला ऐकवणार