एकः
कोंढवा बोपदेव सासवड मार्गावरील कानिफनाथ मंदिराच्या प्रांगणातील उपहारगृह.
"उपवासाचे काही आहे का?"
"बालाजीचे बटाटा वेफर्स आहेत"
"एक पाकीट द्या"
दोनः
पुणे गेस्ट हाऊसमधील रात्रीच्या जेवणाची वेळ. एक वयस्कर जोडपे एका टेबलावर बसलेले. फक्त आजोबा जेवत होते. आजी आजोबांशी बोलत असतानाच आजूबाजूचे निरिक्षण करत होत्या. ते वृद्ध जोडपं हिंदी भाषिक होतं. आजींची नजर भिरभिरत असताना व्हाईट बोर्डवर लिहिलेल्या मेनूवर स्थिरावली.
"बेटा इधर आ", आजींनी पोरसवदा वेटरला आवाज दिला.
ते पोरगं येऊन त्यांच्या टेबलाच्या बाजूला उभं राहिलं
"ये गुलाबजाम स्वीट हैं ना"
"हा"
"उपवास को चलता हैं क्या"
"हा चलता हैं"
वेटरचं बोलणं संपते तोच आजोबांनी त्या दोघांच्या संभाषणात व्यत्यय आणला.
"नही चलता. मत खा"
वेटर खांदा उडवत निघून गेला. आजी बिचार्या हिरमुसल्या होऊन आजोबांच्या चेहर्याकडे पाहत राहील्या.
वाचने
13444
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
असेच दोन परस्पर विरोधी प्रसंग आठवले .